Sunday, August 25, 2013

साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद हा सन्मान नव्हे...जबाबदारी!- संजय सोनवणी



सासवड: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा उत्सव नसून साहित्य-संस्कृतीविषयक मुलगामी चिंतन व मंथन घडवून आणनारे शिबीर असून या संमेलनाचे अध्यक्षपद हा केवळ सन्मान नाही तर साहित्य संस्कृतीला दिशा देत मार्गदर्शक कार्यकर्त्याप्रमाणे राबण्यासाठी मराठी भाषकांनी सोपवलेले जबाबदारीचे पद आहे असे प्रतिपादन सासवड येथील नियोजित ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीतील उमेदवार प्रसिद्ध साहित्यिक, कवि व संशोधक संजय सोनवणी यांनी केले. क-हा नदीपूजन आणि आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर प्रचाराची सुरुवात करतांना त्यांनी आचार्य अत्रे विकास प्रतिष्ठानच्या सभागृहात पत्रकारांशी संवाद साधला. संत सोपानदेवांच्या समाधीचेही त्यांनी दर्शन घेतले. या प्रसंगी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री. अरूण जगताप, शिवसेनेचे सासवड शहर प्रमुख श्री अभिजित जगताप आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सासवड शाखेचे पदाधिकारी श्री. प्रदीप जगताप व अन्य उपस्थित होते.

"साहित्य संमेलन हे एकुणातीलच साहित्य-संस्कृतीला नव-उर्जा देणारे, प्रेरक आणि दिशादर्शक असायला हवे. आपण काय कमावले व काय गमावले यावर सखोल चिंतन संमेलनाच्या माध्यमातून अभिप्रेत आहे. तरुणांना या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर सामावून घ्यावे लागणार आहे." असेही सोनवणी म्हणाले.

सोनवणी पुढे म्हणाले कि "जागतिकीकरणाच्या लाटेनंतर परंपरागत संस्कृती आणि जागतीक संस्कृतीचे प्रवेशत असणारे वेगवान प्रवाह यांतील आंतरसंघर्षामुळे आपण सारेच एकार्थाने सांस्कृतीक पडझडीच्या कालखंडात येऊन ठेपलो आहोत. आजचा तरुण वर्ग मालिकांच्या वा जाहिरातींच्या कचकड्याच्या जीवनदर्शनाला संस्कृती समजू लागल्याने व त्याच वेळीस कठोर वास्तव अनुभवास येत असल्याने अस्वस्थ आहे. त्याला सांस्कृतिक व भावनिक आधार देवू शकेल असे साहित्य क्वचितच दिसते. दुसरीकडॆ सर्व समाजांमद्धे आज शिक्षणामुळे अभिव्यक्तीचीही आस बळावत आहे...पण तिला दिशा देवू शकेल आणि त्या अभिव्यक्तीला वैश्विक साहित्याचे रूप देवू शकेल असे सकारात्मक सांस्कृतीक व सामाजिक वातावरण आपल्यात आज तरी नाही. आपल्याला संस्कृतीचीच एकुणातच फेरमांडणी करावी लागनार आहे.

"मी क-हा पूजन करीत आहे याचे कारण सर्वच जागतिक संस्कृत्या नदीकाठीच बहरल्या. नद्यांचे मानवावर अनंत उपकार आहेत. पण आज जवळपास सर्वच नद्या मानवी अतिक्रमणामुळे प्रदुषित झाल्या आहेत. त्याहीपेक्षा मोठा गंभीर धोका म्हनजे प्रदुषित झालेली आपली संस्कृती. ती कशी स्वच्छ करायची याचे आव्हान आपल्यासमोर आहे. डा. दाभोळकरांची हत्या असो कि महिला छायाचित्रकारावरील अलीकडचाच बलात्कार, आपण किती टोकाचे प्रदुषित झालो आहोत एक चिन्ह आहे व तो आपणा सर्वांना एक धोक्याचा इशारा आहे. तो समजावून घेतला नाही व त्यावर मात करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले नाहीत तर आम्हाला साहित्य-संस्कृतीबद्दल बोलायचा अधिकार नाही.

