Wednesday, September 4, 2013

समजेल तुला हे प्रिये?

माझ्या हास्यातून
वेदनांचे
गडगडाट होत असतात
ढगफुट्यांचे
पेव सांडत असते
छिद्राछिद्रांतून
सारी सृष्टी
आक्रोशत असते
आपल्या अनंत नेत्रांतून...

...मी हसत असतो तेंव्हा!

मी हसत असतो तेंव्हा
पुसायचे असतात मला
तुझे अश्रू
हसायला लावायचे असते तुला
सांगत दर्दभ-या
क्षणांतील
हास्यास्पद विसंगत्या
पण हसायला लावायचे असते तुला
मी आत रडत असतांना!

तू प्लीज रडू नकोस
हे आभाळ
भरू नकोस
ओलावल्या धरतीला
उमाळे आणू नकोस...

ऐक माझे हसणे
त्यात विझव
तुझे वेदनगाणे
तुही हस
मीही हसतो...

वेदना अनंत आणि अजरामर....

समजेल तुला हे प्रिये?

2 comments:

  1. उत्तरप्रदेश मुजफ्फरनगर दंगे के पिछे की सच्चाई .....

    १० दिन पहीले फेसबुक पर बजरंग दल के कार्यकर्ता एक विडीओ को लोगो दिखा रहे थे ...मैंने भी उस विडीओ को देखा बहोत बेरहमी से मुस्लिम लोग दो युवको की पिटाई कर रहे थे ...धर्मांध मुस्लिम लोगो का घिनोना स्वरुप उस क्लिप में था ...बजरंग दल के कार्यकर्ता उस क्लिप को उत्तरप्रदेश में घटी घटना कह रहे थे . पर मैंने उस क्लिप के बारे मै अरविन्द केजरीवाल की कार्यकर्ता अनन्या सिंह यादव इनसे सच्चाई जानी वह क्लिप पाकिस्थान की है ऐसा उन्होंने कहा था .और उन्होंने सबुत भी पेश किये ...मैंने उस क्लिप के बारे में अधिक जानकारी ली तो वह क्लिप जिसे सचिन एंव सौरभ बेहरहमी से हत्या के नाम से लोगो में फैलाई जा रही थी वह क्लिप सिअलकोट पाकिस्थान में घटी घटना की थी .. अल्लाह/ईश की निंदा की इस लिए विकृत धर्मांध मुस्लिम के जमाव ने २ मासूम बच्चो को बेहरहमी से पिट पिट कर हत्या कर डाली थी ..उसके बाद उस हत्याकांड की क्लिप 2010 में युटुब एंव अन्य वेबसाईट पर आयी थी ...उस क्लिप के आने के बाद पाकिस्थान के सामान्य मुस्लिम लोगो में चरमपंथिय धर्मांध लोगो के खिलाफ बहोत बड़ा मोर्चा निकाला ...Justice for the 2 publicly murdered teenage brothers in Sialkot, Pakistan इस नाम से फेसबुक पर भी पेज निकाल कर उन मासूम बच्चो के न्याय के लिए लढाई लढी जा रही है ..
    अब यह क्लिप भारत में बजरंग दल और विश्व हिन्दू परिषद के लोगो ने फैलाई ..कहा देखो देखो कवाल मुजफ्फरनगर में हिन्दू जाट भाई सचिन और सौरभ की मुस्लिम कितनी बेहरहमी से हत्या कर रहे है उस पाकिस्थान के क्लिप को 4500 से अधिक लोगो ने शेयर किया ...मुजफ्फरनगर के हर एक गाव में उस क्लिप को पोहचाया गया ...मुजफ्फरनगर और आसपास के जिल्हो में दंगे शुरू हो गए ..हिन्दू विरुद्ध मुस्लिम की लढाई शुरू हो गयी है ...धर्मांध दोनों शक्ति आम आदमी को एक दुसरे के खिलाफ भड़काने में कामयाब हुए है ...शाहनवाज और सचिन सौरभ के व्यक्तिगत झगड़े को मोदी समर्थक बजरंग दल हिन्दुत्ववादी शक्तियों ने सांप्रदायिक झगड़ो में बदल दिया ...
    सचिन और शहनवाज का झगडा हुवा शहनवाज ने सचिन को मार कर भगाया फिर सचिन ने उसके मामा सौरभ को लेकर आकर शहनवाज की पिटाई की उसमे शहनवाज की मौत हो गयी ...घटनास्थल के नजदीक के मुस्लिम दुकानदारो ने इस वारदात को देखा और कुछ मस्लिम युवको ने सचिन और सौरभ की भी वही चाकू भोक कर हत्या की .....
    दुसरे दिन पाकिस्तानी क्लिप को पुरे जिल्हे में फैलाया गया ...सचिन सौरभ हत्याकांड को मुस्लिम विरोध में भड़काया ...इधर हिन्दुत्ववादी हिन्दू को भड़का रहे थे तो उधर इस्लामवादी मुस्लिम लोगो को भड़का रहे थे ..
    सभी हिन्दू जाती को एकत्र कर के परसों महापंचायत का आयोजन किया गया इस दौरान मुस्लिम युवको ने महापंचायत को जा रहे है लोगो के ऊपर हमला किया था उस हमले में घायल लोग महापंचायत में आये तो महापंचायत के लाखो लोगो का घुस्सा और भी भड़क उठा फिर मुस्लिम विरुद्ध लढाई हर एक गाव में शुरू हुयी है ..इस्लाम का वास्ता दे कर मौलवी यों ने भी मुस्लिम समाज को हिन्दू विरुद्ध जिहाद करने का ऐलान किया है .........एक धर्म के लोग दुसरे धर्म के खिलाफ लढ़ रहे है कही जाने जा चुकी है .
    अभी भी दंगा फसाद शांत नहीं हुवा है ...
    संघ प्रमुख मोहन भागवत ने यूपी और बिहार हमारी प्रयोगशाला है ऐसा कहा था अब वह प्रयोग मुजफ्फरनगर यूपी में शुरू हुवा है और वह प्रयोग हिन्दू मुस्लिम लोगो ने कामयाब बना दिया है ..
    मैंने अपनी दोस्त अरविन्द केजरीवाल की कार्यकर्ता अनन्या सिंह को आज message किया और कहा उस पाकिस्तानी क्लिप से दंगा भड़क गया है उसने कहा भैया पाटिल हमारा देश कभी भी नहीं सुधर पायेगा वह लोग दंगा फ़ैलाने में कामयाब हुए ...मैंने उसकी तसल्ली के लिए कहा नहीं हम युवा लोग इसको को बदलेंगे ....
    पता नहीं कब तक धर्मांध हिन्दू मुस्लिम दंगे करते रहेंगे ???

