Tuesday, February 25, 2014

मनुष्य व्हावे!

वर्तमानात जगणारा माणुसच

इतिहास आणि भविष्याकडे

डोळसपणे पाहू शकतो...

आणि नेहमीच आनंदीही राहू शकतो....!

सर्वच विश्व असे आनंदमय व्हावे

प्रत्येकाच्या मनात कारुण्याचे

झरे फुटावेत

आणि

वेदनांवर...वर्चस्ववादावर

मात करण्याचे

सामर्थ्य फुलावे

येणारा एकेक क्षण अनमोल

प्रत्येकाने प्रत्येकाचा

श्वास व्हावे...

मनुष्य व्हावे!

10 comments:

  1. ‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही,

    न मी एक पंथाचा

    तेच पतित की जे आखडिती

    प्रदेश साकल्याचा

    केशवसुत

    ReplyDelete
  2. सिंहस्थ पर्वणी

    व्यर्थ गेला तुका ,व्यर्थ ज्ञानेश्वर

    संतांचे पुकार, वांझ झाले

    रस्तोरस्ती साठे, बैराग्यांचा ढीग

    दंभ शिगोशीग, तुडुंबला

    बँड वाजविती, सैंयामिया धून

    गजांचे आसन, महंता‌सी

    आले खड्ग हाती, नाचती गोसावी

    वाट या पुसावी, अध्यात्माची

    कोणी एक उभा, एका पायावरी

    कोणास पथारी, कंटकांची

    असे जपीतपी, प्रेक्षकांची आस

    रुपयांची रास, पडे पुढे

    जटा कौपिनांची, क्रीडा साहे जळ

    त्यात हो तुंबळ, भाविकांची

    क्रमांकात होता, गफलत काही

    जुंपते लढाई, गोसव्यांची

    साधू नाहतात, साधू जेवतात

    साधू विष्ठतात, रस्त्यावरी

    येथे येती ट्रक, तूप साखरेचे

    टँकर दुधाचे, रिक्त तेथे

    यांच्या लंगोटीला, झालर मोत्याची

    चिलीम सोन्याची, त्याच्यापाशी

    येथे शंभराला, लाभतो प्रवेश

    तेथे लक्षाधिश, फक्त जातो

    अशी झाली सारी, कौतुकाची मात

    गांजाची आयात, टनावारी

    तुज म्हणे ऐसे, मायेचे माइंद

    त्यापाशी गोविंद, नाही नाही.

    कुसुमाग्रज

    ReplyDelete
  3. कालचा पाऊस

    कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही
    सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे
    कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत
    झाडे करपली, माथी हरपली
    नदीच्या काठाने मरण शोधित फिरलो
    आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो
    कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही...

    यशवंत मनोहर

    ReplyDelete
  4. संजय सर ,
    अतिशय वाचनीय अशी कविता आहे , त्यावर कुणीतरी कविवर्य कुसुमाग्रजांची कविता छापली आहे त्यांचे अभिनंदन !कविता ह्या लेखनाला उत्तम प्रतिसाद म्हणजे फक्त कविताच हे इथे ठळकपणे जाणवते
    एखाद्या दिवाळीच्या ग्रीटिंग ला परत तसेच ग्रीटिंग पाठवतात तसेच हे आहे
    अतिशय छान

    ReplyDelete
  5. सुंदर कविता आणि त्यावरून दिलेली दुसरु पण छान

    ReplyDelete
  6. संजय अण्णा
    आपल्याला नमस्कार
    आपली साठीशांत आता जवळ आली त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा
    आपण अतिशय सुंदर काव्य लिहून ठेवले आहे त्यातच कुणीतरी कुसुमाग्रजांची आणि इतर कविता लिहिली आहे त्या सगळ्याच कविता छान आहेत त्याना चाली लावून आपण अजून त्याची मजा वाढवू शकता आभार असेच कविता करत राहा

    ReplyDelete
  7. पुढच्या साहित्य संमेलनाची तयारी वाटतं? हे हे हे :)

    ReplyDelete
  8. संजय सोनवणी ,
    आपणास जो कविता करण्याचा देणगीचा भाग देवाने दिला आहे त्याचा कधीकधी हेवा वाटतो कारण आपण अनेक रुक्ष संशोधनाचे विषय हाताळता एकीकडे विषमतेबद्दल लिहिता, पोट तिडकीने लिहिताना कधीकधी त्यात भडक पणा पण येतो , परंतु आपल्या कविता मात्र अगदी संयत , आशयघन आणि दुसऱ्याच्या मनाचा ठाव घेणाऱ्या असतात
    आपण म्हणाल की या प्रतिभेला देवाची देणगी म्हणू नका , पण याला दुसरे काय म्हणता येईल ?
    आपल्याकडे समाजात इतके उठसुठ जातींच्या मोहपाशात अडकून लिखाण चालू असते तरी आपण आपले विचार शांततेने मांडत असता , लोकांनी कितीही उखाळ्या पाखाळ्या केल्या तरी आपण आपला तोल जाऊ देत नाही ह्याचे आम्हाला कौतुक आहे
    आपल्याला अजून खूप काम करायचे आहे त्यासाठी आपले आरोग्य जपले पाहिजे
    असेच यापुढे आपल्या ब्लोगवर अखंड हा ज्ञानाचा दिवा तेवत राहो आणि त्याचा प्रकाश सर्वत्र फाकत राहो हीच या शिवरात्रीच्या दिवशी शुभेच्छा
    ओरिजनल आप्पा बाप्पा

    ReplyDelete
  9. सर ,
    प्रत्येकाने प्रत्येकाचा श्वास व्हावे ! फारच छान ! सुंदर !
    जिओ !
    केशवसुत आणि कुसुमाग्रज फारच बहारदार ,

    असेच पुढे जात आमची बहिणाबाई आली असती तर ?
    आमचा तुकोबा आणि ज्ञानराया असता तर ?

    सर आता यापुढे हेच तंत्र वापरत गेलात तर मजा येईल बहुत खूब !
    आपल्या कवितेनंतर जर असे पूर्वीच्या कवींचे लिखाण जर आले तर किती दणकट होतात आपले विचार आणि आनंद द्विगुणीत होतो !

    सर , ज्ञानदेवांच्या पसायदानाची आठवण करून दिली आपण !
    सलाम !

    ReplyDelete
  10. मन सुद्द तुझ गोष्ट हाये पृथ्वीमोलाची
    तू चाल पुढ तुला र गड्या भीती कशाची
    परवा बी कुणाची

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...