Tuesday, March 12, 2013

स्वत:च समृद्ध नसणारे साहित्त्यिक

मराठी साहित्यिकांची गंभीर समस्या ही आहे कि कोणत्याही सामाजिक प्रश्नावर ते जाहीर भुमिका घेत नाहीत. आनंद यादवांची कादंबरी दबावतंत्र वापरुन नुसती मागे घ्यायला लावली गेली नाही तर साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष असुनही त्यांना तेथे पायही ठेवता आला नाही. या निंद्य प्रकाराबाबत साहित्यिकांनी जाहीरपणे साधा निषेध केल्याचे माझा अपवाद वगळता एकही उदाहरण नाही. झोपडपट्टीतील लोकांना काय साहित्य कळते असे उद्दाम प्रश्न ज्या मातीत साहित्यिकांकडुनच विचारले जातात त्यांची साहित्यनिष्ठा व वाचकनिष्ठा कोणत्या प्रतीची असू शकेल यावर मग चिंतन होणे ही दुरचीच बाब झाली. ज्या साहित्यिकांना सामाजिक प्रश्नांबाबत भुमिकाच घेता येत नाही त्यांच्याबद्दल सामाजिक आदर कसा वाढेल?

साहित्यिक हे सामाजिक प्रश्नांपासून अलिप्त आहेत याचे कारण म्हणजे ते कोनत्या ना कोणत्या राजकीय व्यक्तीच्या प्रभावळीत असतात. पारितोषिके, कोणत्या ना कोणत्या मंडळावरील नियुक्त्या अशा स्वार्थप्रणित बाबींमुळे कोणालाही दुखवायची त्यांची इच्छा वा भावना नसते. प्रवीण बांदेकरांसारखे वा कविता महाजनांसारखे काही सन्माननीय अपवाद वगळले तर साहित्यिक समाजापासून तुटलेलाच असल्याचे चित्र दिसते. मग हे साहित्यिक आपल्या साहित्यातून कोणते दर्शन घडवणार आहेत?

दुर्गा भागवत, पु.ल., आचार्य अत्रे असे अनेक दिग्गज साहित्त्यिक एकेकाळी कोणाच्याही रोषाची पर्वा न करता आपली मते जाहीरपने निर्भिडपणे व्यक्त करत असत. कोठे गेली ही परंपरा? पुलंना मुंबईतुन अवमानजन्य शब्दांत हिनवले गेले तेंव्हा कोठे गेली होती ही साहित्यिक मंडळी? साहित्य संस्कृती ही समाजमानसावर प्रभाव टाकणारी असते. आपली साहित्यिकांची संस्कृतीच जर रसातळाला गेल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत असेल तर साहित्य संस्कृती कोठे जाणार?

मराठी साहित्य संस्कृतीचे बनलेले एक अविच्छिन्न लक्षण म्हणजे त्यातील जातीयवाद!

ब्राह्मण, मराठा, ओबीसी व दलित अशी जातीय विभागणी मराठी साहित्याची झालेली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे ब्राह्मणी आहे हा आरोप आजचा नाही. त्यातही देशस्थ-कोकणस्थ ही जातीय बाब डोकावतेच...यंदाही डोकावला होताच! मराठा समाजही त्यांचे साहित्य संमेलन स्वतंत्र आयोजित करतो. ओबीसींचेही आता, दुबळे असले तरी, स्वतंत्र साहित्य संमेलन भरु लागले आहे. मुस्लिम, गुराखी व आदिवासींचीही साहित्यसंमेलनेही होतात. विद्रोही साहित्य संमेलने नेहमीच प्रकाशात असतात ती त्यातील विद्रोही जाणीवांमुळे...पण विद्रोही नेमका कोण हे ठरवायचे तंत्र पुन्हा जातीयच असते! ब्राह्मणी संमेलने (आजवरच्या अध्यक्षांचा इतिहास पहा) केवळ सहानुभुती वा आपण जातीयवादी नाही हे दाखवण्यासाठी अधुन मधुन दलित वा मुस्लिम लेखकाची अध्यक्षपदी निवड घडवून आणत असतात...पण ओबीसींना निरुपद्रवी घटक असल्याने अत्यंत क्वचित असे स्थान मिळाले आहे. आता या सर्व प्रकारात साहित्त्यिक योग्यता हा निकष असतोच असे नाही. दोन-चार, कोणाही वाचकाला न आठवणारी पुस्तके लिहिणारे अनेक महाभाग साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बनलेले आहेत. फक्त मते जमा करण्याचे कौशल्य असले कि पुरे...!

