Sunday, July 20, 2014

राष्ट्रवादाची व्यर्थता!

 एक जग:एक राष्ट्र (६)

राष्ट्रवाद लोकांचे पोट भरू शकत नाही आणि नागरिकांना एकमेकांपासून सुरक्षीतही ठेवू शकत नाही.. राष्ट्रा-राष्ट्रात आपापल्या राष्ट्रांवर तेवढेच प्रेम असणारे आपासात तेवढेच प्रेम करु शकत नाहीत. सांस्कृतिक, भाषिक, वांशिक, धार्मिक (भारतासारख्या देशात जातीयही) संघर्ष थांबत नाहीत. गुन्हेगारी, दहशतवादादि घटना थांबत नाहीत. राष्ट्रा-राष्ट्रांतील (विशेषत: शेजारी राष्ट्रांशी) कसलाच संघर्ष नाही असे राष्ट्र सापडणे अवघड आहे. समाजात राहतांना सामान्य प्रतीची माणसे जसा न्यूनगंड जपतात तसा न्युनगंड छोट्या अथवा दुर्बल राष्ट्रांतही जपला जातोच. असे असुनही राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रासाठी सर्वस्वाचा, प्रसंगी प्राणांचाही त्याग या राष्ट्रवादी मुलतत्वांचा प्रत्येक नागरिकावर मारा होतच असतो. असाच तात्विक मारा धर्मवादी लोक आपापल्या अनुयायांवर करत असतात. अनेकदा धर्म आणि राष्ट्र या दोन भावनांत द्वंद्व उभे ठाकल्याचे दिसते. आर्थिक प्रेरणा, परस्पर शांततामय सहजीवनाच्या प्रेरणांवर या प्रेरणा मात करत असल्याचे आपल्याला अनेक राष्ट्रांतर्गतच्या विध्वंसक व हिंसक घटनांमधून दिसते.

हे संघर्ष अधिकच उग्र होतात अथवा बनवले जातात ते कोणाची वा कोणत्या राजकीय विचारसरणीची सत्ता असावी या प्रश्नाबाबत. जगात सत्तांतरे होतच असतात. अनेक सत्तांतरे रक्तरंजित असल्याचेही आपण पाहतो. सत्तांतरे शांततामय आहेत म्हणून कौतूक करुन घेण्याचे कारण नाही कारण दोन विचारसरण्यांतील संघर्ष सामजिक जीवनाला "एकमय" करत नसून अधिक विखंडने करत जातो. जेवढ्या राजकीय विचारसरण्या तेवढी राष्ट्रे एका राष्ट्रात नांदत असतात असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. अन्य विचारसरण्यांना सत्तेच्या बळावर दडपायचे सौम्य अथवा उग्र कार्य कसे पार पाडले जाते या दोन्हीचा अनुभव भारताने घेतला आहेच. जगाचा अनुभव वेगळा नाही.

मुळात विशिष्ट विचारसरणीचे राष्ट्र असले तर देशाचे अपार हित होईल व मानवी जीवन सुखमय, कल्याणकारी होईल असे दावे राष्ट्रांच्या इतिहासाने पोकळ ठरवले आहेत. साम्यवादी विचारसरणीची कित्त्येक राष्ट्रे कोसळलेली आपण पाहिली आहेत. लोकशाहीवादी म्हनवणारी राष्ट्रे अथवा त्या देशातील काही किंवा बव्हंशी नागरिक हुकुमशाही व्यवस्थेची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भलामन करतांना आपण, अगदी भारतीय संदर्भातही, पाहिले आहेत. त्यामुळे वरकरणी राष्ट्रे जी राजकीय व्यवस्था अवलंबतात त्या राष्ट्रातील नागरिक त्या व्यवस्थेचे सर्वस्वी समर्थक असतातच असे नाही. मानवी स्वातंत्र्याची कल्पना मान्य केली तरी ते स्वातंत्र्य माणसासाठी, व म्हणून समष्टीसाठी हितकारक ठरतेच असे नाही. तसे झाल्याचे चित्र आजही नाही.

मग या सा-यात राष्ट्राचे स्थान काय असते?

राष्ट्र म्हणजे विशिष्ट कायदा, विशिष्ट शासनपद्धती, प्रशासनपद्धती, अर्थव्यवस्था (तीही बदलती) असलेला आणि संरक्षणव्यवस्थेने संरक्षित केलेला एक भौगोलिक तुकडा एवढेच राष्ट्र या संकल्पनेचे प्रत्यक्ष वास्तव स्थान राहते. बाकी इतर सा-या कृत्रीमरित्या जोपासल्या गेलेल्या, जोपासायला भाग पाडल्या गेलेल्या भावना होत.

मनुष्य आदिम होता तेंव्हा जगण्यासाठी, सुरक्षित रहात वंशविस्तार करण्यासाठी टोळीची, राज्यांची आणि नंतर राष्ट्रांची व व्यवस्थेची गरज भासली. त्यात वावगे काहीएक नव्हते. मानव कसा प्रगल्भ होत गेला याचीच ती चिन्हे आहेत. पण जगण्याची कांक्षा ही मानवी
मनाची, स्वभावाची, प्रेरणांची मूलकारण आहे आणि त्यात बदल झालेला नाही. होणार नाहे आणि होऊही नये...पण या सा-यात जगण्याचेही मोल काय राहते?

जगण्याचे मोल देवुनही मनुष्य अनेकदा किमान भावी पिढ्यांसाठी का होईना प्राणांचा त्याग करत राहिला आहे...

कधी योग्य तर कधी अत्यंत चुकीच्या पद्धतीने.

माणसासाठी व्यवस्था येते हे खरे आहे पण ज्याच्यासाठी म्हणून व्यवस्था येते तो माणुसच व्यवस्थेचा अपरिहार्य बळी होत जातो हे आपण दैनंदिन जीवनातही अनुभवत असतो. अमुकच व्यवस्था चांगली हे ठरवायचे खरे तर कोणतेच निकष नाहीत. शेवटी व्यवस्था राबवनारेच व्यवस्थेचे मूल्य निर्धारित करत असतात आणि ती चांगलीच वाटावी यासाठी मानसशात्रीय प्रयोग करत असतात. "चांगले शासन" काय असते हे कोण ठरवते? जगभरचा लोकशाह्या, राजेशाह्या आणि हुकूमशाह्या पाहिल्या तर तेच (सत्ताधारी) चांगल्या शासनाच्या व्याख्या लादत व पटवत सत्तेवर आलेले दिसतात.

लोकांना "पटते" म्हणजे नेमके काय?

पटते कि पटायला भाग पाडले जाते? मनापासून पटले तर नेमके "मनापासून" म्हणजे काय? हे मनच जर "कंडिशंड" केले गेले असेल तर त्या पटन्याला तरी नेमका कोणता अर्थ राहतो? त्यामुळे "मनापासून पटले" हा शब्द एखाद्या दहशतवाद्याला उच्चारणे शोभेल तसेच साळसूद नागरिकांनाही शोभेल. मग हे मनापासून पटलेलेच नंतर कोठे जाते? स्ट्यलिनला सर्वेसर्वा मानत भक्ती करणारेच जेंव्हा त्याचाच पुतळा उखदून फेकतात, सद्दाम हुसेनचाही पुतळा उखदला जातो यातच मानवाचे पटणे हे किती तात्कालिक आणि भावनिक ख-या खोटया लाटांवर हिंदकळनारे अथवा वाहून जाणारे असते यासारख्या घटनांवरून दिसते.