"महात्मा फुलेंच्या स्वप्नातील एकमय समाज साकारणे हे आजही आमच्यापुढे आव्हान आहे. साहित्य हे कार्य समर्थपणे करू शकते पण त्यासाठी सर्व साहित्य प्रवाहांना एका ध्येयाच्या दिशेने नेणे व नवविचारांना प्रोत्साहन देणे ही कार्ये आम्हा सर्वांनाच करावी लागतील."

या प्रसंगी संजय सोनवणी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी जनांदोलन उभे करण्याची आवश्यकता प्रतिपादन करत शासकीय मराठी सोपी केली नाही तर ती लोकप्रिय राजभाषाही बनू शकणार नाही असेही मत प्रतिपादित केले. श्री. अरुण जगताप यांनी सोनवणींच्या परखड भुमिकेचे स्वागत केले. येते संमेलन त्यांच्या विचारांवर नक्कीच लक्ष देईल असेही ते म्हणाले. 

23 comments:

  1. आप्पा -संजय सर नमस्कार

    बाप्पा - आपल्यासारखे शुद्ध चारित्र्याची माणसे जर अध्यक्ष झाले तर ती एक महान घटना घडेल

    आप्पा- सासवड च्या संमेलनात एक फार नवीन वळण आपल्या मराठी चळवळीला अशी खात्री आहे - आपण लिहिलेली सर्व पुस्तके याची साक्ष आहेत

    बाप्पा - आपला नडी तीराचा फोटो फारच छान आहे

    आप्पा - आपण नवीन योजना मांडा

    बाप्पा - अजून कुणीच काही प्रतिक्रीया दिली नाही

    आप्पा पण आम्ही आहोत ना - म्हातारे असलो तरी आपले हित चिंतक आहोत - रिकाम टेकाडे आहोत म्हणून आमच्या कडे ;अक्ष देऊ नका असे म्हणतात बरेच लोक

    बाप्पा - पण आपण म फुले यांचे कार्य पुढे न्याल हि खात्री आहे

    आप्पा - आपण राजर्षी शाहू महाराज आणि डॉ आंबेडकर यांचे कार्य पुढे न्याल

    बाप्पा - आपण डॉ दाभोलकर यांचे कार्य पुढे न्याल

    आप्पा - आपण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून द्याल

    बाप्पा - आपण नुसते कऱ्हेचेच नव्हे तर कृष्ण गोदावरी पवना , आणि वारकरी लोकांची इंद्रायणी आणि पंढरपूरची चंद्रभागा

    आप्पा - नर्मदा तापी गंगा यमुना कावेरी - जिथे जिथे मराठी माणूस आहे त्या सर्व नद्या पवित्र कराल अशी खात्री आहे

    बाप्पा - आपण रायगड राजगड शिवनेरी अशी सर्व स्थाने नव्या जोमाने परत पूर्वीच्या वैभवात नांदावाल आणि सर्व समाधी स्थळे पूर्ववत कराल - त्यांचा जीर्णोद्धार कराल

    आप्पा - आपण मराठीच्या सर्व बोली भाषांची सांगड घालून एक नवा मराठी विश्वकोश तयार कराल आणि आपला झपाटा पहिला तर आपण हे कार्य ३ - ४ महिन्यात कराल

    बाप्पा - उरलेले महिने आपण आपल्या मित्र परिवारा बरोबर प्रगल्भ लेखन आणि भाषणे आणि वैचारिक जागरण करण्यासाठी वापराल असा विश्वास आहे

    आप्पा - आमचे वय झाले तरी आम्ही आपल्या साथीला जितकी पावले टाकता येतील तितके येणार कारण आज महाराष्ट्राला आपली गरज आहे

    बाप्पा - आपण जे प्रबोधन कराल त्यामुळे महाराष्ट्र भारतातील एक सर्वश्रेष्ठ आणि आदर्श प्रांत बनून राहील आणि विविध प्रांतातले विविध लोक आपल्या यशाचे रहस्य जाणून घ्यायला आपल्याकडे येतील - आपण सकळ जन शहाणे करून सोडू शकता हा आत्म विश्वास आहे

    आप्पा - जय शिवाजी जय महाराष्ट्र

    ReplyDelete
    Replies
    1. मित्रा, डोके शांत ठेवून COMMENT POST करत जा!
      बघ ना!
      चुकून केवलभाई रमणभाई चा GOOGLE ACCOUNT OPEN राहिला आणि आप्पा बाप्पा वर COMMENT POST झाली!
      झाला कि नाही घोटाळा?