साहित्य संमेलने जाती आधारीत भरवली जाणे हे सामाजिक अध:पाताचे मोठे लक्षण आहे. इतरत्र शिरकाव होत नाही म्हणुन आपल्याच जातीचे संमेलन भरवा हा प्रकार साहित्य संस्कृतीच्या रसातळाचे विदारक दर्शन घडवते. "सर्वसमावेशकता" हा आपल्या केंद्रीय अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा मुलमंत्रच नसल्याने असे होणे स्वाभाविक बनून जाते. पण यातून समाज विखंडित होतो याचे भान कोनता साहित्यिक ठेवतांना दिसतो? असे घदणे असामाजिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणत्या विचारवंताने आजवर केलाय? "कोणालाही दुखवायचे नाही..." ही काय विचारवंतांची रीत झाली? समाजाच्या हितासाठी अनेकदा खडे बोल सुनवावे लागतात, ऐक्याची दिशा दाखवावी लागते...पण हे कोण करणार?

प्रादेशिक अथवा स्थानिक संमेलने होणे ही वेगळी बाब झाली. ती आवश्यकही आहेत. ते अधिकाधिक भरावीत...परंतू जातीधारीत संमेलने कशी बंद पाडता येतील यावर आता सर्वांनाच गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

चिंताजनक बाब अशी कि वाचकही पुस्तके निवडतांना जातीय विचारांनी प्रेरीत असतात. स्वजातीय लेखकाला तो नकळत प्राधान्य देत जातो आणि त्यावरच साहित्य चर्चा घडवून आणतो. त्यामुळे एक वाचक म्हणुन आपण अन्य लेखकांच्या अनुभवविश्वाला मुकतो आहोत  याची जाणीव ठेवत नाही.

साहित्य हे समाजाच्या ऐक्यासाठी असते, ते सर्वांचेच व सर्वांसाठीच असते आणि त्यातुनच संपुर्ण समाजाच्या मानसिकता बदलावर परिणाम घडु शकतो याचेच भान सुटले तर दुसरे काय होणार?

या सर्व जातीय प्रकारांमुळे साहित्त्यिकांत जो विभेद, जो अत्यंत निंदनीय आणि आक्षेपार्ह आणि कोणत्याही समाज संस्कृतीला अशोभनीय असल्याने, निर्माण झाला आहे त्याची परिणती मराठीचा एकूणातीलच साहित्त्यिक दर्जा ढासळवत नेत आहे. कारण लेखकाला अमुक जातीचे असणे पुरेसे असते. त्यासाठी सहित्त्यिक लायकी सिद्ध करत बसण्याची गरज नसते. मराठीत जर काही दखलपात्र साहित्य निर्माण झालेले असेल तर ते निव्वळ अपघाताने...आणि म्हणुणच असे साहित्य अत्यल्पही आहे. साहित्यिक म्हणुन आपली नेमकी भुमिका काय, आपण आपल्या कलाकृतीला परिपुर्ण करण्यासाठी किती कष्ट उपसले पाहिजेत, हे जर समजले नाही तर ते लेखन सर्वव्यापी व म्हणुनच वैश्विक कसे होणार?

ते वाचनीय आणि प्रगल्भ करणारे कसे असणार?

वाचनसंस्कृती तेंव्हाच वाढु शकते जेंव्हा तेवढेच विविधांगी साहित्य विपुल प्रमाणात निर्माण होते. तुमच्या कादंब-या पाच-दहा पानांपार वाचवत नसतील तर वाचकाने आपले पैसे त्यावर का वाया घालवावेत? ही अपेक्षा चुकीची नाही काय? वाचक तेच पैसे मग सिनेमा पाहील अथवा इंग्रजी (मूळ अथवा अनुवादित) साहित्यच वाचेल कि सरळ! केवळ मराठी साहित्यसंस्कृती वाचवायला त्याचे पैसे काही वर आलेले नाहीत. पुन्हा वर मराठीत वाचनच कमी झाले आहे ही बोंब मारायला हेच लोक आघाडीवर असतात. आपल्या अपयशांचे खापर दुस-याच बाबींवर फोडण्याची राजकीय सवय आता साहित्यिकांनाही लागली आहे आणि ही दुर्दैवी बाब आहे.

वाचन कमी झालेले नाही. ते फक्त मराठी लेखकांचे लेखन कमी वाचतात एवढेच! जेंव्हा वाचायलाच हवे असे त्याच्या आवडीचे साहित्य येते तेंव्हा वाचक बरोबर, प्रसंगी मेहनत घेवुन, ते पुस्तक मिळवतोच असा अनुभव मी अनेकदा घेतला आहे. त्यामुळे वाचकांना वाचायचेच नाही असे नसुन त्याला वाचावे वाटलेच पाहिजे असे देण्यात साहित्त्यिक असमर्थ आहेत म्हणुनच वाचनसंस्कृतीही क्षीणावत चालली आहे.

