Tuesday, September 23, 2014

मंगळयान मोहीम फत्ते...!

अभिनंदन...शास्त्रज्ञांचे...माझ्या देशाचे, देशबांधवांचे....

मंगळयान मोहीम फत्ते...!

आजपासून आपण भारतीय म्हणून आनंदोत्सवात अत्यंत अभिमानाने ताठ मानेने मंगळाकडे पाहणार आहोत. ज्या मंगळाने आजतागायत अगणित विवाह-फेरे फिसकटवले त्या मंगळाभोवती भारतीय यान फेरे घालत रहात त्याला वाकुल्या दाखवत राहणार आहे. परंपरागत अंधश्रद्धांच्या ओझ्याखाली पिचलेल्या भारतियांनी आतातरी त्यातून बाहेर पडायला हवे. येथील राजकीय युत्या - महायुत्या गेल्या उडत...पृथ्वीवरील भारताची आणि मंगळाची ही अनोखी युती जास्त प्रेरणादायी आहे. असो.

मंगळयान काय करणार आहे? मंगळाचा पृष्ठभाग, तेथील वातावरण, खनिजे, भूभागाची संरचना याचा ते अभ्यास करणार आहे. तसेही मंगळाने मानवी मनाला पुरातन काळापासून अक्षरश: बांधून ठेवले आहे. त्याच्या लाल रंगामुळे ग्रीको-रोमन संस्कृतीत त्याला युद्ध व कृषीची संरक्षक देवता मानले जात असे. दुर्बीनीचा शोध जसा लागला तशा त्यावरील कालव्यांसारख्या रेषा दिसल्याने मंगळावर मानवी वस्ती असणारच अशी जणू काही खात्रीच पटली होती. मी लहानपणी गजानन क्षीरसागरांची एक मंगळावरील रुपांतरीत विज्ञानकथा वाचली होती. त्यातले जवळच्या गांवात भाजीपाला विकायला चाललेल्या बुटक्या मंगळ्यांची वर्णने अजून आठवतात. मंगळ हा भविष्यातील मानवी वसाहतींसाठी कसा वापरता येईल याबाबत अनेक काल्पनिका आहेत. चित्रपटही आहेत. एकुणात मंगळाने मानवी जगाच्या कल्पनाशक्तीला भरपूर खाद्य पुरवले आहे. पाश्चात्य जग भारतीयांप्रमाने मंगळाला फक्त कुंडलीत पाहत न बसता १८४९ पासुनच मंगळाचे नकाशे बनवायला लागले होते. तोवर आपल्याकडे आपल्या भारताचा नकाशा बनवण्याची कल्पना करु शकणारा जन्मालाही आलेला नव्हता. पुन्हा असो.

मंगळावर आज तरी पाणी नाही. त्याच्या पोटात काही असेल तर असेल. पुर्वी कधीकाळी होते काय हा प्रश्नही समाधानकारकपणे सुटलेला नाही. मंगळाच्या धृवांवर बर्फ मात्र विपूल प्रमाणात आहे. त्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारची सुक्ष्मजीवसृष्टी तेथे पुरातन काळी असावी असा तर्क आहे. मंगळावरचे वातावरण विरळ तर आहेच पण तेही कार्बन डाय ओक्सोईड, मिथेन अशा वायुंनी भरलेय. थोडक्यात मंगळ आहे तसा वसाहतींसाठी उपयुक्त नाही. पण तरीही मंगळाचा अभ्यास करण्यात स्वार्थही आहे आणि वैज्ञानिक कुतुहलही आहे.

