Thursday, September 25, 2014

सावध ऐका पुढच्या हाका....


भविष्यात काय दडून बसलेय हे कधी कोणाला पक्केपणे सांगता आलेले नाही. माणसाने कितीही योजना आखल्या तरी त्या तशच सुरळीतपणे पार पाडल्या जातील असेही नाही. आपले सरकारही पंचवार्षिक योजना सादर करत आले आहे. या योजना म्हनजे पुढील पाच वर्षात साध्य करायच्या बाबी व त्यासाठीच्या तरतुदी या स्वरुपाच्या असतात. पण त्याही १००% कधी पार पाडल्या गेल्याचे उदाहरण नाही, कारण अनपेक्षीत घटना घडत जातात, अंदाजपत्रके कोसळवत जातात. असे असले तरी त्यांचे महत्व कमी होत नाही. कारण अशा शास्त्रशुद्ध अंदाजांची जाणत्या प्रगतीशील आणि प्रगत समाजांना नेहमीच गरज असते. आपल्या भवितव्यातील अनिश्चितता लक्षात घेऊनही प्रगतीची किमान ठाम दिशा ठरवता येते आणि तेच त्यांचे वैशिष्ट्य आहे.

पण हे झाले आर्थिक/औद्योगिक/संरचनात्मक कार्यांबद्दल. आपण एकुणातील मानवी समाजाच्या भवितव्याचे अंदाजपत्रक कधी बनवत नाही. असे असले तरी अनेक समाजशास्त्रज्ञ हे काम आपापल्या स्तरांवर करत असतात. भविष्यवेधी कादंबरीकारही, भयावह स्वरुपात का होईना भविष्यातील मानव आणि त्याचे जीवन कसे असेल यांचे रंजक चित्रण करत असतात. मुळात माणसाला भवितव्य जाणून घेण्याचा छंद आहे. याला वैज्ञानिकही अपवाद नाहीत. तेही विश्वाची सुरुवात आणि शेवट कसा असू शकेल याचे व्हवितव्य शोधत असतात. फक्त ते शक्यता वर्तवतात...फलज्योतिषकारांसारखी शुभाशुभ-शकुनात्मक भाकिते करत नाहीत.  

ते असो. येथे आपल्याल विचार करायचाय तो पुढील ५० वर्षांत आम्ही कोठे असू. मी "आम्ही" असा शब्द वापरतो तेंव्हा त्यात आम्ही "भारतीय" म्हणून जसे येतो तसेच एक जागतीक समुदाय म्हणूनही येतो. खरे तर प्रत्येक व्यक्तीचे भवितव्य हे मानवजातीच्या भवितव्याशीच निगडित असते. आपले पुढील भविष्य हे आजवरचा आपला प्रवास, वर्तमान आणि भविष्यात यशस्वी अथवा अयशस्वी होऊ शकतील अशा सर्वच क्षेत्रांतील शोधांवर आणि मानवी जगण्याच्या सध्याच्या नितनियमांनी बदलत असलेल्या तत्वज्ञानावर अवलंबून आहे. असे असल्याने अगदी काटेकोर नसला तरी सत्याच्या किमान जवळ जाईल असा तो असावा याबद्दल आपण प्रयत्न करणार आहोत. तर पाहुयात आपण पुढच्या पन्नास वर्षांत कोठे असु ते...

विज्ञान:

येथे मला उपयोजित विज्ञान अभिप्रेत आहे. संगणकाचा शोध लागला तेंव्हापासून आपण बिट सिटीमचे संगणक वापरत आहोत. आज संगणकाचा वेग कल्पनातीत वाढला असला तरी त्याचे मुलभूत शास्त्र, म्हणजे मोर्स कोड, बदललेले नाही. १९९८ साली मी बंगळुर येथे क्वांटम कंप्युटरची संकल्पना मांडली होती. काही वृत्तपत्रांनी त्यांना प्रसिद्धीही दिली होती, पण एकुणात त्याकडे पुरेशा गांभिर्याने कोणी पाहिले नाही. पण पाश्चात्य जगात मात्र यावर खरोखर गांभिर्याने काम सुरु आहे. क्वांटम पातळीवर अणुला विभिन्न उर्जा पातळ्या असता. ०-१ एवढेच नव्हे तर ऋण व धन असे अमर्याद बिटस (अपण सध्या त्याला बिट म्हणूयात) उपलब्ध झाल्याने कार्यक्षमतेची कल्पनाही करता येणार नाही. शिवाय लघुत्तम आकार होईल ते वेगळेच. त्यात न्यनो तंत्रज्ञानाच्या दिशा पाहता स्क्रीन हा छोटीशे घडी करुन खिशातही ठेवता येईल, वीजेची गरज भासणार नाही कारण नैसर्गिक प्रकाशातच त्याचे आपोआप चार्जिंग होत राहील. खरे तर मानवी मेंदुचा क्षमता अशा कंप्युटरमद्धे येत त्यात स्वयंनिर्णयाचीही सोय झाल्यास नवल वाटून घ्यायचे कारण नाही.

आरोग्याच्या क्षेत्रात खुप क्रांत्या तोवर झाल्या असतील. कृत्रीम अवयव (मेंदुही) सहजपणे प्रत्यारोपित होऊ लागले असतील. सर्वात महत्वाचे म्हणजे असे एखादे घड्याळासारखे उपकरण जे शरीरातील जैव-रासायनिक बदल (तापमान-रक्तदाबासहित) सातत्याने नोंद घेत  काही बिघाड आढळल्यास त्याचे पृथक्करण करुन परस्पर सुक्ष्म सुईतुन औषधी देत इलाजही करु शकेत. औंषधांची संख्या मर्यादित होत जाईल. माणसाचे आयुर्मान हे माणसाच्या मर्जीवर राहील इतपत या क्षेत्रात प्रगती झालेली असेल.

हेलिकार (रस्त्यावर चालणारी आणि हवे तेंव्हा उड्डानही भरु शकणारी कार) ही केवळ कल्पना न राहता तोवर तर ती कार जगाच्या अंगवळणी पडलेली असेल. बाकी आंतरग्रहीय प्रवास वगैरे वास्तवे बनत कादंबरीकार आंतर-आकाशगंगीय व आंतर-विश्वीय प्रवासाच्या संकल्पनांत दंग असतील.

आर्थिक:

 जग हळू हळू दोनच आर्थिक विचारधारांमद्धे वाटले जाईल. सध्याची दिशा लक्षात घेता जगात दोन-तीनच अवाढव्य आंतरराष्ट्रीय कंपन्या सर्वचा सर्व उत्पादनांवर नियंत्रण ठेवु लागतील. शेतीही यातून सुटणार नाही. सध्या ज्या वेगात कंपन्या मोठ्या होण्यासाठी विलीनीकरणे, विकत घेणे वगैरे प्रकार करत आहेतच. त्याची परिणती म्हणून एकच जागतीक कंपनी या दिशेने वाटचाल सुरु राहील. मक्तेदारीविरुद्धचे कायदे येतील परंतु या मक्तेदारी कंपन्या सरकारेच बनवणे अथवा कोसळवणे यातही बलाढ्य झाल्याने असे कायदे कितपत टिकतील? किती हवे तसे नवे कायदे पास होतील? आपल्याच देशात आज लोकांचा विरोध असुनही ल्यंड अक्विजिशन कायदा, डिफ़ेंन्स ते रिटेलमद्ध्ये एफ.डी.आय. पारित होते तर भविष्यात आर्थिक मक्तेदार यशस्वी होत सरकारांवरचे नियंत्रण किती कडक करत नेतील व हवे ते कायदे पारित करुन घेतील याचा अदमास येतो.

