Saturday, July 28, 2012

महाराणी अहल्याबाई व धनगरांची बदनामी...



फ़ेसबुकवरील "मानव भोसले" आणि "मराठा रियासत" या अकाउंटसवर मानव भोसलेने महाराणी अहल्याबाई होळकर , धनगर समाज आणि महादेव जानकर यांची अश्लाघ्य, अश्लील अशा भाषेत बदनामी केली आहे. या विकृतांविरुद्ध सुजाण समाज जी कारवाई करायची ती करेलच. ती केली जायलाच हवी, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही.

रायगडावरील वाघ्या प्रकरणात सलग दोन वर्ष नाकावर आदळलेले, मस्ती आणि गुर्मीची सवय असलेले, आम्ही सांगतो तोच इतिहास अशा भ्रमात राहणारे या पराभवाने आपले मन:स्वास्थ्य बिघडवून बसलेले आहेत. वाघ्याच्या घटनेतुन योग्य बोध न घेता, आत्मचिंतन करत न्याय्य वाटेने न चालता या ब्रिगेडी मंडळीने पुन्हा आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवण्याचा व समाजात संतापाचा उद्रेक उठवण्याच चंग बांधला आहे, हे उघड दिसते. या मंडळीला धनगरच नव्हे तर अप्रत्यक्षरित्या सुजाण मराठा बांधवांनाही बदनाम करायचे आहे. महाराणी अहल्याबाईंची महत्ता जगभर मान्य केली गेली आहे. त्यांच्याएवढ्या महन्मंगल, शूर, दानशूर आणि त्याच वेळीस प्रजाहितदक्ष अशी उत्कृष्ठ महिला प्रशासक जगात झाली नाही असा होळ्करांचा शतृ असलेल्या सर जोन माल्कमचाही निर्वाळा आहे. अशा पूज्य महाराणीवर जे अश्लाघ्य भाषेत राळ उठवू शकतात त्यांची जागा कोठे आहे हे मी सांगण्याची गरज नाही.

एकीकडे सर्व समाजात ऐक्य प्रस्थापित व्हावे असे प्रयत्न सुजाण लोक करत असतांना, त्यात थोडेफार का होईना यश मिळत आहे याची चाहुल लागत असतांना त्यात अदथळा आणत समाजस्वास्थ्य बिघडवण्याचा चंग या मंडळीने बांधलेला आहे. धनगर हा महाराष्ट्रातील एक महत्वाचा व सोशीक समाजघटक आहे. मराठा वर्चस्ववादाने विकृत झालेले मराठा पोरे आणि मुली याबद्दल अत्यंत घाणेरडे लिहित धनगर हेच "कुत्रे" आहेत असे "मराठा रियासत" या अकांउंटवर मानव भोसले लिहितो. त्याला धडाधड लाइक्स पडतात ही अजुन एक विकृती. यांचे बोलवते धनी त्यांच्या पाठीशी असल्याखेरीज अशी हिम्मत यांची होणार नाही हेही तेवढेच खरे. पण यामुळे एकामागुन एक समाज ते तोडत चालले आहेत, दुखवत चालले आहेत आणि या पापाची फळे कोण भोगणार?

फ़ेसबुकवर ख-या-खोट्या नांवाने कोनालाही बदनाम केले जाते. पण याचा अर्थ पोलीस त्यांना शोधु शकणार नाही असा त्यांचा भ्रम असतो. आम्ही महापुरुषांच्या बदनामेविरुद्ध कायम स्वरुपी  एक विधेयक पारित करुन घेण्याच्या प्रयत्नांत आहोत. ते पारित होईल तेंव्हा होईल, पण समाजात जोवर असे विकृत आहेत तोवर ख-या अर्थाने हा प्रश्न सुटेल असे वाटत नाही. ब्रिगेडने आपली उरली सुरली लाज वेशीवर टांगण्याचा चंग बांधुन छ. संभाजी महाराजांनाही बदनाम केले आहेच. वाघ्याला हटवता येणे यांना कालत्रयी शक्य नाही या नैराश्यातुन अशा विकृत्या उसळुन येणार असतील तर त्यांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.

