Monday, September 5, 2011
लव जिहाद : भाग २
मी काल लव जिहादवर लिहिले. त्यात मी एका सत्य घटनेची माहिती देतांना माझ्याकडेच आलेल्या दुस-या केसची माहिती द्यायला विसरलो. केस आली होती इंग्लंडमधुन. मुलगी होती ख्रिस्ती. मुलगा मुस्लिम आणि होता पुण्यातील एका निम्न-मध्यमवर्गीय वस्तीतला. पण तो होता रेसकोर्सवरील जोकी...(Jockey). साधारणतया तीन वर्षांपुर्वी या तरुणीचा भारत (पुणे) भेटीदरम्यान या तरुणाशी संबंध आला. तिने धर्म बदलला आणि विवाह केला. तरुणी श्रीमंत होती. ती त्याला इंग्लंडला घेवुन गेली. त्यांना १ मुलही झाले. तदनंतर या तरुणाने इंग्लंड सोडले आणि परत येथे आला. तिच्याशी संपर्क थांबवला. तपासात आढळले कि त्या मुलाचे पहिले एक लग्न आधीच झालेले होते. त्याने पुन्हा इंग्लंडचा रस्ता पकडला नाही हे उघड आहे.
लव जिहाद हा फक्त हिंदु मुलींपुरता मर्यादित नाही तर ख्रिस्ती व अन्यधर्मीय मुलीही याला बळी पदत आहे याचे हे एक उदाहरण.
लव जिहाद खरोखर आस्तित्वात आहे काय असे प्रश्न पहिल्या लेखावर अनेक मित्रांनी विचारले आहेत. मी याबद्दल अधिक माहिती गोळा करत असता लक्षात आले कि केरळ, मंगलोर, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात यासंबंधात मोठ्या प्रमाणावर चलती आहे. २००९ मद्धे कर्नाटक सरकारने याबाबत जाहीर चौकशी करण्याचे आदेश सी.आय.डी. ला दिले होते. त्यामागे कोणती संस्था/संघटना आहे व त्याला धन कोठुन येते याचा तपास करण्याबाबत हा आदेश होता याचाच अर्थ असा कि ही प्रकरणे दखल घ्यावीत एवढी वाढली होती. केरळ उच्च न्यायालयानेही याची दखल घेवुन अशा प्रेमाच्या नावाखालील धर्मांतरे थांबवण्यासाठी कायद्याची आवश्यकता प्रतिपादन केली होती. गेल्या चार वर्षांत किमान ३०,००० हिंदु व ख्रिस्ती मुलींची अशी प्रेमळ (?) धर्मांतरे झाली आहेत. हा आकडा कमी जास्त असु शकतो, कारण अशी सर्वच धर्मांतरे रेकोर्डवर आलेली नाहीत. हिंदुत्ववादी व ख्रिस्ती धार्मिक संस्था/संघटना या विषयाचे राजकारण करण्यासाठी संख्या फुगवुन सांगत असणे स्वाभाविक आहे. परंतु मुळात काहीच नाही असे मात्र नक्कीच नाही.
या सर्व हिन्दु वा ख्रिस्ती आणि सरकारचाही संभ्रम आहे वा होता कि "लव जिहाद" नावाची संघटना तर नाही ना? पण तसे तपासात आढळुन आलेले नाही. "लव जिहाद" ही एक अत्यंत योजनाबद्ध रितीने निर्माण केलेली संद्न्या आहे.
का?
स्वधर्मियांची संख्या वाढवणे, संतती वाढवणे हा मुख्य हेतु या नव्या संकल्पनेत आहे. एके काळी इतरांना जबरदस्तीने धर्मांतरील केले जात होते. आधुनिक काळात ते शक्य नाही. याची जाण आल्याने तरुण मुलींनाच टार्गेट करुन त्यांनाच प्रेमाच्या जाळ्यात अदकावण्यासाठी आणि आपल्या धर्मात घेण्यासाठी या लव जिहादची निर्मिती झाली आहे असे दिसते.
दुसरी बाब अशी कि जरी इस्लाममद्धे ४ पत्न्या करण्याची धार्मिक अनुमती असली तरी प्रत्यक्षातील वास्तव वेगळे आहे. म्हनजे स्त्रीयांची दरहजारी पुरुषांमागील संख्या ही ९४५ (२००१ सेन्सस) एवढीच आहे. म्हणजे एका पुरुषाने ४ सोडा एक लग्न करता येईल अशी तुलनात्मक स्त्रीसंख्या नाही. दुसरे असे की मुस्लिम स्त्रीयांना धर्मात जो दुय्यम दर्जा आहे, बंधने आहेत, त्यामुळे त्यांचा शिक्षण दर अत्यल्प तर आहेच पण तोही मदरशांपर्यंत सीमित आहे. या वास्तवाचाही येथे विचार करणे भाग आहे.
लव जिहादमद्धे भाग घेनारे द्न्यात तरुण हे उच्चशिक्षित अल्पांश आहेत हेही वास्तव आहे. तेही बरचसे शिक्षण मदरसे वा फार फार तर माघ्यमिक शाळांत घेतलेले आहेत. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढता आलेल्या तरुणी काही अपवाद वगळता उच्चभ्रु (आर्थिक द्रुष्ट्या) कुटुंबातील नाहीत. या लव जिहादच्या तक्रारी सर्वाधिक मुस्लिम बहुल प्रांतांतुन आहेत. आणि सर्वच लोक तक्रारी दाखल करत नाहीत कारण कुटुंबाच्या बेइज्जतीची भावना आडवी येते हे एक वास्तव आहे.
