Thursday, January 30, 2014

राहूल गांधींची मुलाखत ...



गेल्या दहा वर्षात प्रथमच राहूल गांधींनी अर्णब गोस्वामींना ८० मिनिटांची प्रदिर्घ मुलाखत दिली आणि मोदी भक्तांनी आणि मिडियाने त्यांच्यावर हल्ला चढवला. या मंडळींना मोदी करण थापरच्या मुलाखतीतून पळून जावे लागले ह्पोते हे मात्र सोयिस्करपणे विसरले गेले. राहुलला अडचणीत आनणारे प्रश्न वारंवार विचारले जावुनही त्यांनी तसे केले नाही. राजकीय नेता म्हणून राहुल गांधी अजुन गेंड्याच्या कातडीचे झाले नाहीत हे मात्र सिद्ध झाले. (आणि होऊही नये...)

अर्नब जानीवपुर्वक मोदी विरुद्ध राहुल असे द्वंद्व पेटवण्याच्या प्रयत्नांत असतांना रहुलनी फक्त तीन वेळा त्यांचे नांव घेतले. अर्नब पत्रकार आहे व त्यांना टी.आर.पी. हवा आहे हे उघड आहे. परंतु हा संघर्ष राहुल विरुद्ध मोदी हा नसून दोन विचारधारांमधील आहे हे राहुलनी अधोरेखित केले. भाजपची विचारधारा सत्तेच्या केंद्रीकरणाकडे जात असून आपल्याला सत्तेचे विकेंद्रीकरण हवे आहे असे राहूल म्हणाले. किंबहुना हाच खरा आधुनिक भारतासमोरील व लोकशाहीसमोरील कळीचा मुद्दा आहे हे अर्णब यांनी लक्षात घेतले नाही. आम आदमी पक्षाचे यश हा याच जनभावनेचा संदेश आहे हे उघड आहे. भारतीय लोकशाहीला सत्तेचे केंद्रीकरण परवडनारे नाही, हे आपण आणिबाणीच्या काळात अनुभवले आहे.

पुर्वी या बाबत कोन्ग्रेसने काय केले हा खरे तर गैरलागू प्रश्न आहे. पिढ्या बदलतात तसे पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचेही विचार कालानुरुप बदलतात. राहूल जर बदलाचे सुतोवाच आणि तशी कृती करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याचे स्वागत व्हायला हवे.

अर्णबनी शिख हत्याकांड आणि गुजरातचा नरसंहार एकाच तराजुत मोजला. शिख हत्याकांड सर्वस्वी वाईटच होते पण ते सरकार प्रायोजित नव्हते आणि कोंग्रेसने शिख समुदायाची त्यासाठी जाहीर माफी मागितली आहे, तसे भाजपने केलेले नाही. गुजरातमधील दंग्यांच्या केसेस अन्य राज्यात चालवाव्या लागल्या एवढी नामुष्की होऊनही ज्यांना त्यांचे समर्थ करावे वाटते त्यांनी खुशाल करावे.

राहुल गांधींचा मुख्य भर महिला व तरुनांचे सबलीकरण, सत्तेचे विकेंद्रीकरण, ग्रामीण भारताचा व एकुणातीलच देशाचा विकास यावर होता. ते वारंवार तेच सांगत होते. परंतु पत्रकारांना सहसा विकासाबाबत बोलायचे नसते. माहिती अधिकार, पंचायत राज, अन्नसुरक्षा, लोकपाल, रोजगाराचा हक्क इत्यादी जमेच्या बाजू सध्याच्या केंद्र सरकारकडे आहेत. गेल्या दहा वर्षात जेवढ्या राजकारण्यांवर, उच्च-पदस्थ अधिका-यांवर खटले भरले गेले, जेलयात्रा करावी लागली ती तशी तत्पुर्वी झाली होती काय या प्रश्नाचा विचार करण्याचे तारतम्य राहुल अथवा कोंग्रेसच्या टीकाकारांत नाही, हे कशाचे लक्षण आहे?

आज भारत हा जगातील सर्वात तरुण राष्ट्र आहे आणि नव्या पिढीच्या आकांक्षा साकार व्हायच्या तर राजकारणातील त्यांचा सहभाग वाढणे आवश्यकच आहे. राहुल गांधी त्यासाठीच प्रयत्न करत आले आहेत. कार्यकर्त्यांनीच आपला उमेदवार निवडावा यासाठी त्यांनी १५ लोकसभेच्या जागाही मुकर्रर केलेल्या आहेत. या जागा कमी आहेत याबद्दल कुचेष्टा करतांना इतर पक्षांनी याबाबत काय केले हा प्रश्न नाही काय?