यामुळे रोजगार बराच वाढेल हे खरे आहे, पण सध्याच्या संघटीत व असंघटीत एकुणातील रोजगारापेक्षा तो अधिक राहणार नाही. मक्तेदारी कंपन्यांचा उद्देशच मुलात अधिकाधिक नफा मिळवणे हाच असल्याने ते आपल्या नफ्याचा वाटा समाजोपयोगासाठी वाटण्याची शक्यता नाही. उलट एकुणातील रोजगार घटत जाईल. याचे महत्वाचे कारण म्हणजे शेती ही भांडवलशही कंपन्यांच्या हाती जाईल. हे भारतातच नव्हे तर जगभर होईल. आज अनेक देशांत बाहेरची व्यक्ती कितीही जमीनी शेतीसाठी विकत घेऊ शकते. भारतातही नवीन भुमी अधिग्रहण कायद्याने या दिशेला मोकळा मार्ग करुन दिला आहे. म्हणजे लाखो एकर जमीनींवर भांडवलदारी आधुनिक शेती सुरु होईल. शेती तोट्याची असते ही संकल्पना बदलेल कारण तिची पद्धतीही बदलेल. सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वत्र विशिष्टच जीवनावश्यक कृषीउत्पादने घेतली जात व्यापारी उत्पादनांची संख्या वाढेल. यामुळे खाद्य वैविध्य सीमित होण्याचा धोका आहेच. पण तात्कालिक आर्थिक फायदे पाहणारी मानवी मानसिकता लक्षात घेता लोक जसे पिझाला सरावले तसेच त्या नवपद्धतींनाही सरावतील.  

पण आधीच म्हटल्याप्रमाणे एक प्रबळ अर्थव्यवस्था विशिष्ट वादावर उभी राहिली कि त्याला प्रत्युत्तर देणारी व्यवस्थाही साकार होऊ लागते, नवे तत्वज्ञान जन्माला येते. येत्या ५० वर्षांत जशी अतिरेकी भांडवलशाही वाढत जाईल तसतसे असंतुष्ट शेतकरी, बेरोजगार दुसरीकडे संघटित होऊ लागतील. मूक्त भांडवलशाही ही नेहमीच अन्याय्य असते. तिची सुरुवातीची फळे मधूर असली तरी व्यापक सामाजिक परिप्रेक्षात ती पद्धत अन्यायकारीच असते. त्यामुळे माओवाद किंवा तत्सम शोषितांचा वाद जन्माला येत एक नवा जागतिक दहशतवादही जन्माला येणार ही शक्यताही तेवढीच प्रबळ आहे.

याचीहे लक्षणे आपल्याला वर्तमानातच पहायला मिळत आहेत. होलंड किंवा काही युरोपियन राष्ट्रांत माओवाद डोके वर काढू लागला आहे. भारतात आदिवासी दुर्गम भागांत मर्यादित असलेला माओवाद (नक्षलवाद) आता पुणे-मुंबई सारख्या शहरांतील तरुणांना व ग्रामीण शेतकरी तरुणांनाही आकर्षित करु लागला आहे हे आपण पाहतच आहोत. यासाठी जातीय विषमता, आर्थिक विषमता आणि त्याहून महत्वाची भावना म्हणजे आर्थिक गुलाम्यांची भावना यांचे संम्मीश्र स्वरुप असेल. थोडक्यात माओवाद मागे पडत नवीन संकल्पना विकसीत होत तसे तत्वज्ञान बनवले जाईल.

अर्थात हे तत्वज्ञान हिंसक असनार हे वेगळे सांगायला नको. जुना भांडवलदार-कामगार संघर्ष असे पोरकट आणि भावनिक स्वरुप अशा लढ्यांना राहनार नाही. त्याचे स्वरुप व्यामिश्र अणि गुंतागुंतीचे तर असेलच पण ते जागतीक पातळीवरचे असेल.

