Friday, July 18, 2014

"वैदिक" चाळे...?


 
एक पत्रकार व वादग्रस्त (अ)योगगुरू रामदेवबाबा यांचे सहकारी वेदप्रताप वैदिक यांनी आपल्या पाकिस्तान भेटीदरम्यान स्थानिक पत्रकाराच्या मदतीने मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मूख्य सूत्रधार हाफीज सईद याची २ जुलैला भेट घेतली. ही भेट सईद व वैदिक यांनी नाकारलेली नाही. या भेटीमुळे भारतात वादळ उठणे स्वाभाविक होते. २६/११ च्या जखमा अजुनही ओल्या असतांना, या हल्ल्यामागील सुत्रधारांना जेरबंद करण्याच्या अथवा पाकिस्तानात घुसून ठार मारण्याच्या वल्गना वैदिकवादी एकीकडे करत असतांना वेदप्रताप वैदिक यांनी खुद्द सईदचीच भेट घ्यावी व काश्मिरसंबंधातही अत्यंत स्फोटक विधान करावे याचा अर्थ नीट समजावून घ्यावा लागणार आहे. मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत केवढे अंतर आहे हेही या निमित्ताने लोकांनी समजावून घावे लागणार आहे. भाजपाच्या मागील कार्यकालात कंदाहार प्रकरण झाले होते व मौलाना अजहर मसूद सहित तीन अतिरेकी खुद्द तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या बंदोबस्तात कंदाहारला मूक्त करण्यात आले होते हेही या निमित्ताने प्रकर्षाने आठवते. दहशतवाद्यांशी लढ्याबाबत भाजपा व तिच्या मातृसंस्था तोंडी कितीही उग्रवादी भाषा वापरत असले तरी त्यांची कृती मात्र विपरित असल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत भाजपचेच समर्थक पत्रकार जेंव्हा भारताला मोस्ट वांटेड असलेल्या हाफीज सईदला भेटतो तेंव्हा प्रश्नचिन्ह उठणे स्वाभाविक आहे.

हाफीज सईद कोण आहे?

लष्कर ए तय्यबा या सध्या जगभर बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेची समाजसेवी शाखा म्हणजे जमात-उद-दवा. या संघटनेची पाकिस्तानात अनेक धर्मादाय इस्पितळे आहेत. काही शाळाही ही संघटना चालवते. वरकरणी समाजसेवी बुरखा पांघरल्यामुळे जगभरातून या संघटनेकडे देणग्यांचा पूर वाहत असतो. वरकरणी समाजसेवा हा या संघटनेचा उद्देश दिसत असला तरी तरुण दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कृतीकार्यक्रम आखणे व अंमलातही आनणे ही कामे ही संघटना करत असते. या संघटनेचे अनेक दहशतवादी प्रसिक्षण केंद्रे पाकव्याप्त काश्मिरमधील मुजप्फराबाद या भागात आहेत. २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सहभागी कसाबसहित सहभागी तरुणांना प्रशिक्षण याच भागातील तळांवर दिले गेले. तेथुनच त्यांना मुंबईला समुद्रमार्गे रवाना करण्यात आले. २६/११ चा आतंक कोणीही भारतीय विसरू शकत नाही.

हाफीज सईद हा या संघटनेचा प्रमूख आहे. २६/११ च्या गुन्ह्यातील तो मुख्य सूत्रधार व आरोपी असून भारताने त्याला ताब्यात देण्याची मागणी पाकिस्तानकडे नोंदवली आहे. पण अद्याप तरी पाकिस्तानने त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत.सईद हा स्वत: अत्यंत बंदोबस्ताने व पुरेसे गुपित पाळून रहात असतो. एका पत्रकाराने "हाफीज सईदला भेटायला आवडेल का?" असे विचारल्यावरून आपण होकार दिला व पत्रकाराने फोन करुन भेट ठरवून दिली असा दावा भारतात परतल्यावर वैदिक यांनी केला आहे. वैदिक यांचे कार्य फक्त पत्रकारितेपुरते मर्यादित असते तरी अशी भेट सहजी कोणी घालून देवू शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.

वेदप्रताप हे बाबा रामदेवांचे निकटचे सहकारी मानले जातात. पाकिस्तानात ते सईदला मोदींचा दूत म्हणुन भेटल्याची चर्चा माध्यमांत व राजकीय वर्तुळांत आहे. त्य्यामुळे ही भेट निखळ पत्रकार म्हनून जर वैदिक यांनी घेतली असती तर त्या भेटीचा वृत्तांत त्यांनी लगेच प्रसिद्ध केला असता. पण तसे घडलेले नाही. त्यामुळे ही एका पत्रकाराने स्वतंत्रपणे घेतलेली भेट आहे या दाव्यात कितपत तथ्य असेल? या भेटीत सईद यांनी आपल्याला ते मोदींना शत्रु मानत नसून आपण दहशतवादी नसल्याचे व आपल्या विरुद्ध अपप्रचार केला जात असल्याचे सांगितले असे म्हटले आहे.

