Wednesday, February 26, 2014

अनादि आणि अजरामर...!

माझे जीवनावर अपरंपार प्रेम आहे
जसे पावसाळ्यावर
जसा पाऊस असतो कधी स्नेहमय...
कधी क्रूर 
तर कधी फक्त वाट पहायला लावनारा...
जीवनही तसेच...

हवे वाटते तेंव्हा ते असतेच असे नाही...
असते तेंव्हा त्याचे मोल समजतेच असे नाही
ते जाते तेंव्हा हव्यासाचा आक्रोश 
ते ऐकतेच असेही नाही...

पाऊस असण्यात जेवढा पावसाळा आहे...
तेवढाच पावसाळा पाऊस नसण्यात आहे...
जेवढे जीवन जगण्यात आहे 
तेवढेच जीवन मरणात आहे...

माझ्या आत्मनांनो...
पावसाळा फक्त चिंब-भिजल्या मनांत असतो
जीवन फक्त मनसोक्त जगण्यात असते...

जगण्याची ही मोहक वाटचाल

अनादि आणि अजरामर...!

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...