Wednesday, April 4, 2012

जैन-बौद्धांची अहिंसा...खरे काय?

१. महाराष्ट्रात बुद्धिझम १००% नसला तरी इ.स. पुर्व २०० ते जवळपास १३व्या शतकापर्यंत प्रभावशाली होता. एवढा कि संतही विठ्ठ्लाला बुद्ध स्वरूपातही पहात होते. जैनंनी श्रीविठ्ठलाला तीर्थंकर नेमीनाथांच्या रुपात पाहिले होते. (श्रीविट्ठल: एक महासमन्वय-रा. चिं. ढेरे आणि विट्ठलाचा नवा शोध- संजय सोनवणी)

२. बौद्ध व जैन धर्मामुळे भारताची सैनिकी शक्ती कधीच कमी झाली नव्हती. अशोकाने वा त्याच्या वंशजांनी वा कोणत्याही बुद्ध राजाने सैन्यदले बरखास्त केलेली नव्हती. सुभौम, खारवेल, राष्ट्रकुटांसारख्या जैन सम्राटांनीही असंख्य युद्धे केलेली आहेत. जैन व बुद्धाची अहिंसा मुळात कोणालाच समजलेली नाही. बुद्धाची वा अगदी जैनांचीही अहिंसा ही फक्त व्यक्तिगत आदर्शवत नीतीला अनुसरुन होती. पण राज्यरक्षणासाठी वा विस्तारवादासाठी अहिंसा त्यांनी कोठेही मान्य केलेली नाही. जैन सम्राट सुभौमाने परशुरामाची युद्धात हत्त्या केली हा इतिहास येथे लक्षात घ्यावा लागतो. सम्राट कुमारपाल सोमनाथ मंदिर उभारल्यानंतर जैन झाल पण त्याने मुलतानपर्यंत आपले राज्य विस्तारले होते.

अशोकाचा नातू ब्रुहद्रथाची हत्या पुष्य़मित्र श्रुंगाने केली. हा ब्रुहद्रथाचा सेनापती होता. तो ब्राह्मण होता असा लाडका तर्क हिंदुत्ववादी इतिहासकारांचा आहे. वास्तव हे आहे कि भारतातच काय, जगातही कोणताही राजा सेनापतीपदावर आपल्या निकटच्या नात्यातील...(भाऊ, मेव्हणा, जावई ई) व्यक्तीचीच सेनापती पदावर निवड करत असे. शिवाजीमहाराजही या तत्वाला अपवाद नाहीत. आणि ते तर्कसुसंगतही होते. बौद्ध असलेला ब्रुहद्रथ तर सेनापती पदावर वैधर्मी, नात्यातील नसलेल्या, त्यात ब्राह्मण असलेल्या, पुष्यमित्राची नियुक्ती करेल हे तर सर्वस्वी असंभव आहे.

दुसरे असे कि पुष्यमित्र श्रुंग यातील "श्रुंग" हे कोणत्याही ब्राह्मण जातींतील ना गोत्र आहे ना आडनांव आहे ना कुळनाम आहे. तो ब्रुहद्रथाचा मेव्हणा होता असे अनेक इतिहासकार म्हणतात. त्याने ब्रुहद्रथाची हत्या सत्ताप्राप्तीसाठी केली. अशीच हत्या खुद्द अशोकाने आपल्या थोरल्या भावाची, कालाशोकाची, केली होती व राजपद मिळवले होते. सत्तासंघर्षात हिंसा अटळ असते आणि ती करायला बौद्ध वा जैन धर्मीयांनी कुचराई जशी केली नाही तशीच राज्यविस्तार करतांनाही सैन्यदलांचा वापर करायला कुचराई केलेली इतिहासात दिसत नाही. अन्यथा मौर्यांचा साम्राज्यविस्तार असंभाव्य असाच होता. पण तो झाला. याचाच अर्थ असा कि त्यांनी "संन्यस्त खड्ग" हा सावरकरवादी विचार कधीच स्वीकारला नव्हता.

कनिष्काने, जो आधी शैव व बौद्ध धर्माचा समर्तह्क बनला, ज्याच्या कारकीर्दीत एक धम्म्संगती भरली, त्यानेच चीनचा पराभव करून त्याच्या राजपुत्राला ओलीस म्हणुन काश्मीर येथे आणुन ठेवले होते हे कोणाला माहितच नसते. म्हणजे त्याने बौद्ध होवुनही लढवैय्या बाण्याचा त्याग केलेला नव्हता.

३. महात्मा गांधींनीही पहिल्या महायुद्धाच्या वेळी भारतीयांना सैन्यात दाखल व्हायचाच प्रचार केला होता. (तोच प्रचार दुस-या महायुद्धाच्या वेळीस सावरकरांनी केला...) म्हणजेच गांधीजींनाही अहिंसेचे खरे तत्व माहित होते. ते ब्रुहद्रथालाही माहित होते. त्याची हत्या कधी केली गेली? तर तो आपल्या सैन्यदलाचे निरिक्षण करायला आला होता तेंव्हा. म्हणजेच त्यानेही सैन्यदल बरखास्त केलेले नव्हते. सावरकर सांगतात तसा तो नेभळा नव्हता. पण सा-या पापांचे खापर बौद्धांवर थोपायचे म्हणुन त्यांनी ब्रुहद्रथाचे "बौद्धत्व" डावाला लावले, अन्यांनी तीच री ओढली.

४. पुष्यमित्राने लाखो बौद्धांना ठार मारले, विहार नष्ट केले असा एक प्रवाद आहे. सत्य हे आहे कि नालंदा येथील स्तुपाचा व विहाराचा जीर्णोद्धार पुष्यमित्रानेच केल्याच्या नोंदी आहेत. बौद्ध साहित्यात कोठेही पुष्यमित्राने बुद्धधर्मीयांचा छळ वा उच्छेद केल्याची अगदी दंतकथाही येत नाही. तसे घडले असते तर बौद्धांनी त्याबाबत नक्कीच नोंदवून ठेवले असते...पण तशी नोंद नाही. पण हिंदुत्ववादी इतिहासकारांनी नेहमीप्रमाणे सत्याचा विपर्यास करत पुश्यमित्राला ब्राह्मण तर ठरवलेच पण बौद्धशत्रुही ठरवले. ती त्यांची लबाड सोय होती.