पुन्हा प्रश्न. मग यात राष्ट्रवाद कोठे राहतो?

राष्ट्राचे म्हनून जे भावनिक स्थान असते ते कोठे जाते? परकीय आक्रमणांना आपल्याच देशातील राष्ट्रप्रेमी म्हणवणारे बंडखोर वाट करून देतात अश घटना जर घडत असतील, सत्ता पालटांसाठी परकीय सत्तांची मदत घेत असतील तर त्याला राजकीय मुत्सद्दीपनाच्या भोंगळ व्याख्येत टाकता येत नाही. मुळात राष्ट्रवादच तकलादू आहे एवढेच काय ते अशा घटनांपासून सिद्ध होते.

आणि तरीही राष्ट्रवादाची मोहिनी लोकांवर असते याचे कारण काल्पनिक अथवा प्रत्यक्ष भयांवरचा उतारा म्हणून राष्ट्रवाद कामाला येतो.
आणि म्हणूनच तो लोकांना हवासाही वाटतो. त्यासाठी ते प्रसंगी आर्थिक, शारिरीक आणि पारिवारिक यातना सहन करायला तयार होतात. गंमत म्हणजे धर्मवादही अशाच अवस्थांतून जात असतो.

राष्ट्र सुरक्षा देते, कायद्याचे (प्रसंगी चुकीचे असले तरी) राज्य देते, स्थिर (अनेकदा अस्थिर असली तरी) अर्थव्यवस्था देते, भवितव्याचे (खोटे भ्रमित असले तरी) आमिष दाखवते, जगात आपले राष्ट्र, आपली संस्कृती व परंपरा कशा महान आहेत हे (खोट्या असल्या तरी) गायची संधी देते, आणि महत्वाचे म्हनजे राष्ट्रासाठी त्याग, प्रसंगी प्राणत्यागही करण्याची प्रेरणा देते.

आणि हे लोकांना हवेच असते असे नाही. परक्यांचे राज्य नाही...आमच्याच लोकांचे आहे ही टोळीभावना कथित "स्वातंत्र्य" जपण्यासाठी स्वकियांची गुलामगिरी सहज स्वीकारत असते...प्रसंगी त्याहीविरुद्ध बंड करत असते.

म्हणजे मानवी प्रेरणाच मुळात अस्थिर आहेत असे म्हणता येईल. त्यांना वास्तवाचा स्पर्श कधीच नसतो असेही उग्रवादी विधान करता येईल.

पण त्याची मुळे ही आपल्याच जागतिक व्यवस्थेत दडलेली आहेत याचा आपण कधी विचार करणार?

मुळात राष्ट्रवाद हवा आहे कारण इतर राष्ट्रांचे सह-अस्तित्व आहे म्हणून. नसते तर त्याची कोणतीही गरज अथवा महत्ता अथवा अपरिहार्यता नसती.

तिसरे-चवथे महायुद्ध करत संपुर्ण राष्ट्रेच व त्यासोबत आपण सर्वांनीच संपवून घ्यायचे कि भुतलावरील सर्वच राष्ट्रांचे अखिल मानवजातीने एकमते, स्वहस्ते विसर्जन करत यच्चयावत विश्वात एकुलता एक प्रगल्भ प्राणी म्हनून सध्या ज्ञात असलेल्या मानवजातीचा खरा सन्मान करायचा?

उत्तर आपल्याच हातात आहे!

17 comments:

  1. टिनपाट लेख आहे , अगदीच बोगस !
    काहीच अर्थ नाही - दिनेश शर्मा किंवा आप्पा बाप्पा असल्या लेखांना रिप्लाय देणे शक्यच नाही

    ReplyDelete
  2. आप्पा- काय हो बाप्पा डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या होऊन अकरा महिने उलटून गेले आहेत, अजूनही मारेकरी व सूत्रधार सापडले नाहीत, आता मात्र तपास सी.बी.आई. कडे सोपविला आहे. मात्र तपासात काहीही प्रगती दिसत नाही.

    बाप्पा- कसे सापडतील मारेकरी, हे काम त्यांच्या विरोधकांनी अगदी शांत डोक्याने केलेले आहे.

    आप्पा- ते कसे काय?

    बाप्पा- अहो, विरोधकांनी असे अनेक खून पचविले आहेत. यावेळी त्यांनी मागे अजिबात पुरावा सोडलेला नाही, भोडोत्री मारेकऱ्यांना सुद्धा यांनी मारून टाकले आहे कि काय अशी शंका येते आहे.

    आप्पा- मारेकऱ्यांनी वापरलेली मोटार सायकल सुद्धा पार्टन-पार्ट सुटा करून भंगार वाल्यांना ठराविक कालावधीच्या अंतराने फुकट दिले कि काय अशी सुद्धा शंका येते आहे.

    बाप्पा- तुम्हाला शंका येते आहे, मलातर खात्रीच वाटते आहे.

    आप्पा- पण पोलिस काय करीत आहेत?

    बाप्पा- ते बिचारे तपासाची दिशा शोधत असतील !

    आप्पा- आणि सरकार?

    बाप्पा- सरकारने तर खून पचविला आहे आणि वरून ढेकरही देत आहे.

    आप्पा- म्हणजे या मागे सरकारचे कारस्थान सुद्धा असू शकते काय?

    बाप्पा- तसे नव्हे, तर सरकारला गुन्हेगार माहित असतील, मात्र ते उघड करण्यास सरकार घाबरत असेल.

    आप्पा- दिल्लीत नवीन सरकार आले आहे. तेही गुन्हेगार शोधाबाबत उदासीनच वाटते आहे. गुन्हेगारांची नावे जाहीर झाल्यास एका मोठ्या वर्गाकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    बाप्पा- कोणता मोठा वर्ग?

    आप्पा - तोच, जो दाभोलकरांना मारण्याची भाषा करीत होता, अंधश्रद्धा विधेयकास बेंबटापासून ओरडून विरोध करीत होता. धर्मच बुडाल्याची भाषा करीत होता. विधेयक हिंदू धर्मा विरुद्ध असल्याचे विष सनातन प्रभात मधून समाजात भिनवत होता.

    बाप्पा- माझे तर स्पष्ट मत असे आहे कि त्या सनातनच्या अभय वर्तकला टायर मद्धे घालून जो पर्यंत पोलिस बडवीत नाहीत तो पर्यंत धागे-दोरे हाती येण्याची सुतराम शक्यता नाही.

    आप्पा- मलाही तसेच वाटते आहे, CBI सूत्रधार आणि हत्याकरणारे यांना शोधून काढते की तेही पुणे पोलीसांसारखे टाळा टाळ करते, हे थोड्या दिवसात समजेलच!
    .................................................................................................................................