मोदी समर्थकांच्या दृष्टीने ही भेट म्हणजे "मोदी-कावा" असून सईदला धडा शिकवण्याच्या रणनीतीचा एक भाग असू शकते. मोदीमाहात्म्य ज्यांच्या डोक्यात खुपच गेले आहे आणि मोदी म्हणजे कुटील बुद्धीमत्तेचे धनी आहेत या विश्वासाच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांना एक प्रश्न पडायला हवा तो हा कि अशी भेट झाली म्हणजे सईदला पकडायची अथवा ठार मारण्याची दिशा कशी मिळेल? विघातक दहशतवादी कारवायांची आखणी करून जो त्यांना अंजाम देवू शकतो, ज्याचे जगभर शत्रू आहेत तो माणूस आजवर जर सुरक्षित राहू शकतो तो एका पत्रकाराला भेट दिल्यानंतरही स्वत:ची सुरक्षितता राखु शकणार नाही काय?

ही भेट का घेतली? ही शिळोप्याच्या गप्पा मारायला झालेली भेट निस्चित नव्हती हे शेंबडे पोरही सांगू शकेल. त्या भेटीत खरोखर काय चर्चा झाली हे स्वत: सईद किंवा वैदिक सांगत नाही तोवर कदाचित आपल्याला समजणारही नाही. प्रश्न असा आहे कि भारताच्या शत्रू क्रमांक एकला वैदिक यांनी भेटावे काय? वर म्हटल्याप्रमाणे एक पत्रकार म्हणून तो अधिकार त्यांना नक्कीच आहे. परंतू ते मोदींचे प्रतिनिधी म्हणून भेटले असतील तर मात्र अत्यंत गांभिर्याने या प्रकाराकडे पाहिले पाहिजे. ते जर सईद यांच्या मनात भारत वा मोदी यांच्याबदल काय चालले आहे हे जानण्यासाठी भेटले असतील तर त्याला मुर्खपणा या सदरात न टाकता देशद्रोह या सदरात टाकून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, कारण भारतीय न्यायालयांनी एकदा निर्नय दिल्यानंतर त्यात उठाठेव करण्याचा अधिकार कोणत्याही नागरिकाला नाही.

खरे तर प्रधानमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहोळ्याच्या वेळीसच पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांना जी विशेष वागणूक दिली गेली व कलम ३७० ची चर्चा ज्या वेगाने उठवली गेली व त्याच्या शंभरपट वेगाने दाबून टाकली गेली तेंव्हाच या प्रकरणात काहीतरी शिजते आहे याची कल्पना यायला हवी होती. 

काश्मिर आणि वैदिकांचे तारे!

वैदिकांनी हाफीज सईदचे भेट घेतली हे भेटीच्या पुरेशा तपशिलाच्या अभावात दिर्लक्षीत करता येईल. परंतू काश्मीरबाबत आपली जी भुमिका पाकिस्तानात डान न्युज (Dawn News)  वाहिनीवर मुलाखत देतांना वैदिक यांनी मांडली आहे ती जास्त विघातक, विभाजनवादी आणि पाकधार्जिनी आहे.

वैदिक यांच्या मताप्रमाणे व्याप्त काश्मिर आणि सध्याचा भारताचा भाग असलेला काश्मिर यांतील जनतेने एकत्र यावे व स्वतंत्र राष्ट्र म्हणून स्वातंत्र्य उपभोगावे व त्याला पाकिस्तान आणि भारताने सहाय्य द्यावे. स्वतंत्र काश्मिरी, त्यांचे उद्योग आणि वैभव यामुळे सध्याचा काश्मिर खरोखरच स्वर्ग बनेल. त्यांचे नागरिक इस्लामाबाद-कराचीतील नागरिकांप्रमाणे जसे स्वतंत्र असतील तसेच भारतातील नागरिकांप्रमाणेही स्वतंत्र असतील.

अशा रितीने त्यांनी मुलाखत देतांना काश्मिरच्या स्वतंत्र अस्तित्वाचे तत्वज्ञान मांडले. भारतात आल्यानंतर त्यांनी या मुलाखतीबाबत छेडले असता आपले म्हनने १८० अंशाच्या कोनात बदलले व धादांत खोटे बोलत "मला जी आजादी म्हणायचीय ती माणसाला-नागरिकाला असनारी आजादी" म्हणायचे होते." असे विधान केले. हेही विधान अजब अशासाठी आहे कि काश्मिरमधील (पाकव्याप्त काश्मिर वगळता) पारतंत्र्यात आहेत असे त्यांना म्हनायचे आहे काय?

भाजपच्या मागील कार्यकालाच्या दरम्यान व्याप्त काश्मिर पाकिस्तानला कायमचा देऊन टाकावा आणि सध्याची ताबारेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा मानण्यात यावी असे म्हनायची टूम निघाली होती. पुण्यातही या विषयावर एका काश्मिरी विद्वानाचे व्याख्यान झाले होते. आता वैदिकांच्या मुखातून त्याही पुढची मुक्ताफळे बाहेर पडत आहेत. यातून देशात एक वैचारिक गोंधळ उडवून देण्याचा डाव नाही असे कोण म्हणेल?

