Monday, March 10, 2014

अश्रुंनी माझ्या...



अश्रुंनी माझ्या नेहमीच आनंद गावा
मन कोमल तरी प्रत्येक घाव झेलावा
थेंब थेंब रक्तातून उमलावे असले मळे
कि दिन उद्याचा माझी तुम्हा भेट व्हावा!

18 comments:

  1. अंकुश आणि अविनाश ,
    आता कुठे शेण खायला गेला आहात ?
    तेजस्विनी ताई तुम्हाला आवाहन करत आहेत
    आणि तुम्ही षंढ असल्या सारखे गप्प बसत आहात ?

    संजय साहेब ,आमचे अतिहुशार संजय सर !
    आड गावाहून पेडगावाला जाऊ नका !कसली मनुस्मृती ?कोणाला घेण देण आहे ?
    प्रत्येक गोष्ट मनुस्मृती आणि पुरुष सुक्त असल्या नावाशी जोडण्याची तुमची हौस फिटत नाही अजून ?जी गोष्ट नाकारायची आहे तिचा एकसारखा पंचनामा करत काथ्याकुट करत बसायचं हि त्या विषयाची चेष्टाच आहे आणि ते पाप तुम्ही करत आहात !
    हा गंभीर विषय आहे १९७३ चा मूळ पंढरपूर देवस्थान कायदा नीट वाचा !
    चा आहे त्या वेळेस मुख्यमंत्री कोण होते ते बघा राज्य कोणत्या पक्षच होत ते बघा . त्यांचे हे पाप आहे त्यासाठी जुने अडगळीतील धर्म ग्रंथाचे दाखले देत साप साप म्हणून भुई धोपटण्याची गरज नाही किंवा ब्राह्मण लोकांवर जातीय टीका करण्याची गरज नाही
    अगदी सोपे सत्य सर्वांसमोर ठेवा

    कायदा करताना कोण सत्तेत होते ? आदरणीय वसंतराव नाईक !
    एक सुसंस्कृत उच्च शिक्षित कर्तबगार मागास वर्गीय वंजारी जमातीला भूषण ठरेल असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व !
    विठ्ठल मंदिर कायदा १९७३ वाचताना बेणारी बडवे पुजारी परिचारक हरिदास असे उल्लेख आहेत आणि त्याचं कक्षा ठरवून दिलेली आहे , एक समिती जिल्हा न्यायमूर्ती नाडकर्णी यांच्या देखरेखीखाली हे ठरले आहे बेणारी वेदमंत्र म्हणून पूजा करतात !असे कायद्यात लिहिले आहे त्यात कुठेही ब्राह्मण हा शब्द एकदाही आलेला नाही ,
    आपण भट ब्राह्मण असे उल्लेख सरसकट करता त्या ऐवजी तो कायदा वाक्क्षुन असे नेमके शब्द वापरून त्या बेणारी बडवे हरिदास यांना बोल लावावेत !
    पण तरीही ते कायद्याचे काम , कोन्ग्रेस सरकारने बनवलेला १९७३ चा देवस्थान कायदा पाळत आहेत - एक वंजारी मुख्य मंत्री असताना हा कायदा झाला हे विशेष !
    बोला !
    दुर्वांचे मूळ आणि ऋषीचे कुळ शोधण्यात अर्थ नसतो !

    ReplyDelete
    Replies
    1. @VIVEKANAND SERAO

      भूसनळ्या, त्या अंकुश आणि अविनाश या सभ्य लोकांबद्दल असभ्य लिखाण करताना तुला थोडीसीही लाज कशीकाय वाटत नाही? तू घरात बसून काय करीत आहेस, ..... खातो आहेस काय? मुर्खा तुला देवीं बद्दल व त्यांच्या प्रसादा बद्दल (पुरुषांनी वळलेले लाडू) जास्त पुळका आला असेल तर तू का कोल्हापुरात जाऊन संघर्ष करीत नाहीस? ते तरी सांग! उगीच बहिकल्या सारखे करू नकोस! तोंडावर पडशील, काळजी घे!

      श्रुती शर्मा

      Delete
  2. अय्या !
    अंकुश सुर्वे आणि अविनाश पण ३ दिवस बाजूला बसतात का ग ?
    आता कुठे मधेच गायब झाले म्हणून विचारते हो
    या वयात असा त्रास होतोच + पण यानापण ?
    तुझ आपल काहीतरीच अग ते मर्द मराठे आहेत , ते गेले असणार कोल्हापुरात !
    लाडू वळायला !तुला काय वाटलं तीन दिवस दिसले नाहीत तर ? अगदीच ग तू चावट बाई !
    अनिता + विनिता

    ReplyDelete
    Replies
    1. @ Anonymous March 12, 2014 at 1:26 AM

      तुला शरम नावाची चीज आहे कि नाही, काय हा फालतूपणा?

