Monday, September 10, 2012

संभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न ...?


मित्रहो, मला एक प्रश्न पडलाय. कालच मी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज या शालिनी मोहोड लिखित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात हा प्रश्न उपस्थित केला आणि मला वाटनारे तर्कनिष्ठ विश्लेषनही केले जे श्रोत्यांना स्फोटक वाटले असले तरीही अन्य वक्त्यांनाही पटले. असो. प्रश्न असा आहे कि १ फेब्रुवारी १६८९ रोजी संगमेश्वर येथे संभाजी महाराजांना पकदण्यात आले व त्यांची हत्या (दुर्दैव म्हणजे या ग्रंथाची लेखिका वारंवार या हत्येला "वध" म्हणत होती. निषेध करावा तेवढा कमीच!) १३ मार्च १६८९ रोजी झाली. या काळात संभाजी महाराजांचा छळ क्रमाने करत शेवटी हत्या कशी केली गेली याची सर्व वर्णणे मिळतात. पण याच काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने वा शंभुराजांच्या एकाही मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी आला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही.

हे विचित्र अशासाठी वाटते कि तदनंतर राजाराम महाराज जिंजीला असुनही मराठ्यांनी याच औरंग्याला सळो कि पळो कसुन सोडले. राजाराम महाराजांच्या अकाली मृत्युनंतराही रणरागिणी ताराराणीने अथक लढा सुरुच ठेवला. औरंग्याला याच भुमीत हताश श्वास घेत मरायला भाग पाडले...

मग असे तेंव्हाच नेमके काय झाले कि एकही सरदार संभाजी महाराजांच्या मुक्ततेसाठी अल्पसाही प्रयत्न करु शकला नाही? मंत्री-मुत्सद्दी यांनी किमान वाटाघाटींचा प्रयत्न का केला नाही?

कि संभाजी महाराज खरेच जनतेला म्हणा वा सरदारांना म्हणा कि मंत्र्यांना म्हणा नकोसे होते? राजाराम महाराज रायगडावरुन वेढ्यातुनही सटकुन जिंजीला जावू शकतात तर महाराणी येसुबाई आणि बाल शिवाजी (शाहुंचे जन्मनाम शिवाजी होते) मात्र औरंगजेबाच्या कैदेत जातात याचा अन्वयार्थ कसा लावायचा?

कृपया इतिहास अभ्यासकांनी या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी मदत करावी ही विनंती.
2 ·  ·  · 
    • Amit Namjoshi संजयदा, योग्य शंकेला वाचा फ़ोडलीत. असं जाणवून गेलं की होय अशी शंका आमच्याही मनात होती.
      about an hour ago · Edited ·  · 2
    • Sudhakar Jadhav स्फोटक आणि अडचणीचे प्रश्न ! उत्तरे मुद्द्यात येतात की गुद्द्यात हे लवकरच कळेल.
      about an hour ago ·  · 1
    • Sanjay Sonawani संगमेश्वर ते तुळापुर हे अंतर पाच-सहा हजार सैन्याच्या मदतीने शंभु राजांना घेवून मोगलांनी कापले. या विस्तीर्ण भागात एकही मराठा सरदार नव्हता काय? कि शंभुराजांना कैद केल्याची माहिती मराठ्यांना त्यांची हत्या होईपर्यतही मिळालीच नाही? मला हे अशक्य वातते म्हणुन हे प्रश्न. औरंगजेबाचे सैन्य मोठे होते पण त्याची धास्त मराठ्यांना होती असेही दिसत नाही....त्यामुळेच नेमके काय झाले असावे याबाबत काहे पुरावे मिळतात काय यासाठीच ही पोस्ट आहे.
      55 minutes ago ·  · 2
    • Sanjay Sonawani 
      जाधव सर, प्रश्नच विचारले नाहीत तर आपण उत्तरे कशी शोधणार? ज्यांना इतिहास ही आपलीच जातीय मालमत्ता वाटते ते गुद्द्यांवर येवू शकतात...तसे काही कालही आले होते...पण म्हणुन संशोधने करायचीच नाहीत का? आपल्याला उत्तरे हवी आहेत आणि ती शोधायचा हा प्राम...See More
      50 minutes ago ·  · 5
    • Gitesh Deokar ‎1.महाराजांची हत्या 13 नाही तर 11 मार्चला झाली...
      2.औरंगजेब महाराजांना सोडायला तयार होता मात्र त्याला स्वराज्याचा खजिना हवा होता..आणि त्याच्या दरबारातील कोण कोण महाराजांना सामील होते,याची माहिती हवी होती..(ही खाफीखानाची नोँद आहे.)
      3.औरंगजेब...See More
      41 minutes ago via mobile ·  · 3
    • Sanjay Sonawani 
      गितेशजी, तारखांचा घोळ आपल्या इतिहासात संपत नाही...दुर्दैव. असो. संभाजी राजे ताब्यात असतांना स्वराज्याचा खजीना तेवढ्याच धमकीवर शंभुराजांच्या मंत्र्यांकडुन वा येसुबाईंकडुन मिळवणे सहज शक्य होते. त्यामुळे शंभुराजांनी खजिना दिला नाही म्हणुन त्या...See More
      30 minutes ago ·  · 3
    • Sanjay Sonawani आणि एक अजुन प्रश्न...शंभुराजांना कैद केल्यानंतर शंभुराजांना किमान चर्चेसाठी त्यांच्या एकाही मंत्र्याशी/अधिका-याशी/वकीलाशी बोलायची परवानगी न देता औरंगजेब शंभुराजांकडुनच अनुमत्या मिळवायला छळत राहु शकतो काय? जगाच्या इतिहासात असा प्रसंग घडला आह...See More
      20 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar कदाचित जातिव्यवस्थेला हादरे देणारं कार्यच कारणीभूत असावं...वैदिक धर्म नाकारुन शाक्त धर्माचा प्रसार यामुळे त्यांची बदनामी करण्यात आधीच मंत्री यशस्वी झाले होते..मराठा सरदारांना वतनदारी पद्धती बंद पाडणं रुचलं नसावं कदाचित..कारण यामुळं त्यांचं वर्चस्व धोक्यात आलं होतं...:-)
      18 minutes ago via mobile ·  · 2
    • Sanjay Sonawani And Rajaram Maharaj restarted vatandari,....Gitesh ji...this also can be a reason. Let's probe more. Thanks.
      15 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar याउलट औरंगजेबाने वतनदारांना मोकळं रान सोडण्याची भूमिका घेतली होती...त्यामुळे शंभुराजांपेक्षा तो परवडला अशी मनोमन गणितं जमवुन शंभुराजांना कसलीही मदत न करता मरणाच्या दारात या सरदारांनी सोडुन दिलं असावं..!
      13 minutes ago via mobile ·  · 2
    • Sanjay Sonawani Could be. We need to probe to reach to the conclusion...
      10 minutes ago ·  · 2
    • Gitesh Deokar तुमच्या मागच्या कथेत चितारलेला इतिहासाच्या गोधड्या उसवणारा नायक खरोखरी तुम्हीच आहात....आगे बढो..:-)
      2 minutes ago via mobile ·  · 1
    • Sanjay Sonawani गितेशदा...म्या जीवंत हाय...सावली नाय.
      उद्याचं दादा माह्यत नाय!..

62 comments:

  1. योग्य मुद्दा आहे.. संभाजी राजे पराक्रमी होते मात्र ते पूर्वी मुघलांना जावून मिळाले होते. या अर्थाने एकदा त्यांनी फितुरी केली होती. पुढे त्यांनी अतुलनीय बलिदान देवून इतिहास रचला मात्र भूतकालातील ही चूक शिवाजी महाराज व त्यांच्या जुन्या साठीदारांना शेवट पर्यंत डसली असणार यात शंका नाही. थोरल्या महाराजांनी रक्ताच पाणी करून स्वराज्य स्थापले , वाढवले मात्र संभाजी राजांनी एकदा फितुरी करून त्यांना खूप त्रास दिला. नंतर ते स्वगृही परतले मात्र जखम सहजा सहजी भरून येत नाही.मात्र दुर्दैवाने राज घराण्यातील काही स्त्रिया मुघल सैन्याच्या ताब्यातच राहिल्या (संभाजी राजांची भगिनी ? ? खात्री करावी लागेल ) यामुळे त्यांच्या कार्कार्दीवर कलंक लागलाच! उत्तरार्धात महाराज स्वराज्याच्या दोन गाद्या करण्याचे योजत होते (राजाराम आणि संभाजी) मात्र त्या आधीच ते निर्वतले. नंतर १६८९ मध्ये संभाजी राजे त्यांच्या मेव्हानाच्या विश्वास घाताने मोघलांच्या कैदेत अडकले तेव्हा मात्र म्हणावे तसा उठाव झाला नाही. संभाजीने जेव्हा बलिदान दिले तेव्हा मावळे त्यांचे पार्थिव ताब्यात घेण्यात यशस्वी झाले मात्र तेवढी धडपड ते हयात असेतोवर दाखवली गेली नाही (काही प्रयत्न झाले असतीलहि मात्र शंकेला जागा आहेच. )

    ReplyDelete
    Replies
    1. thorle Chatrapatinacha barryach ladhya swakiyabarobar zalya ani thorlya Chatrapatina maratha manaylach Kemsawanta sarkhe maratha sardar tayar navhat yat ya prashanache uttar shodhave lagel. lakhat ghya chatrapati sambhaji maharajancha fand fituri karnara mhevanch hota lakshat ghya ani mag itrana shivya dhya.

      Delete
    2. फितुरी करायचं कारण पण सांग मग.अरे ज्यांनी 40 दिवस एव्हड्या यातना सोसल्या त्यांनी त्या वेळी औरंजेबाच्या अटी मान्य करून सुटका करून घेतली असती.पण नाही .संभाजी महाराज मुघलांना मिळले ही शिवाजीराजे ची चाल होती.दक्षिण दिग्विजय चालू होता स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी .माहीत नसेल तर चुकीच्या गोष्टी पसरवू नकोस

      Delete
    3. Bhava nitt itihaas mahit nasel tr ugach kontta pn goshtichye aarop छत्रपती sambhaji maharajan var lavu nkos

      Delete
  2. संभाजीच्या आधी पासून शाक्त संप्रदाय अस्तीताव्त होता, जोमात होताच. संभाजी राजांनीच एकट्यानी शाक्त संप्रदाय वाढवला असे काही नाही. तरी क्षण भर मानले कि वरील कारणामुळे त्यांची काही लोकांनी बदनामी केली तरी एकही सरदार त्यांच्या सुटके साठी प्रयत्न करत नाही याला काय म्हणावे? यामध्ये सोयरा बाईंचे राजकारण, आधीच्या फितुरीमुळे आणि त्यामुळे ओढवलेल्या संकटांमुळे गमावलेली लोकप्रियता ही कारणे पण असावीत असे वाटते.
    बाकी पंडित औरंगजेबाने त्यांची मनुस्मृती प्रमाणे हत्या केली असे मानणारे बी ग्रेडी पण आहेतच कि!

