Sunday, February 9, 2014

The Flight!


52 comments:

  1. लोहपुरुषाचे अश्रू

    भारतीय जनता पार्टीचे 'लोहपुरुष' लालकृष्ण अडवाणी यांची अवस्था सध्या दया येईल, अशी झाली आहे. राजकारणातील ५५ वर्षांपूर्वी सुरू झालेला प्रवास अजून संपलेला नाही, असे अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगमधून त्यांना राज्यसभेच्या वृद्धाश्रमात धाडू पाहणाऱ्या नव्या पिढीला सुनावले आहे.

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आपण वयाच्या साडेचौदाव्या वर्षी आलो आणि आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त झाला, असे सांगून अडवाणी यांनी सध्या त्यांच्यावर रुष्ट असलेल्या संघ परिवाराची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. अगोदर कराचीत संघाचे प्रचारक म्हणून काम केल्यानंतर फाळणीत सर्व सोडून भारतात आल्यावर राजस्थानमध्ये प्रचारक म्हणून केलेल्या कामाची आठवण अडवाणी यांनी केली आहे. जनसंघ व भाजपचा कार्यकर्ता या नात्याने केलेल्या कामाचा उल्लेख त्यांनी केला आहे. अडवाणी यांचा ब्लॉग म्हणजे 'आयुष्यावर बोलू काही' असाच आहे.

    भाजपमधील लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी प्रभृतींना राज्यसभेवर धाडून नरेंद्र मोदी यांच्या वाटेतील अडथळे दूर करण्याचा संघ परिवार व मोदी ब्रिगेडचा प्रयत्न सुरू आहे. अडवाणी यांनी दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर ब्लॉग लिहून आपण राजकीयदृष्ट्या सक्रिय असल्याचे अधोरेखित करण्यामागे त्यांना सामानसुमानाची बांधाबांध करण्याचा परिवाराकडून मिळालेला संकेत हेच कारण आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी अडवाणी यांना राज्यसभेवर धाडण्याचा कुठलाही निर्णय झालेला नसून ते त्यांना हवे तेथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात, अशी सारवासारव केली असली तरी अडवाणी यांच्या ब्लॉगमधील वेदना पुरेशी बोलकी आहे.

    राम मंदिर आंदोलन करून अयोध्येतील बाबरी मशीद जमीनदोस्त केली, तेव्हा अडवाणी हे हिंदुत्ववाद्यांचे हिरो ठरले होते. मात्र तोपर्यंत देशात आघाडी सरकारची लाट आली होती. परिणामी, अटलबिहारी वाजपेयी यांचा चेहरा संघ परिवार व भाजपने पुढे करून सत्ता स्थापन केली. संघ व भाजपचा खरा चेहरा असलेले अडवाणी हे राजकीयदृष्ट्या अस्पृश्य ठरले. पुढे बॅ. जीना यांच्या कबरीवर माथा टेकताना अडवाणी यांनी सेक्युलर यू-टर्न मारला. मात्र त्यामुळे संघाची खप्पामर्जी ओढवून घेतली. २००९च्या निवडणुकीत एक अखेरची संधी अडवाणी यांना दिली गेली. परंतु त्यावेळी ते हिंदुत्ववाद्यांकरिता 'काफिर' ठरले; तर सेक्युलरवाद्यांना 'सोंग घेतलेले' वाटले. माशाप्रमाणेच लोहपुरुषाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत, हेच खरे.

    ReplyDelete
  2. हवा नियोजनबद्ध विकास

    एकविसाव्या शतकातील पहिले दीड दशक पाहता पाहता संपलेही. यापूर्वीच्या दोन शतकांत औद्योगिकीकरण, जागतिकीकरण या दोन संकल्पना आल्या आणि रुजल्या. २१वे शतक शहरीकरणाचे आहे. या शतकाच्या प्रारंभीच्या दशकातच त्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भारतासारख्या विकसनशील देशात शहरीकरणाचे प्रमाण येत्या शतकामध्ये प्रचंड प्रमाणात वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

    महाराष्ट्रही शहरीकरणामध्ये मागे नाही; पण हे सगळे होत असताना नियोजनाचा अभाव ही आपली सगळ्यात मोठी समस्या आहे. शहरे आधी वाढतात आणि त्यानंतर त्यांच्या वाढीचे नियोजन केले जाते, असा आपल्या सर्वच शहरांच्या बाबतीत असलेला अनुभव आहे. मुंबई, पुणे, नागपूर यांसारख्या राज्यातील मोठ्या शहरांच्या बाबतीत हा अनुभव वारंवार येतो. एकीकडे महाराष्ट्राचे कारभारी या शहरांची वाढ रोखण्यासाठी उपाय योजना करण्याची भाषा करतात; पण दुसरीकडे या शहरांमधील इंच इंच जमिनींचा हिशेब ठेवतात, अशी सध्याची स्थिती आहे. या शहरांचा भार आता कोणालाच सोसवत नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या आजूबाजूच्या क्षेत्रामध्ये बेसुमार वाढ होऊन द्यायची आणि त्यानंतर ती गावे शेजारील महापालिकेच्या हद्दीमध्ये समाविष्ट करायची, हा महाराष्ट्रातील राज्य सरकारचा आवडता उद्योग आहे. काही वर्षांपूर्वी जकातीची परतफेड करायला लागू नये या हेतून लोकसंख्येची अट शिथिल करून अनेक नगरपालिकांच्या महापालिका अशाच प्रकारे करण्यात आल्या. पुण्याच्या महापालिकेच्या हद्दीत सध्या अशीच गावे समाविष्ट करण्याच्या हालचाली सुरू आहेत. ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास कोणाचाच विरोध नाही; पण त्यामुळे सध्याच्या महापालिकांवर येणाऱ्या ताणाकडे दुर्लक्ष होते आहे.

    पाणी, सांडपाणी, कचरा, सार्वजनिक वाहतूक आणि सार्वजनिक आरोग्यव्यवस्था या पाच समस्यांनी आज राज्यातील जवळपास प्रत्येक महापालिका त्रस्त आहे. त्यामुळे या नव्या गावांचा समावेश त्रासदायक वाटू लागला आहे. या गावांतल्या नागरिकांना मात्र विकासाची आस लागून राहिली आहे. त्यांच्या याच भावनेला 'महाराष्ट्र टाइम्स'ने आवाज देण्याचे ठरविले आहे. या नागरिकांना चांगले नागरी जीवन देणे ही राज्य सरकारची जबाबदारी असेल, तर या गावांचा समावेश मोठ्या महापालिकांत करून ते शक्य होणार नाही.

    पुण्याशेजारी असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उदाहरण याबाबतीत देण्यासारखे आहे. गेल्या १० वर्षांत राज्यात सगळ्यात चांगल्या मूलभूत सुविधा उभ्या करण्यामध्ये पिंपरी-चिंचवडने यश मिळविले आहे. नवी मुंबई महापालिकेनेही असाच प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आत्तापर्यंतचा 'आधी विकास आणि मग त्याचे नियोजन' ही प्रथा मोडून काढून नव्या महापालिकांचे निर्माण करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. 'आधी नियोजन आणि मग विकास' हेच या पुढच्या काळातील सूत्र असणे आवश्यक आहे. अन्यथा शहरीकरणाच्या दबावात सध्याच्या शहरांमधील मूलभूत सुविधांवर प्रचंड ताण येईल आणि तेथील यंत्रणा मोडकळीस येईल. त्याऐवजी नवे, नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासाचे आश्वासन देणारे शहर उभे करणे यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. त्यासाठी प्रारंभीच्या काळामध्ये निधीपासून ते काही सामायिक सुविधा उपलब्ध करून देण्यापर्यंत सगळ्याच बाबींचे नियोजन गरजेचे ठरणार आहे.

    या सगळ्याच बाबींचा 'महाराष्ट्र टाइम्स' आढावा घेणार आहे. ही मागणी करताना कोणाला तरी आत्ताच्या शहरांमधून तोडून टाकण्याची भावना असता कामा नये; पण नव्याचा स्वीकार करताना जुनेही टिकले पाहिजे, हा आग्रह मात्र धरणे आवश्यक आहे. त्याचे भान आताच्या राज्यकर्त्यांनी ठेवले, तरच येत्या शतकाचे आव्हान आपण पेलू शकू.

    ReplyDelete
  3. हवे सुधारित, सुयोग्य तंत्रज्ञान

    डॉ. अनिल पडोशी, माजी अध्यक्ष, मराठी अर्थशास्त्र परिषद

    पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अनेकदा सांगितले आहे की, शेतीचा विकासदर दरसाल निदान चार टक्के दराने कमीत कमी पुढील सहा वर्षे सातत्याने राहिल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकणार नाही. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीत सुधारित‍/सुयोग्य तंत्रज्ञान वापरल्याशिवाय हे कसे शक्य आहे?

    महाराष्ट्र सरकारने येत्या पाच वर्षांसाठी २० हजार कोटी रुपये खर्चाचे एक मोठे अभियान आखले आहे. त्यायोगे साधारण एक कोटी २५ लाख हेक्टर कोरडवाहू शेतीचा विकास व्हायचा आहे. यात अपेक्षित कामांची यादी पाहिली तर छाती दडपते! हे घडले तर राज्य 'सुजलाम सुफलाम' होणार हे नक्की! परंतु एक कोटी २५ लाख हेक्टरना पाच वर्षांमध्ये २० हजार कोटी म्हणजे एका हेक्टरसाठी दरवर्षी फक्त ३२०० रुपये. वाढत्या महागाईमुळे याचे मूल्य दरवर्षी कमी कमी होत जाणार. एवढ्या तुटपुंज्या रकमेत 'कृषिक्रांती' घडल्यास आनंदच आहे. पण ती कशी घडणार हे समजत नाही.

    शेतीक्षेत्राचा विकास हा देशाच्या आर्थिक विकासाचा पाया आहे, हे आता सर्वमान्य तत्त्व आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तर अनेकदा सांगितले आहे की, शेतीचा विकासदर दरसाल निदान चार टक्के (सध्या जेमतेम दोन टक्के आहे) दराने कमीत कमी पुढील सहा वर्षे सातत्याने राहिल्याशिवाय देश खऱ्या अर्थाने सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडू शकणार नाही.

    देशामध्ये, २०११च्या आकडेवारीनुसार ४८ कोटी कामगार आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक (साधारण २६ कोटी) हे उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहेत. गेल्या ६० वर्षांत शेतीवर पोट भरणाऱ्यांची संख्या १२ कोटींवरून २६ कोटींवर गेली. या २६ कोटींपैकी सुमारे १२ कोटी शेतकरी; तर उर्वरित १४ कोटी भूमिहीन शेतमजूर आहेत. महाराष्ट्रात एक कोटी २१ लाख शेतकरी व एक कोटी ३१ लाख भूमिहीन शेतमजूर आहेत. भूमिहीन शेतमजुरांची संख्या शेतकऱ्यांच्या संख्येपेक्षा जास्त असणे चांगले नाही; कारण शेतमजूर हा वर्ग आर्थिकदृष्ट्या सर्वात दुबळा असतो. दुबळ्यांची संख्या वाढणे कोणत्याही देशासाठी अनिष्टच असते.

    पाणी हे शेतीचे आणि मुनष्याचेही जीवन आहे. समाधानकारक पाणीपुरवठा असल्याशिवाय शेती विकासाची कल्पनाच कठीण आहे. यासंबंधी भारतीय शेतीची परिस्थिती असमाधानकारक आहे. २००५च्या सुमारास आपल्या देशामध्ये ४० ते ४५ टक्के शेतीस पाणीपुरवठा समाधानकारक होता. महाराष्ट्रात ही टक्केवारी २०पेक्षा कमी होती. म्हणजेच देशभर साधारण ५५ ते ६० टक्के शेती (महाराष्ट्रात निदान ७० टक्के ) कोरडवाहू, पावसावर अवलंबून आहे. याचाच अर्थ देशांतील एकूण १२ कोटी शेतकऱ्यांपैकी ६० टक्के कोरडवाहू, म्हणजे पावसावर अवलंबून आहेत. शेती हा त्यांच्यासाठी प्राप्ती वाढविण्याचा व्यवसाय नसून केवळ एक जीवनपद्धती आहे. अशा शेतीस पावसाशी खेळला जाणारा जुगार म्हटले जाते, ते बरोबरच आहे. पाणीपुरवठ्याबबात विविध पिकांचा विचार केल्यास एकूण पिकांपैकी केवळ ऊस (९३ टक्के), गहू (८५ टक्के) आणि थोड्या प्रमाणात तांदूळ (२६ टक्के) याच पिकांना पाणीपुरवठा समाधानकारक मिळतो. बाकीची डाळी, तेलबिया, ज्वारी, बाजरी इ. भरड धान्ये सर्वस्वी पावसावर अवलंबून आहेत.

