Wednesday, March 7, 2012

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर!

जागतीक पातळीच्या इतिहाससंशोधकांनी आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीचा सन्मान दिलेल्या भीमाबाई होळकरांना आमच्या इतिहासाने मात्र काळाच्या कालकुपीत दफन करुन ठेवले आहे, हे एक दुर्दैवच आहे. आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने अठराव्या शतकात शिक्षित असलेली, परंपरेच्या जोखडाखाली न वाढवली गेलेली, पिता यशवंतराव होळकरांच्या पावलावर पाउल ठेवत ब्रिटिशांशी सर्वकश युद्ध पुकारणारी ही महान वीरांगना.

भीमाबाईंचा जन्म १७९७ मद्धे पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता इंग्रजांचे कर्दनकाळ, आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर. दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले. त्यांची सुटका यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव केल्यानंतर झाली. तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षनाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. ब्रिटिश विदुषि मेरी सदरल्यंड म्हणतात, ज्या काळात भारतात महिलांना गोषात रहावे लागे, शिक्षणाचा विचारही नव्हता, अत्यंत बंदिस्त व मानहानीचे जीवन जगावे लागे त्या काळात, यशवंतरावांसारख्या द्रष्ट्या पुरुषाने भीमाबाईला शिक्षण देने व लढवैय्याही बनवणे ही एक क्रांतीकारक घटना होती. अर्थात अशी सामाजिक क्रांती होळकर घराण्याला नवीन नव्हती. अहिल्याबाई होळकर स्वत: शिक्षित तर होत्याच पण त्या काळात भालाफेकीत त्यांचा हात धरणारा कोणी पुरुषही नव्हता. एवढेच नव्हे तर जगातील पहिले महिलांना लष्करी प्रशिक्षण देणारे विद्यालयही स्थापन करुन महिलांची बटालियन उभारली होती. या बटालियनला घाबरुन रघुनाथराव पेशव्यालाही पळुन जावे लागले होते.

यशवंतरावांचा ब्रिटिशांशी संघर्ष सुरु असला व एका मागोमाग एक अशा अठरा युद्धांत त्यांना पराजित करत राहिले असले तरी परिवाराकडे त्यांनी दुर्लक्ष केले नाही. भीमाबाईचा विवाह धारचे संस्थानिक गोविंदराव बुळे यांच्याशी झाला. यशवंतरावांनी आपल्या लाडक्या कन्येला पेटलवाड येथील जहागीरही व्यक्तिगत उत्पन्नासाठी दिली. परंतु विवाहानंतर दोनेक वर्षातच भीमाबाईवर वैधव्य कोसळले. त्या परत माहेरी आल्या व यशवंतरावांनी भानपुरा येथे सुरु केलेल्या तोफांच्या कारखान्याचे व नवीन लष्कर भरतीचे काम पाहु लागल्या. त्यांना उत्तम अश्वपरिक्षा अवगत होती. त्यामुळे भारतभरातुन यशवंतरावांनी एक लक्ष घोडे आपल्या सैन्यासाठी विकत घ्यायचा सपाटा लावला होता त्यात निवडीची मुख्य भुमिका भीमाबाई बजावत होत्या. यशवंतरावांचा भारतीय स्वातंत्र्यासाठी कलकत्त्यावर इस्ट इंडिया कंपनीच्या मुख्यालयावरच हल्ला करण्याचा बेत होता. पण दुर्दैवाने मेंदुतील गाठीच्या आजाराने यशवंतरावांचा २८ आक्टोबर १८११ रोजी भानपुरा येथे अकाली म्रुत्यु झाला. त्यावेळीस भीमाबाईंच्या धाकट्य भावाचे, मल्हारराव तिसरा याचे वय होते फक्त सहा वर्ष. महाराणी तुळसाबाई या मल्हारराव (तिसरे) यांच्या रीजंट म्हणुन कारभार पहात असतांना भीमाबाई लष्करी फेररचनेत व्यस्त होत्या. यशवंतरावांच्या म्रुत्युमुळे होळकरी सम्स्थान ताब्यात घेता येईल या कल्पनेत इंग्रज रमाण होते व तसा प्रयत्नही करत होते, पण त्यांना यश येत नव्हते. कारण तत्कालीन भारतात होळकरांचे लष्कर बलाढ्य मानले गेलेले होते. शेवटी इंग्रजांनी कपटनीतिचा आश्रय घेतला. गफुरखान या होळकरांच्या सेनानीला त्यांनी जाव-याची जहागिरी देण्याचे आमिष दाखवत फोडले. या घरभेद्याने १९ डिसेंबर १८१७ रोजी महाराणी तुळसाबाईंचा निर्दय खुन केला व त्यांचे प्रेत क्षिप्रा नदीत फेकुन दिले.

