Tuesday, July 14, 2015

भारतीय संस्कृतीचा इतिहास

भारताचा विविध उत्खननांतून मिळणारा पुराइतिहास हा किमान ८० हजार वर्ष जुना आहे. तत्कालीन दगडी हत्यारे, दगडी हत्यारे-तासण्या-टोचण्या यातून या शिकारी मानवाची आपल्याला ओळख होते. पुढची ३०-४० हजार वर्ष ही याच मानवाच्या हत्यार कौशल्यातील उत्क्रांतीचीही नोंद ठेवतो. महाराष्ट्रात तर अशा हत्यार/दगडी वस्तू बनवायचे कारखानेही सापडलेले आहेत. महाराष्ट्रातील बेसाल्ट खडकांच्या विपूलतेमुळे हे होणे स्वाभाविक आहे. गारगोट्यांपासून ते हाडांपासूनही बनवली गेलेली हत्यारे आहेत. भारतातील पुरापर्यावरणही कसे बदलत गेले याचे पुरावे उत्खननांतून समोर आलेले आहेत. उदा. महाराष्ट्रात तीस-चाळीस हजार वर्षांपुर्वी पानथळ जमीनी मोठ्या प्रमाणात होत्या. जंगली हत्ती, गेंडा, पाणघोड्यांसारखे प्राणी तर शहामृगासारखे पक्षीही येथे विपूल प्रमाणात असल्याचे पुरावे मिळतात. वीस हजार वर्षांपुर्वी मात्र कोरडे वायुमान सुरु झाले. हिमखंड वितळू लागल्यने सागराची पातळी वढायलअ सुरुवात झाली. या हवामान बदलांमुळे मानवी जगण्याच्या पद्धतींतही बदल होत गेला.

जेथून कलेची अभिव्यक्ती सुरु झाली तेथून मानवी संस्क्रुतीचा प्रकट उद्गार सुरु झाला असे मानले जाते. सरासरी ३५ हजार ते १०००० वर्षांपुर्वीपासूनची भीमबेटका येथे मिळणा-या गुंफाचित्रे या भारतीय अभिव्यक्तीची उदाहरणे आहेत. अशाच प्रकारची गुंफाचित्रे विदर्भातही मिळून येतात. तत्कालीन मानवाच्या जगण्याची पद्धत, नृत्य-कला, शिकारी ईत्यादि बाबी त्या चित्रांतून स्पष्ट होतात. 

सरासरी दहा हजार वर्षांपुर्वीपासून भारतीयांना शेतीचा शोध लागला असे मानले जाते. मेहरगढ येथे ९००० वर्षांपुर्वीच्या शेतीचा शोध लागला आहे. अर्थात हा भाग तुलनेने कोरडा व कमी लोकवस्तीचा असल्याने हा पुरावा समोर आला असला तरी शेतीच्या शोध याहीपुर्वीचा असणार हे उघड आहे. अधिक लोकवस्तीच्या प्रदेशांत बव्हंशी जमीनी पुनर्लागवडी होत आल्या असल्याने पुरातन पुरावे मिळणे जवळपास अशक्य असेच आहे. जगभरातही शेतीचा शोध याच काळात लागला. झार्गोस परवताच्या परिसरात १२ हजार वर्ष जुने शेतीचे स्थळ सापडले आहे. 

शेतीच्या शोधाने शिकारी-पशुपालक माणूस अधिक स्थिर झाला. त्याच्या जगण्याची पद्धत बदलली. शेतीसाठी आवश्यक अशी अवजारे व खाद्य पीकांचे-फळे व भाज्यांचे  "मानसाळवणे" सुरु झाले. संकर करुन नव्या प्रजाती बनवायची कला भारतीयांनी दहा हजार वर्षांपुर्वीच वापरात आणली. सिंधू संस्कृतीचा नागर संस्कृतीचा काळ सनपुर्व ३२०० मद्ध्ये सुरु होत असला तरी पुर्व-सिंधू संस्कृती ही छोटी खेडी करुन फुलत होती याचे पुरावे मिळालेले आहेत. हे लोक अन्यत्रहून कोठून आलेले नव्हते तर जे लोक ज्या-त्या परिसरात शिकार व पशुपालन करुन हजारो वर्ष जगत आले होते त्यांनीच कृषीप्रधान जीवनाचा अंगिकार करत नवीन संस्कृती फुलवली असे प्रसिद्ध पुरात्तत्ववेत्ते जोनाथन मार्क केनोयेर म्हणतात आणि ते संयुक्तिकही आहे. सिंधू व गंगेच्या खो-यांत गाळाच्या जमीनी असल्याने शेतीने तिथे जशी मुळे रुजवली तशीच ती ब्यारतात अन्यत्र, म्हणजे ब्रह्मपुत्रा, गोदावरी, कावेरी...कृष्णा अशा अगणित नद्यांच्या खो-यांत रुजवली. 

या काळात भारतातील जलवयुमान (इसपू ६००० ते इसपू १८००) पावसाळी होते. अनुकूल पावसामुळे शेतीची भरभराट झाली. तिबार पीके घेण्याइतपत मजल गाठली गेली. नद्यांवर बांध घालत कालव्यांनी पाणी दुरवर शेतीसाठी वाहून नेण्याचे तंत्र भारतीयांनी शोधले. जलव्यवस्थापनात त्यांनी केवढे झेप घेतली होती हे ढोलावीरा येथील अवाढव्य अवशेषांवरून समजते. 

सुबत्तेबरोबरच अन्य गरजा वाढतात. त्या गरजा उपलब्ध सामग्री वापरत नवीन शोध लावत भागवल्या जातात. कलादिंच्या आविष्कारांना वाव मिळतो. सिंधू संस्कृतीचा जागतिक व्यापार इसपू ७००० मद्ध्येच सुरु झाला असे केनोयेर प्रत्यक्ष पुराव्यांनी दाखवून देतात. अफ़गाणिस्तान, इराण, तुर्कस्थान, इजिप्त ते अरबी देशांशी भारताचा व्यापार एवढा पुरातन आहे. त्यात अन्नधान्यापासून ते विविध अलंकार, तांबे, सागवानी लाकडॆ यांची निर्यात समुद्रमार्गे व खुष्कीच्या मार्गाने होत असे. इजिप्तमद्ध्ये भारतीय व्यापा-यांनी वसाहती बनवल्याचे पुरावे आढळून आले आहेत. भारताला तेंव्हा मेलुहा म्हटले जायचे हे तेथील लेखांवरुन स्पष्ट झाले आहे. भारतातील अंतर्गत व्यापारही सर्व प्रदेशांत होत असे. उदाहरणार्थ बराच कच्चामाल (उदा. खनिजे) विंध्याद्रीच्या प्रदेशापासून ते आंध्रातून आणली जात. आंध्र प्रदेशातील मृद्भांडी बनवण्याची पद्धत, महाराष्ट्रातील दायमाबाद येथे सापडलेली अग्नी हवा तेंव्हा उपलब्ध असावा म्हणून तेवत ठेवायची पद्धत आणि सिंधू खो-यातील पद्धत यात साम्य दिसून येते ते यामुळेच. थोडक्यात देशांतर्गत दळण-वळण व व्यापारही मोठ्या प्रमाणावर चालु होता.

