Sunday, December 25, 2011

मुस्लीम आरक्षण: काही विचार

मुस्लिमांना साडेचार टक्के आरक्षण देण्याचा केंद्राचा विचार दिसत आहे व त्यावर सध्या वादंगही होत आहे. प्रा. हरी नरके यांनी याबाबत तात्काळ लेख लिहुन ही चाल ओबीसींत फुट कशी पाडु इच्छिते यावर दै. सकाळमद्धे लिहिलेच आहेत. माझे विचार असे आहेत:

१. ओबीसी असणारे मुस्लिम फक्त भारतातच आहेत. इस्लामला खरे तर मुळात जातीप्रथा मान्य नाही. या ओबीसी मुस्लिमांनी आपण मुस्लिम नसल्याचे जाहीर कबुल करावे आणि आजवर ओबीसी मुस्लिम आहोत म्हणुन जे आरक्षण घेतच आहेत ते हिंदु म्हनवत खुशाल चालु ठेवावे...अन्यथा आहे तेही ओबीसी म्हणुनचे आरक्षण रद्द करण्यासाठी हिंदुंना आंदोलन करावे लागेल.

२. इस्लामची आर्थिक दिवाळखोरी ज्या धर्मांध मुल्ला-मौलवींमुळे होत आहे त्यांना धि:क्कारायची लायकी नसणा-यांनी धर्मही जपायचा आणि ज्या धर्मात मुळात जातीच असू शकत नाही त्या जातीही जपायच्या हा दुटप्पीपणा चालु शकत नाही. We have denounced Brahmin superiority...when and how you the people are going to refute Mulaa and maulavi's techeangs? Change or perish!

३. मुस्लीम ओबीसी हा शब्दच भ्रामक आहे. त्यांनी धर्म बदलला शेकडो वर्षांपुर्वी त्यांनी मुळ हिंदु जाती मात्र जपल्या ही त्यांची मानसिक दुभंग समस्या आहे. त्यांना ओबीसी म्हणुन कसलेही आरक्षण मिळता कामा नये.

४. आहे हे आरक्षणच आम्ही नाकारत आहोत, नवे कसे आणि कोण देनार याबाबत आम्हाला कठोर भुमिका घ्यावी लागणार आहे. ओबीसींचा गैरवापर करत त्यांच्याच ताटावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणा-यांचा जाहीर निषेध. हा निषेध उद्या व्यापक आंदोलनात बदलेल याची खात्री बाळगा!

५. मुस्लिमांच्या दैन्याची आणि त्यांच्या समस्यांची पुरेपुर जाणीव आहे म्हणुनच ओबीसी हे गतकालातील हिंदु बांधव म्हणुन त्यांचे २७ टक्क्यांतील आरक्षण आम्ही विनातक्रार स्वीकारले आहे. आता तेही आम्हाला नाकारावे लागेल. उदारता ही कोणी आणि किती दाखवायची याला एक सीमा असते. ती सीमा ओलांडायचे कार्य जे स्वत:ला अश्रफ मुस्लिम समजतात, अन्य मुस्लिमांना अजलाफ (हीण) समजतात, त्यांनी करणे म्हणजे एक नवा इस्लामी मनुवाद आहे. त्याचा धि:क्कार करणे क्रमप्राप्त आहे.

६. मतांसाठी कोंग्रेस कितीही खालच्या पातळीवर जावू शकते. हा पक्ष नव्हे तर समाजविघातक प्रणाल्या राबवत आपल्या आकांक्षा एन-केन-प्रकारेन साध्य करु इच्छिणा-या झुंडीचा समुदाय आहे हे आजवर वारंवार सिद्ध झाले आहे. त्याचा निषेध करणे क्रमप्राप्त आहे.

७. जातीप्रथा आणि त्यातील अन्याय्य समाजपद्धती हे फक्त हिंदु धर्माचे अंग आहे. ज्यांनी या अन्याय्य पद्धतीला लाथ मारुन दुसरा धर्म स्वीकारला आहे, आणि धर्म बदलुन २-५ पीढ्या उलटुन गेल्या आहेत त्यांनी आरक्षण मागणे हे अनैतीक आणि अन्यांना धर्मबदल करण्यास नकळत प्रोत्साहन देनारे आहे. मी या चालीचा स्पष्ट निषेध करतो.

८. इस्लामीयांच्या समस्या या त्यांच्या धर्मात त्यांनीच जोपासलेल्या अंध धार्मिक परंपरांत आहेत. बागबान, हजाम, ई. मुळच्या जाती त्यांनी शब्दश: बदल करुन चालु ठेवल्या म्हणुन ते ओबीसी होवु शकत नाहीत, कारण इस्लामला मुळात जातीप्रथा मान्य नाही आणि व्यवसायाधिष्ठित बागबानादि नांवे कायम राहिली म्हणुन ते ओबीसी होवू शकत नाहीत. अतैव त्यांना कसल्याही प्रकारचे आरक्षण देण्याची आवश्यकता नाही. उलट आहे ते ओबीसी म्हणुनचे, तेही काढुन घेतले पाहिजे. वेगळे, तेही ओबीसी कोट्यातुन देणे ही तर दुरची बाब राहीली. धर्माच्या नांवाखाली आरक्षण देण्याची सोय मुळात घटनेतच नाही...

