Thursday, April 10, 2014

मोदी विवाह: काही प्रश्न!

नरेंद्र मोदींनी आपला विवाह झाला आहे हे अधिकृतरित्या मान्य केले ही चांगली बाब आहे. पण त्यातून उठणारे प्रश्न मात्र अत्यंत गंभीर आणि अनैतिकतेची/अमानुषतेची परिसीमा दाखावणारे आहेत.

नरेंद्र मोदींचे बंधू सोमभाई यांनी दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. कि नरेंद्रभाईंचा जसोदाबेनशी झालेला विवाह हा तत्कालीन प्रथेप्रमाणे झालेला "बालविवाह" होता. (मोदी तेंव्हा १७ वर्षांचे होते.) पारिवारिक दबावाखाली केला गेलेला होता. नरेंद्रभाईंनी वैवाहिक जीवन सुरु होण्याआधीच जसोदाबेनला सोडले व समाजकार्याला वाहून घेतले.

प्रश्न असा आहे कि मोदींनी आपल्या पत्नीला घटस्फोट देवून त्यांना दुसरा विवाह करण्यासाठी अथवा स्वतंत्रपणे त्यांच्या आयुष्याचा कोणताही निर्णय घेण्याची संधी का दिली नाही? त्यांना वैवाहिक बंधनात आजतागायत अडकावून ठेवत, त्यांचा पुर्ण त्याग करत जसोदाबेनच्या भावनिक जीवनाची राखरांगोळी करण्याचा त्यांना कोणता नैतिक अधिकार पोहोचतो? स्त्रीयांना गौण लेखणा-या संस्कृतीचे पक्के अनुयायी असल्याचेच त्यांनी सिद्ध केले नाही काय?

आणि आजतागायत निवडणुकींत दिलेल्या प्रतिज्ञापत्रांत त्यांनी विवाहाबाबतचा रकाना रिकामा ठेवून निवडणूक आयोगाची (पर्यायाने जनतेची) फसवणूक केली नाही काय? केवळ निवडणूक आयोगाच्या धाकाने त्यांना नाईलाजाने आपल्याला पत्नी आहे हे मान्य करावे लागत असेल तर मोदींचे नेमके नैतिकतेचे मापदंड काय?


Peoples Act 1951  प्रमाणे पत्नीविषयकच नव्हे तर तिच्या चल-अचल संपत्तीची माहिती देणेसुद्धा बंधनकारक आहे. मग पत्नी सोबत रहात असो अथवा दूर. ही मोदींनी केलेली फसवणूक नाही काय? 

प्रश्न बरेच आहेत.

पण साध्या माणुसकीचे चिन्ह मात्र कोठे दिसत नाही. विवाह आणि दांपत्य जीवन ही खाजगी बाब आहे हे खरे...पण सीतात्यागाबद्दल आजही रामालाही दोष देणारा समाज मोदींचा हा पत्नीत्याग कसा घेणार आहे?

30 comments:

  1. संजय सोनवणी !
    खरेतर आपण मुलायम सिंग यांच्या उद्गारांची दखल घेणे सर्वात महत्वाचे होते

    शंकरसिंह वाघेला या गुजराथ काँग्रेस च्या नेत्याने सुद्धा लोकाना आवाहन केले , "जरी श्री .मोदिनी टेक्निकली लग्न केले असले तरी त्यांनी कोणत्याही प्रकारचे वैवाहिक जीवन उपभोगले नाही याचा मी साक्षीदार आहे - इतरांनी त्यांच्या खाजगी जीवनात दखल देणे उचित नाही "
    एखाद्या माणसाने लग्न केले किंवा बालविवाह केला आणि काही अपघातस्वरूप तो माणूस कोमात गेला तरीही न्यायालय त्याच्यावर खटला भरणार का ?म गांधी , लोकमान्य ,न्या रानडे ,
    सर्वांचेच बाल विवाह होते कायदा होऊन तो अमलात येणे आणि कायदा होऊन त्याचा अर्थ समाजातील सर्व वर्गात पोचणे आणि सामाजिक रुढीत सुधारणा होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत

    आपल्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल इतके स्पष्ट आणि औचित्य पूर्ण उद्गार अलीकडच्या राजकारणात आणि समाज जीवनात कुणीही काढले नसतील - याबद्दल या काँग्रेस नेत्याचे आभार मानले पाहिजेत यशवंतराव असताना हि जान त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली होती !

    संजय सर , आपण मोदींच्या खाजगी आयुष्यात डोकावून काय साधले ?मोदिनी विवरण पत्रात अजूनही पत्नीच्या संपत्तीचा रकाना कोरा ठेवला आहे ! निवडणूक आयोग त्यांची नियमाप्रमाणे दखल घेण्यास समर्थ आहे . तुम्ही आंबट शौकिन प्रमाणे हा मुद्दा चघळत बसायची गरज नाही ! त्यातून तुम्ही कोणती समाज जागृती करणार - तुम्ही पूर्णपणे चुकला आहात
    आपण यातून काय संदेश देत आहात ?आपले विचार हे कट्ट्यावरच्या गपा अशा लायकीच्या आहेत !
    मागील निवडणुकीत हेमा मालिनी धर्मेंद्र यांच्या बाबत च्या बातम्या आल्या होत्या
    यावेस अमरसिंग यांनी हेमा मालिनी यांच्या बाबत काढलेले उद्गार आणि
    मुलायम यांचे बलात्काराच्या बाबतीत "मुले चुकतात "असे उद्गार जास्त निराशा आणणारे आहेत - अपमानकारक आहेत

    ReplyDelete
  2. संजय सोनवणी ,
    आपल्या लेखनात पुरुषी अहंकार डोकावतो आहे !
    असे आपण म्हणता की मोदी यांनी आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली नाही आणि तिच्यावर अन्याय केला आहे ,आपल्याला एकपत्नी रामही चालतो आणि पाच पुरुषांशी विवाह करणारी द्रौपदीसुद्धा चालते ,कुमारी माता कुंती चालते आणि दश सहस्त्र लग्न करून राधेशी रममाण होणारा कृष्णही चालतो !
    पण भारतीय परंपरेने एकदा वरलेल्या माणसाने आपल्याशी संसार केला नाही तरी त्याला एकदा वरल्यावर तोच आपला सर्वस्व पती परमेश्वर अशा भावनेने राहायचे असेल तर तो तिचा हक्क तुम्ही हिरावून घेत आहात !या पत्नीने श्री मोदींना काहीच दोष दिलेला नाही
    त्याच प्रांतातील काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री फारच सुंदर बोलले आहेत ये खरेतर मोदींचे एकप्रकारे शत्रूच पण त्यांनीही मोदी यांनी कोणतेही वैवाहिक आयुष्य कंठले नाही अशी ग्वाही दिली आहे

    शिवाजी महाराज म गांधी लोकमान्य टिळक यांचा विचार करा !
    म गांधी आणि कस्तुरबा , यांचा इतिहास आणि गांधी सिनेमातील कस्तुरबांची ओढाताण बघा !
    म गांधींच्या मुलांची काय वासलात लागली ?
    संत रामदास यांचे उदाहरण बघा ! ते तर बोहल्यावरून पळाले ,
    पण त्यांचे लिखाण आणि विचार बघा !मनाचे श्लोक वाचा !
    आद्य शंकराचार्यांनी वादविवादासाठी क्षणभर संन्यासी रूप सोडले आणि गृहस्थाश्रम भोगला म्हणजे तो स्त्रीवर अन्याय झाला असे म्हणायचे का ?
    स्त्रीयांना पण आत्मसम्मान आहे आणि त्या पूर्ण आयुष्य एखाद्या पुरुषाला अर्पण करू शकतात . मग भौतिक अर्थाने संसार मांडता नाही आला तरी त्या हा आत्म यज्ञ म्हणून आपले आयुष्य जगत असतील असे आपणास का वाटत नाही

    संजय सर , आपणही स्त्रियाना समजून घेत नाही याचेच वाईट वाटते !

