Sunday, August 17, 2014

डॉ. भटकरांचं परम प्लँचेटfeature size
डॉ. विजय भटकर हे भारतातील एक वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध असून ‘परम’ या महासंगणकाचं कर्तृत्व त्यांना बहाल केलं गेलं आहे. देशी-विदेशी विद्यापीठांत त्यांनी अनेक प्रबंधांचं वाचन केलं असल्याने त्यांना ‘विश्वप्रसिद्ध’ असं लेबल चिकटवता येणंही सहज शक्य आहे. त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ने सन्मानित केलं असून त्यांना इतरही अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. असे विजय भटकर वैज्ञानिक असल्याने त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून वैश्विक घडामोडींकडे पहावं आणि आपल्या अंधविश्वासू भारतीय समाजाचं डॉ. जयंत नारळीकरांप्रमाणे प्रबोधन करावं अशी अपेक्षा त्यांच्याकडून ठेवली तर त्यात काहीही अस्वाभाविक नाही. मात्र आपण धर्म आणि विज्ञान याची सांगड घालण्याचा विवेकानंदांचा संदेश अंमलात आणत आहोत असं सांगत ते धर्माकडेच अधिक झुकलेले दिसतात. बरं तेही समजा ठीक आहे, पण त्यांनीच अंधश्रद्धेकडे झुकावं आणि तिचं जाहीर समर्थन करावं ही बाब मात्र स्तिमित करणारी आहे. भारताला लज्जास्पद आहे.

भारतातील तीर्थस्थानं ही भावी पिढ्यांसाठी दैवी ज्ञानाची केंद्रं बनवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत असं ते एका लेखात लिहितात. ‘दैवी ज्ञान’ हे कोणत्या विज्ञानाच्या नियमात बसतं हे या नवीन हभपंना कोणी विचारलं नसावं. याहीपेक्षा ते पुढे जातात आणि प्लँचेट या अवैज्ञानिक, अंधश्रद्धाळू लोकांनी, विशेषतः युरोपात, जोपासलेल्या गेलेल्या खुळचट खेळाचं समर्थन करतात. तेही डॉ. नरेंद्र दाभोलकरांसारख्या अंधश्रद्धांचं निर्मुलन करण्यासाठी आयुष्य घालवत प्राणार्पणही करणार्या माणसाच्या खुनाच्या तपासाच्या संदर्भात… हे मात्र नुसतं धक्कादायक नाही, तर निंदनीयदेखील आहे.

येत्या २० ऑगस्ट रोजी दाभोलकरांची हत्या होऊन एक वर्ष पूर्ण होईल. या प्रदीर्घ काळात खुनी तर सोडाच, पण खुन्यांचे साधे धागेदोरेही पुणे पोलिसांना मिळालेले नाहीत. यामुळे पुणे पोलिसांवर सातत्याने टीका होत आहे. या नैराश्यातून पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांना काय मार्ग दिसावा तर प्लँचेटचा? एका पत्रकाराने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि सर्वत्र खळबळ माजली. गुलाबराव पोळ यांनी आधी हा प्रकार केला असल्याचं फेटाळून लावलं असलं तरी त्यांनीच या स्टिंगध्ये या प्रकाराची कबुली दिली असल्याने ते अजूनच टीकेचे धनी झाले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने पोळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यात दस्तुरखुद्द नामवंत शास्त्रज्ञ म्हणवणार्या भटकरांनी प्लँचेटच्या वापरात काहीही गैर नसून विदेशांतही पोलीस प्लँचेटचा वापर गुन्हेगार शोधण्यासाठी करतात असं सांगून विवेकवादाची पुरती हेटाळणी केली. यामुळे मराठी माणसाच्या विस्मृतीत जाऊ पाहत असलेला प्लँचेट हा प्रकारही चर्चेत आला.

काय आहे प्लँचेट?

प्लँचेट, बोलके बोर्ड, औजा आणि डायल प्लेटस हा भुताळ प्रकार सरासरी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर पुढे आणण्यात आला. यामागे खुद्द चर्चचा हात असावा असं अनेक विद्वानांचं मत आहे. विविध शास्त्रीय शोधांनी परंपरागत धर्मश्रद्धा कमी होत आहेत, यामुळे लोकांना पुन्हा गुढवादी विचारांकडे खेचणं चर्चला भाग पडलं असणं स्वाभाविक आहे. धर्म आणि विज्ञान या संघर्षात धर्मसत्ता कायम रहावी यासाठी लोकांना मृत्योत्तर जीवनावर श्रद्धा स्थापित करायला लावणं हाही हेतू यामागे होता. म्यगी आणि केट फोक्स या भगिनींनी १८४८ मध्ये आपण मृतात्म्यांशी संवाद साधू शकतो असा दावा केला. तत्कालीन माध्यमांनी या प्रकाराला प्रचंड प्रसिद्धी दिली आणि काही वर्षांत अमेरिकेत लोकांचा प्लँचेट करणं हा फावल्या वेळाचा छंद बनला. मृतात्म्यांशी खरोखर संवाद साधला असे दावेही हिरिरीने होऊ लागले. शेकडो लोक आपण मृतात्म्यांचं माध्यम असण्याचेही दावे करू लागले. एकट्या फिलाडेल्फियामध्ये ४०-५० प्लँचेट मंडळं निघाली. तबकडीसारख्या आकाराच्या वस्तुचा उपयोग यात केला जात असल्याने या प्रकाराला प्लँचेट असं नाव पडलं.

प्रेतात्मे विशिष्ट माध्यमांमार्फत आपल्याशी संवाद साधतात, आपल्या प्रश्नांना उत्तरं देतात हे पाहून प्लँचेटमध्येही अनेक सुधारणा (?) होत राहिल्या. प्रथम टिचक्या वाजवून हो किंवा नाही अशी उत्तरं देणारे साधे प्लँचेट अक्षरमालेवरून हलक्या वस्तू-नाणी-वाट्या इ. फिरवून उत्तरं देऊ लागली. आपोआप उत्तरं लिहून देणारे प्लँचेट मात्र अलन कार्डेक या फ्रेंच माणसाने १८५३ मध्ये शोधलं. अशा रितीने पुढेही प्लँचेटचे अनेक प्रकार शोधले गेले. युरोप-अमेरिकेत या प्रकाराने अभूतपूर्व लोकप्रियता मिळवली. या विषयावर शेकडो पुस्तकंही लिहिली गेली. प्लँचेटची साधनं विकणारे गब्बर होऊ लागले एवढा हा ‘प्लँचेट रोग’ साथीसारखा पसरला होता. ‘औजा बोर्ड’चं (हो किंवा नाही असं सांगणारा) १८९१ मध्ये अमेरिकेत चक्क पेटंट घेतलं गेलं होतं.
या प्रकाराकडून अमेरिकन लोकांचं लक्ष वळालं आणि ते जीवनाबाबत अधिक गंभीर झाले ते अमेरिकन यादवी युद्धाच्या घटनेमुळे… अमेरिकन समाजशास्त्रज्ञ म्हणतात, ‘‘यादवीमुळे अमेरिकन लोक आत्मिक थोतांडाकडून दूर होत वास्तव जगाबाबत अधिक डोळस झाले…’’

थोडक्यात अमेरिकेतून प्लँचेट हा प्रकार जेवढ्या झपाट्याने पसरला तेवढ्याच झपाट्याने दूरही झाला. हा प्रकार संपला असं मात्र म्हणता येणार नाही. कारण युरो-अमेरिकन जगातही अंधश्रद्धा आहेतच. आजही प्लँचेटची उपकरणं बनवणारे आणि त्यांचा वापर करणारे समूह आहेतच. ही उपकरणं शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवली असल्याने ती वापरणार्यांना खरंच मृतात्म्यांशी संवाद साधल्याचा आनंद होतो.
म्हणजेच मृतात्म्यांशी संवाद साधण्याचं लोकांच्या मानगुटीला बसलेलं भूत अजून पुरतं उतरलेलं नाही!

पण पोलीस अंध नव्हते!

या पार्श्वभूमीवर पाश्चात्य पोलिसही गुन्हेगार शोधण्यासाठी प्लँचेटचा वापर करतात, असं डॉ. भटकर कोणत्या आधारावर म्हणाले हे समजत नाही. याचं कारण असं की, पोलिसांनी कुठेही प्लँचेटची मदत घेतल्याचं एकही उदाहरण मिळत नाही. पाश्चात्य जगात प्लँचेटकडे आधिभौतिकवादी सोडलं तर कोणीही गांभीर्याने पाहत नाही. प्लँचेटच्या वस्तू उत्पादकांच्या दृष्टीने ही एक बाजारपेठ आहे. चित्रपट, गूढ कादंबर्या यात मात्र प्लँचेटला स्थान मिळतं ते त्यातील गूढ वाढवण्यासाठी. पाश्चात्य पोलीस गुन्हेगार पकडण्यासाठी अक्कलेचा उपयोग करतात, गुलाबराव पोळ यांच्याप्रमाणे ते अक्कलशून्यतेचा प्रयोग करत नाहीत!

आणि त्याचं समर्थन करू धजावणारे स्वतःला वैज्ञानिक समजणारे मूर्ख तर तिकडे मुळातच नाहीत…
एक बाब आपण सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे ती ही की, प्लँचेटचा जन्मच मुळात लोकांना धार्मिक श्रद्धांकडे खेचण्याचा होता. मृतात्मे असतात आणि ते माणसांशी संवाद साधतात हे दाखवलं की लोक धर्मग्रंथात बाकी जे काही सांगितलंय त्यावरही विश्वास ठेवणार हे ओघाने आलंच. त्यात विज्ञानाचा बळी देणं त्यांना भागच होतं आणि त्यात ते काही प्रमाणात यशस्वी झाले हेही खरं आहे.