    ReplyDelete
  3. एक गोष्ट आपण इथे फक्त अंदाजच करू शकतो, असे झाले असेल किवा तसे झाले असेल.................यात माझा पण एक अंदाज. गीतेश्जी.....म्हन्तात्त तसे मराठा सरदार आणि वतनदार नाराज असतील.........आणि दुसरे म्हंजे पराभूत मानसिकता............स्वत संभाजी रजेच सापडले म्हटल्यावर मराठा सेना काही कला पुरती का हून गर्भ गळीत झाली असणार...जे स्वाभाविक आहे......नंतर नेता मिळाल्या मुले राजाराम महाराज, ताराराणी किवा संताजी धनाजी.................अजून जोमाने लढाईला सुरुवात केली असेल. पण यावरून संभाजी महाराजांना जनतेचा पाठीम्भा नवता असा निष्कर्ष काही उत्साही इतिहास संशोधक काढू शकतात. तसे जर असते तर ८ वर्ष संभाजी महाराज मोगलांचा मुकाबला कासुच शकले नसते.....त्याचे सैन्य ५ लाख असावे असा अंदाज आहे

    ReplyDelete
    Replies
    1. विकास. तुझ्या मते मराठा सैन्य पराभूत मानसिकते मुळे घाबरले आणि त्यांनी
      त्यामुळे संभाजी च्या सुटकेसाठी प्रयत्न केले नाहीत तर मग किमान वाटाघाटी
      किंवा तहासाठी सुधा साधा प्रयत्न केलेला नाही, यावरून जनतेचा पाठींबा
      होता का नव्हता हे स्पष्ट होते. तरी तुमच्या मते यामागचे कारण स्पष्ट
      कराल का कि याच्या मागेही काही खास राजकारण होते असे आह्मी समजायचे.

      Delete
  4. http://en.wikipedia.org/wiki/Sambhaji#Capture_and_Attempts_to_rescue

    Sambhaji, Kavi Kalash and his men were surrounded from all sides. Marathas took out their swords, roared ‘Har Har Mahadev’ and pounced upon the far too numerous Mughals. A bloody skirmish took place and Sambhaji was captured on 1 February 1689.

    Maratha soldiers and other faithfuls unsuccessfully tried to rescue Sambhaji but were killed by Mughals on 3 February 1689.

    ReplyDelete
    Replies
    1. So you mean to say that you are more reliable than Wikipedia? Ha Ha!

      Delete
    2. I am not. I am seeking reliable historical references...If you have kindly share or quit.

      Delete
    3. Wikipedia has a page about you too.

      http://en.wikipedia.org/wiki/Sanjay_Sonawani

      Now would you like the people to believe that the information about you on Wikipedia is unreliable?

      Delete
    4. @Anonymous,

      Mr. Sanjay is pointing to references about historical entities, not current entities.

      Please try to understand the wikipedia procedure of updating the information. The issue seems to be with the moderation procedure of wikipedia in editing contents which is not so reliable.

      -- Ek Wachak

      Delete
  5. शंभूराजे यांच्या अटकेनंतर त्यांचे व कवी कलश यांचे मुंडण करण्यात आले होते (दूरवरून ओळख होवू नये म्हणून ) .
    तसेच त्यांना बांधले होते तोंडावर पट्ट्या होत्या .
    स्वराज्याच्या मुलुखातून मोघल मुलुखात आणायच्या कामात स्वत : गणोजी शिर्के सुद्धा होते व yenaraya जाणार्या वाटसरूंना हे एक आरोपी आहेत असे सांगत होते .

    तसेच संगमेश्वर पासून औरंग्या पर्यंत हजार करण्याचा मार्ग जर तपासाला तर स्वराज्याचा मुलुख छोटा आहे संगमेश्वर मधून सध्याच्या कोल्हापूर जिल्हा जेथे भेदास्गाव येथून मोघलांची हद्द सुरु होत होतीच त्यानंतर सुटका होणे अशक्य होते . मुळात संगमेश्वर येथे जे घडले त्यानंतर तेथे असलेल्या सरदारांनी सुटकेचे अशक्यप्राय प्रयत्न करण्याऐवजी स्वराज्याची पुढची योजना ऐकण्यासाठी कळवणे व aurangyachya मुकाबल्यासाठी सेकंड प्लान आखणे हे इष्ट समजले .



    (संदर्भ : संभाजी कादंबरी )

    ReplyDelete
  6. GANOJI RAJE SHIRKE JE SHAMBHURAJANCHE MEHUNE HOTE ,TYANI SHAMBHU RAJANA
    PAKDUN DENYAS MADAT KELI. SHIWAJI MAHARAJANI AMHAS NATU ZALYAWAR TUMACHI
    JAHANGIRI PARAT DEU,ASE SHIRKYANA SANGITALE HOTE.PARANTU SAMBHAJI MAHARAJ
    VATANDARI PUNHA CHALU KARANYACYA VIRODHAT HOTE TYAMULE GANOJINE DAW
    SADHLA.
    AJSUDDHA APALI WATANE(MATADARSANGHA) SAMBHALNYASATHI AJCHE
    WATANDAR JYA HIN PATALILA JATAT TE BAGHUN SHAMBHURAJANA KA
    EKATE PADLE GELE TE LAKSHAT YETE.
    SONAWANI SAHEB RAJYAKARTYANA SOYICHE HOIL ASECH SATYA AJ
    MAHARASHTRA BHUMILA HAWE AHE.KATU SATTYA SANGANYACHA PRAYATN
    KELYAS TUTUN ADWAYAS ANEK BRIGADE TAYAR AHET.SAWADHAN.

    ReplyDelete
    Replies
    1. Apan satyashich gvaahi karnar. Konala avado athava nahi. MajhyakaDe bareech maahitee jamaa jhali ahe. Udya savistar svatantra lekh lihito. Dhanyavad.

      Delete
  7. samir patil navachya bhadyane paha kay lihun thevle :
    http://sarvsamaj.blogspot.in/

    ReplyDelete
  8. haa borkhedkar aani bharat joshi he doghe ekach wyakti aahet ase waatate.ikde bharat joshi ne hee sanshodhan kele aahe aani tikde borkhedkar ne hee sanshodhan kele aahe .doghaanna hee holkarach saapadle. kharya itihaasaachyaa naawaane nustya thaapaa maarne hyaa lokaan chi icchaa aahe ase diste....

    ReplyDelete
    Replies
    1. Thanks. Mi pan baghitale. Ha Borkhedkar lavakarach aat jail yachi khatri balga. Khotaradepana, khotya profiles ani Briged saerakhya dalabhadri sanghatanet rahun yache doke pisalalelyaa kutryasarakhe phirale ahe. Mi yala anekada maph keley...pan ata nahi.

      Delete
    2. Sanjayji,ha borkhedkar paar ghaabarla. tumchya ekaa chitthawni ne tyaache baaraa waajle :D.............Abhinandan..!!!

      Delete
  9. brahman striyanvar garal okun jhaalee aata tyaanch naav ghevun fAke naavane lihaayla pan laagle.. are bree gedi lokaanno tumchi paidaeesh kuthun jhaali he tumhala pan maahit nasave.. vikrut, sadkya buddhiche lok mhanje Sam bhaajee bi gred!!

    ReplyDelete
  10. ........Thanks. Mi pan baghitale. Ha Borkhedkar lavakarach aat jail yachi khatri balga. Khotaradepana, khotya profiles ani Briged saerakhya dalabhadri sanghatanet rahun yache doke pisalalelyaa kutryasarakhe phirale ahe. Mi yala anekada maph keley...pan ata nahi........

    श्री. संजय सोनवणी यांनी मला आत टाकण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मी घाबरलो आहे. मी माझे सर्व लेख उडवून टाकले आहेत. यापुढे मी इतिहास या विषयावर एकही लेख लिहिणार नाही. इतकेच काय इतिहासाचे पुस्तक सुद्धा वाचणार नाही. मी एक गरीब माणूस असल्यामुळे हा निर्णय घेत आहे. सोनवणी यांनी शोधलेला सर्व इतिहास मी बिनशर्त मान्य केला आहे. इतिहासाच्या सर्व नव्या अभ्यासकांनाही माझी विनंती आहे की, त्यांनीही सोनवणी यांचे सर्व संशोधन बिनशर्त मान्य करावे.

    ReplyDelete
  11. बी ग्रेडी लोक जो विकृत पणा करतात तो एक प्रकारचा न्यून गंड आहे. एक तर या बी ग्रेडीना जातिवंत मराठे निम्न दर्जाचे, अक्करमाशे समजतात. हे जाणून आहेत कि जातीय उतरंडीत एक ब्राह्मण सोडले तर हे सर्वा पेक्षा उच्च स्थानी आहेत.म्हणून ब्राह्मणाना विरोध करून हटवले कि आपण एक नंबरचे होवू असा यांचा भ्रम आहे. खरे तर बहुसंख्य ब्राह्मण पण ही उतरंड मानत नाहीत. आज सर्व जन समान आहेत. ब्राह्मण काय मराठा काय किंवा अन्य जातीय समाज हे जाणून आहे. सर्व समाज हा सुजाण आहे. बहुसंख्य मराठा समाज या बी ग्रेडींना मानत नाही. तो सुजाण समाज आहे. मात्र हे विकृत बी ग्रेडी येन केन मार्गाने स्वताला इतरान पेक्षा उच्च दाखवू पाहतात. महाराष्ट्रात ओबीसी, एन टी, विमुक्त जाती आणि दलित यांच्या वर आण्यात करणारे कुठल्या जातीचे आहेत? बाहेर मिशीला तूप लावून ९६ कुली म्हणून मिरवायचे , खर्या ओबीसीं वर खोटा रुबाब दाखवायचा आणि सरकार दरबारी कुणबी दाखला घेवून ओबीसी सवलती/ भिक लाटायच्या ही लुच्चेगिरी कोण करत? सर्व सत्ता स्थाने असताना ओबीसी नच्या ताटामधला घास कोण मागत आहे? खैरलांजी कुणी घडवला ? फेसबुक वर अहिल्या देवीची बद्नामे करणारे हेच बी ग्रेडी होत. ग्रामीण भागात सवर्ण मुलगी ( बहुसंख्य मराठा) आणि ओबीसी/ दलित मुलगा असे विवाह झाले तर रक्तपात / ओनर किलिंग वगैरे प्रकार का होतो? हे लोक मध्य युगीन / सरंजामी मानसिकतेत आहेत. यांना फक्त आपला टेंभा मिरवायचा आहे. जेम्स लेन ने जे विकृत लिहिले ते यांनी पत्रके चापून सर्वत्र पसरवले. बाहेर लोकांना कळले कि असा पण काही प्रकार आहे (जो खोटा होता). यांना ना जीजावूची चाड ना अन्य जातीय स्त्रियांची ना स्वजातीय स्त्रियांची! यांना फक्त जातीय तेढ पसरवून स्वार्थ साधायचा आहे. जे इतर जातीय स्त्रिया बद्दल विकृत लिहितात ते स्व जातीय स्त्रियांना बद्दल पण तसेच विचार ठेवत असणार हे उघड आहे.

