Sunday, September 4, 2011

"लव जिहाद": एक भविष्यातील समस्या!


लव जिहाद हा भविष्यातील महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याची बीजे वर्तमानात रोवली जात आहेत. याबद्दल शक्यतो कोणी बोलत नाही. हा हिंसक दहशतवाद नसुन सांस्क्रुतीक दहशतवाद असतो. त्याची परिमाने हिंसक दहशतवादापेक्षा भयंकर असु शकतात. पण त्याचे गांभिर्य समजावुन घेतले पाहिजे. जिहाद हा शब्द येथे इस्लामी सांस्क्रुतीक दहशतवादापुरता मर्यादित नाही, हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.
मी साधारनपने एका वर्षापुर्वी एका उच्चवर्णीय आणि उच्चशिक्षित तरुणीच्या पित्याने हतबल होवुन दिलेली केस स्वीकारली होती. त्यात त्या तरुणीने हिंदु असण्याशी बंड करत एका मुस्लिम अल्पशिक्षित आणि गरीब मुलाशी नुसता विवाह केला असे नाही तर धर्मही बदललला. ही बाब तिने किमान दोन वर्ष आपल्या माता-पित्यापासुन लपवुन ठेवली आणि संधी मिळताच घर सोडले. यात वरकरणी काहीही वातनार नाही. प्रेमात सर्व माफ असते. आणि तो प्रत्येक जीवाचा आपल्याला प्रिय वाटना-या जोडीदाराशी विवाह करण्याचा हक्कच आहे आणि तो मानलाच पाहिजे.
पण या प्रेमामागील हेतुच गैर असतील तर?
मी सांगतो त्या केसमद्धे असेच झाले. त्या मुलीची ससेहोलपट झाली. मुलाची पार्श्वभुमी चांगली नव्हती हे तोवर सिद्ध झालेले होते. पुणे सोडुन तो मुलगा तिला हैद्राबादला घेवुन गेला. आम्ही पोलिस कमिशनरांना भेटलो. त्यांनी यात काहीही कायद्याने करु शकण्यात असहमती दर्शवली. मग मी माझ्या एका हिंदुत्ववादी मित्राला फोन केला. त्याने तर मला उडवुनच लावले. त्याचे म्हनने होते कि सोनवणी साहेब, ही प्रकरणे वाढत आहेत आणि त्यात काहीच होवु शकत नाही.
मला गेल्याच आठवड्यात त्याच मुलीबद्दल समजले कि तिचा आता तलाक झाला आहे आणि ती आता महिन्याभरच्या मुलाची आई आहे. तिला बाप घरात घेईना आणि एवढ्या लहान बाळाला घेवुन ती कोनती नोकरी करणार?
समजा ही एखादी दुर्दैवी घटना आहे तर त्याकडेही उभयपक्षी मुर्खपणाचा दोष देवुन स्वता:हुन दुर्दैव ऒढवुन घेतले याबाबत मौन पाळता येईल. परंतु या घटनेमुळे मी असे प्रकार का होतात कसे होतात आणि त्याची परिनती कशात होते याचा जो अल्प अभ्यास केला त्यावरुन दिसलेल्या काही बाबी अशा:
१. लव जिहाद हा भ्रम नव्हे तर वास्तव आहे.
२. या जिहादाची प्रेरणा सिमी ही आहे.
३. शाहरुखखान आणि गौरी हे आयडोल अत्यंत पद्धतशीरपने हिंदु मुलींमद्धे निर्माण केले जात आहे. (या दोघा बिचा-यांना हे माहितही नसेल.)
४. हिंदु-मुस्लिम द्वेष हे एका मानसिक प्रतिक्रियावादी बंडाचे कारण ठरत आहे. मुली स्वता:हुन त्या बंडात भाग घेत आहेत, पण अत्यंत उलट अर्थाने. एके काळी ब्राह्मण मुलींनी दलितांशी फार मोठ्या प्रमाणावर विवाह करण्याची सुरुवात केली होती. आता दलितांऐवजी मुस्लिम तरुणांना प्राधान्य दिले जात आहे.
६. त्याउलट दलित मुलींशी सवर्णांनी विवाह करणे वा मुस्लिम स्त्रीयांशी विवाह करणे हे प्रमाण नगण्य राहिलेले आहे.
७. अतीव प्रेमाने परस्परानुरुप होत कोणीही कोणाशी विवाह करणे अत्यंत स्वाभाविक आहे व त्याला सामाजिक समर्थन असायलाच हवे. परंत लव जिहाद मात्र जाणीवपुर्वक अन्य धर्मीय मुलींना आपल्या धर्मात प्रथम घेत, विवाह करत नंतर त्यांना सोडने या मुलभुत तत्वद्न्यानावर आधारीत आहे. जर प्रेम आहे, सहजीवन जगायचे तर मग धर्मांतर कशाला हवे? परंतु लव जिहादाची पहिली अट मुलीच्या धर्मांतराची आहे.
८. या धर्मांतरीत मुली वा-यावर सोडल्या गेल्या तर त्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याची, त्यांचे पुनर्वसन करण्याची सोय मुळात हिंदु धर्मात नाही आणि हे त्यांना चांगले माहित आहे.
याबाबत मी नक्कीच पुढेही विवेचन करेल. येथे मी फक्त महत्वाच्या मुद्द्यांकडे सर्वच समाजाचे लक्ष आकर्षित करु इच्छितो. प्रेम करणे-विवाह करने यातील नैसर्गिक आणि कायदेशीर स्वातंत्र्य मान्य आहेच आणि असलेच पाहिजे...मग वधु-वर कोणत्याही जातीधर्मातील असोत.
परंतु एक सांस्क्रुतीक दहशतवादाचे, एखाद्या समाजाला खिळखिळे करण्याच्या द्रुष्टीने जाणीवपुर्वक, प्रत्यक्ष शारीरिक हिंसा न करता, मानसिक हिंसा घडवण्याचे असे काही कारस्थान जर आहे तर त्याचा प्रबोधनानेच प्रतिकार केला पाहिजे. याबाबत एक पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे...मित्रांनी जर म्ला अधिक अनुभव (सत्य) पुरवले तर मी त्यांचा आभारी राहील.

