Sunday, November 23, 2014

फक्त ताठ उभा रहा!

मित्रा,
उठ....
घोंगावत्या वादळांना घाबरून
भुईसपाट होण्याचा तुला अधिकार नाही
तुझे पुर्वज
अशाच वादळांनी हतबल झाले होते
या दुर्लक्षांच्या वाळवंटात
गाडले जाण्यासाठी...

त्यांच्या लक्षात नसेल आले
आणि कदाचित तुझ्याही
ही वादळे शेवटी
आपल्याच क्षितिजांना टक्करुन
कायमची विसावतात....
अजरामर असतो आपण
कारण
संस्कृतीला निर्माण करणारे
जोपासणारे
होतोही आपण
आहोतही आपण....

या वरवरच्या
राक्षसी वाटली
तरी भाकड
असंस्कृत वादळांना
भिऊ नकोस
उठ
आणि जोमाने उभा रहा....
ती तुझ्यापाशीच थांबतील
कायमची....
क्षितीजही त्यांना मिळणार नाही...

फक्त ताठ उभा रहा!

1 comment:

  1. संजय सरांनी अति तरल कविता लिहिली आहे ,
    फारच लाघवी साद आहे आणि एकप्रकारे एक दिलासा देणारी रचना आहे
    पण,
    कोणीच अशा कवितांचे किंवा मध्यंतरी केलेल्या लिखाणांचे कौतुक करत नाही याचे शल्य वाटते - संजय सरांचा स्वभाव असे मनाला लाऊन घेणारा नाही तरीही ,
    मला मात्र याचे वाईट वाटते -
    ज्या हिरीरीने लोक जातिधर्मावरच्या लिखाणाना प्रतिसाद देतात ,तितका तरल कवितांना मिळत नाही !
    संजय सर " संस्कृत " या लेखाबद्दल - "उद्या याचे उत्तर देतो " -असे म्हणाले होते - ते राहूनच गेले असे दिसते - !

    ReplyDelete

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!

  २०५० पर्यंत ,  वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...