Tuesday, August 26, 2014

खरे मराठी साहित्य...
"खरे मराठी साहित्य अजून यायचेच असून आजवरचे मराठी साहित्य म्हणजे "जेमतेम साहित्य" आहे. साहित्य म्हणजे समाजमनाचा, त्याच्या वर्तमानाचा, भुतकालीन सावटाचा आणि त्यातून निर्माण होणा-या आशा-आकांक्षांचा आरसा असेल तर अपवादात्मग भाग सोडला तर मराठीत सार्वकालिक म्हणता येईल असे साहित्य नाही.

"मराठी साहित्यिक हा अनुभवांच्या स्वनिर्मित मर्यादांच्या चौकटीत अडकवून घेत, ना स्वत:साठी ना वाचकांसाठी लिहित जात प्रसिद्धी आणि पारितोषिके याच त्याच्या जर साहित्यप्रेरणा असतील तर मराठीचे साहित्य हे खपत नाही, वाचले जात नाही या तक्रारी निरर्थक होऊन जातात.

"महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून ते आजतागायत धार्मिक, वैचारिक, सामाजीक चळवळींनी गजबजलेला आहे. त्याचे प्रतिबिंब/विश्लेषन अथवा त्या त्या चळवळी व त्या त्या काळचे सामाजिक मानसशास्त्र कोणत्याही कादंबरीत येत नाही. जे चित्रण आहे ते वरकरणी व वाचकशरण असेच आहे. परंपरावाद्यांनी पुराणकथांतील व इतिहासातील पात्रांचे पुनरुज्जीवनवादी भांडवल केले तर विद्रोहवाद्यांनी त्या पात्रांचे निखळ द्वेषपूर्ण चित्रण केले. यात पात्रे व समाज कोठे होता? अशाने ज्याला आपण "निखळ साहित्य" म्हणू ते कोठे राहते?

"आणि यातून समाजजीवनाला सुदृढ विचारी बनवायची परंपरा निर्माण होते काय? याचे उत्तर आहे आम्ही साहित्यातून भरीव असे काहीही देवू शकलो नाही. त्यामुळे अलीकडच्या सर्वच सामाजिक चळवळीही साहित्यबंधापासून पुरत्या अलिप्त आहेत. त्यांना तत्वज्ञान देतील असे बळ साहित्यिकांत नाही. ते नाही तर नाही, त्यांचे यथास्थित चित्रणही साहित्यात होत नाही.

"जातीअंत हे आदर्श मानले तर चळवळीच जातींत विखुरल्या आहेत. छोटे-मोठे नेते जातींतच आपले अस्तित्व शोधत आहेत. साहित्यिकही त्याला अपवाद नाहीत. आपल्याच जातीच्या चौकडीत साहित्यिक म्हनून मिरवण्यात जर साहित्यिक धन्यता मानत असतील व इतरांकडे उपहासाने पाहत असतील तर साहित्य आणि साहित्यिकाला अर्थ काय राहिला? "दलित" हा शब्द बाबासाहेबांच्या "Broken Man" सिद्धांताशी जवळ जात दलित या संज्ञेत सर्व पुर्वास्पृष्य, आदिवासी, भटके-विमूक्त व श्रमिक-मजूरही आहेत अशी ती व्यापक संज्ञा होती. परंतू ती बरोबर एकाच जातीच्या मर्यादेत साहित्य व तत्वज्ञान म्हणूनही विसावली आहे. त्यामुळे दलित चळवळही भरकटली आहे. नव्या काळाला सुसंगत असे तत्वज्ञान व तसे साहित्य निर्माण करण्यात घोर अपयश आले आहे."सध्या दिखावू चळवळ्यांपेक्षा समाजाच्या मनातच जी सूप्त चळवळ सतत चालू असते ती लिहिली जात नाही, रस्त्यावर सहसा येत नाही, पण तीच खरे बदल घडवते. त्या चळवळीला अजून वैचारिक अधिष्ठाण साहित्यिकांना देता येत नाही हे त्यांचे दुर्दैव!"

"जागतिकीकरणामुळे नातेसंबंधांची फेरआखणी होत आहे. नवे तानतणाव निर्माण होत आहेत. निराधार व वृद्धांसाठी आश्रम वाढत आहेत. पती-पत्नी, भाऊ-बहीण, पिता-माता-पूत्र या नात्यांचे संदर्भ बदलत चालले आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भही झपाट्याने बदलत आहेत. पण आमचा लेखक कोठेतरी हरवला आहे. आम्हाला लेखकाचाच शोध आहे."


