Sunday, February 9, 2014

संस्कृतीचे मापदंड?

परंपरा म्हणजे संस्कृती असे काही लोक मानतात. त्या आधारावरच संस्कृतीचे मापदंड ठरवतात व थोर-उज्वल परंपरांचा अभिमान बाळगतात. आपल्या देशाच्या परंपरांचा अभिमान बाळगण्याची आपण तर अधिकृत प्रतिज्ञाच करत असतो. पण परंपरा म्हणजे संस्कृती नसून परंपरा सांस्कृतीक जीवनाच्या एक भाग आहेत. नवीन परंपरा निर्माण होणे, जुन्या नष्ट होणे अथवा सुसंगत दृष्ट्या बदलवने हे सातत्याने घडत असते. हे ओघ एवढे व्यामिश्र असतात कि एका विशिष्ट "क्ष" काळातील संस्कृती म्हणजे नेमके काय हेसुद्धा ठरवता येणे अशक्य होऊन जाते. काही मापदंडांवरुन कोणत्याही "क्ष" काळच्या सम्स्कृतीचे मुल्यमापन करता येत नाही ते त्यामुळेच. कारण नोंदले न जानारे बोध आणि अबोध प्रवाह तेवढेच प्रभावी ठरतात. उदा. आपल्यकडे आर्थिक इतिहास लिहिलाच न गेल्याने अर्थसंस्कृतीबद्दल तर्क करण्यापलीकडे फारसे आपल्या हाती राहत नाही. तसेच निर्माणकर्ते घटक संस्कृतीनिर्मितीत हातभार लावत असले तरी त्यांचे विश्लेशन व योगदान निश्चित करायला सामग्री सापडत नाही. हे जुन्या काळातच नव्हे तर आताही घडते. धार्मिक संस्कृती आणि राजकीय संस्कृतीबद्दलही आपल्याहाती जी सामग्री येते ती कितपत तटस्थ आहे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जुन्या काळाच्या संस्कृतीबद्दल बोलतांना तथ्यांपेक्षा भ्रम हाच अनेकदा त्याचा आधार असतो. त्यामुळेही संस्कृतींचे यथार्थ मूल्यमापन होत नाही...किंवा करता येत नाही. अशा भ्रमांच्या आधारावर निर्माण करु पाहणारी नव्य संस्कृती एक भ्रम बनू शकते ती यामुळेच!

शिवाय संस्कृतीच्या श्रेष्ठ-कनिष्ठत्वाचे मापदंड तरी कोणते असतात? जी सम्स्कृती अधिकाधिक समाज-सुसंगत, हार्मोनियस, एकमय आणि प्रागतिक आहे ती संस्कृती चांगली असे फार तर म्हणता येईल...तरीही श्रेष्ठ-कनिष्ठतेचे (दु)र्गूण तिला चिकटवणे योग्य ठरणार नाही.

या पार्श्वभुमीवर भारतीय संस्कृतीकडे पाहिले तर ती कधीच हार्मोनियस आणि समाजसुसंगत नव्हती असे म्हणावे लागते. भारतात विविध भाषा व प्रादेशिक संस्कृत्या स्वतंत्रपणे अस्तित्वात असल्याने एकमयता शक्य दिसत नाही. परस्पर प्रभावांत संस्कृत्या वाढतात हे सत्य मान्य केले तरी त्याचे प्रभावक्षेत्र किती हाही प्रश्न आहेच. परंपरांचे म्हणाल तर असंख्य परंपरा कालौघात आपणच टाकून दिलेल्या आहेत. उदा. वसंतोत्सव/मदनोत्सव हे प्रेमिकांसाठी असलेले उत्सव. आज त्यांची जागा व्ह्यलेंटाईन डे घेते म्हटल्यावर तथाकथित "अ"सांस्कृतिक रक्षकांचा जळफळाट का होतो? वैदिक लोकांचा "इंद्रमह" नांवाचा एक उत्सव असे...त्याचीही परंपरा कधीच लुप्त झाली. अनेक पंथ आले आणि गेले. पांचरात्र संप्रदायाचे तर आज कोणाला नांवही आठवत नाही. आपल्या भाषा जशा मूळ रुपात होत्या तशाच त्या आता राहिलेल्या नाहीत. व्याकरणेही तीच राहिली नाहीत. त्या सातत्याने बदलत्या राहिल्या आहेत. भविष्यातील मराठी कशी असेल याचा अंदाज आपण आज बांधू शकत नाही तो त्यामुळेच!

