Saturday, December 14, 2013

जादू-टोणा विरोधी कायदा....

भारतीय दंडविधानानुसार फक्त पिडितच तक्रार करू शकतो. (खून-अपहरनाचा अपवाद). त्रयस्थाला पिडितातर्फे तक्रार करता येत नाही. जादु-टोणाविरोधी कायद्यात पिडिताची नेमकी काय व्याख्या केली आहे हे जरी स्पष्ट नसले तरी फार तर पिडितांचे नातेवाईक तक्रार करु शकतील. (अप्रत्यक्ष प्रभावित असल्याने.) अंधश्रद्धा निर्मुलन समितीला वा तत्सम अन्य कोणालाही बाधित/पिडित नसल्याने कोणाच्याही वतीने तक्रार करता येणार नाही. ते Law of Equity च्या विरोधात जाईल. सध्याच्या विधेयकात ज्या बाबी दंडार्ह ठरवल्या आहेत त्या बाबींसाठी पिडिताचीच तक्रार ग्राह्य धरणे संयुक्तिकच आहे. फार तर अंधश्रद्धा निर्मुलन समित्या किंवा जागरुक नागरिक पिडिताला तक्रार दाखल करण्यासाठीचे मार्गदर्शन करु शकतील...मदतही करु शकतील.

मग आता प्रश्न असा निर्माण होईल कि या कायद्याची गरजच काय होती? शारीरीक/मानसिक इजा पोहोचवनारी अंधश्रद्धेची(ही) सारीच कृत्ये दंडार्हच होती. फार तर शिक्षा पुर्वी कमी असेल. तशीही महत्तम शिक्षा कोणत्याही आरोपात क्वचितच व अपवादात्मक दिली जाते.

त्यामुळे आताचा जादु-टोनाविरोधीचा कायदा पांगळा म्हणण्यात अर्थ नाही. मुळात त्याची गरज होती काय हा खरा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. खरे तर या कायद्याने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या चळवळीतील एक प्रकारे हवाच काढून घेतली आहे. मुळ प्रश्न याने सुटेल काय? हा गहन प्रश्न आहे. अंधश्रद्धेचे पिडित स्वत: कितपत तक्रारदार बनतील हाही एक प्रश्न आहे. माझ्या मते असे घडण्याची शक्यता कमीच आहे. कारण आपण अंधश्रद्धाळू आहोत हे जर शिक्षित मान्य करत नसतील तर अशिक्षित मान्य करतील याची संभावना अत्यल्प आहे.

दुसरी महत्वाची बाब म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याची काटेकोर व्याख्या करण्यात समाजशास्त्रीय तसेच मानसशास्त्रीय अडचनी आहेत. उदा. ज्योतिष. ज्योतिष ही श्रद्धा कि अंधश्रद्धा? याबाबत गोंधळ आहेच. या कायद्याने बगाडाला बंदी आहे कि नाही हे स्पष्ट नसले तरी मोहर्रमच्या स्वत:ला शारिरीक हानी पोचवणा-या बाबींना बंदी नाही म्हणजे त्यालाही नसावी. संतांनी खरोखरच चमत्कार केले ही श्रद्धा कि अंधश्रद्धा कि वास्तव? हभपंपुढे याबाबत चर्चा करायचीही हिंमत सरकार करणार नाही मग कायद्यात त्याचे काय प्रतिबिंब उमतनार. संतांचे चमत्कार मान्य केले तर सोनवणीचे चमत्कार अमान्य करायला अडचण का असावी? हा शुद्ध दांभिकपणा आहे.

म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद वदवले ही अंधश्रद्धा समजायची नाही...त्याबाबतची प्रवचने लोकांनी "निर्मळ" मनाने ऐकायची...आणि स्वत: मात्र जीवनात अंधश्रद्धा जपायच्या नाहीत. सर्व संतांबाबत असेच म्हणता येईल. पण ते मात्र प्रवचनकारांना सांगायची मोकळीक द्यायची आणि त्याला अंधश्रद्धेच्या परिघातून बाहेर काढायचे, हे काय आहे?