माझी सर्व सुजाण बांधवांना नम्र विनंती कि कोणत्याही समाजातील महापुरुष असोत, त्यांची बदनामी करु पाहणा-यांना धडा शिकवा. त्यांचा जमेल त्या मार्गाने निषेध करा. नाहीतर आपला समाज सर्वैक्याची स्वप्ने कधीच साकार करु शकनार नाही.

हा साराच प्रकार उद्विग्न, खिन्न आणि हताश करणारा आहे. मी या मनोविकृतांचा निषेध करतो.

21 comments:

  1. "मानव भोसले" आणि "मराठा रियासत" ही नावे वापरून धनगर आणि मराठा समाज यांच्यात फूट पाडणाऱ्या व्यक्तींचा आम्ही जाहीर निषेध करतो. उद्या धनगर समाजातील नावाने अकाउंट उघडून मराठा समाजाची बदनामी झाली तर आश्चर्य वाटायला नको.
    ह्या कृत्याने जेवढा धनगर समाजाचा अपमान झाला आहे तेव्हढाच मराठा समाजाचाही अपमान झाला आहे. ज्यांनी हे कृत्य केले आहे ते माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाहीत.

    ReplyDelete
  2. मराठा समाजातील एका इतिहास विषयात उच्च शिक्षण घेतलेल्या एक "कदम" नावाच्या इसमाला मारहाण केली कारण त्याने धनगर साम्राज्याचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराज हे गवळी-धनगर होते हे बर्याच लोकांना पटवून दिले. त्यांना हि चिंता खूप मोठ्या प्रमाणात होती कि राजकीय नेते आणि बरीच जमीनदार वर्ग हा मराठा म्हणवून घेत असतो. आणि जर धनगर १३ ते १४ धनगर साम्राज्य असतील तर आणि शिवाजी महाराजान विषयी चे कुल उत्पत्तीचे संशोधन जर धनगर आणि पशुपालकांच्या बाजूने झाले तर "मराठा" समाजाच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण होयील.

    इतिहास हा भावनिक होयून स्वतःच्या मर्यादित समाजापुरता लिहिल्याची आणि वाचण्याची सवय कारणीभूत आहे.

    महाराणी अहिल्यादेवी होळकर या फक्त राजमाता नव्हत्या तर त्या जनतेच्या आई होत्या. त्यांच्या संस्थानामध्ये कोणी आजारी अथवा जखमी असेल तर त्या जातीने त्याचा उपचार करत असतात.

    त्या राजमाते पेक्षा जनतेची आई जास्त होत्या. अश्या देवी बद्दल अपमान जनक उद्गार काढणाऱ्या नालायक वक्तीला मार खाण्याची प्रचंड हौस आली असावी असे म्हणावे लागेल.

    ReplyDelete
  3. Ashya goshticha nished karava titka kami....madhyantri hi bigredine brahman samajatil striyanchi badnami keli hoti aani aata dhangar mulinchi badnami. hyancha maj utrava lagelch..
    hyach bigredi jatichya itihaskarani thorle bajirao peshve hyanchya matoshrichi badnami keli hoti. aata he maharani ahilybai holkar yanchi keli aahe..hya ashya nalayakvar tvarit karvahi keli geli pahije..