म्हणजे परंपरा अक्षय्य असू शकत नाहीत. किंबहुना त्या तशा नसाव्यातही. कालसुसंगत नवीन परंपरा निर्माण होणे हा संस्कृती विकसनाचा अपरिहार्य भाग असतो. परिवर्तन हा संस्कृतीचा महत्वाचा निकष आहे. प्रागतिकता...अग्रगामीपणा हा संस्कृत्यांचा मुलाधार आहे. जी संस्कृती स्थितीस्थापक होते तिचा विनाश होऊन नवीन सम्स्कृत्यांनी त्यावर कब्जा करणे हे ओघाने आलेच!

सम्स्कृती धर्म-राजकीय इतिहासावर मुल्यांकित करणे हा आपला मोठा दोष आहे. अर्थसंस्कृती ही धर्म/राजकारणापेक्षा मोठा प्रभाव संस्कृती विकसनावर टाकत असते. १०२२ नंतर भारतात सुरु झालेले भिषण दु:ष्काळ, आक्रमणे व त्यामुळे ठप्प झालेल्या विदेश व देशांतर्गतच्या व्यापाराने आलेले आर्थिक दारिद्र्य यातून भारतीय सम्स्कृतीत जी उलथापालथ झाली तिला जागतिक इतिहासात तोड नाही. आजही आपण नवीन अर्थसंस्कृती निर्माण करण्यात अपेशी ठरलो असून आपली मदार बव्हंशी पाश्चात्त्य अर्थसम्स्कृतीतून उधा-या करण्यावर आहे.

त्यामुळे संस्कृतींच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेवर भाष्य न करता, गतकाळातील महान परंपरांचा अभिमान बाळगत बसण्यापेक्षा नवे सृजन जी करू शकते तीच सम्स्कृती होय...अन्यथा आपल्याला सम्स्कृती आहे अथवा होती हे म्हणण्याला काही अर्थ राहत नाही!  

7 comments:

  1. संस्कृती म्हणजे काय? आणि ती वाचवायची आहे म्हणजे नक्की काय करायचं आहे?

    बातम्या देणाऱ्या वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमध्ये बरेच दिवसांत संस्कृती, संस्कृतिरक्षक, संस्कृतिभक्षक आणि तत्सम शब्द पाहायला मिळाले नाहीयेत. पण जेव्हा असे शब्द माझ्या पाहण्यात येतात तेव्हा मला प्रश्न पडतो की ही संस्कृती संस्कृती म्हणतात ती नक्की काय आहे. जाणकारांनी आपापली मते मांडावीत ही अपेक्षा. ह्या चर्चेद्वारे कोणालाही दुखवायचा हेतू नाहीये आणि कोणताही पूर्वग्रह न बाळगता विचार मांडायचा मी प्रयत्न केलाय. ह्या चर्चेतून कदाचित काहीच निष्पन्न होणार नाही. (प्रत्येक चर्चेतून काहीतरी निष्पन्न झालंच पाहिजे असा कुठे नियम आहे काय? आणि खरं सांगायचं झालं तर ज्या चर्चेतून काहीतरी निष्पत्ती झाली ती चर्चाच काय? असो... ) पण माझ्या (आणि कदाचित इतर मनोगतींच्याही) मनात पडलेल्या प्रश्नांना वाट मिळेल आणि झालंच तर थोड्याफार प्रश्नांची उत्तरे पण मिळतील अशी अपेक्षा आहे.

    माझा प्रश्न असा आहे की संस्कृती म्हणजे काय आणि ती वाचवण्याबद्दल अधूनमधून जी चर्चा/ओरड सुरू असते ती नक्की काय वाचवायची म्हणून असते?
    जर आपली संस्कृती ही अगदी पुरातन आहे, अगदी महाभारत/रामायणकालापासून किंवा त्याही मागे जाऊन अगदी वेदकालापासून अस्तित्वात आहे तर हल्लीहल्लीच तिच्या अस्तित्वाविषयी इतकी भीती का? मी लहानपणापासून ह्या 'संस्कृती'बद्दल जे काही ऐकत आलो आहे त्यातून ज्या गोष्टी माझ्या मनावर बिंबवल्या गेल्या आहेत त्या म्हणजे -
    १. महाभारत, महाभारतातली श्रीमद्भगवद्गीता, रामायण, अनेकविध पुराणं, वेद असे अनेक ग्रंथ आपली संस्कृती काय आहे ते सांगतात.
    २. ह्या ग्रंथांत जे काही उपदेश सांगितले आहेत त्यांचे पालन करणे म्हणजे संस्कृती.
    ३. पुरातन कालापासून काही चालीरीती पाळल्या जातात त्या म्हणजे आपली संस्कृती.

