Wednesday, September 4, 2013

साहित्यिकांसह .....


साहित्यिकांसह सामान्यांना मतदानाचा हक्क द्या

प्रतिनिधी | Sep 04, 2013, 08:01AM IST


EmailPrintComment
साहित्यिकांसह सामान्यांना मतदानाचा हक्क द्या

औरंगाबाद - साहित्य संमेलन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मूठभर लोकांचा सहभाग असतो. बारा कोटींच्या महाराष्ट्रात साहित्यिकांसह सामान्यांनाही मतदानाचा हक्क द्यायला हवा. बदल स्वीकारून मतदान ऑनलाइन घेण्यात यावे, अशी मागणी सासवड येथील 87 व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार संजय सोनवणी यांनी केली.

मंगळवारी शहरात आले असता त्यांनी एका खासगी हॉटेलमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, निवडणुकीची पद्धत स्वीकारली असल्याने गळा काढून काहीही होणार नाही. परंतु लोकशाहीत बदलाला नेहमी वाव असतो. प्रत्येक पद्धत परिपूर्ण असतेच असे नाही. सध्याचे युग इंटरनेट असल्याने साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडतानादेखील ऑनलाइन मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात यावी. निवड ही र्मयादित न राहता व्यापक असावी. लोकांना काय वाटते ही भावना लोकशाहीमध्ये महत्त्वाची आहे. ऑनलाइन पद्धतीसाठी येणारा खर्चदेखील कमी आहे. त्यामुळे यामध्ये बदल होणे गरजेचे असल्याचे मत सोनवणी यांनी व्यक्त केले. आपल्याकडे साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हे मानाचे समजले जाते. मात्र ते पद मानाचे नसून कार्यकर्त्या म्हणून काम करण्यासाठी असल्याची भूमिका त्यांनी मांडली.

अभिजात दर्जासाठी जनमताच्या रेट्याची गरज
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी शासन प्रयत्न करत आहे. पण जनमतांचा रेटा वाढल्याशिवाय ही मागणी पूर्ण होणार नाही. मराठी भाषा पुरातन आणि स्वतंत्र आहे. अभिजात भाषेच्या दर्जासाठी तामिळ, मल्याळम भाषिकांप्रमाणेच मराठीप्रेमींच्या जनआंदोलनाची गरज आहे. तसेच जागतिकीकरणामुळे मराठी भाषिकांचेही सामाजिक सांस्कृतिक संदर्भ वेगाने बदलत आहेत. मराठी साहित्य या दूरगामी बदलांना कवेत घेत त्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहिले तरच सध्याची सांस्कृतिक गोंधळाची अवस्था दूर होईल, असे मतही या वेळी सोनवणी यांनी व्यक्त केले.

सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी व्हावी
राज्याचे सांस्कतिक धोरण ठरवण्यासाठी राज्याने डॉ आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने अनेक शिफारशी केल्या असून तो अहवाल सरकारने स्वीकारला आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेने विशेष प्रयत्न झालेले नाहीत. या धोरणाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे मत सोनवणी यांनी व्यक्त केले. सोनवणी गेल्या 37 वर्षांपासून साहित्य क्षेत्रात असून 24 वर्षांपासून ते प्रकाशकांचे कामदेखील करत आहेत.

http://divyamarathi.bhaskar.com/article/MAH-MAR-AUR-sahitya-sammelan-election-aurangabad-4365491-NOR.html

9 comments:

  1. संजय सर ,

    आधी सामान्य जनतेला यातील जवळ जवळ काहीच माहिती नाही - आता उशीर झाला असला तरी आपण ती माहिती देऊ शकता - मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्याची पद्धत कशी असते ते आपण मुद्देसूदपणे सांगावे - निदान पुढल्यावर्षी उपयोग होईल

    याआधी आपण सर्व जनतेला या निवडणुकीच्या पद्धतीची पुरेशी माहिती दिली पाहिजे

    सध्या सामान्य लोकाना काहीच माहिती नाही कि अध्यक्ष कसा निवडला जातो !

