Saturday, August 15, 2015

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!
वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!
फोटो शेअर करा
>>शुद्धोदन आहेर 

वैदिक धर्म-संस्कृतीबद्दल भारतीयांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे. परंतु 'ओरिजिन्स ऑफ द वेदिक रिलिजन अँड इंदुज-घग्गर सिविलायजेशन' (प्राजक्त प्रकाशन) या पुस्तकात लेखक-अभ्यासक संजय सोनावणी यांनी वैदिक धर्म व त्या धर्म-संस्कृतीचे आजचे समर्थक यांच्या मूळ स्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे... 

वैदिक धर्म व त्या धर्म-संस्कृतीचे आजचे समर्थक यांचे मूळ ठिकाण कोणते आहे, या प्रश्नाने अनेक पाश्चात्य व भारतीय इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ-विद्वानांना गेली दोन शतके झपाटून टाकले आहे. इंग्रजांचे राज्य भारतात स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी वसाहतवादी दृष्टिकोनातून भारताचा इतिहास लिहिला, हे सर्वमान्य तसेच स्वाभाविकदेखील आहे. येथील जातिसंस्थाधिष्ठित समाजाचा मुकुटशिरोमणी समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण जातीला आपलेसे करण्यासाठी त्यांनी चाणाक्षपणे 'आर्य' वंशाचे (!) मूळ स्थान भारताबाहेरील युरोपच्या जवळपास 'शोधले'. या अशा प्रकारच्या मांडणीतून ब्रिटिश राज्यकर्ते, युरोपीय व भारतातील तथाकथित आर्यवंशीय हे जवळचे भाईबंद असल्याचा संदेश गेला. त्यातून स्वतःला आर्य समजणाऱ्या ब्राह्मण व तत्सम 'द्विज' जातींचा अहंगंड सुखावला जात असल्याने त्यांनी हा वसाहतवादी सिद्धांत उचलून धरला. भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचे पहिले सर्वश्रेष्ठ नेते असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तर आर्यांचे व वैदिक धर्म संस्कृतीचे उगमस्थान थेट उत्तर ध्रुवापर्यंत नेले. अशा तऱ्हेने वैदिक धर्म संस्कृती व त्यांचे निर्माते-समर्थक हे मूळचे भारतीय नाहीत, हा सिद्धांत सर्वदूर पसरला. 

समस्त शोषित स्त्री शूद्रादि-अतिशूद्रांची स्थलकालपरत्वे यशस्वी चळवळ उभारणाऱ्या महात्मा फुले यांनी हाच सिद्धांत उलटा फिरविला, व जातिसंस्थेचे बळी असलेल्या समाजाला आत्मभान दिले. या आत्मभानाची झळ व्यवहारात बसल्यानंतरही वैदिक-धर्मसंस्कृती व त्यांचे निर्माते असल्याचा अहंगंड बाळगणारे आपल्या अभारतीय उगमाच्या सिद्धांताला चिकटून बसले होते. अगदी स्वातंत्र्योत्तर काळातही हीच परिस्थिती कायम होती. तथापि, समाजशास्त्रीय परिभाषेत 'बहुजनवाद' ही संज्ञा प्रचलित झालेल्या विशेषतः २०व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत, द्विज जातींच्या मूळ स्थानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. यावेळेस चर्चा बहुजनवादाने सुरू केली होती व तथाकथित आर्यांचे 'अभारतीयत्व' अधोरेखित करण्याचे कार्य चालले होते. त्यातील धोका बदलत्या परिस्थितीमुळे लक्षात आल्याने, वैदिक धर्म संस्कृतीचे समर्थक खडबडून जागे झाले आणि इतिहासाची नव्याने मोडतोड करून नवनवीन 'संशोधन' (!) पुढे आणू लागले. वैदिक धर्म-संस्कृती ही मुळात भारतातीलच असून तिचे निर्मातेही मूळचे भारतीयच आहेत व येथूनच तिचा 'जगभर' (?) प्रसार झाला, असा या सगळ्या संशोधनाचा सारांश आहे! 