2 comments:

  1. यासंदर्भात हिंदू जनजागृती समितीने अगोदरच पुस्तक प्रकाशित केले आहे. ते आपल्याला मिळू शकते.
    त्यासाठी www hindujagruti.org यावर संपर्क करू शकता !!

    ReplyDelete
  2. श्री. संजय सोनवणी साहेब,
    या अत्यंत दुर्लक्षित परंतु अतिशय संवेदनशील अशा विषयावर तुम्ही लेख लिहिल्याबद्दल तुमचे अभिनंदन.!!
    मुलींना अत्यंत नियोजनपूर्वक जाळ्यात अडकवून, त्यांच्याशी प्रेमाचे नाटक करून, त्यांना फशी पाडून आपला स्वार्थ साधणे हे मुस्लीम जिहादचे मवाळ स्वरूप आहे. हे स्वरूप कधीही नष्ट होउ शकत नाही. शिवाय त्यावर कोणतीही आणि कशीही बंदी घालता येत नाही / येणार नाही.
    त्यातून कोणत्याही सर्वमान्य मराठी वृत्तपत्रातून हा विषय कटाक्षाने टाळला जातो. (उदा. म. टा., लोकसत्ता, सकाळ, लोकमत,...इ.) आणि ईंग्रजी वृत्तपत्रांना तर हा विषय माहीतच नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरांमध्ये हा विषय म्हणजे, ज्येष्ठ / म्हाताऱ्या लोकांचा धर्माविषयी चाललेला कर्मठपणा आणि त्या अनुशंगिक येणारे तरुण मुलींवरचे निर्बंध (मित्रांची निवड, येण्याच्या वेळा, वेगळ्या पदार्थांच्या पाककृती ,.... इ. इ. ) या भोवतीच फिरत राहतो. त्याविषयी आवाज उठविणारी मंडळी म्हणजे हिंदुत्ववादी, सनातनी, डोळ्यांवर झापड बांधलेली अशी समजूत असते.
    "बाबा, काका, हे लोक जुनी कर्मठ नियतकालिके (तरूण भारत, सनातन, इ. इ. ) वाचतात आणि अश्याच लोकांमद्ये वावरतात म्हणून यांचे असे विचार होतात" हा विचारच मग तरुण मुली/ मुले यांच्यात बळावतो. परिणामी आपण वर्णन केल्याप्रमाणे अनेक घटना घडतात.
    पण आपल्या हिंदू धर्मात परत प्रवेश करण्याला काहीही प्रत्यावाय नसावा. कारण शिवाजी महाराजांनी देखील नेताजी पालकर यांना धर्मशुद्धी करून घेतले होते.!! www.hindujagruti.org या संकेत स्थळावर ही माहिती दिली आहे.
    धन्यवाद !!!

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...