    हा जरी लोकांसाठी जिव्हाल्याचा विषय असला तरी , त्यातील नेमकेपणा लोकाना ठाऊक नाही

    सध्या ज्या संस्थाना मतदानाचा अधिकार आहे त्या संस्था मृतवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही - पण असे संक्याबळ राखून जर कुणी सर्व दोर आपल्या हाती ठेवत असेल तर ते मात्र टीकेस पात्र आहेत !एखाद्या संस्थेची कार्यकुशलता आणि जिवंत पणा मोजायचे मोजमाप नाही - एकूण किती संस्था यात भाग घेतात ?त्या कशाशी संलग्न असतात ? त्यात राजकीय हस्तक्षेप कसा होतो आणि तो कसा टाळता येईल ते सर्व लोकांपर्यंत पोचले पाहिजे खरेतर हे फार पूर्वीच घडायला हवे होते !


    आपण म्हणता तो आग्रह मात्र विनोदी वाटतो -

    तसे करण्याने भीषण परिस्थिती निर्माण होईल

    कारण क्रिकेट मध्ये मग असाच आग्रह धरला तर त्याचे काय होईल ?प्रेक्षकानीच सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक ठरवायचे !- काय धुमाकूळ होईल ?

    सवाई गंधर्व संगीत महोत्सवात आग्रह धरला की येथील श्रोत्यानीच भारतातील संगीत क्षेत्रातील दर वर्षीचे गुणी कलाकार जाहीर करावेत - तर काय होईल ?


    भारतरत्न पुरस्कारासाठी साठी असाच आग्रह झाला तर ?

    श्रोते असोत किंवा प्रेक्षक अथवा वाचक - त्यांना अधिकार देणे - तोही मतदानाचा - हे अवाजवी ठरेल !

    मग असाच निकष लावायचा तर - फक्त राजकारणातील काहीतरी ज्याना कळते त्यांनाच फक्त राजकीय निवडणुकीत भाग घ्यायला परवानगी देण्याचे धोरण राबवले तर ?

    असे करून चालणार नाही -

    ReplyDelete
  2. संजय सर

    आत्तापर्यंत तरी आपण लढवत असलेल्या पदाचे स्वागत कौतुकाच्या नजरेने होते

    या पदावर जे अनेक थोर लेखक बसलेले आहेत ते पहाता अंगावर रोमांच उभा राहील असे वाटते !

    १८७८ ला न्या रानडे यांच्यापासून एक सयाजीराव गायकवाड यांचा १९३२ चा अपवाद सोडला तर १९६७ पर्यंत कोलते यांच्या निवडी पर्यंत अखंड ब्राह्मण वर्गाचे या निवडीवर प्राबल्य होते असे दिसते . आजपर्यंत नेमके काय कार्य झाले आणि काय दिशा पकडली आणि किती काम पूर्ण झाले हा हिशोब कुणीही जन सामान्याला सांगत नाही - त्यामुळे हे पद फक्त उत्सव मूर्ती म्हणून आहे का असे वाटू लागते .

    आपण जो जन सामान्याला किंवा वाचक वर्गाला या पदाच्या निवडणुकीत सरळ प्रवेश असावा

    हा मुद्दा मांडला आहे तो न पटणारा आहे आणि या मध्ये भ्रष्टाचार माजायला वेळ लागणार नाही

    आज मराठवाड्यात पत्ती सुद्धा नित मिळत नाहीत फोन क्र. अपडेटेड नसतात असे प्रसंग वाचून या सगळ्या असहाअकार्य करनाअर्या लोकांची हकाल्पाती अरावी असे वाटाते



    कीर्ति सोनावणे

    ReplyDelete
  3. आपली मागणी अनेक वाद आणि प्रश्न निर्माण करणारी आहे. सामान्य व्यक्ती लेखनाची गुणवत्ता कशी ठरविणार? खरे तर मतदार ठरविण्यासाठी कोणतीही वस्तुनिष्ठ कसोटी आपल्याकडे उपलब्ध नाही. नवीन कसोटी ठरवायची असली तरी ती कशी ठरवायची, हा प्रश्न आहेच.
    या वर भापूर विचार होण्याची आवश्यकता आहे , यात शंका नाही.