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील तरुण लेखक-अभ्यासक संजय सोनावणी यांनी 'ओरिजिन्स ऑफ द वेदिक रिलिजन अँड इंदुज-घग्गर सिविलायजेशन' हा सुमारे अडीचशे पानी संशोधनपर ग्रंथ आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषा असलेल्या इंग्रजीमध्ये लिहून महाराष्ट्राची बौद्धिक परंपरा जोपासण्याचे महत्कार्य केले आहे. वैदिक धर्म-संस्कृती व तिचे निर्माते यांचे मूळ स्थान नेमके कोणते आहे, या कुतूहलापोटी झालेल्या या संशोधनाने अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. आर्यांच्या स्थलांतरणाचे विविध सिद्धांत, सरस्वती व घग्गर नद्यांचा प्रश्न, वैदिक व सिंधू-घग्गर संस्कृतीची तुलना, पारशी धर्मग्रंथ अवेस्ता व ऋग्वेदाचा भूगोल तसेच त्यांची समकालीनता आणि सर्वात शेवटी ऋग्वेदिक धर्म भारतात कसा पसरला; अशा सहा प्रकरणांत या ग्रंथाची विभागणी केली असून प्रत्येक प्रकरणांच्या शेवटी संदर्भांची व टिप्पणांची सूची दिली आहे. यावरून लेखकाने ‌केलेल्या प्रयासांची जाणीव होते. 

'आर्य' हा शब्द 'वंश' या अर्थाने वापरणे कसे अनैतिहासिक व समाजविघातक आहे, याचे विवेचन करताना लेखकाने एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. स्वतःला वैदिक धर्म-संस्कृतीचे निर्माते समजणाऱ्या तथाकथित 'आर्य' लोकांनाच आपल्या उगमस्थानाची एवढी चिंता का पडली आहे? असा तो मूलभूत प्रश्न आहे. एकूणच मानवी समाजाचा इतिहास व संस्कृतीचा विकास पाहता, मानवी जनसंख्येच्या तुलनेत अक्षरशः चिमूटभर असणाऱ्या तथाकथित 'आर्य' लोकांनाच आपल्या उगमस्थानाच्या माध्यमातून वेगळेपणाचा अट्टाहास धरण्याची आवश्यकता का भासते? समजा, उद्या तथाकथित 'आर्य' लोकांचे उगमस्थान आफ्रिकेत अथवा चीन-मंगोलियात आढळले तरी त्यातून मानवी समाज-संस्कृतीच्या विकासात काय मौलिक भर पडणार आहे? 'युनेस्को' जाहीरनाम्याप्रमाणे, कोणताही वंश आपणांकडे विशिष्ट गुणधर्म असल्याने आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असा दावा करू शकत नाही. तरीही तथाकथित 'आर्य'वंशीय आपल्या उगमस्थानाबाबत पर्यायाने अहंगंडाबाबत एवढे चिंताग्रस्त का झाले आहेत? अर्थात, या अशा प्रश्नांची उत्तरे स्वतःला वैदिक धर्म-संस्कृतीचे निर्माते-समर्थक समजणाऱ्या तथाकथित 'आर्य'वंशीय मंडळींनी देणे आवश्यक आहे. 

तथाकथित आर्यांच्या उगमस्थानाची चर्चा करीत असताना सिंधू संस्कृतीची चर्चा होणे अपरिहार्य आहे. पहिल्या प्रकरणाच्या उत्तरार्धात व दुसऱ्या-तिसऱ्या प्रकरणांत लेखकाने ही चर्चा विस्ताराने केली आहे. विशेषतः सिंधू संस्कृतीचे निर्मातेही आम्ही आर्यच (?) आहोत, असे 'संशोधन' (?) पुढे आणले जात असताना, अशा संशोधनातील फोलपणा दाखविण्यासाठी ही चर्चा विस्ताराने करणे आवश्यकच ठरते. याच अनुषंगाने केलेल्या विवेचनात लेखकाने असा निष्कर्ष काढला आहे की, सरस्वती नदी ही पारशी धर्मग्रंथ अवेस्तामध्ये नमूद केलेली 'हराक्षवैती' असून तीसुद्धा अभारतीय आहे. आपल्या निष्कर्षापुष्ट्यर्थ लेखकाने अवेस्ताच्या अभ्यासकांचे पुरावे जोडले आहेत. सध्या देशात सरस्वती नदीविषयी चाललेल्या चर्चेला नवे वळण देणारे असे हे संशोधन आहे. ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने यावर मोकळेपणाने व पूर्वग्रहविरहीत सांगोपांग चर्चा होणे आवश्यक आहे. 