हे वास्तव लक्षात घेता, यात अशा जिहादींना यश कसे मिळते हा सखोल संशोधनाचा विषय आहे. माझे मित्र राजेश राकेश यांनी याबाबत मुलभुत प्रश्न उभे केले आहेत आणि त्यावरही विचार करणे क्रमप्राप्त आहे.
१. मुस्लिम तरुण हे हिंदु तरुणांपेक्षा अधिक स्मार्ट आहेत काय कि ज्यायोगे उच्चवर्नीयही हिंदु मुली त्यांच्या सापळ्यात अडकाव्यात?: या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. भारतीय स्त्रीयांवर पुर्वांपार धर्माने शुद्रत्व लादले आहे. म्हनजे पुरुष उच्चवर्णीय असला तरी त्याच्याच जातीत जन्मलेली स्त्री ही धर्माने मुळात शुद्र मानलेली आहे. म्हणजे अन्य जातीयांचे सोडुन द्या, एकाच जातीत अशी विषम धार्मिक विभाजनी पुर्वांपार झालेली आहे. आधुनिक काळात द्न्यान-विद्न्यान-समाजाशी नाळ जुळलेल्या या वंचित स्त्रीयांनी आपली जीवनादर्षे बदलली आणि परंपरेला त्यांच्या पद्धतीने लाथ मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे समाजशास्त्रीय वास्तव नाकारण्यात अर्थ नाही.
दुसरे असे कि समाजमानसावर प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रभाव गाजवनारे माध्यम म्हनजे चित्रपटस्रुष्टी. या स्रुष्टीवर मुस्लिम कलावंत/गायक/गीतकारांनी/दिग्दर्शकांनी अबाधित राज्य केले आहे हेही एक वास्तव आहे. ते अयोग्य नव्हते, पण त्याचा झिरपत येनारा तरुणाईवरील परिणाम दुर्लक्षिता येत नाही. मुलांवर होणारा परिनाम आणि मुलींवर होणारा परिणाम यात मुलभुत फरक करावा लागतो. दोहोंचे प्रत्यक्ष जगाकडे पहायचे द्रुष्टीकोन आणि तत्वद्न्यान यात फरक असतो. हा फरक प्रामुख्याने भावनिकता/वास्तवता/परिस्थितीला प्रतिक्रिया देण्याची पद्धत आणि सुप्त मानसिक व शारिरीक अशा नैसर्गिक प्रेरणा यामुळे निर्माण होतो. याबाबत आपल्याकडे फारसा अभ्यास होत नाही. प्रबोधन तर खुप दुरची बाब राहीली.
लव जिहाद यशस्वी होतो तो यामुळे.
आणि ही बळी पडते का ती यात मुळात निवडीचा प्रश्नच नसल्याने, जीलाही आपल्या धर्मकक्षेत ओढता येईल ती, अशीच निवडपद्धती असली तर काय करणार?
याबद्दल मी अधिक नंतर लिहितो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी
ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
महार कोण होते? महार कोण होते? या प्रश्नाचे उत्तर देण्याआधी सर्वप्रथम महार समाज म्हनजे काय हे समजावुन घ्यायला पाहिजे. जे सध्या माहित आहे त...
लेखाचा विषय आणि मांडणी चांगली आहे. आणखी सखोल अभ्यास केल्यास या विषयाची खोली आपणास नक्कीच समजून येईल. त्याकरिता हिंदु जनजागृती समितीचा ‘लव्ह जिहाद’ हा ग्रंथ वाचावा. ‘लव्ह जिहाद’ हे एक षडयंत्र असून एक हिंदु स्त्री धर्मांतरीत झाली की, हिंदूंचे एक कुंटुंब वाढण्यास आळा बसतो. शिवाय दुसर्या बाजूने मुस्लिमांच्या संख्येत आणखी भर पडते(त्या स्त्रीपासून होणारी संतती इत्यादी) शिवाय या गोष्टीला कायद्याच्या आधाराने काही करता येत नाही. लग्न करून धर्मांतरीत केले की मुलं जन्माला घालायची आणि लाथाडायचे. मुल जन्माला घातलं की मुलीच्या घरचेही तिला स्वीकारत नाहीत, त्यामुळे तिच्या मजबुरीचा लाभ घेऊन परदेशात(किंवा भारतातही) देहविक्रय करण्यास तिला भाग पाडायचे. अशा धर्मांतरित मुलींचा वापर दहशतवादी कारवायांतही केला जात असल्याचे आता उघड झाले आहे.
ReplyDelete. भारतीय स्त्रीयांवर पुर्वांपार धर्माने शुद्रत्व लादले आहे. म्हनजे पुरुष उच्चवर्णीय असला तरी त्याच्याच जातीत जन्मलेली स्त्री ही धर्माने मुळात शुद्र मानलेली आहे.
हा आपला अपसमज असून याला कोणताही पुरावा नाही. हिंदु धर्माने स्त्रीला कधीच दास्यत्व दिलेले नाही. असे असते तर देवांसोबत देवींची पूजा, व्रतवैकल्ये कशी काय निर्माण झाली असती ? स्त्रीला मातेसमान मानण्यास धर्म शिकवतो. जातीवादाचा चष्मा काढून हिंदु धर्माकडे व्यापक दृष्टीकोनातून पाहिल्यास आपल्या ज्ञानात नक्कीच भर पडेल, यात शंका नाही.