Thursday, July 17, 2014

पुरोगामी...?

मानवी धारणा या खरेच प्रागतिक असतात काय? अनेकदा स्वत:ला प्रागतिक समजणारे आपल्याच धारणांचे नीट विश्लेषन करू न शकल्याने स्वत:ला प्रागतिक समजत, पुरोगामी समजत प्रतिगामी होत जातात. याचे मूळ कारण म्हणजे प्रतिगामीपणा काय आणि पुरोगामीपणा काय याच्याच व्याख्या त्यांना स्पष्ट नसतात.

शेकडो-हजारो वर्षांपुर्वी अमूक होते तसेच वर्तन, तशीच संस्कृती, तेच ग्रंथ आणि त्यातील तशाच्या तशा मान्यता वर्तमानातही पुजनीय/भजनीय व अंतिम सत्य मानतो व तसे वर्तन वर्तमानातही करायचा प्रयत्न करतो वा तशा भावना/विचार तरी जपत इतरांनीही तसेच वागावे व तसाच विचार करावा असा प्रयत्न करतो तो प्रतिगामी असतो असे आपण मानतो. प्रतिगामीपणाला काळ व समाजाचे वा व्यक्तीचे बंधन नसते. पाच-पन्नास वर्षांपुर्वीचे विचारही जो वरीलप्रमाणेच मानतो तोही तेवढाच प्रतिगामी असतो.

पुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते.

वैदिकांना मी विरोध करतो कारण ते प्रतिगामी आहेत. ते कालबाह्य वर्णव्यवस्था, वैदिक स्तोम, परंपरा-संस्कृत्यांच्या इतिहासातील खोटारडेपणा करत आपले वर्चस्व आजही कसेबसे टिकवायच्या प्रयत्नांत मशगूल असतात. पण वैदिक विचारव्यवस्थेला विरोध करणारे स्वत: विरुद्धार्थाने तेवढेच प्रतिगामी असतात त्याचे काय? वैदिक विषम व्यवस्थेला जे सर्वोपरी मानतात ते त्रैवर्णिक, मग ते आज कोणत्याही जातीचे असोत, ते माझ्या दृष्टीने वैदिक आहेत. जे वैदिक नाहेत तरीही स्वत:ला क्षत्रीय/वैश्य मानतात तेही वैदिकच होत. भले वैदिक धर्मात त्यांचे स्थान धर्मबाह्य का असेना. जे या उच्च-नीचतेच्या अमानवी व अवैज्ञानिक संकल्पनांतून बाहेर पडले आहेत व जन्माधारीत कोणत्याही प्रकारचा जन्मसिद्ध वर्णीक वर्चस्वतावाद आपापल्या आत्म्याला साक्षी ठेवून जे नाकारतात, ते त्यांच्या धर्मातील कोणत्याही वर्णात जन्माला येवोत, त्यांना वैदिक मानण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी मानुही नये.

पण म्हणून अमुक वर्णात अथवा जातीत जन्माला आला म्हणून त्यांचा निरंतर द्वेष करत स्वत:चा नव-वर्चस्वतावाद आणु पाहतात ते कोण आहेत? त्यांना कोण पुरोगामी म्हणेल? ते तर तेवढेच, किंबहुना महा-प्रतिगामी म्हणावे लागतील! मग तेही वैदिक बनायचा प्रयत्न करत आहेत असे नाही कि काय? द्वेष करणा-यांची संस्कृती नेहमीच रसातळाला गेलेली आहे. वैचारिकतेचे खून हे द्वेष्टे नेहमीच पाडत आलेले आहेत. माणसाचाचा खुन परवडला...विचारांचीच हत्या करणारे, विचारांचे गर्भ खुडनारे द्वेष्टे हे कोनत्याही समाजाला विघातकच असतात! पण विचार तर पुढे न्यायचा नाही, त्याच द्वेषाच्या चौकटीत अडकुन रहायचे...

पुरोगामी या संकल्पनेची याहून मोठी कुचेष्टा व विटंबना अजून काय असू शकेल?

