Saturday, February 1, 2014

पुष्यमित्र शृंग आणि त्यांची भाषा!


                                                    (Brahmi Inscription on Heliodorus' pillar)


मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याची हत्या करुन त्याचा सेनापती पुष्यमित्र शृंग इसपु १८४ मद्धे सत्तेवर आला. मौर्य घराण्याचे तत्पुर्वीचे सारे लेख प्राकृतात आहेत हे आपण पाहिले. शृंग घराणे हे वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करणारे मानले जाते. त्याच्याच काळात मनुस्मृती लिहिली गेली तसेच त्याने दोन अश्वमेध यज्ञ केले असे म्हटले जाते. अशोकानंतरचे मौर्य राजे हे बौद्ध धर्मीय असल्याने त्यांचे शिलालेख प्राकृतात होते असे जरी गृहित धरले तर मग वैदिक धर्माचा समर्थक आणि प्रोत्साहनकर्ता आणि बौद्ध धर्माचा विरोधक पुष्य़मित्र शृंगाने तरी संस्कृताचा आश्रय घेतला असता. पण तसे दिसत नाही.

शृंग घराण्याने इसपू १८४ ते इसपु ७३ या कालात (जवळपास १११ वर्ष) राज्य केले. सम्राट अशोकाच्या निधनानंतर अवघ्या ५० वर्षात शृग घराणे सत्तेत आले. शृंग नेमके कोणत्या वंशाचे/जातीचे/वर्णाचे याबातचा तिढा विवादास्पद असला तरी भारतीय विद्वानांचे हे घराने ब्राह्मण होते असे साधारण मत दिसते. प्रस्तूत विषयाशी अर्थात त्याचा संबंध नसल्याने या विषयात फारसे जाण्याचे हशील नाही. परंतू अशोकानंतर अवघ्या ५० वर्षांत सत्तेवर आलेले आणि बौद्धधर्म विरोधी असलेल्या शृंग घराण्याच्या कालात किमान शृंगांनी जर अस्तित्वात असती तर संस्कृत भाषेचा उपयोग केला असता हे उघड आहे, मग जनभाषा काहीही असो.

येथे एक लक्षात घ्यायला हवे कि छ. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर आपल्या नाण्यांवर संस्कृतला स्थान दिले. एवढेच नव्हे तर राज्य व्यवहार कोशही संस्कृतात बनवून घेतला. प्रस्थापित फारसीला राजकीय दृष्ट्या नाकारले. शृंग बौद्धधर्मविरोधी असल्याने  व वैदिकाभिमानी असल्याने त्यांची राजभाषा वैदिक संस्कृत असायला हवी होती. पुष्यमित्र शृंगाच्या कालात नसली तरी पुढील अग्नीमित्रापासुनच्या पिढीत तरी संस्कृत अवतरायला हवी होती. पण तसा एकही पुरावा मिळत नाही.

पुष्यमित्राच्या अश्वमेधांची माहिती मिलते ती अयोध्या येथे   आणि पुराणांत. त्याने कोनतीही नाणी पाडलेली दिसत नाहीत कारण बहुदा त्याने राज्याभिषेक न करता आपले मुळची "सेनापती" हीच पदवी कायम ठेवली म्हणून.

पुष्यमित्रानंतर मालविकाग्निमित्र या कालिदासाच्या प्रसिद्ध नाटकाचा नायक अग्नीमित्र सत्तेवर आला. मथुरा विभागात त्याची नाणी सापडलेली आहेत. त्याची नाणी सर्वस्वी प्राकृत भाषेत असून त्यावर "अग्गीमितासा" असे अग्नीमित्राचे मुळचे नांव पंच केलेले आहे. हेही संस्कृतचे अस्तित्व नसल्याचा पुरावा आहे. कारण भाषा कोणतीही असो...नांवात कोणी बदल करत नाही अथवा नांवाचे भिन्नभाषित रुपांतरे वापरत नाही कारण लिपी एकच आहे व ती म्हनजे ब्राम्ही. ब्राह्मीत नंतरच्या काळात संस्कृत लेखही ब्राह्मी लिपीतच लिहिले गेलेले आहेत. म्हनजे ब्राह्मी लिपी व्यक्तिनांवाचे मूळ रुप (जे आपल्याला आज संस्कृतच मुळचे वाटते) लिपीबद्ध करायला कोणतीच अडचण नव्हती.