वैदिक हे रा. स्व. संघाचे हस्तक आहेत असा आरोप राहूल गांधींनी केला आहे. तसेच वैदिक व हाफीज सईद यांचीही भेट घालून देण्यात पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तालयाने पुढाकार घेतला असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. राजकीय आरोप किती गांभिर्याने घ्यायचे हा प्रश्न असला तरी त्यांचे महत्व कमी होत नाही. मुळात एका बिनीच्या दहशतवाद्याशी शत्रू राष्ट्रातील पत्रकाराची भेट होऊ शकते ती वर म्हटल्याप्रमाणे शिळोप्याच्या गप्पांसाठी नव्हे. या मुलाखतीनंतर जर वैदिक काश्मिरबाबत आपले तारे तोडत असतील तर आधीची सईदबरोबरची भेट ही वेगळ्या दृष्टीकोनातून पहावी लागते तरच या दोन बाबींचा उलगडा होण्यास मदत होऊ शकते.

वैदिक हे हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) विचारसरणीचे आहेत. रा. स्व. संघाशी ते सरळ निगडित् नसले तरी अशा अनेक विद्वानांप्रमाणे ते अप्रत्यक्षरित्या संघाचे काम पुढे नेत असतात. सध्या मोदी आणि संघ यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत हे ज्या पद्धतीने भाजपावर स्वत:चे वर्चस्व बळकट करत नेत संघाचे पंख कापत चालले आहेत त्यावरून दिसून येते. अमित शहांसारख्या वादग्रस्त इसमाला त्यांनी भाजपाची अध्यक्ष नेमण्याची परंपरागत पद्धतही मोडकळीस काढत ज्या पद्धतीने अध्यक्षपदावर आणले ते संघाच्या कर्मठ (बे)शिस्तपद्धतीला साजेशे नाही. संघाचा ३७० चा अजेंडा एका मंत्र्याने जोरात उचलला आणि मोदींच्याच इशा-यासरशी गपगार झाला. मोदींवर मुस्लिमद्वेषाचे आरोप आहेत तसेच गुजरातेतील मुस्लिम कत्तलीचेही आरोप आहेत हे वास्तव आहे. तसेच देशपातळीवर घडवावे असा संघाचा होरा असल्यास आश्चर्य नाही. परंतू मदरसे आणि हाज यात्रेबाबतची मोदी सरकारची भुमिका संघाच्या पचनी कशी पडनार?

त्यामुळे वैदिक हा मोदीचा दूत कि रा, स्व. संघाचा दूत हा प्रश्न आला कि वैदिक संघाचा दूत असून मोदींना ब्यकफुटला नेण्याचे कारस्थान असण्याची शक्यता वाटने स्वाभाविक आहे. संघ परंपरेला ते साजेशे आहे. अनेक घातपातांसाठी संघप्रणित हिंदुत्ववादी दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे सहाय्य घेतल्याचे आरोप आहेत. समझौता एक्स्प्रेस स्फोटांचे उदाहरण बोलके आहे. अशा स्थितीत वैदिकची सईदशी भेट भारतीय उच्चायुक्तालयाने घालून दिली कि दस्तुरखुद्द आयएसआयने हेही तपासले गेले पाहिजे.

वैदिक यांची हाफीज सईदशीची भेट ही पत्रकारितेच्या दृष्टीकोनातून झालेली नाही हे उघड आहे. त्यामागील कुटील डाव काय होते हे आपल्याला कदाचित समजणारही नाही. परंतू काश्मीर स्वतंत्र व्हावा हे आपले मत जाहीरपणे आणि तेही पाकिस्तानात व्यक्त करून त्यांनी देशद्रोह केला आहे. . त्यांच्यावर यथोचित कारवाई व्हायलाच हवी यात शंका नाही. सर्वच विरोधी पक्षांनी (स्वत: मोदींनीही) याबाबत तळाशी जाऊन सत्यशोधन करायला हवे.

पाकिस्तानशी युद्ध हाच पर्याय असा साहसवाद दाखवत सातत्याने प्रचार करना-या संघाची व भाजपाची ही नीति आता म्हणे "मित्रनीति" मद्ध्ये बदलली आहे आणि तिचे स्वागत करा असे त्यांचेच बगलबच्चे सांगत फिरत आहेत हे अजुनच विनोदी आहे. एक तर त्यांनाच "संघनीति" अजून समजलेली नाही किंवा ते उर्वरित भारतियांना मुर्ख समजत आहेत.

(हा लेख ताज्या "कलमनामा" साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे.)



10 comments:

  1. हा आप्पा बाप्पा अजून कसा नाही थिडथिडला ?
    म्हातारे झोपलेले दिसतात - का गारठले ?
    उठ रे म्हप्या !कवळी लाव आणि तुझी बडबड सुरु कर !