    ReplyDelete
  4. आता तुमच्या हेतूविषयीच शंका येऊ लागली आहे. जे घडले आहे ते अश्लाघ्य म्हणण्याच्याही पलीकडचे आहे. पण अशी बदनामी फक्त महाराणी अहिल्याबाईंचीच होत नाही. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि आंबेडकर यांची देखील होते आणि अनेकदा होते. पण त्या वेळी तुम्हाला कधी लेख लिहावासा वाटत नाही. आंबेडकरांचे व्यंगचित्र पाहून देखील तुम्हाला लेख लिहावासा वाटला नाही. आरक्षणालाही तुमचा विरोध आहे. तुमच्या आणि गोळवलकर गुरुजींच्या अजेंड्यात काही फरक दिसत नाही. अर्थात तो दोष इतरांच्या दृष्टीचा म्हणून तुम्ही झटकू शकताच.
    एकीकडे तुम्ही समाजाला एकत्र आणण्याची स्वप्ने दाखवता आणि दुसरीकडे प्रत्येक जातीचा वेगवेगळा इतिहास लिहून जातीय ओळख मजबूत करण्याचेच काम करता.जातींचा इतिहास लिहिण्यात काही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण प्रत्येक जातीच्या मनात आम्हीच श्रेष्ठ आहोत आणि आम्हीच राज्यकर्ते होतो असा अभिमान निर्माण होणे हे निश्चितच गैर आहे. आम्हीच राज्यकर्ते होतो आणि आमचे राज्य हिरावून घेऊन आता आम्हाला तुडवले जात आहे ही भावना काही प्रमाणात समर्थनीय असेल पण सामाजिक स्वास्थ्यासाठी हितावह नाही. तुमचा तसा हेतू नसेलही, पण अशा प्रकारच्या भावना समाजात सर्वच जातींमध्ये प्रबळ होऊ लागल्या आहेत. काळाच्या ओघात सत्तेचे केंद्र हे अनेक समूहांच्या हातातून फिरत असते. भूतकाळात कोणाचे पूर्वज राज्य करत होते हे जाणून घेणे महत्वाचे आहे परंतु त्या आधारावर आजच्या काळात सत्तेवर दावा सांगणे हे चुकीचे आहे.
    'आम्ही या देशावर हजार वर्षे राज्य केले आहे. म्हणून आम्ही तुमच्या बरोबरीने लोकशाहीत राहू शकत नाही.' ही मुस्लिम समाजातील प्रबळ भावना हे पाकिस्तानच्या निर्मितीचे मूळ कारण आहे. आज हीच भावना प्रत्येक जातीत मूळ धरू लागली आहे. सत्तेवर अधिकार सांगण्यासाठी गळ्यात गळे घालणारे लोक सत्ता मिळाल्यावर काय करतील हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. सामाजिक ऐक्य हे सत्तेच्या ओढीतून कदापिही निर्माण होऊ शकत नाही. त्यासाठी सामाजिक प्रेरणांमध्ये मूलभूत बदल घडून यावा लागतो. तो बदल जोवर घडत नाही तोवर आम्ही 'श्रेष्ठ आणि इतर सारे कनिष्ठ' हेच सर्व जातीय संघटनांचे घुपे घोषवाक्य राहणार.

    ReplyDelete
    Replies
    1. @Annonymous, जेंव्हा आपण गंभीर विधाने करत असतो तेंव्हा तरी किमान स्वत:च्या नांवाने सामोरे यावे. असो. तुम्हाला माझ्या हेतुविषयी शंका आली आहे, हरकत नाही...याच दुसरा अर्थ असा होतो कि तुम्ही माझे सर्व लेखन (ब्लोगवरील व छापील) वाचलेलेच नाही. गोलवलकरांबरोबर माझे नांव घेवून माझा अपमान कशाला करताय?