आता "भोंदूबाबा" याची तरी नेमकी काय व्याख्या आहे? वरचे उदाहरण घेतले तर हे हभपही भोंदु बाबाच ठरतात कारण ते जे विज्ञानदृष्ट्या अशक्य आहे त्याचाच प्रचार करतात. हा भोंदुपना नाही काय? आजतागायत जे भोंदू बाबा पकडले गेलेत ते गांवा-खेड्यातले. शहरांतेल किती भोंदूवर कारवाई झाली हाही संशोधनाचा विषय आहे. कार्यालये थाटून बसलेले भोंदू कायद्याच्या कचाट्यात येत नाहीत...आले तर तोडपानी करुन सुटतात हा आजवरचा इतिहास आहे. सत्य साईबाबाचे काय झाले? पंतप्रधानांपासून अगदी सचिनसारखा क्रिकेटपटू त्याच्या कच्छपी होता. ती अंधश्रद्धा नव्हती काय?

थोडक्यात मला वाटते जादू-टोना विरोधी कायदा प्रभावी ठरण्याची शक्यता नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत सातत्याने समाजाचे प्रबोधन करणे हाच यथोचित मार्ग आहे. कोणालाही (स्वत:लाही) इजा अथवा आर्थिक नुकसान पोचवनार नाही अशा श्रद्धांना विरोध न करता हानिकारक सर्वच बाबींना विरोध करत रहावे लागेल.  


16 comments:

  1. प्रिय संजयजी,
    शराब बंदी से शराब बंद नहीं हुयी. जुगारबंदी से जुगार बंद नहीं होती. हुंडा बंदी से कोई हुंडा बंद नहीं होता. फिर जादू टोना बंदी से वह बंद कैसे हो सकता है.
    ज्यादा से ज्यादा इतना होगा कि गांव खेड़े के कुछ भोले भाले लोगो को अंध श्रद्धावाले और पुलिस वाले मिलकर परेशान करते रहेंगे और समाचार पत्रों में अपनी बड़ाई के समाचार छापते रहेंगे.
    देश यदि कानूनों से ही बदल जाता तो समाज प्रबोधन की जरूरत ही क्या है.
    देश में कुछ वामपंथी विचार के समाज सुधारक है जिनको लगता है की सरकार नामकी यंत्रणा सभी काम सही कर सकती है. जब तक इनकी गलतफहमी जारी रहेगी, देश को हर दो चार महीनों में एक ने एक नए कानून और उसकी प्रशासकीय यंत्रणा का बोझ ढोते रहना पड़ेगा.
    जब यह सारा कुछ बर्दाश्त के बाहर हो जायेगा तब एक नया कानून लाया जायेगा कि अब कोई ननया कानून नहीं बनेगा.
    तब तक काम चालू रस्ता बंद आहेच.
    दिनेश शर्मा
    पुलगांव

    ReplyDelete
  2. बाकी सगळ्या पोस्ट विषयी सावकाश रात्री लिहितो

    १) कायदा झाला नसता तर सनातनी माजले असते । विचारवंताच्या खुना नंतर दात काढुन फिदीफिदी हसावे … आणि खोटारडा गैरप्रचार करूनही … टांग उपर … त्यांचा गैरसमज दूर करणे आवश्यक होते .

    २) राज्यघटना सार्वभौम आहे आणि आम्ही सर्व धर्मात हस्त्क्षेप करणार हे सेक्युलर तत्व वारंवार ठणकावून सांगणे आवश्यक आहे … बाकी बारकाव्यांबद्दल रात्री लिहितो .

    ReplyDelete
    Replies
    1. डॉ अब्राहम के खयालात पढकर वो कितने रिजिड है इसका एहसास हुआ और बहुत चिंता हुई

      इसलिए डॉक्टर साहाब को हम दरख्वास्त करना चाहते है कि इस मामलेमे शर्मा साहाब ने जो मामला उठाया है वो बहोतही संगीन है और उसे नजर अंदाज नही करना चाहिये



      अवामाको नये खयालातसे उजागर करना ये खाली जम्बुरीयतकी जवाबदारी ना समझते हुए

      सारी कौमको हमे साथ लेके जाना होगा - आज दर्गा और पीर जाकर देखा जाए तो लोग किसकी शिकार हो रहे है ?