भटकरांनी किमान हा इतिहास पहायला हवा होता. पण ते स्वतः वैदिक तत्त्वज्ञानाचा पुरस्कार करणारे असल्याने त्यांनाही विज्ञानापेक्षा धर्मच महत्त्वाचा वाटत असला तर त्यात काहीच नवल नाही. तथाकथित शास्त्रज्ञ, विचारवंतांना आपल्या गोटात खेचत त्यांच्याच तोंडून असल्या बाबींचा गवगवा करून घेतला तर धर्मवाद्यांचं फावतं. तिथे मग प्लँचेट ही ख्रिस्ती धर्मियांची आयडिया आहे याच्याशीही त्यांना देणंघेणं नसतं.
पण यामुळे सामान्य लोक गोंधळतात याचं काय करायचं? त्यांनाही हे प्रकार खरे वाटू लागले आणि महाराष्ट्रातही पुन्हा प्लँचेटचे ‘खेळ’ रंगू लागले तर काय करायचं? विवेकवादाची हत्या होत असेल तर काय करायचं?

डॉ. दाभोलकर आजन्म अंधश्रद्धांविरुद्ध लढत होते. आत्मा, मोक्ष, कयामत का दिन, प्रेतात्मे या सर्व खुळचट अंधश्रद्धा आहेत हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ उच्चरवाने सांगत असताना एक भारतीय महासंगणकतज्ज्ञ मात्र अशा प्रकारांचं समर्थन करतो हे निंदनीय आणि अत्यंत आक्षेपार्ह आहे.

- संजय सोनवणी

(Saptahik Kalamnama)

50 comments:

 1. डॉ. भटकरांनी प्रथम हे स्पष्ट करावे कि, त्यांचे मत एक वैज्ञानिक म्हणून त्यांनी मांडले आहे कि एक सामान्य मनुष्य म्हणून ? जर सामान्य मनुष्य म्हणून ते आपले मत मांडत असतील तर तो त्यांना हक्क आहे पण वैज्ञानिक म्हणून ते अशा अंधश्रद्धांचे समर्थन करत असतील तर मग मी त्यांना व प्लँचेट तज्ञांना आव्हान देतो कि, त्यांनी छ. शिवाजी महाराज, अफझलखान, सदाशिवराव भाऊ आणि बंडवाल्या नानासाहेब पेशव्याच्या आत्म्यांना बोलवून दाखवावे. म्हणजे शाहिस्तेखानावरील हल्ल्यात शिवाजी महाराज होते कि नाही ? अफझल - शिवाजी भेटीत नेमके काय झाले ? सदाशिवराव पानिपतावर मेला कि नाही ? स. १८५७ साली जे झाले ते नेमके काय होते आणि नानासाहेब पेशव्याचा शेवट नेमका कुठे झाला ? इ. प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. आहे का कोणी या आव्हानाचा स्वीकार करण्यास तयार ??

  ReplyDelete
 2. aanisa vale faltu bakbak jaste karat astat. jara discovery channel pahat ja.

  ReplyDelete
 3. प्रिय बंधु,
  दूसरों में बारे में नहीं अपना बताइए,
  पुनर्जन्म को लेकर आपका क्या विचार है?
  आत्मा के अस्तित्व को लेकर आपका क्या दृष्टिकोण है?
  यदि आत्मा होती है, तो मरने के बाद और अगले जन्म के पहले वह कहाँ रहती है?

  ReplyDelete
  Replies
  1. शर्मा, प्लांचेट, आत्मा, भूत को लेकर आपका क्या विचार है? वो भी बताइये! अंधविश्वास किसे कहते हैं?

   Delete
 4. माननीय भाटकर नक्कीच ब्राह्मण असणार - धनगर नसणार - नाही का ?
  आणि यावेळेस डॉ जयंत नारळीकर यांच्या विषयी इतके प्रेम का उतू जात आहे - मागे तुम्ही त्यांचीपण झाडाझडती घेतली होती त्यामुळे त्यांचे काहीच बिघडले नाही
  अशी तुमची एकुणात कथा आहे तुमच्या म्हणण्याला कोण किती किंमत देते त्याचा पण एकुणात विचार करायला शिका वेळ मिळाल्यास

  अशामुळे तुम्ही मात्र भाडोत्री वाटू लागता
  छापणार का - केराच्या टोपलीत जाणार ?

  ReplyDelete
  Replies
  1. 1. माननीय भाटकर नक्कीच ब्राह्मण असणार - धनगर नसणार - नाही का ?
   2. प्रथम असे वाटते की ते ब्राह्मण आहेत ! मराठा किंवा धनगर असते तर ? संजय सोनावानींची जीभ इतकी वाल्वालाली असती का ?---------------------------------------->

   या लोकांना सर्व शास्त्रज्ञ ब्राह्मणच वाटतात! बघा ना, डॉ. विजय भटकरांना सुद्धा हे लोक ब्राह्मणच समजत आहेत. भारतातला पहिला "परम संगणक" एका मराठ्याने बनविला या पूर्ण सत्य गोष्टीवर यांचा विश्वास का बरे बसत नाही? यालाच म्हणतात अहंगंडाने पछाडलेली ब्राह्मणी मानसिकता !

   Delete
 5. आदरणीय विजय भाटकर म्हणजे काही धोनी नाही -
  त्यांचे देशासाठीचे कार्य थोरच आहे -
  खाजगी आयुष्यात ते काय तत्वे ठेवून जगतात ते आपण महत्व देण्यासारखे आहेका ?

  ते आठवड्यातून एकदाच आंघोळ करत असतील
  पगारवाढी बद्दल सारखे भांडत असतील
  किंवा कामुक असतील
  किंवा
  हलक्या कानाचे असतील
  किंवा रोज पहाते उठून गीतेची पारायणे करत असतील - तो त्यांचा खाजगी मामला आहे असे म्हणून सोडून द्यायचे का त्यांच्या खाजगी आयुष्यात आपण दाखल घेत त्यांच्यावर टीका करायची आणि त्यांना सळो कि पळो करायचे ?- त्यांचे कर्तृत्व किती आहे ते पण बघून विचार करता येईल का ?
  प्रथम असे वाटते की ते ब्राह्मण आहेत ! मराठा किंवा धनगर असते तर ? संजय सोनावानींची जीभ इतकी वाल्वालाली असती का ?
  संजय म्हणजे रिकामा न्हावी आणि भीतीला तुमड्या लावी हि म्हण सिद्ध करणारा लेखक आहे !

  ReplyDelete
 6. आपली अकलेची दहीहंडी फोडून आपलेच हसे करून घेऊ नका
  भाटकर ब्राह्मण आहेत म्हणून असा टोकाचा द्वेष बरा नाही
  "I sought the grace of Amma
  for C-DAC's Mission and our dedicated and selfless work,
  and the grace was granted
  in the form of PARAM 10000 on the 11th Foundation Day
  of C-DAC."

  --Dr. Vijay P. Bhatkar, executive director of C-DAC

  स्वतः भाटकर हे अम्मांचे परमभक्त असावेत असे दिसते - आता हा काय त्यांचा गुन्हा आहे ?
  आपणही आपल्या यशाचे श्रेय आपल्या आईला देतोच की

  ReplyDelete
 7. डॉ दाभोलकर आज असते तर त्यांनी काय मत व्यक्त केले असते ?
  नक्कीच त्यांनी डॉ विजय भाटकर यांचा निषेध केला असता
  ते आम्मांचे परमभक्त आहेत हे खरे - त्यांच्या समस्या पण कठीण होत्या सर्व तरुण ऐन वेळेस काम सोडून देशाबाहेर जात होते अशा परिस्थितीत आपण आईच्या मायेने कुणाचा तरी आधार घेतो -
  सगळ्यांचेच पाय मातीचे असतात
  कुणी सांगेल का की भाटकर आणि नारळीकर मराठा आहेत , शैव आहेत का वैष्णव आहेत , आर्य आहेत का अनार्य आहेत ?

  उद्या आता सगळे बाल गंधर्व पुलावर शोक आणि आठवणी घेत २० तारखेला जमा होतील आपणपण डॉ दाभोलकर यांना आदराने श्रद्धांजली अर्पण करूया !

  ReplyDelete
 8. संजय सोनवणी यांच्या कर्तृत्वाचा आलेख आम्हाला अचंबित करत असतो
  सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती अप्रतिम आहे
  मध्यंतरी ते डॉ जयंत नारळीकर यांच्यावर सरकले होते
  आज डॉ विजय भाटकर यांच्यावर सरकले आहेत -
  संजयला भरकटायचे व्यसनच आहे -
  या त्यांच्या स्वभावाचे रहस्य बहुतेक मोहनजो दारो येते सापडेल

  ReplyDelete
 9. अहो डॉ. विजय भटकर, तुम्ही असे वो कसे. तुम्ही विज्ञानाचे विधार्थी ना! असे अंधश्रद्ध होऊन कसे चालेल? तुमचे सुपर कॉम्पुटर मधले ज्ञान खूप असेल, ते असायलाच हवे. याचा अर्थ तुम्ही अडाणी माणसासारखे काय बरळत आहात! हे बरे नव्हे! हल्ली अडाणी लोक सुद्धा असे तुमच्यासारखे बरळत नाहीत हो! मराठा ना तुम्ही, मग असे ब्राह्मणळ्यागत काय करत आहात? वय झाले तुमचे, आता तरी सुधारा स्वतःला नाहीतर लोक म्हणतील "हा शिकून सवरून सुद्धा अंधश्रद्ध आणि अडाणीच राहिला". लक्षात ठेवा "विज्ञाना बरोबर अध्यात्माची सांगड घालणे कदापि शक्य नाही, आणि ते योग्य सुद्धा नाही!".