अत्यंत अपवादात्मक लेखक जागतीकीकरण व त्यामुळे निर्माण होत असलेले बहुसांस्कृतीकीकरण स्पर्शु शकले आहेत. शेतकरी अजुन धड आवाक्यात आलेला नाही. आपण त्याला इतर म्हणतात म्हणुन कृषी/ग्रामीण जीवनाचे उत्कट चित्रीकरण करणारी कादंबरी वगैरे भाडोत्री समिक्षक म्हणतात म्हणुन म्हणायचे...पण त्यात खोली किती, वास्तव किती...कि केवळ ज्यांना त्या जीवनाबद्दल काही माहितच नाही त्यांना गंडवले जातेय हे कोण पाहणार? लोकांना ऐतिहासिक/पौराणिक कादंब-यांचे आपल्याकडे वेड आहे हे खरेच आहे. मृत्युंजयसारख्या कादंब-यांनी वाचकांना वेड लावले हेही खरे आहे. पण गेली काही दशके केवळ अशी पुस्तके पटकन खपतील म्हणुन इतिहासातील व पुराणकथांतील हाती सापडेल ते पात्र घ्यायचे आणि कादंबरी ठोकायची असाही एक लेखकीय उद्योग बनला आहे. अर्थात प्रकाशकांचेही त्यांना प्रोत्साहन असतेच. मग दर्जा कोण पहातो...? (आणि मग वाचतोही कोण म्हणा!) वाचक एकदोनदा गंडला जावू शकतो...पण त्यात वारंवारिता आली कि वाचक दुसरीकडे वळणार हे नक्कीच आहे...वाचकाला दोष देण्याचा आपल्याला मग कोणता नैतीक अधिकार आहे?

थोडक्यात, मराठी साहित्य संस्कृती रसातळाकडे चालली आहे. लोक इतर प्रकारची, माहितीपर, अनुवादित वा वैचारिक पुस्तकांकडे झुकत आहेत. वाचकांची भुक शमलेली नाहीय. शमणारही नाही. उलट सर्व यत्तांना रुचेल असे उच्च (किमान ब-या) दर्जाचे साहित्य येत राहिले तर आहे ती वाचनसंस्कृती भरभराटेल यात मला शंका नाही. यासाठी जातीय पाशांतून बाहेर येत लेखकांनाच व्यापक व्हावे लागणार आहे. समिक्षकांसाठी अथवा पुरस्कारांसाठी न लिहिता स्वत: समृद्ध होत वाचकांसाठी लिहावे लागणार आहे. स्वत:च समृद्ध नसणारे साहित्त्यिक वाचकांना काय समृद्ध करणार?

16 comments:

  1. नऊ ते सहा नोकरी करून फावल्या वेळात लेखन करणाऱ्यांना आयुष्याचे सखोल दर्शन घडणार तरी कसे? ते जर घडले नाही तर उच्च प्रतीचे साहित्य निर्माण कसे होणार? ज्यांच्या स्वत:च्याच सामाजिक जाणीवा मेलेल्या आहेत ते जनतेत कसली बोडक्याची जागृती घडवणार?
    बाहेरील देशांमध्ये गेल्या शंभर वर्षांत राजकीय आणि सामाजिक बदल घडून त्यांचे संपूर्ण जीवनच ढवळून निघाले आहे. त्यातून तावून सुलाखून निघालेले लेखकच जागतिक दर्जाचे साहित्य लिहू शकतात. इथे म्हणजे कोकणातील लेखक केवळ कोकणाचेच वर्णन करणार, देशावरचे लेखक देशावरचे आणि मुंबई पुण्यातील लेखकांना तर त्यापलीकडे महाराष्ट्र अस्तित्वात आहे याचीच खबर नाही. म्हणजे नाकापेक्षा मोती जड.
    स्वत:च्या भक्तांकडून कौतुक, मुलाखती, सत्कार समारंभ आणि सरकार दरबारी वर्णी लावून मिळवलेली पारितोषिके याच्यातच ज्यांची कारकीर्द खर्ची पडली त्यांच्याकडून ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा करणे म्हणजे त्यांच्या पोटावर पाय देण्यासारखे आहे.