    ReplyDelete
  3. हो हो संजय सोनावणी साहेब + आमचा पण हाच प्रश्न आहे - आम्ही तर तुमचे लिखाण वाचून एकदम आनंदात असतो ,किती छान आणि सोपे करून सांगत असता आपण आम्ही नेहमी ठरवतो की एकदाच फ़ायनल ठरवून टाकू आपण कोण ते पण पण बुद्धीच चालत नाही आम्ही शिवरात्र पाळतो ओम नमः शिवाय वर तर आमचा प्रचंड जीवच आहे आम्हाला १२ पैकी ८ ज्योतिर्लिंगाची यात्रा घडली आणि जीवन पवित्र झाले खरोखर आपण किती उत्तम मांडले आहे ,कारण आम्हालाही जाणवते आहे ,आम्ही पण मग नेमके कोण ? आम्हाला दोन्ही देव आवडतात राम कृष्ण हे तर आपण म्हणता त्या प्रमाणे क्षत्रीय पण आम्हाला वंदनीय , पूर्वी मी वाचले होते कि गणपती हा विघ्नकर्ता ,पण आता विघ्नहर्ता झाला आहे , तो पण वंदनीयच !
    सर्वच देव नतमस्तक भावना जागृत करतात, एखादा दर्गा किंवा पीर हा सुद्धा आपलाच वाटू लागतो ,आपल्याकडे खेडेगावातून अनेक ठिकाणी असा अनुभाव येतो ,अगदी ब्राह्मणाच्या घरातून पिराला चादर अर्पण करण्याचा रीतीरिवाज आहे आणि गणपतीची पालखी मुसलमानानी सुद्धा नेण्याचा परंपरागत मान आहे दंगली आणि दंगलीचे राजकारण हा विषयच वेगळा आहे
    तसे पाहिले तर एकही जात किंवा धर्म टाकावू नाही
    सर्व इथल्या मातीत रुजले ,वाढले
    अमेरिकेत काय घडले ,रेड इंडियन काही गोऱ्या लोकाना शिरजोर भारी नव्हते पण त्यांची सरसकट कत्तल झाली ,आपल्याकडे समाज सरमिसळ होताना समाजात सामाजिक नियमभंग झाल्यास फक्त जात पंचायतीकडून जातीबाह्य करत नवी जात निर्माण होत असेल असे वाटते ,त्याला शिक्षा म्हणून रोटी बेटी व्यवहार बंद करत त्याची नवी जात निर्माण करून सोय केली जात असे
    आपल्या राजपूत राजांनी मुसलमान सत्तेला सामोपचारानेच वागवत नेले पण दगाफटका होत त्यांचा पराभव झाला हा इतिहास आहे सत्तेत जरी गमावले तरी हिंदू ,त्याला शैव वैदिक काहीही म्हणा ,हे हिंदूच राहिले आणि बाटलेले मुसलमान आजही जाती त्याच ठेवत मुसलमान झाले हा एक सामाजिक चमत्कारच आहे त्याला काय म्हणायचे त्याला सदासर्वदा उच्च जाती जबाबदार आहेत का ? धर्मच बुडाल्यावर बाटून धर्मबाह्य झाल्यावर ब्राह्मण कसे काय मुसलमानी चांभाराला शिक्षा करेल ? तेच समजत नाही ,तसेच ब्राह्मण आणि क्षत्रीय यांनी त्यावेळेस धाडस दाखवत बाटून धर्म बाह्य झालेल्यांना का परत आपल्या धर्मात घेतले नाही ,राजा जर राजा होता तर त्याने ब्राह्मणाना फटकारत का आपल्या अखत्यारीत मूळ धर्मात शुद्धीकरण करत परत आणले नाही ?
    याचाच एक अर्थ असा निघतो का की जात पंचायती ह्या ब्राह्मण वर्गापेक्षाही जास्त ताकतवान होत्या आणि आजही आहेत ?
    शैव आणि वैदिक हा भाग त्या मानाने दुसऱ्या स्थानावर आहे , परंतु पहिल्या स्थानावर आहे ती जात पंचायत आणि तिथे कुणाचे प्राबल्य आहे तर प्रत्येक जातीच्या म्होरक्याचे !ब्राह्मणांचे अजिबात नाही !राजस्थान , ओरिसा , मध्य प्रदेश , बिहार , युपी महाराष्ट्र इथे आजही त्या जात पंचायती वर कुणालाही , अगदी ब्राह्मणालाही शिरकाव नाही - त्यांच्यापेक्षा ब्राह्मण वर्चस्व गाजवू शकत नाही -
    शैव वैदिक वाद घालण्यापूर्वी हा मुद्दा पण विचार केला जावा
    आणि दाभोलकरांचे खुनी असेच कुठेतरी लपून बसले असणार !

    ReplyDelete
  4. एक गोष्ट तर आरशा सारखी स्वच्छ झाली कि संजय सोनवणी यांच्या हातात सर्व सूत्रे असल्यामुळे असे मधेच आप्पा बाप्पा अवतीर्ण होत आहेत ,
    बघा ना - आप्पा बाप्पा यांच्या गावीही नाही की हे असे टिपण आपण या विचारना उत्तर म्हणून कधी लिहिले - आणि एकदम दाभोलकर यांचा विषय घेत संदर्भ नसताना असे लिखाण येते -
    अरेरे - संजय सोनावणी - तुमची कीव करावी का काय करावे ? तेच तेच संदर्भ हीन लिखाण परत परत आपण का वापरत आहात ?
    तुमची बुद्धि थकली का ?
    फारच हिणकस प्रकार झाला हा !
    अशा चोऱ्या करणे महापाप आहे हो अण्णा !आमच्या धनगराच्या जातीला नाय शोभत !पोटासाठी करत असाल तर मग - चलो माफ कर दिया !
    दुष्काळ आहे याची जाण आहे !

    ReplyDelete
  5. एकुणात लेख म्हणजे एक उत्कृष्ट निबंध आहे त्या बद्दल आपल्या संजय सोनवणी आणि अनानिमास च्या दर्जेदार प्रतिक्रियांचे कौतुक करावे तितके कमीच !
    श्री सागर भंडारे आणि श्री संदीप देशपांडे यांना त्यांच्या उत्कृष्ट प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ,
    आम्ही आमच्या शंका मोकळेपणे सांगत आहोत ,त्यात संजय वर थोडी टीका असणे अपरिहार्य आहे याची सखेद जाणीव आहे !
    आमच्या जागी तुम्ही आहात असे समजून आम्हाला सजून घ्या हि विनंती

