Wednesday, February 20, 2013

"सर्व जाती एकसमान"


वैदिक धर्म आणि शैवप्रधान हिंदू धर्म हे सारत: भिन्न आहेत हे आपण हिंदू धर्माच्या बाबतीत विवेचन करतांना पाहिले आहे. वैदिक धर्म हा उभ्या वर्णव्यवस्थेचे समर्थन करतो हेही उघड आहे. खरे तर वर्णव्यवस्था हेही मुळचे वैदिक धर्माचेही अंग नव्हते हे आपण पुरुषसुक्ताच्या संदर्भात चर्चा करतांना पाहिले आहे. परंतू नंतर कधीतरी ही व्यवस्था जन्माला आली आणि ती वैदिक धर्मियांनी स्वीकारली हेही खरे आहे.

आजच्या विषमतेचे मूळ या वर्णव्यवस्थेकडे जाते. वर्णव्यवस्था हीच मुलात वैदिक असल्याने जे अवैदिक आहेत, म्हणजे ज्यांचा गेली हजारो वर्ष वेदांशी संबंध आलाच नाही त्यांना ती लागू पडत नाही हेही तेवढेच खरे आहे. वेदोक्ताचा अधिकार असनारे आणि नसणारे हे सरळ उभे दोन तट भारतात पडलेले आहेत. वैदिक विरुद्ध अवैदिक हा संघर्ष, वैदिक धर्मियांना हिदू समजल्याने निर्माण झाला आहे व त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे.

थोडक्यात वैदिक धर्मियांना हिंदू धर्मापासून वेगळे समजणे अत्यावश्यक बनलेले आहे. जेंव्हा वेदांचा जन्मही झाला नव्हता त्या काळात, म्हणजे सिंधुपुर्व काळातच लिंगपुजक धर्म अस्तित्वात आला होता. त्याचे भौतिक अवशेषही उपलब्ध आहेत. शैव तत्वज्ञान हे प्राय: लिंगपुजक, प्रतिमा-मुर्तीपूजक असून वैदिक अमूर्त इंद्र-वरुणादि देवतांचे यजन यज्ञातुन आहुती देत केले जात होते. मुर्तीपुजा वैदिक धर्म अस्तित्वात येण्यापुर्वीच्याच काळापासून केली जात होती. आजही ती सर्रास सुरु आहे. किंबहुना प्रचलित धर्म हा सर्वस्वी शैवप्रधान आहे. या धर्मात वर्णव्यवस्थेला कधीही स्थान नव्हते. जे काही अल्प-स्वल्प मिळाले ते वैदिकांच्या सहवासाने. परंतू वैदिक धर्मियांनी वर्णव्यवस्थेतील उच्च स्थान मात्र त्यागले नाही. त्यातुनच उच्च-नीचता सुरू झाली. अनुकरणातून आलेली ही उच्च-नीचता दूर करण्याचे प्रयत्न शैवांनी वारंवार केलेले आपल्याला दहाव्या शतकानंतरच्या इतिहासात दिसतात. पण त्यात अद्याप तरी यश आलेले नाही. याचे कारण म्हणजे वैदिक धर्मही आपल्याच धर्माचा भाग आहे ही भ्रामक समजुत!

परंतु ती समजूत ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारावरच आपल्याला दूर करावी लागणार आहे. वेदमाहात्म्य-वेदमान्यता या गोष्टींचे अवदंबर गेली शतकानुशतके माजवले गेले आहे त्यातून बुद्धीभेद होणे स्वाभाविक होते. परंतू ज्या ९५% समाजाला वेदाधिकारच नाही तर ते वैदिक कसे हा प्रश्न समाजाला कधी पडला नाही. आणि जर ते वैदिक नव्हेत तर मग वेदआधारित वर्णव्यवस्था मान्य करण्याचे कारणच काय हाही प्रश्न कधी पडला नाही. प्रत्येक धर्माची आपापली व्यवस्था असते जशी ती वैदिक धर्मियांची होती. ती असूदेत. पण जे त्या धर्माचेच नव्हेत त्यांनी ती व्यवस्था मान्य करण्याचे व त्याआधारीत आपले समाजजीवन ठरवायचे कारण काय?