      डॉ अब्राहम , हम हमारे धरममे भी अच्छे सुधार चाहते है लेकिन आप जैसे लोगोंको हम किसीभी किमत पर हम अपने धरममे दखल अंदाजी करने नही देंगे

      अपने लोगोंको पढानेकी हम काबिलीयत रखते है

      हमारी मदरसामे आप जैसे लोगोंको कतै आणे नाही देंगे

      Delete
    2. माननीय लोकांनी जो त्यांच्या मदरासात डॉक्टर दीक्षित साहेबाना न घुसण्याचा इशारा दिला आहे तो बरेच काही सांगून जातो

      डॉ दाभोळकराना जेंव्हा प्रस्थापित सनातनी लोकांकडून विचारले जात असे कि आपण हिन्दु लोकांच्याच मागे हात धुवून का लागता - मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्यात का नाही जात प्रबोधन करायला ,त्यावेळेस त्यांचे उत्तर फार मार्मिक असे




      फक्त हभप लोक अंधश्रद्धा पसरवतात असे नाही तर आजचा जात पंचायतीचे निकाल पाहाल तर वेड लागायची पाळी येते - अगदी कोवळ्या मुलीला जख्खड म्हाताऱ्या बरोबर जीवन व्यतीत करण्यास फर्मावणारा जात पंचायतीचा आजचा हुकुम कोणी दिला -

      त्याच जातीच्या लोकांनी ना ?

      स्त्रीयांवर होणाऱ्या इतर अत्याचारा इतकाच हा प्रकार हिणकस आहे - तिथे हभप लोकांचे काहीच चालत नाही त्यांची धाव आणि हाव पंचावर जमलेल्या तांदुळा वरच संपते हे पण लक्षात घेतले पाहिजे

      दाभोलकर यांचे आंदोलन आणि ब्राह्मण द्वेष यात फार फरक आहे

      तुमचा ब्राह्मण द्वेष तुमच्या पाशी ठेवा

      त्याने ही प्रागतिक आंदोलने बदनाम करू नका

      तुमचे हसे होत आहे

      Delete
  3. फारच छान

    विक्रोळीला मी संभाजी लेडीज बार पाहिला आहे- त्याचा मालक मराठी आहे पण ब्राह्मण नाही

    संभाजी बिडी तर जग प्रसिद्ध आहे

    संभाजी हेयर कटिंग सलून , संभाजी वडा पाव ,संभाजी लोटरी सेंटर मी पुण्यात पहातो आहे

    ह्या दुकानांचा मालक मराठी आहे पण ब्राह्मण नाही - असे कसे ?

    अहिल्या मटन शोप आहे - त्याचा मालक ब्राह्मणेतर आहे

    पण एकंदरीत संभाजी नगर हे पुण्याचे नाव ठेवण्याची कल्पना फारच सुंदर आहे



    संभाजीनगर मधील संभाजी पुलावरून पलीकडे जाउन संभाजी बागेच्या जवळील

    संभाजी केश कर्तनालयात संभाजी पवार नावाचा न्हावी संभाजी हिंगमिरे या गिऱ्हाइकाला

    शेजारच्या संभाजी वडापावची तारीफ सांगत होता

    वाक्य रचना आणि अर्थ यामुळे माणूस हरखून जाइल

    करूया करूया असेच करूया

    पण इतके वर्ष म न पा मध्ये आपलीच सत्ता आहे

    का बरे हा अलौकिक विचार आधी कुणाला सुचला नाही ?

    आपले पहिले महापौर बाबुराव सणस आणि उप महापौर होते पारगे - दोघेही कडवे मराठा

    पण त्याना नाही सुचले - त्यांनी लाल महाल परत नित कवला जिजामाता उद्यान संभाजी पूल आणि शिवाजी पूल असे नामकरण केले

    ज्याला सर्व पुणेकर लाकडी पूल आणि नवा पूल असेच म्हणतात

    संभाजी नगरचे उप नगर शिवाजी नगर असे काहीतरी होईल

    औरंगाबादचे नामकरण पण काय बरे आहे केलेले संभाजीनगर का शिवाजीनगर ?

    आपण परत एकदा नीट विचार करूया - मधल्या वेळात बाजीरावाचा पुतळा पर्वतीवर हलवून तिथे शहाजी -जिजाबाई ,शिवाजी आणि संभाजी - राजाराम असा ग्रुप पुतळा बसवावा