कोणतेही जग एकाच व्यवस्थेवर अनंतकाळ चालत नाही. ते अधून मधून कूस बदलतच असते. गणराज्य-राज्य-साम्राज्य-हुकुमशाही-लोकशाही असा प्रवास जगाने केलाच आहे. आर्थिक हुकुमशाही आणि तीही जगव्यापी होण्याची शक्यता अजमावून पहायला आजचे जग निघालेच आहे. सारे तत्वज्ञान आणि तंत्रज्ञान या दिशेला सध्या तरी अनुकूल आहे असेच एकुणातील वातावरण आहे.

या जगातील संघर्षाची दुसरी परिमाने काय असतील? मुळात जोवर जागतिक कंपन्यांची संख्या कमी होत होत, पण विस्तार व दुस-या छोट्या-मोठ्यांना काबीज करत, पुढे जात असतांना कंपन्या-कंपन्यांतील मक्तेदारी टिकवण्यासाठीची व वाढवण्यासाठीची जी युद्धे  (त्यांना आपण कार्पोरेट वार्स म्हणूयात) होतील ती केवळ बुद्धीने लढली जातील काय?

की तीही विध्वंसक बनू शकतील? ज्याप्रमाणे जुन्या पारंपारिक महासत्तांनी आपापली साम्राज्ये जगभर पसरवण्यासाठी आपापसातही युद्धे केली तसे उद्या कंपन्या-कंपन्यात होणार नाही काय? 

एक लक्षात घ्या...सध्या जागतिक कार्पोरेट्स आपापले उद्देश्य साध्य करण्यासाठी त्या त्या देशातील सरकारांवर प्रभाव टाकण्यासाठी खास तरतुदी करत आहेत, भाडोत्री तज्ञ व लोकप्रतिनिधीही विकत घेत आहेत. आपासांवर कुरघोड्याही सरकारांच्याच मार्फत केल्या जात आहेत. अनेक मोठ्या कंपन्या जाणीवपुर्वक अडचणीत आणत संपवल्या जात आहेत. बुडणा-या सर्वच कंपन्या वाईट वृत्तीच्या होत्या असे नाही. क्रिसिल रेटींग उच्च असणा-या कंपन्याही बुडाल्या आहेत. तरीही क्रिसील रेटींगवर कोठे गुंतवणूक करायची अथवा नाही याचे निर्णय गुंतवणूकदार घेत असतो. याचा अर्थ नीट समजावून घ्यायला हवा. एक तर ही रेटिंग्ज (अगदी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची राष्ट्रांबाबतचीही) निरपेक्ष नसतात तर सहेतूक असतात हे अनेक प्रकरणांत उघड झाले आहे. अनेक कंपन्यांना बुडवण्यासाठी माध्यमांचाही चोख वापर केला गेला आहे. भविष्यात हे प्रकार इतपतच मर्यादित राहणार नाहीत. जागतीक एकमेव आर्थिक सत्ताकेंद्र असनारे कार्पोरेट ही संकल्पना भविष्यात कोणी पराकोटीचा महत्वाकांक्षी साकार करु शकणारच नाही असे नाही.

पण मग या स्थितीसाठी कंपन्या-कंपन्यांतील संघर्षही विध्वंसक असण्याचीही तेवढीच शक्यता आहे.

म्हणजे, लोकनियुक्त सरकारे विरुद्ध कार्पोरेट्स, कार्पोरेटस विरुद्ध कार्पोरेट्स आणि सामान्य अर्थशोषित समाज विरुद्ध कार्पोरेट जगावर अवलंबून असलेले उच्चभ्रू जग असा हा किमान तिहेरी संघर्ष असेल. राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्षांची परिमाणेच बदलतील...ती परोपजीवी, म्हणजेच या बाह्य शक्तींच्या स्वार्थ अथवा परमार्थासाठी होतील याचे कारण म्हणजे मुळात कोणते सरकार आणायचे व कोनते कोसळवायचे याचे नित्यंत्रण आक्टोपसप्रमाने त्यांच्याच हातात राहील.