५. पुष्यमित्राने वैदिक धर्माचे पुनर्जीवन केले असाही प्रवाद आहे. त्यासाठी ते पुष्यमित्राने केलेल्या अश्वमेध यद्न्याचाही दाखला देतात. यातुन दोन बाबी स्पष्ट होतात. पहिली म्हणजे पुष्यमित्र ब्राह्मण असुच शकत नव्हता कारण मुळात स्म्रुतींनुसार राजसुय आणि अश्वमेध यद्न्य ब्राह्मणांना त्याज्ज्य आहे. हे यद्द्न्य ते क्षत्रियांसाठी करु शकतात...स्वत:साठी नाही. म्हणजेच पुष्यमित्राचे ब्राह्मणत्व सिद्ध होत नाही. दुसरे म्हणजे पुष्यमित्र स्वता:ला कधीही राजा न म्हनता यावज्जीव "सेनापती"च म्हनवत होता, म्हणजे तो विधीवत जर राजपदावरच बसला नाही तर तो अश्वमेध कसा करु शकतो याची साधी शंका या महाविद्वानांना आलेली दिसत नाही.

६. सातवाहनांनी बौद्ध धर्माला उदार आश्रय दिला. महाराष्ट्रातील जवळपास सर्व बौद्ध आणि जैन लेणी त्यांच्याच काळात खोदायला सुरुवात झाली. अनेक विहार बांधायला त्यांनी देनग्या दिल्या. पण त्याच वेळीस त्यांनी साडेचारशे वर्ष राज्य केले, साम्राज्य विस्तार केला. म्हणजेच अहिंसा नेमकी कशी आणि कोठे वापरायची याची सद्बुद्धी त्यांना होती. आता सातवाहनही ब्राह्मण होते असा प्रवाद हिंदुत्ववाद्यांचा आहे...पण त्यांना एकही पुराण "ब्राह्मण" म्हणत नाही तर "शुद्र"च म्हणतात हे मात्र ते चुकुन सांगायचे विसरतात. होते असे कधी कधी विस्मरणामुळे वा नीट काहीच न वाचल्यामुळे. असो.

थोडक्यात बौद्ध वा जैन धर्मामुळे भारताला अहिंसेची चटक लागली व त्यामुळेच भारत आक्रमकांना नीट तोंड देवु शकला नाही व दास्यात गेला हा हिंदुत्ववाद्यांचा दावा निखालस खोटा आहे. व्यक्तिगत नैतीकतेतील अहिंसा आणि रक्षणासाठीची वा विस्तारवादातील त्याच अहिंसात्मक धर्माचे पाईक असुनही केली जाणारी हिंसा यातील फरक हे नीट समजावुनही घेत नाहीत आणि सांगतही नाहीत. त्यामागे त्यांचे सांस्क्रुतीक पेच असतील एवढेच आपण म्हणु शकतो.

21 comments:

  1. जैन-बौद्धांची अहिंसा गांधींच्याहून वेगळी-वीर सावरकर
    by Madhusudan Cherekar on Sunday, November 20, 2011 at 12:24pm ·
    बौद्ध धर्माने किंवा जैन धर्माने अहिंसेचे जे प्रतिपादन केलेले आहे,ते गांधीजींनी प्रतिपादिलेल्या सर्व प्रकारच्या परिस्थितीत सशस्त्र प्रतिकाराचा निषेध करणार्या आत्यंतिक अहिंसाधर्माशी अगदी विरोधी आहे...जैन्सैनिकांचा जैन आचार्यांनी विरोध केला नाही...
    भगवान बुद्धाने सुद्धा अशाच प्रकारचा उपदेश केला आहे.एकदा एका टोळीचे पुढारी त्याजकडे गेले नि दुसर्या टोळीच्या लोकांनी आपणांविरुद्ध आक्रमण केल्यामुळे त्यांचा सशस्त्र प्रतिकार करण्यास अनुद्न्या मागू लागले.तेव्हा बुद्धाने त्यांस सशस्र प्रतिकाराची आद्न्या दिली.’सशस्त्र आक्रमणाच्या प्रतिकारार्थ युद्ध करण्यास ..आडकाठी नाही.जर ते सत्कार्या करिता सशस्त्र हो ऊन लढतील तर..’
    [मथुरा येथील हिंदुमहासभेच्या अखिल भारतीय अधिवेशनातील अध्यक्षीय भाषण,समग्र सावरकर वांग्मय,खंड३,पृ.६२-६३]

    ReplyDelete
    Replies
    1. हाच तो दुतोंडी सावरकर !
      "सन्यस्त खड्ग" आणि "सहा सोनेरी पाने " हि त्याची भंकस पुस्तके वाचा म्हणजे पूर्ण सत्य समजेल.

      -विवेक पाठक.

