Sunday, April 21, 2013

हिदुवादात या वैदिकांना.......?


सिंधुवाद हाच "स" चा "ह" झाला असेल तर खरा हिंदुवाद आहे. वैदिकवाद हा उत्तरकालीन आहे. वैदिकवादाचही ऐतिहासिकता ही फक्त कही समाजघटकांनी जपली आहे आणि वैदिकवाद हाच हिंदुवाद आहे असा त्यांचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष आग्रह आहे. परंतु ते धर्मशास्त्रीय वास्तव नाही. वैदिक समाजाला अजुनही आपला सामाजिक पाया सापडलेला नाही. त्यांच्या संभ्रमांनी समाजात विभ्रम पैदा होतात याचे त्यांना भान नाही. वर्चस्वतावाद हाच वैदिकवादाचा मुलार्थ आणि प्रमुख गाभा आहे परंतु हिंदुवादाचा आश्रय घेत पुन्हा आणि पुन्हा वैदिकत्वाचा टेम्भा मिरवायला वैदिकवादी तयारच असतात. हिंदू धर्म स्वच्छ करायचा असेल तर सर्व प्रथम वैदिकत्वतेला तिलांजली द्यावी लागेल. ते त्यांना स्वत:ला कधीच जपता आले नाहीत..."गो-ब्राह्मणप्रतिपालक" म्हणवत बहुजनांनीच त्यांना वारंवार संरक्षण दिले...सातवाहन असोत कि शिवाजी-संभाजी....त्या उपकाराची फेड स्वश्रेष्ठत्वतावादात जाणार असेल तर हिदुवादात या वैदिकांना मुळात स्थानच काय आहे? त्यांनी आपली वैदिकता खुशाल आनंदाने जतन करावी...त्यांना नेहमीच पुरातन काळापासून जे संरक्षण मिळाले ते मिळेल...पण मग त्यांनी राष्ट्रवाद आम्हाला शिकवू नये. हिंदू म्हणजे काय हे तर त्यांनी आजिबात सांगु नये!

17 comments:

  1. sanjay sir

    apalya likhanat halli bharpur gondhal adhalato.

    1)anek parmapara (jyat wed suddha ale)potat richawat hindu dharmacha

    ek mahan prawah wahat ahe .ata kuthe junya rudhi,pratha tun apn

    thode baher yet ahot tar tyamadhye nirnirale wad utpann kelech

    pahijet ka?

    2)jya brahmanan baddal tumhi lihit ahat te tar sudharnet (surwa

    wait wa changalya) surawat pudhe ahet.
    3)"sanatan ":sarkhya char lokanche ekun yumhi uagach traga karun.
    ghet ahat.

    4)APLYA KADUN KHUP APESHA AHET.KRUPAY APAN LLIKHAN KARTAN KADHI-HI

    DWESH,RAG ,BHAY ,YANA MANAT THARA DEU NAYE.

    KAMI LIHILE TARI CHALEL,PUN LIHILELA PRATYEK SHABD 100

    WARSHANNATAR SUDDHA WACHAWA WATEL ASE ADARNIY LEKHAK TUMHI

    VHAL ASHI APESHA AHE.

    3)NAHITAR DWESHA CHYA MAHPURAT KITITARI KHEDEKAR,RAMTECHE,SANGALIKAR

    WAHUN JAT AHET.KAL(TIME) TYANCHI THODI SUDDHA DAKHAL GHENAR NAHI.

    4)YA KAL(TIME)NADILA TARUN TUMACHE LIKHAN HAZARO WARSHE TIKEL ASE

    SAKAS ASAWE ,HI SHUBHECHA.

    ReplyDelete
  2. Sanjay Sonawani सरांना हिंदु धर्मातून विषमतेची हकालपट्टी करायची आहे . चातुवर्ण , पुरुषसुक्त आणि मनुस्मृती हे विषमतेचे बौद्धिक आधारस्तंभ आहेत. या तिन्ही प्रतिकांना (श्र्द्धानंदांचा अपवाद ) विशमतावाद्यांनि डोक्यावर ठेवले. वेदपाठशाळेत (अपवाद वगळता ) ब्राह्मण सोडुन कोणालाच प्रवेश नाहि.

    गीतारहास्यात श्रेष्ठ तत्वद्न्य भासणार्या टिळकांनी अर्टिक होम ऑफ वेदास लिहून मूलनिवासी वादाची पायाभरणी केली . त्यांचे वेदोक्त प्रकरण अति क्लेशदायक आहे. परत हिंदूची व्याख्या करताना वेदाला प्रमाण मानतो तो अशी भूमिका घेतली . टिळकांच्या भूमिका हिंदुत्व तोडणार्या आहेत हे निश्चित.

    एकुणच वेद समर्थ्कांनि विषमता पोसली हे वास्तव अमान्य करता येणार नाही - पा वा काणे पासून आजच्या सनातन प्रभात पर्यंत दाखले देता येतिल.

    ( नास्तिक सावरकरांनी थोडे सावरण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या सुधारणावादी विचारांना फारच कमी पाठिंबा मिळाला . आणि गोडसे संबंध आणि समर्थन यामुळे ते कायमचे बदनाम झाले . असो )

    बाकी वेद समर्थकांनी विषमता पोसली हे सत्य तसेच रहाते. आणि त्यामुळे ज्यांना हिंदु राहून विषमतेला विरोध करायचा आहे त्याना वेदाविरोधी भूमिका घेणे क्रमप्राप्त होते. इथपर्यंत सोनावणि सरांशी माझे एकमत आहे.

    (यापुढे " नम्रपणे " मतभेद नोंदवतो )

    १) पण मला असे वाटते कि कर्मविपाक सिद्धांत हिंदुंच्या हाडीमासी खिळला आहे . जैन आणि पारंपारिक बौद्ध हि कर्मविपाक सिद्धांताच्या गारुडाखालि आहेत. (पहा जा- महावीर किंवा गौतमाचे अवतार ) कर्मविपाकाचा घातक सिद्धांत पुर्ण भारतीय उपखंडात आहे. पुनर्जन्म हे जातिव्यवस्थे मागचे सायन्स आहे. आजचा पतित / हुच्च जन्म हा गेल्या जन्मीच्या कर्मामुळे आहे . हे तत्व प्रत्येक हिंदुला मनापासून पटते. जात्यावरच्या ओव्यांपासुन - लोकगीतांपर्यंत आणि पुराणापासून - आजीच्या गोष्टीतल्या परिकथांपर्यंत पुनर्जन्म रुजला आहे. पुनर्जन्माची भाकडकथा कोणत्याहि वैद्न्यानिक कसोटीवर टिकत नसली तरी भारतातील सर्व धर्मांच्या पारंपारिक कसोटीवर टिकते. त्याला सोनावणि सरांची शैव परंपरा देखील अपवाद नाही .