सांस्कृतिक जीवन

सिंधू संस्कृती (ज्याला आपण भारतीय म्हणुयात कारण जरी आधी अवशेष सिंधु खो-यात सापडले असले तरी आता ते सर्वत्र मिळाले आहेत व अजुनही उत्खनने सुरु आहेत.) ही कृषी व व्यापारप्रधान संस्कृती होती. ती इसपू २६०० पर्यंत कळसाला पोहोचली. या काळात जलवायुमान उत्तम होते. गंगेच्या खो-यात पाऊस त्या काळात खुपच जास्त असल्याने अरण्ये व पानथळ जागा मोठ्या प्रमाणात होत्या. त्यामुळे मानवी वस्ती असली व तिच्यात व सिंधु खो-यातील लोकांत सांस्कृतिक व ऐहिक व्यवहार होत असले तरी तेथील वाढीवर मर्यादा होती. परंतू या काळातील देशव्यापी धर्मश्रद्धा या शिव-शक्ती प्रधान व मुर्तीपुजक होत्या याचे मात्र सर्वत्रच मुबलक पुरावे मिळाले आहेत. सिंधु खो-यात इसपू २६०० मधील शिवलिंग तर सापडले आहेच पण त्रिमुखी योगध्यानात बसलेल्या आदिशिवमुद्राही सापडलेल्या आहेत. दायमाबाद येथे इसफु २४०० मधील गारगोटीपासून बनवलेले शिवलिंग सापडले असून अनेक मातृदेवतांच्या प्रतिमा आढळुय्न आलेल्या आहेत असे प्रसिद्ध पुरातत्ववेत्ते दिलीप चक्रवर्ती सांगतात. वृषभाच्या मुद्रा सिंधू संस्कृतीत विपुल तर सापडलेल्या आहेतच पण बंगाल, आंध्र व महाराष्ट्रातील विविध उत्खननांतही लिंग, मतृदेवता आणि वृषभ प्रतिमा मिळालेल्या आहेत. शिव-शक्ती आणि बैलाचे भारतीय संस्कृतीतील महत्व व पुज्यभाव आजही टिकून आहे हे तर स्पष्टच आहे. म्हणजे आजही आपण त्याच संस्कृतीच्या विकसीत धारेचे प्रवासी आहोत.

य संदर्भात डा. रा. ना. दांडेकर म्हणतात कि आदिशिवाचा धर्म आर्यपुर्व काळात भारतात सर्वव्यापी होता. वैदिक धर्मामुळे या धर्माची तात्पुरत्या स्वरुपाची पिछेहाट झाली असली तरी वैदिक धर्म जनमानसाची पकड घेऊ शकला नाही. उलट वैदिकांनाच आपल्या देवता त्यागत अनार्यांच्या देवता स्विकारावे लागले.

बी. बी. लाल यांनी गंगेच्या खो-यात जाखेरा येथे केलेल्या उत्खनांतून तेथील सामाजिक जीवनाची माहिती मिळते. गंगेच्या खो-यातील लोक इसपू २००० च्या काळात शेती, पशुपालन व हस्तोद्योगांच्या आधारे जगत असत. ते मासेमारीही करत. येथे सापडलेल्या भांड्यांत पितळ्या, लोटा, माठ व वाट्याही अगदी आपल्याकडे आताआतापर्यंत जशा वापरल्या जात तशाच होत्या. येथे काच व पितळाच्या बांगड्या तर सापडल्याच पण भाजक्या भांड्यांवरील कोरीव आकृत्यांवरून त्यांना त्रिकोण, वर्तुळ याचे शास्त्रशुद्ध ज्ञान होते. करकटकासारखी भौमितीक अवजारे, ओळंबे इत्यादि अवजारेही सापडली आहेत. 

त्या काळात (सनपुर्व ३१०० नंतर) सिंधु खो-यात अनेक शहरे व्यापार-उदीमामुळे बनली असली तरी बव्हंशी लोक खेड्यांतच राहत असत. स्त्री-पुरुषांना वैविध्यपुर्ण अलंकारांचे वेड होते असे म्हटले तरी चालेल. अजही गुजराथ, राजस्थन, सिंध प्रांतातील ग्रामीण लोक जवळपास तसेच अलंकार-बांगड्या वापरतांना दिसतात. खेड्यांचे महत्व भारतात आताआतापर्यंत होतेच. 

इसपु १८०० च्या आसपास मात्र जागतिक हवामान बदलायला सुरुवात झाली. सुदूर पश्चिमेतील मेसोपोटेमिया ते चीनपर्यंतच्या संस्कृत्या व जनजीवनावर त्याचा विपरित परिणाम झाला. पर्जन्यमान कमी होत गेले. त्यामुळे अर्थव्यवस्थाही गडगडल्या. भारतीय संस्कृतीचा विदेश व्यापार यामुळे ठप्प तर झालाच पीकांवरही त्याचा विपरित परिणाम झाला. नद्याही आक्रसल्या. गंगेच्या खो-यातील पाऊसही कमी झाला असला तरी तो पुर्वीच्या तुलनेत उत्तम म्हणता येईल असा होता म्हणून संस्कृतीचे केंद्र गंगेच्या खो-याकडे सरकले. याच काळात भारताने स्वतंत्रपणे काचेचा शोध लावला हे आता सर्व पुरातत्त्ववेत्ते मान्य करतात. 

वैदिक संस्कृती

ऋग्वेदाचा काळ हा कोणीही जागतिक विद्वान इसपू १५०० च्या पुर्वी नेत नाही. म्हणजेच सिंधू संस्कृतीचा सनपुर्व ७००० पासून उत्कर्ष होत ती जलवायुमानातील बदलाने गडगडली त्या काळात वैदिक धर्माचा आरंभ नुकताच झाला होता. वैदिक धर्म हा आक्रमक आर्यांचा असे मानायची प्रथा होती. पण पुरातत्वीय अवशेषांवरुन हा सिद्धांत कधीच बाद झाला आहे. ऋग्वेद रचला गेला तो आताच्या अफगाणिस्तानातील हरहवती (सरस्वती) नदीच्या काठावर. तो इसपू १००० च्या आसपास भारतात आला तो धर्मप्रचारकांच्या माध्यमातून. शतपथ ब्राह्मणातील विदेघ माथवाची पुराकथा ही प्रचारकांचा प्रवास दाखवते. या काळात उत्तर भारतात संस्कृतीचे केंद्र गंगेचे खोरे बनलेले होते. पुढील वैदिक वाड्मय कुरुक्षेत्राच्या परिसरात लिहिले गेले व तेथुन प्रचारकार्य सुरु झाले. त्या वेळीस भारतात योग, श्रमण, संन्यास अशा अवैदिक तात्विक संस्कृत्या पुरेपुर रुजलेल्या होत्या व तत्वज्ञानातही मोठे कार्य होत होते. शैवप्रधान धर्म हाच याही काळात प्रबळ होता. दक्षीणेत तर वैदिक धर्माला खूप उशीरा, म्हणजे इसपु दुस-०या शतकाच्या आसपास प्रवेश मिळाला असे वि. का. राजवाडे सांगतात.

