Monday, June 30, 2014

चोख्याचा काळ...




भारतात राजकीय इतिहास लेखनाचीच विशेष परंपरा नव्हती, तर सामाजिक इतिहास कोठून मिळनार? जो इतिहास उपलब्ध आहे तो बव्हंशी मित्थकथा, कालविपर्यास आणि त्रोटक स्वरुपाचा आहे. जेथे राजकीय इतिहासच धड समजायची मारामार तर सामाजिक इतिहासाचे काय अस्तित्व असणार? त्यामुळे आपल्या आजच्या सामाजिक परिस्थितीतील गुण-दोष याचा ऐतिहासिक परिप्रेक्षातून अभ्यास करणे स्वाभाविकपणेच कठीण जाते.

चोखामेळा ज्या काळात झाले तो काळ आपण तपासून पाहुयात. चोख्याला व त्याच्या परिवाराला संतत्वाच्या वाटेवर नेण्यात संतशिरोमणी नामदेव महाराजांचा मोलाचा हात होता. याच काळात संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे व गोरोबां-सावतांसारखे अठरापगड समाजातील संतही झाले. तेराव्या शतकाचा उत्तरार्ध ते चवदावे शतक हा या संतांचा काळ होय. या संतांनी पंढरीच्या, अवैदिक परंपरेतील  व तशा अप्रसिद्ध देवतेला समतेचे आराध्य म्हणून स्विकारले. तेराव्या-चवदाव्या शतकातच ही संतांची मांदियाळी उदयाला का आली असावी? अशा कोणत्या प्रेरणा माहाराष्ट्राच्या मातीत एकाएकी निर्माण झाल्या कि ज्यामुळे संतांना सामाजिक चळवळ विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून उभी करावी वाटली?

चोखामेळा व त्याचा परिवार ज्या जातीघटकातून संतत्वाला पोहोचला त्याचा विचार करता तत्कालीन समाजस्थिती नेमकी काय होती याबाबत कुतुहल वाटणे स्वाभाविक आहे. त्याच निमित्ताने महाराष्ट्रात अस्पृष्यतेच्या मानवताविहिन संकल्पनेचे गारुड समाजाला नेमके कधीपासून ग्रासू लागले, नेमक्या काही विशिष्ट जातीच अस्पृष्य़ का ठरवल्या गेल्या याचाही धांडोळा घेणे आवश्यक बनून जाते.

देवगिरीचे यादव

देवगिरीच्या यादवांची सत्ता सन ८५० मद्धेच महाराष्ट्रात स्थापन झाली होती. ही सत्ता सन १३१७ साली शेवटचे आचके घेत संपुष्टात आली व इस्लामी सत्ता महाराष्ट्रावर कायम झाली. म्हणजेच यादवांच्या उतरणीच्या काळात संतांचा उदय झाल्याचे आपल्याला दिसून येते. खरे पाहिले तर १२९६ सालीच अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीचा पाडाव केला होता. तात्पुरत्या स्वरुपात रामचंद्र यादवाची पुनर्स्थापना झाली असली तरी खंडणी न भरल्याने मलिक काफरने १३०७ साली पुन्हा आक्रमण केले होते. १३१७ मद्धे खिल्जीने तेंव्हाचा शासक तिस-या सिंघनला ठार मारून देवगिरीचे राज्य त्याच्या साम्राज्याला जोडून घेतले. ही उलथापालथ आणि रक्तपात महाराष्ट्राने अनेक शतके पाहिलेलाही नव्हता. यामुळे जनजीवन विस्कळीत होणे व काहीतरी प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक समजायला हवे. पण तसे झाल्याचे चित्र दिसून येत नाही.

ही राजकीय अंदाधुंद चालु असतांनाच संतांचा उदय झाला आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रामचंद्र यादवाच्या कालातच नरेंद्र कवीचे रुक्मीणी स्वयंवर व नागदेव चरित, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी हे ग्रंथ लिहिले गेले अथवा तेंव्हा लेखन चालुच होते. संत नामदेव ते चोखा हे बहुजनीय संत याच काळात बहराला येत होते. खरे तर त्यांच्या काळातील ही राजकीय उलथापालथ सामान्य नव्हती. जवळपास साडेचारशे वर्ष महाराष्ट्रावर अव्याहत राज्य करणा-या राजवंशाचा उच्छेद व्हावा आणि त्याचे कसलेही प्रतिबिंब ज्ञानेश्वर ते चोख्याच्या एकाही अभंगात वा लेखनात पडू नये हे विस्मयकारक आहे. केंद्रीय राजकीय व्यवस्था आणि सामान्य नागरिकांत त्या काळात फारसा संबंध नसे हे खरे आहे. खेड्यांतील प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवले जात. गांवचा पाटील सोडला तर इतरांचा राजसत्तेशी काही संबंध येत नसे. हे जरी खरे असले तरी परकीय आक्रमणे होतात, भिषण युद्धे होतात आणि प्रदिर्घ काळ राज्य करणारी सत्ता उध्वस्त होते पण त्याचे पडसाद तत्कालीन व नंतरच्याही संतांच्या अभंगात पडू नयेत हे मात्र विलक्षणच होय!

परंतु विषय पंढरीचा आणि श्रीविठ्ठलाचा असल्याने यादवांची अल्प का होईना चर्चा अत्यावश्यकच आहे. पंढरीच्या श्री विठ्ठलाची मुर्ती चंद्रभागेतिरी पुर्वी उघड्यावर होती. बाराव्या शतकात यादवांच्या विठ्ठलदेव नायक नामक पंढरपूरच्या सामंताने यादवांच्या अनुमतीने विठ्ठलाचे पहिले मंदिर बांधले. तत्पुर्वी विठ्ठलाचे भक्तजन हे बव्हंशी धनगर-कुरुब-कोळी होते हे डा. रा. चिं. ढेरे यांनी साधार सिद्ध करून दाखवले आहे तसेच माणिकराव धनपलवार यांनी विठ्ठलाचे मुळचे रूप शैव होते हेही सिद्ध करुन दाखवले आहे. एका दैवताच्या मुळ स्वरुपात झालेले हे बदल यादवकाळातच झाले आहेत हेही येथे उल्लेखनीय आहे. यामागील कारणांचाही शोध आपल्याला घ्यावा लागणार आहे.

तत्कालीन धर्मस्थिती

तेराव्या-चवदाव्या शतकापर्यंत महाराष्ट्रात अनेक धार्मिक चळवळी झालेल्या दिसतात. एकीकडे समतेचा पुरस्कार करणारे नाथ, वीरशैव आणि महानुभाव पंथांनी महाराष्ट्र भुमी व्यापली असतांनाच वैदिक धर्माचा जोरही राजाश्रयाने वाढत असल्याचे दिसते. मध्यंतरी लुप्तप्राय होऊ पाहणा-या वैदिक धर्माने महाराष्ट्रात उचल खाल्लेली दिसते. याचे कारण म्हणजे मनुस्मृतीच्या दरतीवर देवल स्मृती महाराष्ट्रात यादवकाळातच लिहिली गेली. यादवांचा मुख्य प्रधान हेमाद्री पंताचा जवळपास साडेचार हजार व्रते सांगणारा "चतुर्वर्ग चिंतामणी" हा ग्रंथही याच राजवटीत आकाराला आला. पुर्वी व्रते नव्हती असे नाही, पण त्यांची संख्या अत्यल्प अशीच होती. उदा. शंकरभट्टाच्या "व्रतार्क" मद्धे फक्त ११३ व्रते दिली गेली आहेत. शैव विठ्ठलाचे वैदिक वैष्णवीकरणही याच काळात झाले. प्रशासनातील वैदिकांचे प्रमाणही याच कालात क्रमश: वाढत गेल्याचे डा. मालती महाजन म्हणतात. शुद्रांवरील बंधने या साडेचारशे वर्षांच्या प्रदिर्घ काळात वाढतच गेली आहेत.