    ReplyDelete
  4. वरील एकूण परिस्‍थितीचे अनेक दुष्परिणाम झाले आहेत. विशिष्ट समाजघटकांत दारिद्र्याचे केंद्रीकरण हा अतिशय गंभीर परिणाम होय. एकूणच जमिनीचे लहान क्षेत्र, बेभरवशाचा पाऊस आणि प्रामुख्याने भरड धान्याची शेती यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांत मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य आहे. २००१च्या आकडेवारीनुसार देशातील एकूण दारिद्र्यापैकी २८ टक्के दारिद्र्य या शेतकऱ्यांमध्ये होते, तर शेतमजुरांचे प्रमाण ४३ टक्के होते. दुसरे म्हणजे, बहुतेक कोरडवाहू शेतकरी एकच पीक घेत असल्यामुळे शेतीचा हंगाम (पावसाळा) संपला की ते बेरोजगार असतात. अकुशल व अशिक्षित कामगारांतील सर्वात जास्त बेरोजगारी या वर्गामध्ये आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावर या लोकांची गर्दी असते. त्यांची देशांतील एकूण संख्या सुमारे पाच ते सहा कोटी आहे हे ध्यानात घेतल्यास याचे गांभीर्य लक्षात यावे. या पार्श्वभूमीवर निदान ४० टक्के शेतकरी, योग्य पर्यायी कामधंदा मिळाल्यास शेती सोडून देण्यास एका पायावर तयार आहेत. परंतु त्यांना योग्य पर्यायी कामधंदा मिळत नाही; कारण त्यांचा अशिक्षितपणा आणि अकुशलता! परिणामी, कोरडवाहू शेतकरीवर्ग व शेतमजूर आपल्या देशामध्ये आर्थिक दृष्ट्या सर्वात दुबळा वर्ग आहे.

    कोरडवाहू शेतीविकासाचे दोन प्रमुख पैलू आहेत. आर्थिक व मानवी! आर्थिक पैलूमध्ये कोरडवाहू शेतीतून भविष्यामध्ये अधिकाधिक उत्पन्न (उत्पादन) कसे घेता येईल याचाच प्रामुख्याने विचार असतो, तर मानवी पैलूमध्ये कोरडवाहू शेतकऱ्याचे दारिद्र्य आणि बेरोजगारी कायमची नष्ट करून त्यांना 'आत्मसन्मानासह आर्थिक विकास' साधणे कसे जमेल याचा विचार असतो. परंतु हेदेखील खरे आहे की, कोरडवाहू शेतीचा आर्थिक प्रश्न सुटला तर मानवी समस्या सुण्यास मोठीच मदत होईल.

    सिंचनाच्या सोयी वाढवणे हा आवश्यक परंतु अजूनही प्रभावीपणे अंमलात न आलेला उपाय आहे. या क्षेत्रातील देशाची प्रगती पाहता अजून निदान १५-२० वर्षे तरी आशा नाही. आणखी एक उपाय म्हणजे कमी पाण्यावरच भरपूर उत्पादन देईल असे बीज विकसित करणे! परंतु यासाठी संशोधन (पैसा, गुंतवणूक) आवश्यक असते. येथे चीन देशाने आघाडी मारली आहे. नवीन बीजे देशातच विकसित केली आहेत. चीनमध्ये शेतीतून मिळणाऱ्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी निदान एक टक्का रक्कम शेतीच्या संशोधनात गुंतवली जाते. भारतात हे प्रमाण अर्धा टक्क्याहून कमी आहे. त्यामुळे चीनने शेतीचे उत्पादन आणि शेतीतील दारिद्र्य निवारण यामध्ये नेत्रदीपक प्रगती केली आहे. आपण मात्र संशोधन म्हटले की अजूनही अमेरिकेकडे बघतो.

    सुलभ कर्जपुरवठा हा उपाय नेहमी सुचविला जातो. पण तो खरा उपाय नाही; कारण मुळातच ही शेती मोठ्या प्रमाणात निर्वाहक्षम नाही. केवळ कर्ज मिळाल्यामुळे ती निर्वाहक्षम (व्हायेबल) होऊ शकत नाही. फक्त शेतकरी कर्जबाजारी होतो व शेवटी आत्महत्या करतो! तेव्हा सुधारित आणि सुयोग्य तंत्रज्ञान हाच कोरडवाहू शेतीविकासाचा आणि देशाच्या आर्थिक विकासाचा खरा मार्ग आहे.

    ReplyDelete
  5. या ठिकाणी, त्या ठिकाणी; मराठीची हेटाळणी?

    राजकारण, सत्ताकारण, सार्वजनिक कार्य, लोकसेवा, नोकरशाही या क्षेत्रांत वावरणाऱ्या व्यक्तींच्या बोलण्यामध्ये 'या ठिकाणी, त्या ठिकाणी' या शब्दांचा वापर जास्त दिसतो. सध्याचे राजकारण व अर्थकारण अनिश्चित, अस्थिर, बदलते आणि दिशाहीन झाल्याने ठोस​, समर्पक विधाने करणेच अशक्य असल्याचा हा परिणाम म्हणावा का?

    जाहीर सभा, सार्वजनिक कार्यक्रम अथवा शिबिरे, अधिवेशने, परिषदा, येथे कायम जाणाऱ्यांना एक शब्द चांगलाच परिचित झाला आहे. तो 'या ठिकाणी' किंवा 'त्या ठिकाणी' अशा रूपात अवतरत असतो. त्याला आता इतकी वर्षे झाली आहेत की, तो कानांना खटकतही नाही. सूत्रसंचालक असो, आभार मानणारा असो की, मुख्य वक्ता; प्रत्येकाच्या तोंडी हा शब्द कायमचा मुक्कामाला आला आहे. 'परभणी जिल्ह्यातील माती त्या ठिकाणी चिकण स्वरूपाची आहे,' 'तुरुंगामध्ये आजकाल दारू पिण्याचे व्यसन त्या ठिकाणी फार वाढले आहे', 'या तरुूण कवीचा काव्यसंग्रह या ठिकाणी आज प्रकाशित होत आहे,' अशी वाक्ये कोणत्याही कार्यक्रमात ऐकू येऊ लागली आहेत.

    एक प्राध्यापक एका विद्यापीठात काही वर्षांसाठी एका मोठ्या हुद्यावर काम करू लागला. त्यामुळे त्याला सतत सार्वजनिक कार्यक्रमात बोलावे लागे. आपल्या भाषणात तो 'प्रामुख्याने' हा शब्द इतक्यांदा वापरू लागला की, त्याला त्या शब्दावरून चिडवले जाऊ लागले. त्यानेही बराच काळ 'या ठिकाणी, त्या ठिकाणी'चा आधार घेतला होता. प्राध्यापकपेशातील व्यक्ती अशा निरर्थक, उपटसुंभ शब्दांचा आधार घेते, याचा अर्थ आपल्या भाषावापरात काही तरी अनुचित घडते आहे.

    राजकारण, सत्ताकारण, सार्वजनिक कार्य, लोकसेवा, नोकरशाही या क्षेत्रांत वावरणाऱ्या व्यक्तींमध्ये 'या ठिकाणी, त्या ठिकाणी'चा वापर जास्त दिसतो. डॉक्टर, वकील त्यांच्या नेमकेपणाच्या व्यावसायिक सक्तीमुळे या शब्दांपासून दूर असतात. मात्र जिथे स्पष्टता, ठोसपणा गरजेचा नसतो​, अशा क्षेत्रांत हा शब्दवापर भरपूर आढळतो. याचा अर्थ ढिलाई, ढिसाळपणा, वेळकाढूपणा, चालढकल, टाळाटाळ, टोलवाटोलवी आणि अनिर्णय जिथे जिथे असतो, तिथे 'या ठिकाणी-त्या ठिकाणी'चे वाहक भरपूर दिसतात.

    ReplyDelete
  6. सध्याचे राजकारण व अर्थकारण अनिश्चित, अस्थिर, बदलते आणि दिशाहीन झाले आहे. त्यामुळे ठोस, समर्पक विधाने आपल्या बोलण्यातून करणेच अशक्य झाले आहे. म्हणून 'आधार कार्डामुळे नागरिकांना फार लाभ झालेला असून, नागरिकांनी यापुढेही त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मी या ठिकाणी करतो,' असे वाक्य सरकारी अधिकारी बोलतो तेव्हा त्याच्या मनातच काही शंका आहे असे त्या शब्दांमुळे जाणवते. या ठिकाणी म्हणजे कोठे? कोणते ते ​ठिकाण? अनेकदा आपले बोलणे अर्धेकच्चे आणि बिनतयारीचे वाटू नये यासाठी जागजागी 'या ठिकाणी-त्या ठिकाणी'ची पेरणी केली जाते. कित्येकदा उभयान्वयी अव्ययाची जागा हे शब्द घेतात. केवल प्रयोगी अव्यये टाळण्यासाठीही त्यांचा उपयोग होत असतो. आपल्या भाषेमधून कोणतेही न्यून झळकू नये याची पुरेपूर काळजी सदर व्यक्ती घेत राहते; परंतु तसे करताना संभ्रम, संशय, संदिग्धता, ती स्वतःच व्यक्त करीत जाते. हे चिन्ह अन्य विश्वासाच्या अभावाचे जसे असते, तसे अनधिकार आणि अनिश्चिततेचेदेखील असते. त्याहीपेक्षा ते ठळकपणे 'नॉन कमिटल' म्हणजे कातडीबचाऊ असते.

    'या ठिकाणी त्या ठिकाणी'ची साथ एकछत्री नेतृत्व असणाऱ्या राजकीय पक्षांच्या सत्तारोहणासोबत आली. या पक्षांचे मोजके नेते भावना, भडकपणा, चिथावणी, शिवराळपणा यांचा सढळ वापर करणारे होते. त्यांची लाट निर्माण झाली. साहजिकच उरलेले त्यांचे कार्यकर्ते भाषणे, विचार, वाद, वाचन, विश्लेषण, चिंतन आदी महत्त्वाचे घटक वगळून केवळ आपल्या कार्यावर सार्वजनिक जीवनात स्थिरावले. त्यांना मंत्रीपदे, आमदारकी आदी प्राप्त झाल्यावरही त्यांची भाषा फुलली नाही. बहरली नाही. एक तर तशी गरज कधी पडली नाही. दोन, सत्तेच्या राजकारणात शिरताच आपोआप गुपिते, खलबते, कारस्थाने, भ्रष्टाचार डावपेच वाढले आणि त्यामुळे भाषेवर आवरणे चढत गेली. भाषेमधून विचारांचा कल सापडतो. भाषा व शब्द एखाद्या नेत्याचे अंतर्मन उघड करतात. स्पर्धेच्या अ​स्थिर वातावरणात राजकारण ठोस, रोखठोक शब्दांचे कधी नसते. कोणालाच आपले अंतर्मन कळू नये, भूमिका स्पष्ट होऊ नयेत यासाठी गुळगुळीत व निरर्थक शब्दांचा मारा करणाऱ्यांचे राजकारण महाराष्ट्रात फार फोफावले.

    राजकारणात शिरण्यासाठी जात, संपर्क, निष्ठा आणि पैसा लागतो अशी सध्या समजूत आहे. साहजिकच वाचन, वैचारिक बैठक व पक्षीय भूमिका स्पष्ट नसलेली माणसे कार्यकर्ते म्हणून हिंडू, फिरू लागतात. त्यांची अशा कार्यक्रमात भंबेरी उडते. एक तर 'कार्य' यामध्येच त्यांचा वेळ आणि दर्जा खर्चत असल्याने त्यांना भाषणाची तयारी करायला उसंत नसते. दोन, ते ज्या समाजघटकांमधून आलेले असतात, त्यात वाचन, लेखन वा भाषण, चिंतन यांची पंरपरा नसते. शिवाय राजकीय संस्कृती​अशी की विचारांपेक्षा माणसे पक्की मिळाली म्हणजे निवडणुकीला सोपे जाते. त्यामुळे कार्यकर्ते भाषणांकडे फक्त व्यासपीठाला लागणारे एक सामान अशाच नजरेने बघतात. माईकसमोर उभे राहून फोटोबिटो होईपर्यंत उरकायचा एक उपचार असा त्यांचा आविर्भाव असतो. अत्यंत औपचारिक, नीरस व बाष्कळ भाषणे करण्याची रीत महाराष्ट्रात अलीकडे पडत चालली, त्यामागे हे असे कार्यकर्ते आहेत. त्यांच्यासाठी ना अभ्यासवर्ग, ना वैचारिक बैठक पक्की करणारी भाषणे.

    'या ठिकाणी त्या ठिकाणी' हे बौद्धिक आळसाचेही चिन्ह आहे. कदाचित राजकीय पक्षांमधून हरवत चाललेले अभिव्यक्ती स्वतंत्र्यही या औपचा​रिकतेला जबाबदार असू शकेल. बोलायचे खूप आहे, पण उगाच एखादे वाक्य बेसावधपणे बोलले जायचे आणि प्रसारमाध्यमांसकट प्रतिस्पर्धी आपल्याला छळायचे, असा पवित्रा आजचे राजकारण घ्यायला लावते. त्यामुळे आपले कार्यच बोलते, आपण कशाला बोलावे, असाही आव चांगल्या भाषणांना मारक ठरतो आहे. कदाचित त्यामुळेच आध्यात्मिक पुरुष गर्दी खेचू लागले. चला, साध्या मराठीत रोखठोक विचार (?) मांडून महाराष्ट्राचे प्रबोधन करतो आहे कोणी, हेही नसे थोडके, 'या ठिकाणी'!

