Friday, July 27, 2012

सत्त्याबद्दल...



१. मानवी जगात निरपेक्ष असे सत्त्य अस्तित्वात असू शकत नाही.

२. मनुष्य हा भावनीक प्राणि असल्याने त्याचे सत्त्य हे भावनीक...एव-तेव सापेक्ष सत्त्य असते.

३. त्यामुळेच मानवी जीवनात अंतिम सत्त्य असे कोणतेही तत्व नसते.

४. एकाला जे सत्त्य वाटते ते दुस-याला वाटु शकत नाही, वा एकालाच आज जे सत्त्य वाटते ते नंतर सत्त्य वाटेलच असे नाही, कारण मानवी सत्त्याच्या कल्पना या काळाने बद्ध असतात.

५. म्हणुनच असत्त्यालाही काही अर्थ नसतो. कालची सत्त्ये आज असत्त्य वाटु शकतात तर आजची असत्त्ये उद्याची सत्त्ये बनु शकतात.

६. शाश्वत सत्त्याचा शोध हा मृगजळाचा शोध ठरतो तो यामुळेच.

७. शोध सत्त्याचा नसून तथ्यांचा असू शकतो. तथ्ये सत्त्य असतातच असे नाही. सापडलेली तथ्ये माहितीचा विस्तार असतात. ज्ञानाचा नव्हे.

८. जी सत्ये आजवर गवसल्याचा दावा केला गेला आहे ती भावनिक व म्हणुन संस्कारीत सत्ये आहेत. निरपेक्ष सत्ये नाहीत.

९. संस्कारीत होऊ शकते असे सत्त्य असु शकत नाही.

९. शाश्वत म्हणता येईल असे एकही सत्त्य मानवाला गवसलेले नाही वा कधी गवसणारही नाही. भावनिक असणे ही निरपेक्ष सत्याकडे जाणा-या मार्गातील अलांघ्य व अभेद्य अशी भिंत आहे.

१०. भावनिक असण्यातच मनुष्याचे मनुष्यपण आहे.

7 comments:

  1. सत्त्य आहे ...............

    ReplyDelete
  2. Sonawane sir, aamhala tumche vinodi lekhan vachnyachihi ichha aahe. To ek praant aaplya hatun sutla aahe. Tya prantat ek feri marayala kay harakat aahe?

    ReplyDelete
    Replies
    1. Sanjay Sir yani Vinodi lekhan pan kele ahe. Kahi juni pustake mala aathavat ahet. Pan tumhi mhanta tase blog var tyanche Vinodi lekhan vachayla khup awdel. :-)

      Delete
  3. Yes, pan Sanjayji yababat ajun kahi bolat nahit.

    ReplyDelete
  4. मित्रांनो...मी राजकीय उपहासात्मक कादंब-या लिहिल्या आहेत. त्यात विनोद नक्कीच आहे. मी अत्यंत सुरुवातीच्या कालात काही विनोदी कथाही लिहिल्या होत्या. पण एकुणात माझा पिंड गांभिर्याकडेच झुकतो. तरीही मी तुमच्यासाठी प्रयत्न नक्कीच करेन. फक्त माझ्या त्या इनोदाला हसु नका एवढेच. धन्यवाद.

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...