16 comments:

  1. अगदीच पटण्यासारखे!

    ReplyDelete
  2. It's funny, same author promote Shaiv Dharma just because he thought it was a very first and ancient one in India. Regardless it has any worth or not.

    ReplyDelete
    Replies
    1. Zen, I do not promote any religion, but I tell what religion Non-Vedic people belong to and what not. There should be no confusion on this.So far no proof indicates that Vedic religion entered India prior to Shaivism. So thats it!

      Delete
    2. Really..? if this is the case I appreciate it.
      But from your posts the impression is you promote it. And that too not because of any worthlessness of teachings or philosophy...but because of oldness...

      Any way...I can see the stories of shiva and parvati also are relatively new if compare with "penis-vagina" worship. Might be those who worship it out of sheer gratitude/fear/or amazement of joy, pleasure, and most importantly reproduction...Later on the religion was created so as god shiv and his stories etc...

      (by the way do you see any relation of putting blood on idol (real meaning of puja) especially on linga with menstruation)

      Delete
    3. Great interpretation, keep it up ZEN.

      Delete
    4. झेन , अभिनंदन . अगदी मोजक्या शब्दात तू संजय सरांची बोलती बंद केली आहेस
      त्यांची वैष्णव पंथाला बदनाम करायची भाषा अत्यंत लाजिरवाणी आहे
      त्यासाठी तू त्याना जो जाब विचारला आहेस त्यात
      तुझा अभाय्स पण दिसतो आणि संजय चा हट्टी पणा सुद्धा !त्यांनी जे एक गारुड रचले आहे त्यापासून ते लांब जाऊ शकत नाहीत हीच खेदाची बाब आहे
      जर संजय देव मनात नाही तर हा उपद्व्याप का करतात ?
      एकीकेडे देव मानायचा नाही आणि दुसरीकडे शैव आणि वैष्णव यांच्यात आधी कोण हे सिद्ध करत बसायचे - हे हास्यास्पद ठरते आहे !

      Delete
  3. सोनवणी,
    हरियाणा मध्ये मोहंजोदाडो-हडप्पा पेक्षा ही प्राचीन शहर सापडले आहे, खोदकाम अजून पूर्ण झालेले नाही. होय अगदी सुरेख सुनियोजित शहर आहे ते, मोहंजोदाडो-हडप्पा पेक्षा ही उत्कृष्ट! समजा तेथे तुमचा तथाकथित देव शिव उर्फ शंकर उर्फ महादेव उर्फ महेश उर्फ रुद्र याचा कसलाही पुरावा सापडला नाही तर तुम्ही काय करणार? आणि होय जर वेगळ्याच चित्र विचित्र अनभिज्ञ मूर्ती सापडल्या तर त्या मुर्तींनाच डोक्यावर घेऊन नाचणार काय?

    ज्ञानेश्वर कुलकर्णी

    ReplyDelete
    Replies
    1. कुलकर्णी, त्या मुर्ती किमान वैदिक नक्कीच नसणार...खात्री बाळगा!

      Delete
    2. सोनवणी,
      त्या मूर्ती वैदिक असणे कदापि शक्य नाही, हे माहित आहे मला. प्रश्न हा आहे की तुम्ही शिवाला कुठपर्यंत कुरवाळत बसणार? तुम्हाला शिवपुराण, महाशिवपुराण हे ग्रंथ आणि त्यामध्ये लिहिलेला फापट-पसारा मान्य आहे काय? तुम्हाला शिव ही कोणी होऊन गेलेली व्यक्ती/महापुरुष/देव की संस्कृती वाटते काय? शिवाची कोणती प्रतिमा तुम्ही तुमच्या मनात साठवून ठेवली आहे? ते तरी एकदा कळूद्या? की उगीचच वैदिकांना बदनाम करण्यासाठी शिवाचा उपयोग करायचा! हे बरोबर नाही!