( भांडुप (पूर्व) येथे (24/8/14) झालेल्या साहित्य संगीतीतील "आजचे समाज वास्तव-साहित्य आणि चळवळ" या परिसंवादात बोलतांना मी. सोबत माझे मित्र, सा. विवेकचे संपादक रवींद्र गोळे..या संगीतीचे आयोजक. नेटके आयोजन, प्रगल्भ श्रोते यामुळे सहभाग घेतल्याचे खरेच समाधान मिळाले.)

12 comments:

 1. Khare Marathi sahitya kadhi vachayala milel? Ajparyant aapan khote sahitya vachat aalo ahot kay?

  ReplyDelete
 2. Khare sahitya mhanaje te sahitya tar nahi na?

  ReplyDelete
 3. "ते साहित्य" म्हणजे 'आपल्याच जातीच्या चौकडीत साहित्यिक म्हनून मिरवण्यात जर साहित्यिक धन्यता मानत असतील व इतरांकडे उपहासाने पाहत असतील तर साहित्य आणि साहित्यिकाला अर्थ काय राहिला?'

  ReplyDelete
 4. लीळाचरित्र, नामदेवांचे अभंग, भावार्थदीपिका, तुकोबांच्या गाथा ते अलीकडची दलित आत्मकथने म्हणजेच खरे साहित्य, हे आपणास पटत नाही काय? तुमच्या मते मराठीत खरे साहित्य आणि खोटे साहित्य असा काही साहित्य प्रकार किंवा साहित्यभेद आहे काय? कृपया समजावून सांगा!

  अ. र. कोळी.

  ReplyDelete
 5. अरेच्या, आजपर्यंत प्रकाशित झालेली संजय रावांची ८० च्या वरती पुस्तके सुद्धा खरे साहित्य नाही तर खोटेच साहित्य आहे, असेच म्हणावे लागेल! आज पासून सत्ययुग चालू होणार आहे असे आपणास कदाचित वाटत असेल! व आता जे पहिले पुस्तक प्रकाशित होईल तेच सत्ययुगातील पहिले मराठी सत्य साहित्य अर्थात खरे साहित्य असेल? बरोबर ना?

  ReplyDelete
 6. श्री अ र कोळी सर
  आपले इतक्या कमी शब्दात अगदी योग्य आणि परिणाम कारक प्रतिक्रिया दिल्या बद्दल मनापासून अभिनंदन !
  माझ्यापण मनात अगदी हाच विचार आला होता , पण आजकाल मी प्रतिक्रिया देणे कमी केले आहे कारण या ब्लोग वर ठराविक प्रकारे विरोधी मत देणाऱ्याला टार्गेट केले जाते आणि ते सुद्धा अनामिकाच्या तर्फे !
  त्यामुळे या ब्लोग वरील लिखाणा बाबतची विश्वासार्हता अगदी कमी उरली आहे , पूर्वी अनेक जण सुंदर प्रकारे आपले मतभेद दर्शवत असत , आणि स्वतः संजय सोनावणी सुद्धा त्याला समर्पक विचारी प्रतिक्रिया देत असत , एक निरोगी स्पर्धात्मक वाद प्रतिवाद चालत असे , पण आता हे फारच अभावाने दिसते याचे वाईट वाटते
  संजय सर याबद्दल खुलासा करतील असे वाटते नाहीतर फक्त स्वतःची पाठ थोपटून घेण्यापुरता या ब्लोग चा कारभार आहे असे आम्हाला वाटू लागले आहे तेच खरे ठरेल !

  ReplyDelete
 7. नमस्कार,
  संत साहित्य आणि शाहीर साहित्य , ऐतिहासिक नोंदी ,बखरी ,
  गोपाळभट गोडसे यांचा माझा प्रवास हा १८५७ चा कादंबरीचा प्रवास

  मी, पण लक्षात कोण घेतो ,गड आला पण सिंह गेला ,वज्राघात अशा सुंदर कादंबऱ्या ह ना आपटे यांनी दिल्या फर्ग्युसन मध्ये त्यांनी शिक्षण घेताना त्यांना गणितात अगदीच कमी मार्क पडत गेले आणि त्यांना अधिकृत कधीही विद्यापीठाची डिग्री मिळाली नाही पण अफाट लोकमान्यता लाभली