त्याच वेळीस भीमाबाई आणि मल्हारराव (तिसरे) सर थोमस हिस्लोप या माल्कमने पाठवलेल्या ईंग्रज सैन्याचा सेनापतीशी मुकाबला करण्याच्या तयारीत महिदपुर येथे होते. मल्हाररावाचे वय त्यासमयी फक्त बारा वर्षाचे होते तर भीमाबाईचे वय होते वीस. त्या घोडदळाचे नेत्रुत्व करत होत्या. २० डिसेंबरला सकाळी युद्ध सुरु झाले. दुपारी तीन वाजेपर्यंत होळकरी सेना इंग्रजांना कापुन काढत विजयाच्या क्षणापर्यंत पोहोचली होती. पण ऐन मोक्याच्या वेळी गफुरखान आपल्या सैन्यासह रणांगणातुन निघुन गेला. हाती आलेला विजय त्याच्या गद्दारीमुळे निसटला. याबाबत लुत्फुल्लाबेग नामक तत्कालीन इतिहासकार लिहितो कि, जर गफुरखानाने जागिरीच्या लोभापाई गद्दारी केली नसती तर इंग्रजांचे नाक ठेचले गेले असते व त्यांना भारतावर राज्य करणे अशक्य झाले असते.

या युद्धानंतर मल्हाररावाला इंग्रजांशी मंदसोर येथे तह करावा लागला. पण भीमाबाई मात्र आपल्या तीन हजार पेंढारी घोडदळानिशी निसटली होती. इंग्रजांशी तिचा लढा थांबणार नव्हता. तिने अक्षरश: अरण्यवास पत्करला व पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत गनीमी काव्याचा मंत्र जपला. तिने माल्कमच्या सैन्यावर गनीमी हल्ले सुरु केले. इंग्रज खजीने लुटले. अनेक तळ उध्वस्त केले. मार्च १८१८ मद्धे तर खुद्द माल्कमच्या सेनेला अचानक हल्ला करुन असे झोडपले कि माल्कमलाच पळुन जावे लागले. इंग्रजांनी भीमाबाईची खरी शक्ती तिचे पेंढारी इमानदार सैन्य आहे हे लक्षात घेवुन पेंढा-यांविरुद्धच मोहीम हाती घेतली. पेंढा-यांना पुनर्वसनाच्या, जमीनी-जागीरी देण्याच्या आमिषांचीही बरसात केली. त्यामुळे अनेक पेंढारी भीमाबाईला सोडुन जावु लागले. आपल्या पित्याप्रमानेच भीमाबाईने भारतातील सम्स्थानिकांना बंड करण्याची पत्रे पाठवण्याचा सपाटा लावला होता पण कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. माल्कम तर पिसाळुन भीमाबाईच्या सर्वनाशासाठे भीमाबाईचा माग काढत होता, पण भीमाबाई आज येथे तर उद्या तिथे. तिने इंग्रजी तळांना अचानक हल्ले करुन लुटण्याचा धडाका लावलेला होता. भीमाबाईवरील मोहीम यशस्वी व्हायचे नांव घेत नव्हती. माल्कमने पुन्हा कपटाचा आश्रय घेतला. त्याने भीमाबाईचा मुख्य सेनानी रोशन खान ह्यालाच फितुर करुन घेतले. भीमाबाईचा तळ धारनजिक पडला असतांना त्याने ती खबर माल्कमला दिली. माल्कमने तातडीने विल्ल्यम केइर या नजिक असलेल्या सेनानीला भीमाबाईवर हल्ला करण्यास पाठवले. चहुबाजुंनी घेराव पदला. यावेळीस दुर्दैव असे कि एकाही सैनिकाने शस्त्र उचलले नाही. ते सरळ भीमाबाईला एकाकी सोडुन निघुन गेले. भीमाबाईला कैद करण्यात आले. रामपुरा येथील गढीत त्यांना बंदिस्त करण्यात आले. पुढे नोव्हेंबर १८५८ मद्धे भीमाबाईंचा म्रुत्यु झाला. कैदेतच जन्म आणि कैदेतच म्रुत्यु असे दुर्दैव या थोर महिलेच्या वाट्याला आले. पुढचे दुर्दैव हे कि ज्या अखिल भारताच्या स्वातंत्र्यासाठी जिने संगर मांडला तिला भारतवासी चक्क विसरुन गेले. ती काही आपल्या संस्थानासाठी लढत नव्हती...ते शाबुतच होते...पण आम्हाला झाशीची राणी, जी फक्त आपल्या दत्तकविधानासाठी लढली, फक्त स्वत:च्या संस्थानासाठी लढली तिच्याबाबत आदर असला तरी गवगवा मात्र अचाट असतो ...पण ही आद्य स्वातंत्र्यवीर महिला मात्र माहित नसते.