      उगी-उगी, होतं कधी कधी असं, जेव्हा खोटे ACCOUNT CREAT केले जातात तेव्हा!

      अविनाश.

      Delete
    2. "डोके शांत ठेवून"...
      मुळात अस्तित्वातच नसलेल्या गोष्टीचा वापर कसा करणार तो?

      Delete
    3. अविनाश सर ,

      आणि अनानिमस सर


      ( ते सर्व नियोजित होते - मुद्दाम केलेले असे समजा -)



      आपण काय लिहिले आहे त्यापेक्षा कुणी लिहिले आहे ते बघणे सोडून देवूया का -

      कुणी सत्यदेव म्हणतात तर कुणी सत्य नारायण !

      शेक्सपियर देखील म्हणतो - नावात काय आहे

      मतितार्थ तर ? - चांगला आहे ना ?

      आपल्या संजय सराना काही शिवीगाळ तर नाही केली ना - मग तो आप्पा बाप्पा असो नाहीतर केवल् भाई रमणभाई असो - ( काय बिशाद आहे संजय सराना कुणी वाईट म्हणण्याची )

      म्हातार्रे असतील म्हणून सोडून देऊ या - त्या बरोबर आपण पण म्हातारे कशाला व्हायचं ?


      अविनाश सर ,

      तुम्हीतर किती महान आहात , तुमच्या कडून अजून थोर अपेक्षा आहेत

      आपल्याला बरेच भरीव कार्य करायचे आहे -

      आपला समाज पुढे नेणारे हात जर असे पोरकट वाद लिहिण्यात अडकले तर या देशाचे कसे होणार ?वेळ फार थोडा आहे आणि कार्य अथांग आहे

      सर्वानी एकजूट ठेवत आधी संजय सराना निवडून आणू या

      संजय सरांचा विजय असो

      Delete
    4. वा रे वा! "आपला तो बाबू आणि दुसऱ्याचे ते कार्टे"
      "( ते सर्व नियोजित होते - मुद्दाम केलेले असे समजा -)" म्हणजे आम्ही फक्त कल्पना करीत समजतच राहायचे काय?
      खोटारडेपणा बंद करा! बस!
      नावात काय आहे? सर्व काही नावातच आहे, दोस्ता!
      एखादा विरोधी विचार मुसलमानी नावाने टाकून बघ, लोक कसे तुटून पडतात ते!
      "आपल्याला बरेच भरीव कार्य करायचे आहे -" होय करायचे आहेच, पण खोटेपणा करून नव्हे!

      संजय सरांचा विजय असो!

      अविनाश.

      Delete
    5. लबाड गाढव

      एका माणसाजवळ एक गाढव होते. तो माणूस वाणी होता. तो परगावी सामान विकत घेई आणि गाढवावर लादून आपल्या घरी आणी. एकदा तो वाणी गाढवावर मिठाची गोणी लादून घरी आणीत होता. वाटेत एक लहानशी नदी होती. नदीतून जाताना गाढवाचा पाय घसरला आणि ते नदीत पडले, तोच नदीचे पाणी मिठाच्या गोणीत शिरले व बरेच मीठ विरघळून गेले. फार मीठ विरघळले होते; त्यामुळे गाढवाचे ओझे अगदी हलके झाले. पुढे काही दिवसांनी वाणी मिठाची दुसरी खेप घेऊन आला. नदीजवळ येताच गाढवाला मागील खेपेची आठवण झाली. लागलीच ते जाणूनबुजून पाय चुकवून नदीत पडले. पुन्हा मीठ विरघळून ओझे हलके झाले. आणखी दोन-चार वेळा गाढवाने तसेच केले. शेवटी गाढवाची ही लबाडी मालकाला कळून चुकली. पुढच्या खेपेस गाढवावर खूपसा कापूस लादून तो घरी येऊ लागला. पुन्हा नदीजवळ येताच गाढव खाली पडले. पण या वेळेस कापूस विरघळून भार कमी झाला नाही, उलट पाणी कापसात शिरून ओझे जड बरीक झाले. मोठे ओझे पाठीवर पडून ते लबाड गाढव भाराखाली चेंगरून गेले.

      तात्पर्य : याकरिता आपले काम नेहमी इमानाने करावे. लबाडी केली तर ती कधीतरी उघडकीस येते व आपणास फार मोठी शिक्षा घडते.