या ग्रंथाच्या एकूण विवेचनाचा आशय असा आहे की, वैदिक धर्म-संस्कृतीचा उदय हा आजच्या अफगाणिस्तानजवळच्या परिसरात झालेला आहे. एका अर्थाने, वैदिक धर्म-संस्कृती ही 'अभारतीय' आहे, असे लेखकाचे म्हणणे आहे. तथापि, ही अभारतीय वैदिक धर्म-संस्कृती संपूर्ण भारतभर पसरली कशी, असा प्रश्न स्वाभाविकपणे उद्‍भवतो. यांवर लेखकाचे असे प्रतिपादन आहे की, मिशनरी प्रवृत्तीच्या काही कष्टाळू प्रचारकांमुळे या अभारतीय संस्कृतीचा भारतभर प्रसार झाला! हे प्रतिपादन समाधानकारक नाही, हे उघड आहे. मात्र, लेखकाचा मुख्य विषय वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान शोधणे हा असल्यामुळे त्या धर्म-संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराने गौण स्थान मिळविल्यास फारसे आश्चर्य वाटत नाही. 

ज्ञानवंतांच्या जगात कोणत्याही नव्या संशोधनाची काटेकोर छाननी-तपासणी आवश्यक असली तरी वेगळे मुद्दे मांडणाऱ्या संशोधनाची उपेक्षाही केली जात नाही. आपल्याकडे मात्र आमच्या हितसंबंधांना पोषक काय आहे, याची चाचपणी करूनच एखाद्या व्यक्तीला जनमान्यता अथवा प्रतिष्ठा वगैरे देण्याचा प्रयत्न केला जातो. याउलट आपल्या हितसंबंधांना पोषक नसणाऱ्यांना बदनाम करण्याचेही प्रयत्न केले जातात. त्यातूनच मग गरोदर ब्राह्मण विधवांना मातृ-पितृ वात्सल्याने सांभाळणाऱ्या फुले-दम्पतीला ब्राह्मणद्वेष्टे ठरविण्याचे समाजविघातक प्रकार घडतात. त्यामुळेच की काय, संजय सोनवणी यांच्या या विचारप्रवर्तक ग्रंथाची जागतिक स्तरावर चर्चा होत असतानादेखील बुद्धिवादी महाराष्ट्र मात्र चिडीचूप आहे! संजय सोनावणी यांचे संशोधन अमान्य असल्यास त्यांना ज्ञानाच्या रणमैदानात खेचून त्यांच्या संशोधनाच्या चिंधड्या चिंधड्या उडविण्याचे धाडस दाखवायला काय हरकत आहे? हीच तर खऱ्या ज्ञानवृद्धीची लक्षणे असतात. मराठी समाज या ज्ञानवृद्धीपासून अलिप्त कसा काय राहू शकतो? 

याचा अर्थ हा ग्रंथ परिपूर्ण आहे, असा मुळीच नाही. ऐतिहासिक संशोधनाची एक अन्वेषणपद्धतसुद्धा असते. इंग्रजीत तिला 'मेथॉडॉलॉजी' म्हणतात. लेखकाने आपली अन्वेषणपद्धत सांगितलेली नाही. परंतु ती तर्कशास्त्राधारित असल्याचे जाणवते. वैदिक धर्म-संस्कृतीचे आजचे समर्थक हे ब्राह्मणी अन्वेषणपद्धतीस तर्कशास्त्राची जोड देत असल्याने त्यांचे प्रतिपादन प्रभावी ठरते. ही वस्तुस्थिती विचारात घेता लेखकाने फुले-आंबेडकरवादासारखी अन्वेषणपद्धती वापरली असती, तर या ग्रंथाचे बौद्धिक मूल्य कैकपटीने वाढले असते. विस्तृत संशोधन केलेल्या ग्रंथातील ही गंभीर उणीव आहे. 