    २) विषमता हि वाइट गोष्ट आहे पण ती एकमेव वाइट गोष्ट नाही . तंत्र मार्ग / मुर्तिपुजेचा अतिरेक - त्यातले स्थान महात्म्य , त्यातून निर्माण होणारी क्रमप्राप्त पुरोहितशाहि (भट/गुरव /जंगम) यातही काळानुसार बदल करणे आवश्याक आहे.

    असे असेल तर( वेदविरोध योग्य आहे हे मान्य करून ) वेदाविरोधी हिंदु हा प्रकारही काळाच्या कसोटीवर उतरणार नाही . सुधारणावादि किंवा विद्न्यान निष्ठ - नास्तिक हिंदु कसोटीवर उतरेल . परंपराच शोधायची झाली तर सोनावणी सरांचेच लाडके चार्वाक किंवा सांख्य आहेतच कि !

    ReplyDelete
  3. सर, हिंदू धर्माची एक परिभाषा इतिहासात कधीच सापडत नाही. मूर्तीपूजा आणि मुर्तीपूजेला विरोध, ३३ कोटी देव आणि अद्वैताचा सिद्धांत, चार्वाक आणि वेद, पुराणे अश्या अनेक विरोधाभासांनी भरलेला हा धर्म आहे. ह्यातील एकच तत्वज्ञान हे हिंदू धर्म आणि बाकी सगळे बाहेरचे असे म्हणणे संयुक्तिक ठरणार नाही. मुस्लिम आणि ख्रिस्चन ह्या धर्मान्सारखे एक पुस्तक हाच धर्माचा पाया असे इथे दिसून येत नाही. कालानुरूप वेगवेगळी तत्वज्ञाने ह्या धर्मात मांडली गेली आणि ह्याच धर्माचा भाग होऊन गेली, इतकी की मूळ तत्वज्ञान कोणते ह्यावर सगळ्यांचे एकमत होणे कधीच शक्य नाही. अर्थात ह्यातले कोणते तत्वज्ञान अंगिकारायचे हे प्रत्येकाला ठरावायचा अधिकार आहेच. आणि न पटणारी तत्वज्ञाने नाकारायचा अधिकारही आहेच!

    ReplyDelete
  4. संजय सर ,

    माझ्या माहितीची नवी पिढी आणि त्यांच्या गरजा लक्षात घेतल्या तर ही सर्व चर्चा असंबद्ध होत आहे असे वाटते - तुम्हाला इतकी काळजी कोणाची आहे ?-आमच्याकडे असा विषय चालला होता की

    शिक्षण हेच माणसाला प्रगतिपथावर नेते .

    आज मागासवर्ग हा आधुनिक स्तरातील नोकरी क्षेत्रात बराचसा सामावला गेला आहे . स्थिरावला आहे त्यांचे देवधर्म आणि संजय सरांचा वाद यात बरेच अंतर आहे .

    त्यांचे देव धर्म हे वैदिक धर्माशी अजिबात निगडीत नाहीत - बकरे बळी देणे , इत्यादी गोष्टी करणारी प्रजा भटजी लोकांशी बांधील नाही . कधीही नव्हती . त्यामुळे संजय सर इतके हिंदू धर्म आणि वेद याबद्दल का कायम वैताग व्यक्त करतात ? तेच समजत नाही



    आज बहुतेक जणाना या ना त्या कारणाने आरक्षणामुळे नोकरी चांगली मिळत आहे

    पूर्वीसारखे आता दिवस नाहीत - आता ब्राह्मणवर्ग हा सुपात नसून जात्यात आहे आणि त्यांना कोणतीही सामाजिक आर्थिक राजकीय सुरक्षितता नाही - याची पण नोंद घेतली पाहिजे


    आणि हाच त्यांचा आधार काढून घेतल्याने ते आज दहापट वेगाने प्रगती करत आहेत - त्याना आरक्षण नसणे आणि समाजातून एक प्रकारे फेकले जाणे हीच नेमकी त्यांच्या अफाट प्रगतीची गुरुकिल्ली आहे .

    आज अशी परिस्थिती आहे की त्यांना इतर समाजाची पर्वा नाही आणि इतर समाजाला त्यांची पर्वा नाही - वेद फेकून द्यायला कुणाचीच हरकत नाहीये - कारण आजच्या प्रगतिशी वेदांचा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही - हे ब्राह्मण जाणून आहेत .- ती दृष्टी त्यांना आधुनिक शिक्षणाने दिली आहे .केशवपन थांबले पाहिजे म्हणून आत्ता आरडा ओरडा करण्यात जसे स्वतःचेच हसे होईल तसेच वेदांच्या बद्दल म्हणता येईल ज्या गोष्टी कालबाह्य झाल्या आहेत त्यांची निष्फळ चर्चा करून काय साधते तेच समजत नाही !



    मागास् वर्गाने पण आपल्या समाजातील अनिष्ट रूढी रद्दबातल ठरवून नवीन समाज उभारावा !त्याला ब्राह्मणांचा कदापि विरोध नसेल - त्यांच्या मध्ये ब्राह्मण कधीही येणार नाहीत !येउच शकत नाहीत -

    शिवकालापासून संजय सर एक तरी असे उदाहरण देऊ शकतात का , ज्या प्रसंगात बकरा बळी दिल्यावर ब्राह्मणाने त्यावर प्रथम हक्क दाखवला आहे आणि त्यामुळे त्याच्याघारी तसा नैवेद्य सर्व प्रथम पोचवला गेला आहे ?आणि ब्राह्मणाने पहिला मटणाचा घास घेतल्यावरच इतर समाजाने जेवण घेतले ? असे कदापि दिसणार नाही - अनेक प्रकारच्या ग्राम देवता आणि ग्राम दैवते यात ब्राह्मणाचा काहीही हात नसतो - त्या सर्व प्रथा ब्राह्मणेतर समाजाने निर्माण केल्या आहेत -


    त्यामुळे जुने विषय सतत उकरून चघळण्यात काहीच हशील नाही


    त्या ऐवजी हीच उर्जा आजच्या संदर्भातल्या प्रगती बद्दल वापरली तर समाजाला त्याचा फायदा तरी होईल नाहीतर हे असे घसा कोरडे करण्याने काहीच साधणार नाही -आपण आता आरक्षणाचे पांगुळ गाडे फेकून द्यावेत का नाही ते बघावे - जर ते ठीक असेल तर चालू राहावेत नाहीतर त्याचा फायदा इतर मागास्वर्गीयाना कसा मिळेल तेपण बघावे -

    संजय सर ,

    काल च्या पेपरात जो लेख आहे तो डोळ्यात अंजन घालणारा आहे - १ ९ ७ २ चा दुष्काळ आणि या वर्षीचा दुष्काळ आणि श्री माधवराव चितळे यांचा त्या वरचा अभ्यास - ऊस हे कसे पाणी जास्त खाते वगैरे बाबींबाबत अधिक चर्चा झाली तर ते समाज हिताचे ठरेल - आता चितळे हे वेद मानतात का हा प्रश्न जितका मूर्ख पणा चा ठरेल तितकाच हा वेदांचा मुद्दा वारंवार चर्चिला जाणे मूर्ख पणाचे आहे हे मात्र निश्चित !