    ReplyDelete
  7. विनाशकाले विपरीत बुद्धी

    स्वतःच्या कर्तृत्वाने बाजी मारण्यापेक्षा राज ठाकरे यांचा पक्ष किती मते घेईल, असली उलटी गणिते सोडवत काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते बसले आहेत. त्याचवेळी, सेना-भाजप युती मात्र बेरजेचे राजकारण करीत आहे. राज्यातली अवस्था काँग्रेससाठी १९९५पेक्षाही वाईट आहे. मात्र, त्याचे भान नेत्यांच्या वागणुकीत मुळीच दिसत नाही...

    निवडणुका हे शेवटी आकड्यांचे गणित असते. त्यामुळे राजकीय गोळाबेरीज करणाऱ्यांना निवडणुकीत यश मिळते. केवळ लाटेवर आरूढ होऊन निवडणुका जिंकता येत नाही. अठरापगड जाती आणि विविध धर्मांचे लोक असलेल्या महाराष्ट्रात कोणी कितीही धर्मनिरपेक्ष आणि जातिनिरपेक्ष चेहऱ्याचा ढोल वाजवला तरी पडद्याआडून धर्म आणि जातिनिहाय समीकरणांवरच निवडणुका लढविल्या जातात. केंद्र आणि राज्यात एनडीएचे सरकार असताना तत्कालीन एकसंघ काँगेससोबत रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, जोगेंद्र कवाडे आणि रा. सू. गवई या आरपीआयच्या प्रमुख नेत्यांना पवारांनी सोबत घेतले होते. तसेच, शेकाप आणि डाव्या पक्षांना सोबत घेऊन शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीत मोठा पराभव केला होता.

    मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बरोबर उलटे चित्र दिसते आहे. गेली १४ वर्षे राज्यात सत्ता उपभोगणाऱ्या काँगेस आणि राष्ट्रवादी आघाडीची पावले बेरजेपेक्षा वजाबाकीकडे पडत आहेत. मुस्लिम आणि दलित समाजाला गृहित धरून या राजकारण्यांनी राज्य केले. परंतु, रिपब्लिकन पक्षासारख्या पक्षांना सत्तेचा वाटा मिळाला नाही. ही मंडळी आपल्याला सोडून 'जातीयवादी' पक्षांशी हातमिळवणी करणार नाहीत, अशा तोऱ्यात हे काँगेस-राष्ट्रवादीचे नेते वागले. आधी एखादे राज्यमंत्रिपद भीक घातल्यासारखे दिले. पण नंतर तर तेवढेही देण्याचे औदार्य त्यांच्याकडे उरले नाही. त्यामुळे, नैराश्येतून ही मंडळी शिवसेना-भाजपच्या ओसरीवर जमू लागली.

    भारतीय जनता पक्षावर उच्चवर्णियांचा पक्ष म्हणून शिक्का मारला जातो. परंतु, या पक्षाने हा शिक्का पुसण्यासाठी माळी, धनगर आणि वंजारी असा 'माधव' फॉर्म्युला आणला. त्यामुळे पक्षविस्तारही झाला. पण मध्यंतरीच्या काळात त्यांनी कट्टर धार्मिक अजेंडा राबविला. मग त्यांच्याकडे कोणी जाण्याचे धाडस केले नाही. मधल्या काळात ही मंडळी बरेच शिकली. केवळ काही हिंदूंच्या मतांवर निवडणूक जिंकता येत नाही, याचे आकलन त्यांना झाले. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा सोडून विकासाचा अजेंडा त्यांनी पुढे आणला.

    महाराष्ट्रात काँगेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युती यांना मिळणारी मतांची टक्केवारी ३५ ते ४०च्या दरम्यान असते. मागील निवडणुकांची आकडेवारी बघता आघाडीने ३५ टक्क्यांपेक्षा जास्त मते घेतली तेव्हा त्यांनी जास्त जागा जिंकल्या. युतीनेही ३५ टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळविली तेव्हा जास्त जागा त्यांच्याही पदरात पडल्या. पूर्वी दलित मते सरळ आघाडीच्या पारड्यात पडत. त्यामुळे युतीला फटका बसत असे.

    यंदाचे चित्र पूर्ण वेगळे आहे. राज्यात सलग तीन खेपा काँगेस-राष्ट्रवादी तर केंद्रात सलग दोन खेपा यूपीए सरकार आहे. लोकांचा कमालीचा रोष काँगेस-राष्ट्रवादीच्या विरोधात आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये दलित मतांसाठी आरपीआय नेत्यांची मनधरणी आघाडी करीत असे. यंदा तसे त्यांच्यासोबत कोणी दिसत नाही. रामदास आठवले महायुतीत आले आहेत. त्याबदल्यात त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली आहे. तीही भाजपच्या कोट्यातून. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आठवले यांना मानणारा मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी बराच दलित समाज आहे. राज्यसभेची जागा आठवलेंना देऊन त्या समाजाला योग्य तो संदेश युतीने दिला.

    ReplyDelete
  8. पश्चिम महाराष्ट्र काँगेस आणि राष्ट्रवादीला आंदण देण्याचे काम आजवर युतीने केले. या बालेकिल्ल्यात युतीला कधी फारसे घुसता आले नाही. परंतु, यंदा राजू शेट्टी यांना सोबत घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील दोन-तीन मतदारसंघांत युतीला तुल्यबळ लढती करता येतील. महादेव जानकर यांचा पक्ष असो की रायगडमध्ये शेकाप असो, प्रत्येक ठिकाणी युतीचे बेरजेचे राजकारण सुरू आहे. आतापर्यंत मुंबई, कोकण, विदर्भ, मराठवाडा, खानदेश येथील काही मतदारसंघात युतीचे वर्चस्व होते. परंतु, यावेळी बालेकिल्ले वाटणाऱ्या मतदारसंघांतही आघाडीच्या उमेदवारांचा दम निघेल, असे आजतरी वातावरण आहे.

    युतीचे असे बेरजेचे नियोजनबद्ध गणित सुरू असताना आघाडीत बिघाडी वाढत चालली आहे. अशी बिकट अवस्था काँगेसची यापूर्वी कधीच नव्हती. मतपेढी पक्की असल्याने ते निर्धास्त असत. काँग्रेस पक्ष एकसंध निवडणुकीला सामोरा जाईल, अशी स्थिती नाही. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेल्या मित्रपक्षाला पांगळे करण्याचे प्रयत्न राज्यात काँगेस नेतृत्वाने केले. त्यामुळे त्यांना स्वतःचा पक्ष बांधण्यास वेळच मिळाला नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंग हे अचानक राजीनामा देतात, आणि दुसऱ्या दिवशी थेट मेरठमधल्या नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या व्यासपीठावर दिसतात, ही खबरही आघाडीच्या राजकर्त्यांना नाही. यातच सगळे आले. मुंबई पोलिस आयुक्तपदावर काम केलेल्या अधिकाऱ्यांनी गुप्तचर यंत्रणाही हाताळलेली असते. त्यामुळे काँगेस राष्ट्रवादीवाले किती धुंदीत आहेत, याचे ही उदाहरण आहे.

    दलित आणि मुस्लिम ही हक्काची मतपेढी आज सुरक्षित नाही. दलितांचा एखादा तरी नेता सोबत हवा, अशी जाग आल्याने आता त्याचा शोध चालला आहे. रामदास आठवले यांना भाजपसारखा पक्ष खासदारकी देतो, मात्र, प्रकाश आंबेडकरांना राज्यसभा देण्याऐवजी परंपरागत घराण्यातच राज्यसभेच्या उमेदवाऱ्या वाटण्यात काँगेस नेतृत्वाला धन्यता वाटते. निवडणूक तोंडावर कोणाला खासदारकी द्यावी, याचा मुत्सद्दीपणाही काँगेस नेत्यांकडे नाही. अकोल्याची लोकसभेची जागा आंबेडकर यांचा पक्ष मागत आहे, परंतु तेवढी जागा देण्याची दानतही अजून काँगेसकडे नाही. प्रदेश काँगेसकडून ए. के. अँथनींकडे शिफारस गेली. पण निर्णय घ्यायला दिल्लीला वेळ नाही. कोणत्या पक्षांशी आघाडी करायची, याचा निर्णय अँथनी घेणार!

    इकडे पक्षाचे जहाज बुडायची वेळ आली असताना गुंगीचे औषध घेतल्यासारखी दिल्ली व राज्यातील काँगेसची नेतेमंडळी आहेत. त्यात आता यवतमाळ तसेच औरंगाबाद मतदारसंघात कार्यकर्त्यांचे मतदान घेऊन काँगेस उमेदवार निवडणार आहे. ही नवी पक्षांतर्गत लोकशाही पक्षाला गाळात घालेल की काय, अशी भीती काँगेसजनांना वाटते आहे.

    ReplyDelete
  9. विनाशकाले विपरीत बुद्धी, अशी काँगेसची अवस्था झाली आहे. यूपीएमधील बरेच पक्ष सोडून जात आहेत. राष्ट्रवादी अजून काँगेसला चिकटून आहे. पण या मित्राच्या निष्ठेबाबत काँगेस साशंक आहे. निवडणुकीनंतर हा मित्र दुसऱ्याच आघाडीत किंवा महायुतीत घुसेल, अशी काँग्रेसनेत्यांना भीती वाटते. दुसरीकडे राष्ट्रवादी, काँगेससोबतच निवडणूक लढविणार, असे जाहीर करून बसले आहेत. पण राष्ट्रवादीशी जागावाटपाची चर्चा करण्यात काँगेसनेत्यांना रस नाही. आधी राज्यातल्या नेत्यांशी चर्चा करा. मग बघू , असे फर्मान राहुलबाबांनी दिल्लीत काढले. त्यामुळे राष्ट्रवादी हैराण आहे. वाटपात त्यांच्या जागा कमी करण्याचा काँगेसचा बेत आहे. पण शरद पवार यांना काँगेसला कसे नाचवायचे, हे चांगले ठाऊक आहे. त्यामुळे तेही आपली खेळी खेळत आहेत. काँगेसबरोबर सत्तेत असताना युतीच्या नेत्यांशी जवळीक साधायची. संभाव्य महा-महायुतीची चर्चा घडवून आणायची, असे उद्योग चालतात. त्या बातम्या कानावर आल्या की काँगेसमधली अस्वस्थता वाढत जाते.

    पवारांना आज राज्यातले वातावरण आघाडीच्या विरोधात गेल्याची स्पष्ट कल्पना आली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी २० जागा काँगेस व राष्ट्रवादीने जिंकल्या तरी खूप झाले. नागपूर, रामटेक या विद्यमान खासदार असलेल्या काँगेसच्या जागा अडचणीत आहेत. अन्य बऱ्याच जागांबाबत वेगळी स्थिती नाही. मराठवाड्यात काँग्रेस एखादीच जागा जिंकेल, तर अन्य जागांवर परिस्थिती विकोपाची आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगली, खानदेशात नंदुरबार, मुंबईत एक-दोन, कोकणात एक काही जागा वगळता अन्य जागांवर काँगेस बिकट स्थितीत आहे. राष्ट्रवादी काही बालेकिल्ले शाबूत राखील. परंतु इतर ठिकाणी त्यांचीही अवस्था काँगेसपेक्षा वेगळी नाही. १९९५च्या काळात आघाडीची अवस्था होती, त्यापेक्षा आज वाईट स्थिती आहे. शिवसेना-भाजप युतीच्या सभांना गर्दी होते आहे. युतीचे नेते खूप कर्तबगार आहेत, असे नाही. पण लोकच जाम वैतागले आहेत.

    याचवेळी, काँगेस आणि राष्ट्रवादी काँगेसचे नेते, राज ठाकरे यांची मनसे काय करणार, टोलनाक्याच्या तोडफोडीत त्यांना अटक करता येईल का, अशा राजकीय बेरीज-वजाबाक्या करण्यात गर्क आहेत. महायुतीच्या मतांची विभागणी कशी होईल, असले उलटे गणित मांडत व सोडवत बसले आहे.

    मागील लोकसभा निवडणुकांमधील राजकीय समीकरण आणि यावेळची निवडणूक यात कमालीचा फरक आहे. तेव्हा उत्तर भारतीयांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे राज ठाकरे यांना अटक झाली होती. सहानुभूतीच्या लाटेचा त्यांना मोठा फायदा झाला होता. तसाच फायदा यावेळीही होईल, या आशेवर आघाडीचे नेते बसले आहेत. पण त्यांचा यावेळी भ्रमनिरास झाला तर आश्चर्य वाटायला नको.

    ReplyDelete
  10. संजय सरकार
    आपल्याला आता गप्प बसून चालणार नाही
    आपण एक सुंदर चित्र आम्हाला दिले आहे ,त्यावर प्रतिक्रिया म्हणून हे असले चाले आपण का खपवून घेता आहात हा काही उद्दात पणा नाही ,हा भोङ्गल्पना झाला ,लोक चित्र परीक्षण करण्या ऐवजी राजकारण एके राजकारण करत बसतात
    लग्नाच्या मंडपात , तीर्थ यात्रेत , स्मशानात शोकसभेत ,
    गणपती नवरात्र ,
    अपघातात , चंद्रावर यान गेले किंवा रेल्वेचा भीषण अपघात , मोनोरेल किंवा बीआरटी
    छोट्या मुलांचे कुपोषण आणि स्त्रियांचे शिक्षण , देवी निर्मुलन आणि उजव्या डाव्या कालव्याचे भूमिपूजन ,सर्व ठिकाणी राजकारण , खेळाच्या मैदानात राजकारण ,संगीत सोहळ्यात राजकारण
    तुम्ही चित्र काढले तरी राजकारण आणि का नाही काढले म्हणून राजकारण
    इतका आचरट देश जगात कुठे नसेल
    आपण आज या बद्दल नापसंती व्यक्त केली तर उद्या असे घडणार नाही !
    पण आपण गप्प बसला तर ?
    आपल्या प्रत्येक क्षणाचे आणि श्वासाचे राजकारण होईल ,
    जाहिरात युगाने जसे आपले आयुष्य कुरतडून टाकले आहे तसे या राजकारणाने पार आपले खाजगी आयुष्य पोखरून टाकले आहे
    आपणच याला आवर घालू शकता !