    ReplyDelete
  2. आप्पा - पुण्यातील म्हशींचे सामाजिक बंधुभावाचे भान नष्ट होत चालले आहे !
    बाप्पा - कशावरून ?
    आप्पा - आम्ही परवा गाडीतून चाललो होतो- आय टेन - , चक्क सहा सात म्हशी आडव्या आल्या ! शंभर वेळा भोंगा वाजवला - पण ठप्प ! ओ म्हणता ठो समजत नाही या म्हशीना !
    बाप्पा - काही बोललात का त्याना वेडेवाकडे ?
    आप्पा - लेखकाना सामाजिक बांधिलकी नाही आजकालच्या असे फक्त मी शेजारच्याशी बोलत होतो - आपले अण्णासाहेब - त्यांच्याशी !
    बाप्पा - नेमके काय म्हणाला तुम्ही ?
    आप्पा - त्या निर्मलाला सामाजिक भानच नाही अजिबात - इतकेच म्हणालो -
    बाप्पा - तेच म्हणतो मी - तीच तुमची घोडचूक- किंवा म्हैस घोटाळा ! ! अहो त्या म्हशींच्या घोळक्यात नक्कीच कुणीतरी निर्मला नावाची म्हैस असणार !
    आप्पा - इतक होऊ शकत ? इतकी प्रगती ? तिलापण मराठी येते ? अस कस काय ?
    बाप्पा - अहो आपल मराठी झोपडपट्टी आणि जनता वसाहती बरोबर म्हशींचे गोठे , कोंबड्यांचे खुराडे , घोड्यांचे तबेले असे सगळ्या थरात पोचले आहे !
    आप्पा - रेसकोर्स वर नुसते मराठीत ओरडा - चल धन्नु - आज तुझ्या इज्जतीचा सवाल आहे ! कशी धावेल बघा - सामाजिक बांधिलकी ! १ ० ० टक्के !
    बाप्पा - हे असेच होणार - संजय सर काहीही म्हणोत - आमचा अनुभव सर्वस्वी वेगळा च नव्हे तर वैश्विक आहे !- नुसत्या पुण्या मुंबईचा नाही ! वैश्विक !
    आप्पा - पण काय हो बाप्पा - आपल्या मराठी लेखकांनी रोमन लिपी सुरु केली वापरायला तर किती छान नाही का ?म्हणजे आपल्या व्याकरणातले किचकट ह्रस्व दीर्घ ही कटकट संपेल ना कायमची !
    आणि आपलं नि संस्कृतच नात पण !
    बाप्पा - पोईंट नोट किया जाये - यस सर !- आत्ता पोपची निवड झाली रे झाली की आपले नेक्स्ट - यु नो -
    तुमचे ते मराठी इंटर नेशनल संमेलन व्याटीकनलाच ठरले आहे - तिथे तुमच्या मराठीचा बाप्तीस्माच करून टाकू !
    आप्पा - म्हणजे संजय सरांची व्याकरणाची तक्रार आणि बोलीभाषेचा बहुजनांचा आग्रह - सगळेच आल इन वन सुटेल - नाही का ?
    बाप्पा - तुम्ही इतके हो कसे हुश्शार आप्पा - तुम्ही तर साहित्य परिषदेवर असायला पाहिजे !
    आप्पा - कसच कसच ! आम्ही आपली रेल्वे यार्डात शंटिंगची कामे करण्यातली माणसे - याचे टोक त्याला जोडायचं इतकीच आमची हुशारी -
    बाप्पा - काहीही म्हणा - बर का - आमच्यापेक्षा तुम्ही हुशार आणि तुमच्यापेक्षा पेक्षा त्या म्हशीच हुशार - !
    आप्पा - संजय सर रागावतील बर का अशाने ! सारखीच चेष्टा बरी नव्हे !