वैदिक संस्क्टृतीचे स्तोम कितीही आज वाढले असले तरी वास्तवे खूप वेगळी आहेत. उदाहरणार्थ भारतात इसपू सातव्या शतकापासूनची चिन्हांकित नाणी मिळतात. प्रत्येक नाण्यावर प्रत्येक जानपदाचे स्वतंत्र चिन्ह आहे. यात कोठेही वैदिक चिन्ह येत नाही. इसपु तिस-या शतकापासुनचे अगणित शिलालेख उपलब्ध आहेत. त्यातील सर्वत्र भाषा प्राकृत तर चिन्हे पुन्हा शैव, बुद्धिस्ट, जैन अथवा परकीय सत्ताधा-यांच्या देवतांची आहेत. गणराज्ये अथवा जानपद हे उल्लेख ऋग्वेदात कोठेही येत नाहीत. पौराणिक वाड्मयात  राजांनी खूप यज्ञ केले असे सांगितले असले तरी प्रत्यक्षात यज्ञ केल्याचे फक्त दोन शिलालेखीय उल्लेख आहेत. त्यातील एक पुष्यमित्र शृंगाचा आहे तर दुसरा सातवाहनांचा. हे उल्लेखही प्राकृत भाषेत केले गेले आहेत हेही विशेष. एकाही नाण्यावर अथवा शिलालेखांत वैदिक अथवा संस्कृत भाषा येत नही याचा अर्थ एवढाच कि वैदिक संस्कृती ही अत्यंत मर्यादित होती, व आजही मर्यादित आहे. 

त्यामुळे वैदिक धर्मियांपासून भारतीय संस्कृतीचा इतिहास सुरु होतो हे मत निखालस खोटे आहे. गुप्तकाळात (इ.स. चवथे शतक) वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला व तेथुनच नवनिर्मित संस्कृत भाषेत वैदिकांचा बोलबाला सुरु झाला. त्यापुर्वी वैदिक धर्माच्या प्रबळ अस्तित्वाचे पुरावे इसपु १००० ते तिसरे शतक केवळ आणि केवळ मगध प्रांतातील आहेत. अन्यत्रचे नव्हेत. या धर्माला विरोध करणारे शाक्यमुनी भगवान बौद्ध व महावीरही याच प्रांताशी संलग्न होते हे येथे लक्षत घ्यायला पाहिजे. अन्यत्र हा धर्म विशेष नव्हताच त्यामुळे अन्यत्र विरोधाचा सुरही उमटायचे कारण नव्हते.

म्हणजे वैदिक धर्म हा आयात झालेला. येथीलच मुळच्या अनेकांने धर्मांतर केले यातुन हा धर्म पसरला असला तरी पुजाप्रधान शैव धर्माला हा धर्म कधीच आव्हान देवू शकला नाही. उलट पश्चिमेपासुन पुर्वेपर्यंत आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत शिव आणी देवी संस्कृतीने मात्र पुरातन काळापासून ते आजतागायत आपले गारुड कायम ठेवलेले दिसते. 

भारत हा एवढ्या भाषांचा, प्रादेशिक संस्कृत्यांचा देश असुनही त्यात नेहमीच भावनिक ऐक्य राहिले याचे कारण देशभर विखुरलेली ज्योतिर्लिंगे आणि शक्तीपीठे याचे भान असायला हवे. सिंधू काळापासून चालत आलेला हा सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा आहे. डा. रा. ना. दांडॆकर म्हणतात त्याप्रमाणे वैदिक दैवते कोणीही कधीही पुजत नव्हते. पण आदिम शिव-शक्तीपुजा मात्र आजही कायम आहे. त्यामुळे भारतीय संस्कृती ही पुरातन काळापासुनच शैव होती व आजही शैवच आहे. वैदिक धर्म व संस्कृती या मातीत रुजली नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीचा विचार करतांना वैदिक धर्म व संस्कृतीला चवथ्या-पाचव्या स्थानावर ठेवावे लागते. ते का यावर आपण स्वतंण्त्रपणे विचार करुयात!

18 comments:

  1. फारच उत्तम आणि ओघवते लिखाण केलेले आहे, बर्याच मोठ्या कालखंडाचा संदर्भ देखील घेतला आहे. आणि वेळोवेळी उतखानानाचे दाखलेही दिलेले आहेत, फारच सुरेख आणि वास्तववादी लेख आहे. अर्थात टीकाही करावी असे वाटत आहे,
    १) प्रस्तुत लेखावरून हिंदू धर्माचे स्वरूप एकेश्वरवादीच होते असे दिसते, जसजशी विचारांची प्रगल्भता येते तसतसा मनुष्य एकेश्वर वादाकडे वळतो असा माझा अभ्यास आहे. त्यामुळे त्याही पुढे जाऊन शिव आणि शक्ती हे वेगळे नसून एकच आहेत असे वाटते. पुरुष शरीरातही स्तन असतात, किवा स्त्रीच्या शरीरात हि सूक्ष्म लिंग असते. स्त्री आणि पुरुष ह्यातील सीमारेषा पुसट असतात. त्यामुळे शक्ती हे शिवाचेच किवा शिव हे शक्तीचेच रूप आहे असे वाटते.
    एकेश्वर वाद हा अनेकेश्वर वादापेक्षा श्रेष्ठ आहे याची अनेक कारणे आहेत,
    १) भक्तांच्या श्रद्धा विभागल्या जातात.
    २) मांत्रिक, तांत्रिक, बाबा, गुरु ह्यांचे फावते.
    ३) योग्य दैवताची उपासना न केल्याने फळ मिळत नाही, मनशांती मिळत नाही, आणि देवावरचा विश्वास नष्ट होतो.
    ४) अनेक देवांचे तत्व वेगवेगळे असल्याने (राम -एकपत्नी), (दत्त-मोक्षमार्गी) असल्याने भाविकांचा गोंधळ उडतो.
    ५) देवाप्रती संवेदना कमी होतात. असे अनेक प्रकार आहेत
    २) शिव शंकराची मूर्तीपूजा होते हा आपला सर्वांचा भ्रम आहे. शिवलिंग ह्या स्वरुपात शिवाची पूजा होते. ती मूर्ती नसते. ती एक व्यावहारिक खुण असते. बहुतेक शिव मंदिरे हि जिथे तीर्थ (पाणी) असते तिथेच आहेत. जेणेकरून येणाऱ्या दमलेल्या माणसाला पाणी मिळावे. पाण्याचे महत्व तर आपण जाणतोच. दोन धर्मातील काही विरोधी विचार पहिले तर कळते कि, अ) हिंदू परमेश्वर सगळीकडे व्यापलेला आहे असे समजतात. म्हणून शिवलिंग सर्वदूर पसरली आहेत. ब) त्याउलट इस्लाम मध्यॆ परमेश्वर हा त्रयस्थ आहे त्यामुळे ते एका विशिष्ट दिशेकडे तोंड करून प्रार्थना करतात. असो.
    बहुतेक मूर्ती स्वरूपातील देव हे शिव आणि पार्वतीचा अवतार आहेत. देवीची मूर्तीपूजा हे एक उत्सव स्वरूप आहे. तिची खरी पूजा नवरात्रात घट या स्वरुपात केली जाते व तीच जास्त रूढ पूजा होय. त्यामुळे देवीची मूर्तीपूजा होते हा एक गैरसमज आहे.
    मूर्तिपूजेचे दुष्परिणाम,
    १) मूर्ती ह्या नष्ट होणार्या वस्तूंपासून बनलेल्या असतात, मग त्या नष्ट झाल्यावर देवाचे काय होणार? देव नष्ट होतो का? ठरवून किवा न ठरवता (गणपती विसर्जन) मूर्तींची विटंबना होते.
    २) मनुष्य वस्तुप्रिय बनतो, गळ्यातले लॉकेट तुटले म्हणजे मी आज मारणार असा प्रकार होतो.
    ३) मूर्ती हे धर्म आक्रमणाच्या काळात सोफ्ट टार्गेट ठरतात.
    ४) मूर्ती आणि देव-धर्म ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. मूर्तीपूजा हि भक्तीची फारच प्राथमिक अवस्था आहे. लहान मुलाला समजावून सांगण्यासाठी ती योग्य आहे, त्यापुढे मंत्र, तंत्र असे अनेक प्रकार महत्वाचे आहेत.

