Thursday, December 15, 2011

वर्तमान व भवितव्य

(माझे "महार कोण होते?" हे संशोधनात्मक पुस्तक लवकरच प्रसिद्ध होत असुन त्यातील हे एक महत्वाचे प्रकरण.)

वर्तमान व भवितव्य

मागील प्रकरणांत आपण एकंदरीत वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था यांच्या इतिहासाचे अवलोकन करत असतांना महार समाजाचा इतिहास पाहिला आहे. हा एक पराकोटीचा पराक्रमी, चाणाक्ष आणि बुद्धीवंत समाज होता हे उघड आहे आणि ज्या गतीने बाबासाहेबांच्या अलौकीक नेत्रुत्वानंतर हा समाज वेगाने प्रगती करत आहे ती अचंबीत करणारी आहे. ही प्रगती फक्त आर्थिक नव्हे तर द्न्यान-विद्न्यानाच्या क्षेत्रातही होते आहे. आजची नवीन पिढी तर अधिक सक्षम होत असुन उद्या हेच देशाचे/जगाचे भवितव्य घडवु शकतील अशा विलक्षण टेक ओफच्या तयारीत आहेत.
परंतु हे मला पुरेसे वाटत नाही, हेही मी येथे आवर्जुन नमुद करु इच्छितो. या गतशतकात बाबासाहेबांमुळे पराकोटीची जाग्रुती झालेला, नव-आत्मभान आलेला हा समाज "शिका-संघटीत व्हा व संघर्ष करा" या हाकेला प्रतिसाद देत शिकला-शिकतो आहे. संघर्ष तर पाचवीला पुजल्यासारखाच आहे. परंतु संघटन हे मात्र अत्यंत विस्कळीत आहे. माझे तरुण मित्र आयु. वैभव छाया यांच्या महाराष्ट्र टाइम्समधील चार डिसेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या "नवा सुर्य कवेत घेतांना" या लेखात त्यांची याबाबतची भावना , द्रुष्टी आणि व्यथाही स्पष्टपणे ध्वनीत होते. बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्ष हा फक्त दलितांसाठी काढला नव्हता. हा पक्ष सर्वच पिडितांच्या सामाजिक व राजकीय जाणीवांचा उद्गार असेल असेच त्यांना वातले असावे. पण बाबासाहेब हे फक्त पुर्वास्प्रुश्यांचे ठरवुन भारतीय जात्यंध पुन्हा मोकळे झाल्यामुळे मात्र रिपब्लिकन हाही दलितांचाच पक्ष बनला आणि अन्य सत्तांधांच्या इशा-यांवर नाचत-डोलत ४०-४५ भागांत विभागला गेला. "संघटीत व्हा" ही बाबासाहेबांची हाक त्यांनी सोयिस्करपणे विस्मरणात ढकलली असे मला नाईलाजाने म्हणावे लागत आहे.
बाबासाहेबांनी अत्यंत विचारपुर्वक बौद्ध धर्म आपल्या सर्वच शोषित बांधवांसाठी निवडला. एका अर्थाने हे धर्मांतर नसुन काही हजार वर्ष जपलेल्या, स्वीकारलेल्या वा प्रभावाखाली असलेल्या धर्माकडे पुन्हा परतण्याचा प्रयत्न केला. तो काही प्रमानात यशस्वीही झाला. परंतु बौद्ध धर्माची मुलतत्वे, जी गौतम बुद्धाला व स्वत: बाबासाहेबांना अभिप्रेत होती त्या तत्वांना पायतळी तुदवण्याचे कार्य काही बाबासाहेबांचेच नांव घेणा-या जात्यंध संघटना करत असतात व एका परीने मनुस्म्रुतीचेच अप्रत्यक्ष अनुकरण करत असतात. संघटीत होणे हे अत्यावश्यक आहे हे खरे परंतु अशा व्यक्ती व संघटना त्यात अडथळे बनत आहेत.
ग्रामीण भागात अद्यापही लाखो बांधव सतत विषमतापुर्ण वागणुकच नव्हे तर अन्यायाच्या अविरत लाथा खात आहेत. खैरलांजी गाजले म्हणुन आपल्याला माहित आहे. पण असंख्य घटना नोंदल्याही जात नाहीत. त्यांना माध्यमे मुळात प्रसिद्धीही देत नाहीत. ओनर किलिंग्ज महाराष्ट्रातही होतात. पण माध्यमे त्याबाबत दुर्दैवाने मुक असतात. याबाबत संघटीत आवाज उठवला जात नाही. म्हनजेच बाबासाहेबांचे "संघटीत व्हा" हे विधान पायतळी तुडवले जाते आहे. गौतम बुद्धाने जी संघाची, म्हणजे संघटनेची, एकत्रीतपणाची, बंधुभावाची जी संकल्पना मांडली तीच पायतळी तुडवली जात नाही कि काय?
आज शिकलेला, वरिष्ठ पदावर गेलेला समाज बांधव हा आपल्याच समाजाशीची नाळ तोडत उच्चभ्रु समाजात मिसळण्याचा, त्याप्रमाणे वागण्याचा व त्यांची संस्क्रुती स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. हा एक मानवी स्वभाव आहे हे समजवुन घेतले तरी आपल्याहुन खाली असलेल्या, संघर्षरत असलेल्या बांधवाला हात देण्याचा प्रयत्न मात्र सहसा केला जात नाही.
गतशतकात विद्रोही चळवळीने अत्यंत महत्वाचे सांस्क्रुतीक कार्य केले. त्यातुन एक वेगळीच ज्वलंत अभिव्यक्ती सामोरी आली जी अखिल समाजाला हादरवणारी होती. विद्रोही साहित्य मात्र अपवाद सोडले तर आत्मचरित्रांतच अडकले. बाबुराव बागुल, उत्तम कांबळे यांनी या विद्रोहाला वेगळे आशय प्रदान केले असले तरी ते त्यांच्यापुरतेच मर्यादित का राहिले, यावरही विचारमंथन होण्याची गरज वाटते. वर्तमानात काव्याबाबत तर काही बोलण्याची सोय नाही. नामदेव ढसाळ व केशव मेश्रामांसारखे काही मोजके कवी खरेच आभाळावर रक्ताच्या शाईने वेदनांचे महाकाव्य लिहिणारे कवी. आज त्यांचीही वानवा आहे. विचारवंतांबद्दल बोलावे तर डा. रावसाहेब कसबे, यशवंत मनोहर यांचा सन्माननीय अपवाद वगळला तर अभ्यसपुर्ण सखोल चिंतनाने मंडित सखोल आणि प्रगल्भ वैचारिकतेचा वारसा पुढे नेण्याचे कार्य अभावानेच झालेले दिसते. बाबासाहेबांएवढी सैद्धांतीक, तात्विक आणि समाजशास्त्रीय मांडणीची अद्भुत उंची गाठता येणे शक्य नसले तरी त्या दिशेने कितपत प्रयत्न प्रामाणिकपणे झालेले आहेत, होत आहेत हा प्रश्न स्वत:लाच आपण विचारायला हवा. असे का व्हावे यावरही चिंतन करण्याची गरज आहे. चिकित्सेखेरीज कोणताही समाज व्यापक प्रगती करु शकत नाही. स्वसमाजियांनी व अन्यसमाजियांनी केलेल्या चिकित्सेकडे व्यापक परिप्रेक्षात पाहिले पाहिजे. चिकित्सेबाबत हळवे होणे वा तिचा भावनीक वा संतप्त अव्हेर करणे कोणत्याही समाजाला परवडणारे असु शकत नाही. अन्यथा बाबासाहेबांनी जो विचारस्वातंत्र्य आणि मानवी मुलभुत प्रेरणांना बुद्धीप्रामाण्यवादाला अंगिकारत अभिव्यक्त होण्याचा मार्ग दिला त्याचे काय असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
बाबासाहेबांनी २९ जुन १९२९ रोजी परळला दामोदर हालमद्धे भरलेल्या जाहीर सभेत म्हटले होते ते असे: ""आपण सर्व अस्प्रुश्यांनी सुसंघटीत झाले पाहिजे. मोठ्या दु:क्खाची गोष्ट ही की, आपल्यातील काही लोक "महार-महारेतर" असा वाद माजवितात! महार जरी महाडच्या चवदार तळ्याकरिता आपल्या प्रतिस्पर्ध्याशी झगडले आणि तो तलाव आपलासा करुन घेतला तरी त्या तळ्यातील पाणी चांभारांना आणि मांगांना देखील पिता आले पाहिजे. .....आम्ही अस्प्रुष्य तेवढा एक समजतो." (बहिष्क्रुत भारत-१५ नोव्हेंबर १९२९.)
मला वाटते बाबासाहेबांचा हा विचार आजही समजावुन घेण्याची गरज आहे. पोथीनिष्ठतेत कम्युनिस्ट आणि हिंदुत्ववादी अडकले आहेत तशाच सोयिस्कर पोथीनिष्ठतेत हा समाज अडकत तर चाललेला नाही ना यावरही वर्तमानातील युवा पिढ्यांकडुन अपेक्षा आहेत.
यापासुन सर्वच समाजाने सावध होत पुढचे मार्गक्रमण करायला हवे.
मला असे वाटते कि "निवडीचा संभ्रम" तर निर्माण झालेला नाहीय ना? ज्या हिंदुत्ववाद्यांना पराकोटीचा विरोध शोषित समाजातील विद्रोहींनी केला त्याच कंपुत त्यांचेच काही राजकीय नेते ते साहित्त्यिक मंडळीला सामील व्हावे लागणे याचा अर्थ काय होतो? यामागे व्यक्तिगत राजकीय स्वार्थ आहेत कि समाजाचे खरेखुरे कल्याण साधण्याची आस आहे? अलीकडे तरुण विचारवंत हा प्रश्न जाहीरपणे विचारु लागले आहेत. त्याला उत्तर देण्याची क्षमता या नेत्यांत आहे काय? बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्श्शाबाबत जी मुळ भुमिका मांडली तीच पायतळी तुडवण्याचा अर्थ काय होतो? आयु. वैभव छाया आपल्या एका लेखात या प्क्षबाबत बाबासाहेबांची भुमिका त्यांच्याच शब्दात मांडतात, ती अशी...