    ReplyDelete
  3. संजयजी,
    आपल्या लिखाणात लेखकीय हा शब्द येत असतो , तो व्याकरण दृष्ट्या बरोबर आहे का - असल्यास कसा ?
    राजकीय,संपादकीय,असे ऐकले आहे . . ( पुराण कालातील एकेक पात्र -- - लेखकीय उद्योग बनला आहे )
    हा शब्द खास आपला स्व निर्मित आहे का आधी आपण कुठे वाचला आहे ?
    वाचनीय ,स्पृहणीय ,चिन्तनीय,लक्षणीय - प्रेक्षणीय असे ऐकले आहे , - -शोचनीय, वंदनीय ऐकले आहे ,
    खुलासा अपेक्षीत आहे
    प्रतिक्रिया क्रमांक १ मध्ये नाकापेक्षा मोती जड ही म्हण अतिशय चुकीची वापरली आहे
    असेच मराठीचे अर्धवट ज्ञान आणि त्याचा अर्धवट वापर आणि त्याचे अर्धवट डोक्याने समर्थन करणे म्हणजेच
    बहुजनांचे मराठी असे आपणास वाटत असेल तर सर्व प्रश्नच सुटले असे म्हणता येईल !
    आपण जयवंत दळवी , व पु काळे ,जी ए ,तसेच असंख्य स्त्री लेखिका - इरावती कर्वे , दुर्गा भागवत ,चिंतनशील लेखक- समीक्षक गं बा सरदार ,
    श्री के क्षीरसागर,कुरुंदकर यांना विसरू शकत नाही -
    ते झोपडपट्टी पर्यंत पोचले नाहीत हा त्यांचाही गुन्हा नाही आणि झोपडपट्टीवाल्यांचापण नाही .
    आनंद यादव हे थोर लेखक आहेत आणि त्यांनी क्षमा मागून त्या विषयावर पडदा पाडून विरोधकांनाच एकप्रकारे निरुत्तर केले
    आणि शरमेने मान खाली घालायला लावली हे सत्य आपण सांगितले पाहिजे !
    मराठीत असंख्य ओरिजनल लेखक आहेत - टीकाकार आहेत - प्रकाशक आहेत -
    आतातर विषयांची विविधता वाढत चालली आहे . मराठी लेखणी समृद्ध होत चालली आहे .
    उगीचच चिंता करणारी वक्तव्ये कशाला करायची ?आपली संस्कृतीच मरणासन्न होत चालली असेल तर भाषा हे तिचे फक्त एक अंग आहे !
    धन्यवाद !

    ReplyDelete
  4. अनानिमास ,
    आपण कोण असाल ते माहित नाही , पण आपल्याला चार शब्द सांगणे माझे काम आहे !

    आपणास राग येणार हे गृहीत धरले आहेच !
    नऊ ते सहा नोकरी करूनही उत्तम लेखन करता येते ,
    नोकरीने जाणीवा मरत नाहीत .व.पु. आपण बिनडोक तरी आहात किंवा आपली जीभ सैल तरी आहे.
    नोकरी चा आणि साहित्य निर्मितीचा काहीही संबंध नसतो .
    अनेकजण उलट परिस्थितीचा ताण सहन करून उत्तम लेखन करत होते - स्वातत्न्त्र्यपूर्व काळात आणि त्या नंतर आज सुद्धा -
    मनात येईल ते लिहित सुटणे हाच एक नवीन प्रकार जन्माला आलेला दिसतो आहे ! थोडातरी विचार करावा - अनेक लोक संगीत किंवा चित्रकलेच्या क्षेत्रात हाडाची काडे करून , अपार कष्ट करून निर्मितीची तहान भागवत असतात - कलेसाठी कला म्हणून ! तसेच साहित्यात आहे - !
    आपणास कोणाबद्दल आदर आहे तेच कळत नाही - आपण सदा न कदा उचलली जीभ नि लावली टाळ्याला असे वागत असाल तर ,
    आपण साहित्यीकांविषयीतरी आदराने बोलायला लिहायला शिका - असे माझे आपणास कळकळीचे सांगणे आहे !
    आत्ता सुरवात तरी करा म्हणजे अजून पाच पन्नास वर्षांनी कदाचित आपण विनय म्हणजे काय ते शिकाल , नाहीतर सोपा मार्ग - संजय सरांशी एकदा फोनवर तरी बोलून बघा ! म्हणजे विनयाचा काही अंश आपल्या कानावरून जाइल !
    माझ्या सांगण्याने आपला फायदाच होईल - व पु काळे ज्योस्त्ना देवधर पु ल. देशपांडे वि स खांडेकर असे कितीतरी जन नोकरी करतच लिहित होते ,
    ययातिला मराठीतील उच्च पुरस्कार मिळाला आहे -

    ReplyDelete
    Replies
    1. जे लेखन तुम्हाला उत्तम वाटते त्याचा उदो उदो करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण ते लेखन इतरांनीही उत्तमच मानले पाहिजे हा तुमचा दुराग्रह फाट्यावर मारण्यात येत आहे. ह्या ब्लॉगवर प्रतिक्रिया देण्याचा अधिकार केवळ तुम्हाला हवा असल्यास तुम्ही संजय सरांशी संपर्क साधू शकता. तुमच्याशिवाय इतरांनाही स्वत:च्या मनाप्रमाणे प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे हे तेच तुम्हाला कदाचित पटवून देऊ शकतील.