    ReplyDelete
    Replies
    1. @AMRUTA VISHVARUP February 12, 2014 at 2:34 AM

      संजय सर,

      ह्या अमृत नावाच्या माणसाला येवढा रिकामा वेळ कसा-काय मिळतो हे समजत नाही? प्रत्येक लेखावर, कवितेवर, चित्रावर हा बेलगामपणे लिहित सुटतो. त्या संदर्भात काही माहिती असो वा नसो, याचे लिहिणे चालूच असते. कधीही चांगले विचार याच्या लिखाणातून दिसून येत नाहीत, नेहमी तक्रारीचा सूर असतो. अशा लोकांच्या तक्रारीकडे दुर्लक्षच केलेले बरे!

      प्रतिभा.

      Delete
    2. रिकामटेकडा कुठला!!!!!!

      Delete
    3. पुण्याचा ठोंब्या, आगाऊ आणि भंकस !

      Delete
    4. @ AMRUTA VISHVARUP February 12, 2014 at 2:34 AM

      "विनाशकाले विपरीत बुद्धी"

      Delete
    5. @ AMRUTA VISHVARUP

      "इतका आचरट देश जगात कुठे नसेल"

      स्वतःच्या देशाद्दल असे लिखाण, थु ssss, यांची ह्या देशात राहण्याची लायकीच नाही!

      Delete
  11. असले भंगार प्रचारकी लिखाण कविता किंवा चित्रांच्या प्रतिसादात
    अनिता पाटील विचार मंच किंवा इतर संघटना , कधीही करणार नाहीत हि खात्री आहे ,मग असा प्रश्न पडतो कि हा मूर्खपणा करण्याचा कोणाला झटका येतो
    नक्कीच यामागे संघाचा काहीतरी उद्देश आहे !किंवा म न से चा हा बिनडोक पणा असणार किंवा शिवसेना असणार - कारण त्याना जणूकाही आहात साताच आल्यासारखे वाटत आहे !
    अक्कल गहाण टाकण्याची इतकी हौस कोणाला आहे ?
    संजय सरांनी इतके मनोवेधक चित्र रेखाटले आहे - ते अर्थ पूर्ण आहे , नाविन्यपूर्ण आहे आणि चित्तवेधक आहे अशा वेळी राज ठाकरे , थोरले पवार साहेब किंवा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सत्तेच्या राजकारणाचा उहापोह करण्याची हि जागा किंवा प्रसंग नाही - हे अगदीच मूर्खपणाचे दिसते
    आपणास चित्रकलेत काहीही गम्य नसेल तर थोबाड गप्प ठेवावे पण हटवादी पणाने जिथेतिथे कुत्र्याने प्रत्येक लाइट च्या खांबापाशी पाय वर करावा त्या प्रमाणे आपण प्रत्येक नवीन लेखात राजकारण का आणता ?
    अनिता पाटील विचार मंच यांनी विना मतलब अशा चर्चा टाळल्या तर त्याना अधिक लोक प्रियता लाभेल !

    ReplyDelete
  12. एव्हढे मोठमोठे असंबद्ध लिखाण संजय सोनावनि हे कसे चित्राच्या संदर्भात चालवून घेतात ?एखाद्याच्या शठब्द्य पूर्तीच्या सोहळ्यात कुणी एकदम सगळे आठवणींचे कार्य क्रम चालू असताना , कुणीतरी नर्मदा प्रदक्षणा किंवा गव्हावर पडणारे रोग किंवा बालन्त्पनात स्त्रियांनी काय काळजी घ्यावी असले भासान सुरु केल्यास जसे वेडपट पानाचे वाटेल तसेच हा लेखांचा प्रकार वाटतो आहे ,
    आणि संजय सर ,
    आपण त्याबद्दल एक वाक्यही बोलत किंवा लिहित नाही ?
    कमाल आहे !
    तुमचेच तुमच्या ब्लोग वर लक्ष नाही
    याला काय म्हणावे ?
    पद्मजा

    ReplyDelete
    Replies
    1. @पद्मजा,

      This is peak of your madness!

      Delete
  13. संजय सोनावणी प्रत्यक्ष लिखाणाचा आणि ब्लोग मधील मुख्य चर्चेचा विषय याचा काही संबंध असला पाहिजे का नको ?याबद्दल आपले काय मत आहे ?
    कुणीतरी चर्च मध्ये जसे पादऱ्या समोर काहीही कन्फेशन बॉक्स मध्ये येउन मन मोकळे करत असतो तसा प्रकार चालला आहे . हे सर्व आपल्या देखत चालले आहे याचे फारच वाईट वाटते आहे . आपले चित्र आणि त्या संबंधी चर्चा हवी पण कुणीही काहीही लिहित असते
    उद्या समजा चीनची भिंत आहे त्या जागी न बांधता भारत आणि चीनच्यामध्ये बांधली असती तर ?
    किंवा
    शिवाजी महाराज आग्र्याहून पळून जाताना ब्राह्मणाचा वेश घेऊन चकोट करून पळाले असे लिहिले तर ? किंवा चित्र छान आहे पण आपण जो क्रिकेटचा वर्ल्ड कप जिंकला तो पण ठरवलेला ( फिक्सिंग ) होता असे लिहिले तर ?
    चित्राचा विषय सोडून राज ठाकरे यांच्या बद्दल पाल्हाळ लिहित बसण्यात काय मतलब आहे ?
    आणि खरेतर अशा प्रकारांना अद्दल म्हणून ,
    आपण असले प्रयोग ताबडतोब थांबवून असले प्रतिसाद गाळून टाकले पाहिजेत असे सुचवावेसे वाटते !
    आपले हजारो वाचक आपल्या समर्पक प्रतिसादाची वाट पहात आहेत
    आपण पण ब्लोग च्या बाबतीत स्पोन्सर्द स्पेस देणारे आहात का ?आपली ब्लोग वरची जागा हि प्रायोजित असते का ?

    ReplyDelete
    Replies
    1. शी तुझा गावंढळपणा ............

      Delete
  14. आधुनिक चित्रकला

    आधुनिक (मॉडर्न) चित्रकलेची स्पष्ट जाणीवðदृक्‌प्रत्ययवादानंतर झाली. उत्तर-दृक्‌प्रत्ययवादी चित्रकार सेझान,गोगँ, सरा यांच्या काळापासून आधुनिकतेचे बळ स्पष्टपणे वेगळे दिसू लागले. वस्तू जशी दिसते, तशी वर्णनात्मक पद्धतीने रंगविण्याची पूर्वींची वास्तववादी पद्धती मागे पडू लागली. प्रबोधन काळ, बरोक काळ आणि नंतरचा नव-अभिजाततावादाचा काळ यांतून वास्तववादी पद्धतीची वेगवेगळी रूपे होऊन गेली. या सर्वच कालखंडांत निवळ वास्तवतेहून अधिक समृद्ध असे कलागुण जॉत्तो, जोर्जोने, रेम्ब्रँट, टर्नर, एल ग्रेको या कलावंतांमध्ये होते. दृक्‌प्रत्ययवादापूर्वीच्या दोम्ये, ड्यूरर, दलाक्र्‌वा, कूर्बे या कलावंतांनी निवळ वास्तवतेपासून काही अधिक मिळविण्याचे प्रयत्‍न केले होतेच. दलाक्रवा, कूर्बे यांच्या चित्रांतील रंग-आकारांची हाताळणी नाट्यमय व उत्कट होती. खोटी भावविवशता व अतिरंजित गोडवा त्यांनी कटाक्षाने टाळला. ड्यूरर व दोम्ये यांनी अभिव्यक्तीची उत्कटता साधण्यासाठी प्रसंगी आकृतीचे काही प्रमाणात विरूपणही उत्स्फूर्तपणे केले. निसर्गचित्रणात कॉन्स्टेबल व टर्नर यांनी वेगळ्या वाटा शोधल्या होत्या. बरोक काळात चित्रामध्ये लक्ष्यबिंदु निर्माण करण्याचे कार्य रेम्ब्रँटने आपल्या व्यक्तिचित्रणात केले. तसेच टर्नरने ते निसर्गचित्रणात केले. इतर आकारांना गौण ठरवून लक्ष्यबिंदूवरील आकार ठळक करण्याने एकूण चित्रचौकटीची गुणवत्ताच बदलून गेली.

    या सर्वांच्या कार्यामुळे कलाविषयक जाणिवांमध्ये हळूहळू पण निश्चित स्वरूपाचा बदल होत गेला. विज्ञानातील शोधांमुळे व त्यामुळे उदयास आलेल्या यंत्रयुगामुळे जीवनविषयक जाणिवाही बदलल्या. सामाजिक घडण बदलली. तत्त्वज्ञानात नवे प्रश्न निर्माण झाले. पौर्वात्य व पाश्चात्त्य देशांचे परस्परसंबंध वाढले. पौर्वात्य तसेच आफ्रिकी निग्रो कलांशी संबंध आल्यामुळे पाश्चात्त्य कलावंतांना स्वतःच्या अभिव्यक्तिपद्धतीचा नव्याने विचार करणे अगत्याचे वाटले. वस्तूची तीनही परिमाणे दाखविणाऱ्या पाश्चात्त्य चित्रकलेहून लांबी आणि रुंदी अशा दोनच परिमाणांतून शैलीदार व कसदार आकृती साधणारी पौर्वात्य पद्धती मूलतः वेगळी होती. निग्रो कलेतील सरलता, भाबडेपणा आणि राकट रगदारपणा हे गुण पाश्चात्त्यांना नव्याने परिचित झाले. याच दरम्यान छायाचित्रणाचा शोध लागून, दिसते तसे अचूक चित्रण करण्याची आणि चित्रणात वर्णनात्मक व ऐतिहासिक तपशील अबाधित ठेवण्याची यांत्रिक सोय उपलब्ध झाली. त्यामुळे चित्रकलेचे कार्य याहून मूलतःच भिन्न आहे, ही जाणीव प्रखरतेने झाली.

    छायाचित्रणाप्रमाणे अचूक व हुबेहूब चित्रण करण्याऐवजी, निसर्गातील वस्तूवर होणारा प्रकाशाचा परिणाम आणि त्यामुळे जाणवणारा चैतन्याचा विशिष्ट क्षण व्यक्त करण्याचे प्रयत्‍न प्रथम सुरू झाले. त्यातून दृक्‌प्रत्ययवाद उत्क्रांत झाला.ð माने, ðमॉने, ð दगा, पीसारो या कलावंतांनी चित्रातील वस्तूवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी प्रकाशाचा जिवंत प्रत्यय देणे हेच ध्येय ठरविले. दिनक्रमाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये मिळणारा प्रकाशाचा लोभस प्रत्यय त्यांच्या चित्रांत साठवलेला दिसतो. प्रकाशाच्या जाणिवेबरोबर रंगांच्या पृथक्करणाची सुरुवातही झाली आणि नवी रंगदृष्टी निर्माण झाली. त्यामुळे चित्रातील वस्तू विसविशीत झाली. तेव्हा पुन्हा नव्याने वस्तूवर भर देऊन चित्रण करणे आवश्यक होते. सेझानने वस्तू आणि रंग यांचा पुन्हा नव्याने मिलाफ केला. त्याने रंगाचे सामर्थ्य अबाधित राखले आणि चित्रण करताना नुसत्या अचूक आकृतीऐवजी वस्तूची घनता जतन केली. वस्तूच्या पृष्ठांचे कंगोरे ठसठशीत केले. गोगँने विशेषतः रंगाची सघन उत्कटता आणि निग्रो पद्धतीच्या आकारांचा ठाशीव रांगडेपणा शैलीदार पद्धतीने आपल्या चित्रांत आणला.ðव्हान गॉख याने आपल्या चित्रांतून दोम्ये, ड्यूरर यांच्याप्रमाणेच पण अत्यंत तरल व भावुक अभिव्यक्ती साधली. यानंतर चित्रकलेचे स्वरूप झपाट्याने बदलत गेले. अनेक विचारसंप्रदाय व अभिव्यक्तिपद्धती उदयास्त पावू लागल्या. जर्मनीत भावनाभिव्यक्तीलाच सर्वस्व मानणारा अभिव्यक्तिवाद उत्क्रांत झाला. निवळ रंगाचेच अभिव्यक्तिसामार्थ्य पणाला लावणारा रंगभारवाद फ्रान्समध्ये उदयाला आला. सेझानने घनता साधताना वस्तूच्या पृष्ठांचे पृथक्करण सुरू केले. त्यातून पुढे घनवाद उत्क्रांत झाला. पिकासो, ब्राक या कलावंतांनी वस्तुपृष्ठांचे संपूर्ण विघटन करून अप्रतिरूप चित्रापर्यंतची मजल सोपी करून दिली. घनवादाच्या विकासातील एका टप्प्यावर आणखी एक प्रवृत्ती दिसली. यंत्रयुगातील गती हेच सर्वस्व मानून, गतिशील वस्तूच्या वेगवेगळ्या अवस्थांमधील रूपांचे एका क्षणात चित्रचौकटीत दर्शन घडविण्याच्या प्रयत्‍नातून ðनवकालवाद निर्माण झाला. यंत्र हीच खरी वास्तवता मानून, यंत्राचे आकारच चित्रात रचण्याची लकब लेझेसारख्यांनी स्वीकारली.