ही बाब मान्य केलीच पाहिजे कि हा दोन विचारधारांमधील संघर्ष आहे...व्यक्तींमधील नाही. व्यक्तिकेंद्रीत राष्ट्रीय राजकारण करण्याचे व राबवण्याचे दिवस संपले आहेत. भाजपाची विचारधारा (जनस्मरण कमी असले तरी) काय आहे हे आणि ती खरोखरच लोकशाही मुल्यांना जपणारी आहे काय या प्रश्नाचे उत्तर सर्वांनाच माहित आहे. कोंग्रेस (केवळ पक्ष म्हणून नव्हे) ही एक विचारधारा आहे. या धारेत स्वातंत्र्योत्तर कालात चढ-उतार झाले असतील, आणि आता ती लोकशाहीची मुल्ये जपत नव्या परिवर्तनाला स्वीकारत असेल तर तिचे स्वागत करायला हवे.

राहूल अट्टल राजकारणी नाही आणि हीच त्यांच्या जमेची बाजू आहे. संवेदनशील राजकारणी असे त्यांचे वर्णन करता येईल. त्यांने सरकारला अनेक निर्णय फिरवायला कोंग्रेसच्या व्यासपीठाचा उपयोग केला याला अनेक लोक "नौटंकी" म्हणून हीणवतात. वस्तुस्थिती अशी आहे कि कोंग्रेसमद्धेच आता जुने नेते आणि राहुलमुळे नव्या पिढीचे नेते अशी दुफळी झालेली आहे. जुन्यांना आपली सत्ताकेंद्रे व त्यामुळेच आलेली मनमानी सोडायची नाहीय. ती सोडायला भाग पाडण्यासाठी राहूल कोंग्रेसच्याच व्यासपीठाचा उपयोग करत असतील आणि त्याचा फायदा आम्हाला-तुम्हालाच होणार असेल तर त्याला हास्यास्पद ठरवणा-यांच्या बुद्धीचा विचार करायला हवा.

अलीकडच्याच चाचण्यांमुळे आज चित्र असे दिसते कि संधीसाधु पक्ष आणि त्यांची काहीही होवो---सत्तेतच रहायचे अशा मनोवृत्तीची नेतृत्वे भाषा बदलू लागली आहेत. अशाच संधीसाधुंमुळे देशाचे वाटोळे झालेले आहे. त्यांना कसे हटवायचे व नवी सत्ता-विकेंद्रित अवस्था कशी आनायची हे नागरिकांसमोरील मोठे आव्हान आहे. पंचायत राजमुळे सत्तेचे वितरण झाले पण ते अधिक सक्षम करायला हवे याबाबत दुमत असायचे कारण नाही. भ्रष्टाचाराची अधिकाधिक प्रकरणे माहितीच्या अधिकारामुळेच उजेडात आलीत. तत्पुर्वी प्रकरणे उजेडात येत नव्हती म्हणून भ्रष्टाचार होत नव्हता असे आहे कि काय? अधिक प्रकरणे उजेडात आली म्हणून ब्रष्टाचार-भ्रष्टाचार ओरडण्यापेक्षा यामुळेच भविष्यातील भ्रष्टाचार नियंत्रणात येईल हे आपण लक्षात घ्यायला हवे.

मी राहूल अथवा कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही. पण विचारधारा महत्वाची आहे. लोकशाही समृद्ध होईल अशाच विचारधारेला समर्थन देणे ही आजच्या उद्रेकी आणि विक्षोभी काळाची गरज आहे.


6 comments:

  1. सुरेख !अतिशय विचार करायला लावणारे विवेचन आहे
    सर्वात महत्वाचे म्हणजे दोघेही अजून ब्रह्मचारी आहेत आणि अजूनही दोघांच्या बद्दल कोणीही काहीही अद्वातद्वा आरोप केलेले नाहीत हे दोघांच्या उच्च नितीमत्तेची कल्पना देते
    पक्ष वेगवेगळे असले तरी दोघाना भारताची प्रगती अपेक्षित आहे हे महत्वाचे आहे
    भारत या दोघांच्या हातात सुरक्षित आहे असे समजायला हवे असे आमच्या
    सुतार बाईंचे म्हणणे आहे
    अर्नब गोस्वामी हा अतिशय भडकावणारा पत्रकार आहे आणि तरीही राहुलजीनी अतिशय संयम राखत उत्तरे दिली आम्ही सर्वानी ती मुलाखत पाहिली ,
    आमच्या शाळेतील सर्व जण खूष होते
    शिशुवर्गातील प्रत्येक तुकडीत आम्ही दोन्ही अपेक्षित पंत प्रधानांचे फोटो लावले आहेत ,एकमेकांकडे बघताना ते जणू रोज भारताच्या विशाल स्वप्नांच्या पूर्ततेची शपथ घेत आहेत असे वाटते