ग्रंथातील दुसरी गंभीर उणीव म्हणजे जातिसंस्थेच्या उगम-विस्ताराबाबत बाळगलेले मौन! पारशी धर्मग्रंथ अवेस्ता व ऋग्वेदाच्या आधारे वैदिक धर्म-संस्कृतीचा उदय हा अभारतीय आहे, असे सिद्ध केले तरी या परकीय वैदिक धर्म-संस्कृतीच्या उगमस्थानात न आढळणारी वर्ण-जातिसंस्था भारतीय उपखंडातच का आढळते? शिवाय वैदिक धर्म-संस्कृतीचे बहुतांशी समर्थक हे वर्णजातीस्त्रीदास्य समर्थनाकडे का झुकतात? खरे पाहाता, 'परकीय' वैदिक धर्म-संस्कृती भारतात येण्यापूर्वीच येथे 'सामाजिक' विभागणी झाली होती, असेही अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. वर्णजातिसंस्थेबाबत मौन बाळगल्यामुळे परकीय वैदिक धर्म-संस्कृतीचा व वर्णजातिस्त्रीदास्याचा परस्परसंबंध नेमका काय आहे? याविषयी वाचकांच्या पदरात काहीच पडत नाही. सैतानी जातिसंस्थेचे बळी असलेल्या या देशातील बहुसंख्य जनतेला आज वैदिक धर्म-संस्कृतीच्या उगमस्थानापेक्षा आपल्या भौतिक मुक्तीची जास्त आच लागलेली आहे. या दृष्टीने पाहता, या गंभीर उणीवेने सदर ग्रंथातील आशयघनता फार मोठ्या प्रमाणात गमावली आहे, असे म्हणणे भाग आहे. याशिवाय सदोष शब्द-वाक्यरचनेची काही मोजकी उदाहरणेही सांगता येतील. 

असे असले तरी वैदिक धर्म-संस्कृतीच्या समर्थकांनी 'वैचारिक' गोंधळ घातलेल्या आजच्या काळात या गोंधळाला रोखठोक प्रत्युत्तर देण्याचे महत्कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्याबद्दल लेखक संजय सोनवणी अभिनंदनास पात्र आहेत. समतावादी छावणीने या ग्रंथाचे स्वागत करून त्यांवर जागोजागी साधक-बाधक चर्चा, परिसंवाद घडवून आणले पाहिजेत. याशिवाय, महाराष्ट्राच्या ज्ञानवैभवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलयोग्य ठरविल्याबद्दल महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानेही या ग्रंथाचे स्वागत करायला हवे!

18 comments:

  1. आप्पा - मला हे फार आवडले की - - बाप्पा - काय ?
    बाप्पा -संजयचे काहीतरी तुला आवडले ? हा लेख तर शुद्धोदन आहेर यांनी लिहिलाय असे वाटते
    आप्पा - ऐक तर रे , त्यांचे म्हणणे आहे की वैदिक लोक अफगाणिस्थान मधून इकडे आले . अरे पूर्वीचा हिंदुस्तान आठव , महाभारतात , गांधारी कुठची ?त्यावेळचे राजे आणि त्यांचे देश कोणते ?हे पाहिले तर , दक्षिण भारताचा पत्ताच नव्हता !सर्व नोंदी आहेत त्या पाकिस्तान अफगानिस्तान आणि पंजाब च्या आहेत .
    बाप्पा - आणिक महत्वाची माहिती म्हणजे , वैदिक येण्यापूर्वी सुद्धा , भारतीय उपखंडात जाती व्यवस्था का आढळते ? जी वैदिक उगम प्रदेशात नव्हती ?- हे संशोधन काय सांगते ? वैदिकांनी जाती व्यवस्था निर्माण केली हा कलंक यामुळे पार निघून जातो !याबद्दल संजय सोनवणी यांचे आभार मानले पाहिजेत .
    आप्पा - असे म्हणतात संजय सोनवणी ? नेमके काय शब्द आहेत ते ?
    बाप्पा - ग्रंथातील दुसरी गंभीर उणीव म्हणजे जातिसंस्थेच्या उगम-विस्ताराबाबत बाळगलेले मौन! पारशी धर्मग्रंथ अवेस्ता व ऋग्वेदाच्या आधारे वैदिक धर्म-संस्कृतीचा उदय हा अभारतीय आहे, असे सिद्ध केले तरी या परकीय वैदिक धर्म-संस्कृतीच्या उगमस्थानात न आढळणारी वर्ण-जातिसंस्था भारतीय उपखंडातच का आढळते? शिवाय वैदिक धर्म-संस्कृतीचे बहुतांशी समर्थक हे वर्णजातीस्त्रीदास्य समर्थनाकडे का झुकतात? खरे पाहाता, 'परकीय' वैदिक धर्म-संस्कृती भारतात येण्यापूर्वीच येथे 'सामाजिक' विभागणी झाली होती, असेही अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. वर्णजातिसंस्थेबाबत मौन बाळगल्यामुळे परकीय वैदिक धर्म-संस्कृतीचा व वर्णजातिस्त्रीदास्याचा परस्परसंबंध नेमका काय आहे? याविषयी वाचकांच्या पदरात काहीच पडत नाही. सैतानी जातिसंस्थेचे बळी असलेल्या या देशातील बहुसंख्य जनतेला आज वैदिक धर्म-संस्कृतीच्या उगमस्थानापेक्षा आपल्या भौतिक मुक्तीची जास्त आच लागलेली आहे. या दृष्टीने पाहता, या गंभीर उणीवेने सदर ग्रंथातील आशयघनता फार मोठ्या प्रमाणात गमावली आहे, असे म्हणणे भाग आहे. याशिवाय सदोष शब्द-वाक्यरचनेची काही मोजकी उदाहरणेही सांगता येतील.
    आप्पा - महणजे सरळसरळ संजयानेप्रशस्तिपत्रकच दिले - वैदिक निष्पाप आहेत म्हणून ?नाही का ? बाकी काहीही असो , दे मूर्तीपूजा मानत होते का ? आजचे हिंदूंचे देव हेच वैदिकांचे देव होते का ? त्यापेक्षा वैदिकांच्या आगमना पूर्वी इथे जातपात होती ती कोणत्या आधारे ? ते तरी सांगा संजय साहेब !