      Delete
  2. सोनवणी साहेब, आम्हांला तुमची मते अजिबात मान्य नाहीत. आमचे सावरकर जे लिहितात तेच खरे आहे. उदाहरणार्थ सावरकरांनी आपल्या ' सहा सोनेरी पाने ' या दिव्य ग्रंथात जी मौलिक माहिती दिली आहे ती वानगीदाखल या ठिकाणी देत आहे.
    व्हीन्सेंट स्मिथच्या The Early History Of India या ग्रंथातील उताऱ्याच्या आधाराने सावरकर यांनी गुजरात मधील कुमारपाल या राजाच्या कारकिर्दीत घडलेल्या एका घटनेची जी माहिती दिली आहे ती मननीय आहे. सावरकरांच्या ग्रंथात आलेल्या माहितीनुसार, कुमारपाल हा राजा जैनमतांच्या प्रभावाखाली होता. त्याने सम्राट अशोकप्रमाणेचं आपल्या राज्यात अहिंसेचे धोरण राबविले होते. त्याच्या या अहिंसाविषयक धोरणाची व्याप्ती काय होती याची कल्पना पुढील उदाहरणावरून येऊ शकते. कुमारपालच्या राज्यात एका व्यापाऱ्याने अंगावरची ऊ मारली. हेरांनी हि बातमी राजाल कळवताच, राजाने त्या व्यापाऱ्यास कैद केले. त्याची सर्व मालमत्ता जप्त केली आणि त्या मालमत्तेची विक्रीकारून जैन आचार्यांच्या सांगण्यावरून कुमारपालने त्या मृत ' ऊ ' चे एक भव्य स्मृतीभवन बांधले व त्याचे नाव यूकविहार म्हणजे ऊ चे मंदिर असे ठेवले. आता तुम्ही म्हणाल कि सावरकr खोटे सांगत आहेत, पण हि माहिती म्हणे जैन ग्रंथकारांनीच आपल्या ग्रंथांमध्ये लिहून ठेवली आहे.
    सोनवणी साहेब, आमचे सावरकर तुमच्याप्रमाणे निव्वळ पुस्तकी माहितीवर विसंबून राहिले नाहीत तर, त्यांनी स्वतः त्या यूक विहारामध्ये जाऊन त्या ऊ च्या स्मृतींचे दर्शन घेतले. स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनी जैन लोकांच्या या मूर्ख आणि बालिश अहिंसक धोरणाचे डोळेभरून दर्शन घेतले आणि मग आपल्या ग्रंथात हि नोंद केली. आता हे खरे कि, त्या कुमारपाल नामक राजाने सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला पण सावरकरांना त्याचे महत्त्व वाटले नाही. कसे वाटणार, निव्वळ दगडी बांधकामे करण्यात पैसा खर्च करण्यापेक्षा कुमारपालने मुस्लीमविरोधी अखिल हिंदु राजांची एक संघटना बनवण्यात तो निधी खर्च केला असता तर आमच्या सावरकरांनी जरूर त्या कुमारपालचे कौतुक केले असते. पण असले काही न करता सोमनाथाचे मंदिर मुसलमानांनी भग्न केले व या राजाने ते वसवले या गोष्टीचे काय कौतुक करायचे ? उलट सोमनाथाला प्राचीन वैभव प्राप्त करून द्यायच्या अट्टाहासापायी त्याने मुस्लीम आक्रमकांना पार एकदा सोमनाथावर आक्रमण करण्यास त्याने उकसवले म्हणून त्याचा निषेध का करू नये हे तुम्ही सांगा !

    ReplyDelete
    Replies
    1. संजयजी, सावरकरांच्या अचाट विद्वत्तेपुढे हे अजाण बालक नतमस्तक आहे. ही अमौलिक माहिती पुरवून माझे घोर अद्न्यान दुर केल्याबद्दल शतश: आभार.

      Delete
  3. अशीच हत्या खुद्द अशोकाने आपल्या थोरल्या भावाची, कालाशोकाची, केली होती व राजपद मिळवले होते. सत्तासंघर्षात हिंसा अटळ असते आणि ती करायला बौद्ध वा जैन धर्मीयांनी कुचराई जशी केली नाही तशीच राज्यविस्तार करतांनाही सैन्यदलांचा वापर करायला कुचराई केलेली इतिहासात दिसत नाही. अन्यथा मौर्यांचा साम्राज्यविस्तार असंभाव्य असाच होता. पण तो झाला. याचाच अर्थ असा कि त्यांनी "संन्यस्त खड्ग" हा सावरकरवादी विचार कधीच स्वीकारला नव्हता. SANJAYJI WITH DUE RESPECT OF YOUR KNOWLEDGE THE MOURYAN EMPIRE WAS SPREAD BEFORE KING ASHOKA EMBRACE THE BUDDHA. WHY YOU ARE NOT CHECKING ALL HISTORICAL FACTS IS A QUESTION YOU SHLD ASK YOURSELF. YOUR WRITING SKILL IS SUPARB SO ONE CAN EASILY TRUST ON YOU WHEN HE READ IT BUT HISTORY WRITERS AND STUDENT OF HISTORY NEVER AGREE WITH YOU.

    ReplyDelete
    Replies
    1. अशोक विश्वविख्यात प्राचीन सम्राट. मगघातील पाटलिपुत्र येथे राज्य करणाऱ्या मौर्यवंशातील हा तिसरा राजा. याची बाळपणची माहिती मिळत नाही. त्याचे वडील बिंदुसार याच्या राजवटीत अशोक प्रथम तक्षशिला आणि नंतर उज्जयिनी येथे राजप्रतिनिधी म्हणून काम करीत होता. हा बिंदुसाराचा ज्येष्ठपुत्र नसला, तरी त्याचीच युवराजपदावर नेमणूक झाली. इ.स.पू. २७३ मध्ये बिंदुसाराच्या मृत्यूनंतर सुसीम ह्या आपल्या वडील भावावर कुरघोडी करून त्याने राजपद मिळविले. हा भ्रातृकलह पुढेही तीन-चार वर्षे चालला असावा. कारण त्याने प्रत्यक्षात इ.स.पू. २६९ मध्ये राज्यारोहण केलेले दिसते. वाङ्‌मयीन पुराव्यांवरून असे दिसते, की अशोकाला राजपद सहजासहजी प्राप्त झाले नसावे. त्यासाठी त्याने आपल्या बऱ्याच भावांना मारले असावे. महावंसात असे म्हटले आहे, की “बिंदुसाराला १६ राण्यांपासून १०१ मुलगे झाले. त्यांत अशोक पराक्रमी व लढाऊ वृत्तीचा होता. हाती सत्ता आल्यानंतर त्याने आपल्या ‘तिस्स’ नावाच्या सावत्र भावाला काही काळ युवराजपदावर नेमले. बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यापूर्वी तो ‘चण्डाशोक’ किंवा ‘दुष्टाशोक’ या नावाने ओळखला जाई, मात्र त्यानंतर ‘धर्माशोक’ किंवा ‘सद्‌गुणी अशोक’ या नावाने ओळखला जात असे.” सीलोनी वृत्तांत अतिशयोक्तिपूर्ण असले, तरी संपूर्णपणे त्याज्य ठरविता येणार नाहीत.