खरे तर यादव हे यदुवंशी गोपालक समाजातून आलेले राज्यकर्ते. वैदिक धर्मानुसार शूद्रच. यादव वंशाच्या कारकिर्दीत यादवांनी कसलेही यज्ञ केल्याची नोंद नाही, कारण त्यांना अवैदिक असल्याने तो अधिकारच नव्हता. यादव काळात शैव मंदिरांची संख्या सर्वाधिक असून बव्हंशी लोक शैवप्रधान धर्माचे अनुसरण करत असत. (इतिहास: प्राचीन काळ: सांस्कृतिक इतिहास)

देवल स्मृतीच्या माध्यमातून वर्नव्यवस्थेचे व जन्माधारित्य उच्चनीचतेचे स्तोम महाराष्ट्रात पसरलेले दिसते. बाकी सर्व स्मृत्यांची रचना उत्तरेत झाली असली तरी या स्मृतीची रचना महाराष्ट्रात व यादवकाळातच दहाव्या ते अकराव्या शतकादरम्यान झाली आहे हे लक्षात घेतले पाहिजे. या स्मृतीत वर्णाश्रम-धर्म, शुद्धी-प्रायश्चिते व धर्मांतरितांना परत धर्मात घ्यायची सोय होती असे मानले जाते. त्यामुळे या कालात धर्मांतरांचे प्रमाण वाढले असावे असा तर्क बांधता येतो. राज्यकर्त्यांची साथ असल्याखेरीज धर्मविषयक मतांचा बोलबाला सहजी वाढत नाही. त्यामुळे यादव घराण्यानेही त्यांना प्रोत्साहन दिले असेल अशीही शक्यता आहे.

याच काळात वैदिक धर्माला प्रतिक्रिया म्हणून शैवांनीही वैचारिक आणि समतेची पुन्हा क्रांती सुरु केली. त्यात अग्रभागी होते नाथ, महानुभाव व वीरशैव पंथ. यात नाथपंथ जुना आणि आघाडीवरचा म्हणता येईल. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे मुळची नाथ संप्रदायाशीच निगडित होती. ज्ञानेश्वरांचे अमृतानुभव हा शैव नाथपंथीय तत्वज्ञानात मोलाची भर घालणारा ग्रंथ आहे. उपनयन नाकारले गेल्याने वैदिक धर्मानुसारही ते शूद्रच होते. नाथ पंथ त्यांना अधिक आपलासा वाटला असल्यास त्यात काही आश्चर्य नाही. 

अद्वैत शैव सिद्धांतातून प्रगत पावलेला नाथ संप्रदाय नक्की कधी स्थापन झाला याची ऐतिहासिक नोंद मिळत नसली तरी दहाव्या-अकराव्या शतकात गोरक्षनाथांनी त्याची स्थापना केली असावी असा मतप्रवाह आहे. ज्ञानेश्वरांच्या काळात निवृत्तीनाथांनी वयाच्या दहाव्या वर्षी गहिनीनाथांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा घेतली असे सांप्रदायिक वाड्मयानुसार दिसते. विषेष म्हणजे चारही भावंडांची नांवे ही नाथ संप्रदायाच्या परंपरेतील आहेत. इतकेच नव्हे तर "समाधी" या नाथ संप्रदायातील प्रथेच्या वापर समाधी घेऊन चारही भावंडांनी केला.

नाथ संप्रदाय हा समानतेचा (स्त्री-पुरुषही) पंथ. या पंथाने वैदिक उत्थानसमयीच उचल खावी याचा अर्थ वैदिक विषमतेचे गारुड समाजाला ग्रासू लागले होते. यामुळेच कि काय बाराव्या शतकात बसवेश्वरांनी कर्नाटकात वीरशैव (लिंगायत) पंथाची स्थापना केली. वेद व वैदिक कर्मकांड नाकारत समतेची अवाढव्य चळवळ त्यांनी उभी केली. महाराष्ट्र निकटचा असल्याने, विशेषत: सोलापूर व नजिकच्या भागात हा पंथ पसरुन ज्ञानेश्वर-चोख्याच्या काळापर्यंत सुस्थापित झाल्याचे दिसते.

चक्रधरांचा महानुभाव पंथ १२६७ मद्ध्ये कृष्णाला आराध्य मानत समतेचाच संदेश देणारा पंथ स्थापन झाला. चक्रधर जरी गुर्जर देशातून आले असले तरी त्यांची कर्मभूमी ही विदर्भ, मराठवाडा व खानदेश ही प्रामुख्याने राहिली. याही पंथाने समतेच्या सिद्धांताला चालना दिली.

वारकरी पंथ

एकंदरीत महाराष्ट्रात वैदिक विरुद्ध अवैदिक हा धर्म-संस्कृती संघर्ष यादवकाळात प्रकर्षाने पुढे आलेला दिसतो. समतेचे आकर्षण हा मानवी समाजाचा मुलगाभा आहे. वैदिक वर्णव्यवस्था मात्र ती नाकारते त्यामुळे वैदिक प्राबल्य झुगारण्यासाठी वेदनिषेध केला जाने स्वाभाविक होते.

विठ्ठलभक्ती महाराष्ट्रात अल्प असली तरीही तेंव्हाही नवीन नव्हती. तसा हा अवैदिक देव. माणिकराव धनपलवारांच्या मते हे मुळचे शैव स्थान होते. पुंडरिकाचे मंदिर हे प्रत्यक्षात शिवालय आणि त्यासमोर करकटी ठेवून उभा श्री विठ्ठल हे वास्तव पाहता हे मुळचे शिवस्थानच याबाबत शंका घेता येत नाही. विठ्ठलाची मुर्ती ही आधी उघड्यावरच होती व यादव काळात पहिले मंदीर झाले हे आपण वर बघितले. येथे आजवर विद्वानांच्या साक्षेपी नजरेतुन सुटलेला महत्वाचा भाग असा कि यादवकाळात एकीकडे अवैदिक शैव पंथांचा समतेचा बोलबाला चालु असतांना एक दुर्लक्षीत शैव स्थानाचे रुपांतर चक्क वैदिक वैष्णव स्थानात नेमके का केले गेले असावे हा.

विठ्ठल हा विष्णुच्या सहस्त्रनामांत अथवा चोवीस अवतारांतही न सापडणारा देव. संतांनाही त्याचेच एक आगळे कुतुहल असल्याचे त्यांच्या अभंगांवरून जाणवते. तरीही तो विष्णु अथवा कृष्ण या रुपात पुढे आनला गेला. असे असले तरी विठ्ठल मुळचा शिव आहे याची जाणीवही संतांना दिसते. "विष्णूसहित शिव...आणिला पंढरी" असा संत क्वचित का होईना उद्घोष करतांना दिसतात. तरीही विठ्ठलाला वैष्णव चरित्र बहाल केले गेले, यादवकाळातील ज्ञानेश्वर ते चोख्याने ते स्विकारले आणि त्यालाच आपले आराध्य बनवले हे एक वास्तव आहे.

खरे तर हा लढा वैष्णव कि शैव असा नसून वैदिक कि अवैदिक असा होता आणि त्याच अनुषंगाने तत्कालीन सांस्कृतिक संघर्षाकडे पाहिले पाहिजे. विष्णू ही ऋग्वेदातील, अवघी साडेतीन सूक्त अर्पण केलेली देवता. तो ऋग्वेदात इंद्राचा दुय्यम मित्र (उपेंद्र) म्हणून पुढे येतो. ऋग्वेदात अवतार संकल्पना आहे...पण अवतार घेण्याचे कार्य प्रजापतीकडे आहे, विष्णूकडे नव्हे, हे लक्षात घेतले पाहिजे. विष्णू ही देवता गुप्तकाळात नवीन चरित्र बहाल करत पुढे आणली गेली. त्याला सागरशयनी व लक्ष्मीपती बनवण्यात आले. (ऋग्वेदात त्याला पत्नी असल्याचा उल्लेख नाही अथवा तो सागरशयनीही नाही.) गुप्तांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिला होता. गुप्त नाण्यांवर सर्वप्रथम लक्ष्मी व विष्णू अवतरतात. ऋग्वेदातील अवतार घेण्याचे कार्य आता विष्णूवर सोपवण्यात आले. पुरातन काळातील महनीय व्यक्तित्वे (राम-कृष्ण) विष्णुचे अवतार घोषित करत त्यांची चरित्रेही वैष्णव बनवण्यात आली. इतकी की गौतम बुद्धाला, जो वेदविरोधी होता, त्यालाही विष्णुचा अवतार ठरवण्यात आले.