    ReplyDelete
  15. एवढ्यातच पहिले महायुद्ध भडकून त्यात झालेल्या भयानक मानवी संहारामुळे नवी पिढी बिथरून गेली. ज्या मानवी संस्कृतीत हे युद्ध उद्भवले, ती संस्कृतीच उधळून लावण्याची बंडखोरी सुरू झाली. तत्त्वज्ञान, समाजकारण, कलाविषयक जाणिवा यांमध्ये आजवर वंद्य व रूढ मानल्या गेलेल्या सर्व श्रद्धा व कल्पना ठोकरून लावण्याची लाट ðदादावादाने उठविली. 'वाट्टेल ते, आपोआप सुचेल ते करू!' ही त्यांची घोषणा होती. चित्रफलकावर रंगाबरोबर वाटेल त्या वस्तू चिकटविताना रूढ कलाकल्पनांना त्यांनी तिलांजली दिली. यातूनच आणखी एक नवी विचारधारा उदयाला आली. संस्कृती, कला, बंडखोरी किंवा नवेपणा या सर्वांचे मूळ मानवी मनात असते. त्या मनाचाच मुख्यतः शोध घ्यावा, म्हणून ð अतिवास्तववादाने पराकाष्ठा केली. अशा मनाचा मुक्तपणे शोध घ्यावयाचा, तर नेहमीच्या व्यवहारातील कार्यकारणभाव बाजूला ठेवणे आवश्यक होते. म्हणून त्यांनी आपाततः सुचणारे आकार व कल्पना हेच कलासर्वस्व मानले. त्यांची हाताळणी प्रसंगी वास्तववादीही होती. स्वप्‍नसृष्टी ही कार्यकारणभावाने बांधलेली नसते, ती पूर्णपणे मुक्त असते हे गृहीत धरून स्वतःच्या चित्रणात वास्तव, दृश्यविश्व आणि स्वप्‍नसृष्टी यांना त्यांनी एकजीव करून टाकले. ð पॉल क्‍ले याने वस्तूऐवजी बहुधा नुसत्याच रंग-आकारांच्याच सुसंवादी रचनेतून चित्र उभारले आणि अप्रतिरूप चित्राला निश्चितता, पूर्णता आणि गुणवत्ता आणली. त्याने चित्रकलेच्या मूलतत्त्वांची मौलिक चिकित्साही निबंधरूपाने केली. या सर्व मंथनामध्ये पिकासो, पॉल क्‍ले यांसारखे काही कलावंत विविध कलासंप्रदायांना जवळचे वाटण्यासारखे होते आणि तशी विविधांगी गुणवत्ताही त्यांच्या कलानिर्मितीत होती.

    दुसऱ्या महायुद्धानंतर कलेचे स्वरूप पुन्हा बदलले. ð जॅक्सन पॉलकने ðक्रियाचित्रण सुरू केले. प्रत्यक्ष क्रियेच्या ओघात घडले ते चित्र, अशी क्रियाचित्रणाची भूमिका आहे.ðचिक्कणितचित्रात कोणत्याही वस्तू चित्रफलकावर चिकटविल्या जातात; मात्र त्यातून सौंदर्याकृती साधण्याची दक्षता घेतली जाते. लोकजीवनाशी किंवा सामान्य माणसाच्या जीवनक्रमाशी निगडित असणारी कलेची रूपे व कल्पना आधारभूत मानून, त्यांतून चित्राकृती साधणारी ð जनकलाही उदयास आली. तिच्या पाठोपाठ ð दृक्‌भ्रमकला पुढे आली. दृक्‌भ्रमकलेमध्ये रंगरेषाआकारांतून अशी आकृती गुंतविली जाते, की तीमधून दृक्‌भ्रम करणाऱ्या हालचाली प्रतीत होतात.

    भारतीय चित्रकलेला आधुनिकतेचे वळण दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास लाभले. ðअमृता शेरगिलच्या चित्रांत ते वळण लक्षात येते. सुरुवातीला काही भारतीय वैशिष्ट्येही त्यात जोपासली गेली. पुढे अनेक अभिव्यक्तिप्रकार निर्माण झाले. त्यांपैकी काही टिकले व काही नामशेष झाले. बेंद्रे, हुसेन, शंकर पळशीकर, रझा, हेब्बर, लक्ष्मण पै, न्यूटन सोझा, मोहन सामंत, डी. जी. कुलकर्णी, के. एस्. पणीक्कर, सतीश गुजराल हे प्रमुख आधुनिक भारतीय चित्रकार. आजच्या पिढीतील भारतीय चित्रकार जनकला, दृक्‌भ्रमकला यांसारखे अत्याधुनिक चित्रकलाप्रकारही हाताळीत आहेत.

    आधुनिक मानल्या गेलेल्या कलेत आजही परस्परविरोधी विचारधारा आहेत. द्विपरिमाणात्मक चित्रपृष्ठाची कल्पना आता अबाधित राहिली नाही. माध्यमशुद्धतेच्या कल्पनाही मागे पडल्या आहेत. कलावंताच्या भावनाभिव्यक्तीला सर्वस्व मानणारी सुरुवातीची आधुनिक कल्पना आता बाद होत आहे. मानवी मनाचे कलाकृतीवर होणारे संस्कार पुसून तिचे अवमानवीकरण करण्याचे प्रयत्‍न अमेरिकेत चालू आहेत.

    ReplyDelete
  16. चित्रकला

    रंगविलेल्या आकारांतून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र, अशी चित्राची सर्वसामान्य व्याख्या करता येते. रंगविण्याच्या प्रक्रियेतच चित्र घडले जाते. लेखन आणि रंगलेपन या दोन्ही क्रिया यात अंगभूत असतात. इंग्रजीतील "पेंटीग' या शब्दाचा अर्थ "रंगि वण्याच्या क्रियेपुरताच मर्यादित आहे; पण चित्रकलेच्या क्षेत्रात लेपनाची क्रिया, रंग-कुंचला-फलकादी माध्यम साधनांची गुणवत्ता, कलावंताच्या भावजाणिवांचे चित्राकृतीतील प्रतिबिंब इ. सर्व सर्जन प्रक्रियांचा अंतर्भाव "पेंटीग' या संज्ञेमध्ये होतो. मराठीतील "चित्रकला' ही संज्ञा याच अर्थाने वापरली जाते. "रंगविण्याची' व्यावहारिक उद्दीष्टे अनेक असतात. घर, नित्योपयोगी वस्तू, कापड, यंत्रसामग्री इत्यादींच्या सुशोभनासाठी वा मंडनासाठी केलेले रंगकाम कारागिरी वा कनिष्ठ किंवा उपयोजित कला यांच्या प्रांतात मोडते. मानवी भाव जाणिवांच्या निखळ आविष्कारासाठी अवतरणारे रंगलेपनाचे प्रकार चित्रकलेत मोडतात.

    शिलाखंडावर रेघोट्या ओढणाऱ्या अश्मयुगीन मानवाने आपापतः चित्रकलेचा पाया घातला. फ्रँकोकँटेब्रिअन संस्कृतीतील आदिमानवाने निर्मिलेली ⇨ अल्तामिरा येथील मित्तिचित्रे अनन्यसाधारण आहेत. आदिमानवाची कला म्हणजे त्याच्या यातुविद्येमधील एक विधी होता आणि यातुविद्या म्हणजे प्रतिकूलतेतही बेहोषीने जीवनकलहास तोंड देण्याची अध्यात्मविद्या होती. मानवी बुद्धिशक्तींना दुर्गम अशा शक्तिसिद्धी यातुविद्येतून मिळत असल्याने "अशक्य ते शक्य' करणाऱ्या या चित्रकिमयेबद्दल मानवाला आदिम काळापासून विस्मय वाटत आला आहे. "चित्र' या संज्ञेच्या मूळ संस्कृत अर्थच्छटांमध्ये तो प्रतिबिंबित झालेला दिसतो. चित्र म्हणजे काहीतरी नेत्रदीपक, असामान्य, आश्र्चर्यकारक, आकाश वा स्वर्ग. चित्रकर्म म्हणजे असामान्य कृती अथवा यातुविद्या व चित्रकर्मा म्हणजे चमत्कार करून दाखविणारा जादूगार किंवा कलावंत, चित्रोक्ती आणि चित्रकथालाप या शब्दांचे अद्‌भुत कथा, सुसंवादी निरूपण असेही अर्थ मिळतात. यांतील सुसंवादित्व हीच सर्व कलेची अंगभूत प्रेरणा आहे. कला या अर्थाचा शिल्प हा प्राचीन संस्कृत शब्दसुद्ध यातुविद्येशी संलग्न होता. आजच्या काळात मात्र शिल्प ही संज्ञा मराठी दृश्यकलांमधील त्रिमितीय आविष्कारांसाठी म्हणजे इंग्रजीत "स्कल्णचर' या संज्ञेचा पर्याय म्हणून वापरली जाते. चित्रकला हा द्विमितीय फलकावरील दृश्यकलाप्रकार आहे. माध्यमशुद्धतेचा हा आग्रह प्राचीन काळी नव्हता आणि आजच्या अत्याधुनिक काळातही तो गौण ठरला आहे. रंगलेपित शिल्पे आणि त्रिमितीय पृष्ठोद्‌गमाचे वा उत्थितपृष्ठाचे चिक्कणितचित्रासारखे (कोलाज) प्रकार आता रूढ झाले आहेत.

    ReplyDelete
  17. संजय सर ,
    आपण चित्र काढून कलेच्या चर्चेला बैठक दिली या बद्दल आपले आभार !
    प्रथम ज्यांनी कुणी चित्रकलेबद्दल इतकी छान माहिती दिली आहे त्यांचे अगदी मनःपूर्वक अभिनंदन आणि ज्यांनी पद्मजा कुंभारे वर विनाकारण टीका केली त्यांना असे विचारावेसे वाटते की तिने असा काय वेडेपणा केला आहे ? तुमच्या ब्लोगवर उलट अशा व्यक्ती करडी नजर ठेवून आहेत आणि योग्य तिथे आपणास जाब विचारत आहेत हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे !
    खरेतर
    संजय सर ,
    अनेक कलांबद्दल आपण अशीच एखादी मालिका लिहिली तरी ते स्वागतार्ह ठरेल !
    आपल्या ब्लोगवर पृथ्वीराज घोरपडे ,समीर घाटगे ,पद्मजा किंवा सांगलीकर,विश्वरूप ,अद्वैत कुलकर्णी ,प्रज्ञा बडोदेकर,गोरख ,स्वप्नाली, चैतन्य ,आप्पा बाप्पा यांचे लिखाण चांगल्या दर्जाचे असते आणि ते एक प्रकारे लगेच टीका करत असतात असा माझा अभ्यास आहे ,त्यामुळे आपल्या चर्चाना एक भरीवपणा येतो ,त्यात आपला सहभाग अजूनच चर्चेची उंची वाढवत नेतो ,
    आता एक मुद्दा ,
    मायकेल एञ्जेलो पासून पिकासो पर्यंत विदेशी चित्रकलेचा प्रवास हा अभ्यास करण्या सारखा आहे
    आपल्याकडे पण तितकी भरीव समर्थ कामगिरी नसली तरी आपले काम ,शिल्प चित्रकलेत अगदीच टाकाऊ नक्कीच नाही ,त्याविषयी लिहिण्या ऐवजी असले असंबद्ध लिखाण लिहून जर कुणी छळत असेल तर त्याचा निषेधाच केला पाहिजे , पद्मजा यांचे काहीही चुकलेले नाही ,
    सामान्य जनमानसात अजूनही हुबेहूब नक्कल करणे म्हणजे उत्तम चित्रकला असा जो भ्रम आहे त्याचे उच्चाटन करणे हे फार अवघड आणि आवश्यक काम आहे- उदा , घोडा आणि त्याच्या हालचाली याबद्दलची मुरली लाहोटी किंवा एम एफ हुसेन यांची कामगिरी , खेड्यातील स्त्री समूह आणि त्यांची एकत्रित रचना या बद्दल बी.प्रभा , अशी बरीच उदाहरणे आहेत !
    संजय सर आपण अजून लिहावे
    कलेच्या आस्वादासाठी जनमानस जागे करण्यासाठी ते गरजेचे आहे ,
    आपले पुन्हा एकदा अभिनंदन

    विनिता गोखले

    ReplyDelete
    Replies
    1. आर बापरे! हि "समता गोखले" आता "विनिता गोखले" कधी पासून बनली? हा..हा..हा........