    ReplyDelete
    Replies
    1. गोमांस भक्षक वैदिक ब्राह्मण!

      वैदिकांचे पशुपालन आणि यज्ञ या दोन्ही गोष्टी परस्पर पुरक होत्या. यज्ञात पशुचा बळी दिला जाई. मारलेल्या पशुची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून टाकली जाई. यज्ञात मारलेल्या पशुचे मांस खाण्यासाठी तर चरबी अग्नी भडकाविण्यासाठी वापरली जाई. अग्नी भडकावण्यासाठी इतर कोणत्याही ज्वलनशील पदार्थाची माहिती वैदिकांना नव्हती, हे सिद्ध करण्यासाठी वपेच्या वापराचे उदाहरण पुरेसे ठरावे. प्रारंभकाळी यज्ञाचा एकच प्रकार होता. कालांतराने त्याचे दोन प्रकार झाले.
      १ श्रौत यज्ञ
      २. स्मार्त यज्ञ
      स्मार्त यज्ञात पशुच्या जागी प्रतिकात्मक कणकेचे पशु आले. व वपा म्हणजेच चरबीच्या जागी तुप आले. तथापि, श्रौत यज्ञ हेच यज्ञाचे मूळ रूप असून त्यात पशुबळी अनिवार्य आहे. मनुष्याचा बळी देऊन यज्ञ करण्याची परंपराही वैदिकांत होती. अशा यज्ञास नरमेध म्हणत. (नरमेधाचा उल्लेख खुद्द ऋगवेदातच असून, या विषयी आपण या लेखमालेत पुढे पाहणार आहोत.) प्रारंभी यज्ञ हा दैनंदिन जगण्याचा भाग होता. नंतर त्यात कर्मकांड शिरले. यज्ञाला उत्सवाचे स्वरूप आले. यज्ञ हा श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग ठरला. राजसत्तेची महत्ता ठरविण्यासाठीही यज्ञाचाच वापर होऊ लागला. पण हा काळ फार नंतरचा. या विषयावर श्रीकृष्णविषयक प्रकरणात मी सविस्तर लिहिणार आहे. तूर्त आपण वेदांतील यज्ञाबाबतच बोलू या. ऋगवेद काळात अग्निहोत्र अर्थात यज्ञ करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य होते, असे दिसून येते. सार्वजनिक स्वरूपात होणारया यज्ञाचे विधि ब्राह्मणांच्या हातूनच पार पाडले जात.
      यज्ञात बळी दिले जाणारे पशु
      यज्ञात बळी दिल्या जाणारया पशुंत गाय हा प्रमुख पशु होता. त्याचे कारण गायींची उपलब्धता हेच होते. या शिवाय बैल, घोडे, बकरया व विविध प्रकारचे पक्षीही यज्ञात मारले जात१. बैल मारून करण्यात येणारया यज्ञास शूलगव असे म्हटले जाई. हा यज्ञ रुद्राला प्रसन्न करण्यासाठी करावा, अशी वेदाज्ञा आहे. शूलगवासाठी वापरण्यात येणारा बैल घरच्या गायीचा गोरहा असावा. तसेच हा यज्ञ आर्द्रा नक्षत्रावर करावा, अशी शास्त्राज्ञा आहे२. ही कर्मे गृहस्थ्याने म्हणजेच सांसारिक पुरुषाने करावयाची आहेत. राजसूय यज्ञ चक्रवर्ती सम्राट राजाने करावयाचा आहे. या यज्ञात काळे कान असलेल्या म्हणजेच श्यामकर्ण घोड्याचा बळी दिला जाई. पांडवांनी राजसूय यज्ञ केल्याची कथा महाभारतात येते. या सर्व प्राण्यांची वपा म्हणजेच चरबी काढून यज्ञात आहुती म्हणून वापरली जाई. यज्ञपशु ज्या खांबाला बांधला जाई त्याला यूप असे म्हणत व जेथे पशू कापला जाई त्या जागेला सुना असे म्हणत.
      ब्राह्मणांच्या गोमांसभक्षणाचे पुरावे
      वेद वाङ्मयात गायीच्या हत्येची परवानगी होती. गायीच्या मांसास वेदांत गव्य असे म्हटले जाते. परंतु त्या काळी ब्राह्मण मांसभक्षण करीत होते का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. क्षत्रियांना आजही मांसभक्षणाची शास्त्रोक्त परवानगी आहे; परंतु ब्राह्मणांना नाही. सांप्रतकाळातील महाराष्ट्रातील एक गणमान्य पत्रकार कुमार केतकर यांनी काही वर्षांपूर्वी सकल ब्राह्मण अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना +ब्राह्मण पूर्वी मांसभक्षण करीत होते+ असे विधान केले होते. तेव्हा अधिवेशनातील ब्राह्मणांनी केतकरांना सभास्थानावरून हाकलून लावले होते. त्यानंतर केतकरांनी हा विषय ताणला नाही. ब्राह्मण खरेच मांसभक्षण करीत होते का, याचा कोणताही पुरावा तेव्हा केतकरांनी दिला नव्हता. या सर्व पाश्र्वभूमीवर हा मुद्दा खरया अर्थाने महत्त्वाचा ठरतो. केतकरांसारख्या विद्वान ब्राह्मणांस प्राचीन काळच्या ब्राह्मणांच्या मांसभक्षणाचे पुरावे माहीत नसतील, असे म्हणवत नाही. तथापि, केतकरांनी ते देण्याचे टाळले असे दिसते. केतकरांनी पुरावे दिले नसले, तरी मी ते आता देणार आहे. होय, यज्ञात मारलेल्या पशुचा खूर, हाडे आदी अखाद्य भाग वगळून उरलेला सर्व भाग खाण्यासाठीच वापरला जात असे. क्षत्रिय-वैश्य-शुद्रादि त्रैवर्णिकांसह ब्राह्मणही मांसभक्षण करीत असत. ऋगवेदाचा भाग असलेल्या आश्वलायन सूत्रात३ ब्राह्मणांच्या मांस भक्षणाचे पुरावे जागोजागी आढळतात. आश्वलायन सूत्राचे श्रौत आणि गृह्य असे दोन भाग आहेत. गृह्य म्हणजे घरगुती, पारिवारिक. आश्वलायन गृह्य सूत्रातून ऋग्वेदी ब्राह्मणांनी करावयाची दैनंदिन व नैमित्तिक कर्मे सांगितली आहेत. यातील सर्व नियम हे ऋग्वेदी ब्राह्मणांसाठीच आहेत. त्यामुळे हे गृह्य सूत्र अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याकाळी ऋग्वेदी ब्राह्मणांची सर्व कर्तव्य कर्मे आश्वलायन गृह्य सूत्रांनी बांधलेली होती, त्यामुळे ऋगवेदी ब्राह्मणांना अश्वलायन ब्राह्मण असेही म्हटले जाते.CONT.............

