Sunday, February 9, 2014

Lonely Path


9 comments:

 1. आप्पा - बाप्पा हो लवकर या , हे बघा चित्र !
  बाप्पा - अरे बाबा , जरा उसंत खाऊ देत नाहीस बघ तू !इतका त्या संजयाने कसला लळा लावलाय देव जाणे !सकाळ झाली रे झाली की तुझ सुरु संजय पुराण- हं काय म्हणतोय तुमचा - सॉरी आपला संजय - बारा आहे ना - उगीच मनात काहीतरी येउन वेद्बिद्र येउन जात सकाळी सकाळी -
  आप्पा - संजयने चित्र किती छान काढले आहे बघा
  बाप्पा - अहाहा ! किती सुंदर ,
  आप्पा - खरच सांगरे , तुला काय कळत ?
  बाप्पा - सांगूच का ? दिवाळीत किल्ले करायचो ५वी ६ वीत त्यावेळची आठवण झाली या चित्राने
  असेच अळीव पेरून आमचा किल्ला असाच हिरवागार व्हायचा ,अशीच किल्ल्यावर जाणारी पायवाट असायची आणि गवळण महाराजाना गडावर दूध पोचवायला जाताना दिसायची ,मावळे फिरताना दिसायचे आणि वाघाची एक गुहा असायची ,आता या चित्रात गवळण आणि वाघाची गुहा सोडली तर बाकी सगळ तसच आहे ,अस समजू की महाराज गडावर पोचले आहेत

  आप्पा -किती सुंदर विचार आहेत तुमचे -खरच मला काही वेगळच सुचत होत , आम्ही लहानपणी कोकणात गेलो की करवंद खायला डोंगरात झाडीत घुसायचो अशीच पाउल वाट असायची ,एखादी कुळवाडीण अशाच पाउल वाटेने आमच्या करवंद लुटण्याचा वृत्तांत घरी पोचवत असे ,"गोदाकाकू तुमचे पुण्याचे पाहुणे भर दुपारचे हुंदाडताहेत , मग आमची आत्या माध्यान्हिस वाट तुडवत येत असे - अगो बायो त्या पोरांना धाड पहिली घराकडे ,आलेत मोट्ठे शहाणे - करवंद खाणारे - काही काळवेळ आहे का नाही ?"-
  बाप्पा - आमच्या आत्याने किंवा मामीने असे पकडले कि आम्हाला शिक्षा म्हणून आजोबांचे पाय चेपण्याची शिक्षा मिळत असे !
  आप्पा - चित्राचा अर्थ कसा लावायचा ते आजवर मला उमगलेले नाही ! पण आपल्या आठवणी आपण त्यात शोधत असतो
  बाप्पा - कवितांचे पण अगदी तसेच आहे !आता हे बघ ना हे दुसरे चित्र
  आप्पा - एक गम्मत बघा ,आता इथे लिहिताना कोण काय गमजा करताय बघू !
  आता चान्सच नाही ,ब्राह्मण नाही आणि मराठा नाही ,वैदिक नाही नि अवैदिक नाही
  बाप्पा - तरी बघ आता , कुणीना कुणी येइलच ब्राह्मणाना लाखोली वहात -

  ReplyDelete
 2. शेंडीवाल्याना हद्दपार

  ReplyDelete
 3. असे सुंदर चित्र ज्यात ताजेपणा आहे संग्रहात पाहिजे

  ReplyDelete
 4. हिरवा रंग असा जादू करतो कि नजर खिळून रहाते
  आत्ताच पाउस पडून गेला आहे आणि वातावरणात किंचित गारठा आहे तो जाणवतो
  असे फार कमी वेळा दिसते !

  ReplyDelete
 5. उमाजी नाईकांचे चित्र जास्त चांगले आहे असली डोंगरांची चित्रे काढायला काहीही डोके लागत नाही त्यापेक्षा रस्त्यावर साईबाबा काढणारे थोर !
  हातावर मेंदी काम करणारे त्याहून ग्रेट !
  शाम परब
  कल्याण

  ReplyDelete
 6. सर,
  तुम्ही कोणती चित्रकलेची परीक्षा दिली आहे ?चित्रकलेतील आपली श्रद्धास्थाने कोणती आहेत हे आम्हास समजेल का ?यामध्ये गोंधळेकर सरांचा प्रभाव दिसतो आणि गोयाचापण
  आपल्या चित्रात युरोपियन रंग संगतीचा प्रभाव आहे पण त्याचवेळी विषय निवडीचे स्वातंत्र्य आणि बेसिक स्त्रक्चरचे सामर्थ्य अस्सल या मातीतील आहे
  आपल्यातील रचनाकाराला नम्र वंदन ! ,
  कारण तो कविता , लेख आणि चित्रकला अशा सर्व अंगाने प्रकट होतो आहे