पहिली बाब म्हणजे शिव-गणपती, पार्वती ते मुर्ती रुपात अनेक देवतांचे जेही लोक पूजन करतात ते शैवप्रधान हिंदू होत. पुजा ही मुलात अवैदिक आहे. हा शब्द द्राविड भाषेतील आहे. धुप-दीपांनी पुजा केली जात असल्याचे अनेक पुरावे सिंधू संस्कृतीतील उत्खननांनी आता आपल्याला उपलब्ध करुन दिले आहेत. ते मी क्रमश: पुढील भागांत देणारच असल्याने त्याबद्दल येथे एवढेच.

जातीसंस्था ही शैवांची देणगी आहे जी दहाव्या शतकापर्यंत अत्यंत लवचीक होती, नव्या जाती बनत होत्या तर अनेक जाती नष्ट होत होत्या हे मी जातिसंस्थेच्या इतिहासात स्पष्ट केले आहे.  जातीबदल हा सहज होत होता. दहाव्या शतकानंतर आर्थिक, राजकीय संकटे कोसळल्याने क्रमश: जातीसम्स्था बंदिस्त होत गेली हेही मी त्या लेखमालिकेत स्पष्ट केले आहेच. जर जाती नष्ट होत होत्या, नव्या व्यवसायाधारित बनत होत्या तर याचा अर्थ एवढाच आहे कि जाती जशा बनू शकतात तशाच त्या नष्टही होत राहतात. आज पारंपारिक व्यवसाय जवळपास संपुष्टात आलेले आहेत. नवे असंख्य व्यवसाय जन्माला आलेले आहेत. त्यामुळे जन्माधारित जातिसंस्था विसर्जित करण्याची वेळही आलेली आहे. परंतू वर्णव्यवस्थेच्या पगड्यामुळे व सामाजिक सुरक्षेच्या कारणांमुळे लोकांना जात जपणे आवश्यक वाटते. जी गोष्ट आपल्या धर्माची नाही ती जपणे हाच मुळात अधर्म नव्हे काय? जातिसंस्था ही वर्णव्यवस्थेप[रमाणे उभी नसून आडवी संस्था आहे. म्हणजेच सर्व जाती या समान दर्जाच्या आहेत. वर्णव्यवस्था मात्र विषमतादर्शक आहे. ती जे लोक जपतात त्यांनी खुशाल जपावी. परंतू हिंदू धर्मात वैदिक धर्मीय बसत नसल्याने हिंदुंनी वर्णव्यवस्था त्यागली पाहिजे.

जे लोक वेद/ वेदोक्त कर्मकांड/संस्कार व वर्णव्यवस्थेवर विश्वास ठेवतात व आचरणही करतात ते वैदिक धर्मिय असून जे अवैदिक आहेत, मुर्ती/लिंगपुजक आहेत ते सर्वस्वी अवैदिक असून शैवप्रधान हिंदू धर्मीय आहेत...म्हनजेच एकार्थाने खरे हिंदू आहेत. या धर्मात घुसलेली वैदिक तत्वे अमान्य करणे निकडीचे असून समतेच्या मार्गातील मोठा अडथळा आहेत हे लक्षात घेणे गरजेचे आहे.

तसेच, आपले लग्न लावायला ज्याप्रमाणे मौलवी अथवा फादर आपण बोलावत नाही त्याच प्रमाने, वैदिक धर्मीय हे स्वतंत्र धर्माचे असल्याने, त्यांना बोलावू नये. गुरव-जंगम यांच्या मार्फत अथवा स्वता:च विवाह लावावेत...पुजा कराव्यात.

वैदिक धर्मात, आधीच सांगितल्याप्रमाणे, मुर्तीपुजेला स्थान नाही. काही वैदिक लोक तेही काम करतात...हा त्यांचा द्वै-धर्मीपणा आहे, जो खरे तर त्यांच्याही धर्माच्या दृष्टीने पाखंडीपणा आहे. हा गोंधळ त्यांचा त्यांनी हटवावा.

वैदिक धर्मीय हिंदू नव्हेत. हिंदू शब्द सिंधुवरुन आला आहे. सिंधू संस्कृती ही आपल्याच पुर्वजांनी निर्माण केली व प्राकृतीक धर्म वाढवला. त्या धर्माचे हजारो वर्ष आपण जतन जोपासना करत आलो आहोत. त्यात कालौघात काही वैदिक पुटे बसलीत पण ती सहज दूर करता येतील.