    ReplyDelete
  2. आप्पा - संजयला इतकी जर खात्री आहे की वैदॆकने गुम्हा केला आहे तर तो त्याच्यावर
    खटला का नाही भरत ?संजयला असे लोकोपयोगी काम करायला कुणीच रोखणार नाही !
    बाप्पा - अगदी खर बोललास बघ - समजा आपल्या देशाबाबत कुणी गैर विधान केले असेल तर त्या बाबत एक नागरिक म्हणून कोर्टात दाद मागायला काय हरकत आहे - सर्व कामे सरकारनेच करावी ही अपेक्षा का ?त्यासाठी संजय आणि त्याचे मित्र मंडळ पुरेसे आहे !
    आप्पा - चाल तर मग , पठ्ठे संजय राव असे मैदानात या - उगीच चुलीमागे लपून काड्या घालू नका !
    तुमच्या म्हणण्यात तथ्य असेल तर दूधाका दूध और पानॆका पाणी हो जाएगा !
    बाप्पा - वा वा तुला हिंदी पण बोलता येते तर ?अरे त्या संजयला नको छळू , तो सध्या मेंढरे घेऊन आंदोलन करायच्या गडबडीत आहे ,
    आप्पा - कसली गडबड ?
    बाप्पा - अरे धनगरांची रे - त्यानापण आरक्षण नको का ?

    ReplyDelete
  3. प्रिय मित्र
    पूरा लेख पढ़ने के बाद भी समझ में नहीं आता कि आपको शिकायत किससे है. आर एस एस, मोदी या वैदिक से? दुश्मन से बातचीत विश्व कूटनीति का हिस्सा है. जब अमेरिका का पत्रकार ओसामा बिन लादेन का इंटरव्यू ले सकता है, भारत के पत्रकार प्रभाकरन का इंटरव्यु ले सकते है, प्रियंका गाँधी अपने पिता के हत्यारों से मिल सकती है, तो वैदिक के भाजपा समर्थक होने से उनके अधिकार कम कैसे हो जाते है?

    मान लो कि भाजपा अपनी नीति में बदलाव लाने जा रही है, तो इससे भी अभी इतना आक्रोश करने की क्या जरूरत है? यदि दीर्घकाल में भाजपा की नीति से देश को फायदा होता है तो आने वाली नस्लों को सदा के लिए अपनी गलतियों का शिकार बनाए रखने से क्या यह बेहतर नहीं है? कांग्रेस की तो पाकिस्तान को लेकर कोई नीति ही नहीं थी, जिसके परिणाम देश आज तक भुगत रहा है.

    क्या आपने वैदिक का पूरा इंटरव्यू सुना है? अपनी पाकिस्तान यात्रा के दरम्यान स्वयं वैदिक ने वह इंटरव्यू प्रसारित करवाया था. उसमें कहीं भी वे कश्मीर की पूरी आजादी की बात नहीं करते. उलट पाकिस्तान के कश्मीर संबंधी युक्तिवाद की वे पाकिस्तान में उनके चैनल्स पर धज्जियां उड़ा रहे थे. कोई व्यक्ति केवल आर एस एस का दूरस्थ मित्र होने से उसके प्रति इतनी नफरत और गहरी उपेक्षा केवल उस व्यक्ति के प्रति आपकी जानकारी को कम करती है. कृपया वैदिक का इतिहास पता लगाइए. भारतीय भाषाओं का उनसे बड़ा प्रवक्ता आज भी देश में मिलना मुश्किल है.

    भाजपा के लोग बाकी के विचारकों के प्रति क्या रवैया अपनाते रहे है, इससे कृपया वैदिक के प्रति अपना रवैया निश्चित मत कीजिए. इससे केवल बहस का स्तर गिरता है.

    दिनेश शर्मा

    ReplyDelete
    Replies

    1. मित्रवर्य, मैं आप का मोदी एवं भाजपा के प्रति लगाव समझ सकता हुं. जैसा कि आपने कहा गैरों से मिलने में कोई हर्ज नहीं, बतौर पत्रकार तो जरुर मिल सकते हैं...फिर मुलाकात का ब्योरा देना भी उतना ही जरुरी हैं, नहीं तो ऐसी कुटनीतिक मुलाकाते कभी उजाले में नहीं लानी जानी चाहिये. कश्मीर के प्रती पाकिस्तानी टीव्हीपर जोभी उन्होने कहा...मैंने देखा और सुना भी. ऐसी बातें एक भारतीय से अपेक्षीत नहीं हैं. मोदी विदेश जाते ही उनकी अनुपस्थिती में इन बतों का उजागर होना कोई संयोग नहीं लगता.