आज जागतीक महिला दिनाच्या निमित्ताने जगाने दखल घेतलेल्या या आद्य महिला स्वातंत्र्य सेनानीला विनम्र अभिवादन करुयात, तिच्या स्म्रुती जतन करण्याचा प्रयत्न करुयात व भारतात अशा अगणित भीमाबाई जन्माला याव्यात अशी अपेक्षा व्यक्त करुयात!

------संजय सोनवणी

13 comments:

  1. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर यांना कोटी कोटी प्रणाम...!!!

    संजय सर, ही माहिती खरच नवीन होती.भारतात अश्या अनेक महिला सेनानी असतिल ज्यांचा इतिहास आज ही अनभिज्ञ आहे.ही माहिती दिल्या बद्दल धन्यवाद...!!!

    ReplyDelete
    Replies
    1. खरे आहे हिमांशुजी, या निमित्ताने मीही आपल्याबरोबरच भीमाबाई आणि झलकारीबाई (ज्या अद्न्यात होत्या आणि अजुन अशा असंख्य अद्न्यात वीरांगना असतील)आणि त्याचबरोबर राणी चेन्नम्मा, ताराराणी, तुळसाबाई, जिजाऊ, अहल्याबाई ते राणी बंग, अहिल्याबाई रांगनेकर, आद्य स्त्रीवादी लेखिका ताराबाई शिंदे, आद्य महिला संपादक तान्हुबाई बिर्जे, तारा रेड्डी, आद्य समाजैतिहासकार मुक्ता साळवे, दुर्गा भागवत, महान कवयत्री शांताबाई शेळके, पहिली स्त्रीवादी कादंबरीकार विभावरी शिरुरकर उर्फ मालती बेडेकर अशा अगणित द्न्यात आणि इतिहास घडवणा-या महान स्त्रीयांना विनम्र अभिवादन. स्त्रीशक्ती हीच खरी आदिशक्ती आहे. स्त्रीयांचा सन्मान आणि समान अधिकार मानत नाहीत त्यांना बदलवण्याची एक गरज आहे. या देशातुन कौटुंबिक न्यायालये नष्ट होतील तो खरा सुदिन. ही क्रांती स्त्री व पुरुषाला बरोबरीने घडवायची आहे. महिला दिन हा वर्षातुन एकदा कशाला...तो रोजच का नको?

      Delete
  2. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर यांना कोटी कोटी प्रणाम ...........
    आणि तटस्थ पने इतिहासाचे लिखाण करणाऱ्या इतिहासकाराला विनम्र अभिवादन...........

    ReplyDelete
  3. आद्य महिला स्वातंत्र्य सेनानी भीमाबाई होळकर यांना कोटी कोटी प्रणाम !

    अप्रतिम लेख सर :)

    पुन्ह: एकदा खुप खुप धन्यवाद !

