Saturday, July 19, 2014

मग माणसाच्या स्वातंत्र्याचे काय?

 एक जग:एक राष्ट्र (५)


राष्ट्रवाद हा पुरातन टोळीवादाचे आधुनिक रूप आहे काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. पुरातन टोळीवाद हा समान उद्दिष्टे, वंश आणि भाषेच्या आधारावर उभारलेला होता. म्हणजे प्रत्येक टोळी स्वतंत्र वंश असेच असे नाही तर समवंशीयांच्याही अनेक टोळ्या बनत असत. समान भाषिक गटांच्याही वेगवेगळ्या टोळ्या असत. मग त्या वेगळ्या का होत? तर उद्दिष्टांतील भिन्नता व टोळीनायकांची सत्ताकांक्षा यामुळे एका टोळीतुन अनेक टोळ्या बाहेर फुटुन निघालेल्या आपल्याला दिसतात. ऋग्वेदाचाच दाखला घेतला तर किमान ४८ टोळ्या नोंदल्या गेलेल्या दिसतात. या टोळ्या समानभाषिक-समान वंशीय व समान प्रदेश  वाटून घेणा-या असल्या तरी त्यांच्यातील वेगळेपण हे त्यांच्या उद्दिष्टांत पहावे लागते. यात राजकीय उद्दिष्टे जशी सामील आहेत तशीच धार्मिक उद्दिष्टेही सामाविष्ट आहेत. ऋग्वेदाची रचना झाली ती मुळच्या भरत टोळीतून फुटुन निघालेल्या तुत्सू नामक टोळीमद्ध्ये. भरत टोळी त्याही पुर्वी पुरु टोळीचा भाग होती. पण तुत्सुंनी सुदासाच्या नेतृत्वाखाली खुद्द पुरू संघाशी युद्ध करुन त्यांना पराजित केले असा ऋग्वैदिक इतिहास सांगतो. या युद्धाचे तत्कालीन कारण धार्मिक स्वरुपाचे होते. (सुदास-शत्रू वैदिक यज्ञधर्मास मानत नव्हते.) असो. यावरून दिसनारी बाब ही कि नवी टोळी बनणे हे आधीच्या टोळीतील राजकीय/धार्मिक महत्वाकांक्षी व्यक्तींच्या भिन्न उद्दिष्टांमुळे होते. शत्रुत्वे जपायला समान भाषा अथवा वंश आडवे येत नाहीत हा पुरातन इतिहास आहे.

म्हणजे उद्दिष्टांनी टोळ्यांना अलग अस्तित्व दिले असे म्हणता येईल. राष्ट्रांना हाच टोळीवाद लागू पडेल काय यावर विचार करायला हवा.

राष्ट्रे ही समान भाषा, इतिहास, परंपरा, धर्म, भौगोलिक आस्था, अन्यजनांशी शत्रुत्वाची वा परकेपणाची भावना, राजकीय समान संकल्पना इत्यादिंचा समुच्चय आहे असे वरकरणी पाहता दिसेल. या बाबी टोळीवादातून वेगळ्या काढता येत नाहीत. असे असले तरी भारतासारख्या राष्ट्राला "राष्ट्र" या संकल्पनेत टोळीवादाला काही प्रमाणात का होईना बगल द्यावी लागते. कारण समान भाषा नाही. समान इतिहास नाही. (जो आहे तो उलट परस्परसंघर्षांचा इतिहास आहे.) समान परंपरा अथवा समान धर्म नाही. संस्कृतीबाबतही तसेच गोंधळ आहेत. म्हणजे सर्वजन पाळतात ती संस्कृती वैदिक कि अवैदिक यावर गेले दीड शतक तरी गंभीर विवाद आहेत. भौगोलिक आस्था ही प्रत्यक्षात स्थानिक पातळीपुरती मर्यादित आहे.