    ReplyDelete
  12. जेम्स लेन च्या पुस्तकावरील बंदी हाय कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाने उठवली कारण राज्य सरकारने त्या साठी काही प्रयत्न केले नाही. जेम्स लेनचे वादग्रस्त लिखाण आणखी वादास कारणीभूत ठरो आणि त्यातून आपला राजकीय स्वार्थ साध्लां जावो या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने पुस्तक वरील बंदी विरोधात आपली बाजू मुद्दाम दुबळी ठेवली. आज महाराष्ट्रात ह्या पुस्तकावर बंदी असली तरी इतर राज्यात बंदी नाही. बी ग्रेड, इतर संघटना आणि कॉंग्रेस राष्ट्रवादी सरकारने हा वाद चिघळू देवून पुस्तकाला प्रसिद्धी दिली. जो विषय जास्त गाजावाजा न करता संपवता आला असता तो या लोकांनी वाढवून प्रसिद्ध केला. यांना शिवराय/ जीजावू ची पर्वा नाही हेच या वारूव सिद्ध होते.

    ReplyDelete
  13. शिवरायांची बदनामी झाली, तेव्हा शिवसेना आणि भाजपाचे मौन सूचक होते. महाराजांच्या बदनामीने या लोकांना आनंदच झाला असावा. ह. मो. मराठे यांच्याविरोधात सर्वच वृत्तपत्रांनी लेख लिहिले आहेत. केवळ सामनाने ह. मो. यांच्या विरोधात लिहिले नाही. त्यामुळे महाराजांच्या बदनामी विरुद्ध कोण आहे, हे स्पष्टच दिसते. शिवाजी महाराजांची बदनामी करूनही अपेक्षित परिणाम झालाच नाही. त्यामुळे हे लोक आता बाजीराव पेशवा, टिळक आणि रानडे यांच्या बदनामीच्या मागे लागले आहेत. यांच्या पित्याबद्दल वाद निर्माण केला जात आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. pahila bajirao yacha pita dhanaji jadhav hota ashi charcha ghadvun anli jat ahe. yabaddal kay mhananar?

      Delete
  14. संभाजी ब्रिगेड हि आतंकवादी संघटना असून त्यावर सरकारने बंदी घालायला पाहिजे. ब्रिगेडी लोक हेच खरे शिवरायांचे शत्रू आहेत कारान जेम्स लेन पेक्षा ह्या लोकांनी शिवरायांची बदनामी केली. हि संघटना फक्त मराठा ह्या जातीआठी काम करते त्याना शिवराय संभाजी किंवा अन्य महापुरुषांशी काहीही देणेघेणे नाही . हे संभाजी महाराजाना पकडून देणारे देशद्रोही लोक आहेत. अजुनही हे लोक इतराना अस्पृश्य मानतात. ब्राह्मण्य हे बामानांपेक्षा ह्या लोकांत जास्त आहे. इतर लोकांची diशाभूल करण्याचे काम हि संघटना करत आहे. पण यांचा कावा लक्षात आल्या पासून इतर लोक हि संघटना सोडून जात आहेत. हि फारच आनंदाची गोष्ट आहे. सर्वांनी ह्या देशद्रोही लोkaanpaaun सावध राहावे हि विनंती.

    ReplyDelete
  15. Sagar Chandrakant PilareSeptember 16, 2012 at 5:22 AM

    Sir, you have objected to the use of word 'vadh' by the author. Many people think that 'vadh' is always of a wicked person. The truth is otherwise. 'Vadh' simply means killing. The use of the word does not attach any stigma to the person killed. Please refer Molsworth's dictionary. It gives the meaning of 'Vadh' as killing and explains it with the examples 'matruvadh', 'pitruvadh','bhratruvadh' etc. with their meaning in English matricide, patricide, fratricide etc. The offence defined in s.299 of I.P.C. (Culpable homicide) is also translated as 'sadosh manushyawadh' in Marathi.So I think the author did not intend to insult Sambhaji Maharaj by use of the word 'vadh.'

    ReplyDelete
    Replies
    1. You are right Sagar ji, but in Maharashtra now a days "vadh" word is deliberately being used for the persons murders whom they think were wicked. This is why I have objection, nothing else.

      Delete
  16. मी बरेच दिवस विचार करत आहे की - - -
    शिव धर्म स्थापन केलेल्याना विचारू या की त्यांच्या घरी गणपती बसतो का ?आणि का ? कारण शिवाजी महाराजांच्या कुठल्याच नोंदींमध्ये त्यांच्याकडे - त्यांच्या घरी,एखाद्या किल्यावर, लाल महालावर ,गणपतींची गड़बड़ होती असा उल्लेख मला सापडला नाही.कुठेही जिजाबाई किंवा येसूबाई,सोयराबाई यांची
    घरच्या गणपतीची लगबग मला दिसली नाही.शिलंगणाचे सोने ,खंडोबाचा भंडारा - अशाप्रमाणे शिवनेरीचे ढोल ताशा पथक,साताऱ्याचे -कोल्हापूरचे - लेझीम पथक असे उल्लेख शोधून सुद्धा कुठे सापडत नाहीत
    म्हणून अशा ब्राह्मणी मांडणीच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या कार्यक्रमात भाग न घेण्याचे फर्मान
    त्यांच्या पुढारी मंडळीनी ताबडतोब काढावे .उगीच त्यांचा धर्म बुडायला नको.
    यांच्या शिव धर्मात अजून कुठले उत्सव आहेत ? ते मात्र भरपूर जल्लोषात साजरे करावेत .त्यासाठी सगळ्या जगभर सुट्टी जाहीर करण्याचा हट्ट धरावा.


    सार्वजनीक शिव जयन्ती,लो.टिळकांनी चालू केली म्हणजे त्यांच्या भाषेत - बामनानी -
    त्यामुळे त्याला यांचा विरोधच असणार .


    सार्वजनिक गणेशोत्सव लो.टिळकांच्या पुढाकाराने पुण्यात रुजला .एका ब्राह्मणाने चालू केलेला ब्राह्मणी प्रकार -त्यामुळे त्यात जो ९६ कुळी मराठा भाग घेईल - वर्गणी गोळा करेल - नवे कपडे घालून पोरा बाळाना अनंत चतुर्दशीला विसर्जनाच्या मिरवणुकीत कौतुकाने घेऊन जाईल - ज्याची पत्नी हरतालिका-गौरी पुजेल ती पण दोषीच ठरते.


    हे सर्व थांबले पाहिजे . कारण शिवाजी ,संभाजी यांच्या नंतर उपट सुंभ उगवलेल्या कोकणस्थ ब्राह्मणानी हा गणपतीचा व्याप उभा केला असण्याची शक्यता वाटते. त्याना देशावर आल्यावर स्वतःचा ठसा उमटविण्यासाठी कोकणातले उत्सव इथल्या लोकांवर लादायचे होते - ते त्यानी केले -
    बरोबर आहे ना माझे म्हणणे ?


    शिव धर्मीयानो - - सोडून द्या हे दुसऱ्याची धुणी धुण्याचे उद्योग .
    तुमच्या पूजेचा देव्हारा हा शिव धर्माचा आहे त्यातून गणपती ,बाळकृष्णाची -आणि अन्नपूर्णेची -पूजा करणे म्हणजे केवढी चूक आहे
    मोडीत टाका असले देव- अहो ते तर ब्राह्मणांचे -
    त्या ऐवजी पूजेत शहाजी,जिजाबाई शिवाजी,संभाजी,राजाराम असे पितळी पुतळे ठेवा -
    त्यांना साकडे घाला आणि उपाय विचारा कि या बामणांचा नायनाट कसा होईल....

    http://dattaspeaks.blogspot.in/2012/09/blog-post_17.html

    ReplyDelete
    Replies
    1. शिवजयंती महात्मा फुले यांनी चालू केली. भटमान्य टिळकांनी नव्हे.

      Delete
    2. my main point is shiv jayantee was started other than a 96 kuli maratha.
      Anonymous should learn to use good marathi.
      when i say not shiva but" shivaji "the ji used to offer a respect to the great warrior.
      Now,tilak,agarkar and gokhale had a great contribution in the marathi social and political history.Same is the case about "mahatma"Phule.

      Delete
    3. Whatever your "Main Point" is, that doesn't give you the license to provide wrong information about important historical events. By the way "Shivaji" IS THE REAL NAME. That "ji" is part of the name itself. So don't give the hogwash that you used "ji" for respect. And if you really wanted to respect "Mahatma Phule" then you wouldn't have made this mistake in the first place.

      Everytime you guys want to prove "some point" the credit automatically goes to someone like Tilak. I have never seen a case where the credit for the work of "Tilak" has wrongly been attributed to "Mahatma Phule". Isn't that funny?