      ज्ञानेश्वर कुलकर्णी

      Delete
    3. जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म वैदिक धर्माच्या विरोधासाठी निर्माण झाले असा कित्येकांचा समज आहे. पण जैन धर्माचे मूळ सिंधू संस्कृतीत असल्याने तो वैदिक धर्माच्या ही आधी अस्तित्वात होता, आणि सिंधू संकृती ही वैदिकांचा सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदाच्या रचनेच्या आधीपासून अस्तित्वात असल्याने वैदिक धर्माच्या विरोधासाठी जैन धर्माचा जन्म झाला असे म्हणणे चुकीचे ठरते. तीच गोष्ट बौद्ध धर्माची. बौद्ध धर्माची स्थापना गौतम बुद्ध यांनी वैदिक विरोधात केली असे कोणत्याही बौद्ध ग्रंथात, बुद्धचरित्रात लिहिलेले नाही.

      वैदिक धर्मातील यज्ञामध्ये होणारी पशुहिंसा जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मास मान्य नव्हती. त्यामुळे या दोन्ही धर्माच्या आचार्यांनी यज्ञातील पशुहिंसेला प्रचंड विरोध केला. पण याचा अर्थ असा होत नाही की जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातून जन्माला आले.

      जैन आणि बौद्ध हे धर्म वैदिक धर्माच्या विरोधातील बंडातून जन्माला आले असे म्हणणे म्हणजे या दोन्ही धर्माचे मूळ वैदिक धर्मात आहे असे म्हणण्यासारखे आहे. पण वैदिक धर्म अस्तित्वात यायच्या अगोदर पासून या देशात श्रमण परंपरा अस्तित्वात होती आणि जैन आणि बौद्ध हे दोन्ही धर्म त्या श्रमण परंपरेच्या शाखा आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

      जैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी). पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे.

      महावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.

      त्यामुळे जैन आणि बौद्ध धर्म हे वैदिक धर्माच्या विरोधातून तयार झाले असे म्हणणे हे पूर्ण चुकीचे आहे. वैदिकांनी तसे म्हणणे स्वाभाविक आहे, कारण त्यांना त्यातून आपली प्राचीनता दाखवायची असते. पण सध्या अनेक बौद्ध विद्वान देखील वैदिकांच्या या म्हणण्याला उघड किंवा मूक पाठिंबा देत आहेत, ही खेदाची गोष्ट आहे.

      Delete
    4. भारतीय संस्कृती मधील संघर्ष हा अवैदिक विरुद्ध वैदिक किंवा शैव विरुद्ध वैष्णव होता, असे मानणारा एक प्रवाह आहे. मात्र हा संघर्ष तसा नसून श्रमण संस्कृती विरुद्ध ब्राह्मण संस्कृती असण्याची शक्यता जास्त वाटते. श्रमण संस्कृती ही वैदिक संस्कृती पेक्षा खूप-खूप जुनी आहे.

      Delete
  4. पुरोगामी म्हणजे काय?
    विवेकी, बुद्धिवादी विचार करणारे, वैज्ञानिक दृष्टीकोन स्वीकारलेले, देवा-धर्माच्या पलीकडे गेलेले, समतावादी सहजीवन जगणारे, समाजात नैतिकतेने वागणारे, समाजातील अंधश्रद्धांना मुठ-माती देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे, प्रामाणिक लोक!
    गोडसेवादी म्हणजे काय?
    कशाचीही पर्वा न करणारे, धर्मांध विचाराने प्रेरित होऊन, अहिंसक महामानवांना जीवनातून उठविणारे हिंसक, भ्रष्ट बुद्धीचे माथेफिरू लोक!
    सनातनवादी म्हणजे काय?
    देवा-धर्माच्या नावाने सामान्य जणांना फसवून लुबाडणारे, जुनाट खुळचट चालीरीतींना चिटकून बसलेले, वेदांना प्रिय मानणारे, भ्रष्ट मनुस्मृतीचा गौरव करणारे, समाज सुधारणेला बाधा आणणारे, हिंसेला प्रवृत्त करणारे, परधर्मीयांबद्दल आकस निर्माण करणारे, जातीवर्चस्वाचा टेंभा मिरविणारे, प्रसंगी बॉम्ब स्फोट करणारे, तथाकथित धर्मांध लोक!