    -भैया पाटील

    ReplyDelete
  2. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या खऱ्या मारेकऱ्यांना शिक्षा होणार की नाही ?

    हिंदू धर्म हा महान आहे असे सर्व जगाने मान्य केले आहे . याचे मूळ हिंदू धर्माच्या तात्विक बैठकीत आहे. हिंदू धर्म हिंसा कधीच आणि कोणत्याही कारणास्तव मान्य करत नाही . आहिंसक वैचारिक लढ्यांची एक फार मोठी परंपरा हिंदू धर्माला लाभली आहे. इथे सर्व प्रकारच्या विचारधारांना मुक्त स्वातंत्र्य राहिले आहे. हा धर्म एका विशिष्ट चौकटीत बंदिस्त कधीच नव्हता आणि कधीच नसेल .अध्यात्मिक प्रचितीच्या मागे आपले आयुष्य वेचणारे साधू-संत आणि विविध शास्त्रीय प्रयोग आणि अत्यंत मूलगामी तर्कशास्त्राच्या आधारे देवाचे अस्तित्वच नाकारणारे ....दोघांनाही सारख्याच ममत्वाने या धर्माने आपलेसे केले आहे. वेदांचे कर्ते याच भूमीतले आणि चार्वाक, कपिल देखील याच भूमीतले. नास्तिक विचारधारांना देखील आपल्या सर्वोच्च तत्वज्ञानाच्या षड्दर्शनात स्थान देण्याची उदार धर्मपरंपरा हिंदू धर्माची .

    मुळात हिंदू धर्माचा एकच असा कोणी कर्ता नाही, एकच असा कोणता धर्मग्रंथ नाही, एकच असे कोणते तत्वज्ञान नाही, एकच असा कोणता देव नाही. कोणीच असे छातीठोकपणे सांगू शकत नाही कि अमुक प्रकारचे धर्माचरण करणारा हिंदू आणि अमुक हिंदू नाही. सर्व विचारधारा, पंथ. संप्रदाय यांना सामावून घेत वाटचाल करण्याची हजारो वर्षाची परंपरा या धर्माला आहे.