थोडक्यात जगात शांती राहनार नाही...फक्त अशांतीची परिमाने बदलतील.

मानवी जीवन

या सा-या स्थितीत मानवी जीवन कसे साकारत जाईल? मानवी संबंध कसे राहतील? पती-पत्नी हे नाते तरी तोवर राहील काय? मानवी जीवनाच्या प्रेरणा नेमक्या काय असतील? विज्ञानाच्या प्रगतीने जीवनविषयक तत्वज्ञाने बदलतील हे तर नक्कीच, पण ती कशी असतील?

माझ्या मते ती परिस्थितीनुसार बदलती राहतील. पण मानवी सम्बंधांचे काय? आजच आपण नात्यांपासून तुटत चाललो आहोत. कौटुंबिक जिव्हाळे आपण जवळपास हरवले आहेत. तरुण-तरुणींच्या प्रेमांनाही नवे...काहीसे आत्मकेंद्रित स्वरुप आले आहे. सर्वस्व-त्याग ईत्यादी शब्द आजच हास्यास्पद झाले आहेत. वृद्धाश्रमांतील मातापित्यांची संख्या वाढत आहे. मैत्रीही व्यावहारिक हितसंबंधांवर आधारित बनत आहेत. म्हनजे उपयोगितावाद हा आपल्या जीवनाचा पाया आजच होऊ पाहतो आहे.

यात काही बदल होऊल काय? सध्याची वाटचाल अशीश सरळ दिशेने पुढे गेली तर लग्नसंस्थाच मुळात अस्तित्वात राहणार नाही. विज्ञान व अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे म्हणा कि प्रगतीमुळे, तिची गरजच भासणार नाही. मानसिक गरजा कंडिशन्ड होतील. मुक्त शरीर संबंधांची पुरातन काली जी व्यवस्था होती ती पुन्हा पण नवे स्वरुप घेऊन अवतरेल.

थोडक्यात मानवी जीवनाचे संदर्भच बदलतील. म्हणजेच साहित्य-कला यांच्याही प्रेरण बदलतील...कदाचित त्यांची गरजच उरणार नाही.

महात्मा येईल?

जागतिक परिप्रेक्षात आपण विचार केला तर संपुर्ण जागतिक व्यवस्थेला नैतीक अधिष्ठान देत बदलण्याचे सामर्थ्य असणारे आजवर  कोणीही जन्माला आलेले नाही. अवतार अथवा ईश्वरपुत्र मानले गेलेले मानवी राम-कृष्ण असोत कि बुद्ध-येशू-महावीर, त्यांनाही ते जमलेले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे मुळात मानवी प्रेरणाच नेहमीच अनैतिकतेच्या पक्षात असतात! मुळातच मनुष्य नैतिकतेच्या गप्पा करतो कारण आपण अनैतिक आहोत हे त्याला माहितच असते. आधुनिक काळातील गांधीजींसारख्या महात्म्यांचे तत्वज्ञानही ते गिळंकृत करत जात हवी तशीच जीवनाची दिशा निवडतात. नैतीकतेचे दडपण हे नेहमी सोयीइतकेच असते. आणि तीच नेमकी माणसाची शोकांतिका राहिलेली आहे.

भक्तीवादी नेहमीच ईश्वर अवतार घेत जगाचा नैतिक विध्वंस थांबवेल या आशेवर असतात. पण नैतिक विध्वंस नाही अशी सामाजिक स्थिती जगात मुळात कधी नव्हतीच हे मात्र सारेच सोयिस्कररित्या विसरत असतात! मनुष्य प्रत्येक बदलाला सरावत जातो. त्यातही संतुष्टीत तो असंतुष्टी शोधतो. संघर्षाचे हेतू आणि परिमाणे बदलतात...पण संघर्ष मात्र कायम राहतो.

संघर्ष पुढेही असणार आहे. आर्थिकतेची, साम्राज्यवादाची आणि म्हनून शोषणाची परिमाने बदलतील एवढेच.