मग हे कोणते राष्ट्र आहे? वास्तव पाहिले तर लक्षात येईल कि हे "राजकीय" राष्ट्र आहे. म्हणजे लोकशाहीप्रणित केंद्रवर्ती सत्ता व तिचे उतरत्या क्रमाने सत्ता विभाजन व कायद्यांची संरचना हा त्याचा पाया असून इतर सारे मुद्दे दुय्यम आहेत. प्रत्यक्षात दुय्यम मुद्देच समाजजीवनावर व्यापक प्रभाव टाकत आहेत हे भारतीय परिप्रेक्षात लक्षात येइल. भारतीय राष्ट्रवाद हा तुलनेने सौम्य असण्याची हीसुद्धा कारणे आहेत. पण आपण हाच प्रकार जगभरच्या सर्व राष्ट्रांत कमी-अधिक प्रमानात, बदलत्या अग्रक्रमांनुसार पाहु शकतो. उदा. चिनी राष्ट्रवाद परंपारिक चिनी तत्वज्ञाने, अमेरिकेचा प्रागतिकतावाद, मार्क्सवाद, माओवाद, वंशवाद आणि परंपरेने साम्राज्यकाळापासून चालत आलेला विस्तारवाद यावर आधारीत आहे. तो इतका बहुविध आणि म्हणुनच गोंधळयुक्त आहे कि ल्युसियन पायसारख्या विश्लेषिका "राष्ट्र म्हणून चीनी व्यक्तीमत्वात ठोसपणाचा अभाव आहे." असे म्हणतात.

राष्ट्रवादी म्हनून जर्मन लोक कितीही कडवे मानले गेले तरी या राष्ट्रवादाचा जन्म खूप अलीकडचा, म्हणजे नेपोलियन च्या युद्द्धोत्तर काळातील आहे. नाझी काळानंतर जर्मनीचे विभाजन झाल्यानंतर "राष्ट्रवाद" हा विषयच लोकांच्या दृष्टीने नकारात्मक बनला. शीतयुद्धाच्या कालात काही प्रमाणात सौम्य राष्ट्रवाद पुन्हा उभा राहिला आणि जर्मनी एकत्रही झाला. द्वितीय महायुद्धपुर्व कालात जर्मन राष्ट्रवाद हा जवळपास काल्पनिक "आर्यन वंश" या संकल्पनेवर उभा करण्यात हिटलरला यश मिळाले. पण त्या यशामागे ढासळलेली अर्थव्यवस्थाही कारण होती. हा राष्ट्रवाद टिकला नाही.

या पार्श्वभुमीवर अमेरिकेचा राष्ट्रवाद पाहिला तर वेगळीच तत्वे सामोरी येतात. हान्स कोहन हा तत्वविद म्हणतो कि अमेरिकन राष्ट्रवाद हा वांशिक नव्हे तर नागरी राष्ट्रवाद असून नागरिकत्व हा त्याचा पाया आहे. त्याला संयुक्त संस्थानांनी संस्थात्मक स्वरुप दिले असून कायदे, नागरिकत्वाच्या संकल्पना आणि अमेरिकेच्या संस्थापकांची संस्कृती या मिळून अमेरिकन राष्ट्रवाद बनतो. अर्थात १९१४ पुर्वी वांशिक भेद हा अमेरिकन राष्ट्रवादातील एक प्रभावी घटक होता.

मुस्लिम राष्ट्रवादही प्रत्येक मुस्लिम राष्ट्रात वेगळ्या पद्धतीने राबवला गेला आहे. त्यावर सविस्तर विवेचन नंतर आपण करू. पण म्हणजे राष्ट्रे खूप आहेत पण प्रत्येक राष्ट्राचा राष्ट्रवाद इतके वेगवेगळे रंग घेऊन आहे कि शेवटी राष्ट्र ही संकल्पनाच अव्याख्येय बनुन जावी.

प्रत्येक राष्ट्र हे राजकीय दृष्ट्या स्वतंत्र रहावे, पर-आक्रमणाचा प्रतिकार करायला सज्ज रहावे, सीमा या सम्रक्षीत तर रहाव्यातच पण जमल्यास त्या विस्तारता याव्यात, देशांतर्गत नागरिकांना विकासाच्या व्यापक संध्या मिळव्यात व आर्थिक विकास दर वृद्धींगत रहावा, कायद्याचे राज्य असावे इत्यादि अपेक्षा प्रत्येक नागरिकाच्या (राष्ट्र कोणतेही असो) आपापल्या राष्ट्राकडून असतात असे आपल्याला दिसते. राष्ट्रवाद केवळ एवढ्याच ऐहिक बाबींपुरता मर्यादित राहत नसून तो धर्म, संस्कृती, भाषा, वंशवाद व आपल्या राष्ट्राची महत्ता इत्यादि अद्रुष्य पातळीवर वावरणा-या बाबींवर अधिक अवलंबून राहतो.