    सुनील न्यायाधीश.

    ReplyDelete
  5. सिंधू संस्कृती मधील आद्य महागणनायक पशुपती शिव व गणप्रमुख गणपती हे गणव्यवस्थेचे निर्माते होते. गणव्यवस्था म्हणजे लोकशाही पद्धती शिव व पुत्र गणपती हे नागवंशीय होते. नाग हे मूलनिवासी भूमिपुत्रांचे कुलचिन्ह होते. त्यावेळी विविध प्राण्यांची पक्ष्यांची मुखवटे घालण्याची पद्धत होती. गणपतीचे वाहन उंदीर असणे, शिवाच्या गळ्यात नाग असणे, शिवाचे वाहन बैल असणे, गाय असणे हे कृषिप्रधान श्रमण संस्कृतीचे प्रतिक आहे. महागणनायक शिवाकडे त्रिशूळ असणे हे शत्रू आर्यांसोबत संघर्ष करण्यासाठी घेतलेले शस्त्र आहे. संरक्षणासाठी ते उपयोगी होते. व डमरू हे कृषी संस्कृतीशी निगडीत आहे. सिंधू संस्कृतीत गणप्रधान राज्यव्यवस्था होती. गणपती महागणपती हे पद म्हणजे आज जसे लोकशाहीत राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री असे पदे आहेत. तसे गणपती-महागणपती ही पदे सिंधू गणराज्य व्यवस्थेत अस्तित्वात होती. तीच सिंधू घाटीतील गणराज्य व्यवस्था पद्धत तथागत गौतम बुद्धांच्या भिक्खू संघाकडे येते. भिक्खू संघाच्या निर्मिती परंपरा म्हणून सिंधू सभ्यतेतुन आलेली आहे. भिक्खू संघाचे नियम गणराज्य पद्धत आहे. बौद्ध भिक्खुंचे चिवर भगवे असणे, शिवाचा झेंडा भगवा असणे हा सांस्कृतिक वारसा सिंधू संस्कृतीतून वारसा म्हणून तथागत बुद्धाकडे येतो. सारनाथ येथे जो अशोक स्तंभ आहे तो स्तंभ लोकशाहीचे प्रतिक आहे. सम्राट अशोकाने जेथे गौतम बुद्धाचे पहिले प्रवचन झाले होते. जेथे तथागत गौतमाने पंचवर्गीय भिक्खुंना दीक्षा देऊन धम्म व संघाची निर्मिती केली होती. तेथे एक मोठा स्तूप बांधलेला आहे. हुबेहूब तशाच स्तुपाची प्रतिकृती सिंधू घाटीत सापडली. हा सिंधू धर्माचा वसा सम्राट अशोकाने वारसा म्हणून धम्मचक्र प्रवर्तनच्या ठिकाणी स्वीकारला. वर्धमान महावीरांनी सुद्धा गणराज्य पद्धती स्वीकारली होती. भारतात अनेक ठिकाणी तथागत बुद्धांच्या मुर्त्या नागमुद्रेतील आहेत. नागसंरक्षण देतांना आहेत. हा बुद्ध नागवंशीय असण्याचा पुरावा आहे. कर्नाटक येथे हीच नागवंशीय परंपरा महात्मा बसवेश्वर यांनी स्वीकारली. बसवेश्वर हे सुद्धा नागवंशीय होते. शिवलिंग हे स्त्री-पुरुष समानतेचे प्रतिक त्यांनी धारण केले. व सर्वांच्या गळ्यांत इष्टलिंग धारण करून गणराज्याचा स्वीकार केला. अनुभवमंडप ही लोकसंसद स्थापना करण्याचे महान कार्य बसवअण्णा यांनी केले. या सभागृहात सर्व जातींच्या लोकांना शिक्षण, धर्ममंथन करण्याचे अधिकार होते. अनुभवमंडपाचा पहिला मुख्य गणनायक मातंग समाजातील केला. शिवलिंग हे गण-नायक व गणनायिका यांच्या समानतेचे प्रतिक आहे. गण-व्यवस्था प्रजासत्ताक होती म्हणून हे प्रतिक आले. बसवेश्वरांनी अनेक आंतरजातीय विवाह लावले. त्यामुळे सामजिक समता प्रस्थापित झाली. जातीयतेला विरोध झाला. अनुभव मंडप हे लोकशाहीची व्यवस्था असल्यामुळे बसवेश्वरांच्या काळात वैदिक धर्माचे उच्चाटन झाले. ज्या-ज्या विषमता धर्माच्या नावाखाली वैदिकांनी अस्तित्वात आणल्या होत्या त्या सर्व विषमता बसवेश्वरांनी गाडून लिंगायत धर्माची स्थापना केली. विषमतावादी वैदिक धर्माला संपविण्यासाठी त्यांनी लिंगायत धर्मप्रवर्तन केले. महात्मा फुले यांनी सिंधू संस्कृतीतील सविस्तर इतिहास आपल्या गुलामगिरी पुस्तकात दिला आहे. भारताचे पूर्वीचे नाव बलीस्थान होते. पुढे मध्ययुगीन भारतात हीच सिंधू परंपरा किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांनी ग्रहण केली. जगदीश्वर मंदिर हे पशुपती शिवाचे म्हणजे महादेवाचे मंदिर तिथे स्वतः शिवरायांनी शिवलिंगाची स्थापना केली. शिवलिंग हे गण व्यवस्थेचे स्त्री-समानतेचे प्रतिक आहे. त्याची स्थापना शिवरायांनी रायगडावर केली. शिवनेरी येथे शिवमंदिर वसवले. गणराज्याचे प्रवर्तन रायगडावर झाले यातूनच स्वराज्यात सर्व स्त्रियांना शिवरायांनी मानाचे पद दिले. सर्व राज्यकारभार सुपूर्द केला. ही परंपरा सिंधू संस्कृतीमधूनच त्यांना मिळाली. त्यामुळेच त्यांनी एक गडाला सिंधूदुर्ग नाव दिले हिंदूदुर्ग नाही. शिवराज्य हे लोकशाहीचे राज्य होते. शिवरायांनी किल्ले रायगडावर नागाचे शिल्प कोरले. यातून आपण नाग वंशीय आहोत हेच स्वीकारले.