      Delete
    4. लोकमान्य टिळक यांनीच शिवजयंती आणि गणेशोत्सव सार्वजनिक रीत्या मोठ्या प्रमाणात सुरु करण्यास सुरुवात केली. यांना टिळक म्हणून पोटात दुखत. महात्मा फुलेन्बद्दल पण यांना फार प्रेम नाही. पण टिळकांना श्रेय द्यायचे म्हटले कि जास्त पोटदुखी होते ना. शाहू छत्रपती पासून हे शेपूट घालून बसले होते ते आजतागायत! शिवाजी, संभाजी यानंतर कुठल्या छत्रपतींनी विशेष पराक्रम गाजवला? तसे राजाराम आणि ताराबाई यांच्या नेतृत्वात मराठे लढले मात्र पुढे औरंगजेब गेल्यावर ताराबाई ऐवजी छ. शाहू ला जास्त पाठींबा मिळून ते प्रबळ झाले. स्वराज्याच्या दोन गाद्या झाल्या.शिवराय असतानाच ते होणार होते मात्र पुढे १७०७ मध्ये ते झाले. औरंगजेबा नंतर शाहूला मोगलांच्या कैदेतून सोडले (१७०७) आणि मराठी राज्य दोन गाड्यात विभागले गेले.शाहूला सुरुवाती पासून मोगल गाडी बद्दल सोफ्ट कॉर्नर होता त्यामुळे 'पातशाही रक्षिणे' याला तो प्राधान्य देत असे. थोरले बाजीराव, चिमाजी अप्पा, विश्वास राव, सदाशिव भावू, राघोजी (पूर्वार्धातील) ,माधवराव, नानासाहेब हे पेशवे तसेच जानकोजी, दत्ताजी, महादजी शिंदे, मल्हार राव, अहिल्या देवी होळकर , पवार, पटवर्धन, भोसले वगैरे सरदार हे सगळे मराठे सहाचे पाईक होत. या सगळ्यांचे गुण दोष बाजूला ठेवून त्यांच्या कार्याचा आदर करावा.त्यात जात पात कशाला पाहायची. फुल्यांनी स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा केल्या. आगरकर, लोकहितवादी वगैरेनी पण आपल्या मार्गाने हे केलेच. टिळकांनी राजकीय लाधाये लढली.भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक हि जनतेने त्यांना दिलेली पदवी आहे. समस्त हिंदुस्तानात लाल, बाल, पाल हे त्रिकुट प्रसिद्ध होते. ते राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व होय. जातीय विद्वेषाची कावीळ झालेले सडके लोकच त्यांचा उपहास करून कुठे भट मान्य किंवा अजून काही बालिश आरोप करत बसतात आणि त्यांनी सुरु केलेले गणेशोत्सव आणि शिवजयंती कडे पाहत बसतात.

      Delete
    5. वेदोक्त पुराणोक्त वादात कोल्हापूरची वर्तमानपत्रे शिवाजी महाराज यांच्यावर राळ उडवत होती तेव्हा तुमचे टिळक कुठे झोपले होते?

      १८९३ मध्ये पुण्यात पहिली हिंदू मुस्लिम दंगल कोणामुळे घडली?

      शाहू महाराजांनी सामाजिक सुधारणेचे कार्य थांबवले नाही तर त्यांची गत चाफेकर बंधूनी मारलेल्या ऑफिसर Rand सारखी होईल असे म्हणणारे टिळक कोणालाच कसे माहित नाहीत?

      कुणब्याला विधिमंडळात जाऊन काय नांगर चालवायचा आहे का? वाण्याला तराजू धरायचा आहे का? अशी विधाने करणारे टिळक "लोकमान्य" कसे?

      ज्या काळात शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारखी मंडळी दलित मागासवर्गीयांसाठी झटत होती त्याच काळात "अस्पृश्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले तर आम्ही त्यांच्यासोबत भोजन करू" असे निलाजरे उद्गार काढणारे टिळक तेल्या तांबोळ्यांचे पुढारी कसे?

      Delete
  17. he brigedi navbbudhhanaarakhe aahet. hall madhye shivajicha putala aani aat ganapati asato??????

    ReplyDelete
  18. संजय सोनवणी,
    मी तुमचा ब्लॉग किमान वर्षभरापासून तरी वाचतो. तुमच्या लिखाणात एक सुसंगती होती. वाघ्याचा वाद निर्माण झाल्यापासून तुमची ही लय बिघडत चालली आहे, असे जाणवते. या लेखात तर तुम्ही संभाजी राजांनाच फितूर म्हणत आहात. राजांना थेट फितूर ठरविणा-या काही कॉमेंट आजही लेखाखाली आहेत. तुम्ही त्या मुद्दाम ठेवल्याचे दिसते. संभाजी ब्रिगेडवरचा राग तुम्ही संभाजी महाराजांवर काढू नये, असे सांगावेसे वाटते.

    इतिहासातील एक वादग्रस्त पात्र असलेल्या विठोजी होळकर यांच्या बद्दल तुम्ही गुणगौरव करणारे लिखाण केलेले आहे. याच ब्लॉगवर ते उपलब्ध आहे. मल्हाररावांमुळे पाणिपतावर काही लाख मराठे मारले गेले, तरी तुम्ही त्यांना महान मुत्सद्दी ठरवले आहे.

    का?

    इतिहासकाराने निरपेक्ष भूमिका घ्यायची असते. आपल्या जातीचा म्हणून कोणाला महान ठरवायचे नसते. तसेच आपल्या विरोधकांच्या जातीचा आहे, म्हणून कोणाला दुषणेही द्यायची नसतात. उलट आपल्या जातीच्या राजांची जास्त चिकित्सक पद्धतीने तपासणी करायची असते. तुम्ही याच्या अगदी उलट करीत आहात.

    तुमचा ब्लॉग वाचनीय होता, तो पुन्हा वाचनीय व्हावा, असे वाटते. म्हणून ही कॉमेंट लिहिली. कॉमेंटमधील भावना तुम्हाला पटली असेल, तरच ती कायम ठेवा. पटली नसेल, तर उडवून टाका.

    ReplyDelete
    Replies
    1. आणखी एक मुद्दा राहिला म्हणुन लिहितो. राजाराम महाराजांनी संभाजी महाराजांना पकडून दिले, त्यांना इतर मराठे सरदारांची मुक संमती होती, असा संकेत तुमच्या दोन्ही लेखांमधून मिळतो. उद्या तुम्ही जेव्हा निष्कर्ष काढाल, तेव्हा ते यापेक्षा वेगळे असतील, असे मला वाटत नाही. ही महाराजांची बदनामी आहे, हे आपण लक्षात घ्याल, अशी आशा वाटते.

      Delete
    2. राव, नीट लेख तरी वाचत जावा. संभाजी महाराज फितूर होते असे मी कोठे लिहिले आहे? बहुदा हे तुमचे व्यक्तिगत मत असावे.

      Delete
    3. इतिहासाकडे जातीय दृष्टीकोनातुन पाहु नये. संभाजी ब्रिगेडशीच्या वादाचा आणि या लेखाचा काडीइतकाही संबंध नाही. १ फेब्रुवारी १६८९ ते ११ मार्च १६८९ या कालात मराठी गोटात नेमके काय घडले याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न आहे. ज्यांच्याकडे याबाबत अधिक माहिती असेल त्यांनी पुरवावी. माझे नि:ष्कर्ष लवकरच प्रकाशित करेलच, पण तत्पुर्वी सर्वांनीच छाननी केली तर त्यांना तथ्यपुर्ण बळकटी येईल.

      मी संभाजी महाराजांवर एवढा दुष्ट अन्याय कोणी केला याचा शोध घेत आहे. त्यात सहभागी जेही कोणी असतील त्यांचे माप त्यांच्या पदरात घालणे क्रमप्राप्त आहे.

      विठोजी होळकर वादग्रस्त व्यक्तिमत्व होते असे म्हणना-यांनी इतिहस नीट तपासुन पहावा. मी धनगर नाही त्यामुळे विठोजी स्वजातीय होते म्हणुन त्यांची बाजू घेतली अशे म्हणणे अज्ञानमुलक आहे.

      Delete
    4. Vaghya kutrachya putla hatvnare ani shahid smarak udhavasta karnayanchya mansiktet farak kay.

      Delete
  19. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेवर संभाजी राजना नेले नव्हते. संभाजी राजे आणि शिवराय यांच्या नात्यात दुरावा येण्याला प्रमुख कारण महाराणी सोयराबाई यांचे राजकारण.त्याला साथ दरबारी लोक, सरदार यांची मिळाली.संभाजी राजे मोगलांना जावून मिळालेच नाही तर दिलेर खान बरोबर स्वराज्यावर चालून आले होते. भूपालगड ताब्यात घेतल्यावर दिलेर खानाने गडावरील मराठ्यांचे हात छाटले तेव्हा संभाजी राजे काही करू शकले नाहीत . दिलेर खानाने स्वराज्यातील मुलुख लुटून उध्वस्त केला, प्रजेला लुटले, ठार केले तेव्हा पण संभाजी काही करू शकले नाहीत कारण ते मुघलांचे सात हजारी मनसबदार होते आणि दिलेर खानाचा दर्जा त्यांच्या पेक्षा जास्त होता. शेवटी पश्चात्ताप होवून संभाजी राजे स्वराज्यात परतले. मात्र त्यांच्या पूर्वीच्या चुकीने शिवाजी महाराज मनातून खिन्न झाले होते. सरदार पण सोयराबाई (राजाराम ) आणि संभाजी असे विभागले गेले. आयुष्यभर शिवराय मोगलांशी लढले मात्र उतारवयात त्यांचा मुलगाच मोगालना जावून मिळाला तर त्यांच्या मनाला काय यातना झाल्या असतील? शिवाजी महाराज निधन पावले तेव्हा संभाजी रायगडावर नव्हते. राजाराम यांनी अंतिम विधी केले आणि त्यांनाच गादीवर बसवण्यात आले. पुढे संभाजी गडावर आले त्यांनी स्वताला राज्याभिषेक करवला. सोयरा बाई, राजाराम यांना नजर कैदेत ठेवले. तरी सोयराबाईने पुढे संभाजी वर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न केला. संभाजी राजांनी सोयराबाईला विष देवून संपवले. सोयराबाई समर्थक दरबारी लोक/ सरदार तसेच सोयराबाईचे नातलग (मोहिते) यांना हत्तीच्या पायी देवून / कडेलोट करून संपवले. यामुळे तर पुढे संभाजी राजांच्या सुटकेचा पुरेसा प्रयत्न झाला नाही ?केवळ जातीय भूमिका न घेता सगळ्या बाजू पाहाव्या लागतील. संभाजीला समर्थन करणारे / विरोध करणारे ब्राह्मण होते तसे मराठे पण होते. संभाजी ला पकडून देणारा गणोजी शिर्के हा त्यांचा साक्खा मेव्हणा होता.