खरे तर मुर्तीपूजा ही संकल्पना मुळात वैदिक नाही. यज्ञांतील आहुतींद्वारे हवन करत इंद्र-वरुणादि अमूर्त वैदिक देवतांना आवाहने करत संतुष्ट करणे हे वैदिक कर्मकांड. परंतू बुद्धाच्या उदयापासूनच त्याने हिंसात्मक यज्ञांना विरोध सुरु केल्याने यज्ञ मावळू लागले होते. शिवाय ते खर्चिक, गुंतागुंतीचे आणि वेळखाऊ (काही यज्ञ १२-१२ वर्ष चालत) बनल्याने यजमान सापडण्याचीही मारामार होऊ लागली होती. त्यामुळे मुर्तीपुजेला शरण जाण्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय राहिला नाही. पण तसे करतांना त्यांनी अवैदिक देवता न निवडता विष्णू हीच वैदिक देवता निवडली. पांचरात्र या अवैदिक संप्रदायातील भक्तीतत्व उचलले आणि वैष्णव पंथ जोमाने वाढवला जावू लागला. पण या पंथातील वैदिक वर्णव्यवस्थेची मुलतत्वे मात्र कायम ठेवण्यात आली.

महाराष्ट्रात समतेच्या शैव पंथांचा जागर सुरु असतांना एक अप्रसिद्ध शैवस्थान वैष्णव स्थान म्हणून पुढे का आनले गेले याचे कारण वैदिक-अवैदिक संघर्षात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शैव पंथांना मात दिल्याखेरीज वैदिक महत्ता वाढणार नाही ही यामागची व्यूहनिती होती. त्यामुळे विठ्ठलाला वैष्णव साज चढवण्यात आले. विठ्ठलाचा पुर्व-दैवतेतिहास हा अत्यंत धूसर असल्याने हे वैष्णव चरित्र चढवता येणे सोपेही होते. तसे ते झालेही. आद्य संतांनी विठ्ठलाला विष्णू-कृष्ण याच रुपात पाहिले असल्याने हा चरित्रबदल स्विकारलाही गेला होता असे स्पष्ट दिसते. मात्र चक्रधर जरी कृष्णोपासक असले तरी त्यांनी विठ्ठलाला कधीही कृष्णाचे रूप मान्य केले नाही. उलट ते विठ्ठलाला "गोचोर", "भडखंभा" अशा विशेषणानी हिणावत असल्याचे दिसते.

म्हणजे यादव काळातील ही जी धर्मविषयक उलथापालथ घडत होती तिचेच अनावर आकर्षण संतांना होते असे दिसून येते. त्याचमुळे कि काय अन्य राजकीय उलथापालथी, रक्तपात याबाबत ते उदासीन राहिले एवढाच तर्क काढता येईल. अर्थात सामाजिक-सांस्कृतिक उलथापालथी होत असतांना त्याचे मानसिक परिणाम जनसमुदायावर होणे स्वाभाविक आहे.

विठ्ठलाला वैष्णव रूप लाभल्याने दोन गोष्टी झाल्या. पहिली बाब म्हणजे वेदमाहात्म्य, जे अन्य शैव पंथांनी नाकारले होते ते, कायम प्रस्थापित झाले. विठ्ठलाचे वर्णन करतांना संतांच्या शब्दांत वेद-तूल्य अशा शब्दकळा पाझरतांना दिसतात. "वेदांनाही ज्याचे रूप समजले नाही..." ते "वेदांचा अर्थ आम्हासही ठावा..." अशी तुकोबावाणीही उमटत राहिली. म्हनजे वेदमहत्ता वैष्णव संतांनी स्वाभाविकपणे मान्य केली. जरी त्यांना वेदाधिकार नसले तरी वेदमोहिनी वाढली. ज्ञानेश्वरही अध्यात्मात नसले तरी व्यवहारात वैदिक चातुर्वर्ण्य आहेत हे मान्य करतांना दिसतात. "अनादि निर्मळ वेदांचे जे मूळ...परब्रह्म सोज्वळ विटेवरी", "ज्या कारणे वेदश्रुति अनुवादती...तो हा रमापती पंढरिये.." असे खुद्द चोखोबाच म्हणतात. या जन्मी लाभलेली गती ही गतजन्मातील पातकांच्यामुळे आहे हा कर्मविपाक सिद्धांत चोखा व त्यांचा परिवारही मान्य करतांना दिसतो. आपल्या सामाजिक अधोगतीला, अस्पृष्यतेचा दोष तो गतजन्मीच्या पातकांना देतो...त्याविरुद्ध बंड करत नाही हे वैष्नव संप्रदायच मुळात वैदिक असल्याने असे झाले असे म्हणता येणार नाही काय?

येथे महत्वाचे पुन्हा लक्षात घेतले पाहिजे, शैव पंथ वेद मान्य करत नाहीत आणि म्हनूणच चातुर्वर्ण्य मान्य करत नाहीत. विठ्ठलाचा बोलबाला होण्याआधी महाराष्ट्रात नाथ-सिद्ध-दत्त आदि संप्रदाय शैव सिद्धांतांना आधारभूत घेतच समतेचा लढा यशस्वीपणे लढत होते. इतकेच काय स्वत: ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे ही नाथ संप्रदायातीलच होती. "अमृतानुभव" हे स्वतंत्र प्रज्ञेचे शैव तत्वज्ञान मांडते.असे असतांनाही ते वैदिक वैष्णव संप्रदायाचे अग्रदूत कसे बनले हे एक आपल्या सांस्कृतिक इतिहासातील कोडे आहे.

परंतू संतांच्या समतेच्या चळवळीला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले असले तरी व्यावहारिक अधिष्ठान लाभले नाही याची कारणे आपल्याला वैदिक तत्वज्ञानात सापडतात. मानसिक पातळीवरील व व्यवहारातील जन्माधारित जातीने आलेला हीणभाव त्यामुळेच गेलेला दिसत नाही. चोख्याला आपल्या आराध्याची गळाभेट घेण्याचे भाग्य लाभले नाही. कारण ज्या मुलभूत तत्वज्ञानावर हा वैष्णव पंथ उभा होता त्याचे तत्वज्ञानच जन्माधारित विषमतेचे होते.

आजही विठ्ठलाच्या पुजेत विषमतेचे आदि कारण मानले गेलेले पुरुषसूक्त म्हटले जाते यावरून मला काय म्हनायचे आहे ते लक्षात यावे. समतेची चळवळ पायाच चुकीचा असल्याने फसली तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

अस्पृष्यता

अस्पृष्यता हा भारतातील एक मोठा कलंक आहे याबाबत कोणाच्याही मनात दुमत असण्याचे कारण नाही. परंतू ती नेमकी सुरु कधी झाली आणि का याची कारणे मात्र अत्यंत वेगवेगळी दिली जातात. वैदिक धर्मग्रंथांत चांडाळ-श्वपच-धिग्वन ई. काही जाती अस्पृष्य मानल्या गेल्याचे दिसत असले तरी महार या जातीचा कोठेही उल्लेख मिळत नाही. महार समाज हा मुळचा ग्रामरक्षण, व्यापारी तांड्यांचे रक्षण करनारा समाज. वेशीचे रक्षण करणे, चोरी झाली तर चोरांना पकडणे, जन्म-मृत्युची नोंद ठेवणे, शेतीतील-गांवातील तंटे उद्भवले तर साक्ष देणे (त्याचीच साक्ष अंतिम मानली जाई), राजे-सरदारांचे व्यक्तीगर अंगरक्षक म्हनून कामे करणे इत्यादि अत्यंत महत्वाची कामे त्यांच्यावर सोपवलेली असायची. ही प्रथा ब्रिटिशकाळापर्यंत चालू असल्याचे दिसते. या कामांत कालौघात काही हीणकस कामांचा, म्हनजे मृत जनावर ओश्ढून नेणे, गांवातील स्वच्छता राखणे ई. समावेश झाला. असे असले तरी महारांना अस्पृष्य़ का मानले गेले याचा समाधानकारक उलगडा होत नाही.