    ReplyDelete
  2. ३) प्रस्थापित हिंदू (शैव) धर्म जितका साधा आहे तितकाच जटील सुद्धा आहे हे सांगावेसे वाटते. साधे कुलदैवताचे नमन व घटस्थापना हे त्याचे साधे स्वरूप, तर तंत्र (योग- श्वास निश्वास प्रक्रियेने मन शांत करणे, माणूस जेव्हा घाबरतो तेव्हा तो फार शीघ्र गतीने श्वास घेतो तेव्हा काल्शियम शरीरात व मेंदूला पोचत नाही याचे काळात नकळत अनेक परिणाम होतात), मंत्र-स्तुती, चिकित्सा, निदान हे अधिकाधिक जटील होत जातात.
    ४) ह्या लेखाच्या अनुषंगाने जर शैव धर्म पुरातन असेल तर शिवाची शास्त्रेही तितकीच पुरातन असणार. त्यापैकी हस्तरेषा व शरीरलक्षणे, आगम, योग, प्राण्यांची भाषा बोलणे?? (रामायणातच स्वतः राम हनुमान या वानराशी, जटायू या पक्ष्याशी बोलताना उल्लेख आलेला आहे). हे सर्व येतात. म्हणजे थोडक्यात एकूण ज्ञानाच्या अनेक शाखा तयार झाल्या व एक एका समाजाने त्या स्वीकारून पुढे चालवल्या.
    ५) शिव हा परमेश्वर कि माणूस हा मोठा अवघड प्रश्न आहे. एखादा अलौकिक बुद्धिमान माणूस आज मोठे-मोठे शोध लावू शकतो, पण तो परमेश्वर नसतो. किवा याहीपलीकडे जे काही विश्व आहे त्याचे पूर्ण ज्ञान असलेला परमेश्वर असू शकतो, पण तो असे शोध लावण्याचा उत्साह दाखवीत नाही. आता पुढे अधिक विषयांतर नको.
    ६) तत्कालीन मंत्रांचे स्वरूप:
    अ) बहुतेक सर्व मंत्र ईश्वराच्या स्तुतीपर आहेत. आणि अपेक्षित वरदान मागितलेले आहे. अथर्वशीर्षात ब्रम्हा त्वं, अग्निस्त्वं, वायुस्तम। म्हणजे ईश्वर विश्व्यापी आहे अशी संकल्पना, तर रुद्रात, नाद्याय, वैशन्ताय, कुप्याय, चाय वाट्याय, हे जास्त सूक्ष्म निरीक्षण (परमेश्वर हाच, नदी, छोटे तळे, विहीर, पाण्याचा झरा) असे नोंदवले आहे. वेदातील बहुतेक मंत्र स्तुतीपर आहेत.

    ReplyDelete
  3. नेमका अमवस्येला लेख आलाय, आता किती प्रतिसाद मिळतोय ते बघूया. शिव उपासकाला अमावास्या चांगलीच जाते. लेखावर काही शंका,
    १) वैदिक हे बाहेरचे, अफगाण मधले, तर संस्कृत भाषा प्राकृत वरून आलेली आहे हेही बरोबर वाटते. ती महाराष्ट्री प्राकृत च्या सर्वात जवळची आहे. (लिपी आणि शब्दोच्चार याबाबत) मग पुढील दोन निष्कर्ष निघतात,
    अ) वैदिक लोक आधी अफगाण मधून द्वीपकल्पीय भारतात आले, तिथल्या प्राकृत भाषा अभ्यासल्या मग त्यावरून स्वताची (वेदकालीन) संस्कृत भाषा तयार केली. कारण प्राकृत हि संस्कृत ची जननी आहे हा सिद्धांत.
    ब) वैदिक लोकांनी अफगाण मध्ये असलेली प्राकृत भाषा (कदाचित पश्तुन-पख्तु) (इंडो आर्यन-इराणी-फारसी) लिपी ह्यावरून वेदकालीन संस्कृत भाषा सिद्ध केली व त्या भाषेत वेद लिहिले.
    क) ज्या अनेक भाषांपासून संस्कृत तयार झाली त्या भाषा ह्या इतक्या प्रादेशिक विविधता असलेल्या असल्या तरी परिणाम स्वरूप जी संस्कृत बनते ती मात्र सगळ्या भाषांचे एकत्रीकरण करते कि काय? अवेस्त्यन वेद ह्यांची प्राकृतिक भाषा, महाराष्ट्रातील प्राकृतिक भाषा ह्यात साम्य असणे ह्यात काहीतरी गूढ दडले आहे.