      Delete
    6. Arre yaar kya tum bhi Avinaash bakvaas aadami nikalaa

      God knows - what is your dream about ideal india

      Are you socialist ?

      What is your qualification ?

      How much is your daily income ?

      How much worth are you ?

      In school days one of the last benchers used to call students like you -

      " Fate Nirodh Ke Bachche"

      that is to say - your Janam-Data even wanted to avoid your entry on this earth

      So it is such a pitty - Ham tuz jaise logonko neglect karate hai !

      You are not a donkey - donkey is useful and harmless ,

      but you are not upto that level

      Sorry ,

      But no harm fpr you and from you

      Understand the Logic of Life and Purpose of your existence !

      Poor kid !

      Delete
    7. @Gorakh Goraksh,

      You are real arrogance, vanity, conceit dondey (ass). Do not teach your disgusting teaching to others, your feelings are peak of madness. You are a great example of ideological pauper of the world!

      SUDHAKAR, ATALI-KALYAN.

      Delete
    8. it is a pleasure to hear suach a remark from you miss sudhakar ,atali kalyaan
      Gorakh Goraksh

      Delete
    9. संजय सर -

      अविनाश सर ,

      सुधाकर भाऊ

      आणि

      गोरख भाऊ -

      फोटोत जलपूजन करणाऱ्या संजय सरांच्या ब्लोग वर हे इतके आचकट विचकट लिहिलेले पाहून त्या नदीत जीव द्यावासा अवाटेल !- इतकी घाणेरडी भाषा - ओंगळ अर्थ - मूळ विषयाचा काहीही अर्थाअर्थी संबंध नाही अशी केलेली दुरुत्तरे आणि त्याचा चर्चेत येणारा व्यतय - हे निरोगीपणाचे लक्षण नाही हे नक्की

      - ते दोघे गोरख अविनाश किंवा सुधाकर आणि इतर एकमेकाला ओळखत नाहीत म्हणूनच असे धाडस करतात - त्यांना खात्री असते की आपण खरे खुरे निनावी चेहरे आहोत म्हणूनच ते असे अभद्र लिहित सुटतात !- मग ते आंग्ल असो वा मराठी असो-

      पण हे टाळता येईल का ?

      असे लिहिणे ही कोणाची गरज चअसल्यास त्यांना हा विचारमंच का खुला ठेवायचा?

      माझी संजय सराना विनंती आहे की ,

      त्यांनी अशा विचाराना आणि अशा मांडणीला असे व्यासपीठ मिळवू देवू नये !


      ते जर असे करू शकले तर त्यांच्या विजयाच्या दृष्टीने त्यांनी टाकलेले हे एक भक्कम पाउल असेल !

      आपली मराठी ही आपली मायबोली आहे ना ?

      म्हणजे आपण एकप्रकारे आपल्या आईचाच अपमान करत असतो नाही का ?

      आपल्या संस्कारांची लक्तरेच सर्व जगासमोर टांगत आहोत - !

      सुधाकर आणि गोरख याना कळ कळी चे आवाहन ( आव्हान नव्हे ) आहे की त्यांनी हा मार्ग सोडावा आणि आपापले फोन एकमेकाला द्यावेत आणि यथेच्च विचारांची त्यांच्या खास गलिच्छ शैलीत देवाणघेवाण करत बसावे - अगदी जगाच्या अंता पर्यंत - दोघेही जर आडमुठे असतील तर त्यांनी खाजगीत एकमेकाला शिव्या देत बसावे - पण असे सत्शील वैचारिक व्यासपीठ डागाळू नये - ते एक पाप आहे !

      आपल्या सर्वाची हितैषी


      सुनीता सुधाकर ओक

      Delete
  2. Aplyala mazyakadun bharpur shubhechha. Amhalahi blogjagtatla, itihaskar,svachand manacha kavi, ani thet amchyashi susanvad sadhnara akhil bhartiya sahitya sammelnacha adhyksha labhlyas anand dvigunit hoilach.

    ReplyDelete
  3. आपल्याला माझ्याकडून भरपूर शुभेच्छा. आम्हालाही ब्लॉग जगतातला, इतिहासकार, स्वच्छंद मनाचा कवी, आणि थेट आमच्याशी सुसंवाद साधणारा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष लाभल्यास आनंद द्विगुणीत होईलच.