"अशा नव्या राजकिय पक्षाच्या उभारणीची रणनीती देखील आखली होती. यासंदर्भात १० डिसेंबर १९५५ रोजी जनता पाक्षिकात बाबासाहेबांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत मार्मिक होती. ते म्हणाले की,
“ माझा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया काढण्याचा विचार आहे. भारतीय राज्यघटना खर्‍याखुर्‍या अर्थाने राबविण्यासाठी हा पक्ष काढण्यात येणार असून पक्षाचे मुख्य ध्येय्य समानता, स्वातंत्र्य, बंधुभाव असे राहणार आहे. भारतातील सत्ताधारी काँग्रेसला विरोध करण्यासाठी सर्व लहानसहान पक्षांचे या नवीन पक्षांत एकत्रिकरण करण्यात येईल आणि अमेरिकन धर्तीवर हा पक्ष कार्य करीत राहील. भारतातील व्यापारी वर्गाने अमेरिकेतील व्यापारी वर्गाप्रमाणे सत्ताधारी व विरोधी पक्षांस सहकार्य केल्यास दोन्ही पक्ष मजबूत पायांवर काम करू शकतील व त्यामुळे लोकशाहीच्या निरोगी वाढीस मोठा हातभार लागू शकेल.
"लहानसहान पक्षांजवळचे मामूली निधी, कार्यकर्त्यांची वाण ह्या गोष्टी लक्षात घेता सध्याच्या राजकीय वातावरणात अशा पक्षांना बिल्कूल भविष्यकाळ नाही. सरकारने व देशभक्तांनी अमेरिकेप्रमाणेच काँग्रेस व रिपब्लिकन पक्षांच्या वाढिस प्रोत्साहन द्यावे. उदाहरणादखल घ्यायचे झाल्यास, गेल्या निवडणूकीत शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनला काही हजार रुपये ही खर्च करता आले नाही. या उलट काँग्रेस पक्षाने कास्ट फेडरेशनचा पराभव करण्यासाठी अमाप पैसा खर्च केला.”
आता ही राजकीय भुमिका रिपब्लिकनांनी कशी व का सोडली हे त्यांनाच समाजबांधवांनी विचारायला हवे. एवढेच नव्हे तर त्यावर उत्तर शोधत बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या ध्येयधोरणंवर कसे चालता येईल यावर व्यापक विचारमंथन करत पुढील राजकीय व्युहनीति ठरवायला हवी. बाबासाहेब म्हनाले होते, घरी जा आणि भिंतीवर आम्ही सत्ताधारी बनणार हे लिहुन ठेवा...परंतु प्रत्यक्षातील चित्र हे खेदजनक आहे हे नाईलाजाने नमुद करावे लागत आहे.
दि. ६ डिसेंबर २०११ च्या लोकसत्तात ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत मधू कांबळे म्हणतात:
"....उदाहरणार्थ, आंबेडकरोत्तर कालखंडात नेत्यांच्या आत्मकेंद्रित राजकारणामुळे रिपब्लिकन पक्षाचे विघटन झाले, राजकीय चळवळीला मरगळ आली, एक साचलेपण आले, त्याच वेळी आंबेडकरी विचाराने प्रेरित झालेल्या तरुणांनी साहित्याच्या प्रांतात बंडखोरी करीत उडी घेतली. राजा ढाले यांच्या विद्रोही लेखनाने राजकीय व सामाजिक व्यवस्था ढवळून निघाली. त्यानंतर विद्रोही साहित्याची एक लाटच निर्माण झाली. वैचारिक लेखन, कथा-कादंबऱ्या, कविता यांचा खच्चून भरलेला दारूगोळा प्रस्थापित व्यवस्थेवर आदळत राहिला. त्यातूनच पुढे दलित पँथर नावाचे वादळ निर्माण झाले. या जहाल व आक्रमक चळवळीला नामदेव ढसाळ, बाबुराव बागुल, शंकरराव खरात, दया पवार, डॉ. गंगाधर पानतावणे, ज. वि. पवार, अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, वामन होवाळ, डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. अरुण कांबळे, वामन निंबाळकर, लक्ष्मण माने, प्रेमानंद गज्वी, टेक्सास गायकवाड, भि. शि. शिंदे, दत्ता भगत, योगीराज वाघमारे, आदी लेखक, कवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार यांच्या समर्थ लेखणीने वैचारिक खाद्य पुरवले. अलीकडच्या काळात गौतमीपुत्र कांबळे, किशोर शांताबाई काळे, संजय पवार, आदी लेखक-विचारवंतांनी चळवळीला पूरक असे लेखन करण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्या पंधरा-वीस वर्षांत नवे विषय, नवे आशय, नव्या जाणिवा घेऊन साहित्याची निर्मिती अभावानेच झाली. आंबेडकरी चळवळीचा वैचारिक दारूगोळाही कमी पडला आणि राजकारण एके राजकारण या एकाच आवर्तात आंबेडकरी चळवळ अडकली.
पुढे चार-पाच वर्षांत दलित पँथरचीही शकले झाली. नामदेव ढसाळ यांनी आपले वैयक्तिक राजकारण सांभाळण्यासाठी दलित पँथर ही नामधारी संघटना कायम ठेवली. राजा ढाले यांनी दलित पँथर या नावापासूनच फारकत घेतली. आंबेडकरी चळवळीला सक्षम नेतृत्व देण्यास ढाले-ढसाळही पुरे ठरू शकले नाहीत. काही प्रमाणात ढाले यांच्याकडे शिक्षित तरुण वर्ग आकर्षित झाला, परंतु त्यांनी निवडणुकीच्या राजकारणापासून पूर्णपणे फारकत घेतली. कार्यकर्त्यांना राजकारणापासून अलिप्त राहणे अवघड झाले. कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला. ढाले यांनी पुढे येऊन रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करावे, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा होती. परंतु स्वच्छ व निष्कलंक चारित्र्याच्या चळवळीच्या नावाखाली त्यांनी राजकारणाला थारा दिला नाही. मात्र पुढे त्यांनी स्वत: दोनदा लोकसभेची निवडणूक लढविली. आपली संघटनाही त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बुहजन महासंघात विलीन केली. मात्र त्यातूनही ते आज बाहेर पडल्यासारखेच आहेत. कार्यकर्त्यांची मात्र पुरती कोंडी झाली. आंबेडकरी चळवळीला उर्जितावस्था प्राप्त क रून देण्यात राजा ढाले यांचे योगदान मात्र वादातीत आहे.
"दलित पँथरला फुटीने ग्रासले असतानाच मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराने पुन्हा या चळवळीला एक वेगळे वळण मिळाले. त्यातच रामदास आठवले नेता म्हणून पुढे आले. प्रा. जोगेंद्र कवाडे यांचाही नामांतरवादी नेता म्हणून उदय झाला. तब्बल सोळा वर्षे आंबेडकरी चळवळ नामांतरासारख्या भावनिक प्रश्नात अडकली. शेवटी काय झाले, मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले की विद्यापीठाची फाळणी झाली? विद्यापीठ नामांतराचा वर्धापन दिन साजरा करणाऱ्यांनी याचा जरूर विचार करावा. याच कालखंडात बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणात प्रवेश केला. आंबेडकरी जनतेला पुन्हा एक आशा वाटू लागली. सुरुवातीला त्यांनी दलित, आदिवासी, ओबीसी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न घेऊन आंबेडकरी चळवळीला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून अकोला जिल्ह्य़ात बहुजनवादी राजकीय सत्तेचा पथदर्शी प्रयोग त्यांनी राबविला व तो यशस्वी झाला. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडून वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या. बाबासाहेबांचा नातू, एक अभ्यासू व शहरी-ग्रामीण प्रश्नांची जाण असणारा नेता, अशी ही त्यांची प्रतिमा आंबेडकरी समाजाला आश्वासित करणारी होती. परंतु बुरुजाचा एक एक दगड निखळावा तसे त्यांचे सहकारी त्यांच्यापासून दुरावत गेले. कारणे काहीही असली तरी हा प्रयोग फक्त अकोल्यापुरताच मर्यादित राहिला. आंबेडकरांचे राजकारणही एका विशिष्ट चौकटीच्या बाहेर जाऊ शकले नाही. भारिप बहुजन महासंघाचा जनाधारही आता कमी होऊ लागल्याचे चित्र आहे. मध्यंतरी त्यांनी आंबेडकरी चळवळ संपली काय, असा प्रश्न विचारणारे पुस्तक प्रसिद्ध केले. हा प्रश्न त्यांनी स्वत:ला विचारला आहे की जनतेला विचारला आहे, हे अजून कळायला मार्ग नाही. ज्यांच्याकडून सक्षम नेतृत्वाची अपेक्षा होती, त्यांनीच आंबेडकरी चळवळ संपली आहे काय, असा प्रश्न विचारणे आश्चर्यकारक म्हणावे लागेल. या पुढे आता प्रकाश आंबेडकर वाढतील का किंवा चळवळ वाढवतील का, याबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या आहेत.
"या सर्व राजकीय कोलाहलात रामदास आठवले सारी चळवळ आपल्याभोवती फिरवून घेण्यास यशस्वी ठरले. आठवले यांनी राजकीय चळवळीला एका वेगळ्याच वळणावर आणले. आठवले यांनी काँग्रेसबरोबरच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरू केला. या पूर्वी रिपब्लिकन नेत्यांनी काँग्रेसबरोबर युती केली नव्हती असे नाही, परंतु आठवले यांचे राजकारण हे आंबेडकरी चळवळीचा स्वतंत्र बाणा हरवून बसले. वीस वर्षे त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर आघाडी केली. एक मतदारांची पिढी त्यांनी हातावर व घडाळ्यावर शिक्का मारणारी तयार केली. त्यांनी आरपीआयचे निवडणुकीत साधे खाते उघडण्याचीही तसदी घेतली नाही. आरपीआयचे मतदान किती आहे, हे कधी त्यांना वीस वर्षांत अजमवावे असे वाटले नाही. अर्थात त्याचा त्यांच्या खासदारकी, आमदारकी, मंत्रीपद मिळण्यात कधी अडथळा आला नाही. मान ना मान मै तेरा मेहमान अशा पद्धतीने ते युती-आघाडय़ांचे राजकारण करू लागले. आता त्यांनी शिवसेना-भाजपबरोबर युती केली आहे. शिवसेनेचा आरक्षण, दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर, आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जमीन देणे याला विरोध आहे. त्याचे आठवले यांना काही देणे-घेणे नाही. आमची युती भ्रष्टाचार, महागाईच्या विरोधात आहे असे त्यांचे म्हणणे आहे. मग ते ज्या रिपब्लिकन पक्षाचे राजकारण करतात आणि ज्या पक्षाला बाबासाहेब आंबेडकरांनी खुल्या पत्राच्या माध्यमातून वैचारिक पाया दिला आहे, त्याचे काय? अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमात आपण २०१४ मध्ये उपमुख्यमंत्री होणार, अशी अपेक्षा बोलून दाखविली. किती ही मोठी अपेक्षा आणि महत्त्वाकांक्षा? याचसाठी का हा शिवशक्ती-भीमशक्तीचा सारा अट्टहास, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय रहात नाही. युती-आघाडय़ांशिवाय आठवले राजकारण करू शकत नाहीत आणि त्यांचे नेतृत्वही तरू शकत नाही, हे स्पष्ट आहे. त्यातून आंबेडकरी चळवळीला भक्कम नेतृत्व देण्यास त्यांच्याही मर्यादा उघड झाल्या आहेत.
नव्या नेतृत्वाच्या पिढीतही ज्यांनी आपले नाव कधी मागे पडू दिले नाही, त्या रिपब्लिकन पक्षाचे आणखी एक नेते रा. सू. गवई यांनी कायम काँग्रेसच्या साथीने सत्तेचे राजकारण केले. ही सत्ता फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली किंवा ठेवली असे म्हणता येईल. आमदार, खासदार, विधान परिषदेचे उपसभापती, सभापती, बिहार- केरळचे राज्यपाल असा त्यांचा काँग्रेसच्या मेहरबानीने राजकीय सत्तेचा प्रवास सुरू राहिला. आता त्यांनी राजकीय निवृत्ती घेतल्याचे जाहीर केले आहे. त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई त्यांच्या पक्षाची धुरा सांभाळत आहेत. ते अनेकदा फक्त काँग्रेसच्याच व्यासपीठावर दिसतात. त्यांनी वारसा हक्कानेच काँग्रेसबरोबरची युती चालू ठेवली आहे. काँग्रेसच्या व्यासपीठावर जाऊन मी काही इथे मागायला आलो नाही, असे सांगत असतानाच त्यांनी दडवलेले ताकाचे भांडे कधी उघडे पडते हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. "