    ReplyDelete
  4. ड) कदाचित हा पूर्ण टापु, म्हणजे सगळे इराण, इराक मध्यपूर्व, पाकिस्तान हे सर्वच शिव व शक्तीचीच उपासना करीत होते कि काय? नासदीय सूक्तात हाच प्रश्न मोठा साधेभोळेपणे विचारला आहे, कोण आहे हा परमेश्वर? तो कुठे बसलाय? तो तिथून काय करतोय? असे अनेक प्रश्न!! पण सरतेशेवटी सामान्य (पशुपालक) वैदिकांना वेदात याची उत्तरे मिळाली नाहीत.
    इ) मेलुहा ह्या ग्रंथाचे अनेक भाग आमिष त्रिपाठी नावाने प्रसिद्ध झालेत पण त्यावर काहीही अधिकारवाणीने लिहिल्याचे वाटत नाही. असो पुरातत्व संदर्भ असल्यास स्पष्ट करावा.
    फ) वेदोत्तर काळात वैदिक आणि अवैदिक हा लढा फार महत्वाचा वाटत नाही (फक्त महाराष्ट्र बघता- दक्षिणेकडील राज्यांचे वेगळे गणित आहे), जास्त उद्रेक शैव विरुद्ध वैष्णव असाच झालेला दिसतो. ह्या दोन्हीही देवता ऋग्वेदात दुय्यम आहेत (पण अथर्व आणि य्जूर वेदात महत्वाच्या ठरल्या आहेत) आणि त्यानंतर ह्यांचे अनुकरण समाजाने जास्त प्रमाणात केले आहे. शिव-मंदिरे आणि दशावतार ह्या स्वरुपात ह्या दोनच देवतांचे जास्तीत जास्त अनुयायी आहेत - सध्याचा कळीचा प्रश्न राममंदिर हा ह्यातूनच उद्भवला आहे.)
    ग) वेद हे अस्पष्ट आहेत. पुराणे अतिशयोक्ती पूर्ण आहेत. त्यानंतर जयिष्णू आणि सहिष्णू असे दोन समाजात भेद पडले आहेत. पूर्णतः प्राणीमात्रांना मानणारा शैव धर्म स्वतः कोंबड्या मेंढ्या बोल्हाइचा नावाखाली मटण खातो, तर तिकडे वैदिक लोक काट्यास काटा म्हणून सर्वभक्षी लोकांसमोर गाय खातात आणि जास्तीत जास्त जिष्णू बनायचा यत्न करतात ह्यात नैसर्गिक कारणे दडली आहेत. त्यावरून फार फार पूर्वी एक खंडप्राय संस्कृतीची पाळेमुळे खणताना नुसते आत्ता अस्तित्वात असलेले पुरावे तपासणे हा नुसता पोरखेळ आहे.
    ह) इथे अजूनही न्याय इसीस आणि अमेरिकेचा चालतो. दोन्ही संस्था अगदी परस्पर विरोधी.!! एक धर्मावर आधारित आणि दुसरी लोकशाही आणि मानवतावादी. इसीस आत्ता हि इथे घुसू शकतो त्यावेळी तत्वज्ञान सांगणारे लोक कुठेतरी पळून गेलेले असतील। आधीही पळून गेलेलेच होते, १९९३, २००३, २००६ हर हर महादेव आणि दाशाव्तर हेच वैदिक आणि अवैदिक यांचे युद्ध आहे का?

    ReplyDelete
  5. अप्पा -बाप्पा तुमचा यम यामिचा संवाद कुठे गेला? कुलूप लागले कि काय? आज पान पट्टी बंद दिसत आहे.

    ReplyDelete
  6. सिंधु संस्कृति ही भारतातील ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे. ही संस्कृति प्रामुख्याने सिंधू नदी,सरस्वती नदी व सिंधूच्या उपनद्याकाठी (पंजाबातील ५ मुख्य नद्याच्याकाठी) अस्तित्वात होती. तसेच गंगा यमुना खोरे ते उत्तर अफगणिस्तानपर्यंत ही संस्कृती बहारली. सिंधू संस्कृतीच्या अस्तित्वाचा पुरावा दयाराम सहानी यांनी इ.स.१९२१ मध्ये प्रकाशात आणला. त्याच वर्षी पंजाबातील हडप्पा येथे प्रायोगिक उत्खनन झाले, त्यात सिंधू संस्कृतीचे ताम्रपाषाणयुगीन स्वरुप स्पष्ट झाले.राखालदास बॅनर्जी यांनी इ.स. १९२२ मध्ये मोहें-जो-दडोचा शोध लावला . यानंतर या दोन्ही स्थळी सर जॉन मार्शल (पुरातत्त्वविभागाचे महासंचालक,इ.स. १९०२ ते १९२८), इ. जे. एच्. मॅके, माधोस्वरुप वत्स, सर मॉर्टिमर व्हीलर इ. संशोधकांनी विस्तृत उत्खनने केली.याशिवाय सर्वेक्षणातील पाहणीत सिंध-पंजाबात (विद्यमान पाकिस्तान) सिंधू संस्कृतीची अनेक प्राचीन स्थळे प्रकाशात आली. सिंधूचे खोरे हेच या ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे आगार असल्याने तिला सिंधू संस्कृती अथवा हडप्पा संस्कृती असे नाव देण्यात आले.

    सिंधू संस्कृती आधुनिक भारत (पंजाब, हरयाणा, राजस्थान, गुजरात व पाकिस्तानातील पंजाब, सिंध, बलुचिस्तान व वायव्य प्रांत) भूभागावर वसलेली होती. त्यातील बराचसा भाग आधुनिक पाकिस्तानात असला तरी सिंधू संस्कृतीत आजच्या भारतीय संस्कृतीची पाळेमुळे सापडतात व भारताच्या इतिहासाचा अविभाज्य अंग आहे. ही संस्कृती प्राचीन इजिप्त व इराकमधील मेझोपोटेमिया या संस्कृतीं इतकी जुनी आहे. सिंधू संस्कृतीतील रहिवाश्यांनी धातूंचा वापर सूरु केला. मोहंदोजरो, हराप्पा येथे उत्खनात सापडलेल्या शहरांवरुन सिंधू संस्कृतीची ओळख मिळते.

    सिंधू संस्कृती व वैदिक संस्कृती हे एकच होती का यावर तज्ञांमध्ये वाद आहेत. नंतर आलेल्या वैदिक आर्यांनी सिंधू संस्कृतीवर आक्रमण केले व कालांतराने नष्ट झाली. असा एक मतप्रवाह आहे जो आजवर ग्राह्य धरण्यात आला होता. तर सिंधू संस्कृती व वैदीि संस्कृती एकच होती व सिंधू संस्कृतीवर कोणत्याही प्रकारची बाह्य आक्रमणे झाली नाहीत परंतु कालांतराने बदलली व जी शहरे नष्ट झाली ती प्रामुख्याने हवामानातील बदल, नद्यांच्या पात्रातील बदल व मोठेमोठे पूर यांनी नष्ट झाली. वैदिक संस्कृती संदर्भात खूप साहित्य आहे परंतु पुरातत्वीय पुरावे नाहीत व सिंधू संस्कृतीबद्द्ल भरपूर पुरातत्वीय पुरावे आहेत परंतु त्या संदर्भात कोणतेही साहित्य नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. आधुनिक पाकिस्तान??