  ReplyDelete
 10. आज सकाळी बालगंधर्व पुलावर जमून काय चालले होते ते आपण बघुया
  म्हणून आम्ही उत्साहाने गेलो खरे पण अगदीच निरीत्साः झाला - हि संधी कार्यकर्त्यांनी घालवली

  डॉ दाभोलकर काय किंवा म गांधी काय , जर ते नैसर्गिक मृत्यू पावले असते तर ?
  डॉ दाभोलकर यांचे कार्य निर्विवाद महान आहेच , पण ज्या पद्धतीने त्या जागेवर =( जिथे त्यांचा देह एक वर्षापूर्वी मृतावस्थेत सापडला होता ) = जे काय ओरडा करत थैमान आणि घोषणाबाजी चालली होती ते पाहून , स्वतः डॉ काय म्हणाले असते ते विचार करण्या सारखे आहे
  समाज सुधारणेला अनेक अंगे असतात - म फुले ,डॉ आंबेडकर ,राजा राममोहन राय ,एनी बेझंट असे अनेक आपापल्या अंगाने आपापले दायित्व निभावत आले त्यासाठी प्रत्येकाने अनेक उदंड त्रास भोगला - पण कधीही तोंडातून बर काढला नाही !सुधारक आगरकर यांचे निधन हे तब्येतीची हेळसांड झाल्याने झाले हे सर्वश्रुत आहे
  आपापल्या कार्यात अशा लोकाना हितशत्रू अनंत असतात हे मात्र नक्की !
  डॉ दाभोलकर यांच्या संदर्भात घोषणा देत राहण्यापेक्षा त्यांच्या प्रारंभापासून जर त्यांच्या आठवणी कुणी सांगितल्या असत्या तर ?
  कारण अनेक लोक उत्साहाने जमले खरे , पण कर्कश्य ओरड्यामुळे अनेकांनी हळूहळू काढता पाय घेतला - हि वेळ समय सूचकतेने यापेक्षाही चांगल्या रीतीने वापरता आली असती
  कायदा आणि खुनी पकडणे या पोलिसांच्या अखत्यारीतल्या गोष्टी आहेत -
  पुन्हा डॉ दाभोलकर यांच्या स्मृतींना नम्र अभिवादन !

  म गांधी यांनी तर एक फार मोठी राष्ट्रीय चळवळ उभी केली त्याचा अभ्यास करताना आपले मन थक्क होते मनुष्य स्वभावाचा केवढा हा अभ्यास !
  आपला प्रत्येक हावभाव त्यांनी सहज सुलभपणे आपल्या चळवळीसाठी - मग ते कमीत कमी पंचा नेसून कडाक्याच्या थंडीत इंग्लंड ला जाणे असो किंवा उपवास असो किंवा दांडी मार्च असो -
  लोकांना आपल्या मागे यायला लावायचे कसब अफाट होते - त्यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली - त्यांना हट्टी म्हटले जाऊ लागले

  ReplyDelete
 11. अगदी योग्य लिहिले आहे
  डॉ विजय भाटकर यांनी नेमके कुठे असे म्हटले आहे ते समजेल का ?
  कारण आजकाल मिडीयाला तुकडे करून आणि तोडून जोडून वाक्ये वापरायची सवय लागली आहे - कधी कधी सेन्स ऑफ ह्युमर वापरत असे प्रकार उच्चारले जातात - कधी त्या माणसाचे पूर्ण लक्ष नसते - त्यामुळे मला असे वाटते कि तुम्ही त्यांना वेळ देत त्यांना खुलासा करायला उद्युक्त करावे - कदाचित ते क्षमाही जाहीर करतील - हेतू चांगला असणे महत्वाचे आहे -
  मला एक्जानाच्या प्रतिक्रियेतून आठवण झाली की आपण डॉ जयंत नारळीकर यांच्यावर फारच आगपाखड केली होती - मला पक्के आठवते आहे - ते काही तितकेसे थोर अजिबात नाहीत असा तुमचा सूर होता ,आणि आज त्यांचे एकदम कौतुक ?
  माझ्या आठवणी प्रमाणे तुमच्या पुस्तकाची प्रत त्यांनी तशीच पाडून ठेवली होती असे काहीतरी आठवते
  आपण आपल्याला फार मोठे शास्त्रज्ञ समजता इथेच सगळा घोळ आहे -
  चार नदीकाठच्या मित्रांच्या टोळक्यात असे बोलणे ठीक आहे - पण अहो महाराज ! डॉ नारळीकर हे सुमार दर्जाचे संशोधक आहेत अशा प्रकारचे काहीसे आपले वक्तव्य असल्याचे वाटते -अशाने लोक अहातील तुम्हाला - डॉ नारळीकराना नाही !त्यांच्याच सी ड्याक ची धुरा डॉ भाटकर सांभाळत आहेत
  हापण एक योगायोग म्हणावा कि आपले कोणतेतरी हित संबंध आड येत आहेत म्हणून आपण असे लिहित असता ?
  आपणपण थोर आहात आपले लिखाण आम्ही आवडीने वाचतो -यापेक्षा चांगल्या कार्यासाठी देव आपणास सद्बुद्धि देवो हीच गणरायापायी नम्र प्रार्थना !
  आजच्या दिवस त्या गणरायाला टीकेचे लक्ष करू नका - नाहीतर सुरु कराल - या ब्राह्मणांनी आपल्या फायद्यासाठी - - ते परत कधीतरी - आता सर्व देश गणपतीमय होईल - त्यावर काहीबाही लिहून विरजण घालू नका !हि हात जोडोन प्रार्थना - इति प्रार्थना !( अथर्वशीर्षाच्या शेवटी जे फलप्राप्तीचे उल्लेख आहेत त्याबद्दल अवश्य सडकून लिहा - पण मुळात अथर्वशीर्षच किती गोड आहे - म्हणून तर बघा एकदा !
  प्रत्येक आलापीला आपापली जागा आहे ना - तसेच हे आहे -
  जोगवा असो किंवा जागरण , आरती असो वा मंत्रजागर सगळ्यात एक बेभान होण्याची जी वृत्ती आहे तिचे कौतुक वाटते ! न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या सहकाऱ्याला ५० शब्द अस्सल मराठी शोधून काढायला सांगितले पण त्याला जमेनात - बहुतेक लोकप्रिय सर्व शब्द फारसी अरेबिक संस्कृत किंवा कानडी असे दिसू लागले - हे आपले जाताजाता !

  ReplyDelete
 12. Reply

  VIVEKANAND SERAOApril 11, 2014 at 11:25 PM
  संत तुकाराम यांचा खुनाच झाला आहे हे कोणी मान्य करो वा न करो ,
  त्यांचेच नाही तर ज्ञानेश्वर आणि भावंडांचे पण असेच काहीतरी झालेले आहे !
  मीराबाईचे पण असेच झाले आहे
  आज जसे पुतळे उभारून स्मारके करून लोक परत पापे करायला मोकळी होतात तसेच हेपण आहे !

  Reply

  ReplyDelete
 13. संत तुकाराम यांच्या विषयी चुकीचा, पूर्वग्रहदुषित विचार सोनवणी यांनी मांडला आहे. त्यांनी तुकाराम यांच्या संदर्भातील वाचन अधिक प्रगल्भ केल्यास ते या अविचारापासून दूर होतील अशी आशा वाटते!

  सौ. विभावरी यादव

  ReplyDelete
 14. hoy g hoy vibha agadi barobbar

  ReplyDelete
 15. aamhi vibhavari taainch - naahi naahi - dr sanjay sonawani - naahi - sorry - sanjayacha tivr nishedh karato

  ReplyDelete
 16. डॉ, भटकराना पोलिसानी केवळ रूढ झालेल्या तपासाच्या पद्धतींशिवाय इतर फारशा रूढ नसलेल्या पद्धतींचा विचार करावा असे वाटते असेल तर ते चूक नाही. फारशी रूढ नसलेली पद्धत याचा अर्थ प्लॅंचेट असा घेता येणार नाही

  ReplyDelete
 17. संत तुकाराम आणि चमत्कार...

  आमचे प्राचीन धर्मग्रंथ हे चमत्कारांनी खचाखच भरलेले आहेत. मुळात माणूस हा धर्मवेडा आहे, आणि जेव्हा धर्मग्रंथच चमत्कारांचे समर्थन करताना दिसतात तेव्हा तो साहजिकच डोळे झाकून विश्वास ठेवतो. पिढ्यानपिढ्या हे चालत आले असल्याने ह्या विज्ञान युगात तरी वेगळे काय पाहायला आणि ऐकायला मिळणार? आणि म्हणूनच घरात बसवलेला शाडूचा गणपती भक्ताच्या वाटीतले दुध पितो!

  चमत्कार म्हणजे तरी काय? तर 'जे अशक्य ते शक्य करून दाखवणे' म्हणजे चमत्कार! ज्याला दैवी शक्ती प्राप्त झालेली असते अशी व्यक्ती चमत्कार करू शकते, अशा प्रकारची लोकसमजूत आहे; आणि त्यामुळेच भोंदू बुवा, बाबा काही तरी चिल्लर स्वरूपाची हातचलाखी करून हवेत मोकळा हात फिरवून सोन्याची साखळी काढून दाखवतात. तर काही विज्ञानाचे एखादे तत्त्व वापरून पाण्याचा दिवा पेटवून दाखवितात. पण हे खऱ्या अर्थाने चमत्कार नसतात.

  'चमत्काराशिवाय नमस्कार नसतो' हे भोंदुगिरी करणाऱ्या बुवा, बाबांनाही माहित असल्याने प्रत्येक भोंदूबाबा वरील प्रकारचा एक चमत्कार करून दाखवत असतो. बुवाबाजी करण्याचे चमत्कार हे एक प्रमुख साधन आहे.

  चमत्कार म्हणजे फक्त कार्य. त्यात कारणाचा पत्ताच नसतो.वास्तविक कुठलेही कार्य कारणाशिवाय घडत नाही; परंतु 'चमत्कार' या प्रकारात हा कार्यकारणभाव शोधूनही सापडत नाही.