मला वाटते वरील उतारा पुरेसा बोलका आहे आणि त्यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकता नाही, त्यामुळे काही लबाड लोकांमुळे आंबेडकरी जनतेत संभ्रम निर्माण झाला असुन नेमके काय निवडायचे याबाबत काही गोंधळ तर होत नाहीहे ना असा प्रश्न उठणे स्वाभाविक आहे? जातीचे नको विचारांचे बहुमत हेच सत्तेकडे नेणारे प्रमुख साधन असते. हा समाज एके काळी सर्वच समाजाचा एक अविभाज्ज्य घटक होता. एक स्वतंत्र बेट निर्माण करुन आणि तेही असंख्य (जवळपास ४४) तुकड्यांत वाटुन सत्तेचा मार्ग कसा क्रमिला जाईल? कधी कोन्ग्रेस तर कधी भाजपा वा कधी अन्य पक्ष स्वार्थासाठी फक्त काही लोकांना पदे देत संपुर्ण समाजालाच वापरुन द्यायची नीति पुढेही कायम ठेवायची की नाही यावरही विचारमंथनाची आवश्यकता आहे. तसे झाले नाही तर मागील पानावरुन पुढे अशीच अवस्था होत राहील, आणि ही काही विराट भवितव्यासाठीची व्यवस्था नाही. "अंध आणि स्वार्थी द्रुष्टी ठेवली तर सर्वच समाजाचा घात होईल..." असे अत्यंत तळमळीने बाबासाहेबांनी जळगांव येथील सभेत ८ आक्टोबर १९३६ रोजी म्हटले होते. मला वाटते अनेक नेते/विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या विधानाचा अर्थ समजावुन घेतलेला नाही. किंबहुना बाबसाहेबांच्या विपुल साहित्यांचे खंड जवळपास घरोघरी असतांना ते वाचायचे व समजावुन घ्यायचे कष्ट कितीजणांनी घेतले असतील याबाबत शंकाच आहे.
सध्याचा काळ हा संक्रमणाचा आहे आणि संक्रमणाच्या कालखंडात काही गफलती होवु शकतात हे मान्य जरी केले तरी तो काळ किती असावा यालाही मर्यादा असतात. समाज सातत्यपुर्ण फक्त संक्रमणाच्या स्थितीत राहु शकत नाही. कोठेतरी सामाजिक/आर्थिक आणि सांस्क्रुतीक स्थ्यै-याची स्थिती गाठावी लागले. या संक्रमण काळात महापुरुषांनी प्रस्थापित केलेल्या सिधांतांचे फक्त वांझ गुनगाण अभिप्रेत नसते तर त्या सिद्धांतांना प्रत्यक्ष वर्तनाने, नव्य संशोधनाने व विचारांनी बलकटी देण्याची आवश्यकता असते. असे झाले नाही तर हा संक्रमण काळ लांबत जातो....यावरही चिंतन करण्याची गरज आहे. खरे तर आताच्याच पीढीवर ही जबाबदारी आहे कि ही संक्रमणावस्था एका अंतिम स्थितीत आणावी. ती पुढील पीढीवर ढकलण्याचे अन्याय्य क्रुत्त्य घडु नये अशी अपेक्षा व्यक्त करत असतांनाच म्हणावेसे वाटते कि संक्रमनावस्थेची म्हणुन जी काही स्वार्थी फळे घ्यायला काही लोक सज्ज असतात त्यांना मात्र हा कालखंड लांबेल तेवढा चांगलाच असतो. त्यातच त्यांचे व्यक्तीगत स्वार्थ निहित असतात. अशा लोकांना, त्यांच्या मतांना व मत्तांना प्रतिरोध झाला नाही तर मात्र संक्रमणावस्था लांबत जाते आणि त्यातच दुरगामी समस्यांची मुळे रुजलेली असतात. सध्या तरी ही संक्रमणावस्था लांबावी असे घदण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत व त्याचे खंत वाटणे स्वाभाविक आहे.
उदा. जसे राजकारण्यांना शेतकरी दरीद्र रहाणे अधिक सोयिस्कर असते, झोपडपट्ट्यांचे निर्मुलन नकोच असते तसेच आपल्याच समाजबांधवांना सतत ब्रेनवाशिंग करत त्यांच्या ख-या आर्थिक, सामाजिक व सांस्क्रुतीक बदलाची भुमिका न घेता उलट त्यांना संभ्रमीत ठेवणे आणि आपली नेत्रुत्वे बळकट करणे हाही सोयीचा उद्योग असतो. त्याचा फटका मात्र बसतो तो जनसामान्यांना.
हा समाज अन्य समाजघटकांपेक्षा अधिक वेगाने शिकला याला कारण बाबासाहेबांची प्रेरणा होती. परंतु "केवळ शिक्षणाने योग्यता येते असे नाही" असे बाबासाहेबांनीच धारवाड येथील सभेत २८ डिसेंबर १९२९ रोजी भाषणात म्हटले होते, याचे स्मरण या सर्वच समाजांतील नवशिक्षितांना करुन देणे आवश्यक नाही काय? यातच ख-या प्रगल्भ समाजाची घडन होत प्रगतीची शिखरे पादाक्रांत होतील याचे भान यायला हवे.
जागतीकीकरण आणि समस्या
जागतिकीकरणाच्या लाटेमुळे आणि त्यामुळे ज्या वेगाने समाजव्यवस्था बदलत आहेत त्यांचा फटका तसा सर्वांनाच बसतो आहे. वेगाने होत चाललेले खाजगीकरण, सरकारने अगदी शिक्षणक्षेत्रातुनही क्रमशा: अंग काढत जाणे याच्या भविष्यातील परिणामांची जाणीव काही तरुण विचारवंतांना आहे. यामुळे एक नवी वर्गव्यवस्था निर्माण होवू लागली आहे. भारतातील आधीच विध्यमान असलेली जातीय उतरंड आणि त्यातुन निर्माण झालेल्या मानसिकता आणि त्याच वेळीस निर्माण होत चाललेली ही नवी आर्थिक उतरंड यांचा सामना करण्याची योजना आज दुर्दैवाने कोणत्याही समाजघटकाकडे नाही. राजकीय लोकांना तसे प्रबोधन अडचणीचे ठरते. विचारवंतांची, मग भले ते कोणत्याही समाजातील असोत, या जातीय आणि जागतिकीकरणामुळे नव्याने निर्माण झालेल्या आर्थिक उतरंडींचा परस्पर संबंध आणि त्यातुन निर्माण होत जाणा-या समाज-मानसशास्त्रीय पेचाचे विश्लेषन आणि त्यावरील उत्तरे शोधण्यात घोर अपयश आलेले आहे असेही स्पष्ट दिसते. खरे तर एकीकडे सर्वच समाजाची एक व अविभक्त असण्याची निकड, दुसरीकडे जातीयतेच्या परंपरागत भावना आणि दुसरीकडे वर्तमान स्थितीतील जातीव्यवस्थेच्या पार जाणारी निर्माण होवु पाहणारी जागतीक अर्थव्यवस्था व तिचे आपल्या समाजातील जातीयशीच पुन्हा जुळवले जाणरे संबंध हा एक मोठा पेच असनार आहे, पण त्यातील समाज-सांस्क्रुतीकतेवर व अर्थस्थीतिवर होत असलेल्या या नव्य आक्रमनाची जाणीवच नाही असे चित्र दिसते. आंबेडकरी समाजाने यावरही सखोल चिंतन करावे व भविष्याबाबतची व्युहनीती राबवावी, तर एक विराट आर्थिक भवितव्य घडवता येईल.
या जगतीकीकरणामुळे मानवी संबंधांत वेगाने बदल घडु लागले आहेत. अगदी कुटुंबसंस्था ते पार पती-पत्नींतीलही संबंधांवर त्याचा परिणाम होवु लागला आहे. हे वाढते तानतणाव एकीकडे आणि जातीय परिप्रेक्षातील प्रत्यही बाढतच चाललेले तणाव एकीकडे अशी अवस्था आहे. अनेकजण "काय घेणे आहे मला या समस्यांशी?" असे प्रश्न विचारत बाजुला होत स्वतंत्र होण्याचा प्रयत्न करतात हेही खरे, परंतु दुर्दैवाने त्यांनाही अंतत: मानसीक संघर्षाच्या सीमेवर पोहोचावेच लागते असे आजचे चित्र आहे. भविष्यात काय असेल हे आतातरी सांगता येणे कठीण आहे. त्यासाठी एक वैचारीक, नैतीक आणि सामाजिक संवेदनांचा मुलभुत जाणीवपुर्वक विकास करंण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब २८ आक्टोबर १९५४ मधील एका ह्रुद्द्य भाषणात म्हणतात, विद्या, स्वाभिमान आणि शील ही माझी तीन दैवते आहेत. हे विधान अत्यंत महत्वाचे व प्रत्येकानेच आदर्शवत मानावे असे आहे. द्न्यानामुळेच मानवी मन संतुलन साधत बौद्धीक प्रगती करु शकते. किंबहुना खरा भौतीक विकासही विध्येच्या बळावरच होवु शकतो. शिक्षण म्हनजे द्न्यान नव्हे. स्वाभिमानामुळे जीवनाला एक मानसीक बळ मिलते जे सर्व संकटांवर मात करायला मदत करते. आणि शीलामुळे मनुष्य अकारणच्या स्पर्धेत न पडता खरा जीवनविकास घडवुन आणु शकतो.
शिक्षणाचे होत जाणारे खाजगीकरण व अलीकडेच त्यासंदर्भात पारित झालेले विधेयक हाही एक धोका आहे. त्याबाबत हवा तेवढा रोष व्यक्त झाल्याचे दिसत नाही. किंबहुना शिक्षणाचे खाजगीकरण म्हनजे सरकारने आपली कल्याणकारी राज्याची भुमिका सोडुन भांडवलदारांच्या हातात समाजाच्या भवितव्याची जबाबदारी सोपवणे असाच होतो याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही.
या परिस्थितीत नोक-या हाच आता भविष्यातील जीवनयापनाचा मार्ग राहील याची ग्वाही देता येत नाही. उद्योगधंदे व व्यवसायांकडे भविष्यात मोठ्या प्रमाणावर वळावे लागेल असे चित्र दिसते. त्याबाबतही प्रबोधनाची आवश्यकता वाटते.
परंतु प्रबोधनाची, सामाजिक उत्थानाची म्हणुन जी चळवळ असते ती कोठेतरी वेगाने लोप पावत गेलेली आहे. ती द्वेषमुलक होत केवळ गतेतिहासातील अन्यायाबद्दल आक्रोश करत समाजाला दिशाहीन करत चालली आहे. गतकाळात पराकोटीचा अन्याय झाला आहे हे खरेच आहे. त्याबाबतची खंत, दु:ख आणि वेदना व त्याबाबतचा संतापही अत्यंत न्याय्य आहे. पण तेथेच जनांना थांबवुन, नित्य नवे संभ्रम निर्माण करुन त्यांचा पुढे जाण्याचा मार्ग अवरुद्ध करणे हे कितपत योग्य आहे यावरही चिंतनाची गरज आहे.
मला असे वाटते कि हीच एक संभ्रमावस्था आहे. ज्या सत्ताधा-यांनी/धर्मवर्चस्वतावाद्यांनी शेकडो वर्ष नाडले त्यांच्याशीही काही युती करतात...करावी...पण त्याचा नेमका पाया कोणता याचे भान नसतांना? युती ही समानतेच्या पायावर कोणाशीही करावी. हरकत असण्याचे कारण नाही. पण वापरुन घेतले जाण्यासाठीची युती ही अवमानास्पद नाही काय? असो.
भविष्याचा वेध घेण्याचे सामर्थ्य असणारा समाज व व्यक्तीच इतिहास घडवतात. तेच असाध्यही साध्य करत नवीन धेयांची निर्मिती करत आपला काळ गतीशील/प्रगतीशील ठेवत असतात.
भविष्य तेच घडवतात ज्यांच्या अंतर्मनात एक चेतता वन्ही असतो जो अशक्य ते साध्य करण्यासाठी निरंतर प्रेरीत करत असतो. बाबासाहेब ही एक महाउर्जा आहे. बाबासाहेब हे फक्त एका समाजाचे नव्हते. त्यांना तसे मानणे ही एक न पटणारी बाब आहे.
सांस्क्रुतीक समस्या