    भारतीय राज्यघटना काळ्या दगडावरची रेघ असेल पण,घटनेप्रमाणे अनेक गोष्टी होत असतात असेही नाही !घटनाबाह्य पण समाजमान्य असेही एक भावनाविश्व आहे - सामाजिक आणि खाजगी अशा दोन स्तरात आपण सुशिक्षित म्हणून किती दखल द्यायची ?
    माहिती अपूर्ण देणे , आणि चुकीची देणे यात एक सूक्ष्म भेद आहे राजकारणी माणूस हा समाजसेवक आहे हे मान्य केले तर त्याच्या खाजगी आयुष्यात किती डोकवायचे हे आपण पाहिले पाहिजे
    आपण स्वतःलाच विचारून बघा , अगदी ग्यास आणि फोन कनेक्शन , विजेचा नवीन मीटर , अशा अनेक गोष्टीत आपण किती गंभीरपणे आपली प्रतिज्ञापत्रे देत असतो ते बघा !
    आपणही अनेकदा पं जवाहरलाल आणि लेडी माउंटब्याटन किंवा अनेक लोक प्रतिनिधींच्या खाजगी जीवनाबद्दल वाचले लिहिले पाहिले असेल
    आजच मुलायमसिंग यांनी केलेले वक्तव्य "बॉईज विल बी बॉईज " हे तर इतके धक्का दायक आहे
    निवडणूकीच्या धुमाळीत ते बेधडक असे बलात्काराचे कायदे बदलायची भाषा करत आहेत , कारगिल युद्धाबाबत विधान केले ते बघा !
    आपण या सर्व मुद्द्यांना बगल देत मोदी यांच्या लग्न बाबतचा मुद्दा लावून धरणे आपणास शोभत नाही असे स्पष्ट सांगावेसे वाटते निवडणूक आयोग त्याची दखल घेण्यास पूर्ण समर्थ आहे !
    स्वप्नाली

    ReplyDelete
  3. संजय साहेब,
    मी आपले ब्लॉग मनापासून वाचतो; पण आज मोदी विवाह सारख्या शुलक विषयावरून आपले मत वाचून हा विषय तुम्हाला एवढा महत्वाचा का वाटावा याचे आश्चर्य वाटते. आपल्या भारतीय संस्कृतीत एका स्त्रीने एखाद्या पुरषाशि विवाह केल्यावर त्याला ती जन्मभर आपला पति मानते हे त्या माउलीचे मोठेपण त्या बद्दल त्या माउलीला कोणताही खेद वा दुख नाही (त्यांची मुलाखत Youtube आहे) पण काही राजकारणी आणि आपल्या सारखे पंडित या विषयाचा बाऊ करून त्या माउलीच्या भावनांशी खेळतात. त्या मुळे अशा विषयावर लिहा ज्याने समाज प्राभोधन होईल.

    एखाद्या राजकीय पक्षाचा मुखवटा घातल्या सारखे लिहून काय फायदा.

    राजू फोडसे

    ReplyDelete
  4. -स्वतःच्या बायकोला अशी वागणूक देणाऱ्याने महिला सबलीकरणाची भाषा करू नये.

    -आज पर्यंत मोदी मुग गिळून गप्प का बसले होते?

    -बिचारी ४५ वर्षांपासून आपल्या सख्ख्या नवऱ्याची चातकासारखी वाट बघत बसली आहे त्याचे काय?

    -जशोदाबेन यांच्याकडे शिक्षिकेची नोकरी होती म्हणून बरे, नाहीतर त्यांची काय अवस्था झाली असती हे सांगण्याचीही गरज नाही.

    -नरेंद्र मोदीला जनाची नाही तर मनाची लाज का बरे वाटत नाही!

    -मोदीने येवढा अन्याय केलेला असतानाही जशोदाबेन यांनी कधीही बदल्याची भाषा केली नाही तर मोदीची ती स्तुतीच करीत राहिली, हे मोदीचे करंटेपण आणि त्या माउलीचे मोठेपण नाही काय?

    -निवडणुकीचा अर्ज भरताना मोदी बायकोच्या संदर्भातील माहिती भरत नसत याला काय म्हणावे, का काही म्हणूच नये?

    -मोदीने एका महिलेची पाळत ठेवायला लावली होती, अशा माणसाकडून महिलांनी काय आशा बाळगावी? आणि म्हणे पंतप्रधान पदाचे उमेदवार?

    भारती प्रधान

    ReplyDelete
  5. विधानसभा में कुंवारे थे, लोकसभा में शादीशुदा निकले मोदी

    गुजरात के मुख्यमंत्री नरेन्द्र भाई मोदी विधानसभा चुनाव में पर्चा दाखिले के वक्त तक कुंवारे थे, देश ने उनकी बारात नहीं देखी और लोकसभा के पर्चें में उन्होंने खुद को शादीशुदा बता दिया। मध्यप्रदेश कांग्रेस ने इसे आचार संहिता का उल्लंघन बताया है।
    मध्यप्रदेश कांग्रेस के मुख्य प्रवक्ता के.के. मिश्रा ने पीएम इन वेटिंग और वड़ोदरा (गुजरात) के भाजपा प्रत्याशी नरेन्द्र मोदी द्वारा बुधवार को दाखिल किये गये नामांकन पत्र में अपनी धर्मपत्नी के नाम के काॅलम में स्वयं को विवाहित बताते हुए पत्नी के रूप में श्रीमती जशोदाबेन मोदी का नाम बताये जाने और उसके पूर्व उनके द्वारा लड़े गये अब तक के विधान सभा चुनावों में स्वयं के अविवाहित होने और पत्नी के कॉलम को निरंक रखे जाने की घटना को भारतीय संविधान और आदर्श आचार संहिता का खुला उल्लंघन, धोखाधड़ी और अक्षम्य आपराधिक कृत्य निरूपित किया है।
    उन्होंने आज यहां कहा है कि यह मुद्दा इसलिए और ज्यादा गंभीर है कि भाजपा और मोदी दोनों ही चुनावी समर में कथित रूप से महिलाओं के सम्मान-स्वाभिमान और उनकी रक्षा की निरंतर दुहाईयां देते आ रहे हैं। इस लिहाज से उनके इस कृत्य की गंभीरता और अधिक महत्वपूर्ण हो रही है। लिहाजा, कांगे्रस पार्टी की मांग है कि उनके विरूद्ध संविधान और आदर्श आचार संहिता के साथ धोखाधड़ी व आपराधिक कृत्य का प्रकरण दर्ज किया जाए तथा उनकी विधान सभा सदस्यता भी समाप्त की जाए।

    ReplyDelete
  6. विधानसभा निवडणुकांच्या वेळी मोदींनी पत्नी संदर्भातील रकाना मोकळा सोडला होता़ (खोटारडा कुठला!) या वेळी मात्र त्यांनी पत्नी असल्याचे मान्य केले. त्यामुळे त्या वेळी खोटे प्रतिज्ञापत्रा का सादर केले, तसेच या वेळी मोदींनी पत्नीच्या संपत्तीबाबत माहिती नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आह़े

    'मोदींनी त्यांचे वैवाहिक स्थिती मान्य केली आह़े महिलेवर पाळत ठेवणाऱ्या, पत्नीचा अधिकार हिरावून घेणाऱ्या व्यक्तीवर देशातल्या महिला विश्वास ठेवू शकतील का?

    ReplyDelete
  7. या प्रतिक पाटलाचे बोलणे तुम्हाला इतके का झोंबले ?
    एकीकडे तुम्ही म्हणता की एकट्या दुकट्याच्या अनुभवावरून संपूर्ण जातीला बदनाम करू नये ,मग नथुराम गोडसे वरून संपूर्ण ब्राह्मणाना कायम आपल्या ब्लोग वरून बदनामकारक लिहिले जाते त्या वेळेस आपण कुठे असता ?
    आपण सतत वैदिक धर्मावर भडक लिहित असता त्यावेळेस कुणी काही लिहिले तर आपण का अस्वस्थ होता ?
    आपण संधिसाधू आहात हे जगजाहीर आहे ,आज जैन लोकांसमोर आपण वैदिकाना शिव्या देण्याचे सुख अनुभवाल हे माहीतच आहे !आपल्या सारखी घाण हा समाज दुभांगाण्याचे काम करत आहे

    ReplyDelete
  8. Every news item can be seen from your own outlook
    In present election fever and general climate of distrust and negativity it is difficult to see any positivity in action
    Narendra Modi's status of married life can be seen as act of a person devoted to the cause of Nation and society and sacrificing his personal pleasures.
    It is rare in modern India but our history is full of such examples. Most of freedom fighters and first generation leaders would fit this bill ......food for thought
    Sharad Dandawate