९. कोंग्रेसने असा राजकीय पेच टाकला आहे कि या घोषणेला विरोध करणा-यांची राजकीय पंचाईत होइल. ओबीसी राजकारण करणा-यांची तर अधिकच. पण हा प्रश्न मुळात राजकीय नसुन सामाजिक स्वास्थ्याचा आहे. दोन धर्मात उगा आग पेटवण्याचा आहे. ज्या ओबीसी मुस्लिमांना आधीच आरक्षण आहेच आणि ज्याला आजवर हिंदु ओबीसींनी आक्षेप घेतला नव्हता, तो घेण्याची जाग यामुळे आली आहे आणि त्याचे फलित काय हे येणारा काळच ठरवेल.

१०. हिंदु ओबीसी हे मुळात सामाजिक द्रुष्ट्या विखंडित आहेत...अक्षरश: काही हजार तुकड्यांत वाटले गेले आहेत, त्यांना राजकीय-सामाजिक आणि आर्थिक द्रुष्ट्या वारंवार वापरले जात आहे. पण ते कधीच एक होणार नाहीत या भ्रमात सरकार आहे. मी येथे स्पष्टपणे सांगतो कि ओबीसी (म्हनजे निर्माणकर्ता समाज) एक झाला तर यांची भंबेरी उडणार आहे. आणि हे आज ना उद्या होइलच. आज मात्र त्यांना अगदीच ग्रुहित धरले जात आहे आणि काहीतरी असंसदीय बाष्कळ घोषणा करत फुटीचे राजकारण केले जात आहे.

आणि हे शासनाच्या, वर्चस्ववाद्यांच्या अंगलट येईल हे मात्र नक्की!




7 comments:

  1. गम्मत आहे.
    मराठा समाज OBC आरक्षण मागतो आहे पण त्यांना काही ते मिळत नाहीये.. OBC लोकांचा पण त्याला ठाम विरोध आहे.
    आणि मुस्लीम समाजाची मागणी नसताना सुद्द्ना त्यांना OBC कोट्यापैकी ४.५% आरक्षण बिनबोभाट मिळाले. .. ह्याला मात्र OBC लोकांचा विरोध दिसत नाही (दिसला तरी खूप कमी प्रमाणात)

    थोडक्यात काय, तर एक हिंदू दुसर्या हिंदूला खूप पटकन विरोध करतो, पण जेव्हा मुस्लिमांचा संभंध येतो तेव्हा त्यांची पंचाईत होते.

    (मुस्लीम आरक्षणाला पण "बामणी कावा" असे अजून तरी कोणी म्हणाले नाही.. पण असे म्हणण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण प्रत्येक गोष्टीचे खापर ब्राह्मनान्वरच फोडले पाहिजे ना)

    ReplyDelete
  2. The basis of reservation is social & economical status of the community. In all parameters OBC Muslims fit into this. Therefore, they deserve this reservation category. Hari Narke & his followers are not supreme. If OBC Muslims do not get reservation then no any other OBC should get it. Narke and his team are showing their true colours. Their Equality ( Samata) is for their own benefit only. This article has exposed their greedy & narrow mentality.Vijay Taware

    ReplyDelete
  3. Muslim OBC's already have reservation within OBC quota. The opposition is to separate them and creat rift between two communities without any rhyme or reason!