थोडक्यात "अग्गीमित" हेच मुळचे नांव असून अग्नीमित्र हे नंतरचे संस्कृतीकरण आहे हे उघड आहे. पुष्यमित्राचेही अयोद्ध्या लेखात नांव "पुस्समित सूग" असे आहे व त्याच्या वंशाला "सुगाना" असे म्हटले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. (कनिंगह्यम : Coins of India).  शृंगांच्या काळातील असंख्य शिलालेख उपलब्ध झालेले आहेत, परंतू ते सर्व प्राकृतात आहेत. काही शब्द मात्र प्राकृताकदून संस्कारित होतांना दिसतात. उदा. अधित्थावना या प्राकृत शब्दाचे रुप अधिष्ठापना. अशी अनेक अर्ध-संस्कृत ते संस्कृत शब्दरुपे या कालात भारहूत, सांची येथील शूंगांच्या अखत्यारीत असलेल्या भागांत पहायला मिलतात...परंतु लेख प्राकृतात आहेत. (Epigraphical Hybrid Sanskrit: Th Damsteegt.)

दानभूती हा शृंग वंशातील राजा मानला जातो. कनिंगह्यमच्या मते तो शृंगांचा सामंत असावा. भारहूत येथे एका दानलेखात त्याचेच नांव "वच्छीपुत दानभूती" असे कोरलेले आहे. हे प्राकृतात आहे हे उघड आहे. भारहूत येथीलच एका लेखात "सुगाना राजे" असा शृंगांचा उल्लेख आहे.

या काळात संस्कृत राजभाषेतही होती याचा एकही पुरावा नाही. उदा. ग्रीक राजदूत हेलिओडोरस हा शृंगांच्या दरबारी इसपू ११० मद्धे होता. त्याचा शॄंगांची तत्कालीन राजधानी विदिशेजवळ एक गरुडस्तंभ आहे. त्याने तो पांचरात्र संप्रदायातील तत्कालीन पूज्य देवता वासुदेवाला अर्पण करण्यासाठी उभारला. (पहा: पांचरात्र संप्रदाय) या स्तंभावर त्याने लेख कोरवला असून तो सर्वस्वी प्राकृतात आहे. एक परकीय राजदूत लेख कोरवून घेतांना प्राकृत भाषा वापरत होता ही संस्कृत भाषेची सर्वस्वी अनुपस्थिती दर्शवते.

या लेखात "गरुडध्वजो" व "देवदेवासा" हे अर्ध-संस्कृत रुपांतर सोडता अन्य मजकुर सर्वस्वी प्राकृतात आहे. म्हनजेच काही शब्द सोयीसाठी (देवदेवस्य ऐवजी देवदेवासा) संक्रमनावस्थेत होते. शृंगांच्या कालातही संस्कृत अस्तित्वात नसून ती बनत होती. शब्दांची सुलभ रुपांतरे होऊ लागली होती. अस्तित्वात असती तर अशी मिश्र रुपांतरे न मिळता शुद्ध रुपांतरे दिसली असती.

शृंग घराणे वैदिकाभिमानी असल्याने (वा तसा समज असल्याने) त्यांच्या १११ वर्षांच्या राजवटीत कोठेतरी, एकतरी शुद्ध अथवा वैदिक संस्कृतातील लेख मिळायला हवा होता. (कारण वेद मुलता:च वैदिक सम्स्कृतात लिहिले गेले असा सर्वसामान्य समज आहे म्हनून) परंतु प्रत्यक्षात शृंग कालात विकसीत होनारी...संस्कृत बनू पाहनारी प्राकृत व तीही काही शब्दरुपे मिलतात. शुद्ध सम्स्कृत म्हनता येईल असा लेख सोडा एखाद-दुसरा शब्दही मिळत नाही, ही बाब उल्लेखनीय आहे.