      Delete
  7. भारतातील प्राचीन वैदिक संस्कृती यज्ञ आणि पशुपालन या दोन पायांवर उभी होती. वैदिक स्वत:ला आर्य म्हणवून घेत. अग्नी हा मानवी सभ्यतेतील पहिला वैज्ञानिक शोध समजला जातो. अग्नीच्या शोधामुळे माणूस कच्चे मांस खाण्याऐवजी भाजून, शिजवून खाऊ लागला. मानवाच्या प्रगतीतील ही दुसरी अवस्था आहे. वैदिक संस्कृती याच टप्प्यात विकसित झाली. वैदिक आर्य अग्नीशिवाय जगूच शकत नव्हते. वैदिकांची संस्कृती अंत्यंत प्रगत आणि उन्नत होती, असे मानण्याची अंधश्रद्धा भारतात कित्येक शतकांपासून जोपासली हेतूत: गेली आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे महाभांडार आहे, असा अपसमज शतकानुशतके प्रसृत केला गेला. काही हितसंबंधी पोटपूजक पुरोहित आणि इतिहासकारांनी हे पाप केले. वैदिक आर्य प्रगत नव्हे, तर मानवी प्रगतीच्या दुसरया टप्प्यावर जगत होते. ते भटके आणि पशुपालक होते. त्यांना शेतीचे ज्ञान नव्हते. त्यामुळे मांस हेच त्यांचे मुख्य अन्न होते. मांस खाण्यायोग्य करण्यासाठी वैदिक आर्यांना अग्नीची गरज होती. सासरी जाणारया मुलीसोबत अग्नीही दिला जात असे. वैदिक संस्कृतीने अग्नी सतत प्रज्वलित ठेवणे हे एक आद्य कर्तव्य ठरविले, त्यामागील कारण असे व्यवहारिक आहे. या व्यवहारिकतेतून अग्निहोत्राचा म्हणजेच यज्ञाचा जन्म झाला. यज्ञ संस्कृतीचा जन्म अशा प्रकारे वैदिकांच्या दैनंदिन गरजेतून झाला आहे. घरातील अग्नी विझला तर वैदिकशास्त्रात विविध प्रायश्चित्ते सांगितली आहेत.
    अग्नीसंबंधीचे काही शास्त्रादेश पुढील प्रमाणे:
    विवाहाग्निमग्रतोऽजस्त्रं नयन्ति ।।
    अर्थ : वधुवरांचे पुढे विवाहकाली सिद्ध झालेला अग्नी अजस्त्र न्यावा१. (अजस्त्र म्हणजे मोठ्या भांड्यातून. मोठ्या भांड्यातून यासाठी की मुलीला सासरी आणेपर्यंत तो विझता कामा नये.)
    पाणिग्रहणादि गृह्यं परिचरत्स्वयं
    पल्यपि वा पुत्र: कुमार्यन्तेसी वा ।।
    अर्थ : लग्न झाल्यापासून घरात अग्नीची सेवा स्वत: करावी. स्वत:ला शक्य नसल्यास पत्नीकडून, पुत्राकडून वा अविवाहित कन्येकडून करावी२.
    यदि तूपशाम्येत्पत्न्यूपवसेदित्येके ।।
    अर्थ : घरातील अग्नी जर विझला तर पत्नीने उपोषण करावे, असे ऋषींचे सांगणे आहे.
    वरील शास्त्रादेश पाहिले असता वैदिक लोक पूर्णत: अग्नीवरच कसे अवलंबून होते, हे लक्षात येते. वैदिकांच्या हातातील अग्नी काढून घेतल्यास ते कच्चे मांस दातांनी तोडून खाणारया आदिमानवाच्या अवस्थेत जाऊन पडतील. ही वस्तुस्थिती एकदा समजून घेतली की, आर्यांच्या अफाट प्रगतीचा तसेच महान संस्कृतीचा भोपळा आपोआप फुटतो. अग्निशिवाय दुसरे कोणतेच वैज्ञानिक रहस्य वेदांना माहीत नाही. या पाश्र्वभूमीवर "वेदांकडे चला" ही दयानंद सरस्वतींसारख्या वेदाभिमान्यांची हाक प्रगतीकडे नेण्याऐवजी उलट्या दिशेने मानवाच्या आदिम अवस्थेकडे नेणारी ठरते.

    ReplyDelete
  8. आप्पा - पाटसकर बुवा ! आता आम्ही जरा विठ्ठल नाम गजरात तल्लीन आहोत .
    बाप्पा - संजयचे म्हणणे आहे की विठ्ठल हे विष्णुरूप नसून शिवरूप आहे . आम्ही आमच्या बरोबरच्या शेकडो वारकरी बंधूना संजयचे बोल समजावून सांगत होतो . सगळ्यांनी आम्हाला वेड्यात काढले . सगळे हसायला लागले . आता काय करावे बुवा ?
    आप्पा - आम्ही समजलो की हे प्रकरण असे सुटणार नाही . आम्ही सांगितले की संजय सोनवणी कोण माहित आहेत का ? एक थोर इतिहासकार आहेत . प्रचंड वैश्विक मान्यता प्राप्त असे विचारवंत आहेत त्यांचे विचार तुम्हाला पटत कसे नाहीत ? तुम्ही नुसतेच टाळकुटे . ?
    बाप्पा - संजय राव , आम्हाला वाटते की आपण लोकांचा विशेषतः वारकरी संप्रदायातील भक्तांचा हा भ्रम दूर केलाच पाहिजे . आज पर्यंत आपण अनेक धाडसी प्रकल्प राबवले आहेत . आपण आपल्या स्तकांचे मोफत वाटप करून वारकरी संप्रदायाला जागे केले पाहिजे आणि वैदिकांचा हा दुष्ट डाव कोलमडवून टाकला पाहिजे . आता तर नवीन मांडणी चालू झाली आहे . वाडेकर सारखे नेते पालखीला मुद्दाम आडवे येतात आणि लुटारुसारखे पैसे खाउन आपला विरोध तात्पुरता मागे घेतात . तुम्ही संजय राव , ताबडतोब वारी कशी फोल आहे ते सांगा , पांडुरंग या देवतेची उत्पत्ती , आणि पुंडलिक कथा हे सर्व सांगा . एकादशी जवळ आली आहे .
    आप्पा -खरे विठ्ठल स्थान दाखवा आणि हजार रुपये मिळावा ! अशी जाहिरात करा ! पण एकादशी पूर्वी या मंदिरात येणारे भक्तांचे थवे संजयाच्या खऱ्या मंदिरात जाऊ द्यात ! बडव्यांची फजिती होऊद्यात . !
    बाप्पा - आपल्या अविनाश पाटसकररावाना चैन पडत नाहीये , आम्ही वारीत आहोत . रोज मस्त दूध पितो , रात्री रोज एक नवा पक्का माल मिळतो ५०० रुपयात . रोज मजा चालू आहे . तोंडात देवाचे नाव मात्र पाहिजे . त्याशिवाय काय हो ? राजकारणी काय करतात ? आता नाशकात आखाडे सुरु होतील . तिथेही तेच ! अस्सल माल तिथेही असतोच , त्यामुळे आम्ही कुंभात पण जाणार . इकडे आम्ही वैकुंठवासी , आणि नाशकात बमबम भोले . आल का लक्षात ?
    आप्पा - या संजयाने हा शिव विष्णूचा तिढा डोक्यात टाकला आणि वारीची मजाच गेली . विठ्ठल हा विष्णू नाहीच म्हणे , शंकर आहे !असले काहीतरी तो सांगत असतो .
    पटते का हो पाटसकर तुम्हाला ? त्यापेक्षा अस्सल आखाडे बरे !
    बाप्पा - तात्पर्य , पाटसकर बुवा , नाशकात भेटूया हवेतर . तुम्हाला चिलीम चालते का हो पाटसकर बुवा ? हाफचड्डी घालू नका , ! चला तर , आमची आठवण काढलीत बरे वाटले . काय हो ?
    ते पान पट्टीचे काय ? आम्ही पान खात नाही , चिलीम प्यारी आम्हास्नी ! चिले महाराज कि जय शंकर महाराज कि जय !