      Delete
  4. संजय सर ,
    आर्थिक व्यवहार करायला जरी राष्ट्र हि कल्पना सध्या सोयीची असली तरी तिची गरज आहे का ?
    माझ्या मते बाजारीकरणाला ह्या देश कल्पनेचा चांगलाच हातभार लागतो - तसेच धर्म या कल्पनेचे आहे हे आपण बघतो !
    आज धर्म म्हणजे अगदी ढोबळमानाने काय अस्तित्वात आहे ?
    असे कबूल करावे लागते की आपल्या अडचणी सोडवणारी एक घटनाबाह्य अशी सामाजिक सोय अशीच धर्माच्या अस्तित्वाची कबुली द्यावी लागते
    लोकलमध्ये चालणारे जपजाप्य , सरकारी ऑफिसात असणारे गुरुवार शनिवारचे प्रस्थ ,
    असंख्य गंडे ताईत तोडगे आणि महाराज यांनी समाज खुष असतो आणि त्याला भांडवलदारांचा काहीच विरोध नसणार -
    नेमकी तीच गोष्ट राष्ट्र या कल्पनेची सुद्धा आहे आज जगात जितके नैसर्गिक रिसोर्सेस आहेत त्याच ठिकाणी नेमके अमेरिकेचे शिरकाव करण्याचे ध्येय आहे , कारण यापुढे प्रदूषण ग्रस्त आणि प्रदूषणमुक्त अशीच जगाची वाटणी होणार आहे
    जगात लोकसंख्येचा स्फोट फक्त हिंदुस्तान आणि चीन इथेच आहे ते एक महा प्रचंड आकर्षण भांडवलदारी जगाला आहे , भारतात कधीच क्रांती होणार नाही अशी काळजी त्या महासत्ताच घेतील ,चीन भारतावर आक्रमण करणार नाही अशी काळजीही त्या महासत्ताच घेतील
    त्यामुळे आपण टाळकुटे पण करायला काहीच हरकत नाही !
    ऑलिम्पिक मधील आपलं रेकोर्ड अत्यंत केविलवाणे आहे
    सामाजिक आरोग्याचे दिवाळे वाजले आहे
    आपला देश जगवला जात आहे , त्यात आपले कर्तुत्व काहीच नाही मोदी आणि गांधी यांना उगीचच वाटत असते की आपण या देशाला बदलू शकतो - पण या देशात होणारी घुसखोरी आणि
    कोते राजकीय नेतृत्व यामुळे देशाची सर्व प्रगती कसर लागल्या सारखी कुरतडली जाते
    आपण एक कुणीतरी म्हटल्या प्रमाणे आपले अस्तित्व महासत्तांच्या हवाली करून खालच्या मानेने जगणारे प्रजाजन आहोत , आपण जगवले जातोय हे एक भयानक सत्य आहे
    आता हल्ला करून देश जिंकायची गरज संपलेली आहे तो घात्याताला व्यवहार आहे हे महासात्ताना समजते , महासत्ता यापुढे आपले सर्व खनिज लुबाडून घेतील ,आज अरब तेलावर्कुनचा ताबा आहे ?
    पण हे आपण समजून घेत नाही , we have missed the bus !
    वेळ आली की जात धर्म वैदिक अवैदिक , स्पृश्य अस्पृश्य ,शैव वैष्णव हिंदू आणि मुसलमान , आर्य - अनार्य असा वाद घालायला आपल्याला पूर्ण वेळ आणि बळ असते - आपण फक्त इतिहासात रमतो
    आणि आपला इतिहास थोर आहे अशी आपली गोड समजूत आहे
    तिथे आपण कोणत्याही महासत्तेला शरण जात नाही - आणि हीच तर ग्यानबाची मेख आहे !
    पृथ्वीराज घोरपडे

    ReplyDelete
  5. दिनू तू काय "आर. एस. एस.", "भा. ज. पा." व ह्या "प्रतापी वैदिक" चे वकीलपत्र घेतले आहेस काय? ते तरी सांग! भंकस पत्रकार वेद प्रताप वैदिक सारख्या देशद्रोह्याला तसेच त्याची बाजू घेऊन लिहिणाऱ्या दिनूला भारतातून का बरे हाकलून देऊ नये?

    ReplyDelete
  6. लंडनच्या इंडिपेन्डंट दैनिकातील पत्रकार रॉबर्ट फिस्क यांनी १९९६ साली ओसामा बिन लादेनची घेतलेली मुलाखत खूप गाजली होती. 'द ग्रेट वॉर फॉर सिव्हिलायझेशन' या त्यांच्या इराक युद्धावरील महत्त्वाच्या पुस्तकातही त्या मुलाखतीचे अनेक संदर्भ येतात. अर्थात फिस्क हे कितीही थोर पत्रकार असले, तरी ते प्रखर राष्ट्रवादी व असामान्य बुद्धिमत्ता असलेल्या वेदप्रकाश वैदिक यांच्याइतके 'थोर' अजिबातच नाहीत. कारण त्यांनी लादेनची मुलाखत 'इंडिपेन्डंट' या वृत्तपत्रातून तात्काळ वाचकांपर्यंत पोहोचवली. वैदिक यांनी मात्र पाकिस्तानातून परतल्यावर एका हिंदी दैनिकात या दौऱ्याबाबत लिहिलेल्या लेखात २६-११च्या हल्ल्याचा कर्ता करविता हाफीज सईदच्या भेटीचा पुसटसा उल्लेखही केला नाही. रिजनल पीस इन्स्टिट्युट या इस्लामाबादमधील संस्थेच्या आमंत्रणावरून मणिशंकर अय्यर, सलमान खुर्शीद व काही ज्येष्ठ पत्रकार अशी महत्त्वाची मंडळी पाकिस्तानला गेली होती. वैदिकही त्यांच्यात होते. बाकीचे सगळे भारतात परतल्यावरही वैदिक पाकिस्तानातच राहिले आणि त्यांनी हाफीज सईदची सुमारे सत्तर मिनिटे भेट घेतली. ही मुलाखत आपण पत्रकार म्हणून घेतल्याचे वैदिक यांचे म्हणणे आहे. मुलाखतीसाठी त्यांनी टेप रेकॉर्डर वगैरे सोडाच साधी वही-पेनही नेले नव्हते. कारण वैदिक यांची स्मरणशक्ती म्हणे असामान्य आहे. त्यांनी अनेक राष्ट्रप्रमुखांच्या टिपणे न काढता घेतलेल्या मुलाखतींमध्ये एक शब्दही इकडचा तिकडे न झाल्याचाही दावा ते करतात. तर अशा असामान्य स्मरणशक्तीच्या आधारावर घेतलेली ही मुलाखत प्रसिद्ध करण्याचे मात्र त्यांना सोयिस्कर विस्मरण झाले.