बरे ही अस्पृष्यता गांवपातळीवरील काम करणा-यांबाबत पाळली जात होती का सर्वत्र हा विचार केला तरी गोंधळाचे चित्र सामोरे येते. उदा. सतराव्या शतकातील काही दस्तावेजांवरून दिसते कि सैन्यातील महारांबाबत अस्पृष्यता पाळली जात नव्हती. इतकेच नव्हे तर त्यांचे वेतन व इतरांच्या वेतनातही फरक नसे. त्यांना पराक्रम गाजवल्याबद्दल जमीनी इनाम दिल्या जात. अगदी शनिवारवाड्यातही महार रक्षकांचे पथक होते. शिवकाळात ते अनेक किल्ल्यांचे किल्लेदार असल्याचे दिसते. आपल्याकडील स्थितीस्थापकता पाहिली तर चोख्याच्या काळातही थोड्याफार फरकाने अशीच स्थिती असावी असा अंदाज बांधता येतो. म्हणजे महारांवरील अस्पृष्यता ही सार्वत्रिक होती काय या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी येते. असे असले तरी गांवकामगार महार तरी का अस्पृष्य़ मानला जात होता याचे निराकरण होत नाही.

महारांना जन्म-मृत्युच्या नोंदी ठेवणे, जमीनींच्या सीमा आखणे, सारा मुख्य ठाण्याला पोहोचवणे ई. कामे करावी लागत असल्याने त्यांनी साक्षर असने क्रमप्राप्त होते. चोखा व त्याचा परिवार अभंग रचून लिहित होता ते त्यामुळेच असे म्हनायला प्रत्यवाय नाही. चोखा व त्याचा परिवार मात्र अस्पृष्य़ मानला गेला. संतत्वाला जाऊनही अस्पृष्याचा विटाळ तर गेला नाहीच पण गांवगाड्याचा भारही गेला नाही.

वेठ म्हणजे सरकारी कामे प्रजेकडून मोफत वा अत्यल्प मोबदल्यात करून घेणे. मंगळवेढ्याच्या वेशीचे काम वेठीवर करत असतांना भिंत कोसळून चोख्याला मरण आले. विषमतेच्या काळोखातून विषमतेच्या काळोखात चोखा विलीन झाला.

दुर्दैवाने वारकरी चळवळ त्या अंधारातून बाहेर पडली असे आजही म्हणता येणार नाही!

28 comments:

  1. आदरणीय संजय जी,
    वैदिक और अवैदिक की आपकी सारी बहस, देश की सभी समस्याओं के लिए वैदिक परम्परा को दोषी ठहराना और तथाकथित अवैदिक जातियों को तथाकथित वैदिक व्यवस्था से अलग होने की सलाह देना वैसा ही है जैसे खूब पक चुकी खिचड़ी में से चावल और दाल के दाने खोज खोजकर उनको अलग करना. इससे होगा कुछ नहीं केवल कुछ लोगों में सदा के लिए युगों के शोषित होने की कुंठा पनपने लगेगी. वे बेवजह एक कृतिशून्य सुधारक की तरह मुफ्त की सलाह बांटने का कारोबार करने लगेंगे और खुद भीतर से टूट कर अपने आसपास की दुनिया को भी तोड़ते रहेंगे.
    वैदिक(वैष्णव) और अवैदिक(शिव) भारत का मिलना गंगा और यमुना की तरह दो नदियों का मिलकर एक हो जाना है. कोई गंगासागर में उनके पानी को अलग अलग खोजने की कोशिश करेगा तो उसकी इस मेहनत से होगा कुछ नहीं केवल कुंठा पसरेगी, दोषारोपण का धंदा चलेगा परन्तु इससे समाज की उर्जा प्रतिगामी ही होगी, प्रगतिशील नहीं. ज्ञानेश्वर हो या शंकराचार्य, तुलसीदास हो या तुकाराम ये सभी दोनों धाराओं के मिलने के बाद की महाधारा के किनारे के तीर्थ है. इसलिए आनंद और नृत्य से भरे है. उन्हें अपने अतीत से शिकायत नहीं थी, इसलिए उनकी वाणी सभी को अहोभाव से भर कर जीवन के परम आदर्श की ओर उठने के लिए प्रेरित करती रही.
    आशा है आप भी अपनी प्रतिभा का रास्ता उसी मिलन की ओर ही ले जायेंगे.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
    Replies
    1. वैदिक एवं शैव परंपरा विभिन्न हैं इस वास्तविकता को भुलाया नहीं जा सकता. वर्णाश्रम व्यवस्था कि वजह से असामाजिक उच्चनीचता का जो ग्रहण हमारी समाज व्यवस्था को लगा हैं उसे हटाने का और कोई चारा नहीं हैं. आप कह रहे हैं कि दोनो धाराओं का मिलन हो चुका हैं यह वहम मात्र हैं. दोनो धारा अलग थलग ही जीवित थी और हैं. वेदों का मुर्तीपूजा से कोई संबंध नहीं हैं...तो भी वेदमहत्ता भी चाहिये और समाज में दरार डालनेवाली धाराएं भी चाहिये...ऐसा हो नहीं सकता. आज कोई माने या ना माने, ऐतिहासिक सच्चाईयों को तो झुठलाया नहीं जा सकता. संतों का समता का आंदोलन यदी असफल हुआ तो इसके पिछे वैदिक व्यवस्था ही कारण थी.

      Delete
    2. चोख्याचा काळ...?????????

      नाम्याचा काळ.....
      ज्ञान्याचा काळ....
      तुक्याचा काळ....
      सावत्याचा काळ....
      सेन्याचा काळ....

      असे शीर्षक लेखाला देणे तुम्हाला योग्य वाटते काय?

      Delete
    3. चोखामेळा यांचा काळ....

      असे का बरे लिहिले नाही?

      कृपया उत्तर द्या!

      Delete
  2. हिंदूधर्माचे उद्दिष्ट सुखाची वृद्धी आणि दुःखाचा निरास हे आहे असे उपनिषदांवरून वाटते. वेद प्रमाण मानणे अथवा न मानणे हा हिंदुत्वाचा निकष नाही. सुख-दुःखाचा अनुभव फक्त शरीराद्वारेच घेतला जाऊ शकतो असे मानणाऱ्या संप्रदायाकडून देव या संकल्पनेची निर्मिती झाली आहे. इंद्रिये, इंद्रियाची सहजप्ररणा व इंद्रियांचे अनुभवाला येणारे कार्य यांच्यात सुसंगती रहावी यासाठी कार्य करणाऱ्या प्रेरणेला देव मानले आहे. विष्णू हा पाय हे इंद्रिय, गति ही त्याची सहजप्रेरणा व त्या प्रेरणेचा परिणाम यांच्यावर नियंत्रण ठेवतो. शिव हा अस्थिपंजर हे इंद्रिय, स्थिरता ही त्याची सहजप्रेरणा व त्या सहजप्रेरणेचा परिणाम यांवर नियंत्रण ठेवतो. अस्थिपंजर दहन केल्यावरही टिकून रहात असल्याने तो महादेव या पदवीला पात्र ठरला असावा.