बौद्ध धर्मामुळे भारत देश महान, अस्प्रुष्यांना बौद्ध धर्माशिवाय दुसरा कोनताही अभ्युदयाचा मार्ग नाही, असे बाबासाहेबांनी वारंवार सांगीतले होते. त्यांनी आपल्या लाखो अनुयायांसह धम्म स्वीकारला व समतेचा, बंधुभावाचा करुणामयी बुद्धाचा मार्ग पकडला. त्यांचे "बुद्ध आणि त्याचा धम्म" हा क्रांतीकारी ग्रंथही लिहिला. दुर्दैवाचा भाग असा कि अन्य अस्प्रुश्य जातींनी तर सोडाच परंतु खुद्द महार समाजातील जवळपास १५ ते २०% लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला नाही असे अंदाज वर्तवण्यात येतात. असे का झाले असावे? बाबासाहेबांचा द्रुष्टीकोन व्यापक होता, सर्वच हिंदु धर्मातील लांछनास्पद विषमतेला धर्माच्याच आधारावर कायम ठेवणा-यांना प्रत्युत्तर म्हणुन सर्व शोशितांसह बौद्ध धर्म स्वीकारुन उत्तर देण्याचा होता. परंतु बाबासाहेबांची व्यापक द्रुष्टी पेलली गेलेली दिसत नाही.
खुद्द बाबासाहेबांनाही एकाच जातीच्या चौकटीत बंदिस्त केले गेल्यामुळे तर असे झाले नसेल? खरे तर आज सर्वच पुर्वास्प्रुष्य बौद्ध धर्मात असायला हवे होते. समतेचा आधार सर्वांना मिळाला असता. एवढेच नव्हे तर त्यातुन एक राष्ट्रीय स्तरावरची वेगळीच सांस्क्रुतीक क्रांती घडली असती. पण तसे झालेले नाही. प्रामुख्याने महार समाजच बौद्ध झाला. अन्य समाज मात्र या सांस्क्रुतीक क्रांतीपासुन दुरच राहिला.
धर्मांतर झाले म्हनजे लगोलग पुरातन श्रद्धा तोडता येतात असे नाही. ते मानवी मानसिकतेच्या विरोधात आहे, हे मत घटकाभर मान्य केले तरी धार्मिक संक्रमण, म्हणजे एका धर्मातुन अन्य धर्मात प्रवेश करतांना व नव्या संद्न्या ते श्रद्धा स्वीकारत असतांना, किती काळ असावे?
बाबासाहेबांनी ज्या २२ प्रतिद्न्या प्रत्त्येक बौद्ध बांधवाला दिलेल्या आहेत त्यात जे नाकारायला सांगितले आहे, त्यांना मानसिक पातळीवर कितपत नाकारले गेलेले आहे हा एक अभ्यासाचा विषय आहे. प्रथम आपण त्या प्रतिद्न्या कोणत्या हे पाहुयात:
१) मी ब्रम्हा, विष्णु व महेश याना देव मानणार नाही व त्यांची पुजा करणार नाही।
२) मी राम व कृष्ण याना देवाचा पुनरजन्म मानत नाही व त्यांची पुजा ही करणार नाही।
३) मी गौरी गणपती व ईतर कुठल्याही देविला मानत नाही व पुजाही करणार नाही।
४) मी देवाचा पुनरजन्म मानत नाही।
५) मी बुद्धाला विष्णूचा अवतार मानत नाही, हा एक अपप्रचार आहे।
६) मी श्राद्ध करणार नाही व पिंडदान करणार नाही।
७) मी बुद्धाच्या शिकवणुकीच्या विसंगत वागणार नाही
८) मी कुठलेही कार्य ब्राह्मणाच्या हस्ते करणार नाही
९) मी सगळ्या मानव जातिला समान मानतो.
१०) मी समानता प्रस्थापीत करण्यासाठी कटिबद्ध राहीन
११) मी बुद्धाने सांगितलेला अष्टप्रधान मार्गाचे पालन करेन।
१२) मी बुद्धाने सांगितलेल्या १० पारमितांचे पालन करेन।
१३) मी समस्त प्राणीमात्रावर प्रेम करेन व त्यांचे रक्षण करेन।
१४) मी चोरी करणार नाही।
१५) मी खोटे बोलणार नाही।
१६) मी वैषयीक अपराध करणार नाही।
१७) मी मद्यपान व इतर कुठेल्याही नशेचे सेवन करना नाही।
१८) मी अष्टांग मार्गाचे पालन करेन आणी दया, करुना व प्रेमाचे रोज आचरन करेन।
१९) मी मानव जातीच्या विकासात बाधा घालणा-या व जातिभेद करणा-या या हिंसक अशा हिंदु धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो आहे।
२०) मी फक्त बुद्धांच्या धम्मावर विश्वास ठेवतो।
२१) मी बौद्ध धम्माचा स्विकार करतो, अन हाच माझा पुनरजन्म आहे असे मानतो।
२२) मी अशी प्रतिज्ञा घेतो की, या नंतरचे माझे जीवन मी बुद्ध व त्यांचा धम्म यांच्या शिकवणुकी प्रमाणे जगणार॥