    ReplyDelete
  2. संजय सोनवणी यांनी अतिशय मोलाची माहिती सांगितली असे म्हणता येईल, परंतु त्याना तसेच म्हणायचे आहे का ?कारण मूळ टिपण्णी केली आहे ती शुद्धोधन आहेर यांनी आणि त्यामुळे संजय सर यांनी याबाबत खुलासा करणे महत्वाचे ठरेल . आज पर्यंत नेमका खुलासा समोर येत नव्हता . या लेखात सुद्धा वृथा फिरवा फिरवी करून मध्येच असे म्हटले आहे की वैदिक येण्यापूर्वीही इथे जातीसंस्था होती . त्यामुळे एक प्रचंड गैरसमज जो आज पर्यंत ब्राह्मण समाजाला व्यथित करत होता तो दूर होईल असे वाटते .
    संजय सरांचे म्हणणे मला वाटायचे की असे होते - वैदिक वर्गाने जातीसंस्था निर्माण केल्या . पुरुषसुक्त वगैरेचा उल्लेख करत संजय सर नेहमी जाती संस्थांचा दोष ब्राह्मण वर्गावर लादत असत . पण या नव्या विचाराने एक नवीन चित्र निर्माण झाले आहे !
    वैदिक अफगाणीस्थानातून खुष्कीच्या मार्गाने गांधार , काम्भोज वष्णू , आणि क्रमाने मत्स्य बाल्हिक , कुरु पांचाल असे आले . , पण त्यापूर्वीच इथे जाती व्यवस्था जपणारी संस्कृती पाय रोवून उभी होती . असे संजय सरांचे म्हणणे आहे असे शुद्धोधन आहेर म्हणत आहेत हे विशेष !ती जातिव्यवस्था कर्मावर आधारीत होती का जन्मावर हे संजय यांनी स्पष्ट करावे , कर्ण सूतपुत्रच होता असे इतिहासात मानले जाते हेपण विसरता कामा नये .
    ऋग्वेदात भरताचा उल्लेख आहे.
    मेनका विश्वामित्राची शकुंतला ही मालिनी नदीकाठी शिवालिक रांगेत हिमालयात जन्म पावली ती कण्व ऋषीकडे होती तिथे दुष्यंत कथा होऊन सर्वदमन म्हणजेच भरत जन्माला आला , असे पाहिले तर मग सर्व जाती संस्था आजच्या सारख्या घट्ट होत्या का असा प्रश्न पडतो , विश्वामित्र हा कुशलव या रामाच्या मुलांपैकी कुशाचा खापरपणतू म्हणजे क्षत्रिय आणि मेनका हि अप्सरा , इथेही जातिभेद कसा मोजायचा ?
    उत्तरं यत्समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम् ।
    वर्षं तद् भारतं नाम भारती यत्र संततिः ।।- विष्णुपुराण
    अशी आपल्या देशाची आणि प्रजेची वर्णने विष्णू पुराणात आहेत . भारतीय कोण , त्याचे उत्तर हे आहे ! असो ,
    पण मूळ मुद्दा असा आहे की वैदिक लोक येण्यापूर्वी जातिव्यवस्था होती आणि वैदिक ऋषी वैदिक अप्सरा आणि वैदिक राजे यांनी जो धुमाकूळ घातला त्याला काय म्हणायचे ?