प्रत्यक्षात राष्ट्रांची सार्वभौमता ही आधुनिक काळात गौण बनत चालली आहे हे आपण मागील लेखांत पाहिले. जगातील सर्व राष्ट्रे विरुद्ध एकच राष्ट्र असा वेडेपणा हिटलरनेही केला नाही. याचे महत्वाचे कारण केवळ सामरिक आहे असे नसून सर्वच बाबतीतील परस्परावलंबितता कधी नव्हे एवढी आधुनिक काळात वाढली आहे. संपर्काची साधने जशी विकसीत होत आहेत तसतशी जागतीक सांस्कृतीक सरमिसळीचा वेगही अत्यंत वेगाने वाढला आहे. राष्ट्रा-राष्ट्रांत संघर्ष असला तरी नागरिक मात्र त्या-त्या राष्ट्रांतील संस्कृत्यांतील तत्वांवर (अगदी वस्तुंवरही) बहिष्कार घालतात असे चित्र मात्र आता पुसट होऊ लागले आहे व पुढे ते कदाचित राहणारही नाही.

टोळीवाद ही पुरातन काळातील एक अपरिहार्य मानवी निकड होती. त्यातून गणराज्ये, नगरराज्ये, राज्ये, साम्राज्ये ते राष्ट्रे अशी मजल गेल्या पाच हजार वर्षातील ज्ञात इतिहासाने मारली आहे. सत्तेचे उपजत भान ही मानवी प्रेरणा कालातीत राहिली आहे हेही आपण पाहतो. राजकीय गुलाम्यांविरुद्धचे स्वातंत्र्यलढे आजही जगात कोठे ना कोठे सुरु आहेतच. कोठे ते हिंसक आहेत तर कोठे अहिंसक...पण संघर्ष आहेत हे तर वास्तव आहे. यामुळे वैश्विक व्यवस्था सतत दोलायमान राहत अनिश्चिततेच्या हिंदोळ्यांवर हेलकावत राहते आहे.

राष्ट्रवाद, त्याची कोनतीही राजकीय व्यवस्था असो, प्रिय वाटला तरी त्याच्या प्रिय वाटण्यामागे सुरक्षिततेची आदिम भावना आहे हे तथ्य नाकारता येत नाही. भुमीवर मालकीची भावनाच नाही या काळापासून माणसाने भुमी, जल, आकाशावर मालकीहक्क प्रस्थापित करण्याची मजल गाठलेलीच आहे. प्रत्येक राष्ट्र त्यातील आपापला हिस्सा अधिकारवाणीने, युद्धखोर कृतीने अथवा करारान्वये मिळवायच्या प्रयत्नांत आहे. जगातील सर्वच नागरिक आपापल्या अस्तित्व व भवितव्याच्या प्रश्नाने भेडसावलेलेच आहेत. कधी युद्ध होईल अथवा कधी अचानक दहशतवादी हल्ला होईल हे कोणत्याही राष्ट्रातील नागरिक सांगू शकत नाही. कोठे तणाव अधिक आहे तर कोठे कमी. पण तणाव आहेत हे वास्तव आहे.

यात राष्ट्राचेच स्वातंत्र्य अबाधित नाही तर मग माणसाच्या समग्र स्वातंत्र्याचे काय होणार?

8 comments:

 1. संजय सोनवणी,
  धन्यवाद!
  अप्रतिम लेख.

  विलास खडके, औरंगाबाद.