      दुसरा जातींच्या इतिहासाबद्दल. मुळात या लेखमालेचे preamble तुम्ही वाचलेले दिसत नाही. सर्व जाती एकाच समाजातुन (मग ते ब्राह्मण असोत कि अन्य कोणी) नवनव्या शोधांमुळे लागलेल्या व्यवसायांतुन निर्माण झाल्या, सबब सर्वांचे पुर्वज एकच व एकत्रच होते हे स्पष्ट केले असतांना हा प्रश्न उपस्थित करणे सर्वस्वी अज्ञानमुलक आहे. प्रत्येक जातीसमुहाचे संपुर्ण समाजासाठी योगदान होते व आहे हे सांगणे काळाची गरज आहे. आपली जात राज्यकर्तीच होती हा अहंगंड ज्यांचा असेल त्यांचा असेल. आज सत्तेवरचा दावा हा केवळ लोकशाही मार्गानेच सांगता येवू शकतो. सरंजामशाहीवादी प्रवृत्ती लोकशाहीत अपेक्षीत व अभिप्रेत नाहीत. पण आजही जुने सरंजामदार आजही लोकशाहीचे बुरखे पांघरत तीच सरंजामशाहीवादी माजोर्डी वृत्ती जपत असतील तर निषेध हा होनारच. आणि याच सरंजामदारी प्रव्रुती सामाजिक ऐक्यातील अडसर आहेत. महान लोक सर्वच समाजांचे असतात...कोणत्याही एका जातीने त्यांच्यावर अधिकार सांगु नये...पण आज शिवाजी महाराज ते अहल्याबाई जातीत वाटले गेलेत...हा दोष कोणाचा आहे?

      सामाजिक प्रेरणा बदलायच्या तर आधी सर्वांत आत्माभिमान यावा लागतो. आम्ही तेवढे उच्च आणि बाकीच्यांची लायकी काय हा उद्दाम प्रश्न निर्माण होतो तेंव्हा प्रथम त्या प्रश्नाचे निर्दालन करावे लागते. मला वाटते मी तेच करत आहे.

      आपण प्रतिक्रियेच्या प्रारंभीच निषेध नोंदवला याबद्दल मी आपला आभारी आहे. असाच सुसंवाद सुरु ठेवुयात. धन्यवाद.

      Delete
  5. वर दिलेल्या नावामधे भैया पाटिल हे नाव आहे ते चुकून मराठा रियासत असे लिहिले असावे ..वास्तविक पाहता यातून काही फरक पडत नहीं खरा भैया पाटिल नावाने अकाउंट चलावानारा ब्रिगेडी हा स्वतःहाचे खरे नाव दिबंगर काले हे न संगता भैया पाटिल असे सांगतो ..आनी वरील मराठा नावाने पोस्ट करणारा तोच असणार .....

    "नेशन फस्ट " हे धनगरान्ना कुणी शिकवू नये ..कारन धनगर नेहमी असाच जगत आला आहे . सम्राट सिकंदाराचे देशावरिल आक्रमण धनगर असनारा व आजच्या लोकसभे समोर ज्याचा पुतला उभा करून जगाला ग्वाही देणारा सम्राट चन्द्रगुप्त मौर्य, अल्लाव्द्दीन खिलजी चे अक्रमनाने उद्वस्त झालेला दक्षिण भारत पुन्हा उभा करणारे विजय नगर समजायचे सौन्स्थापक हक्कराय व बुक्कराय बंधू हे धनगरच होते . व औरंगजेबाने सम्पूर्ण सांस्कृतिक भारत उधवस्त ,उकिरडा केला होता ते सम्पूर्ण भारताचा जीर्णोधार मल्हारराव होलकर यांच्या पराक्रमी तलवारीच्या दरार्य ख़ाली मातोश्री अहिल्यादेवी होलकरान्नी स्व खर्चाने केला आहे ते ही धनगरच होते हा इतिहास तुम्ही कितीही लपवला तरी जगासमोर येताच राहणार आहे ..
    जर अश्या देशप्रेमी ,प्रमाणिक धनगराचा गौरव अपनास का सहन होत नाही ...

    राजमाता अहिल्यादेवीं बद्दल झालेल्या अपमानाचा सर्वानिच निषेध करायला हवा..

    ReplyDelete
  6. हा भैया पाटील उर्फ दिगंबर काळे उर्फ मानव भोसले ..हाच सर्वाचा सूत्रधार आहे .....

    सोनवणी सर व हरी नरके हे बहुजन लोकांना मदत करत आहेत या सुडापोटी च भैया पाटील उर्फ दिगंबर काळे हा ब्रिगेडी त्यांचे नाव घेत आहे .....