    ReplyDelete
  9. प्रिय संजयजी,
    सत्य की खोज के लिए पुत्र और पत्नि को त्यागनेवाले गौतम को लोग सिद्धार्थ पुकार कर पूजते है, स्त्री विरोधी होने के नाम पर निंदा नहीं करते. सत्य की खोज में अपनी माता को त्यागनेवाले आदि शंकराचार्य हो या विवाह मंडप से भागनेवाले समर्थ, समाज ने त्याग को भोग से सदा ज्यादा सम्मान दिया है. यदि मोदी ने पत्नि को क़ानूनी रूप से नहीं त्यागा तो पत्नि ने भी तो उनका त्याग कभी नहीं किया. क्या वे मुकदमा दाखल करके मुक्ति नहीं मांग सकती थी? यदि वे मुकदमा दाखिल करती तो क्या मोदी विरोध करते? वे दोनों अपने अपने स्तर पर त्यागमूर्ति बने हुए थे. दोनों ने कभी बाद में किसी अन्य के प्रति अपनी आसक्ति का परिचय नहीं दिया. उनकी पत्नि को बिना मांगे मुफ्त की सलाह देनेवाले क्या पहले समाज में नहीं रहे होंगे?
    क्या यह गरिमापूर्ण नहीं होगा कि हम उन दोनों के निर्णय का सम्मान करे और अपनी कागजी करुणा की नाक उनके निजी मामले में घुसेड़ने से बचे?
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  10. आप्पा - इतक्या सुंदर प्रतिक्रिया आल्या आहेत आणि सर्वांच्या लिखाणात एक महत्वाचे सूत्र दिसते आहे ,ते म्हणजे भारतीय नारी आणि तिचे पती पत्नी नाते निभावणे !आणि
    संजय बद्दलचा तिटकारा ! फारच संजयाने घोडचूक केली हे मात्र खरे !
    बाप्पा - सर्वात महत्वाचे म्हणजे नेहमीच्या ब्राह्मण विरोधी लोकांनी पण शांतता राखत जणू मोदींच्या वैयक्तिक बाबतीत काही बोलायचे टाळले आहे , कदाचित मोडी ब्राह्मण नाहीत म्हणून असेल !पण दोघांनीही व्रतस्थ राहात आजपर्यंत जे आत्मभान ठेवले आहे त्यावर शिंतोडे उडवायचे पाप संजय करीत आहे , हा नीचपणा आहे !
    आप्पा - संजय सरांनी हे लक्षात घेतले पाहिजे ! आज ते पुण्यात जैन लोकांच्यात भाषण देण्यास आले आहेत , पण त्यांनीपण हे लक्षात ठेवावे की जैन हे तर जास्त परंपरावादी असतात
    बाप्पा - कधी कधी आपण कितीही मुखवटे धारण करून आपली छबी निर्मळ आणि सुसंस्कृत ठेवत असलो तरी आपला मुखवटा कधीतरी गळून पडतो आणि आपले गलिच्छ रूप जनतेसमोर येते ,तसेच संजय सोनवणी यांचे झाले आहे - त्याना या उचापती करायची काय गरज होती ?श्री शर्मा यांनी हिंदीत लिहिलेले फारच अभ्यासपूर्ण आहे आणि ते समजत नसेल तर व्यर्थ आहे
    आप्पा - संजय याना भ्रम झाला आहे की त्यांच्या मताला फार किंमत आहे आणि त्यांनी मोदीविरुद्ध लिहिल्याने समाज खवळून उठेल , संजय सरांनी सौ मोदी यांच्या बद्दल आस्था दाखवण्याचा काहीच मुद्दा नव्हता ,
    बाप्पा - संजयला मान देणारी चार पाच टाळकी आहेत त्याना सुद्धा ते मान्य नाही हे फेसबुक वाचले की लक्षात येते , पण सांगणार कोण ? यांचा सुशिक्षित पणा नकली आहे हे सिद्ध होत आहे !
    आप्पा - एकाची शेंडी दुसऱ्याला आणि तिसऱ्याची शेपटी चौथ्याला असे करणे म्हणजे प्रगल्भता नव्हे व्यासंग नव्हे !किंवा अभ्यासूपणा नव्हे !
    बाप्पा - त्यापेक्षा त्यांनी मुलयम वर वार केले असते तर त्याना जास्त कौतुकाचे बोल ऐकायला मिळाले असते , पण मोदी बाबत मात्र त्यांचा पोपट झाला आहे
    आप्पा - संजय बद्दल थोडेफार जे कौतुक वाटत होते तेपण आता संपले , अत्यंत हिणकस माणूस अशी एक नवी ओळख त्यांनी दिली आहे किंवा ते पैसे घेऊन लिहितात असा जो अनेकाना संशय आहे तो खरा ठरत आहे
    संजय सोनवणी यांचा धिःकार असो असे म्हणायच्या लायकीचे सुद्धा ते नाहीत हे आता त्यांनीच सिद्ध केले आहे

    ReplyDelete
  11. -स्वतःच्या बायकोला अशी वागणूक देणाऱ्याने महिला सबलीकरणाची भाषा करू नये.

    -आज पर्यंत मोदी मुग गिळून गप्प का बसले होते?

    -बिचारी ४५ वर्षांपासून आपल्या सख्ख्या नवऱ्याची चातकासारखी वाट बघत बसली आहे त्याचे काय?

    -जशोदाबेन यांच्याकडे शिक्षिकेची नोकरी होती म्हणून बरे, नाहीतर त्यांची काय अवस्था झाली असती हे सांगण्याचीही गरज नाही.

    -नरेंद्र मोदीला जनाची नाही तर मनाची लाज का बरे वाटत नाही!

    -मोदीने येवढा अन्याय केलेला असतानाही जशोदाबेन यांनी कधीही बदल्याची भाषा केली नाही तर मोदीची ती स्तुतीच करीत राहिली, हे मोदीचे करंटेपण आणि त्या माउलीचे मोठेपण नाही काय?

    -निवडणुकीचा अर्ज भरताना मोदी बायकोच्या संदर्भातील माहिती भरत नसत याला काय म्हणावे, का काही म्हणूच नये?

    -मोदीने एका महिलेची पाळत ठेवायला लावली होती, अशा माणसाकडून महिलांनी काय आशा बाळगावी? आणि म्हणे पंतप्रधान पदाचे उमेदवार?

    भारती प्रधान-------------------------------------------------------------------------> भारती ताईने अगदी स्त्री मनातील खदखद व्यक्त केली आहे, तुमचे शतशः अभिनंदन ! ! !
    दिनेश शर्मा आणि आप्पा बाप्पा या हरामखोर, निर्लज्य माणसांकडून अजून काय अपेक्षा करणार ?

    आरती वैद्य

    ReplyDelete
    Replies
    1. मोदी निवडून आले
      तुम्ही चारहि मुंड्या चित झालात
      अगदी पोत्याने मते घेऊन निवडून आले

      Delete
  12. मोदींना 'विवाहीत' नोंद भोवणार?; कपील सिब्बल यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

    वडोदरा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी 'विवाहीत' असल्याची नोंद केली. यावरून राहुल गांधींसमवेत अनेक काँग्रेसजनांनी मोदींवर टीका केली.
    आता काँग्रेस नेते कपील सिब्बल यांनी याआधीच्या निवडणूकीदरम्यानच्या प्रतिज्ञापत्रात मोदींनी विवाहीत असल्याची माहिती लपविल्याच्या कारणावरून निवडणूक आयोगाकडे मोदींविरोधात तक्रार दाखल केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे विवाहीत नोंद प्रकरणाने मोदींसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
    कपील सिब्बल म्हणाले की, "नरेंद्र मोदींनी याआधीच्या २००२, २०१२ सालच्या विधानसभा निवडणूकीत प्रतिज्ञापत्रात विवाहीत असल्याची माहीती लपविल्याबद्दल भारतीय दंडाविधान कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे दाखल केली आहे. याआधी मोदींनी जनतेला आपल्या प्रतिज्ञापत्रातून खरी माहिती दिली नाही मात्र, यावेळी वडोदरा मतदार संघातून निवडणूक लढविताना त्यांनी विवाहीत असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे आजवर मोदींनी खोटी माहिती दिल्याचे समोर आले आहे." असेही सिब्बल म्हणाले.

    ReplyDelete
  13. 'विवाहीत' मोदींवर राहुल गांधींचे टीकास्त्र

    भारतीय जनता पक्षाला(भाजप) केवळ नरेंद्र मोदीच हुषार असल्याचे वाटते असे म्हणत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी मोदींच्या 'विवाहीत' नोंदीवर टीका केली.
    राहुल म्हणाले की, "भाजप निवडणूकीच्या प्रचारात महिलांच्या सुरक्षितेवरून पोस्टरबाजी करताना दिसते पण, उमेदवारी अर्जात आजवर विवाहीत असल्याची नोंद त्यांना(मोदींना) करता आली नाही. गुजरातच्या मुख्यमंत्र्यानी आजवर किती निवडणूका लढविल्या हे माहित नाही परंतु, यावेळी पहिल्यांदा त्यांनी उमेदवारी अर्जावर आपल्या पत्नीचा उल्लेख केला. भाजप केवळ नरेंद्र मोदींनाच हुषार समजते. काँग्रेसने आजवर महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्वाची कामे केली आहेत. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून उत्तरप्रदेशमधील दहा लाख महिलांना बँकांशी जोडले" असेही राहुल गांधी म्हणाले.
    खोटय़ा प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण द्या
    काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी शुक्रवारी नरेंद्र मोदी यांच्याकडे खोटय़ा प्रतिज्ञापत्राबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आह़े विधानसभा निवडणुकांच्या वेळी मोदींनी पत्नी संदर्भातील रकाना मोकळा सोडला होता़ या वेळी मात्र त्यांनी पत्नी असल्याचे मान्य केले. त्यामुळे त्या वेळी खोटे प्रतिज्ञापत्रा का सादर केले, तसेच या वेळी मोदींनी पत्नीच्या संपत्तीबाबत माहिती नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आह़े त्याबाबत सवाल उपस्थित करून नाईक यांनी आक्षेप घेतला आह़े.