    ह्यावर मला असा प्रश्न पडतो की ज्या चालीरीतींबद्दलच बोलायचं त्याच कुटुंबाकुटुंबाप्रमाणे बदलत जातात. शिंप्याच्या घरच्या चालीरीती ह्या, मराठ्याच्या घरच्या चालीरीतींहून कितीतरी भिन्न असतात. ब्राह्मणाघरी ज्या गोष्टी त्याज्य ठरतील (उदा. मासे खाणे) त्याच गोष्टी कदाचित सारस्वताकडे राजरोस होत असतील. (आता इथे जर सारस्वत म्हणजे मासे खाणारे ब्राह्मण असा मुद्द कोणी मांडणार असेल तर वाक्यातील पहिला शब्द बदलून हवं तर 'कोकणस्थ/देशस्थ ब्राह्मणाघरी' असा लिहितो. ) मग प्रत्येकाची संस्कृती वेगळी म्हणायची काय?
    बरं, जरी ह्या सर्व चालीरीतींमधून काही सर्व जातिधर्मपंथसमाजामध्ये समान अशा वेगळ्या काढून त्यांना संस्कृती म्हणायचं झाल्यास ती टिकवायची आहे म्हणजे नक्की काय करायचंय? कारण अनेकदा संस्कृती म्हणून समजल्या गेलेल्या चालीरीती ह्या कालबाह्य ठरून समाजातून नाहीशा होतात. पूर्वी सतीची चाल होती. ती आपल्या संस्कृतीचं एक अंग समजली जायची पण आता तिच्यावर कायद्यानुसार बंदी येऊन ती चाल कालबाह्य ठरली आहे.
    जर धर्मग्रंथांत सांगितलेल्या गोष्टी म्हणजे संस्कृती असे म्हणायचे असेल तर प्रत्येकाला माहीत असलेली द्रौपदी ही पाच नवरे करूनही सुसंकृत होती का? (तिला कर्ण हा आपला अजून एक नवरा असावयास हवा होता असेही वाटत असते. ) हीच द्रौपदी पंचकन्यांपैकी एक आहे. (हा श्लोक "... पंचकन्यां स्मरेन्नित्यं... " असा आहे की "... पंचकं ना स्मरेन्नित्यं... " असा आहे ह्याचा कोण्या जाणकाराने खुलासा केल्यास आमचे मंडळ आभारी असेल. माझा नेहमी गोंधळ होतो. ) एकपतिव्रता अशा सावित्रीची आठवण म्हणून नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली. रावणासारख्याने पळवून नेऊनही सच्चरित्र राहिलेली सीता (सीतादेखील पंचकन्यांपैकी एक आहे) पूजनीय की लग्नानंतरही नियोगपद्धतीने पुत्रप्राप्ती करून घेणाऱ्या कुंती आणि माद्री पूज्य? (कुंतीला लग्नापूर्वी सूर्याकडून नियोगपद्धतीनेच कर्ण झाला आणि तिने कुमारीमातृत्व स्वीकारले. मग आजकालच्या कुमारीमाताच असंस्कृत आणि अनैतिक कशा? )
    महाभारतात आणि हरिवंशात प्रथम प्रजोत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असे वर्णन आहे. आदिपर्वाच्या ६६व्या अध्यायात ब्रह्मदेवाचा मुलगा दक्ष आणि त्याची सख्खी बहीण ह्यांच्या शरीरसंबंधाने ५० कन्या झाल्याचा उल्लेख आहे.

    -परंपरा.