      अविनाश,ठाणे

      Delete
  3. रंगरंगुल्या,सानसानुल्या,
    गवतफुला रे गवतफुला;
    असा कसा रे सांग लागला,
    सांग तुझा रे तुझा लळा.

    मित्रासंगे माळावरती,
    पतंग उडवित फिरताना;
    तुला पाहिले गवतावरती,
    झुलता झुलता हसताना.

    विसरुनी गेलो पतंग नभिचा;
    विसरुन गेलो मित्राला;
    पाहुन तुजला हरवुन गेलो,
    अशा तुझ्या रे रंगकळा.

    हिरवी नाजुक रेशिम पाती,
    दोन बाजुला सळसळती;
    नीळ निळुली एक पाकळी,
    पराग पिवळे झगमगती.

    मलाही वाटे लहान होऊन,
    तुझ्याहुनही लहान रे;
    तुझ्या संगती सडा रहावे,
    विसरुन शाळा,घर सारे.

    ReplyDelete
  4. नेमेची टांगली चित्रे पांढऱ्या भिंती वरती
    हप्ताभर जनाची रीघ, रांगा मागे पुढती

    रंगात कोणी रंगले कुणाचे भान हरपले
    ओलावती काही नजरा, कुणी पुसती नाकी डोळे

    भावली सारी चित्रे अन चित्रांमधले भाव
    हळूच कुणी मज पुसती, काय हो चित्रांचे भाव

    कुणी घेतली चित्रे, कुणी लाविली बोली
    करिती घासाघीस, टक्क्यात अधेली चवली

    चित्रांच्या भावा परते, होता भाव-अभाव
    अशांच्या लागलो ना नादा, रसिकांत रंक ना राव

    ‘प्रेमा’ पोटी सारी चित्रे तयार झाली
    निर्मिता ना उरली माझी, प्रीतीस केवळ विकली

    म्हणती देव तो वरचा असतो भाव भुकेला
    आम्हीही तसेच म्हणतो प्रीत हवी चित्राला

    ReplyDelete
  5. हिरवी हिरवी गार पालवी
    काट्यांची वर मोहक जाली
    घमघम करती लोलक पिवळे
    फांदी तर काळोखी काळी
    कुसर कलाकृती अशी बाभळी
    तिला न ठावी नागरारीती
    दूर कुठेतरी बांधावरती
    झुकून जराशी उभी एकटी
    अंगावरती खेळवी राघू
    लाघट शेळ्या पायाजवली
    बाल गुराखी होऊनिया मन
    रमते तेथे सांज सकाळी
    येते परतून नवेच होऊन
    लेवून हिरवे नाजूक लेणे
    अंगावरती माखून अवघ्या
    धुंद सुवासिक पिवळे उटणे

    ReplyDelete
  6. धरतीच्या उरावर जेंव्हापासून बसलय आभाळ
    तेंव्हापासून आपण ओळखतोय एकमेकाना
    आपल ठरलच आहे !

    सगळे ढग मातीत उतरेस्तोवर
    आपण खूप आठवणार आहोत एकमेकांना
    आता मोगर्याचा गजरा बिजरा न माळता
    समोर बसलीस तरी काही हरकत नाही
    इतक अखंड एकसंध नंतर काहीही आठवणार नाही
    बघ - तू मी लावलेली ती वेल
    तिच्या तिच्या झाडात कशी मग्न झालेय
    सगळ्याच हाका बंद झाल्याने
    कसं भांबावायला झालंय तुला - आणि मला
    मला तर तू समोर असूनही तुझी खूप आठवण येत्येय
    शांता शेळके

    ReplyDelete
  7. कविता सुंदर आहेत ,अगदी जीव ओवाळून टाकाव्या अशा !
    पहिल्या काही इंदिरा संत यांच्या आहेत ते लगेच ओळखू येते आणि शेवटची तर
    साक्षात शांता शेळके
    ग्रेट
    असेच वाचायला मिळावे म्हणून सर तुम्हीपण कविता करत रहा ! आपलीपण कविता महान आहे !