    याने अतिशय घाणेरडे पाने धनगर व बहुजन समाजातील आया बहिणीं वर चिखल फेक केली आहे ....या निमित्ताने संभाजी ब्रिगेड चा खरा चेहरा जगासमोर उघड झाला आहे .....

    धनगर व बहुजन समाजाने ब्रिगेड ची साथ कधीच तोडली आहे ....सोनवणी सर व हरी नरके यांचे कडे कोण डोळे जरी वाकडे करेल त्यांचे डोळे काढून हातात देऊ .........

    या मानव भोसल्याला व त्याचा बापाला धनगर समाज सोडणार नाही ..आणि शिवाजी महाराजानेचे नाव घेऊन त्यांचेच ऐतिहासिक ठेवा उधवस्त कार्नार्यला पण सोडणार नाही ..

    आता पर्यंत आम्ही गप्प होतो ..अहिल्यामाई ला घाणेरडे बोलणार्या ब्रिगेड वाल्याला आता सोडणार नाही

    जय शिव मल्हार , जय भीम !!

    ReplyDelete
  7. Sanjay ji, I have a question for you. Why are you getting offended because some misguided , frustrated people make nonsensical comments. There are rogue elements in every community and they will try their best to create trouble. Some people can't just accept the facts and live in their fantasy world. These are the same people who are blinded by false pride and whenever they are shown the mirror they will spit venom. It's not unexpected.
    But a person of your stature can't react to these people. Sadly, it makes them famous. May be I'm wrong but I wanted to know the reason for this reaction.

    ReplyDelete
    Replies
    1. Milind ji, I fully agree with you. I need not to get offended now and then for such venom, that is now have been become custom of our degraded society. I try to be positive, write on the issues those have far more importance, but unfortunately the bugs of nuisance vallue try their best to destroy the social bonds existing from ancient times. True that reacting on such people make them famous, but I feel giving such people a free space makes them more destructive. If a seed of violence or hatred is seen sprouting, we have only choice to destroy it before it grows to a level that it darkens our minds or let it grow without thinking whether the same seed is going to poison and darken our and our next generations life.

      True, I am too have been tired of these people. True, society and awakened persons like you too have been tired of such people....but they are so much so active...it is just not that they have written something and I am reacting...their actions to which they are directed to makes me worried. Those actions to which they are determined and want to pave their way through such superficially seemed venom, creating an atmosphere, so that their final action would seem as if a reaction. This worries me. All positive thoughts have meaning only if positiveness is well understood. Creation has value only if creative minds are ready to understand meaning of creation. If destruction is only motto of some people, I feel, we need to denounce them as and when they try to surface. Creation cant ever stand upon the land where the destructive minds are at work.

      This is why my friend, though I too feel same as you, I am wasting time to avoid future destruction.

      I am really grateful for your kind words. Thanks.

      Delete
  8. मी चुकतही असेन कदाचित पण ही सगळी चिखलफेक आणि जळफळाट बघितल्यावर मला असे वाटते की वर्गवादाच्या लढ्याला जातीवादाचे स्वरूप देऊन त्या लढ्याची धार बोथट करण्याचा हा प्रयत्न आहे. जे कोणी हे करत आहेत ते अतिशय थंड डोक्याने आणि योजनाबद्ध रीतीने करत आहेत. त्यामुळे त्यांना उत्तर देताना आपणही डोके थंड ठेवण्याची गरज आहे.
    दरवेळी कोणीतरी खोडसाळपणा केला की इतरांनी निषेध नोंदवत बसायचे हा बचावात्मक पवित्रा झाला. आता आपण सर्वसामान्य व्यक्तींनी एकत्र येऊन समाजात असे वातावरण निर्माण केले पाहिजे की अशा प्रकारचे लेखन करणाऱ्यांना स्वत:चीच लाज वाटेल. ब्रूस लीच्या ENTER THE DRAGON या चित्रपटात एक वाक्य आहे जे इथे चपखल लागू पडते - Remember, the enemy has only images and illusions behind which he hides his true motives. Destroy the image and you will break the enemy.