    ReplyDelete
  20. स्वराज्य -
    माझे संजय सोनवणी यांना विचारणे आहे
    आपण नेहमी सरळ सरळ उत्तर देण्याचे टाळता .आपण आपली प्रतिमा जपत आहात असे वाटते. समजा छ.शिवाजीराजे यांना औरंगजेबाने विचारले असते
    कि मरणार का मुसलमान होणार तर त्यांचे त्याला उत्तर काय असते ?
    मला खात्री आहे आहे आपण उत्तर देणार नाही आणि कोणतरी अनोनीमास नावाने लिहील.काहीतरी.
    नेताजी पालकरांना राजांनी परत हिंदू करून घेतले त्याची या ठिकाणी आठवण ठेवावी.
    संपूर्ण भारत देश.त्यातले पुणे मुलुख. शहाजी राजे यांनी किती जणांकडे किती मुसलमान सत्तांकडे सेवा केली याची यादी पाहता ,असे वाटते कि हे शहाजी राजे - त्यांची जहागीर,त्यांना चिकटवण्यात आलेला मोठ्ठेपणा , हा एक अनावश्यक प्रकार आहे .शिवाजीला मोठ्ठेपणा देण्यासाठी - सुरवात वडिलांपासून करायची -ही काळजी घ्यायची इतकेच .ती काळजी बाबासाहेब पुरंधरे यांनी पण घेतली , पण ते ब्राह्मण ना ! शेवटी असे आहे कि शिवाजी तरी मोठ्ठा कसा काय ? रेकॉर्डवर तो मुघलांचा मांडलिक होता कि नाही ? का ती त्याच्या मुत्सद्देगिरीची चाल समजायची ?.मग असा प्रकार सगळीकडे होत राहील. इमान,खोट्या आणाभाका ,खोटा बेल भंडारा हे सगळे म्हणायचे स्वराज्य या नावाने -पण खरे तर ते शिवाजीचे वतन !
    त्याने यश मिळवले म्हणजे काय ?.शिवाजीने स्वराज्य उभारले म्हणजे काय ? लोकशाही होती का ?निवडणूक होती का - नाही - एकछत्री अंमल ! आई थोर असेल पण राज्य यंत्रणेत तिला इतका हक्क कसा काय ?.तर राजांची आई म्हणून.तिचा योग्य पणा कुणी तपासला?तो सरंजाम शाहीचा काल होता - राजेशी मिरवण्याचा काळ होता.
    आग्र्याहून शिवाजी पळाला,त्या नंतर ज्यांनी पाठीवर चाबकाचे फटके खाल्ले त्यांचे पुढे काय झाले .का कालांतराने त्याना पण गद्दार ठरवण्यात आले ? घराणेशाहीच्या गदारोळात ?
    शहाजींच्या काळात शौर्याच्या जोरावर , तलवारीच्या जोरावर आपले वतन उभे करायची प्रथा होती.बळी तो कान पिळी असे होते.
    एक संशोधन असे सांगते कि शहाजीराजे अस्सल या मातीतले होते. ( शिखर शिंगणापूरचा शंभू महादेव श्री.रा.रा.रा.चिं.ढेरे )
    काही जण त्यांना राजपूत ठरवण्याच्या उद्योगात स्वतःला धन्य मानतात.हा निलाजरेपणा तर समजण्या पलीकडचा आहे.
    लोकांपुढे एक छान हृदयाला भिडणारे स्वप्न ठेवल्याशिवाय,त्यांचा पाठींबा मिळत नाही,आणि सामान्य लोकांच्या पाठींब्या शिवाय शिवाय राजेपण मिळत नाही.
    असा सगळा प्रकार आहे . अजूनही तेच चालले आहे .
    धरणे , कालवे आणि आपल्या शेत जमिनी यासाठी - जनतेचा पैसा - त्यांना स्वप्न रंगवायला लावून , हडप करायचा आणि जातीचे राजकारण करून , सगळ्याला ब्राह्मण जबाबदार असे ओरडत सुटायचे ,ह्या ब्राह्मण द्वेषात स्वार्थ असल्याशिवाय ही इतकी गरळ का ओकली जात असते.?
    आत्ता पर्यंत स्वतः सोनवणी पण त्यात मागे नव्हते सभ्य पणाचा अंगरखा पांघरून ते पण ९६ कुळींचे लांगुल चालन करताच होते. शब्दात अडकायचे नाही इतकी काळजी ते घेत राहिले.
    वेळ आली कि अनोनिमास नावाने ब्राह्मण प्रेमाने लिहिणाऱ्याला चपराक बसलीच म्हणून समजा.पण एक चमत्कार झाला .तो केला वाघ्याने ! एक साधा कुत्रा इतका बदल करू शकतो !
    जे काम बऱ्याच ब्राह्मण विद्वानांना जमले नाही ते एका कुत्र्याने केले.संजय सोनावाणींची मांडणीच सौम्य झाली ,ब्राह्मण द्वेष बोथट झाला .पूर्वीचे ह.मो यांच्याशी वाद घालणारे सोनवणी आठवले कि आताचे सोनवणी मुळमुळीत वाटतात .
    आपण जर शिवाजीला भवानी मातेने तलवार दिली वगैरे भाकड कथा समजत असाल ,तर मग तसे लिहित का नाही.
    श्री.अंतुले तिकडे गेले होते त्यांना वेड्यात का काढले नाही .
    मी तरी ती भाकड कथा आहे असे समजतो.आणि तलवार परत आणणे हा सवंग लोकप्रियतेचा लाभ घेण्याचा प्रकार आहे असे मानतो.१६३० आणि १६८० या काळात उरोपात काय चालले होते आणि आपण ज्याच्या नावाने मिरवणुका काढतो आणि २ - २ जयंत्या साजऱ्या करतो त्याची आंतर राष्ट्रीय राजकारणाची पोच किती होती ?
    १६२८ ला ब्रिटीश लोकशाहीत पेतिशन ऑफ राईट मान्य झाला.राजा पार्लमेंट ला ना विचारता कोणतेही नवीन टक्स लावू शकणार नव्हता.
    १६३८ ला गालीलिओ ने त्याचा सिद्धांत मांडला.केप्लर पण याच काळातला .

    ReplyDelete
    Replies
    1. प्रचंड विनोदी लिखाण आहे या मावळ्याचे .
      असे विनोद कसे सुचतात यांना ?
      मलापण विनोद सुचला बगा-हाय कि नाय ?
      तर ते अस हाय बगा
      बिचारे छ.शाहू महाराज म्हणत असतील स्वर्गात कि मला झेपेना म्हणून या बामणाच्या पोराला निवडला मी,
      कारण आपल्यानी दिवेच लावले असते एकेकानी,एक बी भरोशाच नाय !सगळेच अवलादी !
      गले कापणारे -म्हणून वाद नकोत ,गृह कलह नको -
      कोल्हापुरवाले,आणि सातारवाले अशी आपली भांडणे चालणार -तुकडे करून गुमान खाऊया !
      मग रयतेचे कोण बघणार ? मी असा वाया गेलेला , नुसतीच गुडगुडी धरता येते हातात ,तलवार नाही -
      ती कधी म्यानातून काढलीच नाही -हातात धरायची गोष्टच सोडा वो !
      तो बामन बरा-कसा तुरुतुरु धावत असतो - सपासप हत्यार चालवतो-लई गुणाचं लेकरू.अर्ध पोटी भुकेलेल आहे करेल धडपड-नाहीतर आमची कार्टी-
      नुसते वळू-बापाची इस्टेट मोडून खातील -रयतेला विकून खातील
      म्हणून मी या गुणी लोकांना म्हणालो कि बाबानो हे एवढ आमच राज्य सांभाळा त्या बाजी आणि चिमा भटान लई जीव लावला बग .
      त्याचा बाप तर हिशोबाला पक्का.शेतीची अशी घडी बसवून दिली पठ्ठ्यान कि सगळी काळजीच मिटली बगा.
      बाळाजी ,बाजी , नाना ,माधव ,एक सो एक त्या राघो भरारी ने तर अटकेपार झेंडे लावले बगा.
      छाती फुगून आली आमची.लई रंगेल पण बगा आमच्या वानी- मस्तानी काय,तीच कुल सुद्धा -समशेर-पानपतात आमच्या साठी लढल,याला म्हणतात इमान .!

      Delete
    2. संजय सोनवणी,
      मला जे हिडीस उत्तर आले आहे त्याविषयी,त्यांच्यासाठी हा खुलासा -
      आपल्या ब्लोग वर उत्तरे देताना-चर्चा करताना -आपले खरे नाव टोपण नावात बदलून उत्तरे देण्याची पद्धत हीच हिजाडेगिरी नाही का ?
      अभद्र लिहिणे किंवा आई वडिलांकडून संस्कार न झाल्याचे दाखवून देत लिखाण करणे
      आणि अत्यंत हीन दर्जाची भाषा करण्याचे कारण काय हेच कळत नाही .
      अशामुळे संजय सोनवणी यांचा ब्लोग वाचनीय न होता एक अश्लील भाषा वापरणाऱ्यांचा अड्डा ठरतो आहे हे आपण लक्षात घ्यावे.
      आणि या सगळ्यात संजय सोनवणी गप्पच -त्यामुळे हा सगळा प्रकारच वैचारिक चर्चा न राहता खुळावलेल्या तरुणाईचा तमाशा ठरतो.
      तुमच्या सारख्यांनी असे अर्वाच्य शब्द वापरणे फारच गमतीदार ठरते.त्यातून तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही किंवा माझे विचार पण पराभूत होत नाहीत
      शिवाजी हा -सर्व जगाचा विचार करता , इतर देशांच्या नेत्यांच्या त्या काळातील हालचाली बघता , काळाच्या मागे होता असे माझे मत आहे.आणि
      ते तुम्हाला ते चुकीचे वाटते.हेही ठीक आहे.
      लोकमान्य टिळक यांनी मुसलमानांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मान्य केले तीच स्वतंत्र पाकिस्तानच्या निर्मितीची पहिली पायरी ठरली असे जर मी म्हटले
      तर तो काय लो.टिळकांचा अपमान होत नाही.त्याचा निषेध म्हणून असे कुणी विखारी लिहिणार नाही,कारण चर्चा ही वैचारिक असते.
      त्यालापण ही लोक असे उत्तर देतील की टिळकांच्या बाजूने -त्या बामणाच्या बाजूने उब्ने राहायला त्यांच्य्त कुणी उरलाय का पुरुष,आमच्यात बघा,शेकडो मावळे आज
      शिवरायाची प्रतिमा जपायला छातीचा कोट करतील वगैरे वगैरे.यांनी घातलेल्या जातीच्या कुंपणामुळे महाराज आणि त्यांची थोरवी गुदमरत आहेत.
      मुद्दे एका ठराविक जाणीवेने मांडायचे असतात.शिवाजी हि आपल्या जातीची खाजगी मालमत्ता असल्या सारखे काहीजण मिरवत असतात.
      त्यामुळे शिवाजीचे मोठ्ठेपण तुम्ही मारत असता.त्या महान विभूतीला तुम्ही खुजे करत असता हे तुम्हाला समजायला पाहिजे.
      त्यासाठी एकदम धाड धाड अर्वाच्य शब्द वापरत तोफ डागली की आपले शौर्य दाखवले असे तुम्हाला वाटते हाच विनोद आहे .
      आतातरी या सगळ्यातला हास्यास्पद प्रकार काय ते उमजले असेल.
      तुमची लेखणी - तुमची लेखन शैली हा हास्यास्पद प्रकार आहे - तुमचे विचार नव्हेत - हे आपण लक्षात घ्या.
      आणि असल्या तुमच्या बावळट उत्तराला माझ्या सारखे कुणी घाबरत असतील असं विचार करणे हे पण हास्यास्पद आहे हे पण जाणून घ्या.
      महाराजांनी आग्र्यातून सुटका करून घेतली तेंव्हा अतिशय पवित्र देश कार्य म्हणून आसुडाचे फटके कुणी खाल्ले -ते ब्राह्मणच होते.
      तुमच्या नंतर एका अनोनिमास ने लिहिलेला विचार किती आशयपूर्ण आहे ते मनन करून बघा.
      देव तुम्हाला डोके शांत ठेवण्याची सद्बुद्धी देवो.अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
      प्रश्न आणि उत्तरे यासाठी तर असे ब्लोग असतात.पण असे भडक शब्द वापरून त्याचा उच्चभ्रू किंवा विचारवंतांवर काडीचाही परिणाम होत नसतो.
      कदाचित त्यामुळे तुम्ही काही ठराविक वर्गाला शूर वीर वाटत असाल पण - एकतर तुम्ही अजून बरेच पावसाळे पाहायचे असतील .लहान असाल वयाने.
      म्हणून इथेच थांबतो.