    ReplyDelete
  8. सब घोडे बारा टक्के...
    -अशोक पानवलकर

    देशभर होळीचा सण साजरा होत असताना लोकसभा निवडणुकीची राजकीय धूळवडही जोरात आहे. सगळे विधिनिषेध गुंडाळून अर्वाच्य भाषेतील मुक्ताफळे, भ्रष्टाचाराची प्रकरणे खुंटीला टांगून त्याच हात बरबटलेल्यांना उमेदवारी आणि निवडणूक निधी उभा करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी…एकूणच धूळवड आली रंगात आहे.

    election.jpg

    आज होळी आणि उद्या धूलिवंदन. मुंबईत उद्या सोमवारी लोक रस्त्यावर येऊन एकमेकांना रंगवण्याचा कार्यक्रम करतात तर इतर काही भागांत शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी हा खेळ होतो. आजच्या दिवशी कोणालाही कोणाच्याही नावाने ‘बोंब’ मारायची जणू परवानगीच असते. एकुणात आज आणि उद्या कसलेच वाईट वाटून घ्यायचे नसते. तसे पाहिले तर देशात सध्या निवडणुकीची हवा आहे. आणि इथली धूळवड तर केव्हाच सुरू झाली आहे. अनेक नेते मंडळींच्या तोंडातून जे काही ‘सुविचार’ बाहेर पडत आहेत, ते पाहता याची खात्रीच पटत आहे. नव्या लोकसभेसाठीचे मतदान अवघ्या तीन आठवड्यांवर आले आहे आणि उमेदवार निवडीच्या अंतिम टप्प्यात आपण आहोत. प्रत्येक पक्ष निवडून येईल असाच उमेदवार निवडतो हे उघड आहे आणि त्यामुळे तुम्हाला, मला हवे असलेले लोक उमेदवार म्हणून येत नाहीत, तर भरपूर आर्थिक पाठबळ असणारे आणि कदाचित गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारे लोकही रिंगणात उतरलेले दिसतात. शिवाय जातीचे राजकारणही सांभाळावेच लागते. दर वर्षी प्रसारमाध्यमात गुन्हेगारी खटले अंगावर असणारे किती उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत याची आकडेवारी प्रसिद्ध होते आणि विसरलीही जाते. याचे एकमेव कारण म्हणजे प्रत्येक मतदार देशाचा विचार न करता स्वत:चा व स्वत:च्या मतदारसंघाचा विचार करतो. त्याचे तरी काय चुकले आहे म्हणा. तो त्याचे रोजचे प्रश्न सोडवेल असाच माणूस निवडतो. मग उमेदवाराचे चारित्र्य, प्रामाणिकपणा वगैरे बाबी बाजूला पडतात.

    हे प्रत्येक पक्षात चालले आहे. आपण सत्तेवर आलोच आहोत, असेच वागणाऱ्या भारतीय जनता पक्षातही काही वेगळे चाललेले नाही. स्वत:ला ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ म्हणवून घेणाऱ्या भारतीय जनता पक्षालाही याने ग्रासले यात नवल नाही. कर्नाटकमध्ये बी. एस. येडियुरप्पा या माजी मुख्यमंत्र्यांना पक्षात परत घेताना पक्षनेतृत्वाला काही वाटले नाही, तसेच परवा बी. श्रीरामुलु या माजी मंत्र्यांनाही परत पक्षात घेण्यात आले. ज्या बेल्लारी भागातल्या खाणकामाबद्दल दोषी ठरवून तीनच वर्षांपूर्वी सीबीआयचा ससेमिरा मागे लागलेल्या श्रीरामुलु यांना ज्या तत्परतेने पक्षात घेण्यात आले ते पाहता फार आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यांना पक्षात घेण्यास आपला तीव्र विरोध आहे, असे भाजप नेत्या आणि कोणे एके काळी शिवसेनेने पंतप्रधानपदासाठी सुचविलेल्या सुषमा स्वराज यांनी ट्विटरवरून कितीही सांगितले असले तरी त्यांचे या बेल्लारी खाण प्रकरणातल्या संबंधितांशी कसे जवळिकीचे संबंध होते हे सर्वांनाच माहीत आहे. बीएसआर काँग्रेसशी युती करण्यासही आपला विरोध आहे, असेही त्या म्हणाल्या होत्या आणि पक्षातल्या व्यासपीठावरही हा प्रश्न उठविला होता. आपण कसे स्वच्छ आहोत आणि आपल्या पक्षाने भ्रष्ट लोकांबरोबर युती करू नये असे आपल्याला कसे वाटते, ते दाखविण्याचा त्यांचा अट्टहास केविलवाणा आहे.
    contd..............