  सावल्या तांडेल ,वीरधवल,स्वराज्याचा श्रीगणेशा,डॉक्टर अशा कादंबरीने लोकप्रिय झालेले नाथमाधव ,
  महात्मा फुले ,आगरकर , टिळक , चिपळूणकर पु भा भावे ,आचार्य अत्रे ,लेखनाच्या अनेक शाखा आणि अनेक तऱ्हा , अनेक पद्धती आणि अनेक विषय ,
  सावित्रीबाई फुले ,लक्ष्मीबाई टिळकांची स्मृतिचित्रे ,बहिणाबाई चौधरी अशा स्त्री लेखिका बालकवी, माधव ज्युलियन ,करंदीकर , बी ,गिरीश ,गोविंदाग्रज ,कुसुमाग्रज असे कवी - ,इतिहासकार, संशोधनात्मक लेखन , टीकात्मक लेखन ,चरित्रे ,कादंबरी,नाटके
  विजय तेंडूलकर , दिलीप चित्रे ,भालचंद्र नेमाडे असे अनेक दिशांनी आपली मराठी भाषा समृद्ध ज्यांनी केली त्यांचे लेखन हे लेखनच नाही की काय ?
  ना सी फडके वि स खांडेकर ,वि वा शिरवाडकर ,यांच्या पासून आज दया पवार , नामदेव ढसाळ , ग्रेस, कोसला आणि हिंदू सारख्या उत्तम कादंबऱ्या देणारे भालचंद्र नेमाडे असे अनंत कर्तृत्ववान लेखक या मातीत झाले तरी आपण साशंक का ?
  आपण उगीच काहीतरी वैश्विक सत्य सांगितल्या सारखे असले बोलू किंवा लिहू लागलात की अत्यंत कच्चे मडके वाटता आणि तुमची कीव येते - उगीच भांडूप मधल्या चार टाळक्यांसमोर
  काहीतरी बरळलात म्हणजे आपण काहीतरी अगदी मूलभूत वक्तव्य केले असे जर आपणास वाटत असेल तर तो आपला भाबडेपणा नसून बिनडोकपणा आहे हे सांगितलेच पाहिजे !

  ReplyDelete
 8. नेहमीप्रमाणे गंमतीशीर प्रतिक्रिया आहेत. खालील मुद्दे लक्षात घ्यायला हवेत:

  १. संत साहित्य हे आध्यात्मिक साहित्य असून त्याचा आधुनिक साहित्यात मी समावेश केलेला नाही. कथा/कादंबरी/कविता या गृहित धरल्या आहेत. मुळात हा साहित्य प्रकार इंग्रजीच्या अनुकरणाने मराठीत सुरु झाला.
  २. मराठीतील बव्हंशी साहित्यावर इंग्रजीतील कोणत्या ना कोणत्या साहित्य प्रवाहाचा प्रभाव आहे. ज्या लेखकांची आपण नांवे घेतली आहेत तेही या तत्वाला अपवाद नाहीत. कथानकेसुद्धा अदल-बदल करून वापरली गेलेली आहेत. डा. आनंद पाटील यांनी यावर अनेक पुस्तकेही लिहिलेली आहेत.
  ३. महाराष्ट्रात ज्या सामाजिक चळवळी झाल्या त्यांचे नेटके प्रतिबिंब मराठी साहित्यात पडलेले नाही. नवसामाजिक तत्वज्ञान निर्माण झाले नाही. होर्ज आर्वेल किंवा आयन र्यंड यांनी ज्याप्रमाणे संपुर्ण जागतिक समुहाला नवविचारांनी प्रेरित केले तसे साहित्य मराठीत नाही.
  ४. ऐतिहासिक/पौराणिक कादंब-या या बव्हंशी आत्मगौरववादी आहेत अथवा पुनरुज्जीवनवादी आहेत. जातीत साहित्य विभागले गेले हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वस्पर्शी निखळ सामाजिक कादंब-या मराठीत येत नाहीत. जे प्रयोग होतात ते जातीय कारणांनी दुर्लक्षिले जातात.
  ५. माझ्या ब्लोगवर कशा चर्चा होतात हे आपण सर्वच पाहत असल्याने मी उत्तरे देण्याच्याही फंदात पडत नाहीत. अनेक प्रतिक्रिया या उपहासात्मक/विषय सोडून आणि कोणालातरी हिनवणा-या असतात. (मी कोणालाही कधीही टर्गेट केलेले नाही. माझ्यावर असा आरोप करणे अन्याय्य आहे. बाकी चालुद्यात!)

  ReplyDelete
  Replies
  1. Gammatine vagaire kahi nahi aho jars gambhirpane ghyayala shika. Yanna Vishayache gambhiryach nahi multi!

   Delete
  2. Gammatine vagaire kahi nahi, aho jara gambhirpane ghyayala shika. Yanna vishayache gambhiryach nahi muli!