या वरील प्रतिद्न्यांतील पहिल्या सात प्रतिद्न्या नकारात्मक आहेत. म्हणजे हिंदु देव-देवतांना नाकारणा-या आहेत. याच देवदेवतांमुळे वा त्यांच्या अवतारांमुळे जातीव्यवस्था अन्याय्य आणि बंदिस्त करण्यात हिंदु धर्ममार्तंडांना अभुतपुर्व यश मिळाले होते हेही खरेच आहे त्यामुळे त्यांना नाकारणे अत्यंत योग्य आणि स्वाभाविक आहे.
याबाबत काही लोक टिका करतात कि बौद्धजन या प्रतिद्न्यांचे पालन करत नाहीत. त्यात काही तथ्य असु शकते हे काही खालील उदाहरणांवरुन लक्षात येईल.
१. मांढरदेवी येथे काळुबाईच्या यात्रेदरम्यान जी चेंगराचेंगरी झाली त्यात जवळपास एक हजार भाविक ठार झाले. या भाविकांत जवळपास ३०० भाविक बौद्ध धर्मीय होते. हा व्रुत्तांत दै. लोकसत्तामद्धे आयु दिनकर झिंबरे यांनीच लिहिलेला आहे. यात लग्नानंतर काळुबाईला कुलदैवत म्हणुन दर्शनाला जाणा-या एका कुटुंबाचाही समावेश होता.
२. नाशिक जिल्ह्यातील वणीच्या देवीला बसमधुन दर्शनासाठी निघालेल्या बसचा अपघात झाला. त्यात ८० लोक ठार झाले. त्यांत जवळपास ४० लोक नवबौद्ध होते.
३. महागायक पदाला पोहोचलेला अभिजीत कोसंबी या गुणी गायकाने विजयी घोषित होताच कोल्हापुरच्या अंबाबाईला अभिषेक केला होता. एवढेच नव्हे तर गातांना कपाळावर बांधलेल्या पट्टीत अंबाबाईचा अंगारा असल्यानेच हे यश मिळाले असे त्याने व्रुत्तवाहिन्यांना मुलाखती देतांना सांगितले. त्याचे वडील बौद्ध धम्म परिषदेचे कोषाध्यक्ष होते.
४. अभिजीत सावंत हा सर्वात पहिला राष्ट्रीय स्तरावरचा महागायक. व्रुत्तवाहिन्या जेंव्हा त्याच्या घरी पोहोचल्या तेंव्हा त्यांना बाबासाहेब व सिद्धीविनायकाचा फोटो शेजारी-शेजारी दिसला. त्यावर विचारलेल्या प्रश्नात तो म्हणाला कि गणपती ही कलेची देवता आहे म्हणुन मी सिद्धी विनायकाला मानतो.
५. अनेक उच्चपदावर गेलेले समाजबांधव गणेशोत्सव ते नवरात्रोत्सवांना हजेरी लावतात. अनेकांच्या घरात देव्हारेही असतात. बाहेर मात्र हेच लोक बाबासाहेब आणि तथागत भगवान बुद्धाचा जयघोष करत असतात.
मला असे वाटते कि वरील उदाहरणे बोलकी आहेत. त्यातुन बाबासाहेबांनी दिलेल्या प्रतिद्न्यांचे सोयिस्कर विस्मरण दिसत नाही काय?
त्याहीपेक्षा महत्वाचे म्हनजे धम्म आणि बाबासाहेब आंबेडकरी जनतेपर्यंत पोहोचवण्यात आलेले हे जनतेचेच अपयश नाही काय? याचा अर्थ धर्मप्रचारक ही संस्था अपयशी ठरते आहे असे येथे म्हणता येईल काय? बौद्ध धर्म सर्वच पुर्वास्प्रुश्यच नव्हे तर तथाकथित स्प्रुश्या जातींतही पसरवणे हे अनुयायांचे...चळवळवाल्यांचे एक महत्वाचे कार्य नव्हते काय? मला वाटते जुन्या श्रद्धा तोडत पर्यायी जीवनशैली देणे आणि त्याचा प्रसार सर्वत्र करणे हे कार्य अनुयायांचे असते. ख्रिस्ताचा धर्म ख्रिस्ताने नव्हे तर त्याच्या अनुयायांनी जगभर नेला. पुरातन काळात ज्यांनीही बौद्ध धर्म स्वीकारला त्यांनी आटोकाट प्रयत्न करत त्याला सातासमुद्रापार नेले. त्यातील तत्वे ते अक्षरश: जगले. माझे मित्र आयु. मधुकर रामटेके हे बाबासाहेबांना दुसरा बुद्ध मानतात. आणि ते खरेच आहे. पण मग त्यांनी दिलेल्या प्रतिद्न्यांचे विस्मरण कसे होते, यावरही चिंतनाची गरज आहे.
चळवळीची गरज आहे काय?
चलवळ क्षीण झाली आहे. त्यातील पुर्वीचा जोष आणि नवोन्मेश क्रमश: अस्तंगत झालेला आहे. कही घटक द्वेषाधारीत चळवळ चालवत आपले अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे खरे, पण त्यातही नवोन्मेशाचा पुरेपुर अभाव आहे. चळवळीच्या विचारवंतांतही जेवढे राजकीय नेत्यांत असतील तेवढेच मतभेद आहेत.
यावर एक प्रतिवाद असा आहे कि चळवळ समतेसाठी होती आणि ती आता ब-यापैकी अस्तित्वात आली असल्याने ती चालु रहावी याची गरज नाही. साध्य एकदा मिळाले कि कशासाठी चळवळ करायची?
दुसरा मतप्रवाह असा आहे कि मुळात समता अजुनही द्रुष्टीपथात नाही. काही टक्क्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळाले म्हनजे समता आली असे म्हनता येणार नाही. त्यामुळे चळवळीची अद्यापही जीवंत असण्याची गरज आहे.
मला असे वाटते कि दोन्ही पक्ष चुकीची भुमिका घेत आहेत.
पहिला पक्ष जो म्हणतो कि चळवळीची गरज नाही त्यांनी खालील मुद्द्यांकडे लक्ष द्यावे:
१. पुर्वीएवढी जातीयता समाजात राहिलेली नाही हे विधान अर्धसत्य असुन मनांतुन कोणाच्याही जात गेलेली नाही. किंबहुना जातीय अस्मिता कधी नव्हे एवढ्या टोकदार झालेल्या आहेत.
२. जे जातीय संघर्ष कमी झाल्याचे चित्र दिसते त्यात खरा हात बाबासाहेबांनीच बनवलेल्या राज्यघटनेचा आहे. परंतु भारतीय मानसिकता मात्र बदललेली नाही. त्यामुळे खरोखर जातीय संघर्ष संपुष्टात आला आहे काय? तो सुप्त पातळीवर वावरत असतांनाच कोनत्या ना कोणत्या निमित्ताने उफाळुन येत नाही कि काय, आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी सशक्त चळवळीचे अस्तित्व नको कि काय यावरही या पक्षाने विचार करायला हवा.
दुसरा पक्ष जे म्हनतो त्यावरही खालील आक्षेप नोंदवले जातात, ते असे:
१. समतेच्या अधिष्ठानासाठी चळवळीने आजवर नेमके काय केले आहे याचा लेखाजोखा कोण देनार?
२. ज्या टक्क्यांना सामाजिक/आर्थिक स्थैर्य मिळाले त्यांच्याकडुन चळवळीसाठी कितपत योगदान घेतले गेले वा घेण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला गेला? किंबहुना या सुस्थिर घटकाचा प्रबोधनात टक्का किती? नसेल तर का नाही?
३. स्वत:च्याच समाजातील विषमता दुर करणासाठी चळवळीने नेमके काय कार्य आजवर केले?
४. वर्तमान व भविष्यातील प्रश्नांना उतरे शोधत तसे प्रबोधन करण्याचा कितपत प्रयत्न झाला वा होत आहे?