  ReplyDelete
 2. संजय सर ,
  आर्थिक व्यवहार करायला जरी राष्ट्र हि कल्पना सध्या सोयीची असली तरी तिची गरज आहे का ?
  माझ्या मते बाजारीकरणाला ह्या देश कल्पनेचा चांगलाच हातभार लागतो - तसेच धर्म या कल्पनेचे आहे हे आपण बघतो !
  आज धर्म म्हणजे अगदी ढोबळमानाने काय अस्तित्वात आहे ?
  असे कबूल करावे लागते की आपल्या अडचणी सोडवणारी एक घटनाबाह्य अशी सामाजिक सोय अशीच धर्माच्या अस्तित्वाची कबुली द्यावी लागते
  लोकलमध्ये चालणारे जपजाप्य , सरकारी ऑफिसात असणारे गुरुवार शनिवारचे प्रस्थ ,
  असंख्य गंडे ताईत तोडगे आणि महाराज यांनी समाज खुष असतो आणि त्याला भांडवलदारांचा काहीच विरोध नसणार -
  नेमकी तीच गोष्ट राष्ट्र या कल्पनेची सुद्धा आहे आज जगात जितके नैसर्गिक रिसोर्सेस आहेत त्याच ठिकाणी नेमके अमेरिकेचे शिरकाव करण्याचे ध्येय आहे , कारण यापुढे प्रदूषण ग्रस्त आणि प्रदूषणमुक्त अशीच जगाची वाटणी होणार आहे
  जगात लोकसंख्येचा स्फोट फक्त हिंदुस्तान आणि चीन इथेच आहे ते एक महा प्रचंड आकर्षण भांडवलदारी जगाला आहे , भारतात कधीच क्रांती होणार नाही अशी काळजी त्या महासत्ताच घेतील ,चीन भारतावर आक्रमण करणार नाही अशी काळजीही त्या महासत्ताच घेतील
  त्यामुळे आपण टाळकुटे पण करायला काहीच हरकत नाही !
  ऑलिम्पिक मधील आपलं रेकोर्ड अत्यंत केविलवाणे आहे
  सामाजिक आरोग्याचे दिवाळे वाजले आहे
  आपला देश जगवला जात आहे , त्यात आपले कर्तुत्व काहीच नाही मोदी आणि गांधी यांना उगीचच वाटत असते की आपण या देशाला बदलू शकतो - पण या देशात होणारी घुसखोरी आणि
  कोते राजकीय नेतृत्व यामुळे देशाची सर्व प्रगती कसर लागल्या सारखी कुरतडली जाते
  आपण एक कुणीतरी म्हटल्या प्रमाणे आपले अस्तित्व महासत्तांच्या हवाली करून खालच्या मानेने जगणारे प्रजाजन आहोत , आपण जगवले जातोय हे एक भयानक सत्य आहे
  आता हल्ला करून देश जिंकायची गरज संपलेली आहे तो घात्याताला व्यवहार आहे हे महासात्ताना समजते , महासत्ता यापुढे आपले सर्व खनिज लुबाडून घेतील ,आज अरब तेलावर्कुनचा ताबा आहे ?
  पण हे आपण समजून घेत नाही , we have missed the bus !
  वेळ आली की जात धर्म वैदिक अवैदिक , स्पृश्य अस्पृश्य ,शैव वैष्णव हिंदू आणि मुसलमान , आर्य - अनार्य असा वाद घालायला आपल्याला पूर्ण वेळ आणि बळ असते - आपण फक्त इतिहासात रमतो
  आणि आपला इतिहास थोर आहे अशी आपली गोड समजूत आहे
  तिथे आपण कोणत्याही महासत्तेला शरण जात नाही - आणि हीच तर ग्यानबाची मेख आहे !
  पृथ्वीराज घोरपडे

  ReplyDelete
 3. संजय ,
  हा खरे तर मोदीना अडचणीत आणण्याचा एक डाव आहे ब्रिक च्या परिषदेत अडकलेले असताना अडवानी आणि कंपनी गप्प कशी बसेल ?जिथे जिथे मोदी यांची नाचक्की होईल तिथे तिथे अडवानी घाण करणारच !संघ परिवारालाही मोदी यांना सुखाने राज्य करु द्यायचे नसणार कारण मोदी आणि अमित शहा एकत्र - म्हणजे खतरनाक आहे
  नीट बघता वैदिक हा अत्यंत हिणकस माणूस आहे तो कोणत्याही च्यानेल तर्फे किंवा कोणत्याही वृत्तपत्रा तर्फे तिकडे गेला नव्हता - त्याला पत्रकारितेत काहीही मान नाही किंवा त्याचा दबदबा नाही
  तो म्हणजे एक बुजगावणे आहे
  त्यामुळे त्याला कोर्टात खेचणे हेच योग्य आहे ! किंवा काश्मिरी पंडितांनी या बाबतीत निवेदन देणे उचित ठरेल - कदाचित एका मास्तर प्लान ची ही सुरवात असेल तर ?
  वैदिक चे एक वाक्य विचार करायला मात्र लावते
  समजा -
  काश्मीर स्वतंत्र झाले - भारत आणि पाकिस्तान एकत्र होऊन
  काश्मीर आपापल्या हातातून सोडतील का ?
  एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला जगू देतील का ?
  पण उद्या चीनने तिबेट सारखी घुसखोरी केली आणि आठवड्यात काश्मीर व्यापून टाकले तर -
  तर आपण काय करणार ? नेहरूंसारखे निषेध खलिते ?
  आर के लक्ष्मण ची चीन युद्धाची व्यंगचित्रे आठवत आहेत