    ReplyDelete
  6. सर्वसंगपरित्याग केलेल्या जैन आणि बौद्घ मुनींना वा भिक्षूंना श्रमण म्हणतात. ‘ जो श्रमतो तो श्रमण ’ किंवा ‘ सम मन ज्याचे आहे, तो समण ( श्रमण )’ असे ‘ श्रमण ’ ह्या शब्दाचे अर्थ लावले जातात. कायाक्लेशात्मक तपाला जैन धर्मात प्राधान्य आहे. उग्र तपश्चर्या करुन श्रमण धर्माचा आदर्श निर्माण करणारे वर्धमान महावीर ह्यांचा ‘ श्रमण-भगवान ’ ( समणे भगवं महावीरे ) असा निर्देश जैन ग्रंथांतून अनेकदा केलेला आढळतो; त्याचप्रमाणे जैनांची श्रमणसंस्था व त्यांचा आचारधर्म ह्यांचीही माहिती मिळते. ह्या आचारधर्मात पाच महावते अतिशय महत्त्वाची आहेत. ती थोडक्यात अशी : (१) शरीरात जीव असेपर्यंत हिंसा न करणे, (२) कोणत्याही प्रकारचे असत्य भाषण न करणे, (३) कोणतीही वस्तू कोणी दिल्याशिवाय न घेणे, (४) कोणत्याही प्रकारे स्त्रीशी संबंध न करणे, (५) कोणत्याही प्रकारचा परिग्रह जवळ न ठेवणे. ही सर्व व्रते मनाने, वाणीने आणि शरीराने पाळावयाची असतात. हे पाच महावतांमध्ये जे करु नये म्हणून सांगितले आहे, ते स्वत: तर करावयाचे नाहीच; पण दुसऱ्याकडूनही करवावयाचे नाही आणि कोणी ते करण्याची संमती मागायला आला, तर ती द्यावयाची नाही. ही पाच महावते म्हणजे श्रमण धर्माचा गाभा समजला जातो. श्रमणांकडून काही आचारभंग झाल्यास त्यांना काय प्रायश्चित्त द्यावे, हे जैन ‘ छेदसूत्रां’त सांगितले आहे.‘ छेद ’ म्हणजे अपराधी.