    ReplyDelete
  3. हा पाटसकर जरासा वेडा असावा असे वाटते . हा सारखा आप्पा बाप्पा यांच्यावर डाफरत असतो अमित आता शांत झाला आहे , मी भारतीय - याना पण एकदम रद्दीच्या भावात लिहायची सवय आहे , तीच कथा आप्पा बाप्पा यांची . विषय काय आणि आपण काय लिहितो याचे भानही या वर्गाला नाही .
    मुळात संजयाने या आधीच्या लेखात स्पष्ट केले आहे की वैदिक अफगाणिस्तानातून इकडे आले , म्हणजेच वैदिकांचे रक्त अतिरेक्यांचेच नाही का ?तसेच
    वैदिकांपुर्वी इथे जातिभेद होता असेही संजय म्हणतो . म्हणजेच त्याला वैदिकांची इतकी ससे होलपट करायची काहीच गरज नाजी , वेद्पुर्वापार इथे जातपात होतीच . उगीच वैदिकाना नावे ठेवत संजयाने इतक्या सुंदर रात्री वाया घालवल्या !तोच वेळ त्याने वाचन , मनन , नवे विचार समजून घेणे यासाठी वापरला असता तर ?

    ReplyDelete
  4. संजय सर ,
    नमस्कार ,
    शुद्धोदन सरांनी जो विचार मांडला आहे त्यामुळे एक चर्चा इथे झाली पाहिजे ती अशी ,
    अवेस्ता आणि ऋग्वेद याबाबत मते मांडताना त्यांच्या मते , वैदिक हे अफगाणिस्तान भागातून भारतात प्रवेश करते झाले , हे अगदी समजण्या सारखे आहे , कारण भारतात तेंव्हा खुश्कीच्या मार्गाने येण्याचा तो राजमार्ग होता , इतकेच नव्हे तर नंतरही मुस्लिम आक्रमणे त्याच मार्गाने झाली ,
    भारताच्या सीमा त्यावेळेस पार गांधार पर्यंत किंवा त्याही पलीकडे होत्या , इराण मध्ये पारशी धर्म होता , म्हणजे असे म्हणायचे का की अवेस्ता रचला त्या वेळेसच त्यापैकी काही टोळ्या गान्धार्मध्ये आल्या आणि त्याच पुढे बाल्हिक मदर करत पांचाल आणि कुरु पर्यंत , आल्या . ?
    महाभारत हे संजयाने सांगितल्या प्रमाणे फारच अलीकडे घडले असेल तर ?महाभारत काळापूर्वी वैदिकात जर जातीनिहाय समाज रचना नव्हती असा सारांश श्री आहिर काढत आहेत तर मग त्यावेळेस वैदिक पूर्व काळात इथे जे रहात होते त्यांच्यात जातीनिहाय समाज रचना होती असे म्हटले पाहिजे ,
    हा वैचारिक गुंता आपण संजय सर सोडवाल असे वाटते .
    दुसरी गोष्ट महाभारत काळात , खरोखर , समाज रचना तितकीशी कडक नसावी असे अनेक ऋषीमुनी , अप्सरा आणि राजे यांच्या जन्म आणि इतिहासा वरून सिद्ध होते .
    संजय सरानीच पूर्वी अवेस्तचा उल्लेख ऋग्वेदात आहे असे धरून वैदिकांचा आणि ओघानेच महाभारताचा काल अलीकडे सांगितला आहे . त्यामुळे त्याहीपूर्वी जे इथे होते त्यांच्यात आणि हरप्पण लोकात काय नाते होते , आणि हरप्पण हेही जर वैदिक पूर्व असतील तर त्यांच्यात श्री आहेर म्हणतात त्या प्रमाणे जातीधीष्टीत समाज रचना होती का ? अशा अनेक शंका आणि आपले संशोधन याबाबत गोंधळ निर्माण होतो आहे . आपण त्याबाबत खुलासा करून हा अंधार दूर कराल अशी खात्री वाटते .
    मी भारतीय यांचे विचारही अंतर्मुख करणारे असतात . त्यांनीही याबाबत लिहिणे अपेक्षित आहे असे म्हटले तर चूक ठरणार नाही ! फक्त अविनाश पाटसकर यांनी जर स्वतःला या चर्चेतून बाजूला ठेवले तर सर्वांवर अनंत उपकार होतील , कारण काय ते सूज्ञास सांगणे न लगे !
    मी भारतीय किंवा संजय सर , आप्पा बाप्पा , जेंव्हा चर्चेची पातली गंगोत्री पर्यंत नेऊन ठेवतात तेंव्हा नेमके पाटसकर सर मध्ये तोंड घालून ती पातली गटार गंगे पर्यंत आणून ठेवतात . ! स्पष्टोक्ती बद्दल क्षमस्व !