माणसाला तेथील खनिजांचे आकर्षण आहे. सुर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची संरचना वेगवेगळी असल्याने तेथील मुलद्रव्यांत पृथ्वीपेक्षा वेगळ्या संरचनांची मुलद्रव्ये जर सापडली तर त्यांचा उपयोग करून आज अज्ञात वाटनारे अनेक नवीन शोध लागू शकतील. त्यामुळे मानवी जीवन सुकर होईल अशी आशा कोणताही तत्वचिंतक करणार नाही हे खरे असले तरी शुद्ध विज्ञान म्हणून एकुणातीलच सृष्टीच्या निर्मितीचा अभ्यास पुढे जायला मदत होईल. पृथ्वीची वाट पुरेपूर लावल्यानंतर शेवटी माणसाला मंगळच पदरात घेऊ शकतो अशीही, सध्या काल्पनिका वाटली तरी, मानवी आशा आहेच. त्याहीपेक्षा म्हनजे तेथील दुर्मीळ मुलद्रव्यांची येथे आयात हे सध्या तरी ध्येय आहेच. त्यावर अधिकार बजावायचा असेल तर मंगळयानाचा उपक्रम हाती घेणे आवश्यकच होते. एका प्रकारे भारताने हा उपक्रम करून आपला भविष्यातील दावा पक्का करण्याचा मुत्सद्दीपणा दाखवला आहे असेच म्हणायला हवे.

त्यामुळे हे निर्णय घेणारे मनमोहनसिंग सरकार, इस्रोचे सर्व शास्त्रज्ञ, आणि या मोहिमेचे संकल्पक/आरेखक व्ही. आदिमूर्ती यांचे आपण सर्व मनापासून अभिनंदन करुया....पत्रिकेतल्या मंगळाला कायमचा हद्दपार करत मंगळाशी मैत्री करुयात...

काय सांगावे, काही पिढ्यानंतर आमचे-तुमचे वंशज मंगळावरच निवास करुन असतील...

कारण आमच्या पिढ्यांनी पृथ्वीची पुरती वाट लावली असेल...!

7 comments:

  1. अहो संजय राव
    तुम्ही म्हणे शैव आणि आम्ही म्हणे वैदिक , मग आपण कसे नांदणार तिकडे मंगळावर ?
    एक शैव आणि एक वैदिक यांची प्रजा कोण असेल ? का नवीन जात असेल ?
    शैदिक ?

    ReplyDelete
  2. आम्हीपण दिवाळीत मंगळ नावाचे रॉकेट उडवणार
    चीनला लदाख हवाय त्या ऐवजी मंगळावरची जमीन देण्याचा मरेन्द्र नोदी यांचा प्लान आहे
    आणि मंगळावर काश्मीर नावाच एक क्षेत्र आहे ते पण आमचे आहे असे पाकिस्तानने बोलायला सुरवात केली आहे !

    ReplyDelete
  3. आपल्या फोटोत उजव्या बाजूचा तिसरा दगड हे चक्क शिवलिंग आहे- हे आपणास माहीतच असेल
    शैव धर्म सृष्टीच्या चराचरात आहे हे या वरून सिद्ध होत आहे
    या पुराव्या बाबत नरके सर आणि संजय ,बोलत होते आणि एकमेकाना गुप्त भाषेत काहीतरी सांगत होते - नंतर समजले की मंगळावर महामानवाच्या पाउलखुणा आढळल्या आहेत
    एका सांगाड्यावर बुद्ध प्रतिमा दिसल्यामुळे रामदासजी आठवले यांनी आणि संजयाने वैदिक्मुक्त असे जीवन नव्याने मंगळावर सुरु करत भारताची मान जगात उंचावत न्यायचे ठरवले आहे !

    ReplyDelete
  4. संजय सर ,
    हा पांढरी दाढीवाला का इतक्या उड्या मारतो आहे ?
    नरेंद्र मोदिनी निदान एकदातरी डॉ मनमोहन सिंग यांचे या मंगल मोहिमे बाबत कौतुक करावे
    आम्हाला माहित आहे की त्याना फक्त हाफ चड्डीचे कौतुक आहे - तरीही - +
    ती काही मोदी यांची खाजगी योजना नाही - ती आधीच्या सरकारने कार्यान्वित केलेली योजना आहे त्याच्या श्रेयाचे हक्कदार मोदी नसून कोन्ग्रेस आहे

    ReplyDelete
  5. Aho Sonawani, in 1849 were only Vaidik people living in India? No Shaiv people? Who stopped them from making maps of Mangal in 1849? Or were they waiting for your permisison?

    ReplyDelete
  6. Mangal grahavar N A plots vikne aahe,
    Sampark kara - Sharad power

    ReplyDelete
  7. Sattelite sent pic from marce, found that 7-12 was registered for Sharad Power.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...