रक्तात अडखळले रक्त
श्वासात अडकला श्वास
भासात जगते विश्व
तरी जगण्याचा अट्टाहास!
ती प्रशांत पोकळी ऐसी
रुद्ध रुदनाने भरलेली
हास्यात क्षण तो जागे
मसनात जळत्या वेळी!
कोप-यात हासतो सुर्य
कोनाड्यातील पणतीही
मेला जोही होता तो पण
कधी नव्हताच धरतीवरती!
जो जन्माला आला नाही
मरणार कसा तो सांगा?
जाळले कोणा मग तुम्ही,
ते प्रेत कोणते सांगा...
म्रुत्युत अडखळले जीवन
जीवनात अडखळे म्रुत्यु
हा झगडा अविरत ऐसा
कि जीवन म्हणजे म्रुत्यु...!
Subscribe to:
Post Comments (Atom)
लेखकांना राजकीय मते असू शकत नाहीत काय?
लेखकांनी राजकीय मत ठेवू नये, ठेवत असतील तर ते आम्हाला जे आवडते तेच त्यांचे मत असले पाहिजे हा दुराग्रह गेली पंधरा-सोळा वर्ष मी पाहतो आहे....
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
इतिहासात काही अनुत्तरीत प्रश्न असतात. काही प्रश्नांवर इतिहासाने अनेकदा मुद्दाम मौन बाळगलेले असते वा मुळात त्या मौनातच उत्तरे दडलेली असतात...
-
१९ जानेवारी १९९०. भारतीय इतिहासातील एक काळा दिवस. धर्मांधता कोणती निघृण पातळी गाठु शकतो हे दर्शवनारा दिवस. याच दिवशी काश्मीरमधील मशिदी-...
pls share this on fb
ReplyDelete