    ReplyDelete
  9. अप्पा बाप्पा; नुसते शब्दांचे खेळ करून इतिहास सिद्ध होत नाही, ऋग्वेदात शिव व विष्णू हे दोन्हीही आहेत, मग तुकाराम वैष्णव वैष्णव करत का सुटले? त्यांना फारच इच्छा होती तर त्यांनी बाम बाम भोले करत तुमच्यासारखी चिलीम हातात घ्यायला हवी होती.. कारण शैव धर्माचे सार्थक, "सोम को कपालिक (स अ उमा) शक्तिसहित शिव का भी प्रतीक मानता है और उसके पान से उल्लसित हो योगिनी के साथ विहार करते हुए अपने को कैलासस्थित शिवउमा जैसा अनुभव करता है। मद्य, मांस, मत्स्य, मुद्रा और मिथुन - इस पंचमकारों के साथ कापालिकों, शाक्तों और वज्रयानी सिद्धों का समानत: संबंध था और पूर्वमध्यकाल की साधनाओं में इनका महत्वपूर्ण स्थान था।" तुम्ही नुसते लिहिताना चीलीमिचे नाव घेऊ शकता. प्रत्यक्ष चिलीम हातात घेतली तर सगळे वेद, पानपट्टी, शैव वैष्णव हे सरसकट सारखे होऊन जाईल तुम्हाला.. कापालिक आणि बाम बाम भोले हे काय आहे ते तुम्हाला माहित आहे का? तुमच्या सोसायातीतून हाकलून देतील तुम्हाला अश्याने.. शेवटी जागा मिळेल अफगाणिस्तानात, तालिबानच्या शेजारी.. कारण तिकडे हे बाम बाम बोले चालू शकते.. इथे त्याला मान्यता नाही..

    ReplyDelete
  10. अप्पा बाप्पा इतिहास तर सोडून दया पण वर्तमानात तरी काय घडले आहे ज्या अडवाणिनी रथयात्रा काढून दंगली घडवल्या त्यानी लोकशाही विरोधी अनिबाणीची आवई उठवली आणि तुम्ही मोठ्ठा लेख लिहून काढला। ह्या अडवानीने किती दिवस वाट पहिली आणि संघाने किती दिवस वाट पहिली याचा हिशेब समोरच आहे। त्यांना असे काहीही मध्यम मार्ग काढले तरी सामान्य जनता हजारो वर्श दूधखुली नव्हती आणि नहिये त्यामुळे कुणाचे काहीही साध्य झाले नाही। पण वाद विवादाच्या ह्या प्रक्रीयेत् जे कोणी विजयराज पेउथ्वीराज आहेत त्यानी छ शिवजिनबद्दल जे घनेरदे लिहिले त्यामुळे मी माझ्या सर्व पोस्ट्स काढून टकल्या होत्या। कारन गल्लित बसून फुकट प्रतिक्रिया लिहिने अणि सीमेवर प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करणे हयात नक्कीच फरक आहे । ऎसे नामधारी राजे गैलोगल्ली फिरत असतात। फ़क्त काही वैचारिक प्रौरुत्तिनचे वाइट वाटते। जो तुम्ही शैव सामाज म्हणता तोच आज आसाराम तिकडे साईं कुठे अद्वैतानंद कुठे अम्मा माता अश्या लोकांच्या मागे धावतो आहे। त्यात वैष्णव आणि शैव कुठे आहे? 12 वर्षातून एकदा महा कुम्भाला येणाऱ्या शिव भक्तांवर तुमचा फारच राग दिसतोय।

    ReplyDelete
  11. आजच महीना बदलला सूर्याची रास बदलली नक्षत्र बदलले आणि भुर्भुर का होईना पाऊस सुरु झाला आकाशातले गोल कसा पृथ्वीवर परिणाम करतात ते बघा अणि एकीकडे ज्योतिष म्हणे थोतांड आहे

    ReplyDelete
  12. आप्पा - पाटसकर बुवा , तुमचा प्रोब्लेम समजला ,
    बाप्पा - अहो आम्ही संजयला उद्देशून म्हणत होतो की त्याच्यात हिम्मत आहे का ? वारकरी लोकांसमोर जाउन सांगायची की , तुम्ही जो विठ्ठाल पुजता आहात तो खरा विठ्ठल नाहीये . कारण संजयने सिद्ध केले आहे की पुंडलिकाचे मंदिर हेच खरे शिव मंदिर आहे आणि तोच खरा पांडुरंग आहे . विष्णू सहस्त्र नामात कुठेही पांडुरंग किंवा विठ्ठलाचा उल्लेख नाही . हे सर्व संजयनेच सांगितले आहे , तीच गोष्ट त्याने वारकरी लोकाना समजावून सांगावी इतकेच आम्ही म्हणत होतो .
    आप्पा - आणि गांजाचे म्हणाल तर , आम्ही त्यातले दर्दी आहोत असे मानत नाही .
    बाप्पा - अग्रसेन भवनाशेजारी आमची रोजची बैठक असायची इतके सांगितले तरी दर्दी माणूस ओळखून जाइल आणि कौतुक करेल . हा माल कुठे आणि कसा मिळतो हे सर्व आजच्या तारखेने आम्ही जाणतो . त्याच्या इतकी सुंदर गोष्ट जगात नाही .
    आप्पा -काथ्या का भिजवायचा ?चिलमीत गोळी का लागते ठेवावी ? बार कसा मारायचा ? एक चिलीम किती जणांना पुरते ?त्यानंतर काय करायचे ?ते सगळे शास्त्र अनुभवाचा भाग आहे . बोला कधी येताय ? शिवापूरला माल चांगला मिळतो नाहीतर अग्रसेन भवनात . ! बोला !
    बाप्पा - गेली ४० वर्षे आम्ही त्याचे अति श्रद्धेने सेवन करत असतो . मुद्दा हा होता की संजय जे लिहितो त्याचा पाठपुरावा करत त्याचा प्रसार करायचा इतका सुंदर मौका वाया घालवत आहे . लाखातून १ जरी त्याचे समर्थनार्थ बोलला की आज माझे डोळे उघडले , मी व्यर्थच पांडुरंगाला विष्णुमय समजत होतो , तरी आम्हाला बरे वाटेल . पण संजय ऐन वारीत गप्प बसतो !
    आप्पा - आणि पाटसकर बुवा , मुद्दा काय आहे ते सोडून भरकटत का जाता ? आम्ही चिलीम हातात धरली तर काय होईल ते आम्हाला माहित आहे . बनारसला येणार का ? मस्त मजा येते .
    तुम्हाला मूळ मुद्दा समाजाला का ? मोठ्या तोंडाने संजय बोलत असतो , की पान्दुरांगाला शिव पासून वैष्णव करण्यात वैदिकाञ्चा हात आहे , त्याला उत्तर म्हणून आम्ही म्हटले की " सांगा सर्व वारकरी समाजाला की ज्ञानेश्वर तुकाराम आचरत होते , ते वैदिकांच्या राजकारणाला बळी पडले , खरा पांडुरंग आम्हालाच माहित " असे सांगून चूक सुधारायचा आग्रह संजय का करत नाही ?बोला , तुम्ही येताय का , चिलीम ओढायला ?