  साधू, संत, महंत, महात्मे ह्यांचा मोठेपणा आणि महत्व वाढविण्यासाठी त्यांचे भक्त वा अनुयायी त्यांच्या चरित्राला हरतऱ्हेचे चमत्कार चिटकवतात. अश्या वेड्या, आंधळ्या भक्तांनी "मी चमत्कार जाणत नाही" म्हणणाऱ्या तुकारामानाही सोडले नाही. 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार त्यांच्या बारा बंदीला ठिगळासारखा का होईना पण जोडलाच! अशी आहे आमची 'चमत्कार' या अंधश्रद्धेविषयीची मानसिकता!

  चमत्काराविषयी तुकाराम म्हणतात :-

  कपट काही एक | नेणे भुलवायाचे लोक ||१||
  तुमचे करितो कीर्तन | गातो उत्तम गुण ||२||
  दाऊ नेणे जडीबुटी | चमत्कार उठाउठी ||३||
  नाही शिष्यशाखा | सांगो अयाचित लोका ||४||
  नव्हे मठ-पती | नाही चाहुरांची वृत्ति ||५||
  नाही देवार्चन | असे मांडिले दुकान ||६||
  नाही वेताळ प्रसन्न | काही सांगे खाण खुण ||७||
  नव्हे पुराणिक | करणे सांगणे आणिक ||८||
  नेणे वाद घटा पटा | करिता पंडित करंटा ||९||
  नाही जाळीत भणदी | उदो म्हणोनि आनंदी ||१०||
  नाही हालवीत माळ | भोंवते मेलवुनि गाबाळ ||११||
  आगमीचे नेणे | स्तंभन मोहन उच्चाटणे ||१२||
  नव्हे यांच्या ऐसा | तुका निरयवासी पिसा ||१३|| (१३७)

  वरील आत्मकथनातून आपण कोण आहोत? आणि कोण नाही आहोत? याविषयी तुकाराम अतिशय प्रांजळपणे आपली भूमिका स्पष्ट करतात. आपण कोण नाही, हे सांगताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या पुढील प्रकाराचा निषेधच केला आहे. लोकांच्या फसवणुकीसाठी कपट कारस्थान करणे, लोकांना जडीबुटी देणे, चमत्कार दाखवणे, शिष्य करून घेणे, मालकीचा मठ असणे, मालकीची जमीन असणे, देव्हाऱ्ह्यात पुजेची उपकरणे, पूजा द्रव्यांचा पसारा असणे, वेताळ प्रसन्न असणे, आचार विचारात विसंगती असणारा पुरोहित असणे, भंदे खेळणारा देवी भक्त असणे, घटाकाश, पटतंतू विधी करणारा वैदिक असणे, करंटा विद्वान असणे, माळ ओढणारा जपी असणे, जारण मारण, उच्चाटन, मोहन करणारा मांत्रिक, तांत्रिक असणे.

  वरील सर्व प्रकार हे तद्दन खोटे असल्याने कर्मकांडी स्वरुपातल्या त्या अंधश्रद्धाच आहेत. त्यांचा धिक्कार करणारे तुकाराम खरोखर पारदर्शी व्यक्तिमत्वाचे आहेत. एवढा एक अभंग अनिष्ट प्रथा, परंपरा, रूढी, चालीरीती, कर्मकांडे ह्या सर्व प्रकारच्या अंधश्रद्धांना मूठमाती देण्यास पुरेसा आहे. आपल्या घणाघाती प्रहाराने तुकारामांनी त्याचा चक्काचूर केला आहे.

  पण यातली गम्मत अशी की, जे तुकाराम 'मला चमत्कार दाखवता येत नाही' असे प्रांजळपणे सांगतात. त्यांच्याच नावावर 'सदेह वैकुंठगमना' चा चमत्कार लोकांनी खपवावा, हा हास्यास्पद प्रकार असून धक्कादायकही आहे, तसाच तो तुकारामांवर अन्याय करणाराही आहे; पण चमत्कार वेड्यांना त्याचे काय?

  ReplyDelete
 18. साध्वीवर होती "जोशी"ची वाईट नजर?

  हे पाहा संघाचे संस्कार

  साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक सुनील जोशी याची वाईट नजर होती आणि जोशी याच्या हत्येमागे ते एक प्रमुख कारण होते, अशी खळबळजनक बाब एनआयएच्या तपासातून पुढे आल्याचे सांगण्यात येत आहे.

  २००७ मध्ये झालेल्या सुनील जोशीच्या हत्येप्रकरणी मध्य प्रदेशमधील देवास पोलिसांनी आधीच साध्वी प्रज्ञा हिच्यावर आरोप ठेवलेले आहेत. आता एनआयए या प्रकरणात आरोपपत्र दाखल करणार असून साध्वीचे नाव पोलीस आणि एनआयए अशा दोन्ही तपास यंत्रणांच्या आरोपपत्रात असणार आहे.

  'इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, जोशीची वाईट नजर साध्वीवर पडली होती. तो तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. शिवाय अजमेर बॉम्बस्फोटाबाबत जोशी सर्व माहिती उघड करेल, अशी भीती साध्वीला होती. त्यातूनच जोशीची हत्या घडवून आणण्यात आली असावी, असा एनआयएच्या तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

  २९ डिसेंबर २००७ रोजी सुनील जोशी याची हत्या करण्यात आली होती. राजेंद्र आणि लोकेश या दोन आरोपींनी ही हत्या केली होती. हे दोघे आणखीही कटात सामिल होते. मुस्लिमांवर आणखी हल्ले करण्याची योजना ते आखत होते, असेही एनआयएच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

  ReplyDelete
 19. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात पुणे पोलिसांकडून प्लॅँचेटचा वापर झाला. याप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांनी प्लॅँचेट मार्फत खुनाचा तपास शक्य आहे, असे समर्थन जाहीर केले आहे. ते खरे असल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती भटकर यांना प्लॅँचेट करून खुनाचा तपास करावा, असे आव्हान देत आहे.

  ‘अंनिस’चे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील. डॉ. हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार यांनी याबाबात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाच्या तपास करण्यासाठी प्लॅँचेट करणाऱ्यांची मदत घेण्यात आली, ही बाब अत्यंत निषेधार्र्ह आहे. घडलेल्या प्रकाराला जबाबदार घटकांशी चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका ‘अंनिस’ने घेतली असताना प्लॅँचेटमुळे खुनाचा तपास शक्य आहे, असे वक्तव्य विजय भटकर यांनी केले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात मान्यता मिळविलेल्या व्यक्तीकडून अशा प्रकारचे समर्थन समाजासाठी दिशाभूल करणारे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रतारणा करणारे ठरते.

  विजय भटकर यांनी प्लॅँचेट प्रकाराने खुनाचा तपास करणे शक्य असल्याचे सिद्ध करावे, असे आव्हान अंश्रधद्धा निर्मूलन समिती करीत आहेत. याबरोबरच कुठल्याही चमत्कार व अतिंद्रिय शक्तीचा दावा करणाऱ्या व प्लॅँचेटमार्फत तपासाच्या सिद्धतेसाठी अंनिस २१ लाखांचे बक्षीस देण्यास तयार आहे, असेही पत्रकात नमूद केले आहे.

  ReplyDelete
 20. अहो डॉ. विजय भटकर, तुम्ही असे वो कसे. तुम्ही विज्ञानाचे विद्यार्थी ना! असे अंधश्रद्ध होऊन कसे चालेल? तुमचे "सुपरकॉम्पुटर" मधले ज्ञान खूप असेल, ते असायलाच हवे. याचा अर्थ तुम्ही अडाणी माणसासारखे काहीतरीच बरळत बसला आहात! हे बरे नव्हे! हल्ली अडाणी लोक सुद्धा असे तुमच्यासारखे बरळत नाहीत हो! मराठा ना तुम्ही, मग असे ब्राह्मणळ्यागत काय करत आहात? वय झाले तुमचे, आता तरी सुधारा स्वतःला नाहीतर लोक म्हणतील "हा शिकून सवरून सुद्धा अंधश्रद्ध आणि अडाणीच राहिला". लक्षात ठेवा "विज्ञाना बरोबर अध्यात्माची सांगड घालणे कदापि शक्य नाही, आणि ते योग्य सुद्धा नाही!".

  ReplyDelete
 21. दाभोलकर कुटुंबीयांनी यांनी जे सोसले आहे ते असामान्य आहे
  आपले विचार सर्वदूर पोचविण्यासाठी त्यांचे प्रयत्न अजूनही चालू आहेत
  मात्र अमोल पालेकर सारख्या संधिसाधू लोकाना यापासून दूर ठेवालेले बरे - त्यांनी अगदी तरुण वयात आपल्या बायकोला न्याय दिला नाही - त्यांनी असल्या समाज कार्यात न गुंतणे बरे - समाज आपल्याला ढोंगी समजतो इतकी तरी अक्कल त्यांना असायला पाहिजे
  त्याउलट नसरुद्दिन शहा सरांची गोष्ट आहे त्यांचे विचार आणि आचार यात एकसूत्रता आहे - परंतू शबाना आझमी आणि नाना पाटेकर , अमोल पालेकर असल्या ढोंगी लोकांनी उगा आपला आव आणून नक्राश्रू धालू नयेत आणि लोकांनीही असल्यानं थारा देऊ नये !