उदाहरणार्थ महार समाजात साडेबारा जाती आहेत. आज जरी जवळपास ८०% लोक बौद्ध झाले असले तरी सर्वच बौद्ध समान न मानता रोटी-बेटी व्यवहार पोट-जातीआधारीत करतात असे एक सर्वेक्षण सांगते. असे का? खरे तर जातींचा अंत हेच अंतिम उद्दिष्ट बाबासाहेबांनी सामोरे ठेवले होते, असे असतांना हे वास्तव योग्य आहे काय?
दाखल्यावरील धर्म आणि प्रत्यक्षात स्वीकारलेला धर्म यात विभेद का केला जातो हे अनेक विचारवंतांना न उलगडलेले कोडे आहे. त्या कोड्याचा निर्वाह व्हायला हवा. जो स्वीकारला आहे तोच धर्म जन्मदाखल्यावर असने अभिमानास्पद कि जो त्यागला आहे त्या अन्याय्य धर्माची नोंद ठेवने हे अभिमानास्पद?
चळवळ आजही आवश्यक आहे असे मला का वाटते त्याची कारणे अशी:
१. चलवळ ही निरंतर घडनारी घतना आहे, फक्त तिची ध्येये आणि उद्दिश्ट्ये काळानुसार बदलत असतात. चळवळा समाजच ख-या अर्थाने प्रगती साधत असतो. त्यामुळे चलवळीची गरज संपली आहे असे म्हनता येत नाही. किंबहुना प्रत्त्येक समाजालाच सातत्यपुर्ण कालसापेक्ष चळवळींची आवश्यकता असते.
२. दुसरे म्हणजे आजही किमान ४०% नवबौद्ध समाज (यांत धर्मांतर न केलेलेही आले) दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत आहेत. त्यांना जीवनयापनासाठी मजुरी/हमाली सारखी कामे करावी लागत आहेत. त्यांचे सर्वच स्तरांवर शोषण होत आहे. त्यांचे आर्थिक आणि मानसिक उत्थान होण्यासाठीही चळवळीची गरज आहे.
३. आजही नवबौद्धांच्या ब-याचशा धार्मिक/तात्विक प्रेरणा य विगतात सोडलेल्या धर्मांत आहेत. हा संभ्रम दुर करणे आणि त्यांना तथागताच्या प्रशांत प्रांगणात नेत देव-इश्वर-पुनर्जन्मादी दैववादी संकल्पनांच्या कक्षेतुन सोदवण्याची गरज आहे. कारण तसे केले गेले नाही तर ना धड हिंदु ना धड बौद्ध अशी स्थिती निर्माण होईल आणि मग त्याचे निराकारण कसे करायचे हा मुलभुत प्रश्न निर्माण होईल. हा एक वेगळाच धोका आहे.त्याची नोंद चळवलवाले ते तत्वद्न्यान्यांनी घ्यावी ही अपेक्षा आहे.
४. अर्थिक स्तरांवर आणि त्याच वेळीस सामाजिक स्तरांवर मानसिक अडथळे टाळत सर्वांनाच कोणत्या पद्धतीने विकासाच्या मार्गावर नेत, पुर्वीच्या शोषकांपेक्षाही अधिक प्रगती करायला खरेखुरे प्रोत्साहन देईल अशा नव-तत्वद्न्यानाच्या मांडणीची गरज आहे.
५. दुस-यांच्या हवेल्यांचा विचार करु नका, आपली झोपडी असेल तरीही तिला आधी मजबुत करा असा बाबासाहेबांच्या म्हनण्याचा सारांश आहे. याचाच दुसरा अर्थ असा कि आपली व्यक्तिगत मानसिकता जोवर सम्यक तत्वद्न्यानाच्या आधारावर मजबुत होत नाही तोवर या अन्याय्य व्यवस्थेच्या महालांना तोडण्याचे स्वप्न पाहणे बेकार आहे असेच अप्रत्यक्षपणे बाबासाहेब म्हणत आहेत. प्रत्येक समाजघटकाची मानसिकता अशी निर्मळ आणि सबळ करण्यासाठी चळवळीची गरज आहे.