      Delete
    2. @विनिता गोखले

      पृथ्वीराज घोरपडे ,समीर घाटगे ,पद्मजा किंवा सांगलीकर,विश्वरूप ,अद्वैत कुलकर्णी ,प्रज्ञा बडोदेकर,गोरख ,स्वप्नाली, चैतन्य ,आप्पा बाप्पा यांची नावे वापरून तूच लिखाण करीत असतेस/असतोस, असे म्हटल्यास वावगे ठरू नये!

      Delete
    3. @विनिता गोखले

      काही अपवाद असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही !

      Delete
  18. संजय सोनवणी सर
    आपण फेसबुकवर जे बरेच काही महत्वाचे लिहिता , जसे की सध्याच्या राजकारणाचे सरंजामशाही रूप इत्यादी ,त्यामुळे असे लेख किंवा भाषणे आपण आपल्या ब्लोगवर का टाकत नाही ?
    कारण जे फक्त ब्लोगच आवडीने वाचतात आणि ज्याना फेसबुकवर जाता येत नाही त्याना असे चांगले लिखाण अभ्यासता येत नाही , मिळत नाही ,
    खरे म्हणजे सर्वानी आपल्याला फेसबुकवर फॉलो करणे जास्त योग्य होईल कारण तिथे बरेचसे सभ्य लिखाण असते पण आपल्या ब्लोगवर तसे नसते हा फेसबुकचा फायदा म्हणायचा का ?
    तसेच दुसरी विनंती ,
    आपले ज्या ज्या वेळेस पुण्यात भाषण असेल त्यावेळेस आपण दैनिक सकाळ आणि लोकमत दैनिकात तसे कार्यक्रमात सांगत का नाही ?
    खरेतर असे सर्वच चांगल्या उपक्रमा बाबत सांगावेसे वाटते
    बहुतेक वेळा पेपरातील बातमीतून असे चांगले कार्य क्रम उशिरा कळते विनंती
    धन्यवाद

    ReplyDelete
  19. @ AMRUTA VISHVARUP February 15, 2014 at 6:44 AM

    संजय सर,

    ह्या अमृत नावाच्या माणसाला येवढा रिकामा वेळ कसा-काय मिळतो हे समजत नाही? प्रत्येक लेखावर, कवितेवर, चित्रावर हा बेलगामपणे लिहित सुटतो. त्या संदर्भात काही माहिती असो वा नसो, याचे लिहिणे चालूच असते. कधीही चांगले विचार याच्या लिखाणातून दिसून येत नाहीत, नेहमी तक्रारीचा सूर असतो, भोंगळ विनंत्या असतात. अशा लोकांच्या तक्रारीकडे तसेच विनंत्यांकडे सदा दुर्लक्षच केलेलेच बरे!

    प्रतिभा.

    ReplyDelete
    Replies
    1. होय, AMRUTA VISHVARUP हा वेड्याचा बाजार आहे, हे पूर्ण सत्य आहे!

      Delete
  20. पुन्हा निवडणुका लढवू!:केजरीवाल

    दिल्ली सरकारचा राजीनामा द्यावा लागल्याने आमची निराशा झालेली नाही, आम्ही पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊ, अशी प्रतिक्रिया दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झालेले आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिली.

    इंधनदरवाढीप्रकरणी रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्यानेच काँग्रेस आणि भाजपने घुमजाव करत जनलोकपाल विधेयकाला विरोध केला, असा दावा करत आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसचे अंबानी यांच्याशी असलेले हितसंबंध उघड करण्याची रणनीती 'आप'ने आखली आहे. सत्तेतून बाहेर होताच शनिवारपासूनच देशभरात भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी महिनाभर 'झाडूयात्रा' सुरू करण्याची घोषणा केली.

    मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर केजरीवाल यांनी मुकेश अंबानी यांच्या विरोधातील टीका आणखीच तीव्र केली. अंबानींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या निर्णयावर कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची आपली तयारी आहे. देशासाठी तुरुंगवास भोगण्याचीही आपली तयारी आहे, असे केजरीवाल म्हणाले.

    आज ठरणार उमेदवार?

    लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा करण्यासाठी शनिवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानी 'आप'ची बैठक झाली. 'आप'ने भ्रष्टाचारविरोधात 'झाडूयात्रा' काढण्याचे ठरविले असून देशव्यापी प्रचाराची सुरुवात २३ फेब्रुवारीपासून हरयाणातील रोहतकमधील जाहीर सभेने होणार आहे. रविवारी लोकसभा उमेदवारांची नावे नि​श्चित होण्याची शक्यता आहे.

    निवासस्थान सोडणार नाही

    मध्य दिल्लीतील टिळक लेन येथील निवासस्थानात केजरीवाल यांनी अलीकडेच आपला मुक्काम हलविला होता. आपल्याला घर नसून मुलीची परीक्षा होईपर्यंत हे निवासस्थान आपण सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

    विरोधकांकडून टीकेचा भडिमार

    मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन पळ काढणारे अरविंद केजरीवाल यांच्यावर काँग्रेस व भाजपच्या नेत्यांकडून चौफेर टीका होत आहे. लोकसभा निवडणुकीतील आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभेचा बळी दिला, अशी टीका दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस शकील अहमद यांनी केली. राज्यघटनेच्या पलिकडे जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे अपयशी ठरले, असे दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित म्हणाल्या. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणे हेच केजरीवाल यांचे एकमेव चांगले काम ठरले, असे 'आप'ला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार रामबीर शोकिन म्हणाले.

    भाजप दावा करणार नाही

    दिल्लीतील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी शनिवारी सकाळी प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक झाली. उपराज्यपालांनी सरकार स्थापनेचा प्रस्ताव दिला तर भाजप त्यावर विचार करेल, असे भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार डॉ. हर्षवर्धन म्हणाले. पण आमच्यापाशी बहुमत नसून सरकारस्थापनेसाठी भाजप दावा करणार नाही, असे दिल्ली प्रदेश भाजपचे प्रभारी नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.

    ReplyDelete
  21. दिल्लीत राष्ट्रपती राजवट

    दिल्ली विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणूक घेण्याची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा देताना केलेली शिफारस केंद्र सरकारने धुडकावली आहे. नायब राज्यपाल डॉ. नजीब जंग यांच्या शिफारशीनुसार दिल्ली विधानसभा संस्थगित ठेवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय शनिवारी रात्री पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

    विधानसभा संस्थगित ठेवण्याच्या निर्णयामुळे दिल्लीत फेरनिवडणुकीची शक्यता लांबली आहे. पण सुत्रांच्या मते पुढच्या सहा महिन्यांत फेरनिवडणूक घेणे शक्य आहे. त्याचवेळी भाजपने तयारी दर्शविल्यास दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन होण्याचीही शक्यता कायम आहे. बहुमत नसल्यामुळे भाजप सरकार स्थापन करणार नाही, असे भाजपचे प्रदेश प्रभारी नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. मात्र, उपराज्यपालांनी विचारणा केल्यास सरकार स्थापन करण्यावर विचार करण्याची तयारी भाजपचे नेते हर्ष वर्धन यांनी दर्शविली आहे. राष्ट्रपती राजवटीमुळे भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी घोडेबाजारात उतरण्याची संधी मिळणार आहे. भाजपला बहुमतासाठी चार आमदारांची आवश्यकता आहे.

    मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर दिल्ली विधानसभा विसर्जित करून नव्याने विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याची अरविंद केजरीवाल यांची शिफारस उपराज्यपाल नजीब जंग यांनी फेटाळून लावली. दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याऐवजी निलंबित करून राष्ट्रपती राजवट लावण्यात यावी, अशी शिफारस जंग यांनी गृह मंत्रालय आणि राष्ट्रपतींकडे आपला अहवाल सोपविताना केली. बहुमतातील सरकारने विधानसभा विसर्जित करण्याची केलेली शिफारस राज्यपालांवर बंधनकारक असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता.

    'आप'ला ६७ टक्के लोकांची पसंती

    दिल्लीत विधानसभेची पुन्हा निवडणूक झाल्यास आम आदमी पार्टीला मते देऊ, असे मत ६७.१ टक्के दिल्लीकरांनी व्यक्त केल्याचे सर्वेक्षणात दिसून आल्याचा दावा एका चॅनेलने केला आहे. भाजपला २३.१ टक्के लोकांनी तर काँग्रेसला ६.५ टक्के लोकांनी पसंती दिली.

    २३ फेब्रुवारीपासून भ्रष्टाचारविरोधी मोहीम

    केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर आम आदमी पार्टीने शनिवारी लोकसभा निवडणुकीसाठी एक पाऊल पुढे टाकले. काँग्रेस व भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा समोर आणण्यासाठी २३ फेब्रुवारीपासून देशभर भ्रष्टाचार विरोधी मोहीम राबवण्याचा निर्धारही पक्षाने केला आहे. स्वत: केजरीवाल हरियाणातून या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत.

    ..............

    मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना केजरीवाल यांनी राज्यघटनेचे पालन करण्याची शपथ घेतली होती. पण जनलोकपाल विधेयक कायद्यानुसार मांडण्यात आले नाही. केजरीवाल यांनी घटेचा भंग केला आहे. - सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय गृहमंत्री

    ReplyDelete
  22. 'आप'ला कॉर्पोरेट्स बिचकले

    'आप'ला कॉर्पोरेट्स बिचकले, राजकीय असंतुष्ट हादरले

    आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपले सरकार पाडण्याच्या षडयंत्राकरिता रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना जबाबदार धरल्यामुळे 'आप'कडे आकर्षित होऊ पाहणारी कॉर्पोरेट विश्वातील बडी मंडळी बिचकली आहेत तर जनलोकपालाकरिता केजरीवाल यांनी थेट सत्तेवर तुळशीपत्र ठेवल्याने अन्य राजकीय पक्षातून येऊ पाहणारे असंतुष्टही हादरले आहेत.

    'आप'ला दिल्ली विधानसभा निवडणुकीत यश मिळाल्यानंतर व काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकारही स्थापन झाल्यावर मुंबईतील कॉर्पोरेट विश्वातील मंडळींना मुंबई-महाराष्ट्रातही चमत्कार होण्याची आशा वाटू लागली होती. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारच्या व महापालिकेतील शिवसेना-भाजप युतीच्या कारभाराला कंटाळलेल्या अशा कॉर्पोरेट्सना 'आप'चा पर्याय उभा राहू शकतो, असा विश्वास वाटू लागला होता. मात्र, केजरीवाल यांनी कृष्णा-गोदावरी खोऱ्यातील गॅसच्या दराचा मुद्दा उपस्थित करून थेट रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यावर गुन्हा दाखल केला. इतकेच करून ते थांबले नाहीत तर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर काँग्रेस व भाजप यांनी एकत्र येऊन आपले सरकार पाडण्याकरिता अंबानींच्या इशाऱ्यावरून षडयंत्र रचल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील मंडळींना धक्का बसला आहे. येत्या १९ फेब्रुवारीस 'आप'च्या थिंक टँकमधील प्रमुख योगेंद्र यादव मुंबईत येत असून त्यावेळी कॉर्पोरेट क्षेत्रातील काही नामवंत मंडळी त्यांची भेट घेणार होते. परंतु, आता ती मंडळी काय भूमिका घेतात याकडे 'आप'च्याच मंडळींचे लक्ष लागले आहे.

    लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक प्रस्थापित पक्षामधील मंडळी 'आप'मध्ये प्रवेश घेऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत होती. सध्या समाजवादी पार्टी, लोकजनशक्ती पार्टी अशा पक्षातील काही कार्यकर्ते 'आप'मध्ये दाखल झालेही आहेत. पण, केजरीवाल यांनी सत्ता सोडल्याने ही मंडळी अस्वस्थ झाली आहेत. 'आप'मधून निवडणूक लढवून विजयी झाल्यावर अचानक राजीनामे देण्याचे आदेश झाले तर काय करायचे? अशी चिंता त्यांना वाटत आहे. परिणामी प्रस्थापित राजकीय पक्षातील असंतुष्ट मंडळींचा 'आप'कडील ओघ आटण्याची शक्यता आहे.

