Tuesday, December 16, 2014

"जगप्रेमी" नागरिक!

 पाकिस्तानात जे अमानवी भिषण क्रौर्याचे दर्शन घडले त्याने कोणीही थिजून जाईल, हबकून जाईल आणि आम्ही कोणत्या जगात राहतो आहोत या प्रश्नानेच कासाविस होईल. तालिबानला ज्यांनी जन्म घातला, एका भस्मासुराला कामाचे असेपर्यंत पाठबळ देत राहिले ते जागतिक सत्तास्थान असल्याने त्याकडे बोट दाखवले जाणार नाही हे तर आहेच! १९९५ पासून पाकिस्ताननेही तालिबानला नुसते समर्थनच नव्हे तर सक्रीय मदतही केली. जागतिक महासत्तांच्या संघर्षातून निर्माण केली गेलेली ही संघटना...तिच्या शाखाही अनेक. हातात शस्त्र आलेले, हिंसेची सवय लागलेले कोठे शांतता आली कि सैरभैर होतात. मग शत्रू बदलतात. आधीच्या समर्थकांवरच काय स्वकियांवर, स्वधर्मियांवरही उलटतात. अमेरिकेने ते भोगले आहे. परंतू शिकणार कोण? 

पाकिस्तान आता गेली काही वर्ष भोगतो आहे. काल त्याचा कळस झाला. मुलांना ठार मारले याचे कारण त्यांच्या पालकांनी (पाक सैनिकांनी वझिरीस्तानवर हल्ले करून) अमेरिकेला मदत केली आणि पाकिस्तान हे अमेरिकेचे बाव्हले राष्ट्र (पपेट स्टेट) आहे म्हणुन त्याला टार्गेट केले असा दावा टीटीपी च्या कमांडरने केला आहे. या द्वेषाची सुरुवात करून दिली ते नामानिराळे राहतात यावर जागतिक समुदायाने चिंता केली पाहिजे आणि एकत्र येवून कोठेतरी हे थांबण्यासाठी तोडगा काढला पाहिजे. हे येथेच थांबेल असे चित्र दिसत नाही. सुडबुद्धीने पेटलेल्या दहशतवाद्यांकडून यापेक्षाही कृर मार्ग वापरले जाणार नाहीत असे नाही.

पाकिस्तान सरकारने यापासून गंभीर धडा घ्यायला हवा. अमेरिकेचे बाव्हले बनण्यात पाकिस्तानी सत्ताधा-यांचे/लष्कराचे हित असले तरी ते जनतेच्या हिताचे नाही. जागतिक सत्ता तमाशे पाहतील, नव्या रणनित्या आखतील...संघर्ष पेटता ठेवतील. ज्या काही भारतियांनी नि:ष्पाप मुलांच्या हत्यांबद्दल आनंद साजरा केला हेही गंभीर आहे. "तालिबानी" वृत्तीचे असायला मुस्लिमच असणे आवश्यक नसते हेही या निमित्ताने दिसते. अमेरिकेत ख्रिस्ती तालिबान आहे आणि त्याचे नेते काय म्हणतात हे पहा..."We should invade their countries, kill their leaders and convert them to Christianity. We weren't punctilious about locating and punishing only Hitler and his top officers. We carpet-bombed German cities; we killed civilians. That's war. And this is war." -- Ann Coulter. 

हा लढा दिसतो तसा सोपा नाही. एक दिवस खेद व्यक्त करत पुन्हा गहाळ होण्यासारखा नाही. असल्क्या हिंसक, धर्मांध भावना जेथेही कोठे, अगदी अल्प-स्वल्प का असेनात उफाळतांना दिसतात तेथे तेथे सुजाण नागरिकांनी आवाज उठवलाच पाहिजे. जग जर वाचवू शकते तर ते लष्कर नाही, अणुबोंब नाही...धर्म नाही , तर धर्मांपार जात शांततेवर अपार प्रेम करत विराट भवितव्याकडे नजर लावून बसलेले जगभरचे "जगप्रेमी" नागरिक!