    अर्थात ही केवळ एकच बाजू झाली. चार्वाक संप्रदायाच्या लोकांना दिसेल तिथे हाणामार करणारे आणि एका चार्वाकाचा एका चक्रवर्ती राजासमोर राजरोस खून पाडणारे देखील याच धर्माचे पाईक आहेत. चार्वाकांची सर्व ग्रंथपरंपरा नष्ट करून टाकणारे देखील याच मातीत उपजले. जगद्गुरू संत तुकारामांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढणाऱ्या, त्यांच्या पोथ्या इंद्रायणीच्या डोहात बुडवणाऱ्या, आणि शेवटी त्यांना सदेह वैकुंठाला पाठवणाऱ्या औलादी देखील इथल्याच. हिंदू धर्मावर बांडगुळाप्रमाणे माजलेल्या अनिष्ट रुढी दूर करण्यासाठी, अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या महात्मा फुल्यांवर शेण टाकण्यासाठी आपले हात शेणात बुचकाळणारे शेणकिडे देखील इथेच निपजले.

    दाभोळकरांची हत्या कोणी केली व का केली याचा विचार करण्याआधी ही सर्व पार्श्वभूमी अभ्यासणे देखील गरजेचे आहे. मुळात त्यांच्यावर असा खुनी हल्ला व्हावा अश्या पद्धतीने गेल्या अनेक दिवसांपासून विद्वेषाची पेरणी कोण करत होते हे देखील उघड गुपित आहे. एका महन्ताने भर सभेत काढलेले दाभोळकराचा दुसरा गांधी करून टाकू हे उद्गार आता देखील यु ट्यूब वर एका क्लिप च्या रुपाने गरळ ओकत आहेत. दाभोळकरांच्या छायाचित्रावर जणू eliminated अश्या फुल्या कोणी व का केल्या आहेत(. गुगल इमेजेस ) हे देखील उजेडात आणणे गरजेचे आहे.

    आम्ही म्हणतो तेच खरे बाकी सर्व धर्मद्रोही आणि जे जुमानत नाहीत त्यांना संपवा ...ही मुलतत्ववादी विचारसरणी मग ती कोणत्याही धर्मियांची असो लोकशाही साठी अत्यंत घातक आहे. तिची पाळेमुळे खणून काढणे गरजेचे आहे. आणि यांच्या गोळ्या जणू दाभोळकरांसाठीच राखून ठेवल्या होत्या. तिच्यात टुन्डा, एम के शेख, ओवेसी यांच्यापर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य नाही. दाभोळकरांसारख्या ऋजू स्वभावाच्या असंरक्षित समाजसेवकाची हत्या कसली करता ? हिंमत असेल तर या लोकांपर्यंत पोहोचून दाखवा.

    वरून जे प्रारब्धात असेल तेच होते ...अंथरुणाला खिळून आलेल्या मृत्यूपेक्षा असा मृत्यू केव्हाही चांगला अश्या प्रकारचे निर्लज्ज मृत्युलेख छापून आणले जातात. नेमक्या कसल्या हिंदुत्वाच्या गोष्टी करतात ही असंवेदनशील मुर्दाड लोकं ?? यांचे हिंदुत्वाचा मुखवटा देखील ढोंगी आहे. हे फक्त वर्चस्ववादाचे समर्थक आहेत . हजारो वर्षापासून चालत आलेली शोषणाधारित समाजव्यवस्थाच यांना पुढे चालू ठेवायची आहे. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या निमित्ताने यांचा हिंदुत्वाचा भ्रामक मुखवटा टराटरा फाटला आहे. ही असली मुलतत्ववादी विचारसरणीची असंवेदनशील लोक हिंदुत्ववादी असूच शकत नाहीत. यांना हिंदुत्ववादी म्हणन म्हणजे माझ्या या प्राचीन आणि महान धर्माचा अपमान आहे.















    बाकी कोणत्याही विचारवंतांच्या हत्येने त्याचे विचार दबत नाहीत उलट ते अधिकच उसळी मारून वर येतात याला इतिहास साक्षी आहे. दाभोळकरांच्या हत्येने देखील त्यांचे विचार दबणार नाहीत तर त्यांच्या अनुयायांची संख्या वाढणारच आहे. मुळात विज्ञाननिष्ठ आणि तर्कशुद्ध विचारसरणी संपवणे मुलतत्ववाद्यांना कधीच शक्य होणार नाही. हजारो वर्षांपासून ती चालत आलेली आहे आणि चालतच राहील.


    डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन ..!!!

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...