सर्वात महत्वाचे असे कि पुष्यमित्र शृंगाने दोन अश्वमेध केले हे प्राकृतातील लेखानेच नव्हे तर कालिदासाच्या नातकाने व पुराणांनीही सांगितले आहे. अश्वमेध यज्ञविधी यजुर्वेदांतर्गत येत असून सध्या हा वेद वैदिक सम्स्कृतात आहे. प्रश्न असा आहे कि वैदिक सम्स्कृत अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा शृंग घराण्याच्या व तत्पुर्वीच्या कालातील एकाही नानक-अथवा शिलालेखात मिळत नाही तर वेद त्या काळी नेमके कोणत्या भाषेत होते?


 (हेलिओडोरसचा गरुडस्तंभ "खांबबाबा" म्हणुन विशेषत: कोळ्यांकडुन पुजला गेलेला आहे.)

4 comments:

 1. जिस पाणिनि को संस्कृत व्याकरण का जन्मदाता कहा जाता है उसका जन्म सिंधु नदी के पास अटक नामक गांव में ईसा पूर्व ५२० में होने की बात कही जाती है. उनका ग्रंथ अष्टाध्यायी यदि पुष्यमित्र श्रुंग के समय में नहीं था तो पाणिनि क्या श्रुंग के बाद में जन्मा था? आपका तर्क यदि सत्य है तो पुष्यमित्र पाणिनि के पहले जन्मा बाद में नहीं. किन्तु इतिहास का कोई भी सबूत आपकी बात के समर्थन में नहीं है. संस्कृत के पुरानेपन का सबूत पाणिनि से मिलेगा या पुष्यमित्र से इसका फैसला आपको करना है.
  दिनेश शर्मा

  ReplyDelete
  Replies
  1. Sir, by all accounts Panini's period does not go beyond second century AD. You may refer my three articles on Great Grammarian Panini on this blog.

   Delete
 2. पुष्यमित्र शुंग (इ.स.पू.१८७–१५१).

  शुंग वंशाचा मूळ पुरुष व प्रख्यात सेनापती. मौर्य वंशानंतर ख्रि. पू. सु. १८७ मध्ये शुंग वंश उदयास आला. मौर्य वंशातील अखेरचे राजे अत्यंत निर्बल होते. त्यांच्या काळी बॅक्ट्रियाच्या डीमीट्रिअस या ग्रीक राजाने उत्तर भारतावर स्वारी करून साकेत (अयोध्या), मथुरा व पांचाल हे प्रदेश पादाक्रांत केले आणि पाटलिपुत्रापर्यंत धडक मारली. त्याच्या स्वतःच्या राज्यात उपद्रव निर्माण झाल्याने त्याला लवकरच भारतातून पाय काढावा लागला; तथापि या स्वारीमुळे मौर्य साम्राज्य खिळखिळे झाले, यात संशय नाही. या स्वारीचे उल्लेख पतंजलीच्या महाभाष्यात अरूणद् यवनः साकेतम्| अरूणद् यवनः मध्यमिकाम् | असे आढळतात. या परिस्थितीचा फायदा घेऊन शेवटचा मौर्य राजा बृहदरथ याचा शुंगवंशी सेनापती पुष्यमित्र याने सैन्यात फितुरी माजविली आणि मगधाची गादी बळकावली.