      Delete
    3. I have deleted most of the obnoxious comments. I request al;l of you to discuss on the main issue and dont bifurcate it. I always want to give each and one freedom of expression on my blog...but using it ill mindedly will not be tolerated.

      Delete
    4. शिवरायांचा मावळाOctober 5, 2012 at 10:10 AM

      कारण आपल्यानी दिवेच लावले असते एकेकानी,एक बी भरोशाच नाय !सगळेच अवलादी !
      गले कापणारे -म्हणून वाद नकोत ,गृह कलह नको -
      कोल्हापुरवाले,आणि सातारवाले अशी आपली भांडणे चालणार -तुकडे करून गुमान खाऊया !
      मग रयतेचे कोण बघणार ? मी असा वाया गेलेला , नुसतीच गुडगुडी धरता येते हातात ,तलवार नाही -
      ती कधी म्यानातून काढलीच नाही -हातात धरायची गोष्टच सोडा वो !
      तो बामन बरा-कसा तुरुतुरु धावत असतो - सपासप हत्यार चालवतो-लई गुणाचं लेकरू.अर्ध पोटी भुकेलेल आहे करेल धडपड-नाहीतर आमची कार्टी-
      नुसते वळू-बापाची इस्टेट मोडून खातील -रयतेला विकून खातील

      Mr. Sonawani this comment doesn't seem ill minded to you? Is this what you mean mean by freedom of expression?

      Anything that is written against Chatrapati is OK with you. But if the same thing is written about peshwa then its not tolerable? This clearly indicates your intentions.

      Delete
    5. शिवरायांचा मावळाOctober 5, 2012 at 11:19 AM

      @ Dattatreya Agashe

      हिडीस भाषा वापरायची मला हौस नाही आणि तसले संस्कार देखील माझ्यावर झालेले नाहीत. पण तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल वाट्टेल ती भाषा वापरलीत तर हिडीसपणा काय असतो हे देखील तुम्हाला दाखवून देईनच.

      जेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांबद्दल लिहिता तेव्हा ते सर्वांचे असतात आणि आम्ही लिहिले की मात्र ते आमच्या मालकीचे कसे होतात? तुमचे ते सगळे "राष्ट्रीय" आणि आमचे ते सगळे "जातीय"?

      तुम्ही छत्रपती शाहू महाराजांविषयी जी भाषा वापरली आहे ती सभ्यतेच्या कोणत्या वर्गवारीत बसते ते कृपया सांगावे. तीच भाषा मी पेशव्यांसाठी वापरली की ती हिडीस कशी होते?

      मी ब्राह्मणांचा काय कोणाचाच द्वेष करत नाही. त्यामुळे ब्राह्मणांचे शिवाजी महाराजांच्या कार्यात काय योगदान होते हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. मी कुठेही ब्राह्मणांवर टीका केलेली नाही. फक्त पेशव्यांच्या काळातील घटना उघडकीस आणल्या आहेत. त्या घटनाच मुळात हिडीस म्हणाव्या अशाच आहेत. काही घटनांविषयी स्वत: सोनवणी यांनी देखील लिहिले आहे.

      शिवाजी महाराज इतर देशांतील तत्कालीन समाजाच्या दृष्टीने मागे होते हे तुम्ही नव्याने शोधून काढलेले तथ्य आहे हा तुमचा भ्रम आहे. श्रीमान योगी या कादंबरीच्या प्रस्तावनेत नरहर कुरुंदकर यांनी देखील हाच मुद्दा मांडला आहे. पण शिवाजी हे त्याच्या काळाचे अपत्य आहे हे वाक्य देखील त्या प्रस्तावनेत आहे. केप्लर, गालिलिओ आणि शिवाजी महाराज यांची तुलना अप्रस्तुत आहे हे जाणण्याचा विवेक ज्यांच्याकडे असतो त्यांना विचारवंत म्हणतात.
      हा संपूर्ण मुद्दा कुरुंदकर यांनी कोणत्या भाषेत मांडला आहे त्याचा अभ्यास करावा. तुम्ही हाच मुद्दा ज्या भाषेत मांडला आहे त्या भाषेची आणि कुरुंदकर यांच्या भाषेची तुलना करून बघावी आणि मग जमलेच तर स्वत:ला विचारवंत आणि उच्चभ्रू वगैरे म्हणवून घ्यावे. ही असली भाषा वापरून जर तुम्ही उच्चभ्रू होत असाल तर इतरांनी काय घोडं मारलंय?

      तुम्ही जर उच्चभ्रू विचारवंताना साजेशा भाषेत लिहिले तर तुम्हाला उत्तर त्याच भाषेत मिळेल. पण स्वत: चिखलात उतरून स्वच्छतेची जाहिरात करायची असेल तर तुमच्या कपड्यांवरचा चिखल तुम्हाला दाखवून देण्यात येईल याची खात्री बाळगा. तुम्ही जे पावसाळे पाहिले आहेत त्यांचा आब राखून लिहिले तर तुमच्या वयाचाही मान राखला जाईल हा माझा शब्द आहे.

      Delete
    6. अरे कोण हा ..महाराजांचा एकेरी उल्लेख करतोय.. स्तुती करा नाहीतर टीका करा पण महाराजांचा एकेरी उल्लेख करू नका.

      Delete
  21. ब्राह्मण काय मराठा काय किंवा अजून कोणी प्रत्येक जातीत्मधील काही लोक वंश श्रेत्वाच्या भ्रामक कल्पनेतून आपण कसे बरोबर आणि बाकी जात कशी चूक हे दाखवतेय कि काय अशी भीती वाटत आहे.
    शिवाजी महाराज हे भारतामधील मध्ययुगीन एक राजा होते. स्वराज्य स्थापनेचे महान कार्य त्यांनी केले. त्याला आजच्या जगाचे किंवा तत्कालीन युरोपचे कायदे लावून तोलणे बरोबर नाही. नाहीतर जावळीचे मोरे प्रकरण , खंडोजी खोपडेला स्वताचे वतन वाचवले म्हणून उग्र शिक्षा, गागाभट्ट (वैदिक) आणि तांत्रिक असे दोन दोन राज्याभिषेक किंवा सिसोदिया हि उच्च राजपूत वंशावळ दाखवणे ( जीजावूचे माहेरचे जाधव हे भोसल्यांना आपल्या पेक्षा कमी लेखात असत. शहाजी राजे , जीजावू हे जाणून होते. जाधवांनी भोसल्यांना कधीच आपल्या बरोबरचे मानले नाही. म्हणून राज्याभिषेक करताना सिसोदिया हि राजपूत वंशावळ दाखवून आपण उच्च कोटीचे राजपूत आहेत हे सिद्ध केले. अर्थात भोसले हे सिसोदिया कि होयसळ कुळातले यावर देखील वेगळे मतप्रवाह आहेत.) हे सगळे प्रकार आजच्या काळाच्या तराजूत तोलले तर किती चूक किती बरोबर असा प्रश्न पडेल. महाराष्ट्राबाहेर बर्याच ठिकाणी शिवाजी म्हणजे बंडखोर / लुटारू अशीच प्रतिमा अजूनही आहेच.
    प्रताप राव गुजर, नेताजी पालकर वगैरेना वेळेवर आले धावून नाहीत किंवा कर्तव्य पालनात कमी पडले म्हणून कठोर वागणारे महाराज संभाजी राजे मोगलांना जावून मिळाले व नंतर परतले तेव्हा तेवढे कठोर वागू शकले नाहीत. शेवटी पुत्र प्रेम कर्तव्य पेक्षा मोठे ठरले असे म्हणून कसे चालेल. राजे असले तरी घरातले राजकारण (सोयराबाई -संभाजी मतभेद) यामध्ये शेवटी ते स्वराज्याच्या दोन गाद्या कराव्यात या मतावर आले होते. तेव्हा मध्ययुगीन बाबिना आजचा चष्मा लावू नये. शिवाजी, संभाजी राजे महान होतेच मात्र शेवटी हि पण माणसे होती.कधी कधी ती चुका पण करू शकतात त्याची चिकित्सा व्हावी. उगाच जातीय विद्वेषातून एका जातीची बदनामी केली तर आपली पण बदनामी होवू शकते.
    संभाजी राजांच्या मृत्यूवर आणि तत्कालीन गोष्टीवर अजून प्रकाश पडायला हवा. संभाजी राजांची आणि कवी कलश यांची क्रूर हत्या औरंगजेबाने केली. पुढे त्यांच्या मृतदेहाचे काय झाले? वढू गावातील महार समाजाने त्यांच्यावर अन्त्य संस्कार केला असे कुठे तरी वाचले आहे. खरी हकीकत काय आहे?