    आता आपण भ्रष्टाचाराच्या विळख्यातून मुक्त होणार आणि आपण तशी स्पेशालिटी मिळवली की आपण सर्व जगाला म्हणजेच चीन जपान रशिया अमेरिका असे सर्वांनाच भ्रष्टाचार मुक्त करू शकू !असे आमच्या गायनाच्या किणेकर बाई म्हणत होत्या - त्यांच्यामते आपण आपल्या देशातून त्यांच्या देशात भ्रष्टाचारी नसलेले लोक पाठवू शकू !आणि त्यांच्या कडून आपल्याकडे कांदे आणि साखर असे पदार्थ आणून सर्व जगाचे कल्याण करू शकू !
    सर्व पक्षांनी ठरवले की सर्वांनी मिळून एकत्र काम करायचे तर आपला भारत सर्व प्रश्नांवर उत्तरे शोधून पुढे जगाला मार्गदर्शन करेल आणि केजरीवाल यांचे सहाय लाभले तर अजूनच वेग वाढेल ,कारण कॉंग्रेसने जे केले नाही ते केजरीवाल १० दिवसात करतात असे ते म्हणतात - त्यामुळे भारताची स्वप्ने केजरीवाल यांच्या सहाय्याने ३ महिन्यात पूर्ण होतील असे आमच्या चित्रकलेच्या शेळके बाईंचे म्हणणे आहे
    आज जगात कोणताही देश सुखी नाही पण आपण जर इतर देशाना सुखी केले तर आपल्याला सैन्याच लागणार नाही आणि आपला तिरंगा सगळीकडे सन्मानाने फडकेल असे आमचे खोब्रागडे सर सांगतात
    आपल्याला फार मोठा वारसा आहे पं जवाहरलाल यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक सर्वाना वाचण्यास दिले तर किती छान घडेल ,खरेतर कॉंग्रेसने असे नवीन कार्यक्रम राबवावेत त्यामुळे समाज जीवनावर एकत्रित संस्कार होत जातील आणि भारत खरे निधर्मी राष्ट्र होईल आणि सर्व मुस्लिम आणि हिंदू यांच्यात सर्व धर्म समभाव निर्माण होत जाईल
    हीच म गांधीना खरी श्रद्धांजली ठरेल
    महर्षी शिंदे शिशु शिक्षण केंद्र,खंडाळा

    ReplyDelete
  2. संजय सर ,
    आपण किती आत्मियतेने आपले विचार सांगितले आहेत आणि छोटीछोटी मुले सुद्धा आता राजकारण आणि सामाजिक आंदोलने यांचे भान ठेवून एकीकडे अभ्यास करतात हे पाहून आनंद झाला
    आपल्या देशात पुढची १० वर्षे फक्त प्रामाणिक काम करणारी मंडळी एकत्र आली तर किती छान होईल
    सगळे रस्ते स्वच्छ असतील कुणीही रस्ते आणि बागा यात थुंकणार नाही
    आंधळ्या लोकाना रस्ता क्रॉस करायला तरुण वर्ग मदत करेल कुणीही कष्ट करताना दमणार नाही आणि नेमलेले काम वेळात पूर्ण करेल रस्त्यात एकही खड्डा नसेल आपले सैनिक सारखे देशाच्या अंतर्गत भागात बोलवावे लागणार नाही आणि त्याना २६ जानेवारी शिवाय कामच नसेल सर्व हिंदू लोक ईदच्या दिवशी नमाज पध्दतील आणि मुस्लिम लोक गणपतीच्या आरतीला हजर असतील आणि हिंदू मुस्लिम दोघेही ख्रिश्चन लोकाना नाताळला शुभेच्छा देतील

    आता सर्व महाराष्ट्रात अफझलखान आणि औरंगजेब यांच्या पुण्यतिथ्या साजऱ्या होणार आहेत आणि त्याना ब्रह्मणानीच कसे विनाकारण विद्वेष भडकवण्यासाठी मारले ते सांगितले जाणार आहे तसेच शिवधर्मतर्फे दरवर्षी आग्र्याहून महाराज पळाले तसे बर्फीच्या पेटाऱ्या तून आग्रा पुणे अशी यात्रा काढणार आहेत
    त्यामुळे देशात दंगली होणार नाहीत आणि भारतात शांतता नांदेल त्यामुळे आपले शत्रूही आपले कौतुक करतील