      VISNU PATIL

      Delete
    2. आश्वलायन गृह्य सूत्राच्या २३ व्या खंडात ब्राह्मणांनी यज्ञाचे पौरोहित्य करताना पाळावयाच्या नियमांचा उल्लेख येतो. त्यातील एक सूत्र असे :
      न मांसश्नीयुर्न स्त्रियमुपेयुरा क्रतोरपवर्गात ।।सूत्र : २१।।
      अर्थ : यज्ञाचे पौरोहित्य करणारया ब्राह्मणाने यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्त होईपर्यंत मांस भक्षण करू नये. तसेच स्त्रीसोबत संभोग करू नये.
      यज्ञ समाप्तीपर्यंत मांसभक्षण करू नये, असा आदेश या सूत्रात देण्यात आला आहे, याचाच अर्थ त्याकाळात ब्राह्मण मांसभक्षण करीत होते. ब्राह्मण मांस खात नसते तर, अश्वलायनाने असा आदेश दिलाच नसता. यज्ञाचे आमंत्रण स्वीकारल्यापासून यज्ञ समाप्तीपर्यंत मांस भक्षण करू नये, हा नियम फक्त पौरोहित्य करणारया ब्राह्मणांसाठी आहे. इतर ब्राह्मणांसाठी नाही. पौरोहित्य न करणारे ब्राह्मण यज्ञकाळातही मांस खाण्यास मोकळे आहेत, असा त्याचा दुसरा अर्थ होतो.
      आपस्तंभ सूत्र काय म्हणते?
      आश्वलायन सूत्रातीला मांसभक्षणाचा हा उल्लेख असला तरी गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख नाही. हे मांस गायीचेच असेल, असे ठामपणे म्हणता येत नाही. ते कोणत्याही प्राण्याचे असू शकते. यातून ब्राह्मण मांस खात होते, हे सिद्ध होत असले तरी ते गायीचे मांस खात होते, हे काही सिद्ध होत नाही. त्यासाठी वेदवाङ्मयाचाच भाग असलेल्या आपस्तंभ सूत्राकडे आपण वळू या. आपस्तंभ सूत्रात गायीच्या मांसाचा स्पष्ट उल्लेख येतो. हे सूत्र असे :
      धेनवनडुहोर्भक्ष्यम (प्रश्न १, पटल ५ सूत्र ३०)
      अर्थ : गोमांस भक्ष्य आहे. (सोप्या मराठीत अर्थ : गायीचे मांस खाण्यासाठी योग्य समजावे.)
      मनुस्मृतीतील पुरावे
      ब्राह्मण हे गायीचे मांस खात होते, याचे इतके पुरावे वेदवाङ्मयात आहेत की, त्यांचे संकलन केल्यास अनेक खंड होतील. या सर्व पुराव्यांत न पडता ब्राह्मणांना परमवंद्य असलेल्या मनुस्मृतीतले उल्लेख पाहून हा विषय संपवू या. ब्राह्मण ज्याचा महर्षि असा उल्लेख करतात, त्या मनुने + सर्व प्राणी हे खाण्यासाठीच असतात. देवाने प्राणी हे भोजन प्रित्यर्थेच तयार केले आहेत+ असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. मनु म्हणतो :
      प्राणस्यान्नमिदं सर्वं प्रजापतिरकल्पयत ।
      स्थावरं जंगमं चैव सर्वं प्राणस्य भोजनम् ।।
      (मनुस्मृती अध्याय : ५ श्लोक २८)
      याही पुढे जाऊन मनू म्हणतो की, मांस खाल्याने, मद्य प्राशनाने तसेच मैथुन केल्याने दोष लागत नाही. मनूचा हा श्लोकार्ध असा :
      न मांसभक्षणे दोषो न मद्ये न च मैथुने ।
      (मनुस्मृती : अध्याय ५. श्लोक ५६.)
      असाच निर्वाळा याज्ञवल्क्यही५ देतो. याज्ञवल्क्याच्या व्यवहाराध्यात म्हटले पुढील श्लोक आढळतो :
      प्राणात्यये तथा श्राद्धे प्रोक्षितं द्विजकाम्यया ।।
      देवान् पितृन् समभ्यच्र्य खादन्मांसं न दोषभाक् ।।
      अर्थ : श्राद्धात, यज्ञात आणि खाण्यासाठी पशु मारावेत. त्याने पाप लागत नाही.
      प्राणिहत्येला वैध ठरविण्यासाठी वैदिक शास्त्राने अनके श्लोकांची रचना केली आहे. त्यापैकी एका श्लोकात तर असे म्हटले आहे की, वेदांच्या आज्ञेनुसार प्राणी मारण्यात आले तर या कृत्यास हत्या समजली जाऊ नये. हा श्लोक असा :
      या वेदविहिता
      हिंसा न सा हिंसा प्रकीत्र्तिता ।।
      अर्थ : वेदांच्या आज्ञेनुसार करण्यात आलेल्या पशु हत्येला qहसा समजण्यात येऊ नये४.
      लोकहितवादी दाखविली सत्य सांगण्याची हिम्मत
      बौद्ध धर्माच्या रेट्यामुळे ब्राह्मणांनी स्वत:च्या वाङ्मयात गुपचूप बदल करून. जुने ग्रंथांतील उल्लेख दडवून ठेवले. जुने ग्रंथ बाहेर काढून त्यांचा खरा अर्थ जगासमोर आणण्याची हिम्मत ब्राह्मणांनी दाखविली नाही. दयानंद सरस्वतीसारख्या दुराभिमान्यांनी तर्कवितर्क करून नवीनच अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. वेदांत हिंसा लिहिलीच नाही, असा दावा करताना दयानंदानी वेदांचे काव्यात्म आणि सांकेतिक अर्थ लावले. त्यांचा हा उपदव्याप निंद्य आणि बहुजनांची दिशाभूल करणारा आहे. या उलट लोकहितवादी यांनी +वेदकाळी ब्राह्मण गायींसह इतर सर्व प्राण्यांचे मांस खात असत+ हे सांगण्याचे धाडस दाखविले आहे. लोकहितवादी म्हणतात : +श्रौत यागात (याग म्हणजे यज्ञ) हिंसेवाचून बोलणेच नाही. गृह्यकर्मात (गृह्यकर्म म्हणजे नवरा बायकोने मिळून करावयाचे कर्म) अश्वलायनांनी हिंसा लिहिली आहे. यावरून गाय, बैल, बकरी, पक्षी इ. प्राणी यज्ञशेषद्वाराने (यज्ञशेष म्हणजे यज्ञ केल्यानंतर उरलेले) भक्षणार्ह झाली होती व त्याविषयीचा कोणत्याही प्रकारचा निषेध किंवा शंका सूत्रकत्र्याच्या मनात आली असेल, असे म्हणवत नाही. ... आता हे सूत्र वेदास अगदी सन्निध आहे इतकेच नव्हे, तर वेदतुल्य आहे असे सर्व ब्राह्मण समजतात४.+ इतरही अनेक विद्वानांनी ब्राह्मणांच्या गोमांस भक्षणाविषयी लिहिले आहे. तथापि, मी येथे लोकहितवादी यांच्या लेखनातील पुरावा दिला आहे. कारण लोकहितवादी स्वत: ब्राह्मण होते. तसेच एक मोठे समाजसुधारक या नात्याने त्यांनी रोखठोक लिखाण केलेले आहे. या पाश्र्वभूमीवर विधानाला आपसुकच विशेष महत्त्व प्राप्त होते.END.