    ReplyDelete
  4. सचीन, सुदर्शन, धन्यवाद. तुमची तरुण पीढी ही या प्रेरणांतुन नवी सामाजिक क्रांती घडवो हीच शुभेच्छा. गतकालाचे अभद्र ओझे नको, त्यातील विजिगिषु आणि परिणामांची पर्वा न करता अखिल समाजासाठी, त्यांच्य भल्यासाठी ज्यांनी आपले जीवन वेचले त्यांचा आदर्श ठेवा. जग श्रीमंतांचा इतिहास लिहित नसते तर ज्यांनी जग बदलवले वा प्रयत्न केला त्यांचेच अस्तित्व अजरामर ठेवत असते. कालांधारात कोणी ठरवले तरी कोणाला ठेवता येत नाही कारण त्यांचा प्रेरणादायी इतिहास मातीच्या कणाकनातुन कधीतरी कोणाच्या तरी माध्यमातुन विस्फोटत बाहेर येतच असतो, मी एक माध्यम आहे आणि ती परमेश्वराने केलेली तात्कालीक निवड आहे एवढेच. अशा असंख्य निवडी होतील, तुमच्या श्वासातुन, धमन्यांतुन इतिहास आक्रोश करत बाहेर उसलत येत तुम्हाला प्रेरणा देईल.

    तुम्हीच जग बदलवाल. कदाचित त्यासाठीच मला इतिहास शोधावा असे वाटले असेल. यात माझा सहभाग हा केवळ एक विनम्र अभ्यासक एवढाच आहे. मी तुमचे आभार मानतो कि तुम्ही किमान भुतकालीन महत्तांचा सन्मान करता. तुम्हेच वर्तमान आणि भवितव्य घडवायचा प्रयत्न कराल ही आशा आणि त्यासाठी शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. भीमाबाई होळकर यांची हि सर्वचं माहिती इतिहास वाचकांच्या व अभ्यासकांच्या दृष्टीने नवीन आहे. या अजिबात संशय नाही कि, इतिहास लेखकांचा दृष्टीकोन मराठ्यांचा राजकीय इतिहास आणि फक्त पेशवाई यांपुरता मर्यादित राहिल्याने अशा कैक भीमाबाई अजूनही अज्ञात राहिल्या आहेत. श्री. सोनवणी यांचा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे कि, अशा अज्ञात इतिहासाला ते प्रकाशात आणत आहेत.

      Delete
  5. धनगर समाजाचा इतिहास अंधारात आहे याला समाज जवाबदार आहे. आणि जे लोक अभ्यास करू इच्छितात त्यांना अपमानित करणे..इतिहासाला तटस्थ पणे पाहण्याची दुर्ष्टी हरवल्याची इतिहास करांची दिसून येते.

    भीमाबाई होळकरांचा इतिहास माहित नाही हे पूर्ण भारताचे दुर्द्यव म्हणावे लागेल..

    ReplyDelete
    Replies
    1. विट्ठल खोतसाहेब, आपण माझ्या लेखांमधील अनेक मुद्दे तसेच्या तसे स्वत:च्या नांवावर अन्यत्र अनेक संकेतस्थळांवर टाकत असता हे माझ्या निदर्शनास आज सहज शोध घेता आले आहे. असे करंणे हे अनैतीक असुन किमान मुळ लेखकाचा उल्लेख करणे आवश्यक असते हे आपणास कदाचित माहित नसेल. पुन्हा अशी चुक घडु नये ही अपेक्षा.

      Delete
    2. आदरणीय संजय सर , क्षमा करा असे झाले आहे मी काही माझे स्व्हाता चे व इतर वाचलेले मुद्धे मांडताना तुमच्या मुद्ध्यांचा पण आधार घेतला होता. पण आपण ते मुद्धे माझ्या निदर्शनात आणून दिले तर मी तुमचे नाव नमूद अवश्य करेन..

      मी लेखक / कवी नसल्यामुळे मी copy Right कायादेद्याची मला जास्त माहिती नाही. परंतु तत्काळ मुद्धे निदर्शनास आणून द्यावे हि विनंती...

      पण भविष्यात जर मी पुस्तक लेखनाचे काम केले तर मी आपल्या आणि इतर प्रतिभावंत लेखकांच्या पुस्तकांचा आधार घ्यावा लागेल आणि तशी परवानगी आणि कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन..