    ReplyDelete
  4. सांस्कृतिक धोरणाची अंमलबजावणी व्हावी:
    सांस्कृतिक धोरण हि समाजाची एक अविरत प्रक्रिया आहे. राज्य सरकारला ते ठरवण्याचा अधिकार कोणी दिला आणि आ. ह, साळून्खेनाच तो अधिकार का म्हणून? कि ते केवळ एका विचारसरणीचा पुरस्कार करतात म्हणून? ही मागणी बिलकुल चुकीची आहे. संस्कृती आणि धर्म असे एका महिन्यात आणि कोणाच्या मनात आले म्हणून स्थापन आणि विकसित होत नसतात आणि एकांगी विचार करणा-याच्या मनावर ने नसतातच. असला मूर्खपणा तोही लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या नावावर फक्त महाराष्ट्रातच चालतो आणि तोहि मतांच्या गणितावर. त्यातही गम्मत अशी की या तथाकथित पुरोगामी विचारवंताना फुले, शाहू, आंबेडकर आठवतात पण हमीद दलवाइचा सोयीस्कर विसर पडतो. कारण एकाच फुले शाहूंचे नाव घेतले की झुंडी पाठीशी राहतात आणि दलवाइचे नाव घेतले की झुंडी पाठीशी लागतात. यांचा पुरोगामीपणा पण असा मतलबी असतो, स्वत:ला सुरक्षित राखणारा. या ढोंगीपणामुळे महाराष्ट्राची पुरती वाट लागली आहे, विशेषत: शिक्षण क्षेत्राची.

    ReplyDelete
  5. गेली शंभर महाराष्ट्राची फक्त ब्राम्हणांच्या नावाने खडेच फोडण्यात गेली. आता तरी हे सोडा. का विचारवंत होण्याचा सर्वात सोप्पा मार्ग? आता शिक्षण क्षेत्र महाराष्ट्रात बहुजनांच्या हातात आहे मग त्याचा दर्जा असा का घसरला? सहकार क्षेत्रातील प्रगती म्हणजे मुळात मराठ्यांच्या नातेवाईकशाहीची साखळी. या लोकांनी सर्व गोष्टींचा फक्त धंदा केला आणि इतरांना बामनावर दगड मारायला शिकवले पण तेच मागास , इतर मागास जेंव्हा स्वंतंत्र विचार करू लागले तेंव्हा त्यांच्या जाती काढल्या. (उदा. हरी नरके, छगन भुजबळ) कोणतीही गोष्ट गुणवत्तापूर्ण केली नाही. या पुरोगामी मराठ्यांनी गेल्या साठ वर्षात कुळ्या पाहण्यापलीकडे काय केले? आता तरी सुधारा, उगाच पुरोगामी वटवट थांबवा.