      Delete
    2. अशोक हा एक महान ध्येय बाळगणारा आणि ते साधण्यासाठी प्रयत्‍नांची शर्थ करणारा राजा होता. त्याने बौद्ध धर्माला दिलेला आश्रय स्वार्थप्रेरित नव्हता. भारतात आणि भारताबाहेर त्याने निष्ठेने केलेले प्रचारकार्य हे एक साहस होते. धर्मप्रचारासाठी आणि लोकशिक्षणासाठी त्याने केलेली शिलालेखांची योजना ही एक मौलिक कल्पना होती. त्यास साम्राज्याची तृष्णा नव्हती. परंतु स्वतःचे सम्राटपद त्याने कधीही सोडले नाही. कलिंगयुद्धानंतर त्याने आपले राजकीय धोरण बदलले; परंतु कलिंगवरचा ताबा कायम ठेवला. तथापि कलिंगयुद्धानंतर अशोकाने अनाक्रमणाचे तत्त्व स्वीकारले आणि अखेरपर्यंत ते अवलंबिले. सर्वांचे कल्याण करणे हे ध्येय ठेवून राज्ययंत्रणा त्यासाठीच वापरावयाची, असे उद्दिष्ट ठेवून त्याने त्या ध्येयाचा आयुष्यभर पाठपुरावा केला. परंतु त्याच्या पश्चात त्याच्या ध्येयाचे त्याच्या वारसांपैकी कोणीही स्मरण ठेवले नाही. अशोक इ.स.पू. २३२ च्या सुमारास निधन पावला. अशोकाच्या अनेक शिलालेखांतून त्याच्या राण्या व मुले यांचे उल्लेख आहेत; तथापि सर्व तपशील उपलब्ध नाहीत. त्याचा कुणाल म्हणून एक मुलगा राजप्रतिनिधी असल्याचा उल्लेखदिव्यावदान ह्या बौद्ध ग्रंथात आहे. त्याशिवाय त्यास महेंद्र व तीवर नावाचे दोन मुलगे होते. तीवर हा त्याच्या कारुवाकी नावाच्या दुसऱ्या राणीचा मुलगा. ह्यांचे उल्लेख लघुस्तंभ-लेखांतून आहेत. वाङ्‌मयीन पुराव्यांत त्यास चार राण्या असल्याचा उल्लेख असून शाक्यकुमारी ही त्याची पट्टराणी होती. तिच्यापासून त्यास महेंद्र व संघमित्रा ही दोन अपत्ये झाली. ह्या दोघांना अशोकाने बौद्धधर्मपथकातून श्रीलंकेला धाडले होते. महेंद्र हा अशोकाचा भाऊ असावा,असेही काही वाङ्मयीन पुरावे आढळतात. भारता- च्याच नव्हे तर मानवजातीच्या इतिहासात अशोक हे अमर नाव आहे. “इतिहासग्रंथांच्या पानापानांवरून गर्दी करून राहिलेल्या हजारो–लाखो राजेमहाराजांची नावे काळ पुसून टाकील,परंतु अशोकाचे ध्रुवपद कधीच ढळणार नाही.” हे एच्. जी. वेल्स या इंग्रज इतिहासकाराचे त्याच्याविषयीचे उद्गार सार्थच आहेत.

      Delete
  4. Rahul jee, there are few misconceptions amongst historians as well. It is said that because of Chanakya Chadragupta came to the power. But no historical document, except drama "Mudra Rakshasa" support this claim. Megashenese doasent mention at all any Chanakya..kautilyaa,,,whatsoever.

    Ashoka won kalinga and before that he had embraced buddhism, this is what I have mentioned in my article.

    Ashoka retained all the boundaries those were won by his forefathers and established religion of his like...bamiyan can be remembered here.

    pushyamitra was Bruhadratha's brother-in-law...not Brahmin as beleived by the Hindutvavadi Historians. In all the time in the history, the cheif of the armies were belongimng to not only caste/religion of the king, but the position essentially was given to the person in close relationship. When Bruhadrath was a Buddhist, there was no chance that he would appoint a cheif of army, not only against his religion, and not in close relation at all.

    There are several pitfalls in our history. many thins may be disagreed easily. But I object to learn history blindly.

    For it will take us nowhere.
    Thanks for your kind comment.

    ReplyDelete
    Replies
    1. Ashoka won kalinga and before that he had embraced buddhism, this is what I have mentioned in my article.
      Dear Sanjayji please give the proof for this statement which will give me the exact knowledge about the king ashoka. all know that he follow buddhism and spread it but when he started and join buddhism? i do not find any concrete material , if you have it then please let us all know.

      Delete
    2. Rahul jee, there are few misconceptions amongst historians as well. It is said that because of Chanakya Chadragupta came to the power. But no historical document, except drama "Mudra Rakshasa" support this claim. Megashenese doasent mention at all any Chanakya..kautilyaa,,,whatsoever.
      Sanjay ji Megashenese doasent mention at all any chnadragupta or mourya in his INDIKA.,,,whatsoever.
      Sanjay ji CAN WE SAY THAT THE GREAT CHANDRAGUPTA NEVER EXIST ON THE BASIS OF THAT? WE HAVE VERY LITTLE PROOFS OF THE OLD HISTORY OF INDIA. SO WE SHLD NOT WRITE SUCH THINGS, U WANT TO ACCEPT WAGHYA AD LOCAL FOLK STORY AND DON'T ACCEPT CHANAKYA. THIS IS A DOUBLE STANDARD. THERE IS A NOT A SINGLE PIECE OF PAPER EXIST REGARDING WAGHYA DOG STATUE ON RAIGAD,STILL ALL WE ACCEPT IT( EXCEPT THE NEW HISTORY WRITERS OF BRIGADE) . THE STATUE OF DADA KONDADEV WAS REMOVED BECAUSE NO HISTORICAL EVIDENCE FOUND THAT SHIVAJI WAS TOUGHT BY HIM. THEN WHY ARE U SUPPORTING THE STATUE OF WAGHYA ? IF U FIND SOLID PRROF THEN U CAN ACCEPT IT. DANTKATHA VAR KASA VISHWAS THEVAYACHA? MAG PRATEK JAN AAPLE SOYINE ASHA KATHA NIRMAN KARTO KI. U NEED PROOFS, NOTHING ELSE. IF GREAT KING SHIVAJI NOT TEACHED BY DADAJI KONDADEV WE ALL MUST AGREE TO THAT POINT, MAY BE RAISED BY ANYBODY.
      IN ONE OF THE REPLY REGARDING OUR DISCUSSION ON SAVARKAR , U WROTE THAT Megashenese IS NOT TRUST WORTHY AND HERE U ARE USING HIM AS A SOLID PROOF AGAINST THE CHANAKYA.OUR FOREFATHER NEVER MAINTAIN GOOD RECORDS OF HISTORY. SO WE MAY FACE SUCH PROBLEMS. BUT TO TRUST ON NOT TRUST WORTHY PERSON AND AND WRITE AS 100% RIGHT IS NOT A GOOD SIGN. AAPLYA SOYICHE ETIHASATUN PAHIJE THEVADE GHAYACHE AND BAKICHE SODUN JE AAPAN LIHU TECH KHARE HI TAR MARX AANI RSS CHE LOK KARTAT. CONGRESS AND SOCIALIST NEVER ARGUE IN SUCH DEBATES BECAUSE THEY DON'T HAVE KNOWLEDGE.ASO.