    शाळेत गणित भूमिती अजून सोपे केले जाईल आणि व्याकरण शिकवणे बंद केले जाईल
    श्री संजय सोनवणी याना व्याकरण विरहित डिस्कव्हरी ऑफ इंडिया चे मराठी भाषांतर करण्याचे काम सोपवले जाईल ते त्यांनी मोफत केल्यास त्यांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाईल असे ठरत आहे
    सर्व ब्राह्मणाना मंदिरात गेल्यास हिंदू धर्मातून ५ वर्षासाठी निलंबित केले जाईल

    आणि आप पक्ष जिथे गरज आहे तिथे कोन्ग्रेसची आणि/किंवा भाजपाची मदत घेत सरकार चालवेल अशा रीतीने केजरीवाल हे संपूर्ण काश्मिरपासुन कन्या कुमारीपर्यंत लोकप्रिय होतील आणि आज ६५ वर्षे मार्गी न लागलेले प्रश्न मार्गी लावतील
    सर्व खेळांचे नियम आणि शाळेतील अभ्यासक्रम सोपे केले जातील
    सर्वाना समतोल आहार दिल्यामुळे रोगांचे प्रमाण अल्प होत जाईल

    खर्च आणि महागाई कमी झाल्याने सर्व जुन्या लोकांचे पेन्शन ते आपणहून बंद करा असे म्हणतील

    तुरुंगात संजय नावाच्या सर्वाना कायमचे तुरुंगाबाहेर रहायची शिक्षा दिली जाइल - सिनेमाची तिकिट दर कमी केली जातील आणि ग्यास प्रमाणे प्रत्येकास १२ सिनेमे वार्षिक फुकट पाहता येतील
    अशारीतीने समाज उपयोगी कामे केल्यास सर्व देश आणि समाज आनंदात नांदेल !

    नितीन हगवणे ,गगनबावडा

    ReplyDelete
  3. आप्पा - काय सुंदर मुलाखत होती आणि किती सुंदर उत्तरे दिली या नवीन तरुण नेत्तृत्वाने
    !अहो अगदी वडिलांसारखा राजबिंडा दिसतो नाही का ? बाप्पा ,संजय सर म्हणतात तसा हा दोन विचारधारांचा संघर्ष आहे , पण हा पांढरी दाढीवाला अगदीच बनिया वाटतो आणि त्याचे विचार अगदीच बाबा आदमच्या जमान्यातले आहेत !चांगलीच धमाल केली आहे या पांढऱ्या दाढीने !

    बाप्पा - मला एक प्रश्न आहे , आर एस एस आणि मोदी यांच्याकडे जर सर्व प्रश्नावर उत्तरे आहेत असे ते म्हणतात तर ते काम का करत नाहीत त्याला काय
    सत्तेच्या खुर्चीतच बसायची अट आहे का ?एक नम्बरचा लबाड आहे त्यापेक्षा आमचे अजित पवार बघा ,एकदम तरुण आणि पटकन निर्णय असतो !
    आप्पा - अहो बाप्पा ,तिथेच तर घोड पेंड खातय , भरमसाठ स्वप्ने दाखवत केजरीवाल दिल्लीत आला आणि आता कशी फजिती होत्ये त्यांची ?सगळी नुसती स्वप्ने - पोकळ - त्यापेक्षा आपला मराठी बाणा बारा ! आणि तुम्हाला माहित आहे का -
    नितीन हगवणे सर आपल्या गगन बावड्याचे सांगत होते की आता आग्रा नगरीत मिठाई च्या पेटाऱ्या तून महाराज कसे पळाले ते दाखवणारा लाइव्ह शो रोज होतो आहे - त्यासाठी सभासद नोंदणी चालू आहे
    मला शिवाजी म्हणून पेटाऱ्या तून यायला आवडेल - थोडा त्रास - पण ज्यांची दुप्लिकेट होण्याची सुद्धा आपली लायकी नाही इतके हे थोर व्यक्तिमत्व ! विशाल सागरासारखे किंवा सह्याद्री सारखे ,
    बाप्पा - असे म्हणतात की दिल्लीला अजूनही ते पेटारे जपून ठेवले आहेत भुजबळ साहेबांनी आपल्या नवीन महाराष्ट्र सदन इथे !प्रत्येकास १०० रुपये तास असे त्यात बसायला देतात !
    आप्पा - आपले माननीय सार्वजण त्यात बसून आले आहेत !प्रसाद म्हणून मिठाई पण देतात !