      दुसऱ्यांवर व्यक्तिगत टिप्पणी करून त्यांना विनय म्हणजे काय हे शिकवण्याइतके निर्ढावलेपण अजून पन्नास वर्षांनी येईल कदाचित. तुमची आदरस्थाने आणि इतरांची आदरस्थाने वेगळी असू शकतात हे समजायला तुम्हाला हा जन्म देखील पुरणार नाही. उचलली बोटे आणि लावली कीबोर्डला हे करण्याचे स्वातंत्र्य तुम्हीही घेतच असता. बिनडोकपणाचा कॉपीराईट तुम्ही घेतलेला असल्याने इतरांना बिनडोकपणा करण्यापासून रोखण्याचा अधिकार तुम्हाला आहेच. चार शब्द सांगण्याबरोबरच चार शब्द ऐकून घेण्याची सवय अंगी बाणवा आता.

      अरे हो, "साहित्यीकांविषयीतरी" नव्हे तर "साहित्यिकांविषयी तरी " आणि "जन" नव्हे "जण", हे शब्द असे लिहायचे असतात. हे मराठी शुद्ध लेखनाला आमच्यातर्फे छोटेसे योगदान.

      धन्यवाद.

      Delete
    2. प्रिय अनोनिमास ,
      शुद्धलेखनाच्या चुका दाखवल्याबद्दल धन्यवाद ,
      बाकी मुद्देपण चांगले आहेत .
      आता या ब्लोगवर पोटभर सल्ले मिळाले - त्यांचे मनन करण्यात उरलेला जन्म जाइल
      आपल्या प्रतिक्रिया अशाच इतराना मार्गदर्शक ठरतील ! संजय सरांशी बोललो काय नि आपल्याशी - दोन्ही गोष्टी एकच -
      आगाशे

      Delete
  5. लेखकावर सामाजिक बांधिलकीचे बंधन, तशा अपेक्षा का असाव्यात? तो त्याच्या साहित्य निर्मितीतून त्याला जि प्रतिक्रिया द्यायची ती देऊ शकतो, दरवेळी तो डोळ्यात भरणारी कृती करेल, त्याने करावी अशा अपेक्षा का? मला हा तुमचा विरोधाभास वाटतो की एकाचवेळी तुम्ही मराठी साहित्य वैश्विक कसं होणार ह्याची चिंता करता आणि त्याचवेळी साहित्यिक, लेखक ह्यांच्या सामाजिक बांधिलकी, कृती, जातीय स्वरूपाचे वर्तन ह्याबाबत अपेक्षा ठेवता. त्याच्या साहित्यकृती आणि त्याचे सामाजिक नेतृत्व ह्यांत कुठलाही संबंध असण्याची अपेक्षा का? जसे आपण अन्य कलाकार हे त्यांच्या निर्मितीच्या ओघात बेबंद असू शकतात हे कळत-नकळत मानतो, तशी मुभा लेखकांना का नाही? एखादा लेखक व्यसनी, दुर्गुणी, अगदी जातीय वर्तनाचा असेल पण त्याचे लिखाण हे वैश्विक प्रतलात असेल तर आपण त्याला वाचायचं का झिडकारून द्यायचं? मी हे टोकाचे उदाहरण वापरले,पण असे होणे सहज शक्य आहे की व्यावहारिक जगाच्या बंधनांमुळे लेखक त्याला हवे ते स्वातंत्र्य जगू शकत नाही, वरकरणी त्याला काही तडजोडी, रदबदली कराव्या लागतील. पण त्याचे लिखाण मोकळे राहील. लेखकाच्या व्यावहारिक जगातील भूमिका आणि लेखकीय जगातील निर्मिती ह्याचा अन्वय तार्किक दृष्ट्या सिद्ध होणार नाही. आणि तसा लावायचा प्रयत्न करू नये असं वाटतं. सामाजिक बदलांत लेखकाची भूमिका ही त्याच्या लेखनाच्या कृतीतून असते असं मला वाटतं. त्या लेखनाने तो जे घडवू शकेल ते त्याचं योगदान. तो कुठल्या स्टेजवर बसतो, कोणासोबत उठतो-बसतो ह्याने तात्कालिक धुराला उडेल. किंबहुना खऱ्या आणि धंदेवाईक लेखकात हाच फरक करता येईल की खऱ्या अर्थाने लिहिणारा एक अलिप्तता स्वीकारेल. एक लक्षात घ्यावं की इथे लिहिणारा म्हणजे मी फिक्शन लिहिणारा असं म्हणतो आहे. संशोधनपर लिखाणात सामाजिक कृती ही काही अर्थाने गरजेची असते. पण तिथे लिखाण हे साध्य नसून साधन ठरते. प्रामाणिक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय चळवळी आणि लेखक हे संच एकमेकांना प्रभावित करतात, पण त्यांमध्ये सामाईक सगळं असावंच ही अपेक्षा ओझं आहे, आणि कदाचित तीच मराठीला गुदमरवत आली आहे.