      Delete
    3. Dear friend, again you are getting confused. True that megasthenes doesnt mention either or...but the fact remains that there are ample other proofs about existance of Chandragupta. There is no mention in any supportive literature/Puranas about Chanakya. He didnt exist at least in the period of Chandragupta. Thanks.

      Delete
    4. Dear friend, again you are getting confused. True that megasthenes doesnt mention either or...but the fact remains that there are ample other proofs about existance of Chandragupta. There is no mention in any supportive literature/Puranas about Chanakya. He didnt exist at least in the period of Chandragupta. Thanks.
      Now give the ample other proofs about the chandragupta mourya? which you will never give and will wrote like your habit of writing that there are lot of evidence or it is already proved etc..

      Delete
  5. संजयजी! बौद्ध धर्मामुळे भारत लढणे विसरला नाही! हा तुमचा मुद्दा बरोबर आहे पण
    -कलिंग युद्धापूर्वी अशोक बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली होता हे मला मान्य नाही कारण त्याच्याच एका शिलालेखात (बृहत प्रस्तर शिलालेख १३)कलिंग युद्धानंतर त्याच्यात दयाबुद्धी जागृत झाली असे लिहले आहे आणि त्याअगोदरच्या लेखांमध्ये असा उल्लेख नाही! अशोकाने प्रेमाने जग जिंकण्याचा प्रयत्न केला खरा पण अधूनमधून त्याने हितशत्रूंना धमकावत असल्याचे त्याच्या शिलालेखांवरून दिसून येते.
    - बृहद्रथ नेभळट नव्हता असे तुम्ही म्हणता, नोकरशाहीवरील ढासळलेले नियंत्रण, साम्राज्याची बिकट आर्थिक स्थिती आणि सैनिकांसमोर झालेला त्याचा खून काय दर्शविते?
    - कनिष्क चीनी सत्तेकडून पराभूत झाला होता.
    - पुष्यमित्र हा ब्राह्मणच होता, तुम्ही म्हणता कि तो ब्रह्मान असल्याने तो अश्वमेध करू शकत नाही पण इथे एक आणखी एक प्रवाद होऊ शकतो तो असा कि अश्वमेध यद्न्य, वायवेकडील हेलिनेस्तिक ग्रीक लोकांवर विजयाप्रीत्यर्थ केलेला असू शकतो आणि हा यज्ञ अधिकृत राजसत्तेचे प्रतीकही होता. कालीदासाच्या माल्विकाग्नीमित्र या नाटकातही तो ब्राह्मण असल्याचा उल्लेख येतो तसेच त्याच्या प्रशासनाचीही कल्पना येते.
    - "दिव्यावदान" या बौद्ध ग्रंथात शुंग राजांनी बौद्धांचा छळ केल्याचा उल्लेख आहे.
    - पुरातत्वीय संशोधनानुसार सांचीचा स्तूप आणि कौशंबी च्या विहारची मोडतोड पुष्यामित्राच्या काळातील आहे, तुमी म्हणता तसे त्यांचा जीर्णोद्धार झाला आहे पण तो पुष्यामित्राच्या नंतरच्या काळातील आहे, तोपर्यंत बौद्ध विरोध बराच सौम्य झाला होता.
    - शून्गांचे वारस कन्व हेही ब्राह्मणाच होते.
    - शून्गांच्या संदर्भात "ब्राह्मक्षत्रिय" हि संकल्पना बऱ्याच ग्रंथात वापरली आहे.
    - सातवाहन मात्र आंध्रातील नायक राजामधून मौर्य काळात वर आले व मौर्योत्तर काळात राजे झाले, वैदिक यज्ञ याग त्यांनी राजसत्तेला कायदेशीर बनवण्यासाठी केले असावेत आणि त्यांनी जो स्वतः ब्राह्मन असल्याचा उल्लेख केला आहे तो समाजात श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच केला आहे. म्हणूनच गौतमिपुत्र सातकर्णी " खातीयांचा निपात"(क्षत्रियांचा नाश) केल्याचा दावा आपल्या एका शिलालेखात करतो. हा त्यांचा आटापिटा ते ब्राह्मण नसल्याचेच दर्शवितो.पण सातवाहन ब्राह्मण नाहीत हे सिद्ध करण्यासाठी पुराने त्यांना क्षुद्र म्हणतात हा तुमचा युक्तिवाद पटत नाही, कारण बरीच पुराने आणि स्मृती कलीयुगात क्षत्रिय राजे नाश पाऊन क्षुद्र घराणी सत्तेवर असल्याचे सांगतात पण ते तितकेसे खरे नाही.

    ReplyDelete
  6. In these expressions you are sidelining Mahamanav Dr. Babasaheb Ambedkar. Why?

    ReplyDelete
  7. बौद्ध धम्माच्या इतिहासात धर्मांतरासाठी हत्या, तसेच रक्ताचा एकही थेंब सांडल्याचे उदाहरण नाही. हा उल्लेख लेखकाने जाणीव पूर्वक टाळला आहे.