    ReplyDelete
  2. बायकामुलींनी नऊवारी सोडून जेव्हा पाचवारी/सहावारी नेसली तेव्हा डोळे वटारले गेले होतेच. नंतर सहावारी सोडून पंजाबी ड्रेसचा अंगिकार केला गेला तेव्हा आणि पंजाबी ड्रेसची जागा जीन्स-टीशर्टने घेतली तेव्हादेखील समाजाच्या कपाळावर अनेक आठ्या पडल्या होत्याच. पण तरीही मुलींसाठी जीन्स-टीशर्ट हा पोषाख आता स्वीकारला गेलाच आहे. पुरुषांच्या पोषाखात फार बदल झाले नसले तरीही पुरुषदेखील बाराबंदी/बंडी/धोतर ह्यावरून अँटिफिट जीन्स आणि टीशर्ट वापरायला लागले आहेतच. समाज पुरुषप्रधान असल्याने पुरुषांच्या पोषाखाबाबत फार खल केला गेला नाही इतकेच. ह्या बदलांतल्या कोणते स्वीकारार्ह आहेत आणि कोणते टाकाऊ आहेत हे ठरवणे आपल्या हातात नाही. कालौघात ह्या सर्व गोष्टी ठरत असतात.
    काही जण म्हणतात की समाजाला योग्य असणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कृती. पण समाजाला योग्य काय आणि अयोग्य काय हे नक्की कोण ठरवणार? योग्य/अयोग्य ह्या अत्यंत सापेक्ष संकल्पना आहेत. जेवताना पाण्याऐवजी वाइन पिणे हे भारतीय समाजाच्या दृष्टीने कदाचित अयोग्य ठरत असेल. (हेदेखील मी छातीठोकपणे सांगू शकत नाही हे इथेच मान्य करतो. ) पण अनेक युरोपीय देशांमध्ये ती एक अत्यंत सहज गोष्ट असते.

    पण काही प्रश्न अनुत्तरितच राहतात.
    - संस्कृती म्हणजे नक्की काय?
    - जर संस्कृती ही बदलत जाणारी असेल तर रक्षण नक्की कसले करायचे आहे?
    - ह्या बदलाचा विचार करता, पालन तरी नक्की कसले करायचे आहे?

    ReplyDelete
  3. बायकामुलींनी नऊवारी सोडून जेव्हा पाचवारी/सहावारी नेसली तेव्हा डोळे वटारले गेले होतेच. नंतर सहावारी सोडून पंजाबी ड्रेसचा अंगिकार केला गेला तेव्हा आणि पंजाबी ड्रेसची जागा जीन्स-टीशर्टने घेतली तेव्हादेखील समाजाच्या कपाळावर अनेक आठ्या पडल्या होत्याच. पण तरीही मुलींसाठी जीन्स-टीशर्ट हा पोषाख आता स्वीकारला गेलाच आहे. पुरुषांच्या पोषाखात फार बदल झाले नसले तरीही पुरुषदेखील बाराबंदी/बंडी/धोतर ह्यावरून अँटिफिट जीन्स आणि टीशर्ट वापरायला लागले आहेतच. समाज पुरुषप्रधान असल्याने पुरुषांच्या पोषाखाबाबत फार खल केला गेला नाही इतकेच. ह्या बदलांतल्या कोणते स्वीकारार्ह आहेत आणि कोणते टाकाऊ आहेत हे ठरवणे आपल्या हातात नाही. कालौघात ह्या सर्व गोष्टी ठरत असतात.
    काही जण म्हणतात की समाजाला योग्य असणाऱ्या गोष्टी म्हणजे संस्कृती. पण समाजाला योग्य काय आणि अयोग्य काय हे नक्की कोण ठरवणार? योग्य/अयोग्य ह्या अत्यंत सापेक्ष संकल्पना आहेत. जेवताना पाण्याऐवजी वाइन पिणे हे भारतीय समाजाच्या दृष्टीने कदाचित अयोग्य ठरत असेल. (हेदेखील मी छातीठोकपणे सांगू शकत नाही हे इथेच मान्य करतो. ) पण अनेक युरोपीय देशांमध्ये ती एक अत्यंत सहज गोष्ट असते.

    पण काही प्रश्न अनुत्तरितच राहतात.
    - संस्कृती म्हणजे नक्की काय?
    - जर संस्कृती ही बदलत जाणारी असेल तर रक्षण नक्की कसले करायचे आहे?
    - ह्या बदलाचा विचार करता, पालन तरी नक्की कसले करायचे आहे?