    ReplyDelete
  6. आप्पा- अहो बाप्पा , तुम्ही तुमच्या नावाची कधी लपवा छपवी केली आहे का ?
    बाप्पा - नाही - का हो ?
    आप्पा - मग हे आगाशे साहेब इतक्या कळकळीने विनंती करतात , आणि हा कुणीतरी आई बाप नसल्यासारखा
    लफंगा त्याना दरवेळी छळत असतो.
    बाप्पा - त्यांचे आडनाव आगाशे - ते ब्राह्मण - कुणाच्यातरी डोळ्यात खुपत असेल . पण आई बापाचे नाव लपवण्यात त्याला मजा वाटत असेल !
    आप्पा - ते ठीक आहे हो , असते एकेकाची अडचण !लफ़द्यातल असणार हा , नाहीतर सगळ्याना किती अभिमान असतो !
    मी अमका तमका - पण हा अनानिमास नेहमी नाव लपवतो - ते सुद्धा टीका करताना -
    बाप्पा - अहो त्याची आई असेल बड्या घराची - लक्षात आल ना , आणि बाप असेल हजाम किंवा कुणीतरी -
    कस लिहिणार तो तरी बापाच नाव - जाऊ दे - असते एकेकाची अडचण !

    ReplyDelete
    Replies
    1. विनय म्हणजे काय याचे अद्वितीय दर्शन या प्रतिक्रियेतून झळकते आहे. तुम्हालाच एकदा फाट्यावर मारल्यावर तुमच्या सगळ्याच टोपण नावांना फाट्यावर मारल्यासारखेच आहे. त्यापलीकडेही जाणे शक्य आहे. पण नुकतेच तुमच्याकडून "विनय म्हणजे काय?" याचे सोदाहरण धडे घेतल्याने तेवढी लक्तरे काढण्यात येणार नाहीत.

      उठसूट इतरांचे आई बाप काढणे आणि जातीय टिप्पण्या करणे यापलीकडे ज्यांची अक्कल जात नाही त्यांनी संस्कृतीचा आणि साहित्याचा कैवार घेणे हे या देशाच्या महान परंपरेला धरूनच आहे. काळाला लगाम घालण्याचा प्रयत्न जे करतात ते काळाबरोबर अखेर फरफटत जातात हे सत्य ज्यांना कळत नाही त्यांच्या जखमा वारंवार उघड्या पडणारच. मग तरुणांच्या नावाने टाहो फोडणे हे ओघाने आलेच.

      आता वस्त्रहरण झालेल्या द्रौपदीप्रमाणे संजय सरांचा धावा करायचा की टोपण नावे वापरून याहून खालची पातळी गाठायची हे ठरवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहेच.

      Delete
    2. tya palikade kaa jaat naahi - roka kisane hai ?
      if you have the time , i have the inclination - ha ha ha

      Delete
  7. संजय सर ,
    आपल्या ब्लोग वरून अनेक वेळा आपल्याकडे नियमित लिखाण करणाऱ्या लोकांना " अनोनिमास " या
    नावाने लिखाण करून त्रास दिला जातो असे दिसते,
    याचा तिटकारा येईल असा हा प्रकार आहे ,
    त्यात आपण काहीच करत नाही म्हणजे आपलीपण यास फूस आहे का ?
    का आपल्याच संगनमताने हे घडत असते ?
    आपण हे रिमार्क छापणार नाही याची खात्री आहे !
    आपले एक ठराविक लोकांचे , आपले कौतुक करणारांचे एक , ऱ्याकेट आहे असे वाटू लागले आहे .
    कारण आपण बरेच वेळा अशा लोकाना पाठीशी घालत असता - हे आपणपण मान्य कराल.

    ReplyDelete
  8. संजय ,
    मुद्द्याची गोष्ट समजून न घेत मुर्खासारखे वितंड वाद घालणारे आपल्या ब्लोगवर हुज्जत घातल्या सारखे
    आशयाचा आदर न ठेवता भांडत बसतात .
    हा अनुभव मला अनेक वेळा या ब्लोगवर आला आहे.
    आपले नाव लपवून लिहिणारे तर तिरस्कारास पात्र ठरतात
    यापुढे आपल्या ब्लोगवर न लिहिण्याचा निर्णय समयोचित ठरेल ही खात्री झाली आहे.
    या निनावी लोकांना आपली फूस आहे हे पण अनुभवाने पटू लागले आहे.
    हे सगळेच किळसवाणे होत आहे
    यापुढे माझ्याशी संपर्क नको. ही विनन्ती.