    ReplyDelete
  4. या लेखात फारच मर्मभेदीपणा,अचुकता समाज संस्कृतीचे विकसनतेचे विविध टप्पे हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या चढउताराप्रमाणे वाटतात.योग्य दिशादिग्दर्शन व विचारांचा प्रवास तसेच ज्ञानवाद हाच महत्वाचा पाया समाजवादाचा असावा असे इच्छा व्यक्त केली आहे. ग्रंथप्रामाण्याबरोबरच व्यक्तीकेंद्रीतता, व्यक्तीच्या आयुष्यांना येणाऱ्या मर्यादा यांचा गंभीर विचार केला आहे. केवळ उथळपणा व बाबा वाक्य प्रमाणंम हे टाळावे हे सांगितले आहे.जीवनाचे समत्वाने संशोधन करुन ानमार्गाच्याच साहयाने मार्गक्रमण करण्याचा मुलगामी चिंतन आढळते.बरे वाटते. संबधितांनी यावर आपल्या सामाजिक संघर्ष त्यातील यशापयाशाचय हिंदोळयाचा विचार करतांना सोनवणीसरांनी व्यक्त केलेल्या बाबी नक्कीच गांभीर्याने घेऊन जीवनाची प्रगल्भता अनुभवावी ज्यात सम्यकत्व न्याय चित्तवृत्ती जाणीवा जोपासून वैज्ञानिक पध्दतीने निरपेक्ष चिकित्सा अनुभव करीत पुढे जावे.सेमेटीकांच्या समस्या खरच दाबल्या जात आहेत.वर्चस्वता वाद तर नक्कीच सगळीकडे आढळतो. तेव्हा वरील मार्गदर्शन मोलाचे ठरुन ज्ञानवादाचीच कास धरु या.

    ReplyDelete
  5. एकमेकाशी असंबद्ध प्रतिक्रिया आहेत

    ReplyDelete
    Replies
    1. ज्ञानवादाच्या लेखावरील प्रतिक्रिया आहे. जादूटोणाविरोधी कायद्यासंबंधात नाही.प्रसिध्द करतांना मागेपुढे क्रम बदलला गेला असावा.कृपया माफ करा. अभय वांद्रे,मुंबई.

      Delete
    2. ज्ञानवादाच्या लेखावरील प्रतिक्रिया आहे. जादूटोणाविरुध्द कायद्यासंबंधाने नाही.प्रसिध्द करतांना मागेपुढे क्रम बदलला गेला असता. कृपया माफ करा. अभय, वांद्रे, मुंबई.

      Delete
  6. सुंदर



    सोपी भाषा वापरून अवघड विषय सोपा झाला आहे

    आपण सर्व आता जादूटोणा करूया

    अतिशय अवघड जादू सोपी करून लोकांना सांगूया कि

    जीवनात जारण मारण वगैरे या भ्रम निर्माण करतात

    खरे असे काहीच नसते

    राजकीय शक्ती पण कधी कधी असे प्रयत्न करतात

    काही सामाजिक स्तरावर पण असे घडते पण डॉ बाबासाहेब आणि

    म गांधी यांनी आपले जीवन या देशासाठी अर्पण केले आहे त्यामुळे

    समाजातील धर्माचे दलाल आता लवकरच पकडले जातील आणि

    कांद्याचे भाव आनी देव दर्शनाचे भाव खाली येतील

    येत्या निवडणुकात केजरीवाल पर्माने आपन महाराष्ट्रात नवीन पक्ष काढून इलेक्शन खेळून सर्व जागा जिंकूया आणि नवे विचार नवी पुस्तके नवा अभ्यास ठरवूया आणि पहिले काम

    पुणे विद्यापीठाचे नाव फुले आंबेडकर शाहू असे ३ इन १ करूया

    ReplyDelete
  7. आपण आता पुणे विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले करूयाच

    खरेतर हे पूर्वीच करायला हवे होते

    पुणेचे लोक हट्टी आहेत पुणे विद्यापीठाला गेटला डॉ दाभोलकरांचे नाव द्या

    आता मुंबई विद्यापीठचे नाव बालासाहेब ठाकरे आणि करूया डॉ आंबेडकर हे त्या विद्यापीठात शिकायला किंवा शिकवायला होते असे वाचले आहे म्हणून त्यांचे नावाने त्या गेट का नाव ठेवूया

    ReplyDelete
  8. आपण संर्वानी आत्ता जादू आणि इतर गोष्टींचा निषेध करूया

    त्यासाठी सर्व जादुगार लोकांच्या घरावर मोर्चा काढून त्याना निवेदन देवू या

    आणि त्याना जादूचा वापर फक्त चांगल्या कामासाठी करायाला सांगुया

    आणि

    त्याना जादूने गुन्हेगारांना पकडायची विनंती करुया त्यामुळे सगळीकडे शांतता निर्माण होईल आणि

    सर्वाना सोनावणी सरांची पुस्तके वाचायचे राष्ट्रीय काम करायला सांगुया

    भारत चीन सीमेवर आपण जादूचे प्रयोग करून त्याना पळवून लावूया

    संत तुकाराम सिनेमात जशे सर्व पिक डोलताना दाखवले आहे तशी क्याशट सर्व शेतावर लावून पिके जास्त घेवूया

    पुण्यात जादूचे प्रयोग सर्व शाळातून ग्यादरिंग मध्ये फुकट करूया

    पुण्यातले लोक फुकटे आहेत त्याना हे आवडेल



    आपण डॉ दाबोलकर यांचा हरतालिका च्या आकाराचा पुतळा सर्व शाळातून वाटूया

    आणि दर पौर्णिमेला त्याची आठवण करूया

    सोनावणी सरांनी यावर एक कादंबरी अजून का लिहिली नाही?