पण जे बदल होतील त्यात आपण भारतीय म्हनून कोठे बसतो? आपली जातीयता-उच्च-नीचता तेंव्हा तरी संपली असेल काय? नव्या जगाचे आपण अजुनही खरेखुरे नागरिक झालेलो नाहेत. अजुनही लग्नासाठी आम्हाला जातच लागते. लिव्ह इन रिलेशनमद्ध्येही तेच होईल का? तेंव्हाही आम्ही व्यापारी शेती आणि उत्पादक कंपन्यांतही आरक्षनासाठी लढे उभारत असु का?

बघा विचार करुन!

5 comments:

  1. प्रियवर
    विज्ञान, अर्थशास्त्र और मानवी जीवन में से अर्थशास्त्र पर प्रतिक्रिया देना चाहता हूँ:
    दुनिया का पिछला इतिहास एकाधिकार के विरोध में है, समर्थन में नहीं. इसलिए यह सोचना कि एक ही बड़ी कंपनी या कुछ बड़ी कम्पनियाँ सारी दुनिया के व्यापार पर कब्जा कर लेगी, वास्तविक नहीं लगता. आज भी दुनिया के सबसे धनवान लोग वे नहीं है, जो बीस साल पहले थे. भारत में जो दस साल पहले सबसे पैसे वाले थे, आज वे कहाँ है?
    मानवीय स्वत्रंतता की भूख सदा रही है,आगे भी रहेगी. आज दुनिया में जितनी कंपनिया काम का रही है उतनी ५० साल पहले कुल दुकानें नहीं थी. अर्थात नयी कंपनीयां पुराने व्यापार को खत्म करती है, यह आज तक तो भी साबित नहीं हुआ है.
    हाँ मुझे लगता है कि जिनके हाथों में नये अविष्कार की चाबी रहेगी, पैसा उन्ही के पास रहेगा. उस पीढ़ी का मार्क जुबेरबर्ग, स्टीव जॉब कोई और होगा. कोई केवल बड़ा होने से ही नहीं टिकेगा, बल्कि उसका बड़ा पन ही उसके खात्मे की रफ़्तार बढ़ाएगा. नूतन प्रतिभा, छोटी शुरुआत और जनता की नब्ज पर हाथ रखनेवाले देश पनपेंगे. मनुष्य आजादी की कामना में नए टापू खरीदेंगे और अपने इरादों के देश बना लेंगे.
    शेष पर अन्य लोगों की प्रतिक्रिया पढ़ना चाहूँगा.
    दिनेश शर्मा

    ReplyDelete
  2. दिनेश शर्मा महोदय ,
    आप निराश होना स्वाभाविक है क्योंकी कोईभी आरक्षणका पुरस्कर्ता , या ब्राह्मण द्वेष करनेवाला या आंबेडकर वादी ऐसे विषयपर कोइभि टिपण्णी नही करेगा - क्योंकी - इस विषयके लिये जो अभ्यास होना जरुरी है वह करनेकी उनकी मानसिकता नही है
    जो बच गये - वह है इलाईट वर्ग - वह संजय जैसे लोगोंकी बातोंको कुछ भी कीमत नही देते यह एक वास्तविकता है - कोइभि ३ पेग हो जानेके बाद ऐसी बाते लिख सकता है !

    भारतमे एक विशिष्ठ विचारको और मानासिकताको आदर्श मानकर धंदा करनेवालोमे टाटा समुहका नाम बडे इज्जतसे लिया जाता है इस बातको आपने नजर अंदाज किया है
    जमशेटजीसे कई पिढीया उनके प्रगतीकी हम सराहना कर रहे है
    उसके विपरीत आप जो बताना चाहते है वह भी सच है - जो जमानेकी बातको नही समझ सके वह सिर्फ इतिहास बनकर रह जाते है - किर्लोस्कर डालमिया जैसे कई लोग आज सिर्फ रेफरन्स के लिये पहचाने जाते है और टाटा बिर्ला महेंद्र गोदरेज नये मकाम कायम कर राहे है
    आज समाजमे मुफ्त पानेकी होड लगी रहती है - आरक्षण यह उसकाही फल है