    ReplyDelete
  14. 'मोदींचे अधोगतीचे विकास 'मॉडेल' परवडणारे नाही'

    खोटं बोल; पण रेटून बोल, हा घातक पायंडा मोदी राजकारणात पाडू पहात आहेत. त्यांचे गुजरातच्या विकासाचे "मॉडेल' फसवे आहे. उलट त्यांच्या कारकिर्दीत गुजरातच्या विकासाचा दर निम्म्याने घसरला आहे. त्याला उतरती कळा लागली आहे. असे हे अधोगतीकडे नेणारे तथाकथीत मॉडेल देशाला परवडणारे नाही. जे स्वतःच्या राज्यातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करु शकत नाहीत ते देशातील अठरा पगड जातीधर्माचे रक्षण काय करणार.
    एकदाच जन्म झालेला असताना महाराष्ट्र राज्य गुजरातच्या कितीतरी पुढे आहे. गुजरातचाही विकास झाला; पण त्याचे श्रेय गुजराती लोकांना जाते. तेथील लोक कष्टाळू आहेत, उत्तम शेती करतात, चांगला धनसंचय करतात. मोदी पूर्वी कॉंग्रेसचे कारकिर्दीत गुजरातचा विकास दर 17 टक्‍क्‍यापर्यंत गेला होता. नरेंद्र मोदी यांनी मात्र तो साडे आठ टक्‍क्‍यावर आणला. हे त्यांचे विकासाचे मॉडेल आहे काय? त्यांच्या कारकिर्दीत गुजरातच्या विकासदराला उतरती कळा लागली. नरेंद्र मोदी जिथे जातात तिथे फक्त वैयक्तिक टिका करतात. नरेंद्र मोदींना इतिहास माहिती नाही. वेंधळेपणाने विषयाची मांडणी करतात. किल्लारीच्या भुकंपावर त्यांनी गैरसमज पसरविणारे भाषण नागपुरात केले; परंतू राज्यातील लोकांना सत्य माहिती आहे. उलट गुजरातेत कच्छ आणि भुजमध्ये जो भुकंप झाला त्यात आम्ही राजकारण केले नाही. वाजपेयी तेव्हा पंतप्रधान होते आणि नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. वाजपेयी यांनी नेमलेल्या सर्वपक्षीय केंद्रीय समितीचे अध्यक्षपद आपल्याकडे होते. त्यावेळी भुकंपग्रस्तासाठी जे काम केले, ते तेथील लोक आजही विसरलेले नाहीत.
    सत्तेचा वापर लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी केला पाहिजे. शेतीमालाचे भाव वाढविले ते शेतकऱ्यांच्या हितासाठी. त्यांची क्रयशक्ती वाढावी यासाठी. भाजपप्रणित रालोआच्या काळात शेती मालाला जो भाव होता तो युपीएच्या कारकिर्दीत दुपटीपेक्षा अधिक झाला. मोदी कापूस, गहू, तांदूळावरची निर्यात आम्ही बंद केल्याची टिका करतात. वस्तुस्थितीत निर्यात बंद नाही तर ती वाढली आहे. देशाची अन्नधान्याची गरज भागवून निर्यातीतून दोन लाख 32 कोटी रुपयांचे परकिय चलन मिळाले. बळीराजा शेतीचे उत्पन्न वाढवतो. पर्यायाने देशाची संपत्ती वाढवतो, तो चांगल्या प्रकारे जीवन जगला पाहिजे. आज देशाचे पंतप्रधान व्हायला निघालेले गृहस्थ त्यांचे धोरण स्पष्ट करीत नाहीत.
    मोदींना फक्त पंतप्रधानाची खुर्ची दिसते आहे आणि ती मिळविण्यासाठी ते कोणत्याही थराला जायला तयार आहेत. हा महानग पत्रकारांच्या प्रश्नांना कधीही समोर जात नाही, नुकतीच भाषणबाजी, अशा माणसास वेळीच आवर घालावयास हवा.

    ReplyDelete
  15. एकप्रकारे फेसबुकवर संजय ने भरपूर शाब्दिक मार खावून झाल्यावर ,आता आपल्या स्वतःच्याच ब्लोग वर परत मार खात आहे
    तुम्ही नीट बघाल तर एक प्याटर्न दिसतो , जोपर्यंत कुणी त्याच्या बद्दल वाईट बोलत नाही तो पर्यंत त्याची पाळीव कुतरी शेपूट हलवत उभी असतात आणि आप्पा बाप्पा किंवा शर्मा अशा विचारी लोकांनी काही त्याच्या विरुद्ध लिहिले की संजय या कुत्र्यांना छूः करतो आणि मग सुरु होतो डोंबारी खेळ आणि संजय पूजा ! स्वतः स्वतःची पूजा चालू होते
    आदमी सस्तेमे अच्छा है ! सगळे असेच म्हणतात जैन मराठा आदिवासी सगळे असेच बोलतात !
    एकतर इतके भरकटलेले विचार असतात की लोकांना टाईम पास मस्त होतो , मग अशुद्ध भाषा आणि चुकीची विधाने यामुळे तर अजूनच रंगत वाढते !कुणीतरी वेगवेगळ्या नावाने लिहून याला पाठींबा देत असते असा आभास दिसतो आणि हूसून हसून पोट भरते !
    यांनी खरेतर आपली मानसिक चाचणी आणि उपाय करावा
    नाहीतर पुढचा काळ त्यांना भीषण आहे !
    मोदी आणि भा ज प यांना कुणीच हरवू शकत नाही !हि काळाची गरज आहे - मोदी हेपण प्यादे आहेत आणि आर एस एस सर्व सूत्रे हलवीत आहे
    १ महिन्यात हे स्पष्ट होईल आणि संजय आणि इतर गचाळ यांची तोंडे थोबाडीत मारल्या सारखी होतील !सवर्ण लोकांची अर्थकारणातील पकड अफाट वेगाने वाढत आहे !कोन्ग्रेस हि एक म्हातारी संघटना आहे आणि तिच्या पापानीच ती बदनाम झाली आहे !मोदी या मागास वर्गीयाला संघ हुशारीने वापरून घेत आहे , त्याचे इतिहासाचे भूगोलाचे अज्ञान आणि शास्त्रीय अभ्यासाचा अभाव हा संघाच्या पथ्यावर पडला आहे फक्त मोदी यांची मुस्लिम विरोधी इमेज प्रचंड लोकप्रियता खेचून आणत आहे आणि स प आणि कोन्ग्रेस यांची मुस्लिम अनुनयाची भूमिकाच त्यांना पराभवाच्या गर्तेत ढकलत आहे !
    मुस्लिम अनुनयाचा कडेलोट हेच त्यांच्या पराभवाचे कारण आहे !

    ReplyDelete
  16. श्री नरेंद्र मोदी यांचे काय चुकले ? काहीच नाही ! वडील माणसांनी बाल विवाह केला
    त्यांची जात तेली - घांची असून त्यांनी प्रतिज्ञा पत्राने हे जाहीर केले आहे की ते विवाहित आहेत
    नवीन कायदा २०१३ चा आहे तो आधीच्या निवडणुकांना लागू होत नाही त्यामुळे त्यांनी यापूर्वी ही माहिती देणे त्यांच्यावर बंधनकारक नव्हते
    त्यामुळे त्यांच्यावर ही चिखलफेक का होते आहे ?

    उद्या ते भारताचे पंत प्रधान होणार आहेत ,परदेशी दौरे करणार आहेत , त्याना आपण असे बदनाम करायचे का ?भारताच्या विकासाची सूत्रे त्यांच्या हाती जाणार आहेत त्याना आपण असे हिणवायचे का ?थोडा विचार करायला नको का ?