3 comments:

 1. आप्पा - आज म गांधींची प्रकर्षाने आठवण होते आहे
  बाप्पा - जर आज ते असते तर ?
  आप्पा - नक्कीच ते तालिबानला सामोरे गेले असते पेशावरला !
  बाप्पा - आणि मग ? एक भारतीय सीमा पार करून पाकिस्तानात गेला म्हणून पाकिस्तानने काहीच केले नसते ? असे कसे म्हणतोस तू ?
  आप्पा - मला वाटते - ते गेले नसते ! कारण त्यांनी इंग्रजांबरोबर जो लढा दिला तो म्हणजे इंग्रजी "संस्कृतीला" दिलेले आव्हान होते - सर्व युरोपियन देशात इंग्रज हे सर्वात सुसंस्कृत असे धरले जातात
  बाप्पा - म्हणजेच त्याना खात्री होती की इंग्रजी सत्ता आपल्याला न झेपेल असा त्रास देणार नाही - आणि आपल्या अहिंसेचा गवगवा होईल असेच ना ?
  आप्पा - अगदी शब्दशः खरे आहे ते ! पाकिस्तानात त्यांचे काय चालणार ? इसीस सारख्यांनी त्यांचे डोके धडावेगळे केले असते -किंवा स्पेन मध्ये त्यांचे तुकडे केले असते
  बाप्पा - म्हणून तर म गांधीनी खान अब्दुल गफारखान रुजवला - पख्तुनिस्तानात !पेशावर पासून फक्त २९० कि मी वर !
  आप्पा - म गांधी फारच धोरणी होते हे निर्विवाद !आपली अहिंसेची गंगा त्यांनी अफगाणिस्तानात उतरवली म्हणजे बघ !आज त्याच अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा केला आहे
  बाप्पा - हिंसेने काय होते - जरब बसते का ?समाज हिंसेला कंटाळून सत्तांतर करतो - तेही हिंसेने -
  आप्पा - रशिया असो चीन असो नाहीतर अमेरिका असो - बदल म्हणजे हिंसा अटळ - हा सिद्धांताच आहे असेच दिसते - आशियात सुद्धा असेच दिसते -
  बाप्पा - असहाय लोकांना हिंसेचा बळी बनवून त्यांची मने बदलता येत नाहीत मग अजाण मुलांचा बळी घेण्याचे नीच कृत्य केले गेले त्याचा निषेध केला पाहिजे
  आप्पा - आश्चर्याची गोष्ट म्हणजे यात वैदिक कोणीच नव्हते हे विशेषच म्हणायचे !
  बाप्पा - संजय तसाही सिद्धांत मांडेल - त्याचे काही सांगता येत नाही !

  ReplyDelete
 2. प्रियवर
  हम ही सही, हमारा भगवान ही सही, और उस भगवान के तरफ से बोलने का लायसेंस भी केवल हमारा है, ये मानने वाले लोग जोग जब तक पैदा होते रहेंगे, मनुष्यता का ह्रदय यूँ ही छलनी होता रहेगा. धर्म के नाम पर नये बदलाव को नकारने वाले तत्व जब तक आते रहेंगे, अपने आग्रह से दूसरों की आजादी का हक छिनते रहेंगे, तब तक असंसख्य माताओं के आसूँ यूँ ही बहते रहेंगे.
  इस पूरी आपाधापी में महात्मा गाँधी सही अर्थो में एक विकल्प प्रस्तुत करते थे. आज आंख में पानी में भर कर उनकी कुर्बानी याद करने को दिल जार जार रो रहा है.
  उन माँ पिताओं को सांत्वना देने के लिए आज शब्द भी गूंगे है. फिर भी यदि कहना पड़ा तो इतना ही कहेंगे कि हे जगत माता हमें माफ़ करना. यह दुनिया ऐसी बनाने में हम भी बराबर के दोषी है.
  दिनेश शर्मा

  ReplyDelete
 3. Can you answer my question which i asked regarding when Panini lived?

  ReplyDelete