  ReplyDelete
 22. मित्रांनो मिडिया जे सांगत ते सर्व खर आणि बरोबर असते का? आपला अनुभव काय आहे?
  संजय सर तुम्ही हे स्वत: ऐकल पाहिलं होत का?
  स्वत: डॉ. विजय भटकर यांनी दैनिक लोकमत मध्ये एक लेख लिहिला आहे तो तुम्ही वाचायला हवा होता. या लेखात ते म्हणतात
  "माझ्या वक्तव्याचा प्रसंग असा होता, की डॉ. मेधा खासगीवाले यांच्या ‘आत्म्याचा प्रवास व मृत्यूपश्‍चात जीवन’ या मराठी व इंग्रजी अनुवाद केलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनाचा तो प्रसंग होता. मी पुनर्जन्म आणि मृत्यू या विषयावर बोलत असताना एकूण विषयाच्या संदर्भात आलेला तो उल्लेख होता. त्यातही प्लँचेट या विषयावर खूप चर्चा सुरू असल्याने त्याचा संदर्भ देत, ‘या प्लँचेट प्रकरणाचे गूढ उकलण्यासाठी आता नव्याने प्लँचेट करावे लागेल,’
  असे केवळ उपहासाने, विनोदाने म्हटले होते; परंतु त्याचाही विपर्यास झाला. मी एका व्यापक अशा विषयावर विशिष्ट संदर्भात बोलत असताना समग्र विषय समजून न घेता केवळ त्यातील एक तुकडा उचलल्याने हा विपर्यास झाला आहे. "
  http://www.lokmat.com/storypage.php?catid=29&newsid=536

  ReplyDelete
 23. आप्पा - कहर झाला
  बाप्पा - अगदी अन्यायाची परिसीमा झाली
  आप्पा - डॉ भाटकर यांच्यावर टीका करून संजयने महापातक केले आहे
  बाप्पा -आपले सदर वाचनीय होण्यासाठी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला हि वृत्ती बरी नव्हे
  आप्पा- अशाने संजयाच्या सच्चेपणाबद्दल शंका येऊ लागते
  बाप्पा - खरेतर संजय असा नाही , मग हा कोणाच्या मोहाला बळी पडला ?देव जाणे !
  बाप्पा - लोकमत मधील डॉ विजय भाटकर यांचा खुलाशाचा लेख वाचला आणी त्यांच्या कर्तृत्वाची भरारी किती मोठी आहे ते लक्षात आले
  आप्पा- या सोनावणीला एक निर्लज्ज आणि कोडगी सवय आहे - सदासर्वदा भडक प्रतिक्रिया देत राहायचे !कुणी वंदा वा निंदा - हाच याचा धंदा -एक विचित्र विकृती दिसते त्याच्या लिखाणात -
  बाप्पा - किती थोर विचार मांडले आहेत डॉ विजय भाटकर यांनी , ते सतत कोणत्या विचारात मग्न असतात ते त्यावरून लक्षात येते
  आप्पा - नाहीतर संजय - डॉ नारळीकर यांच्यावर टीका झाली - का तर त्यांना याने पाठवलेले यांचे बाड त्यांनी न उघडता परत पाठवले !म्हणून ! ते एकदम वाईट झाले
  बाप्पा - यांनी जी पोर्सोर भोवती जमवली आहेत ती तर अगदीच आचरत आहेत
  आप्पा- बुद्धीप्रमान्य वगैरे यांच्या बाबतीत अशक्यच - याउलट विजय भाटकर यांची लेखाची न्मांदानी किती बुद्धिनिष्ठ आहे बघा जरा इतक्या थोर माणसाबद्दल असे हीन उद्गार काढायला सोनावणीला लाज कशी वाटत नाही ?

  ReplyDelete
 24. डॉ विजय भाटकर यांनी समयोचित खुलासा केला आहे
  त्यांचे मनः पूर्वक अभिनंदन !

  आज डॉ दाभोलकर यांच्या नंतर अंनिस दिशाहीन झाली आहे त्यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी जमलेले लोक हे तो दिवस साजरा करायला जमल्यासारखे वाटत होते चळवळ जर खेडोपाडी रुजली असेल तर तिथून हजारो लोक येणे अपेक्षित होते ,
  पण हे प्रकरण उच्च्च्भ्रु लोकांच्या ताब्यात गेलेले दिसले डॉक्टरांचे कार्य जर खोलवर रुजले असेल तर समाजाने त्यांचे ऋण म्हणून गर्दी करणे अपेक्षित होते पण तसे दिसले नाही
  आज शबाना आझमी -अमोल पालेकर यासारखे टिनपाट उच्चभ्रू अशा कार्यक्रमात मिरवून घेतात
  राष्ट्र सेवा दल हे तर कशावरही गाणी रचते आणि गाते
  सखोल विचार करून आरडा ओरडा न करता डॉ दाभोलकर यांच्या स्मृतीला वंदन करता आले असते
  पण अगदीच घोषणाबाजी करून विषयाचे गांभीर्य संपले

  डॉ भाटकर यांनी यापुढील त्यांच्या लिखाणाबाबत उल्लेख केला आहे त्याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे कारण त्यांनी याविषयात जो आवाका दाखवला आहे तो अफाट आहे - त्यांच्या कडून खूप अपेक्षा आहेत संजय सारख्या धेडगुजरी लोकांनी विषयाचे ज्ञान आणि जाण नसेल तर निदान तोंड बंद ठेवावे ही किमान अपेक्षा आहे संजय सारख्या लोकांकडून अभ्यासाची आणि चिंतनाची अपेक्षाच नाही
  निदान दुसऱ्याच्या पायात पाय घालू नये

  ReplyDelete
 25. अहो संजय सोनावणी ,
  तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे की तुम्ही प्रत्यक्ष ऐकले किंवा पाहिले होते का ?
  नसेल तर बेधडक आपण असा लेख लिहिणे किती उर्मट पणाचा उद्योग ठरतो ते आपण जाणताच
  संजय सोनावणी यांनी खरेतर माफी मागितली पाहिजे
  पण अशी मागणी केल्याने त्यांना अवास्तव महत्व दिल्या सारखे होईल
  इतक्या थोर सत्पुरुषा विषयी असे लिहायला आपणास कशी कुबुद्धी कामी आली ?
  आपण काही दिवस अंतर्मुख होऊन चिंतन करा
  आपण किती गैर वागत गेलो आहोत ते बघा - आपल्या चुका सुधारा -आणि जितके स्वतः ऐकले वा पाहिले तितकेच खरे मना
  डॉ भाटकर यांचा लोकमत मधील लेख आपण वाचा -त्यातून उपरती झाल्यास त्यांची मोकळ्या मनाने क्षमा मागा !

  ReplyDelete
  Replies
  1. @Anonymous August 23, 2014 at 12:26 AM,
   Anonymous August 23, 2014 at 2:50 AM,
   Anonymous August 23, 2014 at 3:14 AM and
   Anonymous August 23, 2014 at 3:27 AM,

   म्हणजेच कोब्रा! तुला आग्र्याच्या मेंटल हॉस्पिटल मद्ये डॉक्टरांनी ताबडतोब बोलाविले आहे, जा लवकर, उपचार फुकटात होणार आहे !


   Delete
 26. तपासात ‘प्लँचेट’चा वापर गैर नाही!

  म. टा. प्रतिनिधी, पुणे

  डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासासाठी 'प्लँचेट'चा वापर करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेचे ज्येष्ठ कम्प्युटरतज्ज्ञ डॉ. विजय भटकर यांनी रविवारी समर्थन केले. 'परदेशात पोलिसांकडून तपास करताना आवश्यक वाटल्यास अतिंद्रिय शक्तींच्या वापराची शक्यता विचारात घेतली जाते. पोलिसांकडून तपासाचा भाग म्हणून 'प्लँचेट'चा वापर केला जाण्यात काही गैर नाही,' असे मत डॉ. भटकर यांनी मांडले. मात्र, याबाबतचा कोणताही वाद आपल्याला ओढवून घ्यायचा नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

  पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात 'प्लँचेट'संदर्भातील एक ओझरता उल्लेख करण्यात आला होता. त्याचा धागा पकडून 'मटा'च्या प्रतिनिधीने डॉ. भटकर यांच्याशी संवाद साधला. डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासातील 'प्लँचेट'चा वापर, त्याच्या विरोधात आंदोलन पुकारण्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा इशारा, आदींचा संदर्भ घेत डॉ. भटकर म्हणाले, 'पोलिसांकडून तपास करताना सर्व शक्यतांचा विचार केला जातो. श्रद्धा-अंधश्रद्धेचा मुद्दा बाजूला ठेवून विचार केल्यास प्लँचेटचाही तपासासाठी वापर केला असल्यास वावगे नाही, असे माझे व्यक्तिगत मत आहे. अतिंद्रिय शक्तींच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींचा अनुभव मी घेतलेला आहे. आत्मा ही संकल्पना नाकारता येत नाही.'
  ------------------------------------------------> डॉ. भटकर हे मराठा असून सुद्धा त्यांचे विचार लंपट बामनांना लाजविणारे असेच आहेत. कदाचित तो संगतीचा परिणाम ही असू शकतो! आपण लोकांच्या मधील अंधश्रद्धा संपविण्याचे काम करायचे की वाढविण्याचे ते भटकर यांच्यावरच सोडून देवू या! अध्यात्म वगैरे भोंगळ कल्पनांच्या मागे हा माणूस का धावतो आहे, हे समजायला मार्ग नाही. "धरल तर चावतंय व सोडलं तर पळतंय" अशी अवस्था भटकर यांची झाली आहे.

  ReplyDelete
 27. डॉ. विजय भटकर मराठा जातीला काळीमा फासू नका, पुण्याच्या पाण्याचा स्वतः वर परिणाम होऊ देऊ नका! म्हणजे कमावले!
  वर कुणीतरी त्याना "ब्राह्मणळ्यागत" वागू नका असे म्हटले आहे, ते योग्यच आहे.
  शास्त्रज्ञ असल्या सारखे वागा, बुवा-बाबा सारखे नव्हे! बघा डोक्यात काही प्रकाश पडला तर!