    ReplyDelete
  3. hello mr sonavani...your distaste towards vedas puzzles me, particularly when you choose to cite only the negatives in them, All 4 vedas, along with aranyak, smriti, upanishad, brahmanak and epics (geeta) are collectively seen as our philosophical guides. What is the point of selective omissions and comissions now that socirey is more homogeneous. your apathy towards vaidik literature misplaced. please do answer,
    aditya kulkarni

    ReplyDelete
  4. Mr. Kulkarni,

    No any kind of the knowledge available in Vedas as well as in Upanishadas. These are deserts without a drop of water and also without sand. Vedas and Upanishadas must be burn in furnace.

    Mangesh Deshpande

    ReplyDelete
  5. प्रिय मंगेश,
    केवल किसी धार्मिक पुस्तक को जला देने से समाज की नजर नहीं बदल जाती. रूस और चीन ने धर्म को नकार दिया किन्तु वहां मानव अधिकार सबसे ज्यादा कुचले गए. हमने १५ अगस्त १९४७ को समानता पर आधारित संविधान को अपनाया किन्तु आज भी सबसे ज्यादा गुलाम भारत में रहते है. मुझे लगता है कि हम सभी ने दूसरों के नजरिये को समझने का बढ़पन बताना चाहिए अन्यथा सभी एकदूसरे को नीचा बताने में अपनी समूची जीवन ऊर्जा फूँक देंगे और असफल आदमी की मौत ही मरेंगे. आप इतिहास से लड़ कर जीत नहीं सकते. किन्तु वर्तमान की इज्जत करके भविष्य संवार सकते है.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
    Replies
    1. वेदांच्या परंपरेतल्या, यज्ञयाग, पूजाअर्चा, अग्निहोत्र, श्राद्ध, स्वर्ग-नरक, कर्म- कर्मफळ, पूर्वजन्म- पुनर्जन्म, मोक्ष या सर्व कल्पना व कर्मकांड ही लोकांना लुबाडण्यासाठी, बनेल हितसंबंधीयांनी निर्माण केलेले भ्रमजाल आहे. पातिव्रत्य हे मूल्य नसून स्त्रियांचे स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे, जुलमी पुरुषांचे एक हत्यार आहे. वर्णाश्रम व जातिभेद हे अशास्त्रीय आहेत. या विचारांची विधायक बाजू अशी- स्वतःची बुद्धी हेच खरे प्रमाण आहे. हे ऐहिक जीवनच खरे आहे. शेती, व्यापार, गोपालन, प्रशासन आणि उपयुक्त शास्त्रांचे अध्यापन अशा साधनांनी काम करून द्रव्य मिळवावे आणि सर्व सुखोपभोग मिळवून नीतीने जगावे. स्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे.

      Delete
    2. वेदान्त हा सत्य नसून वेद रचणारे निशाचर, धूर्त आहेत. अग्निहोत्र आणि वेदांचे पठण तसेच त्यांतील होमहवन हे उपयुक्त नाहीत. ....

      Delete
  6. प्रिय दिनेश,

    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. ज्या वेदांमुळे वर्णव्यवस्था अस्तित्वात आली, त्या वेदांचे गुणगान गायला आम्ही काही मूर्ख नाही. खरेतर ग्रंथ जितके प्राचीन तितके त्या ग्रंथांमद्धे चुका जास्त असणे क्रमप्राप्त आहे. असले ग्रंथ प्रतिकात्मक जाळण्यास कोणाचाही विरोध असण्याचे काहीही कारण नाही. वेद म्हणजेच भेद हे आता सर्वांनाच माहित झाले आहे. मुठभर लोकांच्या भल्यासाठी संपूर्ण समाजालाच वेठीस धरणे कोणत्याही सुजाण नागरिकाला आवडणार नाही. वेदांच्या आड लपून आमच्या जातभाई लोकांनी किती भयानक गुलामगिरी या देशातील लोकांवर लादली होती, याची परतफेड आम्हाला शंभर वर्षे शिक्षण बंदी करून सुद्धा होणार नाही. आमच्या पूर्वजांनी केलेली पापे भारतीयच नव्हे तर पूर्ण मानव जातीलाच शरमेने मान खाली घालायला लावणारी आहेत. वेदांमद्धे काय लिहून ठेवले आहे, हे इतर समाजातील लोकांना समजायला हवे होते. मात्र यांनी त्यांना वाचायलाच प्रतिबंध केला होता. 'शास्त्रात असे लिहिले आहे' असे म्हणून यांनी इतर समाजाला कायम अंधारात ठेवले आणि विना कष्ट करता, विना मेहनतीचे काम करता इतर समाजाच्या घामावर स्वतःचे हित मात्र साधले. कोणताही नवीन शोध जेंव्हा लागतो तेंव्हा एखाद्या अर्थहीन श्लोकाचा संदर्भ देवून हे अगोदरच वेदांमद्धे लिहिले आहे अशी खोटीच माहिती समाजामद्धे पसरवित असतात. वेदांमद्धे असे काहीही नाही की ज्यामुळे सर्व समाजाचा उत्कर्ष होईल. अशा या वेदांना या जगातूनच हद्दपार केल्यास कोणालाही सोयीर-सूतक वाटण्याचे कारण नाही.

    मंगेश देशपांडे

    ReplyDelete
    Replies
    1. अतिशय वास्तववादी प्रतिक्रिया!!!!!!!
      पूर्ण सत्य!!!!!!
      धर्माच्या तथाकथित ठेकेदारांना जबरदस्त चपराक!!!!!

      निलेश पाटील

      Delete
    2. वेदांकडे चला नको, वेदांपासून दूर व्हा!
      इंग्रजांनी वेदवाङ्मयाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा घाबरलेल्या काही ब्राह्मणांनी वैदिक धर्म परंपरा कशी श्रेष्ठ तसेच वेदांकडे परत जाण्यात समाजाचे कसे भले आहे, असे सांगून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दयानंद सरस्वती, विवेकानंद हे लोक असा भ्रम पसरविण्यात आघाडीवर होते. दयानंद सरस्वतींनी आर्यसमाजाची स्थापना केली, तर विवेकानंदांनी रामकृष्ण मठ स्थापन केला. +वेदांकडे चला+ अशी हाक दयानंदांनी दिली होती. या उपद्व्यापातून फार काही साध्य झाले नाही. आर्यसमाजाचे महत्त्व प्रेमविवाह लावून देण्यापुरते राहिले. गेल्याच महिन्यात खुद्द न्यायालयानेच आर्यसमाजाच्या या विकृत चाळ्यांना चाप लावला आहे. रामकृष्ण मठ वैदिक पुस्तकांचे दुकान होऊन बसला आहे. त्यापलीकडे हा मठ कोणतेही विधायक कार्य करू शकला नाही. आपल्या पंथाला हिंदू धर्मात गृहीत धरले जाऊ नये, यासाठी रामकृष्ण मठाने काही वर्षांपूर्वी न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यावरून वेदाभिमान्यांची निराशा लक्षात येते. वेदांकडे चला ही हाक बंद करून आता वेदांपासून दूर चला अशी नवी हाक देण्याची वेळ आली आहे.