  ReplyDelete
 4. मोठमोठी इंग्रजी नावे देत उभ्या राहिलेल्या दलितांच्या संघटनांचे हास्यास्पद वागणे
  आता सर्वांच्याच विनोदाचा आणि करमणुकीचा भाग झाला आहे !
  जे डॉ आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य अर्पित करून उभे केले त्या बद्दल सर्व भारतीयाना नितांत आदर निर्विवाद आहे हे त्रिवार सत्य आहे !डॉ आंबेडकर यांच्यापुढे त्यामुळे ब्राह्मण मराठा आणि इतर सर्व कायम नात्मास्तकच राहतील अशी त्यांची थोरवी आहे!
  पण ,
  त्यानंतर दलित चळवळीत चाललेले राजकारण आणि पडझड यामुळे त्यांचे आपापसातील हेवेदावे आणि गटबाजी यामुळे सर्व चळवळ हा एक प्रचंड विनोदाचा भाग झाला आहे आणि या नेत्यांनी समाजाची सहानुभूती सुद्धा घालवली आहे
  हीच अवस्था नित पाहिले तर अनेक चळवळींची झालेली दिसते ,
  माथाडी कामगार चळवळ असो , मिल मजदूर संघटना असोत , रेल्वे असो किंवा एसटी असो ,
  सहकार चळवळ म्हणा , किंवा समाजवादी चळवळ म्हणा , आज एका विचित्र परिस्थिती झाली आहे त्याला जबाबदार कोण ?

  ReplyDelete
 5. आप्पा बाप्पा संधिसाधू लोकांची उत्तम चेष्टा करतात आणि त्यांना उघडे पाडतात ,उपहास आणि अतिशयोक्ती यांचा योग्य वापर करत ते विषयातले मर्म सांगतात या बद्दल त्यांचे अभिनंदन केले पाहिजे
  हा विषय अतिशय नाजूक आहे
  कारण सर्व मराठी बंधू भगिनीना संत तुकाराम हा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अभिमानाचा विषय वाटतो ब्राह्मण मराठा आणि इतर सर्व जाती सर्वांनाच तुकोबा आपले वाटतात आणि अशा वेळी ३०० ४०० वर्षापुर्वीच्या दंतकथा जागवून त्याला इतिहास असा शिक्का मारत आत्ताच्या द्वेषमुलक जाती संघर्षाला खतपाणी घालायची खेळी कोण करत असेल हे सांगायची गरज नाही !
  हे असे का घडते ? याच्या मागे " असे द्वेष पसरवणे साधून आपण आपली सत्ता टिकवू शकू " असा सिद्धांतच आहे हे उघड आहे हा एकमेव सर्व्हैव्हल = तगण्याचा तोडगा फार भयानक आणि सर्वनाश करणारा आहे हे या उद्दाम लोकाना काळातच नाही
  समजा , हे असेच चालू राहिले तर काय होईल ?
  ब्राह्मण चेचले जातील ? संपतील ?ते जरी कोणाचे स्वप्न असेल तरी तसेच कधीही घडणार नाही !
  सर्व जगाचा जरी सर्व्हे केला तरी असे दिसेल की ब्राह्मण हे बौद्धिक क्षेत्रात आघाडीवर आहेत ,अमेरिकेपासून जपान पर्यंत सर्वत्र त्यांनाच मागणी असते , असे का ? तर , त्यांची शिस्त , कामातील उत्साह आणि एकाग्रता आणि परदेशातही आपले अस्तित्व टिकवून त्या त्या देशाशी जुळवून घेण्याची इच्छा यामुळे अत्यंत कुशाग्र आणि तरल ,म्हणून त्याना अग्रक्रमाने मागणी असते हे विचार करण्यासारखे आहे !
  त्याना कायम इथे टीकेचे लक्ष करत हिणवत जर ठेवले जाउन त्यांच्याकडून उत्तम कामगिरीची हुकमी मागणी होणार असेल तर त्याना जगाची द्वारे कायम खुणावत असतात आणि ते जाणारच ! मानाने राहणार !ते जाणे हा तुमचा पराभव आहे आणि त्यांचा उत्तम वापर करून घेणे हे तुमचे कौशल्य आहे
  आज नासा सारख्या संस्थेत त्यांची संख्या पाहिली की धक्का बसतो !आणि अभिमानही वाटतो !
  आज अमेरिका आणि गर्मानी , ब्रिटन ,फ्रान्स इथे संस्कृत शिकवायला आधुनिक जगात आपल्याकडील लोकाना बोलावणे येते !हजारो तंत्रज्ञ लोक आज जगात आपल्या देशाचे नाव उज्वल करत स्वताचीही प्रगती करून घेत आहेत आणि आपण त्याना हिणवतो ,आपल्या इथे उघड उघड देशाची लूट चालली आहे - सर्व प्रकारे ! दगड माती वृक्ष पाणी वाळू खनिजे जे दिसेल आणि असेल ते कवडीमोलाने परदेशाला विकले जात आहे !शेतजमीन कमी होत आहे ,आणि कोणतेही न्सुयोजन नसल्याने देश बकाल होत चालला आहे ! सत्ता स्तानी असलेल्यांना बुद्धिमान लोकांची अडचण होत आहे !म्हणून जातिभेदाचे सूत्र वापरून बुद्धिमान लोकांची पद्धतशीर हकालपट्टी करण्याचे पाशवी राजकारण चालू आहे !गरीब आणखी गरीब आणि श्रीमंत आणखी श्रीमंत होतो आहे आत्महत्या वाढत आहेत घटस्फोट वाढत आहेत बलात्कार वाढत आहेत खून आणि हत्या वाढत आहेत ! स्त्रियांचे शोषण चालू आहे बालके उघड्यावर उपासमारीने नवी व्यसने आणि नवी स्वप्ने यांच्या कात्रीत उपासमारीचे जीवन जगताना काळ्या कामांच्या विळख्यात सापडत आहेत
  चित्र भीषण आहे आणि त्याचे खापर जाइत्चे राजकारण साधून ब्राह्मण वर्गावर फोडले जात आहे !
  हा सर्व एक खेळ आहे तो नियतीचा निश्चितच नाही - तो मानव निर्मित आहे !त्यात ब्राह्मण आणि पददलित दोघेही भरडले जात आहेत !
  "शहाणे करून सोडावे सकळ जन "अशी परंपरेने जबाबदारी असलेल्या वर्गालाच हिणवत देशाबाहेर काढले जाते आहे मग या देशाचे काय होणार ?
  पूर्वी डांगे लिमये एसेम जोशी , दंडवते अशा लोकांनी समतेचे राजकारण चालवले आता समता हा विनोदाचा विषय झाला आहे आणि आठवले सारखे लोक अजूनच स्वतःचे आणि त्यांच्या विचारांचे हसे करून घेत आहेत !