  ReplyDelete
 28. आपण त्याना जेष्ठ संगणक तज्ञ म्हटले मग ते खरेच असणार. आम्ही या तज्ञांच्या सहवासात २.५ वर्षे काढली. या महामानवाने परम मध्ये काय केले ते आम्हाला कधीच सांगितले नाही. आमचे एक सहयोगी त्यांच्या कचेरित दोन चार वेळा जाऊन आले तेव्हा त्यांच्या समोरील संगणक बंद होता म्हणे. त्यामुळे ते अदृश्य प्रतिमांवर काम करून नवीन तंत्रज्ञान निर्माण करीत असावेत. आमच्या सारखे क्षुद्र संशोधक आपले संशोधन जरनलस मध्ये प्रसिद्ध करतात. पण त्यांच्या सारख्या जेष्ठ तज्ञाला फक्त अतींद्रिय माध्यमे बरी वाटतात. पुण्यात यांचे धंदे बरे चालतात. तिथे अनेक पद्मश्री आहेत व त्यानी आपले असोसियेशन बनवले आहे. स्वतःचे ब्रॅँडिंग ते स्वतःच करतात आणि आपले नाव संस्थाशी वगैरे जोडतात. तेथून त्याना चारापाणी मिळतो. वाव दिल्यास ते संस्थेमध्ये ढवळा धवळ करून त्याची वाट लावतात. धन्य ते पुणेकर आणि धन्य ते भटकर!

  ReplyDelete
 29. वादग्रस्त विधान करायचे आणि मग "मला वाद ओढवून घ्यायचा नाही" असे म्हणून शेपूट घालायचे हे नेभळटपणाचे लक्षण आहे. जाहीरपणे विधान करायचेच असेल तर प्रतिवादाला सामोरे जाण्याची तयारी हवी.

  ReplyDelete
 30. जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत डॉ. विजय भटकर यांचेवर गुन्हा दाखल करता ऐईल का?

  ReplyDelete
 31. भटकर स्वतः ला संगणक पुरते मर्यादित राहू देतील अशी आशा. इतरत्र लूड बूड न केलेली बरी!

  ReplyDelete
 32. काय चालले आहे! भटकर यांचे वक्तव्य आणि खालील प्रतिक्रिया पाहून प्रश्न पडतो की आपण खरेच संगणक युगात आहोत का? भटकर तुम्हाला नक्की काय म्हणायचे होते? ते लवकर स्पष्ट करा, नाही तर तुमच्याबाबतचा जो काही आदर आहे लोकांमध्ये तो हवा होईल.

  ReplyDelete
 33. अतिशय बेजावदार वक्तव्य! विजय भटकर यांचा निषेध! विजय भटकर यांच्यासारख्या प्रसिध्द संगणक तध्नाने असे बेजवाबदार वक्तव्य करून महाराष्ट्राची मान शरमेने खाली घातली आहे. मंगलयान यशस्वी व्हावे म्हणून बालाजी पुढे साकडे घालणारे इस्रो चे प्रमुख व विजय भटकर यांच्यात फरक काय? वरीष्ठ पदांवरील ही मंडळी अशी अक्कल गहाण टाकत असतील तर यांच्याकडून समाजात काय संदेश जातो.

  ReplyDelete
 34. मूर्खपणाचा कळस. भटकर सर, तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते!

  ReplyDelete
 35. गैर म्हणजे बेकायदेशीर की मूर्खपणाचा? अशा प्रकारांवर विश्वास ठेवून चौकशी करू लागलो तर चेटकिणी इत्यांदीची मदत घेणे. चेटुक केल्याच्या नावाखाली जाळणे वगैरे सर्व प्रकारच्या कृत्यांनाही गैर म्हणता येणार नाही. विजय भटकरांकडून तरी अशा विधानांची मी अपेक्षा करू शकत नव्हतो. कदाचित मी चुकीचे वाचले असेल अथवा वृत्त चुकीचे असेल असे कुठे तरी वाटू लागते.

  ReplyDelete
 36. ह्यांचे नावच भट कर आहे तर आत्मा हे सांगणारच. आत्मा ही संकल्पना नाकारता येत नाही मग आता स्वीकारायची कशी हे पण सांगा.

  ReplyDelete
 37. ह्यांचे नावच भट कर आहे तर आत्मा हे सांगणारच. आत्मा ही संकल्पना नाकारता येत नाही मग आता स्वीकारायची कशी हे पण सांगा.

  ReplyDelete
 38. भटकर, धन्यवाद! तुम्हाला काय झाले? कशाला प्रसिध्दी साठी काहीही बोलताय!

  ReplyDelete
 39. भटकर तुम्ही संगणकतज्ञ आहात की देवर्षी, की बंगाली बाबा, की तांत्रिक ते तरी सांगा.

  ReplyDelete
 40. आम्ही ठरवलं आणि आईच्यान सांगतो बगा , थोड कामबी केलं
  पण काय सांगू बाबा तुला ,

  ही शेंडीवाली लोकं फार हलकट - त्यांनी इचारल्यावर आमच्या गोट्याच कपाळात -
  तुमीच काई तरि सांगा आमास्नी
  ते जानवेवाले काय म्हन्यात - आमाला एकदम मान्य म्हने तुमच बोलन - पर एक सांगा - हिंदू धर्माची आदिकृत का काय ते साईत्य काय ते स्टान्डरड म्हणत्यात ते पुस्तक कुटे मिळणार अन त्याची नाव तरी काय ?
  झाली का आमची बोलटी बंद - नाइतर काय हो
  ते म्हंत्यात तुमच्या पत्रात ४ नंबर आन५ आनि ६ नंबरला काइतरि खोट हाये तपासून बागा म्हंत्यात - काय तर म्हणे
  संडासला जाउन आल्यावर पाय न धुता पूजेला बसल तर काय झालं - त्यात काय वंगाळ हाय ?
  देव आनि परमेषर याजर अन्द्शरद्दा अस्त्यील तर मामलाच संपला म्हणत्यात -
  आणि म्हणत्यात कसे - बोम्बालायाला इत हाय तरी काय सांगायला - उगीच आपल लिहित बसलाय हा बिनबुडाचा अनामिक !
  त्यापेक्षा आपल्या अविनाशला किंवा त्या पापडी तळणाऱ्या डाव्यांच्या सारंगाला बोलवा म्हनत्यात ते काई तरी अर्थ सांगतील याचा !
  अवो त्यांच्यात म्हणजे जैन मुसलमान आणि बौद्धात पण बगा अठरा पगड जाती हायेती
  कसाई मुसलमान येगला , सय्यद वेगला , कासार पण येगला , तांबोळी पण त्यांची दुसरीच येगळी मशीद - बांग देनारेबी येगले - ते म्हणे हाजी लागत्यात , म्हणजे सगळ आपल्या सारखाच - बुद्ध बी तसलेच - महायान हीनयान वज्रयान आणि नवबौद्ध एक न्हाइत म्हणे - जैनात म्हणे असंख जाती हायेती श्वेतांबर आहे दिगंबर हाये - त्यांच्या बामणांची नी आचार्यांची लई नाटक असत्यात - त्यांची तोंड फडक बांधलेली ,आणि नागद्यांनी हिंडत्यात - ते कशाला कुणास ठाव ?
  गोव्यात पण किरिस्ताव लोकात पोटभेद पोत्यांनी हायेत - मग खर काय ?

  आपला पांडुरंग बारा कि म्हनात्यो मी - कुनीबी कस बी या - त्यो प्रेमान जवळ घेतो -आता तुमीच कंटाळा न करता सांगा मला कि खर काय ? मला अस वाऱ्यावर सोडून जाऊ नका !आमालाबी भावना आहेत कि हो !आमीबी देव शोदायाला निघालोतो - पण मग फा फापट पसारा तर सगळ्याच धर्मात हाये ! पार तितबि संजय सर छलायला येतात - ते म्हणत्यात की म्हणे आपला पांडुरंग हा खरा शिवाच हाये - म्हणजे तुकाराम जन्म्भार घसा कोरडा करून नाचला - ते उगाच की काय ?
  संजय म्हणतो की आपला पांडुरंग मुळात शिव आहे - हे नवीनच -
  आमि शिम्पल करून सांगू का - तुमी बाबानो मोठ्ठी मानस - हात जोडतो पण आमचा हा पांडुरंग आमाला सोडा - अहो आमचा श्वास हाये तो - असं त्याचं उण डूण काढू नका !तुमची लाथाळी चालू द्या आमच कायबी म्हनन नाय
  हेचि दान देगा देवा तुजा इसारण व्हावा

  ReplyDelete
 41. @Anonymous August 24, 2014 at 1:03 AM

  हा काय आगावपणा?
  पुन्हा आला हा ग्यान गेलेला!

  ReplyDelete
 42. सत्तेचा माज आणि हिंदुत्वाची खाज!

  खाज येणे हा तसा शरीराचा धर्मच, पण यात एक गंमत आहे, तुम्ही शरीराची जास्तीत जास्त काळजी घेत असाल व ते स्वच्छ ठेवत असाल तर खाज येत नाही, पण याच्या उलट जर शरीराच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलात व शरीर घाण करत गेलात तर खाजही वाढत जाते. थोडक्यात खाज येणे हे शरीराच्या दुषीत व दुर्गंधीचे लक्षण आहे. मग ही घाण वाढत गेली की नुसती खाजच येत नाही तर गजखरण होते. त्याचाही पुढचा टप्पा म्हणजे खरुज होते. तर अशा नाना आजाराची सुरुवात होते ती मात्र खाजेतून... अन खाच येण्याच्या मुळाशी असते ती म्हणजे घाण!
  अशीच खाज सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजाना येऊ लागली आहे. ही खाज जरी आज आली तरी खाजेच्या मुळाशी असलेली घाण अनेक दिवसांपासून साफ न केल्याच्या हा परिणाम आहे. शरीराची घाण साफ करणे जसे गरजेचे असते अगदी तसेच विचाराची/मनाची घाणही साफ करायची असते. ती वेळीच केली नाही तर कधी ना कधी त्याची खाज व नंतर दाद (म्हणजेच गजकरण) होऊन बसते. मग हे खाजग्रस्त व दादग्रस्त लोकं आपला आजार इतराना लावत फिरतात. मग अनेक दादग्रस्त एकत्र येऊन एखादी सभा घेऊन दादग्रस्त असणे हेच खरे मणूष्य असण्याचे लक्षण असल्याचा दावा करतात. सध्या असा दावा करत फिरणारे दादग्रस्त इसम म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वेसर्वा मोहन भागवत होत ज्याना हिंदुत्वाची खाज सुटली असून सगळा भारत हिंदू असून ईथला प्रत्येक माणूस हिंदू असल्याचा दावा ते आपल्या खाज सभांमधून करत आहेत.
  cont....