    त्यांनी आपल्या बाल विवाहित पत्नीला सांगितले की हा विवाह मला मान्य नाही मी समाजसेवक आहे आणि मला लग्नाच्या बंधनात अडकायचे नाही तू स्वतःच्या पायावर उभी रहा !हे त्यांचे आपापसातले विचार होते आजही सौ मोदी ह्या आनंदाने बिनतक्रार जीवन जगात आहेत मग तुम्हाला काय त्रास आहे ?

    -नरेंद्र मोदीला जनाची नाही तर मनाची लाज का बरे वाटत नाही ! असे भारती प्रधान यांनी का लिहावे ?त्यांनी पूर्णपणे जर दुसरा संसार थाटला असता तर हा दोष देणे ठीक आहे किंवा त्यांची भानगड असती तर मग हा राग समजू शकतो
    प्रत्येकाने आपल्या जीवनात सुद्धा डोकावून पहावे - आपण किती शुद्ध आहोत ते पहावे
    समाजसेवा राहूदे , साधी सरळ नातीसुद्धा आपण निभावू शकत नाही तर इतर कथा काय सांगायची ?

    ReplyDelete
  17. काँग्रेस मांडणार जशोदांची व्यथा

    पक्षांच्या महिला आघाड्यांतर्फे गावागावांमध्ये मोहिमा

    नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन यांची परित्यक्ता जीवन व्यतीत करण्याची व्यथा आता काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विंग गावागावातील महिलांपर्यंत घेऊन जाणार आहेत. देशसेवेसाठी पत्नीला सोडले असे सांगणारे नरेंद्र मोदी हे देशसेवेला लागल्यानंतर भाऊ, बहीण, आई या बाकीच्या कुटुंबीयांशी कसा काय संबंध ठेवतात व केवळ पत्नीलाच सापत्न वागणूक कशी काय देतात, असा सवाल उपस्थित करत काँग्रेस वा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या गावागावात फिरणार आहेत, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना दिली.

    मोदींनी सुप्रीम कोर्टाच्या बडग्यामुळे लोकसभा उमेदवारीचा अर्ज भरताना आपल्या पत्नीचे नाव अर्जात भरले, तरी तिचा पॅन कार्ड क्रमांक व तिची मालमत्ता याबाबत मात्र माहीत नाही, असे म्हटले आहे, असे नवरा-बायकोचे विचित्र नाते भारतात इतरत्र कुणीही अनुभवले नसेल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

    एकीकडे सुनंदा पुष्कर यांच्यावर ५० कोटींची गर्लफ्रेंड अशी टिप्पणी करणे, दुसरीकडे गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षणाचे विधेयक मंजूर न होऊ देणे, अशा गोष्टींमुळे मोदींची महिलाविरोधी मानसिकता स्पष्ट होतच होती. त्यात स्वतःच्या पत्नीबरोबरच अत्यंत दुष्ट पुरुषी मानसिकतेतून व्यवहार करणाऱ्या मोदींचा स्त्रीविरोधी चेहरा शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महिला आघाड्यांमार्फत केला जाणार आहे, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे.

    या प्रचाराचा भाग म्हणून काही पुस्तिका व सीडीही तयार करण्यात आल्या असून त्यात मोदी व त्यांच्या पत्नीच्या फोटोंबरोबर जशोदाबेन यांची सध्याची फोटो व त्यांच्यावर 'कॅरावॅन' तसेच 'ओपन मॅगझीन' या नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीचाही वापर केला जाणार आहे.

    ReplyDelete
  18. मोदींविरुद्ध तक्रारीची चौकशी

    मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांची माहिती

    भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध काँग्रेसने केलेल्या वैवाहिक स्थितीबाबतच्या तक्रारीची चौकशी करण्यात येईल; त्यासाठी सुप्रीम कोर्टाने यापूर्वी दिलेल्या निर्णयांचा संदर्भ तपासण्यात येईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी शनिवारी येथे सांगितले.

    मोदी यांनी त्यांचा निवडणूक उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात विवाहित असल्याचे नमूद केले होते. त्यावर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून, मोदी यांनी यापूर्वीच्या निवडणुकांत हा रकाना कोरा सोडल्याबद्दल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत पत्रकारांनी संपत यांना विचारता, त्यांनी वरील माहिती दिली. ते म्हणाले, 'आम्ही चेन्नईच्या दौऱ्यावर येण्यास निघालो असताना, काल (शुक्रवारी) सायंकाळी ही तक्रार मिळाली आहे. या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे काही अतिशय स्पष्ट निकाल आहेत. या तक्रारीबाबतही चौकशी करण्यात येईल. त्यासाठी कोर्टाच्या निकालांचा आधार घेण्यात येईल.'

    आझम खान यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांबाबत विचारता, संपत म्हणाले, 'अशा भाषणांबाबत निवडणूक आयोगाला अत्यंत काळजी वाटते. आम्ही उत्तर प्रदेश सरकारला याबाबत एक कडक पत्र लिहिले असून, अशा प्रत्येक प्रक्षोभक भाषणाबाबत एफआयआर दाखल केलाच पाहिजे, असे कळविले आहे.'

    शरद पवार यांच्यासह राजकीय नेत्यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या टीकेला उत्तर देताना संपत यांनी, आयोग नियमानुसारच काम करीत असल्याचे स्पष्ट केले. योग्य ती कागदपत्रे सोबत बाळगल्यास कोणालाही त्रास होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला.

    ReplyDelete
  19. मोदींच्या सभेत रिकाम्या खुर्च्या

    प्रभावशाली वक्तृत्व, विषयावरील पकड, जनमानसाचा ठाव घेण्याचे कौशल्य, देशाचे नेतृत्व करण्याची जिद्द...नरेंद्र मोदी यांची अशी प्रतिमा पुणेकरांमध्ये आहे. देशभर नरेंद्र मोदींची लाट असल्याचे बोलले जात असल्यामुळे मोदींची पुण्यातील सभा अभूतपूर्व होणार, याबाबत कुणाच्याही मनात शंका नव्हती. साहजिकच, एसपी कॉलेजच्या ग्राउंडकडे मोठ्या उत्सुकतेने पावले चालली होती. ग्राउंडवर पायही ठेवण्यास जागा मिळणार नाही, खचाखच भरलेले असेल, सगळे वातावरण मोदीमय झालेले असेल, अशा कल्पना केली जात होती.

    ...पण प्रत्यक्षात ग्राउंडच्या मागच्या बाजूला होत्या रिकाम्या खुर्च्या, मागील बाजूस मोकळे पडलेले मैदान, कोणत्याही निवडणुकीच्या प्रचारसभांसाठी जमवली जाते, तशी वाड्या-वस्त्यांमधील सभांमधील 'गर्दी'... व्यासपीठासमोरील आणि उजवीकडील भागामध्ये खच्चून गर्दी असली, तरी मागील बाजूचे हे वास्तव मात्र सभा कमी कुठे पडली, याबाबतच्या चर्चेलाच खतपाणी घालणारे ठरले. उमेदवारांचे कुणी कामच करीत नाही, अशी तक्रार केली जात आहे. त्याचाच हा परिणाम आहे. उमेदवार आणि त्यांच्या नियोजनकर्त्या मंडळींकडून कार्यकर्त्यांकडे लक्ष दिले जात नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळेच, ही अवस्था होती, अशी कुजबुजही केली जात होती. अर्थात, स्फूर्तिदायी वक्ता म्हणून लौकिक असलेल्या मोदींचे भाषणदेखील प्रभावशाली ठरले नाही. म्हणूनच, एरवी शेवटी होणारे 'वंदे मातरम्' आणि 'भारत माता की जय'पर्यंत जागीच खिळून राहणारी पावले शनिवारी मात्र अर्ध्यावरच माघारी फिरत होती. 'मध्येच का उठून चालला' असे विचारले असता, 'गाडी रस्त्यात लावली आहे, ती घेण्यास चाललो आहे' इथपासून ते 'मी जात नाही, मागे उभा राहतो आहे,' इथपर्यंतच्या उत्तरांची बहाणेबाजी करण्यात येत होती.

    ReplyDelete
  20. मोदीकाळात गुजरातची घसरणच!

    लोकांची खर्च करण्याची क्षमता हा विकासाचा अर्थातच सर्वात थेट निकष असतो. या निकषावर गुजरात राज्य देशातील २८ राज्यांमध्ये १२ व्या क्रमांकावर आहे असे कोणी सांगितल्यास आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल, कारण गुजरात देशातील सर्वात प्रगत राज्य असा आपला समज करून देण्यात आला आहे. पण खरा धक्का पुढेच आहे. गुजरात आधी असलेल्या १० व्या क्रमांकावरून नरेंद्र मोदींच्या काळात १२ व्या क्रमांकावर आलेला आहे. हे अविश्वसनीय वाटले तरी सत्य आहे. अगदी रस्तेबांधणीच्या वेगाचा जरी विचार केला तरी गुजरातच्या क्रमांकाची मोदीकाळात घसरण आहे.

    जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ आणि सध्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांनी काही महिन्यांपूर्वी आपल्या अहवालात विकासाच्या निकषावर देशात गुजरात १४व्या क्रमांकावर असल्याचा निष्कर्ष काढला होता. तो अहवाल आणि विकासाच्या निकषावर क्रमांक काढण्याची पद्धत हे सर्व केंद्रसरकारच्या अर्थखात्याच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. हा अहवाल ज्या आकडेवारीवर आधारित आहे ती सर्व आकडेवारीही आता सर्वांसाठी खुली झाली आहे. युनिवार्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील अर्थतज्ज्ञ डॉ. अशोक कोतवाल आणि आरका चौधरी यांनी या आकडेवारीवरून गुजरातच्या आणि इतर राज्यांच्या प्रगतीबद्दल केलेला संशोधनपर अभ्यासदेखील या युनिव्हर्सिटीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.

    एखाद्या राज्याचा विकास अनेक निकषांवर मोजता येतो. लोकांची खर्च करण्याची क्षमता हा त्यापैकी एक निकष आहे. राज्यातील बालमृत्यूचे प्रमाण हा दुसरा निकष आहे. शिक्षणाची अवस्था हाही महत्वाचा निकष आहे. पण शिक्षण, आरोग्य यांचा विचार करण्याअगोदर आपण पायाभूत सुविधांचा विचार करू. राज्यातील किती टक्के घरांना पिण्याच्या पाण्याची सोय आहे, या निकषावर गुजरात देशातील २८ राज्यांमध्ये ५ व्या क्रमांकावर आहे आणि मोदींच्या दहा वर्षाच्या काळात त्या क्रमांकात काहीही सुधारणा झाली नाही. राज्यातील किती टक्के घरांना शौचालयाची सोय आहे, या निकषावर तर गुजरात चक्क १६ व्या क्रमांकावर आहे आणि मोदीकाळात तो क्रमांक १४ वरून १६ व्या स्थानावर घसरला आहे. रस्ते विकास मोजण्याचे एकक म्हणजे दर हजार चौरस किलोमीटरमध्ये असलेली रस्त्यांची एकूण लांबी, म्हणजे रस्त्यांची घनता. राज्य महामार्गाच्या संदर्भात गुजरातचा क्रमांक वरचा, म्हणजे चौथा जरी असला तरी तो मोदींच्या काळात तिसऱ्या स्थानावरून चौथ्या स्थानावर घसरला आहे. छोट्या रस्त्यांच्या बाबतीत तर गुजरातचा क्रमांक २००४-०५ या काळात ९वा होता, तो आता १२व्या स्थानावर घसरला आहे. छोटे रस्तेच विकास सर्वसमावेशक करण्यात महत्वाची भूमिका बजावतात.

    गुजरातचा २००१ मधील क्रमांक

    गुजरातचा २०११ मधील क्रमांक

    क्रमांकातील सुधारणा

    पिण्याच्या पाण्याची सोय असलेल्या घरांची टक्केवारी





    काही सुधारणा नाही

    विजेची सोय असलेल्या घरांची टक्केवारी



    १०

    ४ क्रमांकांनी घसरण

    शौचालयाची सोय असलेल्या घरांची टक्केवारी

    १४

    १६

    २ क्रमांकांनी घसरण

    किती टक्के कुटुंबांकडे फोन अथवा मोबाइल आहे.

    १०

    १४

    ४ क्रमांकांनी घसरण

    किती टक्के लोकांचे बँकेत खाते आहे.

    १०

    १४

    ४ क्रमांकांनी घसरण

    cont.......

    ReplyDelete
  21. पायाभूत सेवांमध्ये शिक्षणाचे महत्व अतिशय मोठे आहे. दर हजार लोकसंख्येमागे असलेल्या प्राथमिक शाळांची संख्या या निकषावर गुजरातचा क्रमांक देशात सर्वात खालील सहा राज्यामध्ये मोडतो आणि मोदीकाळात त्यामध्ये आणखी घसरण झाली आहे. गुजरातमधील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता तर अतिशय विदारक आहे. शिक्षणाची गुणवत्ता मोजणाऱ्या 'असर' अहवालानुसार गुजरातचा क्रमांक २००६ साली २२ वा होता, तो आता आणखी खाली म्हणजे २३व्या स्थानावर गेला आहे. बहुतेक अर्थतज्ज्ञांच्या मते लोकांची आर्थिक परिस्थिती, राज्यातील आरोग्यसेवा, पाणी पुरवठा या सर्वांवर बालमृत्यू दर अवलंबून असतो. या निकषावर गुजरात आज १७व्या क्रमांकावर आहे. मोदीकाळात यात केवळ दोन क्रमांकांनी सुधारणा झाली आहे. स्त्रियांमधील साक्षरतेबाबत गुजरात १५व्या क्रमांकावर आहे, आणि यात गेल्या दशकात कोणतीही सुधारणा झाली नाही.

    ही सर्व धक्कादायक आकडेवारी विविध सरकारी अहवालात या आधीच प्रकाशित झाली आहे. रघुराम राजन समितीने ती केवळ एकत्र केली आहे आणि ती सर्व राज्यांची आहे.

    पायाभूत वर्षातील क्रमांक

    २०११ सालाचा क्रमांक

    `सुधारणा /घसरण

    दर महा दर डोई खर्च करण्याची क्षमता

    (पायाभूत वर्ष . २००४-०५)

    १०

    १२

    २ क्रमांकानी घसरण

    दारिद्र्य रेषेखालील लोकांचे प्रमाण

    (पायाभूत वर्ष . २००४-०५)

    १४

    १४

    काहीही सुधारणा नाही

    बालमृत्यूचे प्रमाण (पायाभूत वर्ष २००५)

    १९

    १७

    २ क्रमांकांनी सुधारणा

    स्त्री साक्षरता

    (पायाभूत वर्ष २००१)

    १५

    १५

    काहीही सुधारणा नाही

    संपत्तीवृद्धीचे मानक आहे, आर्थिक वृद्धी दर म्हणजे 'ग्रोथ रेट'. ग्रोथ रेट हे विकास साधण्याचे केवळ साधन आहे. ग्रोथ रेटच्या बाबतीत गुजरात देशात अग्रेसर आहे. असे असताना विकासाच्या निकषावर इतर राज्यांच्या तुलनेत हे राज्य अगदी खाली का? असे आहे का की, हा चढा ग्रोथ रेट केवळ काही भांडवल सघन उद्योगांच्या आणि विशिष्ट औद्योगिक घराण्यांपुरताच मर्यादित आहे? एव्हढ्या चढ्या ग्रोथ रेट नंतरदेखील गुजरातमधील श्रमिकांचे वेतनमान देशात सर्वात कमी का? शिक्षण आणि आरोग्य याबाबतीत गुजरात देशात अगदी खाली का? हे सर्व संशोधाकापुढील महत्वाचे प्रश्न आहेत.

    मग असे असताना गुजरातच्या विकासाचा एव्हढा गवगवा का ? ही आकडेवारी गुजरातचा विकास झाला नाही असे सांगत नाही, तर इतर राज्यांचा विकास गुजरातपेक्षा किती तरी अधिक वेगाने झाला असे स्पष्टपणे सांगते. कदाचित राजकारणात सत्य काय असते यापेक्षा सत्य काय भासवले जाते हे जास्त महत्वाचे ठरते. नरेंद्र मोदी यात कमालीचे यशस्वी झाले आहेत.

    मिलिंद मुरुगकर, विकासविषयक प्रश्नांचे अभ्यासक

    ReplyDelete
  22. नरेंद्र मोदी ना मुख्यमंत्री बनण्याच्या लायकीचा ना पंतप्रधान बनण्याच्या लायकीचा माणूस !