    ReplyDelete
  6. उदाहरणार्थ फ.मु . - सोनवणी इत्यादी वगैरे !
    ---------------------------------------------------
    प्रा. रवींद्र तहकिक
    ---------------------------------------------------------------------
    सासवड येथे होऊ घातलेले आखिल मराठी साहित्य संमेलन
    आणि त्या साठी निवडणुकीला उभे असलेले उमेदवार ! विशेषतः
    फ मु शिंदे आणि संजय सोनवणी ; चित्र असे आहे की ,जणू हेच दोन उमेदवार मैदानात आहेत . प्रभा गणोरकर आणि अरुण गोडबोले
    कुणाच्या खिज गिनतीतच नाहीत . एक चित्र असेही रंगवले जात आहे की फ मु कितीच्या फरकाने जिंकणार ? म्हणजे सोनवणी नक्की पडणार !
    निवडणुका म्हटलं किसाहित्य आश्या अफवा -वावड्या - उठणारच ,परंतु सोनवणी तेवढ्याने विचलित झाले ; त्यांना कुणीसं म्हटलं कि ते आजून लहान आहेत ; आता नाहीतर पुन्हा कधी अध्यक्ष होऊ शकतात वगैरे ! तर गडी जाम भडकलाच की ! साहित्य संमेलनाचा अध्यक्ष कुणी म्हातार बुआच आसावा असा काही नियम आहे का ? वगैरे ! असेल तर दाखवा मला वगैरे ! असं अद्वा -तद्वा बोलले म्हणतात ( म्हणजे असें नायगावकर परवा तेंडूलकराना अरुणा ढेरेंच्या घरी म्हणाल्याचं दवणे गोडबोलेंना सांगत होते म्हणे ) असो सोनवणी एवढ्यावरच थांबले नाहीत म्हणे ! तर त्यांनी थेट ज्ञानेश्वरांचीच साक्ष काढली ; म्हणाले वयाचा विचार केला असता तर ज्ञानेश्वरांना सुध्धा लोकांनी संत पद द्यायला वेटिंग वर ठेवलं असतं !
    सोनवणी लेखक कमी विचारवंत जादा आहेत ; त्यात पुन्हा
    राजकारणाच्या खोप्यातही त्यांची मुशाफिरी सुरु असते ; धंदा पाणीही बघतात ; त्यामुळे त्यांना असे काही बाही सुचणे साहजिक आहे ,परंतू
    फ मु च्या बरोबरीत बसन्या साठी ज्ञानेश्वराशी तुलना करण्याचा सोनवनि चा हटयोग बरा नाही वाटला इतकेच !
    आर्थात फ मु अध्यक्ष होण्यास किती लायक आहेत हा वेगळा मुद्दा आहे . म्हणजे अध्यक्ष होऊन ते काय करणार ? वगैरे ! तर इतर तरी काय करतात ? किंवा आजवर कुणी काय दिवे लावले ? म्हणून फ मु कडून
    आमुक -ढमुक टेंभे पलिते उजळण्याची अपेक्षा करायची ? आणि सोनवणी म्हणतात तसे समेलन एक उत्सव झालाय ; तर ; समजा, सोनवणी निवडून आले तर ते या उत्सवाचे कोणत्या जलश्यात रुपांतर करणार ?
    आणि त्यांनी आसा काही जलसा करू घातलाच तर लोक तो चालू देतील का ? हा खरा प्रश्न आहे . बाकी फ मु सोनवणी आम्हास एक समान आहेत ; ते बहुजनातील आहेत आणि आपल्या लेखन विचारातून बहुजन प्रबोधन करत आलेले आहेत ; चळवळीला बळ देत आलेले आहेत म्हणून हे दोघेही आम्हास योग्य उमेदवार वाटतात ; दोघानाही उदाहरणार्थ शुभेच्छा इत्यादी वगैरे !

    ReplyDelete
  7. हेमंत करकरे ते डॉ. दाभोलकर दहशतवाद्यांची ‘नेम’बाजी! (लेखक: संजय पवार)