  ReplyDelete
  Replies
  1. अनानिमास ,
   अत्यंत सुंदर आणि सखोल विवेचन आहे
   ब्राह्मणांचे ब्रेन ड्रेनिंग हा बहुजनांचा विजय नसून पराभव आहे , आणि एक प्रकारे संधिसाधू ९६ कुळी धन दांडग्यांचा तात्पुरता विजय आहे
   शेवटी ब्राह्मण आणि अस्पृश्य एकत्र येणार हे निर्विवाद !
   saagarika raut

   Delete
  2. का हो इतके ब्राह्मणांचे कौतुक उतू चाललय ?

   Delete
 6. डॉ दाभोळकराना जेंव्हा प्रस्थापित सनातनी लोकांकडून विचारले जात असे कि आपण हिन्दु लोकांच्याच मागे हात धुवून का लागता - मुसलमान किंवा ख्रिस्ती यांच्यात का नाही जात प्रबोधन करायला ,त्यावेळेस त्यांचे उत्तर फार मार्मिक असे
  फक्त हभप लोक अंधश्रद्धा पसरवतात असे नाही तर आजचा जात पंचायतीचे निकाल पाहाल तर वेड लागायची पाळी येते - अगदी कोवळ्या मुलीला जख्खड म्हाताऱ्या बरोबर जीवन व्यतीत करण्यास फर्मावणारा जात पंचायतीचा आजचा हुकुम कोणी दिला -

  त्याच जातीच्या लोकांनी ना ?

  स्त्रीयांवर होणाऱ्या इतर अत्याचारा इतकाच हा प्रकार हिणकस आहे - तिथे हभप लोकांचे काहीच चालत नाही त्यांची धाव आणि हाव पंचावर जमलेल्या तांदुळा वरच संपते हे पण लक्षात घेतले पाहिजे

  दाभोलकर यांचे आंदोलन आणि ब्राह्मण द्वेष यात फार फरक आहे

  तुमचा ब्राह्मण द्वेष तुमच्या पाशी ठेवा

  त्याने ही प्रागतिक आंदोलने बदनाम करू नका

  तुमचे हसे होत आहे

  ReplyDelete