    ReplyDelete
    Replies
    1. श्री आदरणीय संजय सर ,
      आपल्या ब्लोगवर इलेक्शन जेपीजी आणि राज या कलमाने कुणीही काहीही जर चापवून आणू लागले तर हद्द झाली असेच म्हणावे लागेल ,आपणास त्या लोकांची मने मोडता येत नसतील तर आपण दुसऱ्या एखाद्या विषयावरील चर्चेत त्यांनी आपले लेख द्यावेत असे म्हणा , कारण काव्य हि फारच नाजूक गोष्ट आहे , त्याचा आस्वाद घेणारे फारच कमी आणि आओअला कवितेचा विषय फार हळुवार असतो !
      त्या सासाठी आपण असल्या विषयाच्या लेखाना अजिबात जागा देऊ नये अशी नम्र विनंती !

      मधुकर ताम्हाणे

      Delete
  9. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेद्र मोदी यांना वाराणसीची जागा देण्यावरून नाटक झाले, मुरली मनोहर जोशी रुसून बसले आणि लालकृष्ण अडवाणी यांचेही रुसवेफुगवे चालूच आहेत. अरुण जेटली यांना अमृतसरमधून उभे राहण्याचा आग्रह धरला जातोय आणि दुसरीकडे भाजपमध्येच तळ्यातमळ्यात करत असलेले अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी दिल्लीतून नव्हे तर पटना साहेब इथूनच निवडणूक लढवायची असा हट्ट धरलाय. जागा सोडेन तर मोदींसाठीच, नाहीतर मीच लढणार असा त्यांचा बाणा आहे. तर तिकडे छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग हे मुलगा अभिषेकला उमेदवारी मिळालीच पाहिजे असा हट्ट धरून बसलेत. या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतील की नाही हे माहीत नाही. कारण निवडणुकीत सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणे केवळ अशक्य असते. केवळ भाजपलाच नाही तर कोणत्याही पक्षाला. कर्नाटकमधून भाजप गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस २८पैकी १९ जागा जिंकले होते. जिथे एकएक जागा महत्त्वाची असते, तिथे अशी रस्सीखेच होणारच. पण आपापल्या मर्जीतील लोकांची वर्णी लावण्यापेक्षा राजकीय पक्ष वेगळा काय विचार करतात? येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे नेते आहेत आणि त्या समाजाची मते हवी असतील तर त्यांना पक्षाबाहेर ठेवून चालणार नाही हे भाजप ओळखते. त्याचप्रमाणे श्रीरामुलु हे अनुसूचित जमात असणाऱ्या वाल्मिकी नायक समाजाचे आहेत. तिकिटे देताना प्रत्येक पक्ष जातीपातीचा विचार करतोच. मग फक्त भाजपलाच दोष देण्याचे काही कारण नाही.
    टुजी टेलिकॉम घोटाळ्यात अडकलेले ए. राजा जर निवडणुकीच्या रिंगणात येतात, काँग्रेसचे पवनकुमार बन्सल यांना पुन्हा तिकिट मिळते, गैरव्यवहाराच्या आरोपावरून पद गमावलेल्या सुरेश कलमाडी आणि अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांना तिकिटे मिळणार, अशा आशयाच्या बातम्या येतात..मग आणखी काय हवे? शिवाय घराणेशाही काही केवळ गांधी घराण्याचीच नाही. इतर पक्षांत पण लागण झालेली दिसते. केजरीवालांच्या ‘आप’ला ‘पहले आप’ असे आधी म्हटले जायचे. आता त्यांना कोणीही गंभीरतेने घेईनासे झाले आहे. इतर पक्षांच्या मागे कोणता ना कोणता उद्योगसमूह आहे, तसा ‘आप’च्या पाठीशी नाही, हे मान्य. पण निधी गोळा करण्यासाठी ज्या जेवणावळी झडत आहेत ते पाहता ‘आप’ कोणत्या दिशेला जात आहे ते सहज लक्षात येते. अमेरिकेत अशी ‘पेड डिनर वा लंच’ अशी पद्धत आहे. आपल्याला पाश्चात्त्यांचे नको त्या बाबतीत अनुकरण करण्याचे वेड असल्याने असले प्रकार घडत आहेत. त्यात, प्रसारमाध्यमातील लोकांना तुरुंगात टाकण्याच्या वक्तव्यामुळे तर (मीडियातही वाईट प्रवृत्ती आहेत हे मान्य करूनही) हसावे की रडावे हेच कळेनासे झाले आहे. सगळ्यांना एकाच मापात मोजले तर ते कर्तृत्व नसते, हास्यास्पद असते, हे केजरीवालांना कळण्यास बहुदा वेळ लागेल.
    या साऱ्या मनोरंजनाने टीव्हीवरचे मनोरंजनाचे (?) रिअॅलिटी शोही मागे पडले आहेत. महाराष्ट्रातही काही वेगळे चालू आहे असे नाही. भाजप, शिवसेना, मनसे, रिपब्लिकन यांचे जे काही चालू आहे ते भरपूर मनोरंजन करणारे आहे. अगदी लोकसभेच्या उमेदवारीपासून ते थेट आदित्यमित्र राहुल नार्वेकरांच्या (मागे घ्याव्या लागलेल्या) विधान परिषद उमेदवारीपर्यंत. शिवसेना -भाजप युती लोकसभेसाठी शाबूत असली तरी आणखी काही महिन्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ती राहील का? की मनसे-भाजप अशी वेगळीच युती दिसेल? नक्की कोणीच सांगू शकत नाही. एक मात्र नक्की. मतदारांच्या दृष्टिकोनातून सारे पक्ष सारखेच. ज्ञानपीठ विजेते कवी विंदा करंदीकर यांच्याच भाषेत सांगायचे, तर