      VISHNU PATIL

      Delete
    3. हिंदूंनी केलेले गोमांसभक्षण
      लेखक एस. एल. सागर
      वाचा आणि विचार करा!

      Authors: एस. एल. सागर
      Translators: प्रमिला बोरकर
      Publication: सुगावा प्रकाशन
      Language: मराठी
      Category: सामाजिक
      Pages: 117
      Weight: 113 Gm
      Binding: Paperback
      ISBN10: 81-88764-48-5

      Delete
  5. संजय सरांचे काही लेख फारच उत्तम आहेत पण हे असे का होते मधूनच काही कळत नाही. बहुदा मानवी स्वभावाच असा असावा. सतत हिंदू धर्माला शिव्या देवून काय मिळते कोण जाणे. बाकी ते जैन दुसऱ्यांशी कसे वागतात ते मुंबई मध्ये राहून बघितले. बाकीच्यांना त्यांच्या इमारतीत येऊ देत नाहीत. नवबौद्ध त्यांचे वेगळेच. ख्रिशन लोक फक्त स्वतःचा धर्म वाढवणे ह्याच ध्येयाने वागतात. मग हिंदुनी काय घोडे मारले आहे. नुसता धर्म बदलून किंवा शिव्या देवून आपली प्रगती होत नसते. हे ज्याला कळले तो शहाणा. तसही माझा स्वतःचा प्रवास आता नास्तीकाकडे चालला आहे. सध्या धर्माच्या नावाखाली जे काही चालले आहे त्याला काहीच अर्थ नाही. निसर्गाप्रमाणे राहणे आणि त्याचा मं राखणे हाच खरा धर्म. बाकी हे सगळे मानवाने स्वतःच तयार केलेल जंजाळ आहे.

    ReplyDelete
  6. SURAWA MITRANO-BRAHMAN-BRAHMANETAR WAD MUDDAM UKRUN KADHALA JATO

    KARAN.


    1)BRAHMAN SOFT TARGET AHET. MARATHYAN WIRUDDH BHADKAU LIHILE TAR PATHIT

    DANDKE BASEL..
    2)BRAHMANA WIRODHAT LIHUN AMBEDKARI CHALWALIT MIRAWATA YETE.

    RASHTRAWADI NETYANCHI KRUPADRUSHTI RAHATE.
    3)TISARE WA SURWAT MAHATWACHE MHANAJE YANCHE YA WISHAYA WARIL LIKHANCH WACHALE JATE.NAHITAR YANA WICHARATO KON?

    4)YA PRAKARCHE LIKHAN WACHUN PRATIKRIYA DENARE PUN CHAR BRAHMAN CH

    ASTAT,BAKI BAHUJAN SAMAJ YA PRAKARCHYA DWESH PURNA LIKHANA KADE
    .
    DHUNKUN SUDDHA BAGHAT NAHI.

    (VED-PREMI)

    ReplyDelete
  7. I just am against varna system that has been deeply rooted in Hindu mindset. I am against that and that's why Vedikism to be denied. Thats it! All those who think Brahmin, Kashatriy or Vaishya based on their birth have destroyed a thread of equality and thus unity. Here I criticise not only Brahmins but those all who think they are at ascending order of Varna system!