  ReplyDelete
 43. मोदी निवडूण आल्या पासून संघाला मोठा चेव आला असून नको त्या कागाड्या करण्याची दुर्बुद्धी उसळी मारुन येताना दिसते आहे. मागच्या काही दिवसात संघाच्या एकूण वागण्याचा पॅटर्न अभ्यास केल्यास हा मोदीच्या निवडीचा परिणाम आहे असे दिसते. निवडणूक जिंकल्याचा आनंद होण्यापेक्षा जातीय मग्रूरीचे दर्शन संघाच्या सर्व पातळीवर अधोरेखीत होऊ लागले आहे. मोदीची सर्वोच्च पदी निवड म्हणजे भारतीयानी संघीय विचारधारेवर केलेला शिक्कामोर्तब असा गैरसमज संघाने करुन घेतला हे स्पष्ट दिसते आहे. याच्या जोडीला मुस्लीम आतंकवाद नि कट्टरपंथीय ईस्लामीकता याच्या विरोधात रान उठविल्यास हिंदूत्वाची गाठ अधिक घट्ट होत जाईल हा सुद्धा संघाच्या गोटातील एक वर्केबल तर्क आहे. थोडक्यात भाजपच्या विजयानी संघाचा आत्मविश्वास बळावला असून भारतीयानी हिंदुत्वाला मान्यता दिली असा गोड गैरसमज संघाने करुन घेतला आहे.
  त्यातूनच हिंदूत्वाचा अजेंडा आता मोठ्या जोमाने चालविला जात असून अनेक आघाड्यावर जिथे जे प्रभावी साधन वापरता येईल ते वापरले जात आहे. सुब्रम्हणीयम स्वामिने ’शंखनाद’ नावाची संघटना उभी करुन देश पातळीवर हिंदुत्वाचा प्रचार चालविला आहे. अत्यंत कडवे हिंदूत्ववादी तयार करण्याची जबाबदारी या शंखनादने उचलली असुन सुब्रम्हणीयम सारख्या प्रचंड ताकदिच्या व्यक्त्याने हिंदुत्वाच्या पुनर्बांधणीसाठी अक्शरशा स्वत:ला झोकून दिले आहे. तोगडीया व सिंघलच्या संघटना तर आहेतच पण त्याच्या जोडीला फेसबूक व ट्विटर वरुन अनेक हिंदुत्ववादी मोहीमा उघडण्यात आल्या. या सगळ्याचा एकत्रीत परिणाम म्हणून मोदी निवडून आले असा या सगळ्या हिंदुत्ववाद्यांचा समज आहे. म्हणून त्याना असेही वाटू लागले आहे की हा देश आता हिंदूत्वाकडे झुकू लागला असून मोदीची निवड ही त्याची पहिली पायरी आहे. अन त्याचाच परिणाम म्हणून मोहन भागवत सारखे हिंदुत्ववादी नेत्याना हिंदूत्वाची खाज सुटली आहे. मग हे नेते जे आजवर बंद दरवाजातील मिटींगामधून खाजवून घेत असत आता खुल्लम खुल्ला सभांमधून हिंदूत्वाची खाज खाजवून घेताना दिसू लागली.
  मोदीच्या विजयामुळे हिंदुत्वाची खाज सुटलेले हे नेते जो काही तर्क लावत आहेत तो अतिउत्साहाचा परिणाम आहे. मोदीच्या विजयात हिंदुत्ववाद्यांचा नक्कीच वाटा आहे पण याआधीही या सर्व हिंदुत्ववादी संघटना भाजपसाठी काम करायच्याच की? तेंव्हा तर असे यश कधीच आले नाही. मग अचानक असा कोणता बदल झाला ज्यामुळे भाजप रेकॉर्डब्रेक विजय मिळवून गेला? याचा जरा शांत डोक्याने विचार केल्यास विजयाचे गमक कळेल. भारतीय जनता कॉंग्रेसच्या भ्रष्ट व उदासीन राजकारणाला विटून गेली होती. घराणेशाहीमुळे संसदीय प्रणालीची रोज होणारी कत्तल व असंवेदनशील शासन यातून मतदारानी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी मोदीला मत दिले हे आहे खरे कारण. म्हणजे भाजप वा मोदीची निवड हा हिंदुत्वाला दिलेला कल नसून कॉंग्रेसच्या विरोधातील रोषप्रकटीकरण होते. पण हिंदुत्ववाद्यानी मात्र उलटाच अर्थ लावला. त्यांचे तर्कशास्त्र असे सांगते की भाजपच्या अजेंड्यावर विकास तर होताच, पण राममंदीरही होते. म्हणजे मोदीनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊनच निवडणूक लढवली व जनतेने मत दिले... याचा अर्थ हे मतदान हिंदुत्वाच्या समर्थनार्थच आहे असा गोड निष्कर्ष हिदूत्ववाद्यानी काढला आहे.

  ReplyDelete
 44. मग हिंदुत्वाची साचलेली घाण काही पटीत वाढते व त्याचा परिणाम म्हणून हे हिदूत्ववादी नेते जागोजागी खाजवताना दिसतात. मोहन भागवतानीसुद्धा नेमका वरील गैरसमज करुन घेतल्यामुळे ते जातील तिथे खाजवून घेताना दिसत आहेत. मग त्यांच्या विचाराना व तत्वज्ञानाला आदर्श मानणारे चिल्ले पिल्लेही या घाणीत मनसोक्त लोळल्यामुळे सर्वत्र खाजवत हिंडताना दिसत आहेत. एकुण काय तर हिंदुत्ववादाची खाज सर्वत्र पसरविण्याचे काम संघ व संघाची पिल्लावळ मोठ्या जोमाने करत आहेत. ही खाज जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहचेल तेवढा संघाचा फायदा असा गैरसमज करुन घेतलेले नेते खुद्द रिंगणात उतरुन खाजेचा प्रचार करत आहेत. मोदी सत्तेत आल्या नंतरच अचानक ही जी खाज सुटली ती सुटलीच मुळात चुकीच्या गृहितकावर. हिंदुत्ववाद्यानी मांडलेले तर्कशास्त्रच मुळात चुकले असून तेच त्यांचा घात करुन जाणार आहे. मोदीला मिळालेले बहुमत म्हणजे हिंदूत्वाचे समर्थन ही खिचडी संघाच्या भटारखाण्यात रांधली गेली. मग संघाच्या भटारखाण्यातून ज्यांच्या मेंदूला खाद्य मिळते त्याना ही खिचडी खाऊन आनंदाच्या उकड्या फुटू लागल्या. त्यामुळे मग भागवता सारखे अर्धे हळकुंडाने रंगणारे हा देश हिंदूचाच म्हणायला मोकळे झालेत.

  मोदीला मिळालेले जनमत हिंदुत्वाच्या समर्थनार्थ नसून ते एका निष्क्रीय शासनाच्या विरोधातील रोषप्रकटीकरण होते हे हिंदुत्ववाद्यानी ओळखावे. न ओळखता आपल्याच गुर्मीत हिंदुत्वाची खाज खाजवत बसलात तर मात्र सत्तेचा माज व हिंदुत्वाची खाज उतरविण्याचे काम जनता करेल.
  End.

  ReplyDelete
 45. मोहन भागवताचे “अविवेकी” भागवत पुराण

  मोदी सरकार सत्तेवर येताच राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे फारच उत्साहित झालेले दिसतात. मोदी सरकारच्या येत्या पाच वर्षाचा काळात “संपूर्ण भागवत पुराण” लिहिण्याची त्यांना फार घाई झालेली दिसते. त्याचाच भाग म्हणून पुराणांवर आधारित भारताचा नवा इतिहास लिहिण्याचे आदेश त्यांनी आपल्या संघीय इतिहासकारांना दिलेले आहेत. जगातील संपूर्ण धर्मांना गिळंकृत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही त्यांनी अलीकडेच मारली असून या देशाचे नाव भारत असणे हे त्यांना मान्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या देशातील सर्व जनता ही हिंदू असून त्यांनी
  स्वत:ला हिंदुस्थानी म्हटले पाहिजे असे जबरदस्तीवजा आवाहन त्यांनी केले आहे. तर हिंदू व्यतिरिक्त इतरांना ते दुय्यम दर्जाचे नागरिक समजतात.
  मोहन भागवताचे वरील आवाहन हे पूर्णत: संविधान विरोधी आहे. संविधानामध्ये “हिंदुस्थान” या शब्दाला कोणतेही स्थान देण्यात आले नाही. संविधानाच्या अनुच्छेद १ मध्ये स्पष्ट करण्यात आले की, या संघराज्याचे नाव इंडिया, अर्थात भारत असे असेल व हा राज्याचा संघ असेल. याच अनुछेदात (२) (३) मध्ये राज्यांची राज्यक्षेत्रे संपादित केली जातील अशी राज्यक्षेत्रे यांचे मिळून भारताचे राज्यक्षेत्र बनते असेही स्पष्ट केले आहे. तसेच संविधानाच्या उद्देशिकेमध्ये “आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य” असे नमूद केले आहे. त्यामुळे कायद्यानुसार या देशाचे नाव इंडिया वा भारत असे असताना मोहन भागवत हे या देशाला हिंदुस्थान संबोधण्याचे आवाहन करतात. हा या देशाच्या घटनाद्रोहाबरोबरच राष्ट्रद्रोह ठरतो. परंतु या देशाच्या पोलीस यंत्रणेने त्यांच्यावर अजूनपर्यंत कोणताही आरोप ठेवला नाही. या उलट शासन त्यांना सन्मानाने वागवीत आहे. परंतु अरुंधती राय, डाक्टर सेन यांच्यावर प्रशासनाकडून पटकन राष्ट्राद्रोहाचे आरोप लावले जातात. त्यामुळे आजच्या सरकारची स्पष्ट दिशा काय आहे? हे सांगण्यासाठी कोणा गोसाव्याची गरज नाही. cont.....

