Monday, May 12, 2014

विद्रोहाची संकल्पना का फसली?

विद्रोहाची संकल्पना फसली कारण विद्रोह नेमका कोणाविरुद्ध, एखाद्या जातीविरुद्ध कि व्यवस्थेतील अन्याय्य विषमतामुलक तत्वज्ञानाविरुद्ध याचे भानच उरले नाही. जातींविरुद्धचा संघर्ष एका जातीविरुद्ध एकवटण्याचा द्वेषमुलक प्रयत्न सुरु झाला येथेच विद्रोहाच्या नाशाची बीजे होती. ब्राह्मण आणि हिंदू देवतांना शिव्या देणे म्हणजे पुरोगामीपणा अशी काहीतरी विचित्र पुरोगामीपणाची संकल्पना हिरीरीने स्वीकारली गेली. असे करत असतांना आपण आपल्याही जातीच्या बेड्या घट्ट करत चाललो आहोत याचेही भान राहिले नाही.

विद्रोह हा आवश्यकच असतो...पण तो विषमतामुलक तत्वज्ञानांना तिलांजली देण्यासाठी...मग ही विषमता जातीय असो कि आर्थिक-सांस्कृतिक!

आमचे विद्वान समतेबद्दल नेहमीच हिरिरीने बोलत असतात. पण त्यांना नेमकी कोणती समता अपेक्षित असते? उच्च वर्णीय, निम्न वर्णीय हे शब्द सातत्याने वापरत असतांना समतेचे अधिष्ठाण कसे येईल याचा कसा विसर पडला? वर्ण शब्द वापरतांना आपण वैदिक विषमतेची वर्णव्यवस्था स्विकारतो आहोत, म्हणजे समतेच्या मुलतत्वालाच सुरूग लावतो आहोत याचे भान कसे सुटले?

मी अंबेजोगाई येथे एका भाषणात म्हणालो होतो, बहुजनांना ज्ञानात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक उत्थान करून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम ब्राह्मणातील "ब्र" काढणेही बंद करावे. त्यांना शिव्या देवून तुमची पोटे भरणार नाहीत. ते जातीसंस्थेचे निर्माते नाहीत. पुरोहित या नात्याने त्यांनी शोषण केले असेल तर त्यांना पुरोहित म्हणून बोलवणे थांबवा...स्वत:च सारी कर्मकांडे करा...शिव्या देत बसून काय साधणार आहे? त्यापेक्षा आपले ज्ञान, अर्थ आणि आजच्या जगाशी सुसंगत अशी सुसंवादी संस्कृतीचे नवनिर्माण कसे करता येईल यासाठी उभे ठाका!

अर्थात विद्रोही म्हणवणा-या चळवळीने झटपट प्रसिद्धी मिळते, टाळ्यांचे गजर होतात म्हणून शिवीसत्राला बांध घालणे सोडले नाही. जातींत स्वत:च कोंबून टाकलेले महापुरुष आपल्या चळवळीचे प्रतीक निवडले, पण जातीपार असलेले महात्मा गांधी यांना स्विकारणे तर दुरच, पण त्यांनाही शिव्या घालत बसण्याचा मार्ग निवडला.

विद्रोही चळवळीने नवे सामाजिक ज्ञान व भान निर्माण केले नाही. सामाजिक ऐक्याची संकल्पना पुढे रेटण्याऐवजी विभक्तीकरणालाच ते कारणीभूत झाले. पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र कधी प्रतिगामी झाला हे समजलेच नाही. जातीय विद्वेषाचे विष उतरलेच नाही...उलट वाढत गेले.