    आज बढता हुआ प्रायव्हटायझेशन अपने आप आरक्षण का निर्मुलन करेगा और समाजको इस गंदी आदतसे छुटकारा मिलेगा !
    बिर्ला जैसे बनियोने पहलेसेहि म गांधीसे अपने संबंध प्रस्थापित करके अपनेआप बहुत कुछ पा लिया - यह भी एक करप्शनहि मानना चाहिये - नरेंद्र मोदीको यह बात ध्यान रखनी चाहिये
    नही तो इतिहास उनको क्षमा नाही करेगा !

    ReplyDelete
  3. आजही प्रतापसिंग कैरो यांची आठवण येते
    त्यांनी लुधियाना दुप्लिकेट बाजार बनवून सगळे नियम गुंडाळत आपले घोडे पुढे दामटले
    की नोट्स मधली जे आर डी नी सांगितलेली नेहरूंची भेट आपल्याला बरेच काही सांगून जाते
    आपला नेता हाच रशिया सारख्या प्रचारकी भपक्याला बळी पडून टाटा सारख्या लोकाना आपली बाजू मांडायला वेळच देत नसेल तर ?
    भारतामध्ये पारशी लोकांचे आपल्या उद्योगात योगदान हा कौतुकाचा विषय आहे
    आणि
    त्यांनी उद्योग काढले की मराठी बाणा दाखवत आपल्या बांधवाना टक्केवारीची भाषा करत फक्त नोकरीसाठी अडवणूक करणे इतकेच कार्य करणाऱ्या शिवसेना वगैरे पक्षाना काय म्हणावे - ?
    शिवसेनेने अतिशय सोन्याची संधी घालवली आहे !
    आज अशी परिस्थिती आहे की जर भारतात उद्योग पतिना पोषक वातावरण मिळणार नसेल तर ते दुसऱ्या प्रांतात नव्हे -देशात आपले प्रस्ताव हलवू शकतात -
    ममता ब्यानर्जीना रतन टाटांनी जे सडेतोड उत्तर दिले ते खूपच बोलाके आणि पुढे काय घडेल त्याची नांदी आहे !
    आजही आपल्या देशात सकस संशोधनाची वानवाच आहे - अगदी सामान्य बौल पेनापासून ते अगदी उच्च घरगुती अप्लायन्सेस पर्यंत आपण आपले म्हणून काहीच निर्माण करत नाही - दायातेक्त युरोपातून फॉर्म्युला आणून फक्त त्रेडरचे काम आपण करत असतो - जॉन्सन अन्ड जॉन्सन इत्यादी कंपन्या यावरच टिकून आहेत !
    भाताताने आज मनुष्यबळ निर्यात करून काही पैसा जमावाला आहे , इंग्रजी भाषा हि आपली पारतंत्र्याची एक कमाई आहे !

    ReplyDelete
  4. ते नक्कीच पुण्यवान होते ,
    त्याचे उत्तर शोधायला गेले की मन म्हणते -
    देव असणेच शक्य नाही !
    कारण ते असते तर त्यांनी संत तुकारामांचे संरक्षण केले असते - खरे ना ?
    ब्राह्मण नीच होतेच , पण देवाने त्याना काहीच शासन केले नाही !ब्राह्मण प्रजेला लुबाडत होते पण
    देवानी ब्राह्मणाना काहीच शासन केले नाही - मग देव कसा असेल ?
    देव ही मानवनिर्मित कल्पना आहे हे नक्की !