    ReplyDelete
  4. मुळात मुस्लिम ओबीसी म्हनवणारे, अगदी ख्रिस्ती ओबीसीही २७% तील आरक्षणाचे लाभार्थी आहेतच. हे नवे आरक्षण लागु केले तर ते मुस्लिमांतील अश्रफ गटालाही मिळेल...जे मुळात घटनेला मान्यच नाही. समजा घटना बदलावी लागली तर मग ब्राह्मण-मराठ्यांनाही का आरक्षण नको हा प्रश्न उपस्थित होईल. मी व्यक्तिशः जातीधारीत आरक्षणाच्या विरोधात आहे. मी वा माझ्या कोनत्याही कुटुंबियांनी त्याचा कधी लाभ घेण्याचा विचारही केलेला नाही. आणि जे सक्षम आहेत त्यांनी करुही नये. परंतु हा मुद्दा पुर्णतया तात्विक आहे. काही ढिओंगी सोडले तर जातीयता व त्याची तीव्रता कशी कमी होइल याबाबत हिंदु सातत्याने विचार करत असतात. सनातन्यांचा अपवाद सोडला तर त्याचे स्तोमही कोणी माजवत नाही. हिंदुंनीच जेवढे हिंदु धर्मावर प्रहार केले असतील तेवढे कोणीच केले नसतील...(त्यात मीही आलो) पण या प्रहारांचा उद्देश्य हिंदु धर्म नष्ट व्हावा हा नसुन त्यातील अन्न्याय्य बाबी एकदाच्या नष्ट व्हाव्यात एवढाच असतो. भारतीय मुस्लिम वा ख्रिस्त्यांमद्धे दुर्दैवाने ते साहस नाही. त्यांना एकत्रीत मतांच्या जोरावर सरकारला फारसा आग्रह न धरता वा आंदोलने न करताही सहज झुकवता येते. हिंदुत्ववाद हा हिंदु धर्माला लागलेला एक प्रकारचा कलंकच असल्याने ८५% हिंदु असुनही त्यांना संपुर्ण बहुमत मिळत नाही. त्याबाबतची बौद्धिके ते घेतील तेंव्हा घेतील...पण मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण देणे हे देशविघातक आहे हे नक्की. एवढेच नव्हे तर सध्या ओबीसी कोट्यातील मुस्लिम ओबीसींना जे आरक्षण मिळते तेही रद्द व्हायला हवे. त्यांची आर्थिक, शैक्षणिक स्थिती जीही काही आहे त्याला भारतीय समाज जबाबदार नसुन ते स्वतः आणि त्यांचे मुल्ला-मौलवी आणि मदरसे चालवणारे जबाबदार आहेत. एकाच देशात दोन शिक्षणप्द्धती कशा अस्तित्वात असु शकतात? खरे तर खास विधेयकाद्वारे सर्वप्रथम मदरशांवर बंदी घातली गेली पाहिजे व मुख्य प्रवाहातील शिक्षण पद्धतीत त्यांना सामावुब्न घ्यायला भाग पाडले पाहिजे. त्यासाठी ओबीसेंतील आरक्षण द्यायला आम्ही अत्यंत उदारपणे तयार आहोत.

    अशरफ मुस्लिम हे एकतर मुळात अफगाणिस्तान वा अरबस्तानातील आहेत. काही त्यांत उच्चवर्णीय हिंदु धर्मांतरीतही आहेत. त्यांना अजलाफ (हीण) मुस्लिमांच्या समस्यांशी काहीएक घेणेदेणे नाही. आणि हेच अजलाफांच्या लक्षात येत नसेल तर तो दोष कोणाचा?

    बलजबरीने धर्म बदलावा लागला त्यांच्या भावना समजाव्वुन घेता येतात, पण स्वार्थासाठी जयांनी धर्म बदलला त्यांचे काय? घटनेने धर्माधारिओत आरक्षणाची सोय केलेली नाही. पण त्याच वेळीस युक्तिवाद असा होतो कि जे शिक्षण्/आर्थिक आणि सामाजिक द्रुष्ट्या पिछाडीवर आहेत त्यांना आरक्षण मिळावे हा घटनाकारांचा रोख आहे. माझे मत असे आहे कि ज्या मुस्लिमांनी भारतावर किमान पाचशे वर्ष सत्ता गाजवली, ज्या ख्रिस्त्यांनी दिडशे वर्ष सत्ता गाजवली, त्यांना राजकीय-आर्थिक मागास कसे म्हटले जावु शकते? प्रत्त्येक घरांत राजा-सरदार असायला हवा होता ही काय पुर्वअट झाली कि काय? धर्म कोनत्याही प्रकारे बदल्;अला असेल, पण नव-धर्मातील फायदे त्यांनी उपटलेलेच आहेत.

    याचाच अर्थ असा कि ख-या अर्थाने गेली किमान हजार वर्ष सर्वच बाबींपासुन वंचित राहिलेला समाज, मग ते ओबीसी असोत कइ बीसी एस टी, एन टी...त्यांना मुख्य प्रवाहात आनण्यासाठी त्यांना हात देणे श्रेयःस्कर कि ज्यांनी नव्या काळाशी जुळवुन न घेता नबाबशाही वा शिवशाही वा पेशवाईतच रममाण व्हायचे ठरवले आहे, आणि आज जे आपनही दरिद्र आहोत असा घोष लावत आहेत त्यांना, यावर गंभीर विचार करण्याची आवश्यकता आहे.

    संधी असुनही प्रगती न करु शकलेले आणि संधीच नाही म्हणुन मागास राहिले त्यांच्यात फरक करावाच लागतो.

    ReplyDelete
  5. If Ashraf muslims are foreigner then many communities are in Hindu religion are so. All muslims are equal and part of India. You are saying Muslims and Christians ruled India for a long time. Correction Not all Muslims but Turks(Mughals) ruled India similarly not Christians but British ruled India. Before and after their rules, Hindus are ruling for thousands still some of them need reservation.The basis of reservations must be reviewed periodically. Some communities like Mali in Maharashtra or Yadav in UP do not deserve reservation on social parameters. It is a time to change the system.

    ReplyDelete
  6. आर्थिक निकषावरच आरक्षण आधारित असावे हे मान्य करण्यासाठी आपणाला किती वर्षे लागणार आहेत नकळे.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...