आज समाजव्यवस्था मोठ्या संक्रमणातून जात आहे. जागतिकीकरण आणि त्यामुळे निर्माण होत असलेली नवी मुल्ये, वाढत्या आशा-आकांक्षा, नव्य जीवनशैलीचे अनिवार आकर्षण आणि त्याच वेळीस उपलब्ध अत्यल्प साधनस्त्रोत या कचाट्यात सर्वच सापडले आहेत. व्यवस्थेचा फायदा अत्यल्प लोकांना होत आहे तर बहुसंख्य लोक वंचित होत चालले आहेत. आरक्षण हवेच यासाठी जसे नवनवे समाजघटक आक्रमकपणे पुढे येत आहेत तसेच यांना आरक्षण का असे जोमाने विचारणारेही पुढे येत आहेत. आरक्षणाची आवश्यकता भासणे म्हणजे अजुनही आम्ही आर्थिक दृष्ट्या मुर्दाड आहोत, आमची मानसिकता ज्ञानात्मक होत प्रगती साधण्याकडे नाही हेच सिद्ध करते. आणि जातीय संघर्षाला आरक्षण हेही एक महत्वाचे कारण आहे याचे भान पुरोगाम्यांना आले नाही. सर्वांत गोड रहायचे, सर्वप्रिय (किमान आपल्या जातगटात तरी) व्हायचे अशी खाज लागलेल्यांकडून परखड बोलीची अपेक्षा तरी कशी करायची?

साधनसंपत्तीचे नुसते फेरवाटप करून काही होत नसते. मुळात उपलब्ध साधनसंपत्तीचा विनियोग कसा करायचा याचीच अक्कल नसेल तर आहे तीही साधनसामग्री वाया जानार. उदा. भारतात आजही ३०% शेतमाल वाया जातो. शेतमालावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण २%‍ पेक्षाही कमी आहे. म्हणजे आपण त्यावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग सर्वत्र सुरु करत शकलो नसू, वाया जाना-या साधनसंपत्तीचा विनियोग करु शकलो नसू तर आपण मागास म्हनवण्याच्याच योग्यतेचे नव्हेत काय?

आहे त्या आर्थिक, ज्ञानात्मक व सांस्कृतिकतेकडून जो पुढे जात राहतो, गुणात्मक प्रगती साधत असतो, त्याला पुरोगामी म्हणतात. प्रस्थापितांना शिवीगाळ करत बसलेल्यांना नाही याची नोंद घ्यायला हवी.

9 comments:

  1. सोनवणी दादा,

    विद्रोह या शब्दाचा द्रोह या शब्दाशी काहीही संबंध नाही, हे सर्वप्रथम आपल्याला समजावून घ्यावे लागेल. विद्रोह म्हणजे अन्यायाविरुद्ध उभारलेले बंड असा त्याचा अर्थ होतो. विद्रोह हा नेहमी अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात ज्यांच्यावर अन्याय झाला आहे किंवा होत आहे अशा लोकांनी उभारलेला लढा असतो, हा लढा फक्त ब्राह्मणांविरुद्ध आहे असे जर आपणास वाटत असेल तर ते बरोबर नाही. प्रत्येक जात जेव्हा आपल्या जातीला इतर जातींपेक्षा वरचढ मानणारी असेल तर स्वतःला खालची मानणारी प्रत्येक जात हा अन्ययविरुद्धाचा लढा देतच राहणार, यात दुमत असू नये. हा लढा काहीसा नरम झाल्यासारखा वाटत असला तरी तो फसला आहे असे म्हणणे खूपच धाडसाचे ठरेल आणि कोणीही हे मान्य करणार नाही.