  शेवटच्या मौर्य राजांच्या कारकीर्दीत मगध राज्याचा संकोच झाला होता; पण पुष्यमित्राने आपली सत्ता दूरवर पसरविली. मध्य भारतात विदिशा येथे त्याचा पुत्र अग्निमित्र प्रांताधिपती म्हणून राज्य करीत होता; पुष्यमित्राच्या सहाव्या वंशजाचा लेख अयोध्येस सापडला आहे. दिव्यावदान ग्रंथावरून आणि तारानाथाच्या तद्विषयक उल्लेखावरून त्याचा अंमल पंजाबात जलंदर आणि शाकल (सियालकोट) पर्यंत पसरला होता असे दिसते.
  पुष्यमित्राने दोन अश्वमेघ यज्ञ केल्याचा उल्लेख अयोध्येच्या लेखात आहे. तरीही त्याने आपली ‘सेनापती’ ही पदवी बदलली नाही. कालिदासाचे मालविकाग्निमित्र नाटक तत्कालीन घटनांवर आधारलेले आहे. त्यातही त्याच्या याच पदवीचा उल्लेख आहे.

  पुष्यमित्राने वैदिक धर्माचे आणि संस्कृत विद्येचे पुनरुज्जीवन केले. त्याने अशोकाचे हिंसाविरोधी निर्बंध बदलून वैदिक यज्ञयागास अनुमती दिली आणि स्वतःही अश्वमेघासारखे यज्ञ केले. पतंजलीच्या महाभाष्यात इदं पुष्यमित्रं याजयामः| असे उदाहरण आले आहे. त्यावरून त्याच्या यज्ञांत पतंजलीने स्वतः ऋत्विजाचे काम केले होते, असे अनुमान करतात.

  पुष्यमित्राने बौद्धांचा छळ केला, असा एक प्रवाद आहे. दिव्यावदनात म्हटले आहे की, पुष्यमित्राने पाटलिपुत्रातील कुक्कुटारामनामक बौद्ध विहार उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यात त्याला यश आले नाही. नंतर त्याने चतुरंग सेनेसहित शाकलपर्यंत चाल केली आणि मार्गातील बौद्ध विहार उद्ध्वस्त करून बौद्ध भिक्षूंची कत्तल केली. शाकल येथे तर त्याने जो कोणी एका बौद्ध भिक्षूंचे शिर आणून देईल, त्याला शंभर दीनारांचे पारितोषिक मिळेल असे जाहीर केले; पण या सर्व दंतकथा दिसतात. त्यांना समकालीन लेखी आधार काहीच नाही. बौद्धांनी अशोकाच्या पूर्ण चरित्राविषयी अशाच दंतकथा पसरविल्या होत्या. याच्या उलट शुंगांच्या राज्यात बौद्ध धर्म भरभराटीत होता, हे भारहुत आणि सांची येथील तत्कालीन स्तूपांवरून व तोरणांवरून दिसते. भारहुत येथील तोरणावर तर सुंगानं रजे| (शुंगांच्या राज्यात) असा स्पष्ट उल्लेख आहे. पुराणांतील उल्लेखावरून पुष्यमित्राने सु. ३६ वर्षे राज्य केले असे दिसते.
  ......................................................................................................................

  ReplyDelete
 3. पाणीनि : (इ. स. पू. सु. पचावे वा चवथे शतक).