    नैष्ठिक बह्मचर्य किंवा संन्यास हे मोक्षाचे मुख्य साधन आहे, हा जैनांप्रमाणेच बौद्घांचाही मुख्य सिद्घांत आहे; तथापि बौद्घ धर्माला आत्यंतिक देहदंडाचा, आत्मक्लेशाचा मार्ग मान्य नाही. त्याचप्रमाणे वैदिक काम्यकर्मकांडाचा, सांसारिक सुखांच्या आत्यंतिक उपभोगाचा मार्गही मान्य नाही. ह्या दोन टोकांतील मधला मार्ग - मध्यमा प्रतिपद् - त्याने काढला. सम्यक आचरण करणारा, शांत, दांत, नियत् ब्रह्मचारी व सर्व भूतांच्या बाबतीत दंडत्याग केलेला असा जो असतो, तोच श्रमण, भिक्षू वा ब्राह्मण होय, असे ⇨धम्मपदात म्हटले आहे.

    बौद्घ भिक्षु-भिक्षुणींचे आचारनियम एकत्रित स्वरुपात आणून शिस्तीबद्दल मार्गदर्शन करणे हा बौद्घांच्या ⇨ विनयपिटका चा हेतू होय. विनयपिटक हे बौद्घ संघाचे संविधान मानले जाते. विनयपिटकांच्या ⇨ पातिमोक्ख ह्या महत्त्वपूर्ण भागात भिक्षु-भिक्षुणींकडून घडू शकणाऱ्या अनेक अपराधांचा निर्देश केलेला असून, कोणत्या अपराध्यास कोणते शासन करावे, हेही सांगितले आहे.

    श्रमणसंस्कृती अशी संज्ञाही रुढ आहे. वैदिक काळापासून भारतात यज्ञप्रधान ब्राह्मणी संस्कृतीबरोबरच अहिंसेवर आधारित श्रमणसंस्कृती अस्तित्वात होती, असे वैदिक वाङ्‌मयावरुन दिसते. इंद्रियनिगह, परिग्रह-त्याग, आत्मशुद्घी व अहिंसा या गोष्टींना महत्त्व देणारी ही श्रमणसंस्कृती होती. बौद्घ व जैन हे श्रमणसंस्कृतीचे अनुयायी होत.

    ReplyDelete
  7. Rationalism is a moral philosophy of human well-being in all respects.
    Rationalism propagates secular ethics that has human happiness and dignity at its core. Individual freedom and individual responsibility from which emanates individual freedom is the foundation of this ethics. Rationalist philosophy is distinct from religion and unlike religion, is concerned with the perceptible world only but it does not oppose religion.
    Secular Ethics is founded on the cause-effect relation revealed in the adage, 'Do unto others as you would have them do unto you'. Rationalism proposes to examine all systems and thoughts that hinder worldly well-being of the society. The rational decision taken by the individual on his own is more praiseworthy than the decision taken because of the fear of god or lure of emancipation.