    राजू काणे

    ReplyDelete
  2. आप्पा - काय रे बाप्पा - इतके जड जड मराठी शब्द आपल्याला तरी झेपत नाहीत
    बाप्पा - म्हणून तर म्हणतो " झाले बहु ,होतील बहु ,परंतु या सम हा " असा आपला संजय आहे !
    आप्पा - पण माझ्या काही शंका आहेत , त्या विचारल्या तर संजय उत्तर देईल का ?कारण आपल्याला तरी कोकणाची माहिती आहे , तिथले थोडेसे श्रम विभाजन आणि अर्थकारण माहित आहे
    बाप्पा - मग विचार ना त्यात काय ?संजय अगदी यथासांग उत्तर देईल !
    आप्पा - ते बघ , म्हणजे आपल्याकडे आगरी आणि भंडारी आहेत , कुळवाडी आहेत ,त्यांच्याकडे लग्नकार्य निघाल की वाडीचा मालक , ज्याच्याकडे हे कुळवाडी काम करतात , तो उसने पैसे देतो ,
    बाप्पा - त्यासाठी कुदुक मुदुक सोन किंवा जमीन लिहून देतो ,कारण त्याचा ब्यान्कांवर भरोसा नाही !
    आप्पा - आणि हे वाडीचे मालक , बहुदा को. ब्रा . , यांना सावकारी रुपात मदत करतात !
    बाप्पा - अशी कुळवाडी लोक अनेक वर्षे या मालकांकडे काम करत आहेत ,तसे पाहिले तर शिक्षण नाही , आणि हि लोक अंगाचे कसब दाखवत आज जणू या ब्राह्मण लोकांच्या घरातले एक असल्यासारखे झालेले आपण पाहिले आहे .
    आप्पा - अगदी खंर आहे !कुठेही वाद नाही , कोकणात काय नि गोव्यात काय , हि एक वेगळीच वृत्ती दिसते !सगळे त्रास आणि संकटे अगदी सहजपणे झेलत सरमिसळ रहात असतात !
    बाप्पा - आणि शिवीगाळ म्हणाल तर , ब्राह्मणापासून पार कोळी आगरी लोक शिव्यांशिवाय बोलतच नाहीत , तिथे जातपात आणि वय याचा संबंधाच नाही मुळी !अगदी न्हावीसुद्धा बिनधास्त ब्राह्मणाला केस भादरताना जोर जोरात आणि ठसक्यात डाफरत असतो ,रिक्षावाला मुली बालीना छेडत असतो - पण सगळे प्रेमाने आणि आपुलकीने ,तिथे बामणाच्या घमेद्खोरिचा उद्धार कुळवाडी करत असतो , त्यात विनोदाची डूब असते , म्हणून तो सर्व प्रकार जातीय संघर्षाचा वाटत नाही !
    आप्पा -आज मुंबईत सुद्धा , कोकणी माणूस स्थिर झाला म्हणूनच एक मेकाना सांभाळत रहाण्याची या नगरीची खासियत बनली !
    बाप्पा - आपल्या महाराष्ट्रात इतर ठिकाणच आपल्याला काहीच माहित नाही !
    आप्पा - कोकणात गांधी असोत नाहीतर सर्वोदय असो , सगळ्याचीच सामुहिक खिल्ली उडवली जाते !, आणि धर्माच्या गाठीपण अगदी ढिल्या आहेत , त्यामुळे मुसलमाना कडले पापलेट आपोआप ब्राह्मण शेतजिच्या पानात दिसते , आणि कुलवादॆनिने केलेले हळदीच्या पानावरचे घावन भटजीच्या पानात आवडीने वाढले जातात !
    बाप्पा - म्हणूनच म्हणतो , व्यसनानि वाया गेलेला माणूस सुद्धा हि कोकणाची माती सांभाळून घेते , इथे कोणतेही घटत पुस्तकी विचार रुजतच नाहीत ,
    आप्पा - सगळेच कोकण माड आणि पोफळीवर आपले आयुष्य बेतात असते , आणि गरजा स्वभावतः कमीच !
    बाप्पा - इथे राजकारण हि करमणुकीची गोष्ट !त्यामुळे इथे कुणालाच कसलाच ताण नाही !
    आप्पा - जातीय आणि धार्मिक तेढ नाही , वैचारिक बाबतीत कुणालाच सोयर सुटक नाही ,
    मग मी म्हणतो , इतर प्रांतात तरी असा भेदभाव का चालतो ?
    बाप्पा - अरे आपल्याला नारळा सारखा कल्पवृक्ष भेटलाय , तसा इतर ठिकाणी नाही !
    आप्पा - आपल्याकडे पोफळी सारखे पिक आहे तसे तिकडे नाही , आणि मासे आपल्याकडचे तिथे नाहीत !मग आहे त्यातच अर्धपोटी भांडत बसतात
    बाप्पा - आपण थोडे अल्प संतुष्ट आहोत हे पण खरे !