   Delete
 9. संजय सोनावणीना त्रास देऊ नका , त्यांना डोहाळे लागले आहेत आता
  साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदाचे आत्तापासून - बरोबरच आहे - म्हणून आत्तापासून भाषणबाजी सुरु झाली आहे - बघुया काय काय डोहाळे पुरवावे लागतात ते !
  आयोजक प्रगल्भ होतेच , श्रोतेपण प्रगल्भ होतेच ,पण वाकताच प्रगल्भ नव्हता त्याला काय करणार - लोकांना कंटाळा आला होता , जांभया देत देत लोक बसले होते -भांडूपकराना पत्ताच नाही की नाते संबंधाची नव्याने आखणी होत आहे , त्यांना तुम्ही काय बोलता आहात त्याचे काहीही सोयर सुटक नव्हते - मुळात कार्यक्रम कंटाळवाणा , मारानाच उकडत होते , आणि सर्वाना काय चालले आहे तेच समाजात नव्हते - कारण वक्ता आनि पानि करत बोलत होता त्याचाच मोठ्ठा हशा होत होता
  सर्वात महत्वाचे म्हणजे स्पष्ट उच्चार - ज्या भाषेत बोलता त्याच्या उच्चारांची जबाबदारी तुमची - तिथे फसलात तर तुम्ही संपलात - आता संजय भाऊ , पुढच्या वेळेस काळजी घ्या , आणि आपला जोकर न होण्यासाठी आपले उच्चार सुधारा , ऐकताना कानाना किती ओंगळ वाटत होते !
  हल्लीच्या मराठी चित्रपटात सुद्धा हिरो शिर्के असो देशमुख असो किंवा निंबाळकर असो , मराठी अगदी चक्क पुणेरी असतेच , मग तुम्ही का मागे राहता ? स्पष्ट आणि शुद्ध बोल आणि सभा जिंका - नाहीतर तुमचा मोरू व्हायला वेळ लागणार नाही !

  ReplyDelete
 10. संजय सोनवणी साहेब ,
  आपण म्हणता ते अगदी खरे आहे संतांचे आणि पंतांचे वाग्मय सोडून पुढच्या काळातील सर्व लिखाणावर पाश्चात्य लिखाणाचा जबरदस्त पगडा आहे - त्याचे मूळ कारण शिक्षण हेच मुली नव्याने दिफ़ाइन झाले होते
  आत्तापर्यंत संस्कृत पाठांतर न्हाबाजे शिक्षण आणि संस्कृतातून शिकलेले न्यायशास्त्र धर्मशास्त्र हेच सर्वश्रेष्ठ शिक्षण असे धरले जात होते ,पेशवे गेले ,इंग्रज आले त्यांना झटपट कारकून हवे होते ,लॉर्ड मेकाले याने १८३५ चा इंग्रजी शिक्षणाचा कायदा आणला आपल्याला प्रजा आणि इंग्रजी सत्ता यात दुवा ठरणारी आंग्ल भाषा जाणणारी भारतीय तरुण पिढी हवी आहे असे त्याचे प्रतिपादन होते
  इंग्रजी वाग्मय , इंग्रजी विचारपद्धती याचा पगडा या वर्गावर पटकन बसत गेला ,
  थोडक्यात खेळ बदलला आणि खेळाचे नियम बदलले !
  त्याला प्रत्युत्तर म्हणून आगरकर टिळकांनी राष्ट्रीय विचारांची शिक्षण संस्था निर्माण केली
  पण इंग्रजी रुजले ते कायमचेच आणि आज भारत हा सेवात मोठ्या लोकसंख्येचा इंग्रजी बोलणारा आशियायी देश झाला आहे आणि ती आपली ताकद धरली जाते - असो -
  हे सर्व घडताना जेत्याची भाषा असा पण मुद्दा होता इथले शिक्षित होते ब्राह्मण , आणि सीकेपी ,
  त्यामुळे जास्त लिखाणातला सहभाग याच जातींचा दिसतो त्यात नवल काहीच नाही -
  त्यांनी जेत्यांची मायबोली शिकली आणि त्यांच्या लिहिण्यात त्याची छाप दिसू लागली हे आपले म्हणणे अगदी खरे आहे आपल्या इथे रेनासंस झालेच नाही - त्यामुळे आपण नाव विचारांचीही कॉपी करत गेलो आणि आपले लिखाण हास्यास्पद होत गेले
  तिकडे द्याफोडीली लिहिली की तेच स्फूर्तीस्थान होऊन आपल्याकडे हिरवळीचे मखमली गालिचे दिसू लागले ,तिकडच्या शेक्सपियर प्रमाणे आपले गडकरी भराभर लिहित गेले -आदर्श त्याचेच आणि आपण भारावलेले ! त्यांच्या प्रत्येक बाबीने आपण फक्त भरवत गेलो - आणि हाच त्यांचा मोठा विजय आणि आपला कायमचा पराभव झाला !
  विसी -व्हिक्टोरिया क्रॉस चे आपण वीर चक्र केले इतकेच काय ते जुजबी बदल !

  ReplyDelete