    सौजन्य: भालेश यादव

    ReplyDelete
  4. काय हो सोनवणी! "द्विजाची कैफियत" मांडलेली तुम्हाला चालते मग "शूद्राची तडफड" का बरे चालत नाही?
    "तुम्हीच खरे ब्राह्मण शत्रू आहात" या तुमच्याच नोव्हेंबर २०११ च्या लेखावरील या दोन प्रतिक्रिया आहेत.
    द्विजाने कैफियत मांडली तर चालते पण शूद्राने त्याच्या मनातील तडफड मांडली म्हणून लेखच उडवायचा?
    सत्य सहन करण्याची हिम्मत नसेल तर विचारवंताचा आव आणू नये.

    ReplyDelete
  5. आप्पा - लोकांच्या भावना दुखावल्या का हो आपण बाप्पा ?

    बाप्पा - नाही बा ! आपण तर चांगलेच लिहिले -

    आप्पा - मग ते केवल् भा ई नाव मधेच आले म्हणून इतका प्रक्षोभ झाला आहे ! कसे काय ? थोडेसे सांभाळून घ्या !संजय सरांचे कार्य आपणाला करायचे आहे !भांडणे कशाला ?

    आप्पा - अहो नावात काय आहे ?असो - काय म्हणताय - विशेष ?

    बाप्पा - अहो आपण सही करायला शेजाऱ्या चे पेन नाही का घेत - तसे समजा -आपणतर पेन दिल्याबद्दल आभार् पण मानतो - इथेतर खोटेपणा नशिबी येतोय असो सहन करायचे असे तर आपल्याला शिकवलेच आहे साने गुरुजींनी - नाही का ? अगदी डॉ दाभोलकर यांनी तरी काय सांगितले ?त्यांनी फक्त हिंदू नव्हे तर इतर धर्मातील अंधश्रद्धा पण उघड करून दाखवल्या - पद्धत वेगळी असेल पण ध्येय तर चांगलेच होते नां ?

    आप्पा - मदर तेरेसा यांना संतत्व देताना चमत्कार करून दाखवावा लागतो - हे डॉक्टर दाभोलकराना फारसे रुचले नव्हते -तसेच मुसलमान धर्माचे पण त्यांनी त्यांचेपण अंधश्रद्धेचे उणेपण दाखवून दिले -

    बाप्पा - कधी वेश पालटून - नावे बदलून चांगल्या कामासाठी त्रास सहन करावा लागतो - डॉक्टर दाभोळकर तर म्हणायचे की इतरांचे नंतर बघता येईल पण आपल्या घरापासून स्वच्छतेची सुरवात करुया !

    - आपण संजय सराना या निवडणुकीत निवडून आणले तर या सरांच्या कार्याला फार हातभार लावल्या सारखे होईल -या महान कार्यात आता सर्वजण सक्रिय होऊ या -

    आप्पा - आपापला खारीचा वाटा उचलुया !

    बाप्पा - आणि ही द्विजाची कैफियत काय प्रकार आहे - सापडत नाही - नोवेम्बर २०११ - शोधायला पाहिजे - अभ्यास केला पाहिजे - विषय अनंत आहेत - कंटाळा करता कामा नये

    आप्पा - संजय सरांचा विजय असो - आता कंबर कसून वाद न घालता कामाला लागुया !

    बाप्पा - चला चला - आता शुभस्य शीघ्रम !

    ReplyDelete
    Replies
    1. दुतोंडे!

      Delete
    2. अविनाश ,

      विकास ,

      सागर ,


      आप्पा दुतोंडे आणि बाप्पा भिंताडे यांचे अविनाशच्या सहकार्याने काम करण्याच्या

      निर्णयाचे आपण सगळे कौतुक करुया

      शंकर इंदुरकर

      Delete
  6. अविनाश साहेब ,

    आपण सर्वानी डॉ . दाभोलकर यांच्या स्मृतीना उजाळा देऊन त्यांचे उरलेले कार्य पूर्ण करुया !

    त्यासाठी सर्व विधायक शक्तींनी एकत्र येणे !

