Saturday, April 20, 2013

भ्रष्ट मानसिकतेच्या लोकांनी

मानवी भावविश्व आणि बुद्धीनिष्ठ विचारांचे विश्व या दोनही स्वतंत्र बाबी आहेत. एकाच माणसात नेहमीच या दोन्ही बाबी संयुक्त निवास करत असतात. करु शकणे हेच त्यांचा सह-अस्तित्वाचे कारण आहे. 

कविवर्य श्रीधर तिळवे यांनी माझ्या एका कवितेवरील प्रतिक्रियेत लिहिले होते कि तर्काधिष्ठता आणि रुमानीपणा, ज्या विरोधी बाबी आहेत त्या तुमच्या लेखनात कशा येतात? उत्तर असे आहे कि माणसाने आईवर प्रेम करणे हा भावविश्वाचा भाग आहे तर आईचे तर्कबद्ध विश्लेशन करणे हा बुद्धीवादाचा भाग आहे. मला असे वाटते कि फुले आणि बाबासाहेबांना हे चांगलेच माहित होते.

मी तर्कभावनेने राम आणि कृष्ण यांची विविधांगाने चरित्रमिमांसा करू शकतो. केलेली आहे आणि करत राहील. ती बरोबरच असेल असा दावा नाही. परंतू केवळ हिंदुच नव्हेत तर वैदिक ते जैन, बौद्ध, मुस्लिम आणि अगदी ख्रिस्त्यांनाही ज्यांच्या जनमानसातील स्थानाचा प्राचीन काळापासून आधार घ्यावाच लागला ते भावविश्व हे असेच टाकुन देण्यासारखे नसते. 

जात्यावरील आयाबहिणींच्या ओव्यांपासून ते कथित अभिजनांनाही मोह घालते ते व्यक्तित्व ही समाजमानसाची उपज आहे असे मी मानतो. ती चूक कि बरोबर याची चाचपणी केलीच पाहिजे. 

परंतू ती तशी करतांना ही अशी व्यक्तिमत्वे फक्त भारतात नव्हे तर जवळपास अर्धे जग कशी मानस व्यापून बसली यावरही विचार व्हायला हवा. 

यात भ्रष्ट मानसिकतेच्या लोकांनी फायदे-उकळावू धोरण कसे राबवले याचाही विचार व्हायला हवा. राम-कृष्ण नाकारायचे हे समजा घटकाभर ठीक आहे...मग चिकित्सेचीही गरज रहात नाही...पण मुळात स्वीकारच कसा झाला याचाही तेवढ्याच चिंतनियतेने विचार व्हायला हवा. माझ्या भावविश्वात काही मिथकतेला स्थान आहे. तर्काधिष्टित ते तपासायचे निर्दय कार्यही मी करतो..केलेच पाहिजे...पण रुपकात्मकता...त्याचे काय करायचे?

उदा. कृष्ण म्हटले कि बासरी आली...राम म्हटला कि धनुष्य आले...क्रुष्णाने गीता सांगितली कि नाही, तो पराक्रमी होता कि भेकड या व्यर्थ गोष्टी भावविश्वासाठी होतात. रामाने कआय न्याय केले आणि काय अन्याय केले या मित्थकथांत जात विश्लेशन करतांना रामाचे भावविश्वातील स्थान कसे नाकारणार? 

जे भगवान बुद्धाला जमले नाही, जैनांना जमले नाही...ते का जमले नाही यावरही चिंतन करत विश्लेशन करायलाच लागनार आहे. 

मी इंग्रजीतील पहिली नर्सरी -हाइम लिहून संगीतबद्ध करुन रेकोर्ड केली तीच मुळात...I pray to you...I bow before you, O Lord Rama या शब्दांनी सुरू होते. आणि मी कथित अर्थाने रामभक्त नाही. 

पण काही बाबी सांस्कृतीक परिप्रेक्षात समाजमनाची आणि म्हणुन व्यक्तिमनाची एक अपरिहार्य भाग बनून जाते. रामाच्या जागी बौद्ध आणा ही नव्या कालाची एक मानसिक गरज असेल तर तसेही होईल. शेवटी प्रागितिहासातील कोनाला मोठे म्हनायचे आणि कोणाला नाही...

हे शेवटी समाज-मानस-शास्त्र ठरवते. 
हे नाकारता कसे येईल?