    आप्पा = या बाप्पा ,बसा , हे लोक आपलीच वाट बघत असतील
    बाप्पा = ते तोतया आप्पा बाप्पा पण हिंडत असतात
    आप्पा = आपला सागर भंडारे किती मन लाऊन लिहितो
    बाप्पा = संजयने एकेक माणूस लाख मोलाचा जोडला आहे
    आप्पा = तू काय म्हणतो आहेस , मन मोकळ कर अरे आपलीच माणस आहेत सगळी ,
    बाप्पा = मला सगळ समजत नाहीरे , थोडफार समजत असं वाटे पर्यंत संजय सर दुसरा मुद्दा मांडतात , सगळाच गोंधळ उडतो आता हेच बघ ना शैव वैदिक , वेद ४ वर्ण +वर्ग सांगतात आणि सुरवातीला श्रम शक्ती प्रमाणे वर्गवारी झाली आणि पुढेपुढे जन्मावर ती आधारित होत गेली असे सर्व साधारणपणे संजयचे मत आहे आणि याला ब्राह्मण वर्ग जबाबदार आहे अशी या सर्वांची तक्रार आहे - कळल का ?आता माझी शंका अशी आहे की राज्य शकटात राज्य निर्माण करणारा भोगणारा आणि शासन करणारा शासक कोण होता ?ब्राह्मण का क्षत्रिय ?
    आप्पा = आल लक्षात , म्हणजे थोडक्यात म्हणजे तुला म्हणायचंय की राजाला सुपर पॉवर असताना त्याला ब्राह्मणाकडून (?) इतर प्रजेवर होणारा अन्याय दिसत नव्हता का ?असच ना ?
    बाप्पा = तेच ते , आजचे राज्यकर्ते तेच करत आहेत
    आप्पा = फेकून द्या त्या पोथ्या ,अहो आप्पा , इतकी चर्चा इतिहास संशोधक करत नाही शेजवलकर,य दि फडके किंवा सरदेसाई , रा चिं ढेरे उपाय सुचवत ओरडा करत नाहीत , ते इतिहास संशोधन करतात !अभ्यास हे एक व्रत आहे !
    बाप्पा = मग आपले संजय सर काय करतात ?
    आप्पा = ते संशोधन ,प्रतिक्रिया आणि साधक बाधक चर्चेला सामोरे न जाता संशोधनाचे भांडवल करून त्यातून एक चळवळ उभी करू बघतात आणि तिचे टार्गेट ब्राह्मण वर्ग असतो
    बाप्पा = म्हणजे यांचे तथाकथित संशोधन पूर्व ग्रह दुषित असते की काय ?
    आप्पा = तसा संशय तरी येतो आहे !
    बाप्पा = विषमतेच्या लढ्यात आर्थिक गोष्टी आणि धार्मिक गोष्टी यातील काय जबाबदार असते आणि आर्थिक विषमता दूर करताना कोण आड येतो हे तपासणे गरजेचे नाही का + का तिथेपण पळी पंचपात्र घेऊन याना ब्राह्मणाच आडवा येतो असे वाटते ?
    आप्पा = एकुणातच मागे वळून बघताना म फुले यांनासुद्धा असे वाटले नाही कि पाटीलकी + देशमुखी हीच खरेतर गरिबांच्या हाल अपेष्टांना जबाबदार आहे , ते सारखे ब्राह्मणा वरच घसरत असत !
    बाप्पा = आजच्या शासन कर्त्या मराठा वर्गाला हा प्याटर्न सोपा आणि सोयीचा आणि हमखास यश देणारा वाटतो म्हणूनच सगळ्याचे खापर ब्राह्मण वर्गावर फोडायचे सोयीचे संशोधन संजय सारखे तथाकथित इतिहासकार करत असतात
    आप्पा = बाकी कुणीही केले नसेल इतके नथुराम गोडसेने ब्राह्मणांचे अमाप नुकसान केले आहे आणि त्यांना समाजकारणातून बाहेर फेकण्यास तोच जबाबदार आहे !
    बाप्पा = एवढे होऊनही आज ब्राह्मण वर्ग नवनवीन वित्तीय आणि इतर क्षेत्रात रेकोर्ड बनवत जगात आपला ठसा उमटवत आहे
    आप्पा = ते अपरिहार्य आहे , इथे जर अन्याय होत असेल तर रडत बसण्याची त्याब्ची वृत्ती नाही ,ते बाहेर पडून नवी क्षितिजे , नव्या सीमा काबीज करतील
    बाप्पा = या देशाला त्यांची किंमत नसेल तर ते तरी दुसरे काय करणार ?

    ReplyDelete
  6. पूर्णपणे चुकीच्या गृहीतकांवर आधारित हा लेख आहे. जो आदर्शवाद लेखकाने शेवटच्या परिच्छेदात दाखवला आहे, तोच आपण भारतीय लोक आपल्या स्वतःच्या लोकशाहीबद्दल बाळगत नाही अन तिला वाट्टेल त्या मंडळींकडून वाट्टेल तशी राबवून देतो अन घेतो. यात चूक लोकशाही व्यवस्थेची नाही आपली आहे, पण लोक अथवा समाज चुकत असेल हे लेखकाच्या गावीही नाही.
    भौगोलिक तुकडा म्हणजे राष्ट्र नाही तर देश अन या देशाला काही समान विचारांच्या अन संस्कृतींच्या आधारावर एकत्र करणारे तत्व / संकल्पना म्हणजे राष्ट्र, लेखक या संकल्पनेला कृत्रिम मानतो पण समविचारी लोकांनी एकत्र येणे हीच मानवाची सहजप्रवृत्ती आहे.

    ReplyDelete
  7. ब्रिटिश सत्ता भारत देशात असताना एक विचित्र संघर्ष इथे चालला होता. अगदी पेशव्यांच्या पुण्यातील कालखंडापासून त्याला उधान आले होते ! तो म्हणजे वैदिक विरुद्ध अवैदिक ! अर्थात अवैदिक लोक हिन्दू होते ! सनातनी वैदिक धर्मीय लोक स्वतःला अतिशय उच्च दर्जाचे मानत असत आणि इतरांना कनिष्ठ दर्जाचे !
    वास्तविक अठरा पगड़ जाती आणि अलुतेदार , बलुतेदार यांच्या शिवाय या तथाकथित उच्च लोकांचे जगणे शक्यच नव्हते ! म्हणजे जगायचे दुसर्यांच्या जिवावर आणि वर तोंड करूँन म्हणायचे आम्ही श्रेष्ठ ! सनातनी वैदिक लोकांचा हां आत्यंतिक वंशवाद त्यांच्या जिवावर अठराव्या शतकात बेतु लागला ! कारण होते भारतात सामाजिक क्रांतिचे . ही क्रांति आणली गेली महात्मा ज्योतिबा फुले यांच्याकडून ! वैदिक धर्मामधील सती जाणे , आपला पतिचा मृत्यु झाल्यानंतर पत्नीने मुंडन करने आदी भयंकर , अमानवी प्रथा वैदिक धर्मामधे होत्या ! त्याला राजाराममोहन रॉय यांनी विरोध केला आणि त्यानंतर महात्मा फुले यांनी त्याच्याही पुढे जाऊंन सर्व स्त्रियांना शिक्षणाचे द्वार खुले केले ! म्हणजे वैदिक धर्म हां हिंसेवर आणि अमानवी कृत्यांचे समर्थन करणारा धर्म आहे ! तो हिन्दू लोकांचा धर्म कधीही नव्हता आणि नसणार !