    बाप्पा - आता भारत सरकारचे सर्व प्रश्न संपणार आहेत असे दिसते . पूर्वी एकच नेता असायचा पण सर्व पक्षात उत्तम नेत्यांचे पीकच आले आहे त्यामुळे आता आपला देशसर्व जगात पहिला येणार !

    आप्पा - ऑलिम्पिक मध्ये आता सर्व पदके आपलीच कारण आपले नेत्तृत्व तरुण वर्गाकडे येणार आणि भ्रष्टाचार मुक्त असे वातावरण असणार -!पूर्वी जी कामे अडकून रहात असत ती आता पटकन होणार - अगदी एतटीएम मधून जसे पैसे येतात तशी पटकन !बाप्पा - पण मला एक सांगा ,
    निवडणूक घ्यायलाच हवी का असे एक मावशी विचारात होती - सगळ्यांनाच देशाचे चांगले करायचे आहे तर ते एकत्रितपणे करा की !

    बाप्पा -वीज ग्यास गहू तांदूळ सगळे स्वस्त करा , रस्ते छान करा , सगळ्याना रहायला जागा आणि नोकरी द्या ,धरणे बांधा - दुधाच्या नद्या वाहू देत
    आणि मग राज्य करा आणि चोरांना पकडा ,आई बहिणीना त्रास देणारी असतील त्याना पकडा , लुटणारे असतील त्याना पकडा ,
    आप्पा - चल तर मग आपण दिल्लीला जाऊ या - महाराजांच्या पेटाऱ्या मध्ये बसायला - दिल्लीत पाचशे सुट्टे देत नाहीत अरे बाबा देशाची राजधानी आहे ना ? आपण आपले पेटाऱ्याचे १०० रु प्रत्येकी वरच काढून ठेवूयात ! चला चला !

    ReplyDelete
  4. जसे पूर्वी नर्मदा प्रदक्षिणा करत तसेच नव्याने हे आपले शिवधर्मीय आग्रा रायगड यात्रा सुरु करणार हे वाचून झाला , फक्त काही विचारतो
    १२ वर्षा खालील ६० वर्षा वरील लोकांना जसे रेल्वेत अर्धे तिकीट असते तसेच का ?
    पेटारा किती मोठा आहे एका पेटाऱ्यात किती जण असणार ?आणि फ्यामिली प्याक आहे का ?
    आम्ही जाती मानत नाही आणि धर्म सुद्धा तर तिथे आम्ही मराठीत घोषणा दिल्या तर ?
    आषाढी प्रमाणे आमची आग्रा रायगड दिंडीची तयारी आहे तर सरकार काय मदत देईल ?
    आम्हाला दिल्ली आणि आग्र्याला शिव धर्म सांगण्यासाठी कायमचे व्यासपीठ मिळेल का ?

    ReplyDelete
  5. संजय सोनावणी ,
    आपल्या या लेखनास काहीच प्रतिसाद नाही ?
    आपल्या कवितांचे समजू शकतो त्या डोक्या वरून जातात पण . राजीव यांचा बद्दलचा लेख इतका सुंदर असून इतकी शांतता का ? सगळे ब्राह्मण एकदम मौन व्रत धारण करून?
    खरेतर गांधी कुटुंब पण ब्राह्मणच आहे तर इतका द्वेष का ?
    रायगड पेक्षा रंकाळ्या वरून यात्रेची सुरवात करून आग्रा येथे यावे आणि गाडीला शाहू एक्स्प्रेस असे नाव द्यावे तसेच सातार हून एक बोगी जोडण्याची ते बघावे
    मोनोरेल प्रकल्प आग्रा इथपर्यंत आखावा आग्रा अमेठी कोल्हापूर असा रूट जमेल का ?आणि त्यास
    जवाहर इंदिरा राजीव आणि राहुल असे नामकरण करावे किंवा जे-वीर करवीर असे म्हणावे
    जवाहर इंदिरा राजीव असा तो प्रकार ! महाराजांच्या तीन पिढ्या आणि जवाहराञ्च्या तीन पिढ्या !सोमनाथ

    ReplyDelete
  6. ek fasalela lekh... ha ha ha.. nahi tithe ghusaycha prayatna asa mahagat padato!!

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...