    Society plays a big role in building moral values.
    Older organized religions have emanated from the atmosphere of oppression, exploitation and immorality; new religions that emerged out of such chaos gave the society an alternative moral and orderly arrangement. People were expected to remain moral due to faith in the religion, fear or love of god and lure of emancipation. But again in practice religion became oppressive and exploitative. Society is dynamic; whereas religion being static, the traditional religious values become obsolete. But the custodian of religion warned people that, 'society cannot be sustained without morality and morality without religion. And rational examination of religion will uproot morality altogether. As opposed to this, rationalism advocated a morality of 'greatest good of the largest numbers and fulfilment of natural human urge'. Every individual has the right to take his own decisions but the same right compels him to respect similar right enjoyed by others. A human being has to live and grow in society and finally quit it when his time comes. He knows that he has to accept human values of love, friendship, affection and co-operation that are also for his good and the good of the society. These moral values are evolved from biological instincts during the course of evolution. Moral individuals make a moral society and a moral society alone can nourish individuals' morality. This cause-effect relation is very easy to understand and does not need the support of any spiritual principle. However without a conducive atmosphere it is difficult to build and sustain a moral society. When individuals of 50 families living in a slum, have to fetch water from a single tap, quarrels are inevitable. What is required in such circumstances is not sermons on morality but making enough water and taps available.
    Normative values:
    Values that help decide whether a given social behaviour is right or wrong are normative values or Norms.
    Habituation to normative values leads to slavery; so much so that, no one dares change them even when they put the whole society in danger.
    Those in power have vested interest in upholding normative values. Changing normative values, therefore, leads to far-reaching social reconstruction.
    Although such broad social reconstruction cannot normally happen, an individual can sharpen his common sense and morals and create new values.
    To initiate the process of change, even pointing out defects in the norms and canvassing opposition to them is important. 'No talk without action' should not be a precondition for attempting to bring about any change.
    Rationalism and social change:
    All of us feel the need for changes in the social structure and norms. And many of us also feel helpless and incapable of doing anything in bringing about the necessary changes.
    contnd.........

    ReplyDelete
  8. The danger in this thought is that it discourages individuals and institutions that strive to cause changes with whatever resources and abilities they possess. Moreover some pessimists even go a step further and argue 'if the society is not going to change, whatever efforts you put in, then why shouldn't I help myself a little bit from the chaos?'
    Rationalists believe that the thoughts become a physical force when they catch the imagination of a large number of people simultaneously. What happens when such a thought is constructive and has the force of conviction of all the people, united as one man, is seen in the villages that have received the "Gram Swachhata Award" (Award for the cleanest village). But when such a thought happens to be destructive- e.g. convincing people that bringing down a Masjid and building a temple there, or vice versa, is a problem of utmost priority over all other development problems - it causes communal riots. This means that building a positive social psyche is very important. Even if you are unable to change the polity and economics of the country, you can still lend our hand to building up a positive social psyche.
    Every individual possesses reason - the ability to discern what is good and what is bad; and therefore can, not only avoid succumbing slavishly to normative values but also fight against exploitation, political deception and high handedness, economic swindling and mental slavery, all caused by outdated normative values. A class of such rationalist intellectuals, who may not be in power, can yet create awareness among people. Our constitution has mentioned the responsibilities of individuals. It says every individual will adopt Scientific Temper, Humanism and the Spirit of Reform. Striving to change the outdated normative values is fulfilling this responsibility.
    E.g. the norm regarding women at present is that 'a woman is inferior to man'. When you try to inculcate the new norm of equality of gender, it becomes necessary to articulate it and then try to practice it in your own life. Moreover one has to endeavour to apply the new value to all aspects of women's lives; to political aspect by improving women's representation in Institutions of Local Self Government, legislative assemblies, and parliament; to economic aspect by giving women equal rights in their fathers' or husbands' properties; to educational aspect by providing not only educational opportunities but also hostels and dormitories for women; and to religious aspect by refusing to perform rituals like Kanyadan.
    While trying to bring about this change, one must remember that the present day man with all his intellectual abilities has evolved from animal ancestors. A large part of his brain is nearly the same as that of his predecessors. His neo-cortex- the seat of his intelligence and judgement developed just a few thousand years ago. This period is not enough to create a coherent harmony between these two, old and the new parts of the human brain. Man is not just an intellectual creature; he is emotional too and most of his decisions depend on his emotional brain derived from animal ancestry. But as Bertrand Russell said, "Our life should be inspired by love and guided by knowledge."
    ***********************************************************************************************

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...