    ReplyDelete
    Replies
    1. राजा राम मोहन राय हे वेद विरोधी नव्हते आणि त्यांनी त्यांच्या पंथाचे नाव ब्राह्मो समाज असे ठेवले होते आणि ते इस्ट इंडिया कंपनीचे पगारी नोकर होते

      मराठी म फुले सारख्या वेद विरोधी भूमिका त्यांनी किंवा आर्य समाजाचे दयानंद सरस्वती यांनी घेतल्या नव्हत्या हे विशेष !राजा राम मोहन राय यांचा परिचय ख्रिस्ती धर्मोपदेशक आणि इतर लोकांबरोबर आला तरीही त्यांनी हिंदू धर्म सोडला नाही , सतीची चाल लॉर्ड बेन्तिंग यांनी कायदा करून बंद केली आणि रा रा राय यांनी त्यांचे अभिनंदन केले
      भारतभर नव्या उथ्थानाचा अभ्यास केला तर सर्व साधारणपणे असे दिसते की समाजाच्या प्रगतीला आणि नव्या विचारणा सुद्धा ब्राह्मण सहायभूत ठरलेले आहेत
      रा रा राय हे ब्राह्मण कुलातील होते ,कौतुकाचा भाग - म्हणजे - (खास संजय सोनावणी -साठी )
      रा रा राय यांचे वडील वैष्णव आणि आई शैव पंथाची होती !
      दयानंद सरस्वती हे तर गुजराथी ब्राह्मण होते आणि त्यांनी पंजाबात आर्य समाज लोकप्रिय केला!
      तात्पर्य ब्राह्मण वर्ग हा समतेची जाणीव होणारा वर्ग होता आणि त्यांनी अनेक पंथ स्थापन केले
      सृजनशीलतेचे विचार मांडले
      असाच प्रकार न्या रानडे यानिपन मांडला -
      रा रा राय यांचीतर ३ लागणे झाली होती , तीच गोष्ट न्या रानडे यांची
      कालपरत्वे विचार आचार बदलत गेलेले आपल्याला दिसतात हे त्यातले तात्पर्य आहे
      रोहिदास

      Delete
    2. राजाराम मोहन रॉय आणि दयानंद सरस्वती या दोघांनी जेवढे वैदिक धर्माचे नुकसान केले नसेल तेवढे कोणत्याही समाजातील माणसाने केलेले नाही. याला कोणाचाही विरोध असण्याचे काहीही कारण नाही. ब्राह्मो समाज काय किंवा आर्य समाज काय पूर्णपणे नामशेष झाल्या सारखेच आहेत. यांना उभारी मिळणे केवळ अशक्यच!

      स्वप्नील आगाशे

      Delete
  8. राष्ट्र आणि राष्ट्रभूमी यांना आदर्श मानून त्यांवर निष्ठा ठेवणारी आधुनिक राजकीय विचारप्रणाली व त्यावर आधारलेला ध्येयवाद. एकोणिसाव्या शतकापासून यूरोपच्या इतिहासाला दिशा देणारी एक प्रमुख प्रेरणा म्हणून राष्ट्रवादाचा निर्देश करता येईल. हेच ऐतिहासिक कार्य राष्ट्रवादाने पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात आशिया खंडात आणि दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात आफ्रिका खंडात पार पाडले आहे. एक राजकीय विचारप्रणाली या अर्थाने राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि एकता कायम राखणे, ही स्वयंसिद्ध नैतिक भूमिका होय. राष्ट्रीय स्वयंनिर्णयाच्या म्हणजेच राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या हक्काचा पुरस्कार करणे, हे व्यक्तिस्वातंत्र्याच्या संकल्पनेचे सामूहिक राष्ट्रीय रूप होय. उदारमतवादाचेच हे दोन भिन्न पातळ्यांवरील आविष्कार होत. विकासोन्मुख आणि न्यायाधिष्ठित समाजरचना निर्माण करणे आणि जागतिक शांतता व सहकार्य साध्य करणे, ही उद्दिष्टे साध्य करावयाची असतील, तर व्यक्तिस्वातंत्र्यास पूरक असलेल्या राष्ट्रस्वातंत्र्याचा आग्रह धरावयास हवा, अशी उदारमतवादाची भूमिका आहे. जॉन स्ट्यूअर्ट मिल, जोसेफ मॅझिनी, वुड्रो विल्सन यांनी तिचे सातत्याने समर्थन केले; परंतु दोन महायुद्धांदरम्यानच्या कालखंडात राष्ट्रवादाची अतिरेकी, भ्रष्ट आणि विकृत कल्पना फॅसिझम आणि नाझीवाद यांच्या रूपाने फोफावली. दुसऱ्या महायुद्धात या शक्तींचा बीमोड होऊन राष्ट्रवादाच्या संकल्पनेस लागलेले ग्रहण सुटले व महायुद्धोत्तर काळात आशिया-आफ्रिका खंडात राष्ट्रवादाने एक स्वातंत्र्यवादी आणि पुरोगामी प्रेरणा या भूमिकेतून ऐतिहासिक कार्य बजावले. प्रगत औद्योगिक समाजात राष्ट्रवादी प्रेरणेचा भर काहीसा ओसरला असला, तरी नवजात राष्ट्रांमध्ये मात्र अंतर्गत आणि बाह्य विघटनवादी शक्तींचे आव्हान पेलणारी एक विकासोन्मुख आणि लोकशाहीवादी प्रेरणा, म्हणून राष्ट्रवादाचे ऐतिहासिक कार्य संपलेले नाही.
    c..........

    ReplyDelete
  9. राष्ट्रवाद या संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी विविध दृष्टिकोनांतून तिच्याकडे पाहणे आवश्यक ठरते.

    तत्त्वज्ञानात्मक दृष्टिकोन : तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता राष्ट्रवाद या संकल्पनेचे मूळ कांट (१७२४ – १८०४) या जर्मन तत्त्वज्ञापर्यंत पोहोचते. शाश्वत नीतिमूल्यांच्या निकषांविषयी त्याने असे प्रतिपादन केले, की नीतीचे उगमस्थान प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातच असते. व्यक्तींच्या आशा-आकांक्षांना नैतिक आशय प्राप्त होतो, तो कोणा बाह्य प्रेरणांच्या प्रभावामुळे नव्हे, तर त्या व्यक्तीचा आपल्याच जन्मजात प्रवृत्तींच्या विरोधी जो संघर्ष चालू असतो, त्याचा तो परिपाक असतो. नैतिक अर्थाने प्रत्येक व्यक्ती स्वायत्त असते. व्यक्तींची स्वतःची अनुभूती हीच नीतिमूल्यांची जननी आहे. म्हणून अनुभूती घेण्याचे स्वातंत्र्य हे नैतिक जीवनाचे अधिष्ठान आहे.

    कांटच्या या प्रतिपादनामुळे व्यक्ती ही धर्म आणि समाज यांच्या विघातक बंधनातून तत्त्वतः मुक्त झाली हे खरे; पण या सर्व स्वायत्त व्यक्तींना एकत्र जोडणारा कोणताही तात्त्विक दुवा अस्तित्वात नसेल, तर सुसंघटित आणि अर्थपूर्ण समाजजीवन निर्माण होऊ शकणार नाही. ही गोष्ट राष्ट्र या संकल्पनेमुळे शक्य झाली. व्यक्तिजीवनाची राष्ट्रजीवनाशी सैद्धांतिक सांगड घालण्याचे कार्य योहान फिक्टे (१७६२–१८१४) या दुसऱ्या जर्मन तत्त्वज्ञाने केले. फिक्टेच्या मते मानवी संस्कृती ही आपाततः घडलेली घटना नसून ती एका चिरंतन वैश्विक शक्तीचा आविष्कार होय आणि याच विश्वशक्तीने राष्ट्र हा समूहजीवनाचा मूलाधार म्हणून निश्चित केला आहे. साहजिकच व्यक्तीस समृद्ध नैतिक जीवन जगण्याची संधी आणि स्वातंत्र्य राष्ट्रजीवनाशी तादात्म्य पावल्यानेच प्राप्त होते आणि म्हणून राष्ट्र ही समूहजीवनाची श्रेष्ठतम व स्वयंसिद्ध सीमा आहे. व्यक्तीच्या सर्वोच्च निष्ठांची ती स्वामिनी आहे.