  ReplyDelete
 7. संजय सर , मी प्रथमच आपल्या ब्लोगवर लिहिते आहे
  आप्पा आणि बाप्पा यांचे पटले कारण केजरीवाल हे आंदोलन करण्यात एक नंबर असतील पण शासन चालवण्यात अगदीच झिरो ठरले ,
  स्वतः ते सनदी अधिकारी होते आणि त्यांच्या मिसेस सुद्धा सनदी अधिकारी आहेत +त्यांना शासन कसे चालते याची जाण असायला हवी पण दुर्दैवाने त्यांची गणिते सामान्य माणसाला कळली नाहीत किंवा त्यांनी जे केले ते पूर्व नियोजित होते असे म्हणायला त्यांनी जागा निर्माण केली आहे
  आपली ताकद नसताना ते सरकार चालवायला गेले ते का ?
  कोणता मोह पडला त्यांना ? काँग्रेस कोणत्याही क्षणी आपल्याला तोंडघाशी पाडू शकते हे माहित नसायला ते दुधखुळे नाहीत आणि असे असताना ज्या खुर्चीवर बसायचे तीच जर दोलायमान असेल तर मग जनता काय म्हणेल ? आपले हसे होईल ,हे भान त्याना का राहिले नाही ? स्वतःची शोकांतिका करून घेत लोकसभेला जायचा जर त्यांचा प्लान असेल तर ते भावनात्मक राजकारण करत आहेत ,आज त्यांचे तिकीट वाटपाचे तंत्र पाहिले तर असे दिसते की पुर्वाश्रमिञ्च्या समाजवादी लोकाना ते जास्त महत्व देत आहेत -म्हणजे मुलायमचा समाजवाद नव्हे तर लोहिया ,जयप्रकाश , एसेम आणि मधु लिमये यांचा समाजवाद - म्हणजेच तिसऱ्या आघाडीचे जणू शुद्धीकरण करण्याचे तर ते राजकारण करत नाहीत न असे वाटू लागते
  मुलायम ,बिजू पटनाईक किंवा नितीशकुमार यांच्या समाजवादाला प्रादेशिक अस्मिता किंवा प्रादेशिक भाषिक बंधनांनी झाकाळून टाकले आहे ,अण्णा हजारेना गुरु मानून केजरीवाल हि प्रादेशिकता तोडू पहात आहेत ,पण खरेतर निओ समाजवाद हा कालबाह्य झाला आहे आणि त्यामुळे केजरीवाल हे एकप्रकारे मध्यम वर्गाचे हितसंबंध सांभाळणारे एक नेतृत्व असेल असे येईल ,त्याला भगवा किंवा हिरवा रंग देत तेच काम मोडी आणि उलायाम करत आहेतच खरेतर हा आयडेंटीटी क्रायसेस आपल्या देशात कायम त्रास देणारा मुद्दा आहे !
  काही कमीजास्त असेल तर अवश्य सांगावे
  सौ मोहिनी पारकर

  ReplyDelete
  Replies
  1. किती खोटी Accounts open करून तीच व्यक्ती लिखाण करीत राहणार आहे, समजायला मार्ग नाही? आप्पा-बाप्पा, केवलभाई-रमणभाई, प्रज्ञा बडोदेकर, अमृता विश्वरूप, पद्मजा कुंभारे, समीर घाटगे, दत्तात्रेय आगाशे, प्रतिभा-प्रतिमा या व अशा अनेक नावांनी एकच व्यक्ती लिखाण करीत असते, हे सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. स्त्रियांची नावे वापरून लिहायला सुद्धा याला लाज वाटत नाही.

   अनुज, बारामती

   Delete
  2. किती खोटी Accounts open करून तीच व्यक्ती लिखाण करीत राहणार आहे, समजायला मार्ग नाही? आप्पा-बाप्पा, केवलभाई-रमणभाई, प्रज्ञा बडोदेकर, अमृता विश्वरूप, पद्मजा कुंभारे, समीर घाटगे, दत्तात्रेय आगाशे, प्रतिभा-प्रतिमा या व अशा अनेक नावांनी एकच व्यक्ती लिखाण करीत असते, हे सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. स्त्रियांची नावे वापरून लिहायला सुद्धा याला लाज वाटत नाही.

   अनुज, बारामती

   Delete