    मुख्य मुद्दा हा आहे की, वैदिक ज्या विवेकानंद इंटरनॅशनल फाऊंडेशन या संस्थेचे सदस्य आहेत, त्या संस्थेतील त्यांचे तीन सहकारी हे सध्या पीएमओमध्ये कार्यरत आहेत. त्यातील नृपेंद्र मिश्रा हे प्रधान सचिव, पी. के. मिश्रा हे अतिरिक्त प्रधान सचिव व अजित धोवल हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अशी महत्त्वाची पदे भूषवित आहेत. त्यामुळे हाफीज सईदसारख्या अतिरेक्याची भेट घेण्याचा सल्ला वैदिक यांना त्यांच्या या सहकाऱ्यांनी दिला होता का, असा प्रश्न स्वाभाविकपणे समोर येणारच. यावर वैदिक यांच्याकडे कोणतेही उत्तर नाही. इतरांना प्रखर राष्ट्रवादाचे डोस पाजणारा भारतीय जनता पक्ष या प्रकरणात घेत असलेल्या दुटप्पी भूमिकेवर कुणीही विश्वास ठेवणार नाही. वैदिक-सईद भेट जगासमोर आली कशी याचे तपशील वादग्रस्त आहेत. कारण वैदिक यांनी तर या भेटीचा उल्लेखही टाळला होता. त्यामुळे ही गुप्त भेट सईद किंवा आयएसआयच्या माध्यमातूनच फोडली गेली असावी, असे दिसते. नरेंद्र मोदी पाकिस्तान भेटीवर आल्यास आपण विरोध कराल का, असा प्रश्न वैदिक यांनी आपल्याला विचारल्याचे सईद याने ट्वीट केले आहे. तसेच भारतात किती अतिरेकी विचारांचे लोक राहतात हे वैदिक व आपल्या भेटीमुळे झालेल्या वादावरून लक्षात येते, असेही सईदने म्हटले आहे. मुंबईवरील हल्ल्यात शेकडो निष्पापांचे बळी घेण्याचे कारस्थान रचणाऱ्याकडून मोदींच्या पाक भेटीला हिरवा कंदील मिळविण्याचा घाट वैदिक यांनी कुणाच्या सांगण्यावरून घातला होता, या प्रश्नाचे उत्तर देशातील जनतेला मिळायलाच हवे. या पाक दौऱ्यात काश्मीर स्वतंत्र करण्याचे तारेही वैदिक यांनी तोडले आहेत. याच मुद्द्यावरून अरुंधती रॉय यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवावा अशी मागणी भाजपच्या काही समर्थकांनी केली होती. त्यांनी वैदिक-सईद भेटीचा हिशोब दिला पाहिजे. भाजपचा दुटप्पीपणा यापूर्वीही अनेक प्रकरणातून समोर आला आहे, मात्र देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत असा हलगर्जीपणा अत्यंत धोकादायक ठरू शकतो.