      Delete
  7. आप्पा - नका हो असे भांडू मंगेशबाबू ,
    बाप्पा - अहो असे देशपांडे आणि कुलकर्णी भांडू लागले तर काय गहजब होईल हो !
    आप्पा - अहो हे असं चालायचंच ,आदित्य्रराव , तुम्ही मांडलाय तो मुद्दा अगदी फिट्ट आहे -संजय सरांची सवयच आहे ती ,कोणताही वाद ओढून ताणून एकदा अवैदिक आणि वैदिक असा नेला फरफटत , की मग त्यांना सुखाची झोप लागते ,पण या देशपांडेना काय झालय असं ?
    बाप्पा - किती हजारो वर्षाची जुनी गोष्ट आहे - आज त्याला काही वेटेज आहे का ?आजच्या गोष्टीत रस घेत आपण बोलूया नाहीका ?आणि सगळे ग्रंथ जाळून टाकण्यात काय पुरुषार्थ आहे ?किती कष्ट घ्यावे लागतात एकेक पुरावे आणि संशोधन करायला !जगज्जेता सिकंदर आणि नेपोलियन याना किती प्रेम होते इतिहासावर ! त्यांनी केव्हढी तरी ग्रंथालये उभारली , सर्व जगातून ज्ञान एकत्र केले
    आप्पा - संजय सरांचे कौतुक एकाच गोष्टीचे करावेसे वाटते की ते कधीही जाळून नष्ट करायची भाषा करत नाहीत ,म्हणून ते थोर आहेत आणि नाईलाजाने म्हणावेसे वाटते की देशपांडे साहेब आपण ब्राह्मण असून पुरातन वाग्मय जाळून टाकायच्या गोष्टी करत आहात !निदान वेद म्हणजे काय ते तरी बघा ना !त्या काळात त्या लोकाना सुचलेले असे काहीतरी - त्यांनी त्यांच्या वकुबा प्रमाणे मांडले ! तेच सर्वोत्तम असेल असे नाही - पण त्यातील सर्वच विचार टाकाऊ आहेत का ?
    बाप्पा - देशपांडे सर , आमचा आप्पा म्हणतोय ते पटतंय बर का थोड थोड !
    आप्पा - अहो , मनुष्य प्राणी हा सर्वात जास्त परावलंबी आहे , सर्वात जास्त वेळ घेतो तो स्वतःच्या पायावर उभे रहायला , इतर जनावरे लगेचच हिंडू फिरू लागतात ,पण माणसाचा मेंदू हा सर्वात प्रगल्भ मानला जातो , आणि देशपांडे साहेब तुम्ही असे हिंसा आणि जाळपोळ बद्दल बोलावे हे बरे नव्हे !आपण अभ्यास केला आणि नव्या गोष्टी उभारल्या तर स्वागतच आहे - ते काम आजचे शिक्षण करतेच आहे ,
    बाप्पा - आपली आजी आपल्याला गोष्टी सांगायची , त्याची आठवण झाली की आजही आनंदच होतो नाही का ?पण आपण त्या गोष्टी खऱ्या मानतो का ? कंपनीत बॉस ला त्या कथांचा रेफ़रन्स देऊन आपण आपला मुद्दा खरा करायला गेलो तर आपलेच हसे होईल !तीच गत आज या तथाकथीत अपौरुषेय वाग्मायाची आहे - त्या रचनांचे महत्व संशोधनासाठी आहे , जगण्यासाठी नाही ! हे एकदा समजून घेतले की त्याना जाळायची गरजच उरत नाही !
    आप्पा - कमाल झाली , किती सोपे करून सांगितलेस तू बाप्पा ! - इंद्र आणि इतर देवता यांची युद्धे वाचली की मजा वाटते - केवळ एका पुरुषसूक्ताचा दाखला देत मनुवदाचा विषय नाचवायचा हे हास्यास्पद आहे ! अशी कल्पना केली की तत्वज्ञांनी मंडळीनी त्या काळात त्यांना कळलेला मानवी जीवनाचा उलगडा त्यांनी मांडलेला आहे , तर मग सर्व मजेदार वाटू लागते -
    बाप्पा - हीच गोष्ट सर्व धर्माना लागू पडते -खरे तर आज सर्व धर्म कालबाह्य झाले आहेत -
    अहो देशपांडे , कोण आजकाल संध्या करत नाही की वैश्वदेव करत नाही की जानवे घालत नाही आणि त्यामुळे त्यांची नोकरीही जात नाही किंवा घातले म्हणून प्रमोशन मिळत नाही
    आप्पा - सनातन धर्म म्हणून आज ज्याचा प्रचार चालतो त्याचा आपण विरोध केलाच पाहिजे ,जेवताना चित्रावती घालणे - अहो लग्नात बुफे घेताना जर प्रत्येक जण चित्रावती घालत बसले तर ?
    बाप्पा - पण एकाएकी त्या काळात सर्व संतांनी राम कृष्णाच्या लढवय्या रुपाची आळवणी सोडून विठ्ठलाची आराधना आणि आळवणी का सुरु केली हे न उलगडणारे कोडेच आहे !
    आप्पा - समाजाच्या निराशेला - पराभूत मनोवृत्तीला दिलेला हा आधार तर नाही ना ?
    बाप्पा - आणि आजचा वारकरी म्हणतो की गोहत्याबंदी करा नाहीतर एकादशीला मुख्य मंत्र्याला पूजा करून देणार नाही ?हि हिंसा आणि माज नाही का ?
    आप्पा - देशपांडे कुलकर्णी बोला आता !
    बाप्पा - संजय सोनावणी सर , ते अवैदिक वगैरे जरा बाजूला ठेवा आणि या वारकरी लोकांची घमेंडखोर भाषा चालली आहे त्यांना जाब विचारा !

    ReplyDelete
  8. विषयाला थोडंसं लांब ...सोनवणी सर, डाॅ. आंबेडकरांच्या 'विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाची मूर्ती आहे...' ह्या तर्काविषयी आपले काय मत आहे ...ह्या मुद्द्यावर जास्त काही वाचावयास मिळत नाही...

    ReplyDelete
  9. Ekdahi sant chokhamela mhnun ullekh nahi ya lekhat. Ani purna varkaryana ji panchshilesarkhi pach vachane ghyayala lavatat he Kay shaiv dharmane baudha dharmapasun usne ghetala ahe?

    ReplyDelete
  10. काय आहे हे आप्पा बाप्पा प्रकरण? बोगस नावाने लिहून विनाकारण दुसऱ्यांच्या विचार मंथनात तोंड खुपसत असतो, तशी याची ही जुनीच खोड आहे. ह्या ब्लॉग वरती वेगवेगळ्या नावाने हाच टिप्पण्या लिहित असतो. उगाचच फापट पसारा लिहित असतो. कधी सोनावनींवर तुटून पडतो तर कधी लाचार होऊन कौतुक करीत असतो. "एक ना धड भाराभर चिंध्या" अशी याची अवस्था आहे, काय करायचे वाचनच कमी. हुशार असल्याच्या अविर्भावात लिहित असतो मात्र ज्ञानच कमी असल्याने उगीचच तोंडघशी पडत असतो. अशा ह्या माणसाच्या बिनडोक टिप्पण्याना लोक प्रतिक्रिया देणार नाही अशी अपेक्षा बाळगूया!!!

    अरुण जोशी.

    ReplyDelete
    Replies
    1. आप्पा- मला एक सांगा अरुण जोशी सर ,आम्ही काय सांगत आहोत ?तर संजय सर बेरजेच्या अंगाने मांडणी करतात त्याचे उलट कौतुक करतोय ! आणि देशपांडे कुलकर्णीना भांडू नका असे सांगतोय
      बाप्पा - कधीही जाळा - तोडा ,फोडा असे सुचवत नाही
      आप्पा - आम्ही लाचार कधी झालो ? आणि कशासाठी ?अहो जोशी साहेब , आपल्याला आनंद मिळतो ,चार गोष्टी शिकायला मिळतात म्हणून लिहायचे आणि संजय सारखा मुलगा आपल्या विचाराना मान देतो म्हणून लिहायचे ,नाहीतर कोण आणि कशाला लिहील?
      बाप्पा - आपण आपली नावे वापरून लिहितो त्याला टोपण म्हणणे म्हणजे विनोदी वाटते !
      आम्ही अजिबात हुशार नाही , जेमतेम पास अशी आमची कीर्ती,म्यारेथोन मध्ये "आणि हेही धावले "इतकेच काय ते आमचं रेकोर्ड !आम्ही चक्क ढ आहोत म्हणा ना -
      अप्पा - संजय सर आम्हाला टीका करून बोलतील त्या दिवशी पासून आम्ही लिहिणे बंद करू हे नक्की !
      आम्हाला प्रतिक्रियांची भूक नाही - पण मुलांनी नित मार्गाने जावे असे वाटते आम्ही या सर्व तरुणाईला आमचीच मुले मानतो आणि प्रेमाच्या हक्काने काही सांगत असतो - त्यांना बहकवत तर नक्कीचनसतो
      आपली मुले लांब काळाच्या पडद्यामागे गेल्यावर किती यातना होतात - ती वेळ शत्रूवरही न येवो !
      बाप्पा - , अरे आप्पा - आपली अडचण होते आहे संजय सराना , आता आपण इथून जाऊ या !आपण म्हणजे विनाकारण अडगळ झालो आहोत - हेच खरे !