    ReplyDelete
  8. अहिंसा
    जगातील सर्व धर्मांमध्ये या ना त्या प्रकारे अहिंसातत्त्वाल महत्त्वाचे स्थान मिळालेले आहे. वैदिक धर्मात पशुयज्ञाचे स्थान महत्त्वाचे आहे. पण प्रत्यक्ष पशूची हत्या करण्यास सांगितले असूनही, पशुहत्या- विषयक विवेचनात गूढ रूपाने ही हिंसा नसून अहिंसाच आहे, असे सांगण्याचा ब्राह्मणग्रंथांत प्रयत्न केलेला दिसतो. ह्यावरून अहिंसाकल्पनेची बीजे वैदिक कर्मकांडातच सापडतात हे कळून येते. पशुयज्ञ ही संस्था मुळात वेदपूर्वकालीन वैदिक आर्यांच्या आदिम स्थितीतील संस्था आहे. ब्राह्मणग्रंथांच्या काळी ही यज्ञीय पशुहिंसा मनास खुपू लागली. म्हणून ‘पशू मृत होतो’ असे पशुयज्ञात न म्हणता ‘तो स्वर्गाला जातो’ असे म्हणावे, नाहीतर मृत्यू यज्ञ करणाऱ्याचा पाठलाग करील, असे ब्राह्मणग्रंथांत म्हटले आहे. जसे करावे तसे भरावे, हा कर्मसिद्धांत याच सुमारास आर्यांच्या मनात डोकावू लागला. हिंदुधर्मातील संन्याशाला जी व्रते पाळावी लागतात, त्यांमध्ये अहिंसा हे पहिले व्रत आहे. जैन साधूला जी पाच महाव्रते पाळावी लागतात, त्यांमध्येही पहिले महाव्रत अहिंसा हे आहे. त्याचप्रमाणे बौद्ध धर्मातील ‘अष्टांगशील’ किंवा ⇨पंचशील यांमध्येही अहिंसेला पहिले स्थान आहे. अहिंसा दोन प्रकारची : निषेध-स्वरूपाची व विधि-स्वरूपाची. येशू ख्रिस्तानेही आपल्या अनुयायांना ‘तू प्राणिहत्या करू नकोस’ अशी एक आज्ञा दिलेली आहे. ‘दया धर्म का मूल हे’ (तुलसीदास) किंवा ‘सर्व प्राण्यांकडे आत्मौपम्य-दृष्टीने पाहावे’ अशा अर्थांच्या वाक्यांतून अहिंसेचे हे दोन्ही अर्थ प्रकट होतील.

    ‘अहिंसा परमो धर्म:’ म्हणजे अहिंसा हा श्रेष्ठ धर्म होय, असे महाभारतात व अन्यत्र हिंदुधर्मग्रंथांत वारंवार सांगितले आहे. राज्यव्यवस्था समाजधारणेकरिता करावी लागते, असे राजधर्म प्रकरणात सांगितले आहे. ‘समाजधारणा म्हणजेच अहिंसा’ असा अर्थ महाभारतात केला आहे. सबळाने दुर्बळाचा नाश करू नये, हा राजधर्माचा एक मुख्य उद्देश होय.

    महाभारतातील अहिंसेची साधकबाधक चर्चा अशी आहे : सार्वत्रिक अहिंसा अशक्य आहे; कारण ‘जीवो जीवस्य जीवनम्’ असा जीवसृष्टीचा नियम दिसतो; प्रत्येक माणसाकडून सूक्ष्मजंतूंचा नाश नकळत होतच असतो. म्हणून शक्यतो जाणूनबुजून हिंसा होणार नाही, इतकाच प्रयत्न माणसाला शक्य आहे. बलदंड व आततायी अशा मनुष्याचा प्रतिकार करताना त्याची हिंसा करणे कित्येकदा अपरिहार्य ठरते. परंतु प्राणिमात्रावर दया करणे हा विधायक दृष्टिकोन व परोपकार हे अहिंसा धर्माचे विधायक स्वरूप प्रशस्त होय. CONT........1

    ReplyDelete
  9. भारतवर्षामध्ये ऋषि-मुनींपासून महात्मा गांधींपर्यंत संतांनी जीवनात अहिंसेला मुख्य स्थान दिले आहे. हिंसा, मग ती कोणत्याही कारणासाठी घडणारी असो, अधर्म होय, अशी विचारसारणी पूर्वीपासून प्रचलित आहे. सामान्यपणे हिंसा वर्ज्य असली, तरी जीवनार्थ वा धर्मकार्यामध्ये घडणारी हिंसा क्षम्य आहे, अशीही एक दुसरी विचारसरणी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. हिंसा त्याज्य आहे आणि हिंसेमध्ये इतर अनेक पापे उद्भवतात; म्हणून धर्माचरण करणाऱ्या माणसाने कोणत्याही स्वरूपातील स्थूल अगर सूक्ष्म हिंसा टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, हे क्रमप्राप्त होते. म्हणूनच भारतामध्ये अनेक जमाती शाकाहारी आहेत. त्यांमध्ये जैन धर्माचे अनुयायी प्रमुख आहेत. जैन समाजाचे अहिंसाधर्मामुळे उद्योगधंदेही मर्यादित झाले आहेत.

    जैन आचारशास्त्रात साधूसाठी अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य व अपरिग्रह ही पाच महाव्रते सर्वसंग्राहक म्हणून सांगितलेली आहेत. बाकीची इतर व्रते गौण आहेत. या पाच महाव्रतांमध्येसुद्धा अहिंसाच प्रमुख आहे. अहिंसाव्रताचे अधिक चांगल्या रीतीने पालन इतर महाव्रतांमुळे होते. अहिंसातत्त्वाची मीमांसा जैन धर्मामध्ये अतिशय बारकाईने केलेली आहे. एखाद्या जीवाचा वध करणे किंवा त्याला दु:ख देणे म्हणजे हिंसा, असा ‘हिंसा’ या शब्दाचा ढोबळ अर्थ आहे. राग-द्वेषाच्या आधीन होऊन अगर निष्काळजीपणामुळे मनुष्य जेव्हा दुसर्या जीवाला दु:ख देतो, तेव्हा ते कृत्यही ‘हिंसा’ या संज्ञेस पात्र होते. अशुभ भावनेने केलेले कोणतेही कृत्य हिंसा या दोषास पात्र होते. परंतु मुलास चांगले वळण लागावे या हेतूने त्याला शिक्षा करणारा बाप हिंसक ठरत नाही. ज्यावेळी आपल्या मनामध्ये अशुभ भाव उत्पन्न होतात, त्या वेळी आपल्याच आत्म्याची हिंसा होत असते. याच्या उलट, एखादा मनुष्य सद्हेतूने प्रेरित होऊन संयमाने वागत असला आणि त्याच्या हातून जीववध घडला किंवा दु:ख उत्पन्न झाले, तरी ती हिंसा दोषास्पद होत नाही. साधू आपल्या हातून हिंसा घडू नये यासाठी संयम पाळतो, तो राग, द्वेष किंवा क्रोध, मान, माया, लोभ हे कषाय, म्हणजे दोष, उत्पन्न होऊ देत नाही. कारण प्राणव्यपरोपण (प्राणनाश) दुसऱ्याचे होते तसे आपलेही होते. हिंसेचे ‘स्थूल हिंसा’ व ‘सूक्ष्म हिंसा’ असे दोन प्रकार आहेत. साधूला या दोन्ही प्रकारच्या हिंसेचा त्याग करावा लागतो. खरा साधू शक्य तेवढी हिंसा टाळतो. परंतु काही प्रमाणात सूक्ष्म हिंसा ही घडणारच. अशा वेळी त्याचे भाव जर शुभ असतील आणि तो जर संयत असेल, तर ती सूक्ष्म हिंसा दोषपात्र ठरत नाही. CONT..........2