    हेमंत करकरे महाराष्ट्र एटीएस प्रमुख.
    २६/११च्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात ‘शहीद’.
    डॉ. नरेंद्र दाभोलकर अज्ञात (हा लेख लिहिपर्यंत) मारेकर्यांकडून पुण्यात सकाळी ७ वाजता गोळ्या घालून खून.
    करकरे आणि डॉ. दाभोलकर यांच्यात एक साम्य आहे आणि ते साम्य म्हणजे सनातन्यांकडून जिवंतपणी धमक्या, अवहेलना आणि धर्मद्रोही (हिंदू) राष्ट्रद्रोही आणि यापेक्षा शेलक्या विशेषणांनी निर्भत्सना आरती. आणि त्यांच्या मृत्युपश्चात जाहीर शोक आणि मतलबी उरबडवेपणा करण्यात आला.
    हेमंत करकरे तसे काही फारसे परिचित नव्हते. खैरनार, वाय. पी. सिंग, वाय. सी. पवार, रिबेरो यांच्यासारखे काही ना काही कारणांनी ते प्रसिद्धीच्या झोतात नव्हते. मर्यादित राजकीय, माध्यम वर्तुळात माहीत असतील कदाचित. पण ते एकदम प्रकाशात आले, जेव्हा मालेगाव स्फोटात मुस्लीम नव्हे तर हिंदू दहशतवाद्यांना त्यांनी संशयित म्हणून अटक केली!
    ज्या कुजबूज आघाडी कडून ‘प्रत्येक मुसलमान दहशतवादी नसतो पण पकडलेला प्रत्येक दहशतवादी मुस्लीम असतो’ असे एसएमएस फिरवले जात होते, त्यांना जवळच्या अशा अभिनव भारत, सनातन प्रभात, प्रज्ञा सिंहसारखी साध्वी यांना जेव्हा करकरेंनी ‘आत’ टाकलं तेव्हा हाहाकार माजवण्यात आला. स्वतःला स्वयंघोषित राष्ट्राभिमानी समजणार्या भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाने आणि शिवसेनेसारख्या भगवं/हिरवं असं समाजाचं रंग विभाजन करणार्या पक्षाने या आरोपींना न्यायालयात आणलं तेव्हा त्यांच्यावर फुलं उधळली!
    इंदिरा गांधी वा राजीव गांधी यांच्या मारेकर्यांवर शिखांनी किंवा तामिळींनी अशी जाहीर सुमनं उधळली नव्हती. तीही कोर्टाच्या आवारात.
    पण गर्विष्ठ हिंदू संघटनांना आपल्या विचारांच्या लोकांना असं दहशतवादी ठरवलेलं आवडलं नाही. बहुसंख्य असलेल्या हिंदुंच्या देशात हिंदुच अतिरेकी? हे म्हणजे भगव्या रक्ताला हिरव्या विद्वेषाची फोडणी दिल्यासारखं झालं.
    एका रात्रीत हेमंत करकरे नतद्रष्ट, राष्ट्रदोही इ.इ. झाले.
    करकरेंना ‘सामना’तून लाखोली वाहून, धिंड काढावी इथपर्यंत शब्दमजल गेली. भाजपसह संघपरिवार यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष खतपाणी घालत होता.
    करकरे काही खैरनार, हजारेंसारखे बोलके नव्हते. ते शांत राहिले. पण या सार्या टीकेमुळे व्यथित झाले. गृहमंत्र्यांशी त्यांनी ही नाराजी बोलूनही दाखवली. एटीएसच्या प्रमुख पदावरून दूर होण्याची इच्छा व्यक्त केली. पण आबांनी त्यांना शांत केलं.
    आणि त्याच रात्री बहुधा, ते त्या २६/११ च्या हल्ल्यात अशोक कामटे, विजय साळसकरांसह शहीद झाले!

