Saturday, December 28, 2013

प्रकाशाची मला भिती वाटतेय....

कोठेतरी सारे व्यर्थ
नि उदास वाटतंय
तुडूंब भरलेल्या
काळोखी हृदयाला
घनकाळोखात डुबवावे वाटतंय
एकही लकेर रसरशित
शिरू न शकावी
असल्या कुहरात शिरावसं वाटतंय...

पुन्हा धरित्रीच्या मूक
गर्भाशयात जावंसं वाटतंय!

या कोणत्या वेदना आहेत?
हे कोणते आक्रोश आहेत?
ज्याला काही प्राप्तच करायचे नव्हते
त्याच्या वाट्याला आलेले
हे कोणते प्राप्तन आहे?
मृत्युच्या शवाशी
संभोग करणारे
हे कोणते प्रेत आहे?

काहीही समजत नाही...
काहीही उमगत नाही
चौबाजुंनी उसळनारे उद्रेकी
आक्रोश थांबत नाहीत
व्यर्थतेला सार्थ बनवणारे
हात नाहीत
स्वत:च स्वत:ला
गाडत न्यावे
त्याला पर्याय नाही...

प्रकाशाची मला भिती वाटतेय
त्याच्या स्पर्शातील
एकाकीपणा सोसण्याची
हिंमत हरपतेय......
काळोखही साथ नाकारतोय
अवचित पाठीत खंजिर
खुपसणा-या
विश्वासघातकी
मित्रासारखा...
मृत्युसारखा!

7 comments:

  1. संजय सोनवणी ,

    अतिशय मनाला भिडणारे आहे हे सर्व

    पण आपण अतिशय सुंदर काळजाला हात घालणारे लिहिले आहे

    आपण भावना मांडताना अतिशय हृदय द्रावक मांडणी केली आहे

    " पुन्हा धरीत्रीच्या मूक गर्भात जावेसे वाटत आहे " अशा ओळी हृदयाचा घेतात

    असेच लिहित राहाल अशी २०१४ साठी आशा करतो

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर. माझ्या ब्लोगवर आपला अनेकांनी अपमान केलाय...मी क्षमा मागतो. परमेश्वर त्या नीचांना सद्बुद्धी देवो!

      Delete
  2. संजय सर ,

    माझ्या नावाचा गोंधळ असेल असे समजू

    कुत्तात्रेय म्हणजे दत्तात्रेय असे कुणाला वाटले असेल

    माझा राग नाही एकुणातच मी कमी असतो या मध्ये

    आपण सक्षम आहात आणि उदार मतवादी आहात हाच महत्वाचा मुद्दा

    ब्लोग तुमचा आहे त्याला चाळणी आपणच लावणार हि खात्री आहे

    धन्यवाद

    ReplyDelete
  3. सर ,

    आपण या काव्यात फार उच्च पातळी आहे - शब्दशः हि कविता तोंडपाठ होणे कुणालाही आवडेल !

    नट सम्राट या गद्य नाटकातील मुक्त काव्याची - अनेक वाक्यांची आठवण होते आपली कविता वाचताना !

    फारच सुरेख -मनाच्या तळातून आल्याशिवाय अशा ओळी येणार नाहीत!

    जीवन खऱ्या अर्थाने आणि अंगाने जगताना अनुभवांची जी साय धरते त्यातूनच अशी मानसिक अस्वस्थता येते कवीच्या वाट्याला

    -

    हि अवस्था मी अनुभवली आहे - त्यामुळे आपण एकाच अनुभव शेयर करतो आहोत हा आनंद लाभतो या वेदनेतून मिळणारा - भावनिक सोबतीचा हा आनंद अनमोल आहे !



    पुढील वर्षात आपल्या कडून खूप अपेक्षा आहेत

    आपण अनंत अंगाने अनेक पातळीवर जीवन जगात असणार त्यामुळे हा उद्वेग असा बाहेर येतो आहे

    आमच्या सारख्या ला अशा वेदना म्हणजे सुद्धा एक पर्वणीच वाटते हा एक स्वार्थी पणाच म्हणायचा नाही का ?गझल म्हणणारा किंवा म्हणणारी जशी स्वतः त्या दुःखाशी समरात होताना आपले दुःख त्या ओळीत शोधत असतात तसेच हे लेखक वाचकाचे नाते आहे

    अभिनंदन !

    ReplyDelete
  4. संजय सराना नवीन वर्षाच्या शुभेच्छा

    आपली २०१३ शी निरोप घेणारी कविता अतिशय अस्वस्थ करणारी आहे

    मी त्याची पारायणे केली आणि न राहवल्यामुळे लिहित आहे

    प्रकाशाची भीती वाटून कोठेतरी सारे व्यर्थ वाटत आहे हि निराशा आमच्या सारख्या आपल्या

    चाहत्यांना अधिकच निराश करणारी आहे आपला विविध विषयांचा आवाका स्तिमित करणारा आहे आणि आपली मुळात जाउन संशोधन करणारी वृत्ती एक विषयाला नवीन दिशा देते

    आणि तेच तेच वाचनात येणाऱ्या गोष्टी आपण मोडीत काढत नवीन बाजू लीलया मांडता हे एक विशेष आहे आणि

    प्रस्थापित विचारांची कोंडी आपण मोडू शकत नाही आणि आपल्या विचाराना राजमान्यता लाभत नाही अशीतर आपली वेदना नाही ना ?

    आपल्याला कसले शल्य आहे ?

    आपल्याला नाकारले गेल्याचे ?

    आपले विचार प्रस्थापिताना भावात नाहीत ?

    मग हि याच मातीत परत गाडून घेण्याची हताश मनीषा का आपला पाठलाग करत आहे ?आम्हाला असे आपल्या कडून लिहिलेले वाचले कि फार फार चिंता वाटते !

    काळजी घ्या सर !

    ReplyDelete
    Replies
    1. Aabhari ahe Pradnya...Nahi...vyaktigat shaly nahi...saamajik vedana kadhi kadhi umadalun yetat evadhech!

      navin varshachya hardik shubheccha!

      Delete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...