    ReplyDelete
  7. वेडपट वैदिक

    राजकीय आंदोलने करण्याची क्षमताच नसतानाही रामदेवबाबांना आंदोलनांच्या राजकारणात महत्त्व मिळू लागले, त्यास भाजपनेही हातभारच लावला आणि या बाबांचे सल्लागार म्हणवणाऱ्या वेद प्रताप वैदिक यांनी थेट पाकिस्तानात जाऊन हाफिझ सईदची भेट घेतल्यावर पत्रकारासारखे नव्हे, तर शांतिदूतासारखे वागणे आरंभले! याच सईदला भेटणाऱ्या यासिन मलिकवर कारवाईची मागणी काही महिन्यांपूर्वी करणाऱ्या भाजपने आता शांत राहू नये..
    सत्ताकारणाच्या लघू उद्दिष्टांच्या पूर्ततेत भुरटय़ांना महत्त्व दिले गेले की जे होते ते कोणा वेद प्रताप वैदिक नामक पत्रकाराने लष्कर ए तय्यबाचा प्रमुख, मुंबईवरील २६/११ हल्ल्याचा सूत्रधार हाफिझ सईद याची भेट घेतल्याने झाले आहे. हे वेद प्रताप स्वत:स पत्रकार म्हणवतात. अलीकडे या पेशातील मंडळी आपल्या मर्यादा ओलांडून फारच बहकू लागली आहेत. कोणी राज्यसभेसाठी आपली पत्रकारिता कोणा राजकीय पक्षाच्या दावणीला बांधताना दिसतात तर अन्य कोणी राजकीय पक्षाचे वकीलपत्र घेतल्यासारखे सुमार युक्तिवाद करण्यात धन्यता बांधतात. हे वेद प्रताप याच माळेतील मणी म्हणावयास हवेत. फरक इतकाच की अन्यांप्रमाणे या वेद प्रतापाने आपली सेवा राजकीय पक्षांसाठी उपलब्ध करून न देता ती बाबा रामदेव यांच्या चरणी अर्पण केली. भ्रष्टाचार आदी प्रश्नांवर अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल वगैरे महाजनांनी गत सरकारच्या विरोधात आंदोलन छेडल्यावर आणि त्यास उत्तम टीआरपी आहे याची खात्री पटल्यावर तीत बाबा रामदेव या बोगस माणसाने उडी घेतली. भगवी वस्त्रे परिधान करून जगास नैतिकतेचे सल्ले देणाऱ्या या बाबाने स्वत:च्या उद्योगाचा कर लपविल्याचा आरोप आहे. स्विस बँकेतून काळा पैसा आणण्याविषयी निर्बुद्ध बडबड करणाऱ्या या बाबास स्वत: देय असलेला कर मात्र भरावा असे वाटले नाही. त्याच वेळी त्यांच्या भगव्या वस्त्रांवर विश्वास ठेवणाऱ्या अण्णा हजारे वा केजरीवाल यांनाही या बाबाची विश्वासार्हता तपासण्याची गरज वाटली नाही किंवा वाटली असेल तरी त्यांनी ते केले नाही. याचे कारण सरकारविरोधात बोलणारा, भूमिका घेणारा तो सज्जन अशी सोपी मांडणी या मंडळींनी केली होती. म्हणूनच असे अनेक भुरटे अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्या आंदोलनात येऊन मोठे झाले आणि परिणामी त्या आंदोलनाचे नुकसान करून गेले. वेद प्रताप वैदिक हे यांतील बाबा रामदेव यांचे म्हणे सल्लागार.
    contd.......

    ReplyDelete
  8. त्या अर्थाने त्यांची संभावना उपभुरटे अशी करता येईल. बाबास सल्ला देणे, त्यांच्या प्रसिद्धीची कामे पाहाणे किंबहुना इतकेच काय सरकारी कारवाईचा वरवंटा फिरू लागल्यावर पळून जाण्यासाठी बाबास महिला वस्त्रे पुरवणे आदी जबाबदाऱ्या या वेद प्रतापाने अगदी वेदिक परंपरेस जागून पाळल्याचा इतिहास आहे. तेव्हा असे हे महनीय पत्रकार कम सल्लागार कम राष्ट्रहितचिंतक पाकिस्तानात जाऊन हाफिझ सईद यांना भेटल्यामुळे सध्या मोठा गहजब उडालेला आहे. वस्तुत: पत्रकार म्हणवून घेणाऱ्याने कोणास भेटावे अथवा भेटू नये हा काही संसदेत चर्चा वा वादविवाद करावयाचा विषय नाही. तरीही तो या प्रकरणात झाला. विरोधी पक्षीयांनी या मुद्दय़ावर सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले. या पत्रकाराची पुण्याई इतकी की एरवी संसदेत पेंगणाऱ्या राहुल गांधी यांनाही यामुळे तोंडाचा चिकटा घालवण्याची संधी मिळाली. या सगळ्याचे श्रेय सर्वार्थाने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडे जाते.
    याचे कारण बाबा रामदेव या फुटकळ गृहस्थास मोठे केले ते भाजपने. योगासने आणि योगशास्त्राची चर्पटपंजरी हे इतकेच याचे भांडवल. परंतु केवळ भगवी वस्त्रे परिधान करतो आणि सत्ताधारी काँग्रेसच्या विरोधात सोयीस्कररीत्या भूमिका घेण्यास तयार असतो म्हणून भाजपने हे भूत शिरावर घेतले. सत्ताकांक्षेने आंधळा झालेला भाजप त्या काळात सदसद्विवेकबुद्धी गमावून बसला होता. त्यामुळे काँग्रेसविरोधात जो बोलेल तो आपला म्हणत या पक्षानेही अनेक फालतू मंडळींचा गोतावळा जमा केला. त्यातील एक अग्रगण्य म्हणजे बाबा रामदेव. याबाबत भाजपचे भान इतके हरपले की या बाबाची तुलना थेट महात्मा गांधी यांच्याशी करण्यापर्यंत त्या पक्षाचे वकिली अध्वर्यू अरुण जेटली यांची मजल गेली होती. बाबा रामदेव याने जी काही जनजागृती केली त्यामुळे भाजप सत्तेवर येण्यास मदत झाली याबद्दल भाजपने या बाबाचे आभार मानले होते. या भगव्या वस्त्रांकिताचे जनजागरण भाजप नेत्यांना जयप्रकाश नारायण यांच्या कार्याच्या तोडीचे वाटले. एका अर्थाने ही परतफेड होती. निवडणुकीच्या आधी बाबाने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सत्कारात आरती ओवाळली होती. नरेंद्र मोदी हेच भारताचे एकमेव तारणहार आहेत असा संदेश बाबाने या आपल्या आरतीद्वारे दिला होता. तेव्हा आता भाजपस याच आपल्या कृत्याची फळे भोगावी लागत आहेत. या बाबाचा अनुयायी वेद प्रताप पाकिस्तानात जाऊन काहीबाही बरळला असेल तर ते पाप भाजपच्या अंगास चिकटणार हे नि:संशय. इतके दिवस बाबास शिरोधार्य मानून चालल्यानंतर आता अचानक आमचा आणि बाबाचा संबंध नाही, असे भाजपस म्हणता येणार नाही. अलीकडे अनेक पत्रकार पाकिस्तानात जाऊन बिर्याणी पाहुणचार घेतात आणि आल्यानंतर भारत-पाक संबंधांचे गोडवे गाण्यास सुरुवात करतात.
    contd...........