थोडक्यात वर्णव्यवस्था सर्वस्वी नाकारने व वैदिक पगडा झुगारुन देत आपला मुळचा समतेचा धर्म जोपासत "सर्व जाती एकसमान" हा मुळचा आदर्श जोपासावा.

शैव धर्माची पुरातनता पुढील लेखात देत आहे.
Pls read this also

http://sanjaysonawani.blogspot.in/2013/02/blog-post_22.html

4 comments:

  1. To Sanjay Sonwani sir," all castes are equal"this statement probably would be accepted by all thinking persons. varna system is hierachial and cste system is linear,this your claim is not satisfactorially explained .(i have read ur articles on history of caste system.)those who are vedic, they should not do murti pooja ,this statements reveals those who are brahmin they should not be allowed to utter mantras in wedding ritual.caste system is not divided into upper or lower castes ,this sentence is almost wrong. where there are groups there is comparison ,there is competition and so there is some superior than others. varnas were there in past on the basis of occupation or work type.so is the caste system. also, it is well known fact that both of them after some decades made on birth basis. it is interesting and thought provoking that brahmin is a varna and a caste too...a note worthy thing that is in all decades in india brahmins were never large in no. today also they contribute less than 5% in no. so it is logical that they have used their superiority with established powers all the time. it also worthy all of them had not exploited all so called lower casre poeple.if u remind some names of all social workers and socially sensitive leaders u come tothis thing. i want to reiterate that this ur blog is a food for all those who have completed their basic needs b'coz remaining were in battle for living. so i kindly and with doe respect request u that what ever u write it should go without pre conceivd notions to readers....... thank u for such thought provoking and brain tesing articles on socially sensitive issues.....

    ReplyDelete
  2. कांही लोक जैन किंवा इतर अवैदिक भारतीय धर्माचे वैदिकीकरण/ब्राम्हणीकरण झाल्याचा आरोप करत असले तरी त्यात तथ्य नाही. कारण हे धर्म पाळणा-या समाजात असलेल्या अनेक परंपरा या वैदिकांच्या सारख्या दिसत असल्या तरी त्या वैदिक परंपरा नसून त्यांच्या स्वत:च्या परंपरा आहेत. जसे, मूर्तीपूजा, मंदिरे, मोक्ष-आत्मा-पुनर्जन्म या संकल्पना. वेदांमध्ये हे काहीच नाही. वैदिकांनीच या परंपरा इतर धर्मियांकडून घेतल्या आहेत, त्याही केवळ पोट-पाण्यासाठी, कारण पूजा-अर्चेमध्ये जे मंत्र वापरले जातात ते वेदोक्त नसून पुराणोक्त असतात. जैन धर्मात काय किंवा शैव धर्मात काय, वैदिक ब्राम्हणांना कोठे स्थान असते? आणि बहुजन समाजात अनेक लोक लग्ने लावण्यासाठी ब्राम्हणांना बोलवत असले तरी त्याला फारसे महत्व नसते. जसे लग्नात फोटोग्राफर, व्हिडिओवाला, वाजंत्रीवाला असतो तसाच एक रिचुअलवाला असतो.

    ReplyDelete
  3. आप्पा - नमस्कार
    बाप्पा - इतके दिवस कुठे होतात आप्पा.
    आप्पा - अहो ,अंजय सरांचे लिहिणेच बंद होते ना !मग भेटणार कसे नि कुठे ?
    बाप्पा - आज त्यांचा लेख वाचूनच आत्ताच बाहेर पडत होतो,आणि तुमची भेट झाली .
    आप्पा - इतके मस्त लिहिले आहे.