    ReplyDelete
  3. महात्मा गांधी जातीपार असते तर त्यांनी पुणे कराराला विरोध केला नसता....

    ReplyDelete
  4. आप्पा - काय रे बाप्पा - इतके जड जड मराठी शब्द आपल्याला तरी झेपत नाहीत

  5. कोणालाही विद्रोह करायाच वेळ येऊ नये अशी समाज व्यवस्था निर्माण करा.

    ReplyDelete
  6. आप्पा- काय हो बाप्पा डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन नऊ महिने उलटून गेले आहेत, अजूनही मारेकरी व सूत्रधार सापडले नाहीत, आता मात्र तपास सी.बी.आई. कडे सोपविला आहे.

    बाप्पा- कसे सापडतील, हे काम त्यांच्या विरोधकांनी अगदी शांत डोक्याने केलेले आहे.

    आप्पा- ते कसे काय?

    बाप्पा- अहो, विरोधकांनी असे अनेक खून पचविले आहेत. यावेळी त्यांनी मागे अजिबात पुरावा सोडलेला नाही, भोडोत्री मारेकऱ्यांना सुद्धा यांनी मारून टाकले आहे कि काय अशी शंका येते आहे.

    आप्पा- मारेकऱ्यांनी वापरलेली मोटार सायकल सुद्धा पार्टन-पार्ट सुटा करून भंगार वाल्यांना ठराविक कालावधीच्या अंतराने फुकट दिले कि काय अशी सुद्धा शंका येते आहे.

    बाप्पा- तुम्हाला शंका येते आहे, मलातर खात्रीच वाटते आहे.

    आप्पा- पण पोलिस काय करीत आहेत?

    बाप्पा- ते बिचारे तपासाची दिशा शोधत असतील !

    आप्पा- आणि सरकार?

    बाप्पा- सरकारने तर खून पचविला आहे आणि वरून ढेकरही देत आहे.

    आप्पा- म्हणजे या मागे सरकारचे कारस्थान सुद्धा असू शकते काय?

    बाप्पा- तसे नव्हे, तर सरकारला गुन्हेगार माहित असतील, मात्र ते उघड करण्यास सरकार घाबरत असेल.

    आप्पा- निवडणुका संपल्या आहेत, निकाल 16 मे ला जाहीर होतील, गुन्हेगारांची नावे जाहीर झाल्यास एका मोठ्या वर्गाकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    बाप्पा- कोणता मोठा वर्ग?

    आप्पा - तोच, जो दाभोलकरांना मारण्याची भाषा करीत होता, अंधश्रद्धा विधेयकास बेंबटापासून ओरडून विरोध करीत होता. धर्मच बुडाल्याची भाषा करीत होता. विधेयक हिंदू धर्मा विरुद्ध असल्याचे विष सनातन प्रभात मधून समाजात भिनवत होता.

    बाप्पा- माझे तर स्पष्ट मत असे आहे कि त्या सनातनच्या अभय वर्तकला टायर मद्धे घालून जो पर्यंत पोलिस बडवीत नाहीत तो पर्यंत धागे-दोरे हाती येण्याची सुतराम शक्यता नाही.

    आप्पा- मलाही तसेच वाटते आहे, बघू निवडणुक निकालानंतर तरी सरकारचे डोळे उघडतात कि नाही ते! तो पर्यंत तरी आपल्याला शांतच बसावे लागेल.
    ....................................................................................................................