    ReplyDelete
  22. संजय महाराज,
    आपण दाखवलेली तत्परता अभिनंदनास पात्र आहे.
    मनापासून धन्यवाद.
    एक निकोप चर्चेचा मंच असे आपल्या ब्लोग चे आपण रूप राखा आणि बघा,आपल्या विविध विषयांवरच्या चर्चेत माझ्यासारखे असंख्य लोक हिरीरीने भाग घेतील.मतभेद असू शकतात,ते असलेच पाहिजेत पण ते निरोगीपणे मांडण्याचे भानही सर्वानी ठेवले पाहिजे.
    पुनश्च धन्यवाद !
    आपले भाषा,जातींची निर्मिती अशा अनेक ताज्या विषयांबाबत आपल्या ब्लोग वरती असलेले लिखाण खूपच वाचनीय आहे.
    आपला ब्लोग आम्हाला उच्च प्रतीचा वाचनाचा आनंद मिळवून देईल अशी आशा आहे - ती आमची गरज आहे,

    ReplyDelete
  23. जसा पांडुरंग,
    जशी आपली जन्मदात्री आई,
    तसेच छत्रपती शिवाजीराजे हे आपल्या सर्वांचे भूषण आहेत.ते आपले सर्वस्व आहेत
    त्यांची महान कामगिरी आपण पामर कोण नाकारणार ?
    त्यांच्या थोरवीचा सूक्ष्म अभ्यास आपण सगळे करू या.तीच काळाची खरी गरज आहे.
    पांडुरंगाला कुणी शिव्या दिल्या तर आपण म्हणू कि देवा याला सद्बुद्धी दे !-हा त्या पांडुरंगाने शिकवलेला धर्म आहे.
    आपल्या आईला कुणी शिव्या दिल्या तर आपण त्याला तिथेच ठेचून काढू.कारण ते एकाच नाते असे आहे कि ज्यात भेसळ क्षम्य नाही.
    छ.शिवबांचे पण तसेच आहे.त्यांच्या विषयी कुणी वाईट बोलले ,लिहिले तर खुलासा विचारायलाच पाहिजे-
    पण सभ्यता सोडून नाही ,तर अभ्यासपूर्ण मार्गाने -विचारांनी विचारांचा पराभव केला पाहिजे . ! शिवराळ भाषेने नव्हे-हीच शिवाजीची शिकवण आहे.
    शब्द,विचार,आचार यामध्ये हा राजा नेहमी श्रेष्ठ ठरला. असे लोकोत्तर पुरुष युगायुगातून एकदा निर्माण होतात.
    आणि म्हणूनच त्यांना "युग पुरुष " म्हणतात.
    यापुढे आपण सर्वजण सकसपणे, निरोगीपणे लिहिण्याचा संकल्प सोडूया.! ह्या संजय सोनावानिंच्या भावनांशी मी पूर्ण सहमत आहे .

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर! आई-वडिलांचे स्थान हे परमेश्वरापेक्षाही वरचे आहे. त्यात भेसळ संभवतच नाही. त्या स्थानाला जर कोणी धक्का लावला तर त्याची गय केली जाऊ शकत नाही. पण असा वैचारिक प्रतिकार करतांना आपण स्वत:च त्यांच्या पातळीवर उतरून अशा समाजकंटकांच्या हाती कोलीत देऊ नये हे भान सर्वांनाच असले पाहिजे. प्रौढप्रतापपुरंधर क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज हे खरोखरच "युग पुरुष" होते. अशा व्यक्तीविषयी लिहितांना तसेच कोणत्याही विषयावर मत प्रदर्शन करतांना मर्यादेचे भान राखणे अतिशय गरजेचे आहे.

      Delete
  24. पुस्तक परिचय:- शिवाजीचे उदात्तीकरण

    डॉ. विनोद अनाव्रत या विचारवंताचे“शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव” नावाचे पुस्तक नुकतेच वाचण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे संपुर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय असा आज पर्यंतचा केलेला प्रचार व प्रसार या पुस्तकाच्या माध्यमातून आयू. अनाव्रत अत्यंत विद्वत्तापुर्वक परतवून लावतात. शिवाजी खरच महाराष्ट्राचा राजा होता का यावर विचार करायला लावणारं हे पुस्तक आहे. शिवाजीनी जेंव्हा राज्यभिषेक केला तेंव्हा तो फक्त साडेतीन जिल्ह्याचा राजा होता हे या पुस्तकातून सिद्ध करताना अनेक पुरावे देत त्यांचा दावा कसा मजबूत आहे हे सप्राण सिद्ध केले. त्याच बरोबर या साडॆतीन जिल्ह्याच्या राजाला कसं सवर्णानी महाराष्ट्राचा राजा बनवून टाकले याचीही सांगोपांग चर्चा लेखकाने या पुस्तकात केली आहे.
    ’शिवाजीच्या महानतेचा बागूलबुवा’नावाच्या प्रकरणानी पुस्तकाची सुरुवात होते. काय आहे या प्रकरणात? बरच काही आहे. आज पर्यंतच्या लेखकानी शिवाजीचे गुणगाण करताना आधीच्या वर्णवादी लेखकांची जी –ही ओढली अन तेच ते रेटताना विवेकबुद्धी न दाखविता जे जे सोडलं(कावेबाजीने) ते सगळ अनाव्रताना यानी या पुस्तकात अत्यंत विद्वत्तापुर्वक मांडलं आहे. अत्यंत संशोधक पद्धतीने एक एक गोष्ट तर्काच्या कसोट्यात घालताना शिवाजीचा फूगा कुणी व का फुगविला याचं लेखकानी दिलेलं स्पष्टिकरण डोळे उघडणारं आहे. एका छोट्याशा जगिरदाराला व बंडखोराला ज्याचं साम्राज्य तीन जिल्ह्याच्या बाहेर कधीच नव्हतं त्याला हिंदू राजा घोषित करण्यामागची अनेक कारणं सांगताना शिवाजी खुद्द कसा ब्राह्मणांच्या हातची खेळनी होता हेही पटवून देण्य़ात आले आहे. हे पुस्तक वाचताना अनेक ठिकाणी अरेच्च्या असपण होतं का? म्हणायला लावणारे अनेक संदर्भ व तर्क आहेत.
    शिवाजी महाराज ज्याना आपण महाराष्ट्राचं दैवत मानतो ते खंडणीखोर होते हे या पुस्तकातून मला कळलेलं आजून एक रहस्य होय. मी तर पार गोंधळून गेलो आहे, कुणावर विश्वास ठेवावा या संभ्रमात पडलो आहे. पण लेखक हे आंबेडकरवादी असल्यामूळे यांच्या संशोधनावर शंका घ्यायला जागा नाही. कारण या मातीत खरी संशोधनाची बिजं रोवणारा समाज जर कुणी असेल तर तो फक्त आंबेडकरवादी समाजच आहे. ईतर सगळे मतलबी व स्वार्थी संशोधक आहेत हे सर्वज्ञात आहे. जिथे खंड्णी नाकारली जाई तिथे लूटमार करुन ते खेडे नष्ट केले जाई असाही उल्लेख या पुस्तकात येतो. हे जर खरे असेल तर आता त्यावर काय बोलावे...
    CONTINUED.............

    ReplyDelete
  25. या पुस्तकात आजून एक अत्यंत महत्वाचं प्रकरण “रयतेचा खरा राजा कोण, शिवाजी की औरंगजेब” येतं जे वादग्रस्त वाटतं खरं पण जरा आत्मचिंतन केल्यास तत्कालीन सम्राट औरंगजेबाची महती पटवून देणारं हे प्रकरण आहे . या प्रकरणातून अनाव्रतानी काय मांडलं? वर वर पाहता शिवभक्ताना वाटेल की मराठा राजाच्या विरोधातली विधानं केली आहेत, पण ते सत्य नाहीये. औरंगजेबाच्या विरोधात शतकानू शतके ओकण्यात आलेली गरळ व त्यांच्यावर केलेल्या आरोपाचे मुद्देसुद खंडण करण्यात आले आहेत. औरंगजेब म्हटलं की आमच्या आंगावर पाल धावते. एवढ्यामोठ्या देशाचा व अनेक जाती पातीनी कुजलेल्या विचारांचा नि लोकांचाही डोलारा अत्यंत कुशलतेने पेलणारा तो भारतसम्राट किती कुशल होता हे अनाव्रताना मोठ्या समर्थपणे मांडलं आहे. औरंगजेब आज पर्यंत कुणालाच पेलला नव्हता. कायम मनात अढी ठेवूनच औरंगजेब रेखाटण्यात आला होता पण अनाव्रताना खरा औरंगजेब मांड्णे जमले असे म्हणायला हरकत नाही. तुम्ही एकदा हे पुस्तक वाचले की औरंगजेब कसा रयतेचा राजा होता हे नक्की पटेल. औरंगजेबाने सख्या भावांच्या केलेल्या कत्तलिवरुन त्याना आज पर्यंतच्या सर्व संशोधकानी खलनायक ठरवत बदनाम केले होते. पण त्या कत्तली कशा कालसुसंगत होत्या हे ही लेखकाने अनेक उदाहरण देत पटवून दिले आहे.
    या पुस्तकात एक अत्यंत महत्वाचा संदर्भ असा येतो तो म्हणजे शिवाजीचा फूगा फूगविण्याचे कारण काय? तर यावर लेखकानी अत्यंत तर्कसुसंगत चर्चा केली आहे. शिवाजीमुळे ज्याना फायदा होत गेला त्या समाजाने शिवाजीला हिंदू राजा घोषीत करत आपली पोळी लाटून घेतली. शिवाजीच्या आडून ब्राह्मण वर्गाणी आपला डाव कसा साधला व शिवाजीला शेवटी शेवटी पर्यंत हे कळलेच नाही अन जेंव्हा कळले तेंव्हा उशीर झालेला होता हे मांडताना लेखकानी त्यांचा अभ्यासाचा आवाका काय आहे ते दाखवून दिले आहे. त्याच बरोबर महाराला दिलेली पाटिलकी व शिवाजीच्या काळातील समता याचाही योग्य संदर्भासकट समाचार घेण्यात आला आहे.
    शिवाजी महाराजांच्या कारकिर्दिवर प्रकाश टाकणारे हे एक नवे संशोधनात्मक पुस्तक आहे. आज पर्यंतच्या सर्व साचेबंद कक्षा ओलांडून नव्या दृष्टिकोनातून व संशोधक वृत्तीतून आकार घेतलेले हे पुस्तक प्रत्येकानी नक्की वाचावे.
    टीप:- हे पुस्तक म्हणजे शिवाजी वर आरोप नसून शिवाजीचा फूगा फुगविणा-या तत्कालीन वर्णवादी विद्वानांचा भांडाफोड होय.

    शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव
    लेखक: डॉक्टर विनोद अनाव्रत
    पाने १८०, किंमत १८० रुपये
    प्रकाशक: सुगावा प्रकाशन
    ५६२ सदाशिव पेठ
    पुणे ४११ ०३०
    फोन: ०२० २४४७ ८२६३
    END.

    ReplyDelete
    Replies
    1. काही गोष्टी चा सुगावा लागण गरजेचं आहे

      Delete
  26. sanjay sir ,as per my little knowledge all this paradoxical events happened only due to foolish desicion of KING SNBHAJI to abolish well proved & established "intelligence agency system of BAHIDJI NAIK"
    even today there is only one topic for PhD in espionage in oxford i.e BAHID JI NAIK system of spying

    ReplyDelete
  27. १.मला या कटामध्ये संभाजी महाराजांचे निकटवर्तीय सरदार सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येते कारणं त्यांना जर संभाजी महाराजांचा अपहरण झालेलं आहे हे माहीत होतं/असेल मग सोडवण्याचा कोणताही प्रयत्न इतिहासात का उल्लेखित नाही.
    २.संभाजी महाराजांच्या हत्येपर्यंत त्यांचे कुणास ठाऊक नसणे.(गुप्तपणे हत्या करण्यात आली) ज्यामूळे जनतेतील उद्रेक टाळता येईल.

    ReplyDelete
  28. त्या काळातील ब्राह्मणांना कदाचित संभाजी महाराज नकोसे होते , म्हणून त्यांना मरण्यासाठी सोडून दिले असावे . नंतरच्या काळात त्यांच्या राजकिय हत्येला धार्मिक बलिदानाचे स्वरुप देऊन पहिल्या बाळाजी पेशव्यांनी पुन्हा सैन्य उभे केले . जवळ जवळ नष्ट झालेले साम्राज्य पुन्हा उभे केले . या गोष्टीला खरे मह्त्व दिले पाहिजे . आता 400 वर्षानंतर धार्मिक आणि जातिय वाद वाढवण्यात काहीही अर्थ नाही . इतिहास तटस्थपणे लिहिला जात नाही . किंबहुना तो तसा लिहीला जाऊ देत नाही . हे सध्याच्या इतिहासाचे दुखणे आहे . ऐतिहासिक व्यक्तिंचे गुण दोष आहे तसे दाखवले जावेत .

    ReplyDelete
  29. संभाजी राजांचे शौर्य
    काही लोक आजही म्हणतात की शिवाजी महाराजांनी जेवढे कमावले ते संभाजी महाराजांनी फुकट घालवले.
    अजूनही खूप लोकांचा हाच ग्रह आहे की संभाजी महाराज म्हणजे विलासी, व्यसनी अन रंगेल होते, फुटीर, सत्ताबुडवी राजपुत्र होते, स्वैराचारी होते, दुराचारी होते म्हणून.
    अन जेव्हा औरंग्याने त्यांना पकडले तेव्हा त्यांचा छळ केला अन त्यांना मारले. एवढंच ठाऊक आहे लोकांना संभाजी महाराजांबद्दल??

    अरे स्वराज्याचा दुसरा छत्रपती आहे, कल्याणच्या सुभेदाराची सून आईच्या मानाने माघारी पाठवणाऱ्या राजाचा पुत्र आहे, चाळीस दिवस औरंग्याच्या छावणीत अत्यंत क्रूर असा छळ अन हाल सहन केले त्यांनी, कशासाठी? कोणासाठी?

    औरंग्याने त्यांना धर्मपरिवर्तन करण्याची ऑफर दिली होती, मग का नाही त्यांनी ऐकलं? का नाही झुकले त्याच्यासमोर?? कुठून आलं हे सगळं शौर्य, त्याग, धाडस, बलिदान करण्याची वृत्ती. अरे रंगेल असते तर कशाला ताठ मानेने उभे राहिले असते त्याच्या समोर, व्यसनी अन विलासी असते तर शरीराचे हे हाल सहन तरी केले असते का त्यांनी??

    अरे झुकले असते नमले असते तर ऐश मध्ये जगले असते… मग का केलं असेल हे आत्मबलिदान. आजही त्यांची बदनामी करणाऱ्या आमच्यासारख्या हरामखोर लोकांसाठी.??? एवढ्या ज्वलंत तेजस्वी इतिहासाला आपण बदनामीच्या आगीत लोटाव हे त्या संभाजीराजांचे नाही, तर आपले दुर्दैव. आपण कसे एवढा वाईट विचार करू शकतो त्यांच्याबद्दल.

    ReplyDelete
  30. बर एवढं सगळं मानलं तरी पण हा विचार कधी कोणी करतो का की…..

    ज्या शिवराय आग्ऱ्याला भेटीस गेले असताना औरंग्याने त्यांना फक्त कैदेत ठेवले होते,
    मग संभाजी राजांचे एवढे अनन्वित हाल करण्याचे कारण काय असू शकते??
    असे काय घडले असावे की औरंगजेब संभाजी महाराजांमुळे एवढा दुखावला असावा.?? त्यांना चाळीस दिवस त्याने कैद करून त्यांचे हाल हाल का केले असावेत?

    शिवरायांनी औरंगजेबाची सुरत देखील दोन वेळा लुटली,
    त्याचा मामा शाहिस्तेखान याची पुण्यात बोटे छाटली.
    पण तरीसुद्धा औरंगजेबाने त्याचा बदला म्हणून जास्त काही केले नाही,
    मग संभाजी राजांविषयी त्याच्या मनात एवढी चीड का असावी??? कारण संभाजी राजांनी औरंगजेबाच्या मग्रुरीला ठेचले होते, त्याचा अहंकार मातीत गाडला होता.

    शिवरायांनी कधी बुऱ्हाणपूर व औरंगाबाद ला हात घातला नाही, पण राज्यभिषेकानंतर अवघ्या पंधरा दिवसात सुंदरीच्या गालावर तीळ शोभणारे बुऱ्हाणपूर लुटले, तेथील १८ व्यापारी पुरे उध्वस्त केले, एकही शिल्लक ठेवला नाही. त्यानंतर औरंगाबाद ला तडाखा दिला.
    रामशेज सारखा छोटासा किल्ला कमी शिबंदी सह असा लढवला की शहाबुद्दीन खान, फत्तेखान, कासीमखान हे सरदार प्रचंड फौजफाटा घेऊन मोठ्या तोऱ्यात आले असताना जवळपास सहा वर्षे फक्त झुंजत राहिले, पराभूत होत राहिले, अन औरंगजेबाची नाचक्की होत राहिली.

    १६८२ ला दस्तुरखुद्द औरंगजेब त्याच्या प्रचंड फौजेसह दख्खनवर चालून आला.
    पण संभाजी राजांच्या नेतृत्वाखाली मराठे झुंजत राहिले. मराठे टकरा घेत राहिले.

    संभाजी राजांनी विलक्षण युद्धनीती खेळली, औरंगजेब महाराष्ट्रात येताच मराठ्यांनी आपल्या फौजा सरळ मुघल प्रांतात घुसवल्या, कापाकापी केली, पुरती वाट लावली. त्या नीतीने औरंगजेबाच्या नजरा विस्फारून गेल्या.


    औरंगजेबाने जंजिऱ्याचा सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज, चिक्कदेवराय यांना फितवून, उकसवून मराठ्यांवर चाल करायला लावले, पण या सगळ्या शाह्यांना, परिणामी औरंग्याच्या पदरी फक्त आणि फक्त पराभवच आला.
    मोठी नामुष्की झाली.
    एवढे अफाट सैन्य असूनही आपण संभाजी राजांना हरवू शकत नाही त्यामुळे औरंगजेब पुरता वैतागला, चरफडत राहिला,संतापला.

    औरंगजेब आपल्याच सरदारांवर बरसत राहिला.
    “क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दी दिमत मे, कहा गयी? कहा गया वो दख्खन का चुहा?”
    सरदारानी उत्तरे दिली की “हुजूर वो बेबाक संभा सैतान है.”

    स्वराज्याच्या सीमा तब्बल पाच पटींनी वाढवल्या.

    शहाआलम, हसन अली खान, रणमस्त खान, बहादूरखान, कासीमखान यांना तुडव तुडव तुडवले.
    एक २५-३० वर्षाचा पोरगा आपल्याला एवढा त्रास देतो, नाचक्की केरतो हे औरंगजेबाला जणू सहनच झाले नाही.
    तो सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरला. हे साहस कोणाचं, हा पराक्रम कोणाचा, हे धाडस कोणाचं होत,
    तर सर्जा संभाजी महाराजांचं.
    त्रिवेंद्रम, त्रिचीनापल्ली, मद्रास, तंजावर, पाषाणकोट केरळ, आंध्रप्रदेश कुठवर कुठवर मजल मारली होती.

    संभाजी राजांच्या या धगीने औरंगजेब हैराण झाला.

    औरंगजेबाला वाटायचं संभाजी म्हणजे शिवाचा नादान अन तख्तनशील वारस. अनुमान तर बदलून घ्यावच लागलं. अरे शिवाजी राजपेक्षा दहा पटींनी हा संभाजी राजा तापदायक आहे हे त्याला उमगले.

    शेवटी औरंगजेबाने आपल्या डोईवरची बादशाही पदाची पगडी डोक्यावरून खाली ठेवली. आणि म्हणाला, “जब तक उस संभा को गिरफतार नही करता, उसे मार नही देता, ये दख्खन पर मुघल सलतनत का झंडा नही लहराता टब तक ये बादशाही पगडी हम नही पेहनेंगे.”

    शेवटी इथंच मेला औरंगजेब, पण मरेपर्यंत त्याला हे भाग्य लाभलंच नाही. दख्खन मधील एक खण सुद्धा त्याला जिंकता नाही आला.

    राजांना कैद करताना सुद्धा औरंगजेबला कपटी डावच खेळावा लागला. त्यानेही मान्य केलं होतं जणू संभाजीला आपण उघड्या मैदानात पराभुतच करू शकत नाही.

    अशा या महापराक्रमी छाव्याला मानाचा मुजरा

    ReplyDelete
  31. संभाजी राजे मुगलाना मिळाले हे शिवरायांचे राजकारण होते.संभाजी राजाना सोडवण्याचे प्रयत्न झाले नाहीत कारण मराठ्याकडे मोठया फौजा नव्हत्या.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...