    ReplyDelete
  23. आता पक्षबांधणी हेच केजरीवालांचे लक्ष्य

    मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर पुढे काय, हा प्रश्न अरविंद केजरीवाल यांना 'आप'चे नेते, कार्यकर्ते विचारत आहेत. पक्षबांधणीसाठी केजरीवाल यांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा उधळलेला वारू रोखण्यासाठी लोकसभेच्या ११८ जागी उमेदवार उभे करण्याच्या इराद्यात 'आप' नेते आहेत.
    'केजरीवाल यांच्याच नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढणार'
    सत्तास्थापनेमुळे केजरीवाल दैनंदिन कामकाजात अडकून पडले होते. त्यांना इतर नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास फारसा वाव मिळत नव्हता. लोकसभा निवडणूक जवळ येत होती, तर प्रशासकीय वेळकाढूपणामुळे केजरीवाल फारसे प्रभावी निर्णय घेऊ शकले नाही. काँग्रेस पक्ष कोणत्याही परिस्थितीत पाठिंबा काढण्याच्या मनस्थितीत नव्हता. अशावेळी कोणतेही कारण पुढे करून सत्तेतून पायउतार व्हायचे व लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार करायचा, अशी रणनीती केजरीवाल यांनी आखली होती.
    दिल्लीत राष्ट्रपतीराज
    पहिला डाव बरोबर पडला असला तरी दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने केजरीवाल यांची कोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी आगामी काळात केजरीवाल संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे 'आप'च्या गोटातून सांगण्यात आले.
    सरकारच्या राजीनाम्यानेदु:स्वप्न संपले -जेटली
    केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी भ्रष्ट मंत्र्यांची यादी घोषित केली होती. तेव्हाच केजरीवाल राजीनामा देणार असल्याची कुजबुज सुरू झाली होती. भ्रष्ट मंत्र्यांविरोधात प्रचार केल्यास त्याचा लाभ 'आप'ला मिळू शकतो. शिवाय लोकसभा निवडणुकीत काही ठिकाणी 'आप'चे उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे, असा 'आप'चा अहवाल आहे. परंतु प्रचारासाठी अरविंद केजरीवाल मैदानात उतरणार असतील तरच लोकसभा निवडणुकीत पक्षाला लाभ मिळेल, असा पक्षाचे नेते योगेंद्र यादव यांचा कयास आहे. लोकसभा निवडणुकीसोबत दिल्ली विधानसभेची निवडणूक घेतल्यास केजरीवाल यांची कोंडी होईल. लगेचच निवडणूक झाल्यास पुन्हा केजरीवाल सत्तेत येतील व भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रस्थापित पक्षांना अपशकुन होईल. निवडणूक आयोगाने मात्र कोणत्याही क्षणी निवडणुकीस तयार असल्याचे संकेत दिले आहेत. आयोगातील वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून, लोकसभा निवडणुकीसोबतच दिल्ली विधानसभेची निवडणूक घेण्याचा सरकारचा मानस आहे.
    केजरीवाल यांच्यामुळे दिल्लीत अस्थिरता निर्माण झाली. 'आप' सरकारचे ४८ दिवस प्रशासनातील सर्वाधिक वाईट दिवस होते.
    डॉ. हर्षवर्धन, भाजप नेते.
    केजरीवाल घटनाविरोधी वागल्यानेच आम्ही विरोधात मतदान केले होते. राजीनामा देऊन त्यांनी जनमताचा अनादर केला आहे.
    अरविंदर सिंह लवली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष.

    ReplyDelete
    Replies
    1. "आप" ने दिल्ली मध्ये राजीनामा देवून एका बाणात दोन पक्षी (पक्ष- काँग्रेस व भाजप) मारले आहेत!

      Delete
  24. "अभी तो शीला हारी है, अब मोदी की बारी है"

    जनलोकपाल विधेयकच्या मुद्यावरून 'आम आदमी पक्षा'ने दिल्लीच्या सत्तेचा त्याग केल्यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. 'आप'च्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर दिल्लीत पुन्हा एकदा लवकरात लवकर निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेस आणि भाजपने केली आहे. तर दुसरीकडे आगामी लोकसभा आणि दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी 'आम आदमी पक्ष' कामाला लागला आहे. 'आम आदमी पक्षा'ने ४९ दिवसांच्या राजवटीत घेतलेले लोकप्रिय निर्णय आणि मुकेश अंबांनी यांचे गैरव्यवहार आपच्या आगामी प्रचाराचे मुख्य मुद्दे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच "अभी तो शीला हारी है, अब मोदी की बारी है", च्या घोषणा देत 'आप' समर्थक नव्या उत्साहाने कामाला लागले आहेत. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल हेच 'आम आदमी पक्षा'चे नेतृत्व करणार असल्याची माहिती 'आप'चे नेते योगेंद्र यादव यांनी दिली आहे.
    जनलोकपालच्या मुद्यावरून अखेर सत्तात्यागाचा मुहूर्त साधला!
    * ४९ दिवसांत 'आप'ल्याच सरकारवर झाडू
    * ४२ मतांनी जनलोकपाल प्रस्ताव नामंजूर
    ज्यासाठी सत्तास्थापनेचा अट्टहास केला ते जनलोकपाल विधेयक दिल्ली विधानसभेत सादर होऊ न शकल्याने आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. केजरीवाल यांचे बहुचर्चित जनलोकपाल विधेयक विधानसभेत मांडण्याचा प्रस्ताव २७ विरुद्ध ४२ मतांनी फेटाळण्यात आला. या मतदानात भाजप, काँग्रेस व अपक्ष सदस्यांनी सरकारच्या विरोधात मतदान केले. नैसर्गिक वायूच्या दरवाढीवरून रिलायन्सचे मुकेश अंबानी यांच्याविरोधात गुन्हा नोंदविल्यानेच भाजप आणि काँग्रेसने हे विधेयक रोखल्याचा आरोप केजरीवाल यांनी नंतर केला.
    दिल्ली विधानसभेचे अधिवेशन खुल्या मैदानात घेण्याचा आग्रह धरणाऱ्या केजरीवाल यांना नायब राज्यपाल नजीब जंग यांनी 'समज' दिली होती. याशिवाय केंद्र सरकारच्या परवानगीशिवाय जनलोकपाल विधेयक विधानसभेत न मांडण्याची सूचना केली होती. ही सूचना धुडकावून केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयक सभागृहात मांडले. हा प्रकार घटनाबाह्य़ असल्याचे सांगत भाजप व काँग्रेसने विधेयक सादर करण्यास विरोध केला. मतदानानंतर हा प्रस्ताव फेटाळण्यात आला.
    नायब राज्यपालांनी मनाई केल्यानंतरही विधेयक सभागृहात मांडण्याची परवानगी देणारे विधानसभा अध्यक्ष मनिंदरसिंह धीर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार असल्याची घोषणा भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी केली. ते म्हणाले की, विधानसभेच्या चार दिवसांच्या कामकाजात जनलोकपाल विधेयकाचा उल्लेख नाही. शिवाय विधेयक आणण्याची परवानगी नायब राज्यपालांकडून घेण्यात आलेली नाही. तरीदेखील हे विधेयक मांडण्यात आले. हा प्रकार घटनाबाह्य़ आहे.
    मतदानानंतर अरविंद केजरीवाल म्हणाले की, विधानसभा लोकशाहीचे मंदिर आहे. मी भारतीय राज्यघटनेचा अभ्यास केला. तेथे कोठेही लिहिले नाही की, जनलोकपाल विधेयक सभागृहात मांडण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी हवी. केंद्राकडे परवानगी मागितली असती तर ती कधीच मिळाली नसती; याची खात्री भाजप व काँग्रेसला असल्याने ते एकत्र आले आहेत. आम्हाला त्याची पर्वा नाही. आम्ही सरकार नव्हे देशाला वाचविण्यासाठी कटीबद्ध आहोत. भ्रष्टाचार रोखण्यासाठी हजारदा मुख्यमंत्रीपदाची खुर्ची पणाला लावण्यास मी तयार आहे.
    समान मुद्दय़ावर काँग्रेस आणि भाजप एकत्र येतात तर! मग देशाचा विकास हा तो मुद्दा असता तर 'आप' उगवलाच नसता!
    ते आले, ते खोकले, ते गेले.. दिल्ली मात्र अधिकच दिशाहीन झाली.
    (सोशल मीडियावर सामान्यांच्या प्रतिक्रिया)
    जाणे नक्की होतेच..
    काँग्रेस आणि आप यांचे सरकार दीर्घ काळ राहणार नाही, हा अंदाज सर्वानाच होता, पण हा 'घरोबा' कधी संपतो, याचा मुहूर्त माहीत नव्हता. प्रत्येक मुख्यमंत्री सत्तेत टिकून राहण्याची सबब शोधत असतोच केजरीवाल मात्र सत्ता सोडायचीच संधी शोधत होते, असे एका विश्लेषकाने म्हटले आहे. काँग्रेसचाच पाठिंबा घेऊन काँग्रेसविरुद्ध प्रत्येक पाऊल टाकण्याच्या केजरीवाल यांच्या खेळीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही संतप्त होते. काँग्रेस आपला पाठिंबा काढून घेईल आणि पुन्हा जनतेकडे जाता येईल, असा केजरीवाल यांचा होरा होता.

    ReplyDelete
    Replies
    1. "आप "च्या कारकीर्दीने भाजप व कॉंग्रेस दोघे एका माळेचे मणी आहेत हे सिद्ध झाले.हे दोन्ही पक्ष भ्रष्ट व्यवस्थेचा भाग आहेत. राज्यकर्ते जनतेसाठी राज्य करत नसून श्रीमंत कॉर्पोरेट साठी काम करतात हे सिद्ध झाले.हा देश कॉर्पोरेट चालवतात राज्यव्यवस्था कॉर्पोरेटसाठी चालते पैसा तेच कमावतात नेते त्यांचा मुखवटा बनतात आणि आपण राज्यकर्त्यांना दोष देतो.

      -योगेश्वर.

      Delete
    2. होय "अभी तो शीला हारी है, अब मोदी की बारी है"
      हे खरे ठरणारे आहे.

      Delete
  25. दिल्ही मी अरविंद ओर महाराष्ट्र मे राज एक दिन राज करेगा राज अरविंद कि तरह. अरविंद केजरीवाल यांची "दिल्ही तो झाकी हे इंडिया अभी बाकी हे" आनेवाले लोकसभा चुनाव के लिये हमारी तरफ से BEST OF LUCK.

    प्रशांत चव्हाण

    ReplyDelete
  26. "आप "च्या कारकीर्दीने भाजप व कॉंग्रेस दोघे एका माळेचे मणी आहेत हे सिद्ध झाले.हे दोन्ही पक्ष भ्रष्ट व्यवस्थेचा भाग आहेत. राज्यकर्ते जनतेसाठी राज्य करत नसून श्रीमंत कॉर्पोरेट साठी काम करतात हे सिद्ध झाले.हा देश कॉर्पोरेट चालवतात राज्यव्यवस्था कॉर्पोरेटसाठी चालते पैसा तेच कमावतात नेते त्यांचा मुखवटा बनतात आणि आपण राज्यकर्त्यांना दोष देतो.

    -योगेश्वर.

    ReplyDelete
    Replies
    1. "रिलायन्स" वाले अंबानी आणि कंपनी भ्रष्ट सरकारी अधिकार्यांना विकत घेऊन मोठे झालेले आहेत, हे कोणीही नाकबूल करणार नाही.

      Delete
    2. अगदी खरे आहे हे!

      Delete
  27. यावेळेस सगळीकडे आप पक्ष निवडून येणार हे अगदी सत्य आहे !
    त्यामागे अमेरिका आणि रशिया आणि चीनचा हात आहे !
    कारण भारतात अराजक माजणे या सर्वाना आवडेल !
    पद्मजा कुंभारे

    ReplyDelete
  28. आज पर्यंत अनेक टोळधाडी आल्या आणि गेल्या
    संघ- जनसंघ , जनता पक्ष ,असे बरेच प्रयोग झाले
    पण काळाच्या कसोटीवर कोण उतरले ?
    फक्त काँग्रेस !
    त्यामुळे कितीही उड्या मारल्या आणि कितीही रंग बदलले तरी काँग्रेसला पर्याय नाही
    आम्हा सर्वाना त्या केजरीवालचे अजिबात कौतुक नाही ,जनतेने इतके भरभरून निवडून देऊनही जर त्याना अवदसा आठवत असेल तर ते चुकार राजकारणी तरी आहेत किंवा त्यांच्यात दम नाही
    टी व्ही वरच्या मुलाखती पाहून असे वाटू लागते की हे संघ आणि भाजप पेक्षाही स्वतःला शुद्ध तुपातले समजतात ,
    प्रत्येकजण स्वतः जणू सोक्रेटीस अरिस्टोटल प्लेटो असल्यासारखा वागत असतो आणि सर्व जण उरलेल्या वेळात समाज कार्य करणारे वाटतात ,आपापले उद्योग सांभाळत देशकारण करता येत नाही
    म गांधीनी किंवा नेहरूंनी असे नाही केले ,आमच्या लाल बहादुरनि स्वतःची ऑफिसेस सांभाळत राजकारण चालवले नाही किंवा इंदिरा आणि राजीव गांधी यांनी पार्ट तैम उद्योग म्हणून पंतप्रधान पद नाही स्वीकारले एक स्त्री असून इंदिरा गांधीनी सर्वाना हलवून सोडले वाजपेयींनी स्वतः त्यांच्यावर मनसोक्त स्तुतिसुमने उधळली
    पण आज भ्रष्टाचाराचा एकच मुद्दा घेऊन केजरीवाल मुख्यमंत्री बनले ,आणि पूर्व नियोजीत असल्या सारखे रणभूमी सोडून आता पळून जात आहेत त्याना कायदा माहित नसावा असे वाटत नाही ,लेफ्ट गव्हर्नरची परवानगी बिल मांडताना लागते असे आता सोली सोराबजीपण म्हणत आहेत ! यांचे मंत्री सोमनाथ हे कायद्याचे जाणकार आहेत ना ?मग ते सल्ला देताना अशा चुका का करतात आणि बेछूट पणे लोकप्रियता मिळवण्यासाठी ग्यास आणि पाणी यांचे कसे धोरण राबवतात ? ते पाहिले की या पार्टीचा पोरकटपणाच चव्हाट्यावर येतो जनतेला व्हचन देताना यांनी आत्मभान ठेवले नाही आणि आता खेळ अंगाशी आल्यावर ते काढता पाय घेत आहेत आणि निमित्त लोकसभेच्या निवडणुकीचे सांगत आहेत
    काँग्रेसने खरेतर समजूतदार पणे आपला पराभव पूर्ण मान्य करत याना राज्य चालवायला पूर्ण सशर्थ पाठींबा दिला होता पण या सुवर्ण संधीचा त्याना फायदा घेता आला नाही ,उलट त्यांनी त्याचे मातेरे केले आहे !आणि अभावितपणे भाजप या सनातनी पक्षाचा विजय सोपा करून दिला आहे का अशी भीती वाटू लागते यांचे पुढारी फक्त टीव्ही च्यानेल वर गप्पा मारायला चांगले आहेत याना राज्य चालवण्याचा शून्य अनुभव आहे ,गृहपाठ पक्का नसताना हे परीक्षेत पहिल्या नम्बराने येण्याची स्वप्ने बघत आहेत आणि तोंडघाशी पडून स्वतःचे जगासमोर हसे करायची शक्यता पक्की करत जात आहेत !
    स्वप्नाळू लोकांची ही झुंड देशाला मागे मागे नेत जाईल याविषयी आता कुणालाच शंका नाही !
    केजरीवालची पत्नी सुद्धा त्याच्या इतकीच शिकलेली आहे आणि उच्च सनदी अधिकारी आहे
    जर त्या जीवावरच याचे घरचे बरे चालले आहे असे मानून हा माणूस देशाचे भले करायला निघाला असेल तर ते फारच कीव करण्यासारखे आहे !याला सर्वच जर खेळ वाटत असेल तर अशा लोकाना राजकारणातून हद्दपारच केले पाहिजे !
    " नथिंग टू लूझ " या एकाच तत्वावर जर याचे सगळे आडाखे असतील तर हा देशाचे काय भले करणार ?आज काँग्रेस पक्षाला म गांधी ,मोतीलाल , जवाहरलाल , इंदिरा राजीव आणि सोनिया अशी परंपरा आहे सोनिया यांना तर सर्वजण पंतप्रधानाची माळ घेऊन उभे होते , पण त्यांनी मोह आवरला आणि हा केजरीवाल
    पद्मजा कुंभारे