    ReplyDelete
  9. पाकिस्तानातही हेच होते. चार-दोन बोलघेवडे भारतात येऊन तीच पोपटपंची करतात. अशा स्वयंघोषित शांतिदूतांचे हल्ली चांगलेच पेव फुटलेले आहे. फरक इतकाच की काँग्रेसच्या राज्यात हे स्वघोषित शांतिदूत लाल रंगाचे असत. आता ते भगवे असतात. वेद प्रताप अशांपैकीच एक. ते अन्य स्वघोषित शांतिदूताच्या पुढे एक पाऊल गेले आणि थेट हाफिझ सईद यालाच भेटून आले. वास्तविक ते जर प्रामाणिक पत्रकार असते तर त्यांनी या भेटीचे वृत्तांकन केले असते, मुलाखत लिहिली असती. यातील काहीच या वेद प्रताप यांनी केले नाही. ते थेट नेतेगिरीच करू लागले आणि भारत-पाक संबंध सुधारण्याची जबाबदारी जणू आपणावरच आहे असे भासवू लागले. सरकार अडचणीत यायला सुरुवात झाली ती येथून. या वेद प्रतापांचे हे उद्योग वादग्रस्त ठरतील आणि आपल्याला अडचणीत आणतील याचा अंदाजच सरकारला आला नाही. वास्तविक परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ही बाब समजावयास हवी होती. कदाचित ती समजलीही असेल. परंतु यामुळे मोदी सरकार अडचणीत येत असेल तर येऊ दे, आपल्याला काय असा विचार त्यांनी केला नसेलच असे म्हणता येणार नाही. कारण काहीही असो. या प्रश्नावर गदारोळ व्हायच्या आतच सरकारने आपली भूमिका स्पष्टपणे करण्याची गरज होती. ते न झाल्यामुळे बाबा रामदेवास यावर भाष्य करण्याची संधी मिळाली. हाफिझ सईद याच्या हृदयपरिवर्तनासाठी आपल्या या सहकाऱ्याने प्रयत्न केले असा अजब रामदेवी खुलासा बाबाने केला. खरे तर त्यांची ही आध्यात्मिक वृत्ती लक्षात घेता सरकारनेच हृदयपरिवर्तन हे स्वतंत्र खाते तयार करून बाबास त्याचे मंत्री करावे. नाही तरी ते महात्मा गांधी यांच्याइतकेच थोर असल्याचा साक्षात्कार भाजपला झालेला होताच. तेव्हा त्या महात्म्याचे राहिलेले हृदयपरिवर्तनाचे कार्य पूर्ण करण्याची ऐतिहासिक संधी भाजपस मिळू शकेल.
    खरे तर एरवी हे प्रकरण इतके वाढले नसते. परंतु याच हाफिझ सईद याची भेट जेव्हा काश्मीरचा फुटीरतावादी नेता यासिन मलिक याने घेतली, तेव्हा मलिक याच्या अटकेची आणि त्याचे पारपात्र जप्त करण्याची मागणी भाजपने केली होती. ती करणारे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर आता केंद्रात मंत्री आहेत. त्या वेळी मलिक याचे स्थान तुरुंगात आहे असे मानणारे भाजप नेते त्याच पापासाठी आता वेद प्रताप वैदिक यास कसा काय वेगळा न्याय लावणार? तेव्हा झाली तेवढी शोभा पुरे झाली. सरकारने आता तरी या वेडपट वैदिकास आवरावे.End.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...