    ReplyDelete
  8. CONT.....................

    त्याबरोबर उजव्यांनी मांडी बदलून ‘हिरव्यां’विरुद्ध लढताना शहीद झाले म्हणून इतरांसोबत करकरेंचीही भगवी आरती सुरू केली आणि त्यांच्या हौतात्म्याचा ‘सरकार’ला जाब विचारू लागले!
    धोतराचं पितांबर कसं होतं त्याचा हा चांगला वस्तुपाठ होता. आदल्या रात्रीपर्यंत ‘काफर’ असलेला लगेच ‘शहीद’ ‘अमर’ ‘हुतात्मा’ झाला. गुहेतून डरकाळ्या फोडणार्या वाघासकट, समयोचित जान्हवी कानाला अडकवणारे सगळे चेहरे बदलून शोकसभेत सामील झाले.
    डॉ. नरेंद्र दाभोलकर समाजवादी परिवारातला जुना, जाणता कार्यकर्ता. या दशकातला साधनेचा संपादक, सामाजिक कृतज्ञता निधीसह अनेक विचारपीठांचा, संस्थांचा अध्यक्ष, विश्वस्त, कार्यकर्ता.
    अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, लेखक, कार्यकर्ते. अथक भ्रमंती तेवढंच विस्तृत, माहितीपूर्ण लिखाण करणारं लिखाणही ललित वगैरे नाही तर प्रबोधनात्मक, परिवर्तनास पूरक.
    साधनेच्या संपादकपदी आल्यावर तर त्यांनी अनेकांना लिहायला लावलं. साधना मीडिया सेंटर सुरू केलं. चांगली प्रकाशनं काढली. तीनएकशे पृष्ठांचे दिवाळी अंक काढले.
    तरीही समाजवादी चळवळ्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आम जनतेच्या गावीही नसे. मात्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि त्या कार्याच्या, रेट्याच्या माध्यमातून अंधश्रद्धाविरोधी कायदा करण्यासाठी बिल तयार केलं, ते विधानसभेच्या पटलावर आणलं, तसे डॉ. दाभोलकर हिंदू सनातन्यांच्या रडारवर आले.
    करकरेंप्रमाणे दाभोलकरही निर्भत्सना आरतीचे धनी झाले. पण दाभोलकर खचले नाहीत, मागे फिरले नाहीत, थकले नाहीत. हा कायदा व्हावा यासाठी सहिष्णू होत ते १८ वर्षं सतत सरकार, विधिमंडळं, राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, व्यक्ती, संप्रदाय यांच्याशी संवाद साधत राहिले. भूमिकेत ‘उद्देशाला’ धक्का न लावता बदल करत राहिले. पण समाजवादी माणसाने भूमिका सांगितली आणि आपल्याला ती ‘पटली’ हे जाहीरपणे कसं मान्य करायचं? आपल्या शंका/कुशंकांना दाभोलकरांनी सप्रमाण खोडून काढलं हे ‘सत्य’ धर्माभिमान्यांना पचवता येईना. मग काही ना काही खुसपटं काढून विषय प्रलंबित ठेवला. फारच अंगावर आलं तर धर्मावर आक्रमण म्हणून डांगोरा पिटायचा!
    तरीही दाभोलकर पिच्छा सोडेनात, तेव्हा त्यांना पिशाच या आपल्याच संकल्पनेवर विश्वास ठेवल्याचा पश्चाताप होऊ लागला. विधिमंडळात अमुक एक संख्येने आहोत म्हणून सेनेसारख्या पक्षाने हिंदुत्वाची झाल पांघरत विरोध केला. प्रबोधनकारानंतर एकाही ‘ठाकरे’ने भटशाही विरुद्ध आपला कोदंडाचा टणत्कार केला नाही, उलट निओ ब्राह्मनीझमच्या इशार्यावर ते आपलं हिंदुत्व अधोरेखित करत आले!
    जिवंतपणी ज्या दाभोलकरांना विरोध केला, त्यांची हत्या होताच या सार्यांनी अश्रू ढाळत सरकारला टार्गेट केलं पुन्हा एकदा तीच करकरे नीती!
    सरकराने या संधीचा फायदा घेत वटहुकूम काढला तसे सगळे भगवे परत लाल झाले!
    बारा कलमं जगाला उपलब्ध झाली, त्यात धर्म शब्द नाही. धार्मिकतेवर अंकुश नाही की टाच नाही तरी फडणवीसांपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सगळे ‘आमच्या धर्मावर’ म्हणून छात्या फुगवत राहिले. कायदा वाचला नाही तरी भाष्य! आणि दुसरीकडे स्वतःच्या आमदाराचे महिला कर्मचार्यांशी असभ्य वर्तनाचे रेकॉर्डेड पुरावे बघूनसुद्धा माझं कुटुंबवत्सल बाळ म्हणून त्याचं समर्थन!
    यांच्या सभास्थानी शिवरायांचे ‘पुतळे’ असतात हे लाक्षणिक अर्थाने घ्यायला हवं! महाराजांच्या विचारांवर तप्त शिसं ओतून ते गोठवून यांची मर्दुमकी त्यांच्या नावावर! हरहर महादेव.
    अशा पद्धतीने सनातन्यांचा थयथयाट गेला आठवडाभर चालू आहे. श्रावणात आमदारांचे भाद्रपदी प्रकार सुरू आहेत. दाभोलकरांचा असा मृत्यू ही ईश्वरी कृपा असं लिहून छापण्याचा सनातन प्रभातच्या आठवलेंचा निर्लज्जपणा, त्याचं समर्थन करण्याचा त्यांच्या कार्यकर्त्यांचा कोडगेपणा यातून काय दिसतं?
    लोकशाही पद्धतीने भारतीय समाजाला बुद्धिप्रामाण्यवादाकडे नेण्याचा प्रयत्न गाईचं शेण उचलून तिची शेपटी मस्तकी लावणार्यांना पचत नाहीय!
    END.

    ReplyDelete
  9. अहो संजय पवार ,

    बर शाल तुम्ही बोललात या ब्लोगवर !

    अहो इथे असले विचार एकतर्फी कुणी ऐकून घेत नाही !

    मला वाटलं की तुम्ही विचार करून लिहित असाल , पण तुम्हीतर एखाद्या शिकाऊ कुत्र्याप्रमाणे भुंकत सुटला आहात - जरा विचार करा - या बसा -आपण विचार करू -



    समजा , सर्व ब्राह्मण महाराष्ट्रातून एकदम नाहीसे झाले तर- सर्व अडचणी सुटणार आहेत का ?