    ज्या माणसाचा स्त्री विषयच दृष्टीकोण इतक्या खालच्या दर्जाचा आहे अशा माणसाला राजकारणातून स्त्रियांनीच हद्दपार करायला पाहिजे. लग्न करूनही स्त्रीला अशी वागावणूक देवून काय साधले? लग्न करायचेच नव्हते तर भोवल्यावरुन पळून का गेला नाही? "मेरे आगे पीछे कोई नाही हैं" अशी खोटारडी वक्तव्ये मोदिकडून का केली गेली? भावाशी, वाहिनीशी आईशी संपर्क होता तर बायकोशी का नाही? जशोदाबेन यांच्यामते दोघांनी साधारण तीन वर्षे संसार केला, मात्र तीनच महिने एकत्र राहिलो होतो. विभक्तच व्हायचे होते तर रीतसर घटस्फोट का दिला नाही, दुसऱ्या लग्नाला परवानगी का दिली नाही? हा स्त्रीवरचा अन्याय नव्हे काय? किमान घटस्फोट मिळाला असता तर जशोदाबेनला दुसरे लग्न तरी करता आले असते! बिना आर्थिक मदत देता जाशोदाबेन यांना वाऱ्यावरती का सोडून दिले गेले? माणुसकी म्हणून बायकोची ४५ वर्षे एवढा मोठा काळ पडद्याआड गेला असताना साधी विचारपूस सुद्धा का केली गेली नाही? बिचारीला मोदीने सोडून दिल्या नंतर स्वकर्तुत्वावर शिकून सरकारी शिक्षिकेची नोकरी पत्करून निवृत्त झाली, मात्र मोदीला याचे काहीही सोयर-सुतक नाही? कर्मठ धर्मवादी गुजरातच्या वातावरणात बिचारीची "नवऱ्याने सोडून दिलेली" म्हणून आयुष्य भर अवहेलना सहन करावी लागली असेल! अशा या स्त्रीद्वेषी माणसास स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनीही नाकारायलाच हवे!

    प्रतिभा साने

    ReplyDelete
  23. गुजराथींनी छत्रपतींचा इतिहास चुकवला...

    'छत्रपत्री शिवाजी महाराज यांचा जन्म १६०३मध्ये झाला. दादोजी कोंडदेव हे महाराजांचे आजोबा होते आणि त्यांचा जन्म झाला तो शिवनेरी राजवाड्यात!' ही माहिती छापली आहे गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या सातवीच्या सोशल सायन्स या विषयाच्या पुस्तकात! इतिहासाचे बेमालूम चुकीचे संदर्भ दणक्यात ठोकणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्या राज्यातील शाळांमध्ये मुळातच चुकीचा इतिहास शिकवला जातो, हे यामुळे सिद्ध झाले आहे. छत्रपतींचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेची यावर भूमिका काय असेल, याविषयी अनेकांना उत्सुकता आहे.

    गुजरातच्या पाठ्यपुस्तक मंडळाने २०१३मध्ये प्रकाशित केलेले सातवीचे हे दुसऱ्या सत्राचे सोशल सायन्सचे पुस्तक आहे. त्यास शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचीही मान्यता आहे. 'मोगल साम्राज्याचा सुवर्णकाळ आणि ऱ्हास' या सहाव्या प्रकरणात पान क्रमांक ५९वर मोगल साम्राज्यास आव्हान देणाऱ्या राज्यकर्त्यांचा एकेका परिच्छेदात परिचय करून देण्यात आला आहे. त्यात शिवाजी महाराजांविषयी माहिती देताना या चुका करण्यात आल्या आहेत.

    काही दिवसांपूर्वी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी रायगडावरून शिवाजी महाराजांवर स्तुतीस्तुमने उधळली होती. प्रत्यक्षात, त्यांच्याच राज्यातील पाठ्यपुस्तकात शिवाजी महाराजांविषयीचा चुकीचा इतिसहास शिकवला जात असल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.

    या पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म १६०३ रोजी शिवनेरी राजवाड्यात झाला असून, त्यांना लहानपणी धार्मिक शिक्षण त्यांचे आजोबा कोंडदेव यांनी दिल्याचे नमूद केले आहे. मुळात शिवाजी महाराजांचा जन्म हा १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. तर तलवारबाजी, दांडपट्टा या युद्धकलेचे शिक्षण दादोजी कोंडदेव यांनी दिले. तर धार्मिक शिक्षण त्यांच्या मातोश्री जिजाऊ यांनी दिले असून, लखोजी जाधव आणि मालोजी भोसले हे त्यांचे आजोबा हा खरा इतिहास आहे.

    'साधना' मासिकाच्या एप्रिलच्या अंकात प्रा. भगवान पाटील यांनी यावर प्रकाश टाकला आहे. 'महाराष्ट्र टाइम्स'चे वांद्रे येथील वाचक मनोहर जोशी यांनीही बाब निदर्शनास आणली. पाटील यांनी हे पुस्तकच रद्द करावे आणि चुकांची दुरस्ती व्हावी, अशी मागणी केली आहे.

    ReplyDelete
  24. आपल्याकडे दादोजी याना न्याय मिळाला नाही आणि काही हलकट विकृत कृतघ्न लोकांनी त्यांचा पुतळा हलवला ,
    पण गुजराथ मध्ये आजही समजूतदार लोक आहेत ,एक राज्य निर्माण होताना त्याला सर्वांचा
    हातभार लागत असतो हे त्याना चांगले माहित आहे ,
    त्यांनी एकदम दाडोजीला हाकलून लावले नाही
    तपशिलाचा भाग म्हणून काही दुरुस्ती गरज पडल्यास नेहमीच शक्य असते , ती कधीही करता येईल !एखादे सर्वसमावेशक प्रकटन आणि सुचना काढून या तृती दूर होत असतात !
    १६०३ हि प्रिंटींग मिस्टेक असू शकते , पण दाडोजीला न्याय मिळाला हे स्तुत्य आहे , अभिनंदनास पात्र आहे !या छावा आणि इतर फालतू संघटना यांची अवस्था " सरड्याची धाव कुंपणा पर्यंत " अशी आहे ! त्याना जास्त लाडावून ठेवले आहे ते इथल्या ब्राह्मणद्वेष्ट्या सत्ताधाऱ्यानी !
    पण यांची गुजराथला जाउन निषेध करायची धमक नाही !
    अपनी गलीमे कुत्ताभी शेर !

    ReplyDelete
  25. गुजरातमधील इतिहासाचे 'ते' पुस्तक रद्द...

    गुजरातमधील सातवीच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती छापल्याचे वृत्त 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झाल्यानंतर ते पुस्तक रद्द करण्यात आले आहे. गुजरात बोर्डाच्या सातवी इयत्तेच्या सोशल सायन्स सेमिस्टर २चे हे वादग्रस्त पुस्तक काढून टाकण्याचा निर्णय गुजरात राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना नवे सुधारित पाठ्यपुस्तक देण्यात येणार असल्याचे गुजरात बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन पेठानी यांनी मंगळवारी 'मटा'ला सांगितले. दरम्यान, या पुस्तकाचे भाषांतर करणाऱ्या शिक्षकास निलंबित करण्यात आल्याचे कळते.

    गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाने सन २०१३ साली प्रकाशित केलेल्या सातवीच्या सोशल सायन्स सेमिस्टर २च्या पुस्तकात 'छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १६०३मध्ये झाला असून, दादोजी कोंडदेव हे महाराजांचे आजोबा होते आणि महाराजांचा जन्म शिवनेरी राजवाड्यात झाला होता,' असा चुकीचा इतिहास छापला होता. यासंदर्भात 'महाराष्ट्र टाइम्स'च्या मंगळवारच्या अंकात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर या वृत्ताची गंभीर दखल घेत, गुजरात बोर्डाने मंगळवारी तातडीने सर्व अधिकाऱ्यांची बैठक बोलवली. यात बोर्डाने आपली चूक मान्य करत, अखेर हे पुस्तक रद्द करण्याची घोषणा केली.

    यासंदर्भात गुजरात बोर्डाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन पेठानी यांनी 'मटा'शी संपर्क साधून, बोर्डाच्या इतर सर्व पुस्तकांत शिवाजी महाराजांच्या इतिहासाबाबत काहीही चूक नसल्याचे स्पष्ट केले. यंदा हे पुस्तक पहिल्यांदाच भाषांतरीत करण्यात आले असून, त्यात ही चूक झाली. तर महाराजांच्या जन्माबद्दल जी चूक झाली, ती 'प्रिंटिंग मिस्टेक' असल्याचे स्पष्ट केले. तसेच सर्व चुका सुधारून नवीन पुस्तक छापण्याचे आदेशही दिल्याचे त्यांनी जाहीर केले. येत्या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना नवीन सुधारित पुस्तक मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

    दरम्यान, या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या चुकांबरोबरच अन्य चुकाही महिनाभर आधीच आढळून आल्या होत्या. त्यावेळी गुजरातच्या शिक्षण मंत्र्यातर्फे तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीच्या अहवालानंतर या पुस्तकाचे भाषांतर करणाऱ्या शिक्षकास निलंबित करण्यात आले आहे.