    ReplyDelete
  7. विद्रोह या शब्दाचा वापर हिंदीत केल्यास त्याचा अर्थ
    किसी के प्रति किया जानेवाला द्रोह अर्थात् शत्रुतापूर्ण कार्य।विशेषतः राज्य या शासन के प्रति अविश्वास या दुर्भाव उत्पन्न होने पर उसकी आज्ञा.विधान आदि के विरुद्ध किया जानेवाला आचरण या व्यवहार।देश या राज्य में क्रांति करने के लिए किया जानेवाला उपद्रव।असा दिला आहे ,आता मराठीत सुद्धा साधारण तसाच अर्थ आहे त्यामुळे विद्रोह याचे विश्लेषण संजय सोनावणी यांनी करावे असेच योग्य ठरेल दुसरा मुद्दा ,पुणे करार म्हणजे काय असे विचारून संजय सर गप्प बसतात , हे बरे , नव्हे मला मान्य आहे की काहीजण उगाचच आपल्याला बरेच काही माहित आहे असा आव आणतात , म्हणून आपण कदाचित असे प्रश्नांकित वाक्य टाकून त्याना गप्प केले असेल , पण खरोखरच इंग्रजांनी १९३० पासूनच आपल्या समाजाला फोडण्याची नीती अवलंबिली होती आणि स्वतंत्र मतदार संघ आणि राखीव जागा यांचा शिरकाव भारतीय मनात कसा करून ठेवला हे मुळातच बघण्यासारखे आहे ! मुसलमान ख्रिश्चन आणि अंगलो इंडियन यांच्या बाबतीत ते धोरण सुरूही झाले होते हे विशेष !पुणे करारात स्वतः म गांधीनी ३ पैकी एकच मिटिंग अटेंड केली आणि नंतर तर ते उपोषणालाच बसले डॉ आंबेडकर आणि म गांधी यांच्यात करार काय झाला ते मुळातच बघण्या सारखे आहे ! यापूर्वीही लोकमान्य टिळकानीही अशा विघटीत धोरणाला हस्ते परहस्ते हातभारच लावला होता हेपण विशेष आहे त्यामुळे दूर दृष्टी बाबत बोलायचे तर आपले नेते कसे आणि कुठे कमी पडले आणि इंग्रजांनी कसा त्याचा फायदा घेतला हे पण बघण्या सारखे आहे ,फोडा व झोडा हे ब्रीद बाळगून , प्रत्येक वर्गाची अस्मिता चाळवत , इंग्रजांनी दुहीची बीजे पद्धतशीर पेरली आजही नेहरूंचे लदाख आणि अक्साई चीन याबाबत चे वक्तव्य आठवते - " तिथे काहीच , साधे गवताचे तृणही उगवत नाही " असे म्हणत त्यांनी प्रकरण गुंडाळायचा प्रयत्न केला !म्हणजेच आपले नेतृत्व किती सावध होते व आहे हेपण बघण्या सारखे आहे भारतीय समाज हा एकसंघ नाही आणि त्यासाठी त्याना स्वतंत्र राजकीय अस्तित्व हवे हि धारणा जागृत करत इंग्रजांनी अखंड भारताच्या अस्तित्वाला सुरुंग लावायचा जोरदार कार्यक्रम राबवला !आता हे पण बघण्यासारखे ठरेल की अखंड भारत हे स्वप्न सत्यात उतरणे व्यवहार्य होते का ?ते एक ब्राह्मणी स्वप्न होते का ? ५४० संस्थानिकाना स्व निर्णयाची मुभा देत इंग्रजांनी काय विष पेरले ?आणि त्यांना तनखे देत भारत सरकारने किती चतुराईने इंग्रजांचा एक डाव हाणून पाडला !एकसंघ बहुभाषिक भारत हे व्यवहार्य होते का ? ब्या.जीनाना अखंड भारताचे पंत प्रधानपद देण्याचा बेरकी प्रस्ताव फक्त म गांधी सारखे मुरब्बी राजकारणीच करू शकत होते , आणि नेमके हेच जीनांनी ताडले होते , की म गांधी बघता बघता आपल्याला आपल्या स्वप्नांसकट गिळंकृत करून टाकतील !म गांधींचा थोरपणा यातच आहे !

    ReplyDelete
  8. Vidroh mhanaje anyayaviruddhacha pratikar kings ubharalela ladhach haach marathi arth apekshit aahe Hindi nhave.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...