    काहीजण काही चुका करून पश्चातापा नंतर जर एकत्र येण्याचे मनात असतील तर त्यांचेही स्वागत मन उदात ठेवून केले पाहिजे असे वाटते

    आपण फार मोठे आहात अधिकाराने -

    आमच्या साराख्याने आपणास सांगणे हे योग्य नाही तरी लहान तोंडी मोठ्ठा घास घेऊन म्हणावेसे वाटते की हा सनातनी प्रवृत्तींच्या विरोधातला लढा आता अधिक निष्ठेने लढला पाहिजे

    त्यासाठी आप्पा बाप्पा असोत किंवा केवलभाई असोत जर आपल्या मार्ग दर्शनाखाली काम करणार असतील तर त्या सारखी आनंदाची गोष्ट नाही

    आत्ता आपल्या सारख्या लोकोत्तर सृजनांची आपल्याला आवश्यकता आहे

    अविनाश सर , आपण आम्हा सर्वाना मार्गदर्शन करा ! आम्हाला दिशाहीन झालेल्यांना खरी दिशा दाखवा

    आत्ताचा काळ हा योग्य मार्ग्दर्शनाचा अभाव असलेला काळ म्हणता येईल

    अविनाश सर , आपला प्रत्येक शब्द इतिहास रचणार आहे हे आम्हा सारख्या पामराना माहित आहे

    आपण सर्व भविष्याचा विचार करून या निर्नायकी देशाला दिव्यत्वाची वात दाखवावी आणि या देशाला हवे असलेले नेतृत्व द्यावे !

    जयहिंद जय तुळजामाता भवानी ! !

    आम्हा सर्व सैनिकाना आपण नवा मार्ग दाखवा !

    भारत माता की जय ! ! !

    ReplyDelete
  7. सर्व लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला म्हणून धन्यवाद

    सर भर भरून विजयी होवोत

    आम्ही आपल्यामागे आहोत

    अविनाश , सागर भंडारे आणि विकास अत्यंत धन्यवाद

    ReplyDelete
  8. sanjay sir ,

    aapan ghetalelya bhumikela aamachaa salaam

    aapan kadhi sabhaa ghenaar aahaat ka te saangaave

    aapanaas aamachya sarvaanchya shubhechchaa

    yogesh and ankita mane

    ReplyDelete
  9. Sanjay Sir

    What are your plans for senior and handicapped writters in Marathi

    What will be your reaction if all the books mainly based on science are to be translated in Marathi and will you insist a fullproof system for crosschecking the grammer ?

    Sir We are very much worried about the low percentage participation of Dalit and Muslim brotherhood in the Marathi drama and poetry - please opine

    We are planning to invite you people to our country - are you ready for the knock - is it the right time to say yes or do you need some more time to say YES ?

    Amruta Divakar

    ReplyDelete
  10. aappaa bappaa recalls a poem ,

    Where The Mind Is Without Fear



    Where the mind is without fear and the head is held high
    Where knowledge is free
    Where the world has not been broken up into fragments
    By narrow domestic walls
    Where words come out from the depth of truth
    Where tireless striving stretches its arms towards perfection
    Where the clear stream of reason has not lost its way
    Into the dreary desert sand of dead habit
    Where the mind is led forward by thee
    Into ever-widening thought and action
    Into that heaven of freedom, my Father, let my country awake


    Rabindranath Tagore

    ReplyDelete
  11. वा वा ,

    अनेक दिवसानंतर ही कविता वाचायला मिळाली

    साधना मध्ये जात असताना तिथे गीतांजलीचे भाषांतर वाचले होते

    त्याची आठवण झाली

    आप्पा बाप्पा आभार !

    डॉ दाभोलकर यांच्या संदर्भात ह्या कवितेची आठवण होते आणि संजय सरांच्या समोर उभे असलेली आव्हाने सुद्धा यातून आजच्या संदर्भात अधोरेखित होतात !

    अशीच एक खलील जीब्रांन ची कविता होती -" त्या देशाची स्थिती दयनीय असते "

    भाषांतर बहुतेक कुसुमाग्रजांनी केले असावे - नक्की आठवत नाही -

    ReplyDelete
  12. संजयजी,


    मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी उम्मेद्वारीसाठी हार्दिक शुभेच्छा, माझ्यामते तुमच्यासारखा सम्पूर्णभारतात hitech मराठी साहित्यकार नाही ...जी आज काळाची गरज आहे,जेणे आजची नवीन पिढी मराठी साहित्याशी आपल्या संगणकावर चांगली ओळख पटून घेतील.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...