स्त्रीयांविरुद्धचा सांस्क्रुतिक दहशतवाद ही भारतीय इतिहासातील एक भीषण शोकांतिका आहे. एके काळी भारतात असूर संस्क्रुतीची स्त्रीसत्ताक पद्धती अस्तित्वात होती. ती सातवाहनकालापर्यंत जपली गेली. त्या काळात स्त्रीयांना नुसत्या समानतेचा नव्हे तर उच्च दर्जा दिला जात होता. वैदिक धर्मीयही सुरुवातीला स्त्रीला ब-यापैकी सन्मान देत असत. यद्न्यकर्मातही तिला सहभाग घेता येत असे. पुढे स्म्रुतीकाळापर्यंत मात्र तिच्यावर क्रमश: एकामागुन एक बंधने लादायला सुरुवात झाली. मनुस्म्रुतीने तर कहरच केला. स्त्रीयांचे स्वातंत्र्य पुरेपुर नाकारत मनुने तिच्या जीवनभरच्या गुलामीची सोय लावली. स्त्री कोणत्याही वर्णाची असली तरी तिला शुद्रत्वाचा दर्जा दिला. तिचा धर्मिक दर्जा हिसकावुन घेण्यात आला. समाजात तिने कसे वागावे यावर बंधने लादली गेली. पुढे बालविवाहाची अनिष्ट प्रथा सुरु झाल्यावर तर तिच्या हालांना पारावर राहिला नाही. विधवा विवाह नाकारल्याने स्त्रीयांना कसल्या भिषण स्थितीतुन जावे लागले असेल याची कल्पना केली तरी कोणाही सुसंस्क्रुताच्या अंगावर काटा उभा राहिल्याखेरीज राहणार नाही. सती प्रथेने कळस गाठला. पार इंग्रजांचे राज्य येईपर्यंत गेल्या शतकाच्या आरंभापर्यंत ही स्थिती कायम राहिली.
हा दहशतवाद माजवता आला कारण त्यासाठी धर्माचे तत्वद्न्यानच तसे बनवले गेले. सर्वात भिषण बाब म्हणजे आजही मनुस्म्रुतीचे समर्थक स्त्रीयांवर घातलेली बंधनेच योग्य होत असा प्रचार-प्रसार करत असतात. गुजरात मधील रा.स्व.संघ प्रणित शाळामद्धे आजही सतीप्रथा किती उदात्त होती हे विद्यार्थ्यांवर बिंबवले जाते. यातुन सांस्क्रुतिक दहशतवादी जन्माला घातले जात आहेत जे आजच्या समाजासाठी विघातक आहे.
स्म्रुतींनी जाती/वर्णव्यवस्था जन्माधारित केली. महाभारत-रामायण व पुराणांच्या नवलेखकांनी (मुळ रामायण व महाभारत प्राक्रुतातीलच...पण संस्क्रुत भाषा निर्माण केल्यानंतर त्यात अनुवाद करतांना...) असंख्य धादांत खोट्या कथा निर्माण करुन त्यांचे प्रचार-प्रसारण केले. समाजावर या बाबी बिंबवण्यात आल्या. ब्राह्मण वर्चस्व हेच अंतिम सत्य आहे असा सिद्धांतही मांडला गेला. अस्प्रुष्यतेची जोड देवुन सर्वच समाज धार्मिक वर्चस्ववाद्यांच्या दास्याखाली आणला गेला. धर्माविरुद्ध ब्र काढायची सोय ठेवली नाही. असे करणा-या असंख्य संत/विचारवंतांच्या हत्याही केल्या गेल्या. अशा रितीने हा सांस्क्रुतिक दहशतवाद कायम झाला.
बरे आधुनिक युगात तरी त्याला पायबंद बसला आहे काय? तर नाही. हिंदुत्ववादी अनेक धार्मिक संघटना वैदिक वर्चस्वासाठी जीव तोडुन प्रयत्न करत आहेत. त्यासाठी या संघटना दैनिके/नियतकालिके/पुस्तके/व्याख्याने/चित्रफीती अशी साधने वापरत वैदिकाश्रयी सांस्क्रुतिक दहशतवाद पसरवत आहेत. यात रा.स्व. संघ ते सनातन प्रभातसारख्या संघटना आघाडीवर आहेत.