    मुसलमान आले त्यांनी आपली मंदिरे पाडली , पण देव गाभाऱ्यातून आले नाहीत .
    ब्राह्मण शेफारले ते कोणामुळे - त्यांना राजाश्रय होता - आणि मुसलमान राजवट आली तरी त्यांनी हिंदूंच्या धार्मिक उतरंडीत दखल घेतली नाही - म्हणजेच हिंदू क्षत्रिय सरदार जहागीरदार यांनी एकप्रकारे ब्राह्मणाना संरक्षण दिले - आजही ३ % ब्राह्मणात पूजा अर्चा करणारे किती ?त्यावर जगणारे किती ? हा विचार केला तर सर्व समाजाच्या अगदी नगण्य असा वर्ग आज धार्मिक कृत्ये करतो आणि त्यावर आपले पोट भरतो - अनेक पिढ्या हा ब्राह्मण विरोध चालू आहे तरीही बहुजन समाज अजूनही या पुरोहित वर्गाला मानतो -
    आपण एक मोठ्ठी चूक करत आहोत - पुरोहित आणि ब्राह्मण असे वेगळे आहेत आणि ज्याना ज्याना वेद आणि श्रुती स्मृती याबद्दल राग आहे -त्यांचा राग हा पुरोहित वर्गावर आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे आणि त्यामुळेच जातीय गैर समाज निर्माण होतात

    वेद काय आहे हे खुद्द ९० % ब्राह्मण लोकांनाच माहित नाही - कारण त्यांचा यावर विश्वासच नाही - त्यांनी आधुनिक जगाची आणि ज्ञानाची कास धरून त्यांनी आपला मार्ग निवडला आहे
    आज गेले अनेक वर्षे होम करणे आणि पूजा करणे याचे स्तोम सार्वजनिक गणपतीत वाढत आहे - त्याचा निषेध केला पाहिजे कारण आपण जर अनेक वर्षे या पुरोहित वर्गाविरुद्ध जनजागृतीचा प्रचार करत असाल तर आज सार्वजनिक रित्या गणपती उत्सवात अथर्वशीर्ष , होम , अभिषेक , तोरण बांधणे हे प्रकार कोणत्या जातीकडून केले जातात याचा आपण सर्व्हे केला तर काय दिसते ?

    आपण इतके मोठ्ठे लेख लिहित आहात तर , आपण साधे पोस्टर तयार करून मूकपणे सार्वजनिक गणपतीत या वेदाधीष्ठित पठणाचा जाहीर निषेध का करत नाही ?आज गणपती विसर्जन हौदात करा असा प्रचार चालतो - त्याच्या शेजारी कर्मठपणे वाहत्या पाण्यात गणपती विसर्जन करा असाही प्रचार शांततेने चालतो - दोन्हीही पक्ष शांततेने आपला प्रचार करत असतात - तसेच आपणही पोस्टर वापरून सार्वजनिक गणपतीत आराशित आणि एकूण वातावरणात कर्मठ विचारांची चिरफाड करू शकाल - दगडूशेठ लालबाग अशा मनाच्या गणपतीसमोर जे होमहवन चालते त्याला प्रोत्साहन देणारे कोण आहेत ?हे स्तोम का वाढत आहे ?याला पोसणारे कोण आहेत ?हे असेच सार्वजनिक बैठक लाभून विस्तारत गेले तर या वेदावर रचल्या गेलेल्या सामाजुतीना पसरवणारे कोण ?आज हजारो गृहिणी अथर्व्श्र्शाचे पारायण करतात त्याचा आपण जाहीर निषेध का करत नाही ?
    पुरोहित वर्ग हा नेहमीच लोचट असतो आणि धार्मिक बाबतीत अगदी पूर्ण आश्रिताञ्च्या सारखा वागणारा असतो - त्यामुळे त्यांचे महत्व वाढवायचे का कमी करायचे ते बहुजनांनी ठरवायचे आहे - आणि बहुजानानीच सार्वजनिक गणपती हे एक उत्तम व्यासपीठ मानून अशा गोष्टींचा जाहीर

    ReplyDelete
  5. कोब्रा आता शांत बसला आहे, BJP आणि RPI च्या प्रचाराला लागला की काय?

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...