    ReplyDelete
  4. आपल्या तारुण्यात -
    अ > आपण जे काही करत असताना लोक आपल्याला नावे ठेवतात -

    ब> जे काही आपण करू शकत नाही म्हणून आपण चरफडतो -

    आपली मुले तरूण झाल्यावर-
    क> ती जे करत असतात त्यातील ज्याला आपण नावे ठेवतो -

    ड> जे काही त्यांनी करू नये असे आपल्याला मनापासून वाटते -

    - अशा सर्व गोष्टींना चढवलेला तत्त्वज्ञानाचा पोषाख म्हणजे आपली संस्कृती.

    एक चावून चोथा झालेली मध्यमवर्गीय (आणि तरीही मी रवंथ करत आहे अशी) व्याख्या! ;)

    ती वाचवायची म्हणजे आपण काय करायचं आहे?
    - मुळात ती वाचवायची आहे असं तुम्हाला वाटतं का? वाटत असेल तर 'कशी वाचवायची?' ते आपोआपच कळेल.
    नसेल तर प्रश्न निरर्थक.

    ReplyDelete
  5. हे खरं आहे की संस्कृती हे एक मोठे संकुल आहे. आणि त्यामुळेच ह्या संकुलात असणार्‍या सर्व गोष्टींची चर्चा (त्यात कालानुरूप झालेले बदल, त्यांच्या आत्ताच्या स्वरूपाची योग्यायोग्यता ह्याबाबत) व्हावी अशी अपेक्षा आहे. हेदेखील मान्य की राजवाड्यांच्या पुस्तकातल्या काही निवडक उतार्‍यांच्या जोरावर संस्कृतीची चर्चा करणे योग्य ठरणार नाही. तो एकांगी विचार ठरेल. पण केवळ चर्चेचा प्रस्ताव म्हणून ते उतारे दिले आहेत. त्यात मनोगतींनी आपल्याकडील उदाहरणांची भर घालावी ही अपेक्षा आहे.
    रोटीबेटीच्या व्यवहाराबाबत बोलायचे झाल्यास त्याबाबत हल्ली स्पृश्यास्पृश्यता पाळण्याचे प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागले आहे. आंतरजातीय विवाह आता बर्‍यापैकी मोकळेपणाने होऊ लागले आहेत. आंतरधर्मीय, अगदी कमी प्रमाणात आणि भीतभीत का होईना, पण होत आहेत. मला वाटते की वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये (भारतीय, युरोपीय, अमेरिकी, इ.इ.) असाच बदल घडतोय. काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे तर काही ठिकाणी नुकतीच सुरुवात झालीये. जर सर्वच संस्कृतींमध्ये सारख्या पद्धतीनेच हे व्यवहार होतात तर मग वेगवेगळ्या संस्कृतींना 'रोटीबेटी'च्या आधारावर वेगळेपण मिळते का?
    कामजीवनाबद्दल बोलायचे झाल्यास त्याला सांस्कृतिकपणापेक्षा व्यक्तिगतपणाच जास्त आहे असे मला वाटते. (तुमचे आणि माझे कामजीवन सारखेच असेल असे नाही. तरीही आपण आपली भारतीय संस्कृती आहे असे म्हणतो.)
    खाद्यजीवनाबाबत बोलायचे झाल्यास मराठी आणि दाक्षिणात्य खाद्यजीवनातदेखील बरीच तफावत आढळून येते. मी रोज पोळी-भाजी-वरण-भात खाणारा माणूस. हाटेलात जाऊन नाहीतर कोणत्यातरी रविवारी घरी इडली, डोसा खाणार्‍यातला. मराठी माणूस हल्ली जितक्या प्रमाणात डोसा, उत्तप्पा खातो तितक्याच प्रमाणात पिझ्झा, बर्गर खाऊ लागलाय. मग खाद्यजीवनावर आधारीत माझी आणि एखाद्या दाक्षिणात्याची संस्कृती एकच असे छातीठोकपणे कोण सांगू शकेल? जर एखाद्या सुब्रह्मण्यमची आणि माझी संस्कृती एकच असेल तर मग एखाद्या लिओनार्दोची आणि माझीही संस्कृती समानच नाही का?
    भाषेबद्दल बोलायचं तर (कुठेतरी वाचल्याचं आठवतंय की) दर ११ किमीला भाषा बदलते. मला फ्रेंच, जर्मन, आर्पिटान जितक्या परक्या आहेत तितक्याच बोडो, गढ़वाली आणि सांपोचे परक्या आहेत. मग एखादा दिब्रुगढचा पेपरवाल्याशी मी जितक्या सहज सांस्कृतिक संवाद साधू शकेन तितक्याच सहज मी तो एखाद्या ऑन्रीशी (Henryचा फ्रेंच उच्चार 'ऑन्री'सारखा होतो.) किंवा यॅकसशी बोलू शकेन.
    वेशभूषेबद्दलदेखील आता जागतिक स्तरावर इतकी सरमिसळ होते आहे की मी 'भारतीय वेशभूषा' असा शब्द वापरण म्हणजे एखादं जुनाट पुस्तक उघडून बसण्यासारखं आहे असं मला वाटतं. कारण हल्ली एखादा 'श्रीरंग' हा एखाद्या 'रॉबर्ट'सारखेच कपडे घालतो.
    (आपण सांगितलेल्या मुद्द्यांपैकी) राहती राहिली धार्मिक कृत्ये आणि सामाजिक व्यवहार. आता तर धार्मिक कृत्यांमध्येदेखील बदल होत चालले आहेत. कित्येक गोष्टी कालबाह्य होऊन नाहीशा झाल्या आहेत. (उदा. अश्वमेध यज्ञ ) जे काही शिल्लक आहे त्याबळावर आपली संस्कृती वेगळी म्हणणे हे तितकेसे बरोबर वाटत नाही.
    सामाजिक व्यवहार म्हणजे आपल्याला काय (काय) अभिप्रेत आहे ते थोडे स्पष्ट केले तर बरे होईल.
    म्हणजे बर्‍याच बाबतीत आपण (भारतीय) जगातील इतर लोकांप्रमाणेच व्यवहार करत असू तर आपली (भारतीय) संस्कृती वेगळी कशी? आणि जर काही टिकवायचं असेल तर ते काय?
    भारतीय/हिंदू संस्कृती ही आता ग्रीक/रोमन (थोडेसे कालविसंगत वाटल्यास युरोपीय/अमेरिकी/रशियी असे म्हणू) वेगळी न राहता एक जागतिक संस्कृतीच नाही का निर्माण होत आहे?
    मग संस्कृती नक्की कशाला म्हणायचे?