      Delete
    3. Now successful edition has been done. Thanks for informing me Valuable thing

      Delete
  6. ""पण आम्हाला झाशीची राणी, जी फक्त आपल्या दत्तकविधानासाठी लढली, फक्त स्वत:च्या संस्थानासाठी लढली तिच्याबाबत आदर असला तरी गवगवा मात्र अचाट असतो ...पण ही आद्य स्वातंत्र्यवीर महिला मात्र माहित नसते. ""

    yaawar jaraa adhik prakaash taaku shakaal kaa?
    kaaran majhya mate jhanshi chya ranilaa parakiyanchi cheed lahan panaa pasunach hoti. ani te suddha tich baalpanichya anek prasangaatun samajaun yete..

    ekachi resh mothi karanya sathi dusaryachi resh khodayachi vrutti ataa sampurna bahujan samajaatach disun yet aahe..

    jo uthato to brahman wadachya navakhali samajaat duhi pasarawat aahe.. ugaach khajawoon kharooj kadhanyachi lakshane aahet hi..

    ata lekhaa baddal thodese...
    jhunj hi kadambari mi waachali.. ti nemki yashawant rawanchya mrutunantar sampate..tyamule malaa khupach utsukataa laagun rahili hoti ki pudhe nakki kay jhale asel.. punyaat yeoon gelo tevaa bhandarkar ani itihas sanshodak mandalaat jaoon aalo.. pan majhi visit fakt 8-10 diwasanchi asalyane malaa ya kamaa sathi faarasa wel deta nahi alaa.. aapanaa mule pudhachi gosht thodakyat ka hoina samajali..
    sampurna lekh atishay uttam.. pan jhanshichya ranichaa upamardatmak ullekh khatakalaa.. ani te suddhaa mahila dinachyach diwashi.
    mi punyaat alo ki tumhala bhetayachi ichha aahe... wel dilyaas uttam...

    ReplyDelete
    Replies
    1. परागजी, झाशीच्या राणीबद्दल मलाही आदर आहे, परंतु तिचा अवाजवी गवगवा केला गेला आहे याबाबत मला तरी शंका नाही. राणीने उठाव सुरु झाल्यानंतर जवळपास वर्षानंतर भाग घेतला. तत्पुर्वी ती आपले दत्तकविधान मान्य व्हावे यासाठी इंग्रजांना वारंवार विनंतीपत्रे पाठवत होती. संस्थान बरखस्ती अटळ आहे हे लक्षात आल्यानंतरच तिने लढ्याचा पवित्रा घेतला. मुळात १८५७ चा उठाव हे स्वातंत्र्य युद्ध कि जिहाद कि बंड कि शिपाईगर्दी हा विवाद अद्याप शमलेला नाही. त्यामुळे माझ्या विवेचनात बहुजनवाद ई काही आहे व मी राणीचा उपमर्द करत आहे असे क्रुपया समजु नये. पण राणीची सहकारी झलकारीबाई (जीने राणीच्या वेषात स्वत: किल्ला लढवत राणीला सुरक्षित जावू दिले) नेमकी का सांगितली जात नाही हे एक न उलगडणारे कोडे आहे. भीमाबाईबदल पुर्णतया मौन का हेही उलगडत नाही. असे एखादवेळा झाले तर समजु शकतो परंतु वारंवार अनेकांच्या बाबतीत अशा हेटाळण्या अथवा विस्म्रुतीत ढकलण्याचे प्रकार होत असतील तर त्यांस काय म्हणावे?

      असो. आपण पुण्यास आल्यावर अवश्य संपर्क करा. भेटायला नक्कीच आवडेल. धन्यवाद.

      Delete
  7. आभार तुमचे कि तुम्ही हा इतिहास समोर आणला. मी इतिहसाचे वाचन करतो, पण होळकर घराण्याचा इतिहास कधी वाचनात पुरेपूर नाही आला, फक्त होळकर पानिपातातून पळाले आणि पराभव झाला या वृत्तीतून वाचन झाले. आम्हाला सांगण्यात येते एग्रजांबरोबर मराठ्याची ३ युद्धे झाली, होळंकारनी केलेल्या २७ युध्याचा उल्लेख कुठेही नाही. फार दुर्देवाची गोष्ट. तुम्हासारख्या दिग्गजांनी यावर सविस्तर लेखन करावे हि इच्छा.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...