    ReplyDelete
  29. आपण पद्मजाताई चांगला मांडलाय मुद्दा !
    आपण कॉंग्रेसच्या समर्थक आहात हे जाणवते पण आपण जे मांडले आहे ते नाकारणे अवघड आहे कारण केजरीवाल यांचे म्हणणे असे होते की आम्ही समर्थन मागितले नाही आणि काँग्रेस सांगत होती की स्थिरता आणि निवडणुका टाळण्यासाठी आम्ही पाठींबा दिला आहे परंतु आप ने ज्या चुका केल्या त्या भीषण आहेत सोमनाथ यांची वागणूक अत्यंत चूक आहे लाजिरवाणी आहे विश्वास हा माणूस एकदम उगवल्या सारखा येउन काहीही वक्तव्य करतो आहे इतर अनेक सहकारी काल पर्यंत वेगळ्याच भूमिकेत होते आणि आज एकदमसाक्षात्कार झाल्या प्रमाणे त्याना जणू आप म्हणजेच मोक्षाचे साधन वाटू लागले आहे हे सर्व न पटणारे आहे
    छान छान बोलणे अत्यंत सोपे आहे पण काश्मीर विषयक यांचे विचार ऐकले की आप पार्टी किती बोगस आहे याचा प्रत्यय येतो सोमनाथ ,भूषण,विश्वास असे अनेक अपरिपक्व गोळा होऊन पार्टीची प्रतिमा खराब करत आहेत हे सर्वानी लक्षात घेतले पाहिजे
    ज्यांच्याकडे पाणी मीटर आहेत आणि नाहीत त्यांच्यात जो फरक केला आहे तो तर घातक आहे !
    यातून कोणती प्रवृत्ती निर्माण होईल ?महालात रहाणारे आणि रस्त्यावर रहाणारे - पण मग मध्यम वर्गाचे काय ?तो तर आजकाल राजकारणाला दिशा देणारा निर्णायक वर्ग आहे !
    अजूनही रोजगार ,संरक्षण आणि परराष्ट्र , अर्थकारण याबद्दल आप चे विचार अगदीच अपरिपक्व आहेत असे नमूद करावेसे वाटते
    वैकुंठ

    ReplyDelete
  30. ही पद्मजा कुंभारे इतकी उलट सुलट का कॉमेंट करत आहे ?
    एकदा ती काँग्रेस च्या बाजूने बोलते तर त्या आधी आप पक्ष निवडून येणार असे सांगते
    हे काय आहे ?

    ReplyDelete
  31. कमालच झाली
    चित्र काढतात पक्षाचे ,
    पारवा चिमणी कावळा बगळा मोर आणि काकाकुवा
    पण गप्पा मारतात मात्र दुसऱ्याच असे कसे हो बुवा
    मोदी अडवानी केजरी आणि राहुल सोनियांच्या गप्पा
    असे कसे हो तुम्हीच सांगा आप्पा आणि बाप्पा

    ReplyDelete
  32. आप्पा आणि बाप्पा पुण्याचेच पेन्शनर
    याना उद्योगाच नाहीत
    आईने जन्माला घातलाय म्हणून जगतात , कुणी मारत नाही म्हणून जिवंत आहेत
    मारणार कोण ?मेलेल्याला काय मारायचे ?

    ReplyDelete
  33. बाप्पा - बघा आप्पा साहेब आज आम्ही तुमच्या आधी पोचलो !
    आप्पा - अहो काय आहे , तुम्हाला रस्ता पाठ आहे तुमच्या नातीच्या शाळेचा , आमचा नातू अजून टिल्लू आहे ,आपली पूर्वीची हगरी बिगरी हो ! नुसताच दाबा खायचा आणि देवाची प्रार्थना म्हणायची !
    बाप्पा -चला लवकर आज त्यांनी नाटुकली बसवल्ये म्हणे या पिल्लांनी त्यांच्या शाळेत ,
    आप्पा - वा , अगदी थाटाच दिसतोय , आणि हे झेंडे कसले हो सगळीकडे ?शाळेचा तर नाही वाटत , कुठल्यातरी पक्षाचा वाटतो आहे !
    नवीन मराठी शाळा वर्ग २री अ सादर करत आहे एक एक एकांकिका "राजकारण राजकारण "
    बबडी - आज आम्ही तुम्हाला सगळ्या जगाला एक गम्मत सांगणार आहोत ,ती तुम्ही कुण्णा कुण्णाला सांगायची नाही ,जो सांगेल त्याला शिक्षा ,ओळखा बर काय गम्मत आहे ती ?
    छबडी - तुम्ही पिकनिकला जाणार ?
    बबडी - चूक
    छबडी - तुम्ही क्रिकेटची म्याच बघायला जाणार ?
    बबडी - चूक
    छबडी - तुम्ही सिनेमा बघायला जाणार ?
    बबडी - चूक ,sss चूक ! हरलीस म्हण ,हं आता ऐक आम्ही ना , आपण ना सगळ्यांनी ना नवीन पक्ष काढायचा , तू मी गोपू अश्विनी , तिची बहिण ,माझी आई आणि आजी
    छबडी - ए चालेल चालेल , माझी आजी आणि आई बाबा पण येतील आणि आपण सगळ्यांनी आपला देश मोठ्ठा करायचा सगळ्या जगात ,कुणी पैसे खायचे नाहीत आणि सगळ्यांनी खूप काम करायचं ,सगळच सगळ्यांना फुकट द्यायचं , मग कुणालाच पैसे लागणार नाहीत ,पगार पण नको शेतकरी धान्य फुकट देणार , शिंपी छान छान कपडे फुकट शिवून देणार ,कुंभार मडकी फुकट देणार ,वीज फुकट ,ग्यास फुकट ,रहायला घर फुकट !
    बबडी - अग यात विशेष काय ?हे तर केजरीवाल आहेत न ते करणारच होते दिल्लीत ,पण हे दुष्ट काँग्रेस आणि भा ज प आणि तो मुकेश अंबानी आहेत ना त्यांनी यांनी त्यांना कामच करू दिल नाही - आता आपण केजरीवाल सारखा नवीन पक्ष काढून मराठी लोकाना मदत करूया
    छबडी - किती दुष्ट आहेत ना हे सगळे ! आता आपण सगळ्यात आधी समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारूया !,त्यात कुणीच कुणाला पैसे द्यायचे नाहीत - बरोबर ना ?मग नावाडी आपल्याला तिथे फुकट घेऊन जातील ,आपण त्याना आपली पुस्तके फुकट देवूया ,आपले सर त्यांना एबीसीडी फुकट शिकवतील आणि चिमा न्हावी त्यांची फुकट दाढी करेल ,भीमा त्यांना फुकट चपला देईल आणि आबा ठोमरे त्याला फुकट सायकल चालवायला देईल सगळे आपापल्या कडच्या वस्तू एकमेकांना फुकट देतील मग पैसेच लागणार नाहीत - नोटाच नाहीत मग चोरीपण होणार नाही ! सगळे सुखीच होणार पोलिसांना पण काम नाही म्हणून ते शेती करतील - - -

    आप्पा -वा बाप्पा , बघा बघा , हे उद्याचे केजरीवाल आणि अन्न हजारे -
    बाप्पा - पण यात कुणीतरी मोदी आणि शरद पवार पण आला तर ?
    आप्पा - अहो जाऊ द्या हो , हि यांची भातुकलीतली पार्टी समजूया ,आपणतरी आता दिल्लीतला प्रकार काय समजायचा ? एक भातुकलीच नाहीका ?

    ReplyDelete
  34. संजय सर , मी प्रथमच आपल्या ब्लोगवर लिहिते आहे
    आप्पा आणि बाप्पा यांचे पटले कारण केजरीवाल हे आंदोलन करण्यात एक नंबर असतील पण शासन चालवण्यात अगदीच झिरो ठरले ,
    स्वतः ते सनदी अधिकारी होते आणि त्यांच्या मिसेस सुद्धा सनदी अधिकारी आहेत +त्यांना शासन कसे चालते याची जाण असायला हवी पण दुर्दैवाने त्यांची गणिते सामान्य माणसाला कळली नाहीत किंवा त्यांनी जे केले ते पूर्व नियोजित होते असे म्हणायला त्यांनी जागा निर्माण केली आहे
    आपली ताकद नसताना ते सरकार चालवायला गेले ते का ?
    कोणता मोह पडला त्यांना ? काँग्रेस कोणत्याही क्षणी आपल्याला तोंडघाशी पाडू शकते हे माहित नसायला ते दुधखुळे नाहीत आणि असे असताना ज्या खुर्चीवर बसायचे तीच जर दोलायमान असेल तर मग जनता काय म्हणेल ? आपले हसे होईल ,हे भान त्याना का राहिले नाही ? स्वतःची शोकांतिका करून घेत लोकसभेला जायचा जर त्यांचा प्लान असेल तर ते भावनात्मक राजकारण करत आहेत ,आज त्यांचे तिकीट वाटपाचे तंत्र पाहिले तर असे दिसते की पुर्वाश्रमिञ्च्या समाजवादी लोकाना ते जास्त महत्व देत आहेत -म्हणजे मुलायमचा समाजवाद नव्हे तर लोहिया ,जयप्रकाश , एसेम आणि मधु लिमये यांचा समाजवाद - म्हणजेच तिसऱ्या आघाडीचे जणू शुद्धीकरण करण्याचे तर ते राजकारण करत नाहीत न असे वाटू लागते
    मुलायम ,बिजू पटनाईक किंवा नितीशकुमार यांच्या समाजवादाला प्रादेशिक अस्मिता किंवा प्रादेशिक भाषिक बंधनांनी झाकाळून टाकले आहे ,अण्णा हजारेना गुरु मानून केजरीवाल हि प्रादेशिकता तोडू पहात आहेत ,पण खरेतर निओ समाजवाद हा कालबाह्य झाला आहे आणि त्यामुळे केजरीवाल हे एकप्रकारे मध्यम वर्गाचे हितसंबंध सांभाळणारे एक नेतृत्व असेल असे येईल ,त्याला भगवा किंवा हिरवा रंग देत तेच काम मोडी आणि उलायाम करत आहेतच खरेतर हा आयडेंटीटी क्रायसेस आपल्या देशात कायम त्रास देणारा मुद्दा आहे !
    काही कमीजास्त असेल तर अवश्य सांगावे
    सौ मोहिनी पारकर

    ReplyDelete
    Replies
    1. किती खोटी Accounts open करून तीच व्यक्ती लिखाण करीत राहणार आहे, समजायला मार्ग नाही? आप्पा-बाप्पा, केवलभाई-रमणभाई, प्रज्ञा बडोदेकर, अमृता विश्वरूप, पद्मजा कुंभारे, समीर घाटगे, दत्तात्रेय आगाशे, प्रतिभा-प्रतिमा या व अशा अनेक नावांनी एकच व्यक्ती लिखाण करीत असते, हे सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे. स्त्रियांची नावे वापरून लिहायला सुद्धा याला लाज वाटत नाही.

      अनुज, बारामती

      Delete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...