    सर सर तुम्ही आणि एक कवितापण करा आणि एक चित्र काढा

    प्रा रामटेके य़ाणा त्यांनी डॉक्टर आंबेडकर आणि डॉ दाभोल्कार यांच्यावर नाटक आणि हरी नरके याना कादंबरी लिहायची वीनंती

    ReplyDelete
  9. पुणे विद्यापीठाचे नाव पुणे आणि मुंबई विद्यापीठाचे नाव मुंबई असे हास्यास्पद प्रकार याच महाराष्ट्रात घडू शकतात याला काय अर्थ आहे

    भारतात मौलाना आझाद हे किती थोर होऊन गेले

    त्यांनी पहिल्याच दिवशी वंदे मातरम चालू झाल्यावर ओरडून करा असे सांगितले त्यावेळेस न्हेरू अम्बेडकर पटेल सर्व हादरले त्यांच्या नावानेपण विद्यापीठ आहे

    दक्षिणेत तर बोलूच नका तिथे नात नात्यांची मंदिरे आहेत मग आपण निदान सर्व गावाच्या नावाने असलेल्या विद्यापिठाना थोर ( चोर नव्हे ) लोकांची नावे द्यायला काय हरकत आहे

    चोरांचे म्हणाल तर लिस्ट अफाट वाढेल पण थोर म्हणाल तर आता आहेत कुठे थोर ?

    फक्त आंबेडकर फुले नि शाहू इन बिन तीन , अगदी जागा असेलच तर त्यांच्या बायका घ्या

    त्यानंतर नवले कराड आणि कदम आहेतच

    दि वाय पाटील आहेतच

    साहेब तर सगळ्यात शेवटी - ते फारच थोर आहेत त्यांचे अंतर राष्ट्रीय स्कूल प्रसिद्ध आहे

    आणि ते सोनावणी सरांचे परमस्नेही आहेत साहेबांच्या घरात सोनावणी सरांची सर्व चित्रे टांगलेली आहेत आणि कपाटात सर्व कादंबर्या आहेत

    आता त्यांचे २००० पानांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाल्यावर ते काही तासात सर्व महाराष्ट्रात पेक लाट निर्माण करेल सर्व महाराष्ट्र त्याची वाट बघात आहे

    त्याची कीमत असेल त्यातून सोनवणी सरांच्या गावात विहिरी खणून तिथे पाती लावायची सरांची इच्छा आहे आज ते जे कार्य करत आहेत त्यामुळे सर लवकरच नोबेल चे बक्षीस मारणार हे नक्की

    टंचा वाचक वर्ग आता काही कोटीत पोचला आहे

    महाराष्ट्रात दर ३ माणसात १ जन त्यांच्या कवितांचा कादम्बर्याचा किंवा चित्रांचा वेडा झाला आहे

    सावित्रीबाई आंबेडकर यांचा विजय असो

    सॉरी सावित्रीबाई फुल्यांचा विजय असो

    यशवंतराव म्हणायचे आपण बेरजेचे राजकारण करुया फुल्या किंवा भागाकाराचे नाही ते काय ते आत्ता कळतंय फार हुशार माणूस

    दोघेही यशवंत राव सगळेच मोहिते होळकर चव्हाण सगळे च यशवंत

    अहिल्याबैन होळकर यांचा विजय असो त्यांचे नाव कोणाला ध्यायचे ?

    ReplyDelete
  10. सोनवणी चले अपनी चाल
    कुत्तात्रेय भुकत है भुकने दो

    ReplyDelete
  11. वशीकरण विरोधी कायदा आहे काय?

    ReplyDelete
  12. वाघेश साळुंखेMarch 16, 2022 at 7:44 PM

    जादूटोणा विरोधी कायद्याच्या उपयुक्ततेबद्दल आता पुन्हा नव्याने लिहावे लागेल.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...