    ReplyDelete
    Replies
    1. Jidnyasu ji, I agree with you. We need to find a way that can break the enemy. Spraeding positive thought as much as possible could be an answer.

      Delete
  9. धनगर, मराठा, ब्राह्मण, लिंगायत, वक्कलिंग, मुस्लिम, समाजाला बदनाम करणारे / त्यात फूट पाडणारे ...

    महाराणी अहल्याबाई, संभाजी महाराज यांची बदनामी करणारे...

    R.S.P मधील मराठा , लिंगायत , वक्कलिंग , मुस्लिम समाजातील नेते / समर्थक / कार्यकर्ते कसे बाहेर पडतिल, याची विशेष काळजी घेणारे... आणि त्यासाठीच मान्य. महादेवजी जानकर व R.S.P'स बदनाम करू पाह्णारे...

    पुरोगामी चळवळीस / नेते व लेखक यांना कमालीचे व घाणेरडे पध्दतीने बदनाम करू पाह्णारे, आणि ते ही महापुर्शांचे नाव घेवून ... आता ते पुरते उघडे पडले आहेत.

    त्यांचा खरा, संकुचित, विचित्र चेहरा दिसला आहे.

    आता त्यांनी लिमिटही क्रॉस केले आहे.

    मराठा रियासत आणि मानव भोसले द्वारे जे काही चालले / करीत आहे... त्यांना आता माफ़ी नाही.

    ReplyDelete
  10. ब्रिगेडी आणि बामसेफींच्या अतिशय विखारी आणि विकृत प्रचारतंत्रामुळे महाराष्ट्रातील सामाजिक-सांस्कृतिक वातावरण गढूळ झाले आहे.उठता-बसता छत्रपती शिवाजी महाराज,जिजाउ,संभाजीराजे,महात्मा फुले,डा.आंबेड्कर यांचे नाव घेणारया या संघट्नांच्या कार्यपदधतीमुळे खरं तर या महापुरषांचाच अपमान होत आहे.याला वेळीच आवर घातला पाहीजे.

    ReplyDelete
  11. खर तर हि खूप निषेधात्मक बाब आहे, जर एखाद्या व्यक्तीने अशाप्रकारे अश्लाघ्य शब्दातून Internet किंवा Social Networking site वरून टीका केल्यास आणि त्या व्यक्तीची पोलिसात तक्रार नोंदवल्यास पोलीस India IT Act ,2000 आणि Indian IT amendment ,Act 2008 नुसार कार्यवाई करू शकतात. मला वाटत अशा नालायक लोकाची जागा त्यांना समाजाने योग्यवेळीच दाखवून द्यावी.

    ReplyDelete
  12. अहिल्यादेवी होळकर या पुण्यश्लोक होत्या.इस्लामी आक्रमणाने ध्वस्त झालेल्या सर्व मंदिरांचा पुनरुद्धार त्यांनी केला.खरे तर हे काम छत्रपतींनी किंवा पेशव्यांनी करावयास हवे होते.पण त्यांच्यासारख्या बहुजन समाजातील विधवा स्त्रीने हे महान कार्य पार पाडले.त्यांना विनम्र अभिवादन!