    नोकरीत हल्ली ब्राह्मण नसतातच - कारण सर्व आरक्षण धोरण त्यांच्या विरोधात आहे

    शिक्षणात हल्ली सर्वजण - सर्व जातीचे -पहिले येतात -

    कुणालाही कुठेही घर घेता येते - वाडा वस्ती - जात पंचायत असे काहीहि शहरात नसते



    समजा आपण विचार करुया - अडचणी काय आहेत ?

    संधी कमी आणि लोकसंख्या जास्त हाच खरा मुद्दा आहे आणि संधी वाढवणे हे सरकारचे काम आहे - म्हणजेच रोजगार वाढवणे - त्यातच ब्राह्मणाला अग्रस्थान का मिळते ?कारण त्यांचा पर्फ़ोर्मन्स !शुद्ध लिहिणे , शुद्ध बोलणे - मग ते इंग्रजी असो किंवा मराठी !

    शिक्षणात ब्राह्मणेतर विद्यार्थी पण ब्राह्मणा इतकाच पुढे आहे हे १०-१२वी च्या निकाला वरून कळते

    प्रश्न वेगळे आहेत आणि ध्येय ब्राह्मण लोकाना धोपटायचे आहे -हि तुमची फसगत तुमच्याच ९६ कुळी नेत्यांनी करून दिली आहे -त्यांनी ब्राह्मणांचे काहीच वाकडे होणार नाही - हे पण तुम्ही लक्षात घ्या - आजही समाजात ब्राह्मण लोकांची टक्केवारी फक्त

    २ ते ३ टक्के असताना त्यांच्यावर ही आग पाखड ,का ? सरकारी दारे ब्राह्मणाना बंद असली तरी ९६ कुळी लोकांना यांची भीती का ?त्याची कारणे फार वेगळी आहेत -


    छत्रपती शिवाजी महाराजाना मराठा समाजाने फक्त आपली मुखत्यारी असल्यासारखे वागत छोटे केले आहे ! हे सत्य मांडणारे कोण ? ब्राह्मणच !

    शेतमजूर कुणाला लागतात - त्यांच्या परिवाराचे कल्याण कुणी करायचे - असले प्रश्न कोण मांडतात - आंदोलने कोण पेटवतात - ब्राह्मण !

    शहरी जमिनीला प्रचंड भाव मिळतो म्हणून आपापली शेती मोडून गुंठेवारी किंग कोणत्या पक्षात आहेत ?- आणि त्यातील हितसंबंध कोण उलगडून दाखवते ?- ब्राह्मण !

    काही दिवस ही ब्राह्मण द्वेषाची मखलाशी चालेल , पण ब्राह्मण द्वेषाने मूळ प्रश्न सुटत नाही हे कळल्यावर , गरीब शेतमजूर यांच्याच दरवाजावर धक्के मारू लागेल !त्यावेळेस यांना छत्रपतींची किंवा ब्राह्मण द्वेषाची ढाल उपयोगी पडणार नाही -

    महाराष्ट्र शहरीकरणाच्या विळख्यात सापडला आहे - पाण्याचा तुटवडा वाढत आहे -डॉ दाभोलकर यांच्यामुळे जात पंचायत आणि लोकप्रिय ग्रामीण अंध श्रद्धाना खीळ बसत असेल - या माणसामुळे जर नवे वारे वाहू लागले असतील

    मत देणाऱ्यांचे मत परिवर्तन होत असेल , त्यांच्यात डॉ दाभोलकर यांच्या सारख्या (परिवर्तनवादी (ब्राह्मण )माणसामुळे जर आमुलाग्र मतपरिवर्तन होत असेल तर आपले काय होणार असा हा यक्षप्रश्न आहे - या अवस्थेत त्याना ना छत्रपती मदत करू शकतील ना ब्राह्मणद्वेष - कारण आपल्या मजूर वर्गाला जर सुशिक्षित केले तर तो शहरात निघून जाइल ही भीती त्यांना त्रास देते - ९६ कुळी राजसत्ता स्वस्तात आणि मुजोरीत चालवण्याची सवय आता महागात पडणारी होत चालली आहे

    त्याचे खापर ब्राह्मणावर फोडायचेच असेल तर फोडा -कर नाही त्याला दर कशाला ?

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...