    बाप्पा - पण ते शैव धर्मात पण पूर्वी जाती होत्या म्हणतात ते कसे ?
    आप्पा -तुम्हीपण एकदम अंगावर येता राव ! मला पण ते कोडेच वाटते आहे. चला त्यांनाच विचारू या !
    ते म्हणतात कि १० व्या शतका पर्यंत शैव " लवचिक" होते , त्यांच्यात नव्या जाती निर्माण होत होत्या आणि जुन्या नष्ट होत होत्या. पण उदाहरण नाही देत ते !
    मला आठवतंय , अकराव्या शतकापासून तर पुढे मुसलमानांचे अखंड आक्रमण सुरु झाले !
    बाप्पा -मुसलमानांनी सपासप घणाघाती सोमनाथ फोडत ,अनेक दैवते फोडली शैव काय नि वैष्णव काय - त्याना सारखेच.- ते आल्लाचे बंदे !
    आप्पा - पण त्याना कुणीतरी समजावून सांगितले असते कि आम्ही शैव आहोत आमचे आणि वैदिकांचे विळ्या भोपळ्याचे नाते आहे. तुम्ही त्यांची देवळे बिनदिक्कत फोडा -विष्णूचे तुकडे करा कारण तो आमचा देवच नाही - तो वैदिकांचा देव.तर किती छान झाले असते.
    बाप्पा - पण काय हो ! मग नंतर झालेले सगळे मराठी संत हे त्या वैष्णव मार्गाला कसे गेले ?
    आप्पा-अहो,आज एकादशी आहे,आपण शैव आहोत ना ?मग आपण वैष्णवांची एकादशी कशी साजरी करायची ?काय करावे ते समजतच नाही . खिचडी तर सोडवत नाही !
    बाप्पा - मी सांगू का -आधार कार्डा सारखे एक बेसिक कार्ड करायला पाहिजे !शैव आणि वैष्णव - शिया या आणि सुन्नी यांचे पण करावे हवे तर !
    विशेषतः भिकारी आणि ग्यास साठी तरी ! आपल्याला दान करायचे आहे तर ते सत्पात्री तरी गेले पाहिजे ना ?
    आपण शैव ! आणि भिकारी वैष्णव ! झाले का वाटोळे - तसे नको व्हायला !
    आप्पा - बारा ज्योतिर्लिंगे आणि सर्व शिव मंदिरे येथे जानवीवाले आहेत त्याना हाकलायचे कसे ?मध्यंतरी मी रामेश्वरला गेलो होतो. तिथे शांत आणि सुंदर आद्य शंकराचार्यांची
    शिव शंकराची संस्कृतमधली रचलेली रचना पठण चालले होते .
    बाप्पा - धिःकार असो ! आद्य शंकराच्रार्य काय ते "योगी" नव्हते - ते "निरुद्योगी" ! शेंडी ठेवून सगळ्यांचीच स्तोत्रे म्हणत बसत असत. त्यांनीच तर दुर्गा असो ,गणपती असो,शिव असो,विष्णू असो,सगळ्यांची तारीफ करणारी गाणी केली .संस्कृत हि काय भाषा आहे का ?
    आप्पा - अहो विष्णू आला कि सगळे अवतार आले. कृष्ण आला, राम आला, दहीकाला आला- त्यापेक्षा आपला भोलेनाथ बरा ! एक चिलीम सगळ्याना मस्त करून टाकते !
    जय भोलेनाथ.!
    बाप्पा - तुम्ही कितीही शंख करा ! संजयजी छापणारच नाहीत ! बघा मजा !
    आप्पा - बघुयाच ! लागली पैज !
    बाप्पा - कसली ?
    आप्पा - ते संजयजी सांगतील !- महाशिवरात्र जवळच आहे.
    बाप्पा - घोडे मैदान जवळच आहे असे म्हणायचं का तुम्हाला ?
    आप्पा - तेच - आमची हि शैव पद्धत - शैव स्टाईल आहे !आम्ही आता आमची पोस्टाची तिकिटे , नोटा सगळे वेगळे करणार आहोत . अजून बरेच सांगायचं , पण संजय ऐकतील तर ना ! आमचा झेंडा , शैव गीत सगळे वेगळे - सिनेमा वेगळे - संस्कार वेगळे -शाळा ,कोलेज वेगळे,सर्तीफिकीत वर असणार नंदी !आणि झेंड्यावर शिवलिंग !

    ReplyDelete
    Replies
    1. नमस्कार आप्पा-बप्पा...तुमच्यावीन मैफिल सुनी-सुनीशी होती. (तुमचे अप्रत्यक्ष प्रश्न समजले...उत्तर घेऊन लवकरच येतोय!) धन्यवाद!

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...