      Delete
    2. sanjay sar ,
      aappaa aani bappaa he bhau bhau aahet ka mitr ? tyanchya ashlil chavat goshti band karaa aani tyanchi nirbhatsana kara haa aamachaa aadesh aahe
      THIS IS AN ORDER AND YOY MUST FOLLOW IT OTHERWISE WE WILL **** YOU

      Delete
    3. दोन म्हातारे काहीतरी लिहितात आणि सोनवणी साहेब त्यांना मुक्तद्वार असल्यासारखे लिहायला परवानगी देतात हे अगदीच चुकीचे होते आहे
      आप्पा आणि बाप्पा यांचे बारसे झाले त्या वेळचे नाव काय होते - ते त्यांनी गहाण टाकले काय ? का जात पंचायतीने त्यांच्यावर बंदी घातली म्हणून नवीन नावाने आता परत प्रकट झाले ?यांचे आईबाप कोण ?

      Delete
  11. १. वेद हा एक मंत्रांचा म्हणजेच ऋचा किंवा स्त्रोत्रांचा संग्रहा आहे. या ऋचांचे उच्चार करतात त्यांना “ऋषी” म्हणतात.

    २. मंत्र म्हणजे इंद्र, वरूण, अग्नि, सोम ईशान, प्रजापति, ब्रम्ह, महिर्ध्दि, यम इत्यादी देवतांचा केवळ धावा करणार्‍या प्रार्थना होत.

    ३. धावा म्हणजे शत्रूविरुध्द साहाय्य करण्यासाठी, धनप्राप्तीसाठी भक्ताकडून अन्न, मांस आणि मद्य यांचा नैवेद्य स्वीकारण्यासाची विनंती करण्यासाठी केलेली प्रार्थना होय.

    ४. वेदामध्ये फारसे तत्वज्ञान नाही. परंतु असे काही वैदिक ऋषी होते की, ज्यांनी तात्विक स्वरुपाच्या काही कल्पना मांडल्या होत्या.

    ५. (१) अघमर्षण, (२)प्रजापति परमेष्ठि, (३) ब्रम्हणस्पति किंवा बृहस्पति, (४) अनिल, (५) दीर्घतमा, (६) नारायण, (७) हिरण्यगर्भ आणि (८)विश्वकर्मा, हे ते ऋषी होत.

    ६. या वैदिक तत्ववेत्यांपुढील मुख्य समस्या पुढीलप्रमाणे होत्या. जग उत्पन्न कसे झाले? वस्तूची निर्मिती कोणत्या पध्दतीने करण्यात आली? त्यांचे ऎक्य व अतित्व का आहे? निर्मिती कशी झाली आणि कुणाच्या आज्ञेने झाली? जग कशापासून निर्माण झाले आणि ते कुठे जाणार आहे?

    ७. अघमर्षण म्हणतो की, जग तपसपासून (उष्णतेपासून) निर्माण झाले. हे निर्मितीक्षम तत्व होय. त्यापासून अनाद्यनंत असा नियम आणि सतय याचा जन्म झाला. यांच्यापासून रात्र(तमस) उत्पन्न झाली. तमाने पाणी निर्माण केले आणि पाण्यापासून काळाची उत्पत्ती झाली. काळाने चंद्र आणि सूर्य, स्वर्ग आणि पृथ्वी, आकाश आणि प्रकाश यांना जन्म दिला आणि दिवस व रात्र यांची व्यवस्था निर्माणा केली.

    ८. ब्रम्हस्पतीने “असत” पासून “सत” ची उत्पत्ती होते असा सिध्दांत गृहीत धरला. त्याने “असत” या शब्दाचा अर्थ अनादि अनंत असा सांगितला. सत हे मुलत: असतपासून उत्पन्न झाले. जे जे सत(अस्तित्वात असलेले) आहे, आणि जे जे शक्य आहे आणि तरीही असत (अस्तित्वात नसलेले) आहे, त्या सर्वाचा असत हा मूलाधार आहे.

    ९. प्रजापति परमेष्ठीने असतपासून सत निर्माण झाले काय? या प्रश्नापासून सुरुवात केली. त्याचे म्हणने असे की, या प्रश्नाचा प्रस्तुत विषयांशी संबंध नाही. त्यांच्या मते अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंच मूळ पाणी होय. त्यांच्या मते मूळ पदार्थ जे पाणी ते सत आणि असत यांच्या व्याख्येत बसत नाही.

    १०. परमेष्ठीने जडत्व आणि चेतना यांत भेद केला नाही. त्याच्या मते पाणी एका स्वाभाविक तत्वापासून स्वत:चे रुपांतर विशिष्ट वस्तूमध्ये करुन घेणे. य तत्वाला “काम” किंवा “वैश्विक इच्छा” असे नाव त्याने दिले.

    ReplyDelete
  12. ११. अनिल हा आणखी एक वैदिक तत्ववेत्ता होता. त्याच्या मते वायू हे मूलतत्व होय. त्याच्यात स्वाभाविक चैतन्यशक्ति असते. त्याच्यात निर्मितीतत्व निसर्गत:च असते.

    १२. दीर्घतम याने सांगितले की, सर्व प्राणिमात्र शेवटी सूर्यावर अवलंबून असतात. स्वत:च्या स्वाभाविक सामर्थ्याचा आधार असलेला आणि त्यावरच हालचाल करणारा सूर्य पुढेमागे सरकत असतो.

    १३. सूर्य करड्या रंगाच्या पदार्थाचा बनलेला असतो आणि विद्युत व अग्नी ही देखील त्याप्रमाणेच बनलेली असतात.

    १४. सूर्य, विद्युत व अग्नी हे पदार्थ पाण्याचे बीज होत. पाणी हे वनस्पतीचे बीज होय. याप्रमाणे दीर्घतम याचे विचार होते.

    १५. नारायणाच्या मतानुसार पुरुष(परमेश्वर) हे पहिले जगत्कारण होय. सूर्य, चंद्र, पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, अंतरिक्ष, आकाश, क्षेत्र, ऋतू, पक्षी, सर्व पशू, मानवाच्या सर्व जाती आणि सर्व मानवी संस्था यांची उत्पत्ती पुरुषांपासूनचन होते.

    १६. तात्विकदृष्ट्या हिरण्यगर्भ हा परमेष्ठी आणि नारायण यांच्या मध्यभागी होता. हिरणयगर्भ म्हणजे सुवर्णगर्भ(बीज). या विश्वाच्या महान शक्तीतूनच इतर सर्व शक्तींची आणि ऎहिक व पारलौकिक जीवांची उत्पत्ती झाली.

    १७. हिरण्यगर्भ म्हणजे अग्नी. सौरतत्व नावाचे या विश्वाच्या उत्पत्तीचे तत्त्व अग्नीपासून बनले आहे.