    ReplyDelete
  9. 'अंतर्नाद-मार्च २०१३' च्या अंकात डॉक्टर गिरीश जाखोटिया यांचा 'बदलत्या महाराष्ट्रातले साहित्यिक' हा लेख या संदर्भातच आहे. डॉक्टर साहेबांनी साहित्यिकांच्या बाबतीत परीघ आक्रसण्याची समस्या अतिशय यथार्थपणे मांडली आहे. ही समस्या आजकाल सार्वत्रिकच दिसते आहे. सर्वसामान्य माणूस कधी जाणूनबुजून तर कधी नकळत कुणाच्या बहकाव्यात येत देश, प्रांत, जात, भाषा,या संकुचित होत जाणाऱ्या परिघात स्वतःला कोंडून घेत आहे. यामुळे स्वार्थापोटी म्हणा वा अज्ञानापोटी म्हणा या छोट्या परिघाबाहेर मानवतेचा एक विशाल परीघ साद आहे याचा आपल्याला सोयीस्कर विसर पडत चालला आहे. आणि आम्ही केवळ स्वतःलाच अश्या संकुचित परिघात ठेवत नाही तर छत्रपति शिवाजी, फुले, आंबेडकर, टिळक यांसारख्या युगपुरुषाना देखील त्यात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा वेळी आम्हा सर्वसामान्यांच्या संकुचित परीघाबाहेरील विशाल परिघाचे दर्शन आपल्या समर्थ साहित्याच्या माध्यमातून घडवून समाजाला जागे करण्याची, योग्य ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी निश्चितपणे साहित्यिकांचीच आहे, असायला हवी. निदान साहित्य संमेलनासारख्या सशक्त व्यासपीठावरून तरी अशी अपेक्षा ठेवणे काही चूक नाही. संवेदनशील मनाने समाजातील स्पंदने सजगपणे टिपून ती तटस्थतेने व निर्भयपणे मांडणाऱ्या साहित्यिकांकडे समाजाला अशाप्रकारे मार्गदर्शन करण्याची, भानावर आणण्याची क्षमता असते. मात्र तुरळक अपवाद वगळता, बदलत्या महाराष्ट्रातले साहित्यिक हे कुठल्याही वैचारिक भूमिकेवर ठाम उभे राहण्याची प्रज्ञा नसलेले प्रवाहपतित व सर्वसामान्य आहेत. मुळात सकस साहित्याच्या निर्मिकाकडे अपेक्षित आहे ते आत्मभान. मात्र आजच्या तथाकथित साहित्यिकांच्या 'स्व'भानाने आत्मभानावर मात केली आहे. त्यामुळे सरकारी योजनांचे लाभ, एखाद्या पुरस्काराचे दान, एखाद्या कार्यक्रमाची सुपारी याकडे डोळे लावून बसणाऱ्या भाटांकडून समाजातील प्रश्न, घोटाळे, समस्या आपल्या प्रभावी लेखणीने मांडून अभिजात साहित्यानिर्मिती करण्याची अपेक्षा काय करावी?. आम्ही महाराष्ट्रीय मध्यमवर्ग इतिहासाकडून काही धडे घेण्यापेक्षा सारे आयुष्य इतिहासाचे ओझे वाहण्यात धन्यता मानतो. त्यामुळे तीनशे वर्षापूर्वी महाराजांनी गाजविलेल्या मर्दमुकीवर आणि दादोजी होते की नव्हते यावर आम्ही अजूनही भावनांची दुकाने उघडून मिश्या पिळतो आहोत.

    ReplyDelete
  10. अनोनिमास ,
    स्वरदा विचारू इच्छिते =
    अहो फुसके दम देण्यात काय पुरुषार्थ ?
    मराठ्याना षंढ म्हणता आणि मग हे काय आहे ?
    विनय म्हणजे काय म्हणत कुणाची लक्तरे कुठे टांगली आहेत अशा गप्पा मारत असतान तुम्हाला खुल्ला जाब विचारला जातोय आणि तुम्ही षंढ गप्प ?
    पुन्हा एकदा - आहे का हिम्मत - रोक किसने है ?
    उत्तर देण्याचा पुरुषार्थ दाखव .

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...