  ReplyDelete
 46. संघीय लोक व हिंदू तत्त्वप्रणालीला मानणारा मिडिया “भारत” या शब्दाऐवजी “हिंदुस्थान” या शब्दाचा वारंवार वापर करताना दिसतात. ही भूमिका राज्यघटनेतील तत्वाविरोधी असून तो षडयंत्राचा भाग आहे असे मानायला पाहिजे.

  मोहन भागवताचा प्रिय शब्द “हिंदू” या शब्दाच्या उत्पत्ती बाबत अनेक विद्वानांनी संशोधन करून “हिंदू” शब्द परकीय असल्याचे सिद्ध केले आहे. गतकाळातील अनेक भारतीय नेत्यांनी हे मान्यही केले. स्वामी दयानंद सरस्वतींनी (१८२४-१८८३) वेदाकडे परत चला असे म्हटले होते तर अरविंद घोष हे (१८७२-१९५०) वेदांना वैदिक धर्माचे मूळ स्थान मानतात. स्वामी विवेकानंद हिंदू या शब्दाला चुकीचा ठरवीत म्हणतात, the word Hindu is a misnomer; the correct word should be a Vedantins, a person who follows the Vedas.

  भारतीय व विदेशी विद्वानांच्या संशोधनात ‘हिंदू’ हा शब्द कोणत्याही वेदात, उपनिषदात, पुराणात, मनुस्मृती, रामायण, महाभारत, भगवतगीता, जैन धर्म व बौध्द धर्माच्या साहित्यात कधीही आलेला दिसत नाही. महावीर, बुध्द, सम्राट अशोक, चाणक्य, पतंजली, मनु व शंकराचार्य यांनीही हिंदू हा शब्द कधीही उच्चारला नाही वा कोठे कोरून ठेवलेला नाही. तो कोणत्याही पुरातन वैदिक मंत्र उच्चारणात शोधूनही सापडत नाही. मुस्लीम आक्रमणानंतर “हिंदू” या शब्दाचा उदय तर ब्रिटिशांच्या काळात “हिंदुवाद” हा शब्द प्रचलित झालेला दिसतो. त्यामुळे उदयास आलेला ‘हिंदू’ हा पुरातन शब्द नसून त्याला आलेले धर्माचे स्वरूपही आधुनिक आहे. या धर्माला ना धर्मंसंस्थापक आहे ना त्याचा कोणताही धर्मग्रंथ. तरीही हा शब्द बहुजनाच्या मस्तकात टाकण्याची जबरदस्ती मोहन भागवतीय प्रवृत्ती करीत आहे. हा संघीय षडयंत्राचा भाग आहे.
  हिंदुस्थानात राहणा-या प्रत्येकाला हिंदू का म्हटले जात नाही, असा सवाल संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उपस्थित केला आहे. यासाठी त्यांनी इंग्लंडमध्ये राहणाऱयांना इंग्रज, जर्मनीत राहणाऱयांना जर्मन, अमेरिकेत राहणाऱयांना अमेरिकन म्हटले जाण्याचा तर्क दिला आहे. याच तर्काने भारतात राहणा-यांना भारतीय असे संबोधण्यात येत असते. याचे ज्ञान भागवताना नाही काय?. गुलामीदर्शक “हिंदुस्थान” हा शब्द या देशातील बहुजनांना मान्य नाही. तरीही भागवती प्रवृत्ती “हिंदू व हिंदुस्थानीचे” गीत गातात. या देशाला हिंदू राष्ट्र घोषित करायचे व त्याआडून भारतीयावर सनातन धर्मीय “चातुर्वर्णीय व्यवस्था” लादायची हा संघानितीचा एक भाग आहे.
  cont....

  ReplyDelete
 47. जगातील सर्व धर्मांना गीळकृंत करण्याची ताकद हिंदू धर्मात असल्याची दर्पोक्तीही भागवताने मारली. त्यांच्या या दर्पोक्तीमध्ये कसलेही तथ्य नाही. या देशाच्या भौगोलिक परिस्थितिमूळे अरबांनी इंदू/सिंधू नदीच्या पलीकडील सर्व लोकांना हिंदू म्हटले. आणि त्यामुळेच नदी पलीकडे वास्तव्य करणा-या येथील विविध समुदायाच्या लोकांना विशेषत: जैन व बौद्धांना हिंदू लेबल आपोआप लावल्या गेले. फार मागे न जाता स्वातंत्र्यानंतरचा काळ बघितला तर या देशात कोणत्याही मुस्लीम वा ख्रिश्चन वा बौध्द समुहाने हिंदू धर्म स्वीकारला नाही. याउलट लाखो हिंदूचे मुस्लीम, ख्रिश्चन तसेच बौध्द धर्मात धर्मांतरण झालेले बघायला मिळते. हे धर्मांतरण स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी झालेले दिसते. जातीभेद, विषमता, अन्याय व अपमान या दलदलीतून निघून मुक्त जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे धर्मांतरण होय. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कैचीत आदिवासी (आदिम धर्म) सापडलेला दिसतो. हिंदुत्ववादी आदिवासींना “वनवासी” म्हणून संबोधत असतात. त्यांना वनवासी संबोधून त्यांच्या “घरवापसीचा नारा” संघांनी दिला. आदिवासीचे हिंदुकरण करण्याच्या षडयंत्राला आदिवासी समाज बळी पडून आपली मूळ संस्कृती नष्ट करून घेत आहे. याच आदिवासीचे हिंदूकरण करणारे मात्र सरकार व खाजगी कंपन्या जल, जंगल जमीन हिसकावून त्यांना जंगलाबाहेर हाकलून देत आहे. अन्न, वस्त्र व निवारा ह्या प्राथमिक गरजा आदिवासी ज्या जंगलातून पूर्ण करतात त्याच जंगलाच्या बाहेर त्यांना काढण्यात येत आहे. त्याविरोधात मात्र “ब्र” शब्दही काढीत नाही. यावरून संघाला आदिवासीच्या जीवनासी, त्याच्या भूकेशी काही देणेघेणे नाही तर त्यांना केवळ हिंदूची लोकसंख्या फुगन्यासी सबंध आहे.
  मोहन भागवताच्या संघाने या देशाचा इतिहास बदलविण्याचा घाट घातला आहे. गुजरात ही त्यांची प्रयोगशाळा आहे. बालसंस्काराच्या नावाखाली पौराणिक काल्पनिक मिथ हे इतिहास म्हणून कोवळया मनावर बिंबविण्याचा प्रयत्न हा सत्य लपवून ठेवण्याचा अघोरी उपाय होय. रामायण, महाभारतातील कपटी कारस्थाने, महिलावर झालेली चिखलफेक, ब्राम्हणी सामाजिक व्यवस्था, ब्राम्हण वर्गाचे समाजावरचे नियंत्रण व इतरांच्या धर्माचा द्वेष हे विषय शिकवून संघाला (अ)विवेकी समाज निर्माण करून आस्थेला सर्वोच्च स्थान देवून डोके हलविणारी विजय भटकरादी पिढी निर्माण करायची आहे काय?
  विवेकवाद हा 'प्रत्यक्ष प्रमाण अधिक अनुमान' या स्वरूपाचा असतो. विवेकवादाच्या वाटचालीतील महत्वाचे धोरण म्हणजे समाजाचा मनात समतेचे, एकतेचे, विज्ञानवृत्तीचे रोपण करने हे असते. आस्तिक व नास्तिक या वादात न पडता सहयोगी अस्तित्वावाराचा दृढविश्वास व त्यावरची वाटचाल. मोहन भागवताना “विवेक व विवेकवाद” या शब्दाची फार अलर्जी असावी. त्यामुळेच त्यांच्या मनात “अविवेकी विध्वंसाची” पुनरुक्ती नेहमी नेहमी होत असावी. कारण विवेकशून्य माणसेच समाजात व माणसामाणसात विषवल्लीचे रोपण करीत असतात. अशा लोकांना शांतता, विश्वास व सहजीवन नकोसेच असते. तर त्यांना हवी असते अंधश्रद्धा, द्वेषावर आधारित समाजपद्धती व मानसिक दृष्ट्या पाया पडणारी पंगु पिढी. ती निर्माण करण्यासाठी भागवत व त्यांचे संघीय सैनिक आपली सारी हयात घालवीत आहेत. ज्यांना समाजाने शहाणे होवूच नये, त्याने उलट प्रश्न करूच नये असे वाटते तो धुर्तांचा वैमानिक असतो. त्यांचा तर्क व न्याय यावर विश्वासच नसतो. मोहन भागवत व त्याचा संघ आज अशा धुर्तांची भूमिका वटवीत आहे. या अविवेकी “भागवत पुराणाचा” उधळणारा चौखूर वेळेत रोखला नाही तर विनाशाशिवाय दुसरे काहीही हाताला लागणार नाही याचीही खबरदारी घेणे गरजेचे आहे.

  बापू राऊत
  End.

  ReplyDelete