    १८. अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तूंचा मूल पदार्थ पाणी होय, असे गृहीत धरणे आणि मग त्याच्यावर चैतन्य शक्तीचा आरोप करुन त्यापासून हे सर्व जग निर्माण झाले असा निष्कर्ष काढणे या गोष्टी विश्वकर्म्याच्या दृष्टीने अगदी अपुर्‍या आणि असमाधानकारक होत. रुपांतराचे तत्व अंगभूत असलेले पाणी हा जर मूळ पदार्थ असेल तर पाणी अस्तित्वात कसे आले आणि त्याने आपल्यातील चैतन्यशक्ती निर्मितीतत्व, भौतिक सामर्थ नियम आणि इतर सर्व गोष्टी कशापासून अस्तित्वात आल्या हा प्रश्न आपल्यापुढे शिल्लक राहतोच.

    १९. विश्वकर्म्याचे मत असे होते की, परमेश्वर हीच चैतन्यशक्ती होय. परमेश्वर हाच प्रारंभी असतो. आणि परमेश्वर हाच अंतीही असतो. तो दृश्य विश्वाच्या पूर्वी पासून आहे. सर्व वैश्विक शक्ती अस्तित्वात येण्यापूर्वी तो अस्तित्वात होता. ज्याने हे विश्व निर्माण केले आणि कार्यान्वित केले तो एकमेव परमेश्वरच होय. परमेश्वर एक आहे आणि एकमेव आहे. तो अज(जन्म नसलेला) आहे, आणि अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्यातच वास करीत असतात. तो सर्वज्ञ आणि सर्वशक्तीमान असा आहे. तो निर्माता आणि संहारकर्ता आहे. जनक म्हणून त्याने आपल्याला उत्पन्न केले, आणि संहारक या नात्याने अस्तित्वातील सर्व वस्तूंचे भवितव्य त्याला माहीत आहे.

    ReplyDelete
  13. २०. सर्वच वैदिक ऋषी आदरणीय नाहीत. फक्त दहा वैदिक ऋषींनाच अति प्राचीन आणि मंत्रांचे खरेखुरे जनक होते.

    २१. परंतु नैतिक पातळी उंचावणारे असे मंत्रामध्ये काहीही आढळत नाही.

    २२. म्हणूनच वेद हे ओसाड वाळावंटाप्रमाणे निरुपयोगी आहेत.

    २३. म्हणून ज्यापासून काही शिकता येईल असे मंत्रात काही नसल्यामुळे मंत्र बाजूला सारले.

    २४. त्याचप्रमाणे वैदिक ऋषींच्या तत्वज्ञानात काहीही आढळले नाही. सत्य प्राप्त करुन घेण्यासाठी ते चाचपडत होते. परंतु ते त्या सत्याप्रत पोचले नाहीत.

    २५. त्यांचे सिध्दांत म्हणजे तर्कशास्त्रांचा किंवा वस्तूस्थितीचा आधार नसलेल्या केवळ कल्पना होत्या. तत्वज्ञानत त्यांनी जी भर घातली तिच्यामुळे कोणतीही सामाजिक मूल्ये निर्माण झाली नाहीत.

    २६. म्हणून वैदिक ऋषींचे तत्वज्ञानही निरुपयोगी म्हणून ते अमान्य केले.

    ------------------------------------------------------------------------------------------------------------

    ReplyDelete
  14. वेदांबद्दल अतिशय उत्कृष्ट माहिती वरील टिप्पणी तून मिळाली, धन्यवाद!

    विवेक शर्मा

    ReplyDelete
  15. "जन्म गेला उष्टे खाता, लाज न येई तुमच्या चित्ता" असा खडा सवाल देवाला संत चोखामेळा यांनीच केला होता!

    अनंत देटे

    ReplyDelete
  16. संत चोखामेळा यांचा जन्म इ.स.१३३८ साली पंढरपूरला झाला.जातीने हरिजन असलेल्या चोखामेळा यांचा धर्ममार्तंडांनी खुप छळ केला.त्यांना मंदिरात यावयास बंदी घातली.'शुद्ध चोखामेळा करे नामाचा सोहळा'असे म्हणून ते आपल्या शुद्धत्वाची ग्वाही देऊन,देहभाव नष्ट झाल्याचे सांगतात.संत सोयराबाई या त्यांच्या पत्नी होत.संत चोखामेळाच्या मृत्यूनंतरही त्यांच्या हाडातून विठ्ठल नामाचा गजर ऐकू होता असे सांगतात.पंढरपुरला विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी आहे.

    ReplyDelete
  17. जोहार मायबाप जोहार ।
    तुमच्या महाराचा मी महार ॥१॥

    बहु भुकेला झालो ।
    तुमच्या उष्ट्यासाठी आलो ॥२॥

    बहु केली आस ।
    तुमच्या दासाचा मी दास ॥३॥

    चोखा म्हणे पाटी ।
    आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ॥४॥

    ReplyDelete
  18. श्री संत चोखामेळा

    संत चोखामेळा हे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन होते. त्यांची बायको सोयराबाई, बहीण निर्मलाबाई व मुलगा कर्ममेळा असे सर्व कुटूंब विठठल भक्त होते. त्यांनी पुष्कळ अभंग लिहीले असून ते प्रसिध्द आहेत. त्यांनी विवेक दिप म्हणून एक ग्रंथ लिहीला आहे. मंगळवेढे येथे किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखोबाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखोबारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी म्हणून जी पायरी दाखविली जाते त्या पायरीसमोर वद्य त्रयादशी रोजी नेऊन ठेविल्या. मंगळवेढे येथे त्यांची पुण्यतिथी वद्य पंचमीस होते व पंढरपूरी वद्य त्रयोदशीस होते. त्या समाधी स्थानावर श्री राजे निंबाळकर फलटण यांनी चांगली घुमटी बांधली आहे. मंगळवेढे येथे त्यांच्या निधनाच्या जागे वर एक शोभिवंत घुमटी बांधावी अशी सुचना ना. बाळासाहेब खेर यांनी मंगळवेढयास आल्यावेळी केली होती. त्याप्रमाणे श्री. संत चोखामेळा स्मारक समिती म्हणून एक समिती स्थापन होऊन त्या समितीने निम्मी वर्गणी जमविली व सरकारांतून निम्मी वर्गणी मिळाली. व एक चांगले सुशोभित स्मारक त्याठिकाणी झाले आहे. या घुमटीचे उदघाटन श्रीमंत राजेसाहेब सांगली यांनी ता १४/०३/१९६० रोजी केले आहे.

    श्रीसंत चोखोबाच्या अस्थि घेऊन जातान श्रीसंत नामदेव महाराज यांनी मंगळवेढ्यापासून दोन मैलावर व १० मैलावर विसावा घेतला त्या ठिकाणी लोकांनी पादुका स्थापन केल्या असून पंढरपूरास चालत जाताना त्या विसाव्यापाशी थांबून पादुकांचे दर्शन घेण्याचे वारकरी व इतर वारकरी व इतर मंडळीची पध्दत आहे. श्रीसंत चोखोबा महाराज यांचे चरित्र लिहिलेल अभंग गाथा प्रसिध्द आहे.

    ऊस डॊंगापरी । रस नोहे डोंगा ।
    काय भुललासी । वरलीया रंगा ।
    चोखा डोंगापरी । भाव नाही डोंगा ।
    काय भुललासी । वरलीया सॊंगा ।
    चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके १२०० साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती. शके १२६० ला मंगळवेढ्यातील वेशीच्या पुर्वेकडील तटाची भिंत कोसळली होती. व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपूरी आला. आणि त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आला. याचा पुरावा अभंगातून चोखोबांनी व्यक्त केला आहे.

    मंगळवेढ्याभॊवती कुसू बांधावया । महाराशी बोलावण्या दूत आले ।
    महारा समागमे चोखामेळा आला । काम ही लागला करावया ॥

    असा पुरावा चोखॊबाच्या अभंगगाथ्यात आहे. सदैव विठ्ठल नामात ते दंग असायचे. चोखोबांना नेहमी हीन कामे करावी लागायची. एखादे अवघड काम चोखोबांना होईना त्यावेळी स्वत: पांडूरंग ते काम आवडीने करायचे.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...