    समाजशास्त्रीय दृष्टिकोन : समाजशास्त्रीय दृष्टिकोनान्वये राष्ट्र हा आधुनिकीकरणाच्या इहवादी प्रभावी प्रेरणांना मिळालेला राजकीय प्रतिसाद आहे. एखाद्या समाजात आधुनिकीकरणाची प्रक्रिया सुरू होते, याचा अर्थ त्या समाजाची पारंपरिक संस्थात्मक बैठक विघटित होऊन सामाजिक एकसंधता नष्ट होते. पारंपरिक समाजामध्ये व्यक्ती आपल्या सामाजिक भूमिका व्यक्तिगत पातळीवरच हाताळीत असतात, समूहजीवनाच्या कक्षा संकुचित असतात. लोकांचे आर्थिक राहणीमान तुटपुंजे असते, तंत्रज्ञानाची पातळी निकृष्ट दर्जाची असते आणि नफ्यासाठी उत्पादन हे समाजमूल्य नसते. अशा समाजात समाजजीवनाचे नियमन करण्यासाठी आवश्यक असलेली अनेकविध कार्ये एकमेकांपासून शास्त्रीय पद्धतीने विलग केलेली नसतात. म्हणून त्यामध्ये वस्तुनिष्ठता नसते. याउलट आधुनिक समाजातील सामाजिक व्यवहार व्यक्तिनिरपेक्ष पातळीवरून हाताळले जातात, कार्यांचे एकमेकांपासून पद्धतशीरपणे आणि काटेकोर विलगीकरण केले जाते, व्यक्तींचे एकमेकांशी संबंध कार्यांच्या संदर्भात ठरतात व म्हणून ते निर्वाणीचे नसतात. आधुनिक समाज हा प्रगत तंत्रज्ञानावर आधारित आणि उद्योगप्रधान असतो.
    c..............

    ReplyDelete
  10. आधुनिकीकरणाच्या या प्रक्रियेत एकमेकांविषयीच्या व्यक्तिगत विश्वासावर आधारित परंपरागत राजकीय संबंध निष्प्रभ होतात व त्यामुळे सामाजिक पोकळी निर्माण होते. परिणामी एकाकीपणा, साशंकता, अस्थिरता आणि असुरक्षितता या भावनांनी सर्व व्यक्ती व्यग्र होतात. त्यांच्या सर्वोच्च निष्ठा ज्याला अर्पण करून निश्चिंत होता येईल, अशा नव्या स्वरूपातील समाजपुरुषाची गरज त्यांना भासू लागते. राष्ट्राच्या रूपाने हा नवा समाजपुरुष त्यांना सामोरा येतो. हा राष्ट्रपुरुष त्यांच्या जीवनास स्थैर्य आणि शाश्वती देतो. राष्ट्र या संकल्पनेचे एक प्रमुख सामाजिक मानसशास्त्रीय स्पष्टीकरण असे आहे.

    वसाहतवाद आणि राष्ट्रवाद : काही मार्क्सवादी अभ्यासकांच्या मते राष्ट्रवाद ही केवळ वसाहतवादविरोधी प्रतिक्रिया आहे. या दृष्टिकोनातून वसाहतवादी परकी सत्तेने लादलेल्या जुलमी व अपमानास्पद अंमलाविरोधी निर्माण झालेली राजकीय चळवळ म्हणजे राष्ट्रवाद होय. परकीय अंमलामुळे राष्ट्रास आत्मभान निर्माण होण्यास मदत होते हे खरे असले, तरी राष्ट्रवादाचे जनकत्व वसाहतवादाशी जोडणे जसे चूक आहे, त्याप्रमाणे राष्ट्रवादाचा अर्थान्वय केवळ वसाहतवादाच्या संदर्भात स्पष्ट करण्याचा प्रयत्नही चूक आहे. तसे करणे म्हणजे वसाहतवादाचा अनुभव नसलेल्या समाजामध्ये राष्ट्रनिर्मितीची क्षमता नाकारणे होय.

    मार्क्सवाद आणि राष्ट्रवाद : मार्क्स, लेनिन आणि स्टालिन या तिघांनीही अशी सैद्धांतिक भूमिका घेतली की राष्ट्रवाद व भांडवलशाही समाजव्यवस्था ही एकाच संस्थेची दोन रूपे आहेत. ‘कामगारांना पितृभूमी नसते,’ हे मार्क्सचे वचन प्रसिद्ध आहे. याचा अर्थ असा समजता येईल की जोपर्यंत कामगारांचे समाजातील स्थान आर्थिक व राजकीय दास्याचे आहेत, तोपर्यंत त्यांच्यामध्ये राष्ट्रनिष्ठेची भावना निर्माण होणे अशक्य आहे आणि हे दास्य संपुष्टात आले की राष्ट्रवादाचा राजकीय पायाच नष्ट होतो. दरम्यानच्या काळात कामगारांच्या निष्ठांचा केंद्रबिंदू आंतरराष्ट्रीय श्रमजीवीवर्ग हा असतो.

    लॉर्ड अ‍ॅक्टनसारख्या मार्क्सच्या समकालीन असलेल्या बिगर मार्क्सवादी टीकाकाराने राष्ट्र-संकल्पनेविषयी ‘राष्ट्रचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट होय,’ अशी जी एकांगी भूमिका घेतली, तशी मार्क्सवादी विचारात आढळत नाही. राष्ट्र या संकल्पनेने बजावलेल्या प्रागतिक कामगिरीची योग्य ती दखल मार्क्सवादाने घेतली आहे. एंगेल्सने म्हटले आहे की, ‘आंतरराष्ट्रीय कामगार क्रांती घ़डून येण्यासाठी परकी सत्तेच्या दास्यात असलेल्या समाजांना स्वातंत्र्य प्राप्त होऊन त्यांची स्वतंत्र राष्ट्रे होणे आवश्यक आहे’. खुद्द भांडवलशाही समाजांचा विचार करतानादेखील असे लक्षात येते की भांडवलशाहीच्या सुरुवातीच्या कालखंडातील राष्ट्रवादाचे कार्य पुरोगामी स्वरूपाचेच आहे. लेनिनने राष्ट्रवादाचे तीन ऐतिहासिक कालखंड मानले आहेत : पहिला कालखंड (१७८९–१८७१) हा भांडवलदार वर्गाच्या उन्नयनाचा कालखंड होता. या कालखंडात भांडवलशाही प्रेरणा या एका अर्थाने पुरोगामी होत्या; कारण त्यांनी कालबाह्य अशा मध्ययुगीन सरंजामशाही शृंखला तोडून इतिहासाच्या प्रगतीचा मार्ग मोकळा केला. या ऐतिहासिक कार्यामध्ये राष्ट्रवादाने भांडवलशाहीस मोलाची साथ दिली. दुसऱ्या कालखंडात (१८७१–१९१४) भांडवलशाही व्यवस्थेचे पूर्ण प्रभुत्व प्रस्थापित झाले; पण त्याचबरोबर भांडवलदार वर्ग पुरोगामी भूमिकेपासून दूर जात प्रतिगामी बनला. हा साम्राज्यवादी कालखंड होय. या कालखंडात भांडवलशाही राष्ट्रांनी अवलंबिलेले साम्राज्यवादी धोरण म्हणजे राष्ट्रवादाचे विकृत स्वरूप होय. या नंतरच्या तिसऱ्या कालखंडात साम्राज्यवादी राष्ट्रांमधील संघर्ष अतिशय तीव्र होईल, असे भाकीत लेनिनने केले.