    ReplyDelete
  10. गृहस्थधर्माच्या हिंसेचे चार प्रकार केलेले आहेत : (१) संकल्पी हिंसा : इरादापूर्वक केलेली हिंसा. शिकार खेळणे, मांसभक्षण करणे इ. गोष्टी या सदरात येतात. गृहस्थाला काया-वाचा-मनेकरून हिंसेचा त्याग करावा लागतो. (२) विरोधी हिंसा : आपल्यावर हल्ला झाला असता, आत्मसंरक्षणासाठी करावी लागणारी हिंसा. स्वतःच्या अगर स्वकीयांच्या किंवा देशाच्या रक्षणासाठी गृहस्थ हिंसा करू शकतो. जैनधर्मीय क्षत्रिय कुळातील राजांनी युद्धे केलेली आहेत. (३) आरंभी हिंसा : जीवनयात्रा चालविण्यासाठी किंवा भोजन-पान तयार करण्यासाठी अनेक क्रिया कराव्या लागतात. अशा क्रिया करताना होणारी हिंसा ही आरंभी हिंसा होय. (४) उद्योगी हिंसा : उदरनिर्वाहासाठी गृहस्थाला एखादा उद्योग अगर नोकरी करावी लागते; त्या उद्योगात अंतर्भूत असलेली हिंसा ही उद्योगी हिंसा होय. जैनधर्मी गृहस्थाला हिंसाप्रचुर उद्योग करता येणार नाही. परंतु राजाची नोकरी करता येईल, सैनिकी पेशा पतकरता येईल आणि स्वामीची आज्ञा म्हणून युद्धही करता येईल. अहिंसाचार पाळणाऱ्या गृहस्थाला मांसाहार वर्ज्य करावा लागतो, यात मात्र शंका नाही.

    बौद्ध धर्माच्या अष्टांगशीलामध्ये अहिंसेला महत्त्वाचे स्थान आहे आणि बौद्धधर्मी भिक्षूंचा आचारही अहिंसेला पोषक असाच आहे. परंतु सध्या चीन, जपान इ. देशांमध्ये जे बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, ते मांसाहार निषिद्ध मानीत नाहीत. अशोकाने बौद्ध धर्मातील अहिंसेचे स्वतः आचरण केले व लोकांना धडा घालून दिला. आपल्या शिलालेखांतून त्याने एकंदर प्राण्यांवर दया करण्यासंबंधी आणि त्यांचे रक्षण-पोषण करण्यासंबंधी लोकांना आज्ञा दिल्या. त्याने राजवाड्यातील प्राणिहत्या थांबविली.

    हिंदू संस्कृतीतील अहिंसेचे स्थान सुस्पष्ट आहे. वैदिक धर्मामध्ये धार्मिक महत्त्व असलेल्या यज्ञात पशुहत्या विहित आहे. परंतु कालांतराने पशुहत्यायुक्त यज्ञ बहुशः बंद पडले आणि भक्ति-ज्ञानावर अधिष्ठित असा मोक्षमार्ग प्रचलित झाला. अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य इ. तत्त्वांवर आधारलेला धर्म हिंदुधर्माचा प्राण बनला. हिंदू धर्म, बौद्ध धर्म व जैन धर्म संन्यासधर्माच्या बाबतीत एकरूप आहेत. योगदर्शनात अहिंसाधर्म मुख्य मानला आहे. CONT..........3

    ReplyDelete
  11. महात्मा गांधी हे चालू युगातील अहिंसेचे थोर उपासक होते. गांधींच्या जीवनावरही जैन धर्माचा आणि जैन गुरूंचा बराच परिणाम झालेला होता.गांधींनी आपल्या जीवनाचे सर्व तत्त्वज्ञान अहिंसा व सत्य यांवर अधिष्ठित केले होते. जीवनाच्या सर्व अंगोपांगांना त्या अहिंसेने स्पर्श केला होता. खाजगी जीवनात त्याचप्रमाणे सामाजिक व राजकीय जीवनातही अहिंसातत्त्व कार्यान्वित करण्याचे त्यांनी हिरिरीने प्रयोग केले. राजकारणात त्यांनी सत्याग्रहाचे नवीन तंत्र उपयोगात आणले.

    अहिंसेच्या बाबतीत पाश्चात्त्यांची विचारधारा वेगळी आहे. आपल्याकडे धर्म आणि आहार यांचा जितका निगडित संबंध आहे, तितका पाश्चात्त्य विचारवंत किंवा धार्मिक लोकांत तो नाही. शाकाहाराची कल्पना नसलेला मनुष्यही तिकडे धार्मिक, सच्छील किंवा दयावंत असू शकतो; मांसभक्षण व मद्यपान धार्मिकतेच्या आड येऊ शकत नाहीत.

    धर्मामध्ये सांगितलेली अहिंसा ही वैयक्तिक आत्मकल्याणासाठी सांगितलेली असली, तरी समाजाचे धारण-पोषण अहिंसेमुळे सुलभ होते, हे सहज दिसून येईल. दुसऱ्याने कष्ट करून मिळवलेल्या धनाचे अपहरण न करणे, स्वार्थासाठी असत्य वचनाचा उपयोग न करणे, परस्त्रीचा अभिलाष न धरणे, स्वत:कडेच अपरिमित संपत्तीचा साठा न करणे इ. गोष्टी अहिंसेमध्येच येतात. उदा., एखाद्याने कष्ट करून मिळविलेली संपत्ती कोणी चोरणे म्हणजे त्याचे बाह्य प्राण हिरावून घेण्यासारखेच आहे. वर निर्दिष्ट केलेल्या गोष्टींमुळे दुसऱ्याला दु:ख प्राप्त होते. म्हणजे ती हिंसा आहे. म्हणजे अहिंसा पाळल्याशिवाय समाजाला स्थैर्य प्राप्त होणार नाही.