    गोड गोड जुन्या थापा, जुन्या आशा, नवा चंग,

    जुनी स्वप्ने नवा भंग, तुम्ही तरी करणार काय,

    आम्ही तरी करणार काय!

    त्याच त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय,

    जुना माल नवे शिक्के, सब घोडे बारा टक्के!

    याच कवितेत ते शेवटी म्हणतात..

    भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा, कोण खरा?

    कोणी तिऱ्या कोणी छक्के, सब घोडे बारा टक्के!
    END.

    ReplyDelete
    Replies
    1. आई शपथ ! आता संजय रावांनी हा पण धंदा चालू केला वाटत
      शिरत विकणे आम्ही समजू शकतो पण हे काय ? उद्या कुणी तुमच्या आमच्या लाडक्या ब्लोग वर कोलगेट कशी चांगली किंवा सेनीटरी न्यापकीन आमच्याच कंपनीचा कसा फायदेशीर आहे असे लिहू लागले तर त्याना दोष कसा देणार आपण ?
      आपण जाणून बुजून दुर्लक्ष करत आहात ?

      Delete
  10. भाजपचा बाहेरख्यालीपणा

    -आशिष चांदोरकर

    शिवसेनेशी प्रदीर्घ काळ संसार केल्यानंतर भारतीय जनता पक्षाला शिवसेनेचा कंटाळा आलाय आणि ‘मनसे’चं आकर्षण वाटायला लागलंय. ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वार्धक्यामुळे शिवसेनेला उतरली कळा लागली आणि त्यांच्यानंतर शिवसेना जणू संपलीच आहे. त्यामुळे वेळीच या जोखडातून मुक्त होऊन ‘मनसे’च्या साथीनं नवा संसार थाटूया,’ अशी इच्छा भाजपच्या काही नेत्यांची आहे. भाजपच्या सर्वच नेत्यांना बदफैलीची ही बाधा झालीय, की नाही माहिती नाही. पण ‘मनसे’ला बरोबर घेतले तरच भविष्यात अधिक फायदा आहे, असा समज नागपूर कुळातील बहुतांश नेत्यांनी करून घेतला आहे. त्यांनाच मनसेचा अधिक पुळका आलाय आणि तो अधूनमधून येत असतो.

    raj1.jpg

    मुळात गेल्या काही दिवसांपासून तुलनेने मागे पडलेल्या, राष्ट्रीय राजकारणात जाताना काय भूमिका घ्यायची, याबाबत व्दिधा मनस्थिती झालेल्या आणि मोदीविरोधी गरळ ओकून अडचणीत सापडलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनाकारण चर्चेत आणण्याचे काम भाजपच्या धुरिणांनी केले आहे. टोलच्या मुद्द्यावर आंदोलन छेडूनही राज यांना सूर गवसत नव्हता. ‘राज हे अत्यंत अस्वस्थ आहेत आणि कोंडीत सापडले आहेत. काय निर्णय घ्यावा, हे त्यांना सुचत नाहीये,’ अशी माहिती त्यांच्या अत्यंत निकटवर्तीय देत होते. मात्र, राज यांना या कोंडीतून सहीसलामत बाहेर काढण्याची ‘पूर्ती’ नागपुरातील दिलदार मित्राने केली आहे. या राजनाट्याचे मुख्य मानकरी आहेत नितीन गडकरी.