    दुसऱ्या महायुद्धानंतर आशिया आणि आफ्रिका खंडांत साम्राज्यवादी शक्तींशी मुकाबला करण्याची जबाबदारी राष्ट्रवादावर पडली. मार्क्सवादाने या परिस्थितीची योग्य ती दखल घेतली आहे. आंतरराष्ट्रीय संदर्भात मुक्त अगर मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारलेल्या नवजात आशियाई-आफ्रिकी राष्ट्रांतील सत्तारूढ वर्गाचे मूल्यमापन करताना मार्क्सवादी विवेचनात, ज्या नवजात राष्ट्रांची आर्थिक धोरणे साम्राज्यवादास पूरक आहेत, त्यांची संभावना साम्राज्यवादाचे हस्तक अशी होते; परंतु ज्या राष्ट्रांची आर्थिक धोरणे पूर्णतः राष्ट्रीय हितावर आधारित असतात, आर्थिक स्वयंपूर्णता हे ज्यांच्या अर्थव्यवस्थेचे ध्येय असते व परकीय भांडवलशाही शक्तींशी ज्यांचे संबंध स्पर्धात्मक असतात, अशी राष्ट्रे भांडवलशाही स्वरूपाची असली, तरी राष्ट्रवादी आणि म्हणून साम्राज्यवादविरोधी असल्यामुळे त्यांचा उल्लेख राष्ट्रवादी भांडवलदारवर्ग, असा पुरोगामी अर्थाने करण्यात येतो.
    ..................................................................................................................

    ReplyDelete
  11. संजय सर आपण हे छापणार का नाही ?
    राजा राममोहन राय यांची लहान वयात २ लग्ने झाली होती ,आणि नंतर एक लग्न झाले -
    त्यांनी सतीची चाल बंद करायला इंग्रज सरकारला सहाय्य केले , ते त्यांना सोपे आणि सोयीचे होते
    त्यांनी वेद्विरोधी भूमिका घेतली नाही , धर्मात जे जे अभद्र रुढी रुपात होते ते ते त्यानी आचार विचारातून वगळून नवीन पंथ निर्माण केला , ते ख्रिस्चन धर्मोपदेशक लोकांच्या सानिध्यात होते तरीही त्यांनी घणाघाती अशी हिंदू धर्मावर किंवा वेदांवर टीका केली नाही ! त्यांच्या पंथाचे नावही ब्रह्म जाणणारा समाज असे - ब्राह्मोसमाज -होते

    त्याउलट म फुले यांची वागणूक दिसते - म फुले (१८२७-१८९०)यांची भाषाही कधीकधी ताळ तंत्र सोडून वहावत गेलेली दिसते त्याचे कारण त्याना हवे तितके सामाजिक एक्स्पोझर मिळाले नाही - हे असेल !ब्राह्मण लग्नात त्यांचा अपमान झाला वयाच्या २१ व्या वर्षी आणि चित्र बदलले -अजून २५ वर्षांनी त्यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला पण त्याला आर्य समाज किंवा ब्राह्मो समाज इतके नाव मिळाले नाही !
    म फुले यांनी जमीनदार आणि वतनदार हे कसे शेतकरी वर्गाच्या गरीबीला जबाबदार आहेत ते न मांडता केवळ ब्राह्मण वर्गावर हल्ला केला - आणि रा रा राय आणि दयानंद सरस्वती यांनी स्वतः ब्राह्मण असून सामाजिक सुधारणा केल्या !
    आजकाल महाराष्ट्रात ब्राह्मण विरोधी वर्गाला म फुले शाहू आणि आंबेडकर असे त्रिकुट ही नवीन महाराष्ट्राची त्रिमुर्ती वाटते -
    पण आज आंबेडकर चळवळ पार रसातळाला गेली आहे ,एका क्वार्टर मध्ये थंड होणारे कार्यकर्ते हजारोने निर्माण झाले आहेत - एका बाटलीसाठी ते गोवध बंदीच्या घोषणाही देऊ शकतात आणि शाहू महाराजांच्या नावाने घोषणा देवू शकतात - हे सर्व भीषण सत्य सर्व राजकीय पक्षाना माहित आहे !म्हणूनच रामदास आठवलेंना फेकलेले तुकडे चघळत गप्प बसावे लागते

    ReplyDelete
    Replies
    1. Forget about my faiths..as I have none. I am sure Vedic religion is the worst on this earth. I prove it with thousands of evidences. The Brahmins those crossed thresh hold of Vedic religion are respectable to me too. But Veda's?

      Delete
  12. संजय ,
    आपण याला केराची टोपली दाखवणार का ?
    राष्ट्र ही कल्पना केवळ सोयीची म्हणून जिवंत आहे
    क्राय विक्रय करायला जो मांडणीचा भाग असतो त्यातील ती एक सोपी व्यवस्था आहे
    आज जगाचे दोन भाग पडले आहेत
    जीवः जीवस्य जीवनम या सुत्रा प्रमाणे मोठा मासा लहान माशाला गिळतो आहे
    जमिनीचे व्यवहार , हेच सांगतात , कंपन्यांचे एकत्रीकरण हेच सांगते ,नोकरीतील तकलादू पणा हेच सांगतो !कारण सर्व गोष्टी मार्केट शी जोडल्या गेल्या आहेत - आता फसवे दावे आणि खोट्या घोषणा , भावनात्मक आव्हाने यांना बाजारात स्थान नाही - त्यामुळे देश हि कल्पना सुद्धा मोडीत निघणार हे वैश्विक सत्य आहे !पूर्वी भावनात्मक आव्हाने करून आपली राज्ये निर्माण केली गेली , सत्ता स्थाने उदयाला आली - त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी - जर तो बहुजनांचा राजा होता तर त्याने संत तुकाराम यांच्या खुनाची दाखल का घेतली नाही ? तुम्ही हे सत्य छापणार नाही हे माहित आहे , कारण तुम्ही फक्त सोयीचे तेव्हढेच छापता हे जगजाहीर आहे !