Pls visit following links:

http://ssonawani.blogspot.in/2013/04/lord-krishna-was-he-real.html

http://ssonawani.blogspot.in/2013/04/ramayana-story-behind-story.html

2 comments:

  1. आप्पा - अहो बाप्पा , कुठे होता इतके दिवस , वाटलं मुक्काम हलवला का काय ?

    बाप्पा - म्हणजे , तुम कहना क्या चाहते हो ?

    आप्पा - म्हणजे स्वारी निघाली का वैकुंठाला असे वाटले , उगीच खोट का बोला !

    बाप्पा - नाही हो या उन्हामुळे कुठे बाहेर पडू नयेसे वाटते , नुसता वणवा पेटलाय !

    अहो सांगायचं राहूनच जाइल - संजय चे नवीन वाचलं का -ब्युटीफ़ुलच एकदम !

    अगदी - म्हणजे अगदी ठरवून सुद्धा त्याच्या ब्लोगवर न लिहिण्याचा नियम मोडावासा वाटेल इतका अप्रतीम लेख आहे - हा विषयच मुळात आपला प्यारा !

    आप्पा - अहो मीपण वाचलाय म्हटलं - खरच सर्वार्थाने सुंदर - पण लोक प्रतिसाद देत नाहीत - भरभरून -फार वाईट वाटते बघा - किती सुंदर मांडणी केली आहे - आईचे प्रेम देवाचा ओढा , किती सुंदर विषय आहेत -

    बाप्पा - आईचे प्रेम हे तर आपण या जगात येण्यापूर्वी पासून आपल्याला आईकडून मिळत असते

    आप्पा - ती उब , तो आपलेपणाचा स्पर्श , आणि ती सुरक्षितता आपल्याला आईच्या पोटात मिळते - त्याला नेमके नाव काय द्यायचं ?निसर्गाची किमया ?

    बाप्पा - ती अगदी पहिली निसर्ग निर्मित भावना आहे का ? संभोगा इतकीच परिपक्व ?आप्पा - संभोग सुख आणि त्यातून काही महिन्या नंतर निपजणारे वात्सल्य ह्या भावना किती समजायला , अवघड आहेत नाही का ?अगदी ओरिजनल - अस्सल !

    आप्पा - या जगात ढकलल्या गेलेल्या चिमुकल्या जिवाला ओढ कशाची असते - तर त्या जन्मदात्या आईची - ती पुढे कितीतरी वर्ष त्याची पाठ राखण करत असते -

    बाप्पा - आणि ज्यांना हे छत्रच लाभत नाही त्यांना - ? त्यांना हे विश्वच आई बनून त्यातून ईश्वराची हाक ऐकू येते -


    आप्पा - आपला विवेक कुठे सुरु होतो आणि भक्ती कुठे थांबते ती पण अनुभवायचीच गोष्ट आहे नाही का ?

    बाप्पा - म्हणजे मेंदू दुसऱ्या मेंदूला जन्माला घालायच्या गडबडीत असतो का प्रेम प्रेमाला नव्या बीजात बघू इच्छित असते तेच कळात नाही !


    आप्पा - आणि बाप्पा रे - आता चांगली ब्रह्मानंदी टाळी लागल्ये तर सांग ना बाप्पा की आपल्याला देवाचा कितीही राग आला तरी आपण परत परत त्याच्याच कडे का ओढले जातो ?


    बाप्पा - सांगू का , ऐकवेल का तुला , आईच्या पोटात असल्यापासून आपण आरत्या ऐकत असतो , त्याचा तो परिणाम आहे ,देव हि भावना आणि त्याच्या बाजूनी लगेच इतर भावनांची गुंफण होत जाते ,बहिणीला भाऊ दिसती , मुलाला आई दिसते , पुरुषाला सखी भेटते ,

    संत मीराबाई असो किंवा ज्ञानेश्वर , सगळ्यांना तो सगळीकडे त्यांना हव्या असलेल्या रुपात दिसू लागतो -देव भावाचा भुकेला असं नसत आपण भावाचे भुकेले असतो !

    आप्पा - पण बाप्पा , मला एक सांगा , यातले नाट्य बाजूला ठेवले तर काय उरते ?कोरडी चिकित्सा ,आणि बुद्धी खरे खोटे ठरवणार म्हणजे तरी काय करणार ?त्या प्रक्रियेचीच चिकित्सा करूया का ?- काय विश्लेषण करता येईल बौद्धिक पातळीवर - देव नावाचे असे काहीच अस्तित्वात नाही - असेच ना ?पण पुढे काय ?