    ‘मी माझ्या मित्राला भेटलो, सहज भेटलो,’ असे गडकरी म्हणत आहेत. मैत्री जपण्यासाठी त्यांनी नेमकी हीच वेळ साधण्याचे कारण काय, याचा खुलासा गडकरी करू शकतील काय? मुद्दामून सेनेला डिवचायचे आणि तुम्ही सोडून गेलात तरी राज आमच्याजवळ आहेत, हा संदेश उद्धव यांना द्यायचा हाच गडकरींचा हेतू नव्हता, यावर कसा विश्वास ठेवता येईल. तावडे आणि आशिष शेलारही दोनदोनदा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले. काय हो, विधान परिषदेची चर्चा फोनवर होऊ शकली नसती का? मुद्दाम वाद सुरू असताना जाऊन प्रत्यक्ष भेटण्याची आवश्यकताच काय? राजकारणात तुमची मैत्री आणि इतर राजकीय नेत्यांशी असलेले संबंध जपायला हरकत नाही. मात्र, त्याचे विशिष्ट टायमिंग असते. ते प्रत्येकालाच साधता येते, असे नाही. गडकरी गटाच्या नेत्यांनी उद्धव यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे गडकरी गटाचेच हसे झाले. राजीवप्रताप रूडी यांना नाक घासत मुंबईत येऊन उद्धव यांची मनधरणी करावी लागली. नरेंद्र मोदी यांना फोन करून उद्धव यांच्याशी चर्चा करावी लागली. त्यामुळे उद्धव यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर तो सपशेल फसला आहे.

    मुळात गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस तसेच विनोद तावडे या गडकरी समर्थकांना उद्धव यांच्यापेक्षा राज हेच अधिक आकर्षक, लोकप्रिय आणि उपयुक्त वाटतात. ‘राज हे किती प्रभावी आणि गर्दी खेचणारे आहेत. बाळासाहेबांप्रमाणे किंवा राज यांच्याप्रमाणे उद्धव यांना लोकप्रियता, भाषण करण्याची स्टाइल तसेच लोकमान्यता नाही. त्यामुळे उद्धव यांच्याऐवजी राज यांच्यासोबत गेलो तर भविष्यात अधिक फायदा आहे,’ असे काही भाजप नेत्यांनी प्रस्तुत लेखकाशी बोलताना अप्रत्यक्षपणे मान्यही केले आहे. अर्थात, ही गोष्ट मान्य करतानाच शिवसेनेबरोबरची युती अभेद्यच राहील, असेही ही मंडळी म्हणत असतात. पण ते तोंडी लावण्यापुरते. गडकरी गटाला शिवसेनेबरोबरची युती नकोच आहे, हे अनेकदा स्पष्ट झाले आहे. कदाचित शिवसेनेने युती तोडावी, यासाठी ते वाट पाहत असावेत. म्हणजे युती तोडण्याचे पाप उद्धव यांच्या माथी मारले जावे आणि आपण नामानिराळे रहावे, असाच काहीसा त्यांचा प्लॅन असावा.

    शिवाय या संपूर्ण प्रकरणाला गडकरी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यातील शीतयुद्धाचीही किनार आहे. गडकरी आणि उद्धव या दोन्ही सीकेपींमध्ये फारसे मधुर संबंध नाहीत. ‘बाळासाहेब यांच्यापर्यंत माझा फोन पोहोचू दिला जात नाही,’ अशी खंत गडकरी यांनी मागे एकदा केली होती. त्यावरून गडकरी नि मातोश्री यांच्यातील संबंधांची कल्पना येते. तुलनेने मुंडे यांच्याशी बाळासाहेब आणि आता उद्धव यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे कदाचित मुंडे यांना ‘चेक’ देण्यासाठीच गडकरी हे अधूनमधून राजप्रेमाचे उमाळे काढत असतात, असे म्हणायला नक्कीच संधी आहे.
    contd.....

    ReplyDelete
  11. भाजपवाल्यांची गोची अशी झाली, की त्यांना राजही हवाय आणि शिवसेनाही हवीय. मुंडे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी दोन्ही भावांना एकत्र आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद लाभला नाही. मध्यंतरी उद्धव ठाकरे यांनी मदतीचा हात पुढे केला होता. मात्र, मनसेच्या अध्यक्षांनी अत्यंत वाईट पद्धतीने तो झिडकारला. त्यामुळे आता उद्धव आणि राज यांच्यात समेट घडून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्याच त्याच नाटकाचा प्रयोग करण्याची आवश्यकता काय. राज किंवा उद्धव यापैकी एकाचीच निवड भाजपला करावी लागणार आहे.