    ReplyDelete
  13. अरेरे , किती मठ्ठ रिमार्क दिले आहेत या पाटसकर सरांनी ?. आत्ता काही गरज आहे का ? ही वेळ आहे खरेतर संजय सरांचा सिद्धांत लोकांसमोर ठेवायची . आजचे पांडुरंगाचे देऊळ हे खरे विठ्ठलाचे मंदिर नाही , खरा पुंडलिकाच्या समाधी मंदिरापासला मामला काही वेगळेच सांगतो हा संजयचा लाडका सिद्धांत ! ते वारकरी लोकाना समजावून सांगून त्याना खरे विठ्ठलाचे रूप उघड करणे आणि ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव हे वैदिकांच्या गारुदाला कसे बळी पडत गेले आणि आज आपण बघतो तो विठ्ठल कसे थोतांड आहे हे सोनवणी सरांनी वर्तमान पत्रात लेख लिहून या आषाढीला सांगावे .
    आणि पाटसकर बुवा , तुम्ही भलतीकडेच आपली गाडी वळवत नेत असता . सनघ्वल्याञ्चा यात कुणी हात धरणार नाही ! आप्पा बाप्पा सांगत आहेत ते संजयला , तुम्हाला नाही . मध्येच चीलीमिचे खुसपट काय काढले ? पूर्वी प्रत्येक किल्यावर रात्री मशाली पेटत आणि चिलीमही पेटत असे .पहारेकरी गस्त घालत चिलीम ओढत ,त्यात गैर काय आहे ? आणि फुशारकी काय आहे ? आप्पा बाप्पा म्हणतात तसे काशीला गेले तर , सर्वत्र चिलीम दिसते , घाटावर ओळख असो वा नसो , चिलीम दोस्ती करवते . , पाटसकर पक्के संघवाले आहेत हे पदोपदी जाणवते . अगदीच मुळमुळीत विधाने असतात .
    त्या उलट लिहा वाचा यांनी सुंदर परीक्षण केले आहे आणि लेखाची शोभा वाढवली आहे , त्याना नम्र प्रणाम ! आप्पा बाप्पा यांनी सुचवलेले आवाहन संजय पूर्ण दुर्लक्षित करेल , कारण तोच त्याचा धर्म आहे आणि धंदाही आहे !काहीतरी उलटसुलट लिहित राहायचे इतकेच ! आहे का त्याच्यात धमक , पेपरात लिहिण्याची , आषाढीला की पंढरपूरचा पांडुरंग हा खरेतर शिवरूप आहे , वैष्णव नाही ?

    ReplyDelete
  14. संजय सरांचा "भरकटलेली वारी " हा अत्यंत नितांतसुंदर लेख सर्वांनी वाचावा . लेख कसा असावा त्याचे ते उत्कृष्ट उदाहरण आहे .
    आपल्या मतांचे समर्थन करायला एकसारखे समोरा समोर यावे असा आग्रह धरणे म्हणजे पोरकट विचार आहे . हे अप्पा बाप्पा यांच्या ध्यानात यायला पाहिजे .
    पण ते मुळात गंजडी असतील तर ते कठीणच आहे . वैदिकांनी वारकरी चळवळ हळूहळू कशी ताब्यात घेतली ते पण शोधण्यासारखे आहे . संघटना आली की पदे आली अधिकार आले आणि चढाओढ आली - ते अटळ आहे का ?अपेक्षित आहे का ?
    त्या लेखावर कॉमेंट करताना कुणीतरी लिहिले आहे की , पंढरपुरातील मंदिरात गरुड खांब आहे तिथे नंदी बसवण्याचे आंदोलन संजय सोनवणी का करत नाहीत ? ही प्रतिक्रिया जहाल वाटते .

    ReplyDelete
  15. सोनवणी सरांचा भरकटलेली वारी हा लेख २०१३ चा असला तरी तो कायम ताजा वाटतो . त्यातील विचार आपल्या सामाजिक परिस्थितीवर जे कोरडे ओढतात ते लक्षात घेतले पाहिजे . हल्ली ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या पालखीला जो उशीर होऊ लागला आहे , त्यामुळे हळूहळू गजगतीने हि पालखी गणपती मिरवणुकीचा कित्ता गिरवू लागणार असे दिसते . ढोल ताशे यांचे अनुकरण चालू झालेच आहे . गुजराथी समाज केली वाटत असतो त्याची साले रस्त्यावर पडलेली दिसतात . त्याबद्दल वारकरी लोकाना कोणतीही शिस्त नसते . हा मुद्दा समजावा का काय वाटावे यावर बंधन हवे ? हा मुद्दा महत्वाचा ?पालखी सोहळ्यात काही पदार्थ वाटण्याचे काहीही प्रयोजन नसते . प्रत्येक पालखी आणि त्यांचे नियम असतात , अन्न पुरवठा असतो . त्यामुळे खरेतर असे वाटपाचे प्रकार बंद होणे गरजेचे आहे , पालखी गेल्यावर रस्त्याला ओंगळ स्वरूप येते .
    या विषयावर अजून एक सांगावेसे वाटते - गणपती मिरवणूक आणि एकंदरीत गणपती उत्सव अत्यंत हिडीस स्वरूप धारण करत आहे . कलाकुसर पहावी तर त्यात १९७० नंतर काहीही प्रगती नाही , देखावे अत्यंत खालच्या पातळीचे असतात . रस्ते अडवून लोकांची गैरसोय होत असते . काही मैदानावर आपापल्या मंडळाचे देखावे सादर केले तर काय हरकत आहे ?पण काही मंडळीना अडवणूक करून धागड धिंगा करण्यात धन्यता वाटते .
    पूर्व तयारी म्हणून नदीकिनारी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ढोल ताशे बडवणे हा तर वारी पासून सुरु होणारा त्रास आहे .

    ReplyDelete
  16. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  17. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...