    ReplyDelete
  8. Harshad Sarpotdar
    हिंदूधर्म : खरा आणि खोटा !
    आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती यांनी १८७५ साली प्रसिद्ध केलेल्या 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथात हिंदू धर्माचं खरं स्वरूप खालीलप्रमाणे (साधार !) दाखवून दिलंय :-
    १) हिंदू धर्मात मूर्तीपूजा आणि लिंगपूजा पूर्णपणे निषिद्ध आहे.
    २) मंदिरे व स्मारकं उभारणंसुद्धा निषिद्ध आहे. ती उभारण्यापेक्षा तो पैसा समाजोपयोगी कामांसाठी लावावा असं म्हटलं आहे.
    ३) नामस्मरण, जपजाप्य, पोथीवाचन, व्रतवैकल्य, वास्तुशांत, सत्यनारायण, उपासतापास मुळीच सांगितलेले नाहीत.
    ४) तीर्थयात्रा सांगितलेल्या नाहीत. केवळ वनात जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात राहायला सांगितलेलं आहे.
    ५) नरबळी, पशुबळी, नागबळी इत्यादी सर्व गोष्टी निषिद्ध आहेत.
    ६) परदेश पर्यटनाला अजिबात बंदी नाही. समुद्र ओलांडून कोणीही कुठेही जावू शकतो.
    ७) बालविवाह निषिद्ध आहे. सोळाव्या वर्षापर्यंत मुलीचं लग्न करायला मान्यता नाही.
    ८) विधवा विवाहाला मान्यता आहे. एवढंच नव्हे, तर नियोग पद्धतीने देखील विधवा स्त्री अपत्य निर्माण करून त्याला आपला वारस बनवू शकते.
    ९) सतीची चाल या धर्मात कधीही सांगितलेली नसून हे कृत्य पूर्णपणे धर्मबाह्य आहे.
    १०) सर्व वर्णांच्या स्त्री व पुरुषांना वेद शिकण्याचा आणि स्वतःचा विकास घडवून आणण्याचा अधिकार आहे. कारण वेदांमध्ये जगाच्या उत्पत्तीपासून पदार्थविज्ञानापर्यंत अनेक शास्त्रांविषयीचं ज्ञान सांगितलेलं आहे.
    ११) या धर्माचा खगोल शास्त्रावर विश्वास आहे, पण फलज्योतिषावर नाही.
    १२) चमत्कार, गंडे दोरे, ताईत, मंत्र तंत्र, जारण मारण, करणी, वशीकरण, भूतप्रेत वगैरे सर्व गोष्टी निषेधार्ह असून हिंदू धर्म या गोष्टींचा पुरस्कार करत नाही.
    १३) अस्पृश्यता निषेधार्ह असून ती हिंदू धर्माने कधीच व कुठेच सांगितलेली नाही.
    १४) परमेश्वर एकच असून तो निराकार असल्याचं हा धर्म मानतो.
    १५) वेद पठण (ज्ञानप्राप्तीसाठी), तपसाधना (म्हणजे चिंतन आणि वैज्ञानिक प्रयोग) आणि होम हवन (आरोग्यासाठी) एवढंच करा असं हा धर्म सांगतो.
    या पार्श्वभूमीवर आपण 'खरा' हिंदू धर्म आचरत आहोत की 'खोटा' हे ज्याचं त्याने ठरवावं. (आर्यसमाजींच्या हिंदु धर्माच्या व्याख्येबाबत अन्यत्र (चव्हाटा) येथे चर्चा सुरु आहे.)


    (तेथे दिलेला हा प्रतिसाद)
    १. पहिले चार मुद्दे वैदिक धर्मीय आहेत. वेदांना या बाबी मान्य नाहीत.
    २. पाचवा मुद्दा काहे प्रमाणात चुकीचा आहे. जुन्या वैदिक काळी यज्ञात नरबळी/पशुबळी दिले जात असत. मुर्तीपुजकही नरबळी/पशुबळी देत असत, पशुबळी अजुनही चालु आहेत...फक्त बळींचे कर्मकांड वेगळे होते/आहे.
    ३.सहावा मुद्दा सुधारणावादी आहे. समुद्रबंदी पुर्वी कोणावरच नव्हती. मुर्तीपुजक मात्र समुद्रबंदी पाळत नव्हते हे दहाव्या शतकापर्यंत तरी दिसते.
    ४. सातवा मुद्दा दोन्ही धर्मांना लागु होता. पण वैदिक धर्मियांनी मध्ययुगात बालविवाहांना प्रोत्साहन दिले. मुर्तीपुजकांत बालविवाह होत नव्हते.
    ५. सतीप्रथेचे अस्पष्ट निर्देश ऋग्वेदातच आहेत. महाभारतात माद्री सती गेली होती. पण ती तुरळक प्रथा होती. मध्ययुगात वैदिक धर्मित्यांत मात्र ती सरसकट चालु राहिली ती पार इंग्रजी राज्य येईपर्यंत. पण या चालीला वैदिक अथव अवैदिक धर्म पाठिंबा देत नाही. विधवांनी पुनर्विवाह करावा असे क्काही स्मृती सुचवतात तर काही विधवांनी धर्मोपरायण जीवन पतीच्या स्मृतींत घालवावे असे सांगतात.
    ६. दहावा व अकरावा मुद्दा सवस्वी चुकीचा आहे. शुद्रांना (स्त्रीयांनाही) वेदाधिकार नाही. हा आर्य समाजींचा सुधारणावाद म्हणता येईल.
    ७. बारावा मुद्दाही चुकीचा आहे. अथर्ववेद सोडा, खुद्द ऋग्वेदात (दहावे मंडल) जारण-मारण विधी येतात. किंबहुना जगातील सर्वच धर्मांचे (समाजमानसशास्त्रामुळे) हे एक अंग आहे. आर्य समाजे येथे सुधारनावादी बनलेले दिसतात, पण धार्मिक आधारावर ते खोटे सांगत आहेत.
    ८. तेरावा मुद्दा धादांत खोटा आहे. स्मृती अस्पूष्यतेचा उच्च रवाने गौरव करतात.
    ९. वैदिक देवता या अमुर्त आहेत. एकेश्वरवादाकडे नेणा-या काही ऋचा नक्कीच आहेत. परंतु यज्ञात विविध देवतांना आवाहने करण्यात येतात. बहुदैवतवाद हा वेदांचा प्रमुख गाभा आहे.
    १०. पंधराव्या मुद्द्याचे काय करायचे हा वैदिक धर्मियांचा प्रश्न आहे.
    शिवमंदिरांच्या रक्षणासाठी महार नियुक्त केल्याचे माधवराव पेशव्याच्या रोजनिशीत नोंदले आहे. त्याच नोंदींत विट्ठल मंदिर परिसरात मात्र महारांना प्रवेशबंदी आहे. या बाबी काय सुचवतात याचाही विचार करावा.

    ReplyDelete
    Replies
    1. दयानंद सरस्वती म्हणजे "माझीच लाल" म्हणणाऱ्या माकडाची गोष्ट आहे, यात काहीही संशय नाही.

      Delete
  9. उसाचा मुद्दा इथे येणाचा संदर्भ काय? साखर कारखाने आणि उसामुळे थोडीबहुत ग्रामीण भागाची प्रगती झाली आहे ती ज्या लोकांनी अगोदरच शेती आणि वाडे विकून शहरात आसरा घेतला आहे आणि आता शेहारातून अमेरिकेत आसरा घेत आहेत त्यांना पाहवत नाहि. त्यामुळे सहकारातील काही वाईट प्रवृत्तींचा फायदा घेत उसाच्या पाण्याच्या वापराच्या अडून , साखर सम्राट अशी विशेषणे वापरून सहकार चळवळ बदनाम करण्याचे प्रयत्न हे काय नवीन नाहित. ह्या मागे खूप कुटील कारस्थान आहे.