भवितव्याची दिशा

प्रत्त्येक व्यक्तीचे, समाजघटकाचे आणि राष्ट्राचे भवितव्याविषयक काही खास विचार असतात, स्वप्ने असतात. त्या स्वप्नांना
साकार करण्यासाठी निश्चित अशा योजना असतात. धोरणे असतात. ती धोरणे वेगवेगळी असु शकतात. त्यावरुन नेमके काय धोरण असावे याबाबत वादही असतात. परंतु विकास आणि प्रगतीचे, स्वाभिमानानाने व्यक्ती, समाज वा राष्ट्र म्हणुन जगण्याचे, इतरांपेक्षा श्रेष्ठ होण्याचे स्वप्न मात्र सर्वांत एक समान धागा असतो.
महार समाज हा एक लढवैय्या समाज होता व आहे हे आपण मागील प्रकरणांतुन पाहिलेच आहे. या समाजाचा इतिहास हा अत्यंत गौरवशाली असुन सर्वच समाजांचे त्याने प्रामाणिकपणे जीव धोक्यात घालुन रक्षण केले आहे हेही आपण पाहिले आहे. हा समाज भावनाशील असुन स्वभावाने अत्यंत मायाळु असाच आहे. या समाजाचा अन्य समाजघटकांकडे पाहण्याचा आणि अन्य समाजघटकांचा या समाजाकडे पाहण्याच्या द्रुष्टीकोनात अर्थातच फरक आहे आणि याचे कारण म्हणजे या दोन समाजांत (धार्मिक व सत्ताधारी जाती एकीकडे तर अन्य सर्वच शुद्रातीशुद्र एकीकडे) शोषित आणि शोषक असा विभेद आहे. वैदिक वर्चस्ववादी संस्क्रुतीने आपल्या स्वार्थी प्रेरना जतन करण्यासाठी अखिल समाजाचा बळी चढवला आहे हा इतिहास आहेच. त्यासाठी इतिहासाची, धर्मेतिहासाची कशी मोडतोड केली आहे हेही आपण पाहिलेच आहे. याबाबतचा क्रोध आणि संतप्त उद्गार बहुजनीय चळवळीमधुन वारंवार उपटत असतात. परंतु या शोषकांना शिव्या घालत बसल्याने आपली प्रगती होणार नसुन ती आपली आपल्यालाच साध्य करावी लागणार आहे.
मला वाटते खरा अभ्युदय खालील मार्गांत आहे. ते असे:
१. राजकीय आणि आर्थिक सत्ता: मानवी समाजाच्या प्रगतीची दिशा ही आर्थिक आणि राजकीय सत्तेतच सामावलेली असते. जोवर या सत्ता मिलवता येत नाहीत तोवर खरी प्रगती साध्य करता येणार नाही.
२. सांस्क्रुतीक फेरमांडनी: संस्क्रुतीचे अर्थव्यवस्थेचे खरे निर्मानकर्ते आणि त्याचा फायदा घेणारे निरंकुश (अगदी आजच्या लोकशाहीतही) सत्ताधारी आणि धर्मवर्चस्ववादातुन पुन्हा राजकीय सत्ताच मिळवु पाहनारे यांत विभेद करावाच लागेल. समाजेतिहासाचा मी आधीच्या प्रकरणांत मांडलेला क्रम पुन्हा तुम्ही तपासुन घ्या. निर्माणकर्त्यांनीच त्यांची धर्मिक सोयीसठी निर्मिती केली आणि कानामागुन येत तेच तिखट झाले. सत्ताधारी जाती याच वर्गाच्या जीवावर जगल्या. आजही जगत आहेत. त्यामुळे संस्क्रुती मुळात कोणी निर्माण केली? जीवनोपयोगी शोध कोणी लावले? शस्त्रे कोणी बनवली, त्यासाठी कसे आणि कोनते लोह/पोलाद बनवावे याचे शोध कोणी लावले? अन्न आवश्यक पण जाती-पाटे वरवंटे कोणे शोधले आणि कष्ट घेत अव्याहत कोणे बनवले? ती नसती तर आज मानवी खाद्य संस्क्रुती काय असती? लेणी खोदायला कोणते क्षत्रीय वा ब्राह्मण आले होते? त्या महान कलाक्रुतींची सौदर्यपुर्ण निर्मिती करणा-या, वैद्न्यानिक द्रुष्टीकोन असणा-या त्या पाथरवट (वडारी) समाजाचे मानवी संस्क्रुतीवर गेली ५ हजार वर्ष उपकार आहेत. असेच आपण सुतार, तेली, कोळी-कोष्टी, अशा अठरापगड जातींबद्दल बोलु शकतो. त्यांना आज समाजव्यवस्थेने आणि नव्या अर्थव्यवस्थेने कोठे ढकलुन दिले आहे? या निर्मानकर्त्या लोकांवर आक्रमणे होवू नयेत, त्यांचे जीवित आणि वित्त सुरक्षीत रहावे यासाठी जीवाची बाजु कोणी लावली? त्या महारक्षकांची स्थिती अत्यंत केवीलवानी कोणी केली?
रोष स्वाभाविक आहे. पण हे सारेच मुळात निर्मानकर्ते आहेत तसेच लढावुही आहेत. भविष्यातील वाट ही हातात हात धरुनच पुढे गेली तर राजकीय सत्ता आणि मग सर्वांचेच ख-या अर्थाने विकसन संभाव्य आहे. "जातीचे नको...विचारांचे मताधिक्य हवे" हे बाबासाहेबांचे मत येथे नुसते उपयुक्त नाही तर ते अत्यंत व्यापक संदेश देते असेच मला येथे नमुद करावेसे वाटते.
आपली सांस्क्रुतीक पाळे-मुळे शोधत नव्याने सांस्क्रुतीक फेरआखनी करत आपल्याला भवितव्यातील नवसंस्क्रुतीचा एल्गार केला पाहिजे. जगभरात खालुन वरचा इतिहास" लिहिला जात आहे. आपल्यालाही सामान्य माणसांचा/जातीघटकांचा उज्ज्वल इतिहास, त्याचे संस्क्रुती घडवण्यातील योगदान सतत्याने संशोधन करत मांडले जायला हवे. त्यातुनच सर्व समाजांना आपापले आत्मभान मिळवता येइल. आजच्या विभक्तीकरणातील मुळचे एकाकारत्व पहावे लागणार आहे.
३. वैचारिक सत्ता: वैचारीक सत्ता जोवर प्रबळ होत नाही तोवर जातीअंत होणे शक्य नाही. विचारशील समाजच खरी सामाजिक क्रांती घडवुन आणु शकतो. नव्या विचारांचे सर्जन, संवर्धन आणि जोपासना हे कोणत्याही सुध्रुढ समाजाचे अव्यवच्छेदक लक्षण असते. ही वैचारीक सत्ता म्हणजे कोणाला तुच्छ वा हीन लेखण्यासाठी नसुन स्वतंत्रपणे प्रगल्भ उंची गाठणे व सर्वंच्याच कल्याणासाठी अभिप्रेत असते. भारतात युरोपात जशी मध्ययुगात कला ते साहित्य, अर्थव्यवस्था ई. क्षेत्रात फार मोठी वैचारीक क्रांती झाली. त्यामुळे जगाचा चेहरा-मोहरा बदलला. महात्मा फुले आणि डा. बाबासाहेब आंबेडकरांनी तशी वैचारीक क्रांती देशात घडवली...पण आपण तेथेच थंबलो आहोत. त्या वैचारिकतेचे संवर्धन आणि जोपासना करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत. समता-बंधुता-स्वातंत्र्य या संकल्पना कागदावरच राहिल्यात कि काय असे वाटण्याची स्थिती आहे.
भवितव्य घडवलेच पाहिजे. तेही विराट. त्यातच राष्ट्राचा आणि शोषित समाजांचा अभ्युदय आहे.