  संस्कृतातील पहिल्या सर्वांगपूर्ण अशा व्याकरणाचा कर्ता. पाणिनीच्या काळासंबंधी विद्वानांत मतभेद आहेत. अष्टाध्यायी, अष्टक किंवा शब्दानुशासन ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या, पाणिनीच्या व्याकरणग्रंथातील पुराव्यांवरून; त्याचप्रमाणे अन्य ग्रंथांत आलेले पाणिनीविषयक उल्लेख लक्षात घेऊन पाणिनीचा काळ वर दिल्याप्रमाणे इ. स. पू. पाचवे वा चवथे शतक असा सामान्यतः मानला जात असला, तरी काही संशोधकांनी पाणिनीचा काळ इ. स. पू. आठव्या शतकापर्यंत मागे नेलेला आहे. पाणिनीच्या एका सूत्रात शलातुर देशाचा उल्लेख आहे. ह्याच देशाचा तो रहिवासी असावा, असा विद्वानांचा तर्क आहे. शलातुर ह्या शब्दाचे प्राकृत रूप सलाउर असे होते. अनेक प्रांतांत ‘स’ च्या ऐवजी ‘ह’ उच्चारला जात असल्यामुळे सलाउरचे रूप हलाउर होऊन आणि ‘ह’ व ‘ल’ ह्यांच्यात वर्णव्यत्यत होऊन सलाउरचे ‘लहाउर’ असे रूप होऊ शकते. ह्या ‘लहाउर’ चेच पुढे ‘लहोर’ झाले असावे. असे अनुमान करून शलातुर म्हणजेच आजचे लाहोर असण्याची शक्यता नमूद केली जाते. पाणिनीच्या सूत्रांतून येणारे सिंधु, तक्षशिला, कच्छ इ. उल्लेखही बोलके आहेत. पाणिनीचे शिक्षण तक्षशिलेस झाले असावे, असा तर्क आहे. पाणिनीचा ‘दाक्षीपुत्र’ असाही उल्लेख केला जातो, हे पाहता त्याच्या आईचे नाव ‘दाक्षी’ असावे, असा तर्क केला जातो.

  पाणिनीने वैदिक भाषेबरोबर तत्कालीन बोलीभाषेचा अभ्यास करून दोहोंसाठी वर्णनात्मक व्याकरण लिहिले. सु. ४,००० सूत्रे असलेल्या ह्या व्याकरणग्रंथाचे आठ अध्याय असल्यामुळे त्याला अष्टाध्यायी किंवा अष्टक असे नाव रूढ झाले. अष्टाध्यायीमधील सूत्रे बीजगणितातील सूत्रांप्रमाणेच तांत्रिक परिभाषेत लिहिली गेली असून योजिलेल्या तंत्राचा नीट उलगडा व्हावा, म्हणून त्याने संज्ञासूत्रे आणि परिभाषासूत्रे दिलेली आहेत.

  वाक्यांतील पदांचा परस्परसंबंध, सामासिक पदांचा प्रकृतिप्रत्ययात्मक विभाग, संधी ह्यांचा विचार केला असून त्यासाठी अनुबंध, प्रत्याहार, स्थानिन्, आदेश, आगम इ. तांत्रिक साधनांचा उपयोग केला आहे. ग्रंथातील तपशील व बारकावे ह्यांवरून अष्टाध्यायी हा ग्रंथ म्हणजे शतकानुशतके चालू असलेल्या व्याकरणविषयक विचारांचे (व कदाचित ग्रंथांचेही) शेवटचे संस्करण असावे, असे दिसते. पाणिंनीने आपल्यापूर्वींच्या दहा वैयाकरणांचा उल्लेख केलेला आहे. ‘गणपाठ’ व ‘धातुपाठ’ अशी परिशिष्टे त्याने अष्टाध्यायीला जोडलेली आहेत. गणपाठात शब्दांचे गट केलेले असून त्यासाठी समान प्रत्यय अथवा स्वर इ. कसोट्या लावल्या आहेत. तो तो गट त्या त्या गटातील पहिल्या शब्दापुठे ‘आदी’ हा (किंवा या अर्थाचा) शब्द लावून ओळखला जातो. उदा., ‘स्वरादि’. पाणिनीच्या सुत्रांवर ⇨ कात्यायनाने (इ. स. पू. सु. तिसरे शतक) चिकित्सक दृष्टिकोणातून वार्त्तिके लिहिली आहेत. ह्या वार्त्तिकांवर ⇨ पतंजलीने ⇨ महाभाष्य नावाची प्रसिद्ध टीका लिहिली (इ. स. पू. सु. १५०). सातव्या शतकात जयादित्य आणि वामन ह्यांनी अष्टाध्यायीवर काशिका नावाची टीका लिहिली. इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषांत अष्टाध्यायीचे अनुवाद झालेले आहेत.

  ReplyDelete