    अमेरिका आणि इतर देशात आता जीवन मुक्त होत आहे ,राजकारण आणि धार्मिकता यापासून समाजाला मुक्ती हवी आहे .सामाजिक सुरक्षितता आणि आरोग्य आणि शिक्षण हे मुख्य मुद्दे आहेत - अमेरिकेत शिक्षण भारतासारखे अडचणीचे आहे का ?तिथे आपल्या सारखे पूर्वीचे सहकार आणि साखर सम्राट जाळू लावल्या प्रमाणे जनतेचे शोषण करतात का ? हॉस्पिटले जनतेची लूट करतात का ?
    आशियायी देशात ,
    शेजारी देशांचे अतिक्रमण हीच आशियायी देशांची समस्या आहे , कारण लोकसंख्या !
    आणि आर्थिक चढाओढ !त्यामुळे देशाचे नेतृत्व हे ज्यांच्या हाती आहे ते लोक आतंकवाद आणि गुंडशाही यांच्या आधाराने साता केंद्रे काबीज करून आपले आसन घट्ट करू बघत आहेत

    लायकी नसताना जनतेची पिळवणूक करायची लालसा बाळगून सत्ता आपल्या हातात ठेवण्याचे प्रयत्न होत आहेत आणि भ्रष्टाचार हा मुख्य मुद्दा होत आहे !

    ReplyDelete
  13. आप्पा - छत्रपति शिवाजी महाराज यांचे जर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे राजगुरू असतील तर छत्रपति शिवाजीचे हेरखाते इतके जगप्रसिद्ध होते ते काय करत होते ?त्या हेरानापण ब्राह्मणांनी पैसे खाउन भ्रष्ट केले होते ? तसे शक्यच नाही , कारण तुकाराम तर शिवाजीचे गुरु म्हणजे मामला नाजूक होता ,मग ह्या खुनाला वाचा का नाही फुटली ?

    बाप्पा - ब्राह्मण इतके पॉवर फुल नव्हते की त्यांनी सर्व सरकारी क्षेत्रात आपले हातपाय पसरले असावेत
    यापूर्वी जनहितासाठी शिवाजीने भल्याभल्या ब्राह्मणाना अगदी तत्काळ शासन केले आहे मग इथेच तो गाफील राहील असे वाटत नाही , एकच शक्यता असू शकेल की , तुकाराम आणि शिवाजी दोघेही बौद्ध धर्म स्वीकारणार असतील आणि ती बातमी फुटली असेल आणि मनुवादी ब्राह्मणांनी दोघानाही विष प्रयोग करवून मारले असेल ,

    आप्पा -कारण शिवाजीचा मृत्यू पण सरळ वाटत नाही . शिवाजीचा सर्व धर्म समभाव आपण आत्ताच्या पाठ्य पुस्तकातून वाचतोच आहोत ,त्याने अफझलखानाला मारले नाही , तो चुकून अपघाताने मारला गेला एका ब्राह्मणाकडून आणि त्याबद्दल शिवाजीने त्या ब्राम्हणाची कान उघडणीही केली असे डॉ टेक्सास गायकवाड सांगतात .तसेच पुण्यात लाल महालात चुकून दरवाजात बोटे अडकून शाहिस्तेखानाची बोटे तुटली तर याच ब्राह्मणांनी शिवाजीवर सारा मामला ढकलून त्याला बदनाम केले अशा रीतीने शिवाजी आणि अफझलखान+ शाहिस्तेखान असा गैरसमज करून देऊन ब्राह्मणवर्ग त्यांच्यात आणि मराठा लोकात तेढ वाढवायचे गुप्त प्रयत्न करत होते हेच सिद्ध होते

    आप्पा - शिवाजी आणि तुकोबा याना अहिंसा फारच प्रिय होती आणि ब्राह्मणवर्ग स्वतःच्या भल्यासाठी त्याना मुसलमान समाजाच्या विरुद्ध भडकवत असे ,दोघानाही कार्ले आणि भाजे लेणी फार आवडत असत आणि ते दोघेही तिथे जाउन बौद्ध धर्मावर अभ्यास करत असत ,चिंतन करत असत विठोबा हा बुद्धच आहे +असेच एकदा चिंतन करताना ब्राम्हणानी मुघल सैन्याला बातमी दिली आणि ते तिथे पकडायला आले (पुरावा +संत तुकाराम हा चित्रपट )पण तुकोबांनी शिवाजीला वाचवले आणि ब्राह्मणांची फजिती झाली बुद्ध स्वतः मुघलाना फसवायला आला होता
    बाप्पा - तसेच नंतर उपरती होऊन दोघांनी बौद्ध धर्म स्वीकारायचे फ़ायनल केले
    त्यापूर्वीच ब्राह्मणांनी त्यांचा खून केला हा सुसूत्र विचार डॉ राहुल गायकवाड पीएचडी यांनी
    ( शिवाजी तुकाराम बुद्ध आणि डॉ आंबेडकर ) अशा प्रबंधात मांडला आहे त्यामुळे प्रभावित अनेक मराठा आणि वारकरी आता बौद्ध अनुयायी झाले आहेत - होणार आहेत ,पण त्याला उत्तर म्हणून ब्राह्मणांनी आपल्या दशावतारात बुद्धाला घुसडले आहे त्याचा अखिल नवबौद्ध नीळा बावटा संघ आणि देहूकर वारकरी मंडळ निषेध करत आहे असे आम्ही कालच ऐकले

    आप्पा - सांगायची महत्वाची गोष्ट एकच , प्रत्येक ठिकाणी लोकाना ब्राह्मणद्वेष दिसतो पण ब्राह्मणांच्या गुप्त कारवाया दिसत नाहीत !खरेतर महाराजांच्या वाघ्याला पण बौद्ध धर्म स्विकारायचा होता पण कुत्र्यांना बौद्ध करून घेत नाहीत म्हणून त्याने शेवटी प्राणार्पण केले !वाघ्या जन्माने हिंदूच राहिला याचे महाराजाना फार वाईट वाटले !

    बाप्पा - असे महाविचार मांडणारे डॉ राहुल यांचे आपण आभार मानले पाहिजेत !
    आप्पा - आणि सर्व जानाव्यांची होळी केली पाहिजे , तसेच सर्व शेंडीधारी वर्गावर बहिष्कार टाकत त्याना हिंदू धर्मातून हद्दपार केले पाहिजे !
    बाप्पा - चलातर , ६ डिसेंबर २०१४ ला शिवाजी पार्क वर ! या ब्राह्मण वर्गावर शेवटचा वैचारिक हल्ला करून त्याना पार पळवून लावूया !

    ReplyDelete
  14. संजय ,
    फारच सुंदर माहिती लगातार मिळत चालली आहे
    राजा राम मोहन राय यांचे वडील वैष्णव आणि आई शैव होती ही फारच महत्वाची माहिती मिळाली
    तसेच त्यांची ३ लागणे झाली हे पण विशेष आणि ते ब्राह्मण होते हेपण विशेष !
    ब्राह्मण माणूस इतका पुरोगामी कसा ?
    दयानंद सरस्वती पण ब्राह्मण ? तेपण इतके पुरोगामी ?
    म्हणजे फक्त मराठी ब्राह्मण नालायक आणि मनुवादी होते का ?

    म फुले यांचा ब्राह्मणाच्या लग्नात वयाच्या २१ व्या वर्षी अपमान झाला हेपण नवीनच !त्यामुळेच त्यांचा ब्राह्मणद्वेष समजून घेता येतो !

    आप्पा बाप्पा यांनी अतिशय उपहासाने समाजातील द्वेष प्रवृत्तीची खिल्ली उडवली आहे -
    आप्पा बाप्पा - जुग जुग जियो !

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...