हा दहशतवाद वापरत असतांना ते खोट्याचा तर कधी असत्याचा तर कधी भ्रमाचा आधार घेत असतात. वेदांत सर्व आधुनिक विद्न्यान आहे, रामसेतु हा खरेच रामाने बांधला, ब्राह्मण हे मुळचे आक्रमक आर्यवंशी असुन तीच श्रेष्ठ जमात आहे, व्यास-वाल्मिकी ते कालिदासादि महाकवी हे ब्राह्मणच होते, सातवाहनादि पुराणांनी मुळची शुद्र ठरवलेली राजघराणी ब्राह्मणच कशी होती हे संशोधनाच्या नावाखाली सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, बहुजनीय पुज्य अशी अवैदिक दैवते ही मुळची वैदिकच कशी होती हे ठसवण्याचा प्रयत्न करणे ई. असंख्य मार्गांनी हा सांस्क्रुतिक दहशतवाद सुरु आहे. या दहशतवादाचा उद्देश हा मुळात वैदिक सांस्क्रुतीक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आहे हे उघड आहे. त्यात स्वजातीय हीरोंना (नेते/विचारवंत/क्रांतिकारक) यांना योग्यतेपेक्षा अवाढव्य माहात्म्य देणे याचाही अंतर्भाव आहेच. आणि जे त्यांचे म्हणने अमान्य करतात त्यांना ब्राह्मणद्वेष्टा ठरवत त्याला पुर्ण बदनाम करणे हे तंत्र वापरले जाते. या तंत्रात सावरकरवादी तर फारच पुढे आहेत.
आणि याला असणारा दुसरा पदर म्हनजे मुस्लिम/ख्रिस्ती द्वेष. त्यासाठी यांच्या प्रकाशनांतर्फे अनेकदा धादांत असत्य बातम्या प्रसिद्ध केल्या जातात वा छोट्या घटनांना वारेमाप महत्व देत भीती निर्माण करण्याचेही कार्य केले जाते.
प्रति-सांस्क्रुतिक दहशतवाद
या सांस्क्रुतिक दहशतवादाची तेवढीच दहशतवादी प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटु न लागली तरच नवल होते. ब्राह्मणी वर्चस्ववादी इतिहास नाकारत असता नवा सत्येतिहास तटस्थपणे सामोरा आणुन समाजाकडुन धन्यवाद मिळवण्याऐवजी तेवढाच खोटा आणि आक्रमक भाषेतील (कधी कंबरेखालची भाषा वापरत) लिहिणा-या काही कथित विचारवंतांची फौज निर्माण झालेली आहे. जेही काही ब्राह्मणांचे आहे ते नाकारत त्यांची कत्तल करायची भाषा करत एका समाजाला भयभीत करण्याचा प्रयत्न हा सांस्क्रुतिक दहशतवादाचाच प्रकार आहे. त्यात मराठा सेवा संघ, भारत मुक्ती मोर्चा व बामसेफ या महत्वाच्या संघटना सहभागी आहेत.
या सांस्क्रुतिक दहशतवाद-प्रतिदहशतवादाच्या परिप्रेक्षात जो सांस्क्रुतिक संघर्ष निर्माण झाला आहे त्याची परिणती पुढे हिंसक दहशत्वादात झाली नाही तर आश्चर्य वाटेल. याला पायबंद घालायचा असेल तर प्रथम वैदिकांना बदलावे लागेल. त्यांचा धर्म कधीच नष्ट झाला आहे. त्यांच्या देवता कोणीही पुजत नाही...अगदी तेही. वेदांत काही नाही...वेद पुरातन वगैरे नाहीत. जगाचा सांस्क्रुतीक इतिहास तसे कोठेही निर्दिष्ट करत नाही.
Subscribe to:
Post Comments (Atom)
सिंधू संस्कृतीची मालकी!
सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
हिंदुत्त्ववादी संघटनांचा स्त्रियांच्याविषयी किती उदात्त दृष्टीकोन आहे याची प्रचीती गेल्या काही दिवसांमध्ये कर्नाटक आणि गुजरातच्या विधानसभेत दिसून आलेली आहेच. याविषयी हिंदुत्त्ववादी संघटनांनी काय केले ? कि त्या ब्लू फिल्ममधील नायिका या मुस्लीम वा ख्रिस्ती आहेत, म्हणून त्यांना पाहणे हे क्षम्य आहे अशीच त्यांची समजूत आहे काय ?
ReplyDelete‘कपडे काढू'ब्राह्मण मुलींचे काय?
ReplyDeleteआदरणीय, संजय सोनवणी सर,
आपण योग्य विषय योग्य पद्धतीने मांडला आहे.
संस्कृती रक्षणाच्या नावाखाली आरएसएस, शिवसेना, श्रीरामसेने, विहिप या ब्राह्मणी संघटना वेळो वेळी दहशतवाद माजविताना दिसून येतात. कर्नाटकातील एका पबमध्ये श्रीरामसेनेने काही मुलींवर हल्ला केला होता. येथे एक गोष्ट कोणीच लक्षात घेत नाही की, सिनेमाच्या पडद्यावर, तसेच टिव्हीवर अर्धनग्न कपड्यात वावरणा-या ९९ टक्के मुली ब्राह्मणांच्या आहेत. धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून डर्टी गर्ल विद्या बालन ही उदाहरणे त्यासाठी अत्यंत बोलकी आहेत. संपूर्ण कपडे काढण्यास उत्सुक असलेली पुनम पांडेही ब्राह्मणच आहे. संस्कृतीच्या नावाने दहशतवाद माजविणा-या ब्राह्मणी संघटनांनी आपल्या मुलींच्या विरोधात आवाज उठविल्याचे काही ऐकिवात नाही.
आपल्या मुलींचे नग्न देह पाहून ब्राह्मणी नेत्यांचे डोळे तृप्त होतात की काय?
या विषयी मी माझ्या ब्लॉगवर व्यवस्थित लेख टाकलेला आहे. जिज्ञासूंनी अवश्य पाहावा.
माझ्या ब्लॉगची लिन्क खाली देत आहे :
http://anita-patil.blogspot.in/2012/03/blog-post_19.html
आपली लहान बहीण
अनिता पाटील
त्यात ब्राह्मणेतर मुलीही आहेत . आणि हे असले किंवा याहूनही अश्लील सिनेमे आवडीने बघणारे आंबट शौकीन पुरुष सर्वच समाजात आहेत . अनेक अभिनेत्री कारकीर्दीच्या सुरवातीला अशी दृश्ये देतात त्यामागे प्रसिद्धी हाही हेतू असतो . या कृती अभिजनांनी केल्यामुळे त्याची स्तुतीही होते हा आपला आक्षेप काही प्रमाणात योग्य आहे पण त्यासाठी फक्त ब्राह्मण मुलींना आणि तेही कपडे काढू या विशेषणाने टारगेट करणे योग्य वाटत नाही . समाज व्यवस्थेच्या विषम उतरंडीत स्त्री सुध्दा खालीच आहे. एखादा कमी कपड्यातला किंवा अश्लील समजला गेलेला सीन दिल्यावर फक्त स्त्रीचीच चर्चा करणे हेही विषमता वादी मानसिकतेचे लक्षण आहे
Delete- अभय
@ anita patil: I agree with ur point that Large number of girls are Brahmins bt its not the case that their whole society is of that type. I hav read ur blogs and I really think that u need to go to Psychatrist and take treatment. Because u r having thoghts which r dangerous for society.
ReplyDeleteNothing dangerous. She (Anita) has just mentioned a point in this thread. Which is unfortunately hard to deny. She has not penned anything about the society but has asked for a thought from them instead. Its true now a days people send this bunch of thinkers to Psychatrist just because they don't speak the way society thinks. 'Dangerous to society... hmmmmm...
DeleteCould you explain us what is SATI PRATHA according to vedas, before condemening the Hindu Dharma?
ReplyDelete1. Where I have said sati Pratha was created by Veda's? In Veda's there was symbolic Sati...not actual burning.
Delete2. I have condemned the people those in the name of religion (Hindutva) try to glorify wrongs of the past...and I shall condemn such fanatic Hindutvavadis forever. Thanks for commenting.