4 comments:

  1. हिंदु धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो आहे।
    tya aadhi caste certificate madhun HINDU haa shabd kadun dakhvaa magach pudche bola.

    HINDU manun RESERVATION cha fayda geichaa ani gungaan baudh dharmache gayache

    wa re wa

    ReplyDelete
    Replies
    1. जयेंद्रसिंह रावल, तथागत गौतम बुद्धांच एक वाक्य आटवल करानाशिवय काही होत नाही प्रत्येक गोष्टीला कारण असते.
      हिंदु धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्विकार करतो आहे????कारण वर्ण व्यवस्था, जातीय विषमता आणि ज्या धर्मा मध्ये माणूस माणसाच्या स्पर्शाने बाटतो आणि जनावराच्या मुत्राने
      शुद्ध होतो असा धर्म त्याग केला आणि स्वतंत्रता,समानता,बंधुता आणि न्याय असलेल्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला.
      २. caste certificate मधून हिंदू शब्द हा काढून टाकल आहे तेही १९५६ नंतर
      ३. आरक्षण हे जातीच्या आधारे देण्यात आले आहे तेही टक्केवारी नुसार.
      बघू कसे? हे १००% मधले खालील ५०% आराक्षण मग राहिलेल ५०% आरक्षण कोणाचे
      ह्याचा विचार केला का????

      ☑संपूर्ण आरक्षण = 50%.

      ☑ओबीसी = 27%

      ☑NT+ ST = 10 %

      ☑SC = 13%

      आता SC मधे 60 जाती

      त्यात 1 बौद्ध बाकिचे सर्व हिंदु

      म्हणजे

      बौद्धांन्ना 50 %पैकि फक्त 0.21% आरक्षण

      आणी बाकीचे सर्व हिंदूना

      तरिही म्हणतात बाबासाहेबांनी बौद्धांना सर्व

      आरक्षण दिले..


      Delete
  2. @Jayendrasingh Rawal saheb

    nav baudh mhanun suddha reservation bhetate.

    mala watate baudh dharm ha fakt gharat samorachya kholit buddhacha photo thevanya purata maryadit nasava.

    me social network war bhagato ki bhuddhacha prachar ha,hindu war clesh karun kela jato je 100% chuk ani buddha dharmahya ulat aahe.

    buddhacha prachar ha fakt dhamma padanech kela pahije,jenekarun fakt tathakatit pidit navhe tar purna manav jatila fayada hoil,ani yanech sarv bharat baudhmay hovu shakato.nahitar babasahebanche swapna dwesh pasarun purna hovu shakat naahi.

    etaranana nave thevanya aadhi apan swata kiti pratindeche palan karato he pahile pahije pratek ambedkar wadyane.

    ReplyDelete
  3. डॉ .बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीचे अध्यक्ष होते.
    त्या "समितीने" घटना बनविली आहे.
    फक्त आंबेडकरांनी नाही.
    त्या घटनेत इतक्या दुरुस्त्या का झाल्या ?इतकी तिची बांधणी कच्ची होती का ?अपूर्ण होती का?
    तेकौतुकास्पद ठरते काय ?

    रिपब्लिकन पक्षाची वाताहात झाली आहे.
    त्यांची शिबिरे - उत्सव - होतात,संमेलने होतात त्यावेळी सर्वत्र रेल गाड्या भरून येत असतात
    मुंबईला माणसांचा महापूर येतो.
    अत्यंत बेशिस्त , मस्तवाल ,फुकटे आणि तोंडाला देशी दारूचा दर्प असणारे हे सगळे २ दिवस
    मुंबईत धुमाकूळ घालतात.

    हिंदूंमध्ये प्रत्येक राजा जसा स्वतःला विक्रमादित्याचा रेफरन्स देण्याचा प्रयत्न करत असतो , तसेच बुद्ध आणि जैन लोक
    आमचे या आधी अमुक तीर्थंकर होऊन गेले असे सांगण्याचा आटापिटा करत असतात.तात्पर्य आमचा धर्म तुमच्या पेक्षा जुना आहे वगैरे.

    बौद्ध धर्म आणि धर्म सत्ता जर सुदूर चीन , जपान , इंडोनेशियात पसरली होती तर ती इथेच कशी घसरणीला लागली ?
    गौतम बुद्ध कशाने मेला ?सडके मांस भक्षण करण्याचा मोह झाल्यामुळे का ?
    त्याने आपला लाडका शिष्य आनंद याला मृत्यू समयी दूर का पाठवले ?
    कृपया यावर कुणी प्रकाश टाकेल का ?

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...