    अशी वेळ आली, तर कदाचित गडकरी समर्थक हे राज यांच्या पारड्यात आपले माप टाकल्याशिवाय राहणार नाहीत. गोपीनाथ मुंडे आणि त्यांच्या समर्थकांची काय भूमिका असेल, हे ठामपणे सांगता येणार नसले तरीही उद्धव आणि मुंडे यांचे संबंध उद्धव आणि गडकरी यांच्या संबंधांपेक्षा खूपच उत्तम आहेत. त्यामुळे जर मुंडे शिवसेनेशी घरोबा करण्याच्या बाजूने असतील, तर आपण ‘मनसे’चा मुद्दा लावून धरावा, अशी भूमिका गडकरी घेत आहेत का देव जाणे. भाजपच्या राष्ट्रीय नेतृत्वानेच शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना झुलवत ठेवण्याचा आदेश प्रदेश स्तरावरील नेत्यांना दिला आहे, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

    भाजपवाल्यांनी एकदाच ठरवावे, मनसेला बरोबर घ्यायचे की शिवसेनेला. जर मनसे बरोबर नसल्यामुळे फटका बसतो, असे वाटत असेल तर एकदा शिवसेना बरोबर नसताना किती फटका बसतो, ते तरी आजमावून पहा. म्हणजे तुमचे तुम्हालाही कळेल, की शिवसेना खरोखरच अस्ताच्या दिशेने चालली आहे, की शिवसेना संपली, हा भ्रम आहे.

    भाजपला काहीही वाटत असो, त्यांचे धोरण काहीही असो, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेना हा मोठा भाऊ तर भाजप हा धाकट्या भावासारखाच आहे. भाजप मात्र, काही पॉकेट्स पुरता मर्यादित असाच पक्ष आहे. शिवसेनेचे मात्र, तसे नाही. तो राज्यात सर्वदूर पसरलेला आणि तळागाळात रूजलेला पक्ष आहे. ओबीसी, मराठा आणि इतर जाती-जमातींमध्येही शिवसेनेची मतांची टक्केवारी लक्षणीय आहे. राज बाहेर पडण्यानंतरही मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या महानगरपालिका टिकवून ठेवण्यात शिवसेना यशस्वी ठरली आहे. मुंबई महापालिका पडणार, अशी हाकाटी विरोधक आणि पत्रकारांनी पिटल्यानंतरही सलग तिसऱ्यांदा मुंबई पालिकेवर भगवा फडकाविण्यात उद्धव यशस्वी ठरले. त्यांच्याकडे बाळासाहेब यांच्यासारखे वक्तृत्व नसेल. त्यांच्यासारखी शैली नसेल. पण त्यांचे संघटन उत्तम आहे. त्यांनी पक्षाची बांधणी अत्यंत चांगल्या पद्धतीने केली आहे. म्हणून तर अनेकदा पडझडीनंतरही शिवसेना टिकून आहे. तेव्हा उद्धव यांचा करिष्मा नाही, असे भाजपवाल्यांना वाटत असेल, तर वाटू दे. पण त्यामुळे शिवसेनेच्या यशावर काहीही परिणाम होणारा नाही.
    contd.....

    ReplyDelete
  12. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीचे उदाहरण घ्या. ज्या मनसेशी भाजपला घरोबा करायचा आहे, त्या मनसेमुळे भाजपचे कल्याण-डोंबिवली पालिकेतील संख्याबळ १६ वरून नऊवर आले. तर शिवसेनेला फटका बसेल, असे वाटत असताना त्यांच्या जागा २९ वरून ३१ वर गेल्या. म्हणजे बालेकिल्ल्यात सेनेला फटका बसेल, असे वाटत असताना झाले उलटेच. भाजपच्या जागा घटल्या. स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हटवादी प्रवृत्तीचा तसेच चुकीच्या तिकिटवाटपाचा फटका पक्षाला बसला होता. तसाच एकननिष्ठ मतदारांनी ‘मनसे’ला मतदान करण्याचा फटकाही भाजपला सहन करावा लागला होता. मनसेशी युती करण्याआधी भाजपचे एकनिष्ठ मतदार ‘राज’ यांच्या मागे का जातात, याचा पक्षाने विचार करावा.

    तेव्हा आता भाजपने ठरवायचे आहे. ज्या पक्षामुळे आपल्याला फटका बसतो आहे, त्यांच्याशी लढायचे आणि पराभूत करायचे, की पांढरे निशाण हातात घेऊन थेट हार मानायची. शिवाय युती केल्यानंतर आपल्याला फटका बसणारच नाही, याची हमी कोण देणार. दुसरीकडे शिवसेनेची साथसंगत सोडल्यामुळे होणारे नुकसान आणखी निराळेच.