    ReplyDelete
  6. भारतीय संस्कृती

    आपली भारतीय संस्कृती हजारो वर्षांपूवीर्ची आहे. आपल्या संस्कृतीवर अनेक परकीय आक्रमणे झाली, परंतु ती नष्ट झाली नाही. भारतीय संस्कृती उपासना, त्याग, संयम, सहिष्णुता इत्यादींचे मिश्ाण असून ती आपणाला अंधारातून प्रकाशाकडे नेते. जगात जे जे मंगल आणि पवित्र आहे त्याचे आपल्याला दर्शन घडविते. साने गुरुजींनी भारतीय संस्कृतीचे यथार्थ वर्णन केले आहे. ते म्हणतात. ''भारतीय संस्कृती म्हणजे सहानुभूती, भारतीय संस्कृती म्हणजे विशालता, भारतीय संस्कृती म्हणजे सत्याचे प्रयोग. भारतीय संस्कृती म्हणजे सारखे ज्ञानाचा मागोवा घेत पुढे जाणे. जगात जे जे काही सुंदर, शिव व सत्य दिसले ते ते घेऊन वाढणारी ही संस्कृती आहे. जगातील सारे ऋषिमहषीर् ती पूजील. जगातील सर्व संतांना ती वंदील. जगातील सर्व धर्मसंस्थापकांना ती आदरील. मोठेपण कोठेही दिसो, भारतीय संस्कृती त्याची पूजा करील. आदराने त्याचा संग्रह करील. भारतीय संस्कृती संग्राहक आहे. ती सर्वांना जवळ घेणारी आहे. ''सवेर्षामविरोधेन ब्रह्माकर्म समारंभे।'' असे म्हणणारी ती आहे. संकुचितपणाचे वावडे असणारी ही संस्कृती आहे.'