    अहिंसाधर्माला अनेक कारणास्तव मर्यादा पडतात. कोणत्याही प्राण्याची हिंसा होऊ न देता मानवाला जगता येणे अशक्य आहे. सूक्ष्मजंतूंचा मानवाच्या हातून आपोआप नाश होतो. कारण हवेत, जलात, निरनिराळ्या खाद्यपदार्थांत सूक्ष्मजंतू असतात. शेती, लोहारकाम इ. धंद्यांत जंतूंची आपोआप हिंसा घडतेच. वनस्पतींना प्राण आहे असे मानले, तर वनस्पतींवाचून जगणे अशक्य आहे. दुसरे असे, की आनादिकाला - पासून अन्नाचा तुडवटा असल्यामुळे माणसाला मांस व मत्स्य यांचा आहारात वापर केल्याशिवाय जगणे अशक्य झाले असते. मानवी शरीराला पोषक असलेली उच्च प्रतीची प्रथिने मुख्यतः प्राणिज पदार्थांपासूनच प्राप्त होऊ शकतात. प्रथिनांवाचून मानवी शरीर दुर्बल व रोगग्रस्त होते. अनेक प्रकारचे रोगजंतू नष्ट केल्याशिवाय आरोग्यप्राप्ती होऊ शकत नाही. CONT.........4

    ReplyDelete
  12. मानवी स्वभाव संघर्षशील असल्यामुळे स्वीयसंपत्तीचे व स्वकीयांचे रक्षण करण्याकरिता युद्ध हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपात त्याला आत्मरक्षणार्थ अपरिहार्य ठरते. त्याकरिता वीरवृत्तीची जोपासना व वाढ करणेही मानवाचे कर्तव्य असल्याचे इतिहासावरून दिसते. वीरवृत्तीच्या योगाने व युद्धप्रवणतेमुळे मानवी समाजांची प्रगती झाली आहे, असेही एक युद्धसमर्थक तत्त्वज्ञान जगातील काही तत्त्ववेत्त्यांनी प्राचीन काळापासून मांडले आहे. परंतु हिंसात्मक युद्धामुळेच मनुष्याचे पराक्रम इ. सद्गुण वाढीस लागतात असे म्हणता येणार नाही. हिंसक युद्धाशिवाय पराक्रमाची कला, ज्ञान, नीती इ. क्षेत्रे मानवाला प्रथमपासून उपलब्ध आहेत.

    सामाजिक जीवनामध्ये आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारामध्ये अहिंसेचा उपयोग होऊ शकेल; पण त्यासाठी लोकशाहीची मूल्ये समाजात दृढमूल व्हावी लागतील; वांशिक भेद मिटावे लागतील; बुद्धिवादाची वाढ व्हावी लागेल आणि वर्गकलह नष्ट व्हावे लागतील. END.

    ReplyDelete
  13. जैन धर्म व बौद्ध धर्म :

    जैन धर्म आणि बौद्ध धर्मातील साम्यदर्शक गोष्टी अशा आहेत: दोन्ही धर्मांचे प्रवर्तक मगध देशातील क्षत्रिय होते. दोघाही धर्मप्रवर्तकांना जिन, अर्हत्, बुद्ध, सुगत, तथागत इ. समान उपाधींनी संबोधण्यात येत असे. दोन्ही धर्मांचे अनुयायी आपल्या धर्मप्रवर्तकांना ‘देव’ समजून व त्या देवांच्या मूर्ती मंदिरात स्थापन त्यांची पूजा करतात; चैत्य वा स्तूप उभारून त्यांत त्यांच्या मूर्तींची स्थापना करतात. चोवीस ⇨तीर्थंकर होऊन गेले असे जैन मानतात, तर पंचवीस बुद्ध होऊन गेले असे बौद्ध मानतात. या जगाचा इतिहास सांगताना जैन धर्म आणि बौद्ध यांची कल्पाची व युगाची कल्पना अवाढव्यपणात समान आहे. या दोन धर्मांतील साम्य असे : अहिंसा परमधर्म, यज्ञखंडन, वेदप्रामाण्य व जातिसंस्था मोक्षमार्गात न मानणे; कर्मसिद्धांत, भिक्षुसंघ, लोकभाषेत उपदेश, मोक्षाचा सर्व मानवांस अधिकार इत्यादी.

    जैन धर्म आणि बैद्ध धर्मांतील प्रमुख तत्त्वांमध्ये मौलिक फरकही आहे. बौद्धांची पंचस्कंधांची कल्पना जैन कल्पनेहून भिन्न आहे. जैन पृथ्वीकाय, अप्‌काय, तेजकाय, वायुकाय व वनस्पतिकाय असे पाच प्रकारचे स्थावर जीव मानतात. बौद्धांमध्ये अशा प्रकारची कल्पना नाही. मतिज्ञान, श्रुतज्ञान, अवधिज्ञान, मन:पर्ययज्ञान व केवलज्ञान हे ज्ञानप्रकार बौद्धांत नाहीत. बौद्ध ‘निर्वाण’ आणि जैन ‘मुक्ती’ या कल्पना भिन्न आहेत.

    श्रमणसंस्कृती : वैदिक काळापासून भारतात यज्ञप्रधान ब्राह्मणी संस्कृतीबरोबरच अहिंसेवर आधरित श्रमणसंस्कृती अस्तित्वात होती, असे वैदिक वाङ्‌मयावरून दिसते. इंद्रियनिग्रह, परिग्रहत्याग, आत्मशुद्धी व अहिंसा या गोष्टींना महत्त्व देणारी ही श्रमणसंस्कृती होती. बौद्ध व जैन हे श्रमणसंस्कृतीचे अनुयायी होत. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य व परिग्रहत्याग ही व्रते श्रमणसंस्कृतीत मुख्य मानली होती.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...