    ReplyDelete
  13. संजय सोनवणी,
    अहिल्यादेवी हिला पुण्यश्लोक अशी यथार्थ पदवी दिलेली आहे
    त्यांच्या बद्दल कणभरही वाईट लिहिण्याचा विचार मनात येणे हे पाप आहे.
    पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी केलेले समाजकार्य पर्वता एव्हढे उत्तुंग आहे. त्याला कुणाच्याच शिफारशीची गरज नाही
    .हल्लीचे खुजे राजकीय नेतृत्व या साध्वीपुढे खुजेच पडणार.
    त्यानी धर्मासाठी जो पैसा खर्च केला तो योग्य धोरण राबवून केला .मराठेशाहीच्या पडत्या काळात त्यानी उत्तम प्रकारचे
    घाट आणि देवळे संपूर्ण भारतभर बांधली आणि प्रजेची- समाजाची - धर्म जाणीव भक्कम ठेवली.
    आज पुतळे उभारणे -मग ते समुद्रात असोत वा जमिनीवर,माणसांचे असोत वा हत्तींचे - सगळा भ्रष्टाचाराचा मामला झाला आहे.
    अहिल्याबाई बद्दल एक कथा वाचनात आली होती.ती तिच्या प्रगल्भ राजकीय जाणिवांचा पुरावाच देते.
    राघोबादादा पेशवे पदावर बसून नंतर त्याची बार भाई मुळे पळापळ झाली त्या वेळेस आनंदीबाई अहिल्याबाईना भेटायला संस्थानच्या वेशीवर पोहोचली.
    तिची अपेक्षा आपल्याला पेश्वीणी प्रमाणे वागणूक मिळेल पण अहिल्यबाइनी तिला वेशी बाहेरच ठेवले -मानाने राजधानीत न आणता, तिला वेशी बाहेर
    जाऊन भेटल्या आणि तिची परस्पर बोळवण केली.कर्ज मागायला आल्याचा हेतू आधीच ओळखून त्यांनी मुत्सदी पणाने त्यांना चार हात लांब ठेवले.

    ReplyDelete
  14. संजय सोनवणी,
    पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या बद्दल अतिशय हीन लिहिणाऱ्यांचा निषेध करत मी काही गोष्टींचा खुलासा विचारत आहे.
    पानिपतच्या युद्धात नजीबखान हातात सापडला असताना , तो माझा मानसपुत्र आहे - त्याला सोडा - अशी देशविरोधी
    भूमिका मल्हाररावांनी घेतली होती असे " पानिपत"(विश्वास पाटील या कादंबरीत वर्णन आहे ते खरे आहे का ?
    पेशव्यांबद्दल सुद्धा त्यांचे उद्गार असे आहेत की पानिपतात झाले ते झाले नसते तर पेशव्यांनी
    आपल्याला नाटक शाळेचे कपडे धुवायला लावले असते -आपल्या सगळ्याना.(किंवा साधारण या प्रकारचे -शब्द बदलले असतील -पण गाभा तोच आहे.)
    असे मत त्यानी व्यक्त केले होते का ?
    छ.शाहू महाराजांनी अधिकृतपणे निर्माण केलेल्या पेशवे पदाबद्दल इतके अनुदार उद्गार त्यानी कसे काय काढले ?
    पेशव्यांनी महाराष्ट्र आणि दक्षिण वाचवण्यासाठी इतर जातींची फळी मुघल आणि महाराष्ट्रा मध्ये उभी केली .
    आणि स्वतःचे काम या शिंदे-होळकर यांच्यावर लादले आणि स्वतः मजा मारायला मोकळे झाले.
    चौथाई आणि सरदेशमुखी यावर तृप्त राहून पेशव्यांनी मराठी राज्याचे नुकसानच केले.
    घणाघाती लढाया लढूनही शत्रू जिवंतच राहिले ही पेशव्यांची मोठ्ठी चूक आहे.
    आपण वेळात वेळ काढून यावर आपले मत नोंदवाल का ?
    मी असभ्य लेखनाचा परत तीव्र निषेध करतो.

    ReplyDelete
    Replies
    1. Vishwaas Patlaana hey pan mahit nasave ki Malhaarawani panipataa nantar weglya swaarya karat kamkuwat Najibaa kadun Maratha Muli, bayka ani sainikaana sodvun aanle. aaj Vishwaas patil bhrashtaachaarche aaropi ahet. Tyancha Panipat kadambarit aslela Marathyancha sandharbh puhna sanshodhla pahije. aajwar Fakt Maratha jaatach ladhli asaach samaj karun dila aahe. Baki jaati baghyachya bhumiket hotya ani jya ladhlya tyaana Eklavyachi shiksha dili geli aahe.

      Delete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...