    ReplyDelete
  10. बाप्पा - आप्पा , थांबा , एक काम करू या -

    आप्पा - काय ?

    बाप्पा - या संजयला पकडून त्याची मुलाखत घेऊया - किंवा त्या आजी म्हणतात तसे त्याच्यावरून ओवाळून टाकू या -

    आप्पा - इतके का एकदम निकराच्या निर्णयावर आलात हो बाप्पा - ?आपल्याला ते ओवाळून टाकणे पटत नाही बुद्धीला - स्पष्ट सांगतो !

    बाप्पा - अहो तेच दळण तो दळतो आहे ! पाच वर्ष झाली आता - आणि त्याची अडचण काय आहे समाजा बद्दल - मी त्याच्या बाजूलाच जाणार आहे त्या वेळेस त्याला सांगतो की बाबारे आमच्या इथे कुणाचच काही म्हणण नाही रे - ज्यांना बकरी कापायची आहेत त्यांना ते करू दे - ज्यांना वेद शो केस मध्ये ठेवायचे आहेत त्यांना तसे करू दे -ज्यांना वेद जन्मभर म्हणत बसायचे आहेत त्यांना म्हणत बसू दे ना - आपल काय बिघडत त्यामुळे ?

    आप्पा - जर का वेद म्हणायची सक्ती केली - फक्त ब्राह्मणांवर - तरी त्यांचाच किती आरडा ओरडा होईल - अहो त्यांची मुले त्या वेदांपासून मैलभर लांब पळत असतात -इथे आहे कुणाला वेळ त्या दोन चार हजार वर्ष पूर्वीच्या गोष्टी ऐकायला ? तुम्हाला आहे का वेळ ?


    बाप्पा - आमच्या गांवचे ते भिकम्भट - अहो त्यांचा मुलगा तर ए. आर. रेहमान कडे ड्रम वाजवतो - आणि किती सुंदर - स्वतः रेहमानने त्याच्या वाढ दिवसाला केक कापला -आणि आपल्या म्हाळगी बाई - त्यांचा मुलगा हॉटेल म्यानेजमेंट चा कोर्स करून ताज ला मोठ्या पोस्ट वर आहे -व्हेज नोन व्हेज सगळ टेस्ट कराव लागतं - सगळे पदार्थ येतात त्याला - आणि ती गोखल्यांची सूनु - अहो ती सुनिताहो - तिने निकाळज्यांच्या सिद्धार्थशी लग्न केलय - तो फोरेन सर्विस मध्ये आहे आपल्या देशाच्या - आणि ती एअर लाईन मध्ये आहे - आता मला सांगा - हा युवा वर्ग काय करतोय आणि आपण ही असली खुळचट चर्चा का करतोय ?


    आप्पा - अहो कोणतीही जात असो - त्यांना प्रगती हवी आहे - ते शिकले आहेत त्यांना कोणी कधी काय आणि किती चुका केल्या हे पंचनामे करायला वेळच नाही - त्यांना एकमेकाना भेटायला नीट पुरेसा वेळ नाही -

    बाप्पा - आज समाज काय वेगाने प्रगती करतो आहे ते संजयला समजतच नाही असे दिसते आहे - त्याची एकच रेकोर्ड - वेद आणि शैव धर्म - वेद आणि वैदिक धर्म हा हिंदू धर्मा पेक्षा वेगळा आहे - असू दे असला तर -संजयला एक सांगू या का - समज वैदिक धर्म हा हिंदू धर्मा पेक्षा वेगळा आहे तर एकदा लिस्ट कऋण टाका - चला - एकेक सांगत जा बाबारे - म्हणजे आम्हाला आम्ही कुठल्या धर्मातले ते तरी कळेल - जमेल का रे तुला संजय ?-

    आता अस कर दोन धर्म आहेत असे धर आणि सांगत जा - सोप्प आहे ना रे ?

    आणि अरे संजय - एक काम कर ही लिस्ट तू स्वतः प्रत्येक देवळावर किंवा सकाळ-लोकसत्ता अशी देऊन टाक आणि सर्व जनतेला आवाहन कर की - लोकहो तुम्हाला आता आवाहन करतो की मला माझा खरा धर्म " सापडला" आहे - तुम्हालापण सापडावा म्हणून ही घ्या लिस्ट - आणि आजपासून ठरवून टाका - आपला हिंदू धर्म टिकवायचा असेल तर असे वागा -

    महिन्याप्रमाणे - चैत्र पाडवा -हिंदू का वैदिक ?

    राम नवमी -हनुमान जयंती -आद्य शंकराचार्य जयंती ,गुरुपौर्णिमा ,नागपंचमी ,गणेश चतुर्थी - हरतालका ,घट स्थापना -दसरा , दीपावली , दत्त जयंती - अनेक स्वामी आणि महाराज यांच्या पुण्य तिथ्या आणि जयंत्या ,महाएकादशी - आषाढी कार्तिकी -( या नक्कीच वैष्णव म्हणजे हिंदू नव्हेत ) नंतर -महाशिवरात्र अगदी छोटी यादी आहे - मनात आणल तर संजय महाराजाना एका मिनिटात निकाल देता येईल आणि भारतातील तमाम लोकांवर प्रचंड उपकार होतील धर्म वाचवल्याचे - नाही का हो संजय गुरुजी ?


    आप्पा - तुम्ही उगीचच चिमटे काढताय बर का आमच्या संजय महाराजाना -


    आज मुलाना घेऊन आई वडील रविवारीच फक्त बाहेर जाऊ शकतात - इतर दिवस सर्व आपापल्या वाटानी धावत असतात - सगळे नीट आखीव रेखीव चाललेले असते - त्यांना अभ्यास आहे - काम आहे - स्वप्ने आहेत - तेच जुने प्रश्न आता त्यांच्या मध्ये अडचण बनून येत नाहीत - आज ऑफिस मध्ये कोणतीही जात असो - सर्व एकत्र डबा खातात - पिकनिकला सगळे भरपूर मजा करतात - व्हेज नोंव्हेज खातात - सगळा समाज एक होतो आहे - आधुनिक शिक्षण - गरजा आणि आधुनिक विचार प्रवाह यातून हा नवा तरुण वर्ग जातो आहे



    बाप्पा - आज अनेक जण आंतर प्रांतीय लग्ने करत आहेत - सरमिसळ वाढत चालली आहे -

    आपले कुटुंब आणि आपली स्वप्ने यातून हे वेद आणि असले विचार ऐकणे पूर्ण कालबाह्य झाले आहे -आणि ते स्वाभाविक आहे .