    बाप्पा - पुढे काय म्हणजे ?अहो जिथे सुरुवातच नाही तिथे शेवट कसा ?

    आप्पा - अं ह - सुरुवात नाही असे कसे - तुमच्या बिग ब्यांग आधी बिग कोलाप्स मानतातच ना ?पण खरी अडचण तीच आहे - शेवट मानला की सुरुवात पण मानावी लागते ,म्हणजेच काळ मर्यादित झाला !हे कुणाला मान्य आहे न कुणाला नाही !

    बाप्पा - अमर्यादित विश्व आणि मर्यादित विश्व - असेच म्हणायचे आहे न ?

    आप्पा - आपला आदिनाथ उत्पत्ती स्थिती आणि अंत याला जबाबदार आहे -

    बाप्पा - अहो स्वर्ग नरक या कल्पना आहेत असे आपण म्हणू शकतो पण या उत्पत्ती आणि अंताचे काय ?

    आप्पा - आणि स्थिती चे पण काय ?- उत्पत्ती स्थिती आणि लय असा हा खेळ मांडला कुणी हा प्रश्न माणसाला चकित करतो हे मात्र निर्विवाद -

    बाप्पा - पण यात एकदा का पाप पुण्य आले की वाट लागते - मग तुंदिल तनु चपळ चरण असे देवाचे एजंट घुसलेच आपापली पळी पंचपात्री घेवून !

    आप्पा - पुर्वीपण चिंतन करणारा तपस्वी लोकां चा वर्ग असेच विचार करत असेल .

    बाप्पा - खाण्याची भ्रांत कुणालाच नसली की विचार करायला मर्यादाच नसते - त्यातून कल्पनेचे वारू एकदा उधळले की मग दिवसरात्र चर्चा आणि खल !

    आप्पा - यातून समाजाला उपयोगी असे काही निघेलच असे पण नाही !मग अशा नुसत्याच विचार करणाऱ्या आणि खरे श्रमिक लोक असा तिढा निर्माण झाला असेल असे पण वाटते . बाप्पा - मग त्यात वर्ग आलेच ! श्रमिक आणि चिंतन करणारे -इथूनच वर्ण झाले असतील . आप्पा - पण श्रम करणाऱ्या लोकांनी चिंतन करायचेच नाही असे थोडेच आहे ?

    बाप्पा - तीच तर संघर्षाची पहिली ठिणगी होती . ती पेटली नाही हे दुर्दैव -पूर्वीच्या काळात राज्य व्यवस्था उभरून येत होती त्याकाळात राजा आणि प्रजा यात या चिंतन करणाऱ्या वर्गाला एजंटचे काम कारावे लागले आणि अंधार दाटून येत गेला ! आज पर्यंत तो तसाच आहे -

    ReplyDelete
  2. DEAR SIR
    1)MALA WATATE KI M.D.RAMTECHE YANCHYA BLOG WARIL RAM –KRUSHNA
    YA HINDU DAIWATAN WARI DWESH MULAK LIKHANALA UTTAR MHANUN APAN
    HA LEKH LIHILA AHE.
    2)HINDU STRIYANA HARANE FAR AWDTAT,TYANICH SALMAN KHAN LA HARNE
    MARAYALA BHAG PADLE.ASHA PRAKARCHI ANEK MURKHA WIDHANE YA
    LEKHATUN AHET.
    3)SATARYA MADHIL LAXMAN LILA YA BAUDDH DHARMACHYA PRABHAWAMULE
    ZALYA KA ASE APAN RAMTECHE SAHEBANA WICHARU SHAKTO PUN APAN
    ADHIK SAMANJAS AHOT.
    4)SANJAY SIR ,YA WIRODHAT TUMHI NEHMICHI NIRBHAY BHUMIKA NA GHETA
    KEWAL ,MOGHUM LIHUN KA THAMBLAT?
    5)AJ AMBEDKAR ASATE TAR TYANA WATLE ASTE KI WIRODHAK PARWADLE
    PUN RAMECHE YANJ –SARKHE SAMARTHAK NAKOT.
    (EK OBC TARUN)

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...