Friday, November 15, 2013

मृत्यू ....

मृत्यू हुंदडत असतो
चोही बाजुनं...
जाणवत असतात त्याला आपले
श्वास-नि:श्वास
भ्रमांमधले भ्रम...विभ्रम...
येथून तेथली निरंतर
व्यर्थ जीवघेणी धाव...
धपापत्या उरांचा घेत असतो तो
मोहस्पर्श
अजाणांना
अधिकच अजाणतेत
असतो कसा
रमवत तो!

...खेळच त्याचा असला
हसत असतो...
दशदिशांतून वाकुल्या दाखवुन...
माहित असते त्याला ठाम
कितीही धावले तरी
जाणार कोठे हे
जावून जावून?

4 comments:

  1. I liked this one a lot ! Death can make a fool out of anyone .

    Abhay Tarange

    ReplyDelete
  2. आपला प्रयत्न सुंदर आहे

    मला एकदम आठवली ती नट सम्राटची

    एक अस्वस्थ शब्दांची धारा -


    " जगाव की मरावं

    हा एकच सवाल आहे

    या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन

    जगाव बेशरम लाचार आनंदानं , की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर

    त्यात गुंडाळल्या जाणीवेच्या यातनेसह

    मृत्यूच्या काळ्याशार डोहामध्ये ?

    आणि करावा सर्वांचा शेवट एकाच प्रहारान - माझा तुझा आणि त्याचाही .

    मृत्युच्या महासर्पान जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला

    नसावा जागृतीचा किनारा

    कधीही -

    पण त्या निद्रेलाहि पुन्हा स्वप्न पडू लागले तर

    तर - तर

    इथेच मेख आहे

    नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही

    म्हणून आम्ही सहन करतो हे जुन जागेपण

    सहन करतोप्रेताच्या निर्जीवपणान अभिमानावर होत असलेले बलात्कार

    अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असलेल्या सत्वाची विटंबना

    आणि अखेर करुणेचा कटोरा घेऊन

    उभे राहतो खालच्या मानेने आमच्या मारेकऱ्याच्याच दाराशी .

    विधात्या , तू इतका कठोर का झालास

    एका बाजूला , आम्ही ज्याना जन्म दिला ते आम्हाला विसरतात

    आणि दुसर्या बाजूला, ज्यान आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस ,

    मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन , हे करुणाकरा,

    आम्ही थेरड्यानी कोणाच्या पायावर डोक आदळायच ?

    कोणाच्या - पायांवर - कोणाच्या ! "

    कुसुमाग्रज


    अंगावर शहारे आणणारे शब्द !- बेबी मावशी

    ReplyDelete
    Replies
    1. खरे आहे...कुसुमाग्रजांची प्रतिभा एखाद्या महाकवीला साजेशी होती.

      Delete
  3. कुसुमाग्रज पुणेरी भट नव्हते

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...