    भारतीय संस्कृतीत अद्वैताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अद्वैत म्हणजे आपल्यासारखेच इतरेजन आहेत ही संकल्पना. आपण सर्वजण सारखे का, आपणात एकत्व का, अद्वैत का, तर ही परमात्म्याची शक्ती सर्वात सारखीच आहे. तो आणि मी एकच आहोत. माझ्यातून त्याचीच शक्ती प्रगट होते. तशीच ती इतरांतूनही. अद्वैत म्हणजे आपल्या आणि परमात्म्याच्या ऐक्याची अनुभूती आहे. मला जे काही मिळाले आहे ते दुसऱ्यालाही मिळावे. आपल्याला ज्या गोष्टींमुळे आनंद प्राप्त होतो, तसाच आनंद दुसऱ्याच्या वाट्याला यावा. मला जे आत्मज्ञान प्राप्त झाले आहे तसेच दुसऱ्यालाही प्राप्त व्हावे. नियती आपल्याला अद्वैत शिकवीत असते. आपल्या भोवतालची सृष्टी आपल्याला अद्वैत शिकवीत असते. भोवतालची सृष्टी आपल्याला संकेत देत असते. पण तिकडे लक्ष देण्यासाठी कुणाला वेळ नाही. जो तो आत्मकेंदित झाला आहे. प्रत्येकजण आपल्या संसारात रममाण झाला आहे. समाजाचा संसार कुणी पाहायचा? आपण समाजाचे एक घटक आहोत, आपण सर्व एक आहोत, सारखे आहोत, ही भावनाच शिल्लक उरलेली नाही. अद्वैतभाव हा भारतीय संस्कृतीचा आत्मा आहे हे तत्त्व आपण मान्य केलं तर त्या संस्कृतीत आपण किती भर घालीत आहोत याचा प्रत्येकाने विचार करावा.

    भारतात जे जे महात्मे होऊन गेले ते ते भारतीय संस्कृतीत भर घालून गेले आहेत. हे महात्मे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झाले होते. त्यांच्यातसुद्धा मतभिन्नता होती. परंतु त्या सर्वांचे ध्येय समाजसुधारणा, समाजाची उन्नती हेच होते. महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणासाठी आपले सर्वस्व वाहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांच्या उद्धारासाठी आपले आयुष्य खचीर् घातले. महषीर् र्कव्यांनी विधवा विवाह चळवळीसाठी हयात घालविली. सेवाव्रती बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांची अविरत सेवा करून आनंदवन निर्माण केले. हे सर्व महात्मे भारतीय संस्कृतीला उच्च स्थानावर नेण्यासाठी झपाटलेले होते. नवविचारांसाठी भारतीय संस्कृतीची कवाडे सताड उघडी आहेत. याचे वर्तमानकाळातले उत्तम उदाहरण म्हणजे कम्प्युटर क्षेत्रात भारताने केलेली प्रगती.

    भारतीय संस्कृती आणि अमेरिकन संस्कृती, या दोन संस्कृतींतला फरक किती आहे, हे एका गंमतीशीर प्रसंगाने मी अनुभवले आहे. एकदा मी विमानाने न्यूयॉर्कला जात होतो. प्रवासात टॉयलेटला जाण्यासाठी विमानाच्या मागील बाजूस असलेल्या टॉयलेटपाशी गेलो. सर्व टॉयलेट 'द्गठ्ठद्दड्डद्दद्गस्त्र' होती, त्यामुळे मी तेथे उभा राहिलो. तेवढ्यात एक वृद्ध अमेरिकन गृहस्थ येताना मला दिसले. विमान थोडे हलत होते, त्यामुळे त्यांना चालत येताना त्रास होत होता. ते गृहस्थ माझ्या पाठी मागे येऊन थांबले. भारतीय संस्कृतीनुसार 'पहले आप' या भावनेने मी त्या गृहस्थांना माझ्या अगोदर जाण्यास सांगितले. ते गृहस्थ माझ्याकडे रागाने पाहत टॉयलेटमध्ये गेले. परत येतानासुद्धा ते माझ्याकडे रागारागाने बघत गेले. ही घटना मी ज्या अमेरिकन गृहस्थांकडे राहिलो होतो, त्यांना सांगितली. ते गृहस्थ मला म्हणाले, 'तू त्यांच्या वाढलेल्या वयाची त्यांना जाणीव करून दिलीस येथेच त्यांचा अपमान झाला.' भारतीय संस्कृतीत जो आदरभाव होतो तो अमेरिकन संस्कृतीत अपमान ठरतो.

    - अप्पा परचुरे

    ReplyDelete
  7. भारतीय संस्कृती

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...