    ReplyDelete
  11. आप्पा - पेट्रोल पंपावरचा मुलगा ,अप अन्ड अबोव्ह च्या पार्किंग मधला मुलगा -

    बस कंडक्टर ,सिनेमा थिएटर मधला तिकीट देणारा ,स्कूटर सर्व्हिसिंग करणारा ,शेतात काम करणारा ,विहिरीच्या पंप दुरुस्त्या करणारा , चप्पल दुरुस्ती , सुतार , दुकानात पुड्या बांधणारा ,ऑफिसात डबे पोचवणारा ,रिक्षावाला , प्लंबर , गवंडी ,मांडव घालणारा - पंक्चर काढणारा - आकाश कंदील करणारा , दुधवाला , फुलाचा पुडा टाकणारा , पेपरवाला आणि असेच असंख्य - यांना काय कौतुक असणार की वेद आपल्याला म्हणायला मिळणार का नाही ?अहो ब्राह्मणांनाच त्यात इंटरेस्ट नाही तर यांना कसा असणार - कुणालाही फिकीर नाही की आपण करतो आहोत ते काम वेदांनी शिफारस केल्या प्रमाणे आहे का नाही - त्यांना कौतुक फक्त गावाच्या जत्रेच असणार - ! मी कधी " आपल्या " माणसांना भेटेन विचारपूस करेन असे त्यांना झालेले असते - - ती त्यांची खरी संस्कृती !तिथे देवाच्या नावाने मतान शिजत असतं .

    घोंगडी आणि कांबळी पसरून नाती जुळत असतात , मने मोकळी होत असतात -हिशोब मांडले जात असतात ,सोयरिक ठरत असते -



    बाप्पा - विद्यार्थी वर्गाला तर वेदांचे सोयरसुतक अजिबातच नाही - त्यांची स्वप्ने वेगळी आहेत - त्यांना मागे ओढणे पाप आहे !- संजय जी आपण हे थांबवा आता - नव्या पिढीला काय हवे आहे ते बघा - संभाजी ब्रिगेड ,अनिता पाटील यांची काळजी करू नका - ते असेच नष्ट होणार आहेत - त्यांच्याच कर्माने -

    कारण त्यांच्या विचारांच्या मांडणीतच दोष आहे . संस्कारातच खोट आहे.

    द्वेषाने कधीही समाजातील समस्या सुटत नसतात ! असे इतिहास शिकवतो - पार हिटलर पासून ते गोडसे पर्यंत !



    आप्पा - लाख मोलाचे बोललात बाप्पा - !

    एक साधा विचार करून बघा - संजय जी - हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का ?

    सर्व शंकराचार्यांनी वेद पठण सर्व ज्ञाती बांधवाना खुले केले तर ? भाज़.प.तरी ही क्लुप्ती वापरेल का ?

    हिंदू धर्म आणि इतर हुकुमशाही धर्म यात हाच तर फरक आहे . उद्या चारी पीठाच्या शंकराचार्यांनी ठराव केला की आजपासून वेद चारी वर्णांसाठी मुक्त केले आहेत तर काय होईल - इकडची रेषा तिकडे होणार नाही -कोपऱ्या वरच्या देशी दारूच्या दुकानातून सगळेजण निघून पोथ्या घेऊन मंदिरात धावतील का ?- अजिबात नाही ना ?



    बाप्पा - या आनंदामुळे प्रत्येक दाणे आळी तील स्त्री येणाऱ्या जाणाऱ्याला राखी बांधेल का ?

    आणि प्रत्येक लॉटरी वाला प्रत्येक तिकिटावर बक्षीस देईल का ?- नाही ना -

    आप्पा - समाजाला काय हवे आहे हे जो जाणतो आणि त्यासाठी धडपडतो तोच खरा समाजसेवक - आणि आईच्या मायेने समाजाला त्यांच्या चुका समजावून सांगतो तो खरा समाज सुधारक -डॉ .बाबासाहेब आणि महात्मा फुले हे असे होते म्हणून ते थोर !

    त्या दोघांचे हृदय हे आईचेच होते ,ते हिंसक तर अजिबात नव्हते -

    बाप्पा - आपण मात्र विकृत - संजय सरच परवा म्हणत होते - आठवतं न ?

    आप्पा - आपण आपल वेद मन मोकळ करत राहायचं - कुणी काही म्हणा !







    ReplyDelete
  12. संजय सरकार ,

    आम्ही आपणाला विनंती करतो - जरा दमाने घ्या ,

    जुनी हाडे चघळत बसू नका


    आणि त्या अलख निरंजना चे पण अभिनंदन - छान लिहितात हल्ली सगळेजण !

    संजय सरानापण विचार करावा लागेल

    इतके यांचे लेखन विचारपूर्ण असते -


    आणि तुमचे ते विनोदवीर आता गंभीर झाले आहेत - आप्पा आणि बाप्पा - ते कसे काय विकृत वाटले हो तुम्हाला संजयदादा ?असो -


    आप्पा आणि बाप्पा - शाब्बास - आपले किती अभिनंदन करावे ?

    तुमच्या खुसखुशीत आणि संयमित विचारांनी चर्चेत मजा आली ,

    आपण आमच्या संजय सराना चांगलेच चिमटे काढले आहेत - ते एका अर्थांनी बरे झाले - कुणीतरी आमच्या ऐवजी त्यांचे कान पिळायला हवेच होते -

    मी आपली अनेक दिवसापासून मजा बघतो आहे - आपणाला अनिता पाटील आणि राजा मैन्द यांचा राग येतो ते अगदी बरोबर आहे - आमचेच दुखः तुम्ही आज सर्वांसमोर मांडले आहे -

    आजच्या तरुणाईची स्वप्ने आपण छान सांगितली आहेत . आणि एक सांगू का ,

    हा दुष्काळ संपला की

    परत संजय साहेबा - गणिताने सिद्ध करून दे रे बाबा की उसाची शेती आपल्या मराठी मातीला कशी घातक आहे ते - आमचे मन फार दुखावते हो ! आम्ही रक्त आटवून स्वराज्य उभारलं ते काय असं वाळवंट होण्यासाठी का ?- या माझ्या भुमिपुत्राना सांगा रे कुणीतरी समजावून - हा उस तुम्हाला देशोधडीला लावेल - विचार करा

    आणि मला कशाला सहकार चळवळीच कौतुक सांगताय ?

    किती लबाड्या आणि लफडी लपवणार आहात रे - सहकार संघाची वाट लागली - सगळ सगळ्याना माहित आहे -

    मासाहेब तर किती व्याकूळ होतात - पण कुणापाशी मन मोकळ करणार ?

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...