    ReplyDelete
  26. गुजराती पश्चातबुद्धी

    महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांचा जाणता-अजाणता अपमान दर काही दिवसांनी कुठे ना कुठे होत राहावा, ही दुर्दैवी बाब आहे. त्यावर मग ओरड होते. संबंधितांना जाग येते. माफीनामे येतात. विषय तेवढ्यावर थांबतो. आणखी काही दिवसांनी कोणत्या तरी नव्याच पुस्तकात पुन्हा कोणीतरी तपशिलाची किंवा निष्कर्षाची चूक करतो. कधी एखादा दीडशहाणा अपुऱ्या माहितीने वाट्टेल ती शेरेबाजी करतो. कधी ही गफलत असते तर कधी ती खोडी असते. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी छत्रपती शिवरायांचे नाव वारंवार घेत असतात. त्यांचा आदर्श ठेवण्याची भाषा करतात. मात्र, त्यांच्याच राज्यातील सातवीच्या इतिहासाच्या पुस्तकात शिवरायांचे जन्मवर्ष व जन्मस्थळ यांच्याबाबत चुकीचे उल्लेख करण्यात आले. म.टा.ने हे वृत्त प्रकाशित करताच गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाने हे पुस्तक रद्द केले. हे भाषांतरित पुस्तक लिहिणाऱ्या शिक्षकालाही निलंबित केल्याचे सांगण्यात आले. मात्र, दादोजींना शिवरायांचे आजोबा बनविणारे हे पुस्तक बातमी आली नसती तर अभ्यासक्रमात तसेच शिकविले गेले असते. मग काही वर्षांनी गुजराती मंडळी छत्रपतींचे जन्मस्थळ पाहण्यासाठी शिवनेरीचा 'राजवाडा' शोधत फिरली असती. ते आता सुदैवाने टळले आहे. पुस्तकात झालेल्या या 'चुका'च असतील. कोणी मुद्दाम हा कारभार केला नसेलही. तरीही, यातून जो गलथानपणा आणि निष्काळजीपणा दिसतो, तो आक्षेपार्ह आहे. मुळात, पुस्तकाचे भाषांतर करताना व ते प्रकाशित करताना महाराष्ट्राचा इतिहास जाणणाऱ्यांशी मसलत केली असती, तर बिघडले नसते. मात्र, देशात बहुतेक राज्यांच्या पाठ्यपुस्तक मंडळांना सरकारी पद्धतीने काम करण्याची कीड मागेच लागली आहे. गुजरातच्या कथित कार्यक्षम मोदी सरकारलाही पाठ्यपुस्तक मंडळाचा कारभार सुधारता आलेला दिसत नाही. याचे कारण, केवळ छत्रपती शिवरायच नव्हे तर इतरही ऐतिहासिक महापुरुषांबाबत या पुस्तकाने असेच दिवे लावले आहेत. गुजरात पाठ्यपुस्तक मंडळाच्या कार्यकारी अध्यक्षांनी या 'प्रिंटिंग मिस्टेक' आहेत, असे खुलाशात म्हटले आहे. जन्मसाल छापताना चुकले हे एकवेळ समजू शकते. पण शिवाजी राजांचे शिक्षक दादोजी कोंडदेव पुस्तकात 'आजोबा' कसे होऊ शकतात? की हिंदीत आजोबांना दादाजी म्हणतात, म्हणून? खरेतर, महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमून शिवरायांचा उल्लेख असणाऱ्या सर्व भाषांमधल्या पुस्तकांची नियमित तपासणी करण्याची कायमस्वरुपी यंत्रणा उभी केली पाहिजे. त्याशिवाय, या चुका थांबणार नाहीत. आपल्या इतिहासाची काळजी आपणच घेतली नाही तर पुढच्या पिढ्यांवर कोणत्याही भाषेतून महाराष्ट्राचा भ्रामक इतिहास शिकण्याची आफत ओढवेल. मराठी माणसे म्हणून आपण ती कदापि येऊ देता कामा नये.

    ReplyDelete
  27. गुजरात महिमा: एका नापास विद्यार्थ्याची गोष्ट
    -महावीर सांगलीकर


    मोदींच्या काळात गुजरातने प्रचंड प्रगती केली असा आभास तयार करण्यात आला आहे. पण आपण गुजरात विषयक कांही महत्वाच्या गोष्टी माहिती करून घेणे गरजेचे आहे. पहिली गोष्ट म्हणजे भारताच्या संरक्षणात गुजरातमधील लोकांचा कसलाही सहभाग नाही. गुजराती लोक सैन्यात भरती होत नाहीत. देशासाठी रक्त सांडायला हे लोक कधीच तयार होत नाहीत. त्यामुळे आजपर्यंत झालेल्या युद्धांमध्ये गुजरातचे शहीद सैनिक दिसत नाहीत. आडातच नाही तर पोह-यात कुठून येणार?

    स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात भारताच्या प्रत्येक प्रदेशात अनेक क्रांतिकारक झाले, त्यांनी छातीवर गोळ्या खाल्ल्या, फासावर चढले, पण गुजरातमध्ये असे झाले नाही.

    मुंबई मध्ये सुमारे तीस टक्के लोक गुजराती आहेत. मुंबईवर दहशतवाद्यांचा हल्ला झाला तेंव्हा जे लढले, त्यात गुजराती कुठे होते? मुंबई पोलिसांत अगदी पंजाबी, तमिळ लोक दिसतात, पण गुजराती पोलिस, पोलिस अधिकारी कधी दिसला आहे का? म्हणजे इतरांनी आमचे संरक्षण करावे, मरावे, आम्ही आपला पैसा कमावत रहाणार अशा विचारांचे हे लोक आहेत. दमडी जाये पर चमडी न जाये.

    मोदी हे कधीच पंतप्रधान होवू शकत नाहीत. पण आपण मनोरंजनासाठी असे मानले की मोदी पंतप्रधान झाले, तर हे नक्की आहे की ते युद्ध उकरून काढतील. या युद्धात देशभरचे अनेक सैनिक मरतील, अपंग होतील, पण यात मोदींच्या गुजरातचे काय जाणार आहे? या युद्धात एकही गुजराती मरणार नाही.

    महाराष्ट्र, पंजाब आणि इतर अनेक प्रदेशातील लोकांसाठी सैन्याच्या अनेक रेजीमेंट्स आहेत. मराठा रेजिमेंट, महार रेजिमेंट, बॉम्बे स्यापर्स, पंजाब रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, बिहार रेजिमेंट, मद्रास रेजिमेंट, राजपूत रेजिमेंट, राजपुताना रायफल्स, आसाम रायफल्स, जम्मू-काश्मीर रायफल्स वगैरे वगैरे. गुजरातचे काय? 1965 साली भारतीय सैन्याने गुजरात रेजिमेंट उभारायचा प्रयत्न केला होता, पण तो प्रयत्न फसला, कारण गुजरात मधून कोणी भरती व्हायलाच तयार झाले नाही.

    जी गोष्ट संरक्षण क्षेत्रात गुजरातच्या योगदानाची तीच गोष्ट खेळातील. भारताला ऑलिम्पिकमध्ये अनेक सुवर्ण पदके मिळवून देण्याच्या वल्गना मोदी करतात, पण आज पर्यंत ऑलिम्पिक राहो, पण आशियाई खेळात देखील एकाही गुजराती खेळाडूने सुवर्ण तर जावो, कास्य पदकही मिळवले नाही. ज्या लोकांसाठी पैसा हाच खेळ आहे, त्यांच्याकडून तशी अपेक्षाही करता येत नाही. मुळात गुजराती खेळाडू असतातच कोठे?

    कला, क्रीडा, साहित्य, साहस, विज्ञान अशा सगळ्याच विषयात गुजरात नापास आहे.

    येथे सांगायचा उद्देश हाच आहे की मोदी लोकांना मूर्ख बनवत आहेत, आणि अनेक लोक समजून-सवरून मूर्ख बनत आहेत. गुजरातची अवस्था त्या विद्यार्थ्यांसारखी आहे की जे विद्यार्थी एखाद्या विषयात ब-यापैकी मार्क मिळवतात, पण बाकी सगळ्या विषयांमध्ये नापास होतात. मग तो नापास विद्यार्थी एका विषयाच्या जोरावर आपण कसे हुशार आहोत हे सांगत सुटतो. त्याचे ऐकून कमी समज असणारे लोक सगळ्या विषयांमध्ये चांगल्या मार्काने पास होणा-या विद्यार्थ्यांपेक्षा या नापास विद्यार्थ्याने अभ्यासात चांगलीच प्रगती केली आहे असे समजू लागतात.

    ReplyDelete
  28. Hii sir .,, जैन तत्व नुसार जगाची निर्मिती व परीक्षण कश्याद्वारे झाले? Ple answer sir

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...