    ‘शिवसेनेने भाजपला अनेकदा वेठीस धरले. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडली. कमळाबाई म्हणून हिणवले’ असे अनेक दावे भाजपकडून वारंवार केले जातात. मात्र, हेच भाजपचे नेते शिवसेनाप्रमुखांचा दिलदारपणा कायम विसरतात. १९९८-९९ च्या काळात मायावती, जयललिता आणि ममता बॅनर्जी यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नाकात दम आणला होता. मंत्रिपदावरून हट्ट आणि अडेलतट्टू भूमिकांमुळे वाजपेयीं कोंडीत सापडले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अटलजींना सांगितले होते, की शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचे मी राजीनामे घेतो. आमच्या वाट्याची दोन मंत्रिपदे त्यांना द्या. पण तुमचे सरकार राष्ट्रहिताचे आहे. ते वाचले पाहिजे.

    पंजाबमध्ये अकाली दल आणि महाराष्ट्रात शिवसेना हे दोन पक्ष भाजपचे खरेखुरे साथीदार आहेत. जुने साथीदार आहेत. नव्या पक्षांना बरोबर आणण्याच्या नादात जुन्या आणि निष्ठावंतांना सोडून देऊ नका, इतकीच अपेक्षा युतीच्या अनेक कार्यकर्त्यांची तुमच्याकडून आहे, असे त्यांच्याशी बोलल्यानंतर स्पष्टपणे जाणवते. बाकी काय, भाजपचे धुरिण स्वतःच्या हाताने अनुकूल परिस्थितही स्वतःच्या पक्षाची आणि स्वतःची माती करून घेण्यासाठी ओळखले जातात. यंदा ती वेळ आणू नका, असेच शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
    End.

    ReplyDelete
  13. संजय सर ,
    प्लीज जरा लक्ष ठेवाल का ?
    अप्रतिम कविता आणि त्याला प्रतिसाद म्हणून ज्याना समजा स्वतःला कविता येत नाहीत पण कवितेचे वाचक म्हणून ज्यांनी काही जुन्या सुंदर कविता प्रतीकाच्या रुपात दिल्या आहेत , त्यानंतर अगदी अत्यंत लाज वाटेल असे लिखाण आणि त्यानंतर प्रचारकी लिखाण आपल्या ब्लोग वर वाचून फार फार वाईट वाटते
    आपण स्वतः यात लक्ष घालून हे बंद करावे अशी नम्र विनंती
    कवितेचा आस्वाद हा फार उच्च विषय आहे , एकप्रकारे ती अनुभूती आहे ,त्यानंतर असा विचका करणारी लिखाणे म्हणजे अति घाण वाटते . आपण आपला ब्लोग हा निवडणूक प्रचाराला भाड्याने दिला आहे का ?कोणताच काही अर्थाअर्थि संबंध नसताना हे लोक कसे असे लिहितात ?
    कृपया आपण त्यांच्या आणि आपल्या भूमिकेचा खुलासा कराल का ?
    कृपया वाट बघत आहे !
    कविता छान आहेत , पण असा दणका आला की ! ? +

    ReplyDelete
  14. अश्रुंनी माझ्या नेहमीच आनंद गावा
    मन कोमल तरी प्रत्येक घाव झेलावा
    थेंब थेंब रक्तातून उमलावे असले मळे
    कि दिन उद्याचा माझी तुम्हा भेट व्हावा!

    संजय सर आपल्या या सुंदर ओळीनंतर अनेकांनी शांत शेळके आणि इंदिरा संत इत्यादी गुणाढ्य कवयत्रिञ्च्या सुंदर रचना आठवणी म्हणून दिल्या आहेत त्यानंतर एकदम हे तुणतुणे आमच्या गळ्यात मारून आपण रंगाचा बेरंग केला आहे !

    आपण आमचे अपराधी आहात !
    आम्हास असले दळभद्री लेख वाचायला लावून आपणास किंवा त्या लेखकाना काय विकृत आनंद मिळतो ते काळात नाही ! आपला प्रतिसाद काय आहे ते ऐकण्यास आम्ही उतावीळ आहो!,कारण आम्हाला हा जुलूम असह्य होत आहे
    त्यापेक्षा आपले लेखन न वाचणे हाच मार्ग उरतो !असे साश्रू नयनांनी सांगावे

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...