    ReplyDelete
  5. आप्पा - वाचता वाचता कितीतरी गोष्टी वाचण्यात येतात नाही का बाप्पा ?
    बाप्पा - हो रे हो -
    आप्पा - आता हेच बघ ना , संस्कृत आणि अवेस्ताच्या भाषा साम्याबद्दल वाचताना कितीतरी माहिती दिसत गेली .
    The separation of Indo-Aryans proper from the undifferentiated Proto-Indo-Iranian ancestor group is commonly dated, on linguistic grounds, to roughly 1800 BC.[2] The composition of the oldest hymns of the Rigveda is dated to several centuries after this division, or to roughly 1500 BC.[3] Both Asko Parpola (1988) and J.P. Mallory (1998) place the locus of the division of Indo-Aryan from Iranian in the Bronze Age BMAC culture. Parpola (1999) elaborates the model and has "Proto-Rigvedic" Indo-Aryans intrude the BMAC around 1700 BC. He assumes early Indo-Aryan presence in the Late Harappan horizon from about 1900 BC, and "Proto-Rigvedic" (Proto-Dardic) intrusion to the Punjab as corresponding to the Swat culture from about 1700 BC. According to this model, Rigvedic Sanskrit within the larger Indo-Aryan group is the direct ancestor of the Dardic languages.[4] The hymns of the Rigveda are thus composed in a liturgical language which was based on the natural language spoken in Gandhara during the early phase of the Swat culture, at the end of the Indian Bronze Age. This liturgical language over the following centuries came to be separated from spoken vernaculars and came to be known as the "artificial" or "elaborated" (saṃskṛta) language, contrasted to the "natural" or "unrefined" prākṛta vernaculars by the end of the Vedic period.
    बाप्पा - अरे आप्पा , तुझे वय बघ , आता इतका ताण घेऊन हे असले इंग्लिश वाचत बसू नकोस , त्रास होईल ,
    आप्पा - अरे आपला संजय इतके छान छान लिहित असतो त्यामुळे असे काही वाचले की त्याला सांगावेसे वाटते , संजायानेही हे वाचले असेलच - नक्की ! आम्हाला थोडा वेळ जास्त लागतो ! चष्मा जुना झालाय !

    ReplyDelete
  6. vedik sanskrut असे विकीपेडिया वर जाऊन पाहिले तर असा खजिना भरपूर सापडतो , आणि वाचता वाचता आप्पा आणि बाप्पांच्या चष्म्याचा नंबर वाढतच जाइल ,
    असो -
    पण , एकंदरीतच आप्पा बाप्पा यांचे कौतुक केले पाहिजे ,
    मी भारतीय यांनी अभ्यासू लिखाण सुरु केल्या पासून आप्पा बाप्पा यांचीही वाचन करण्याची सुरवात केली असे म्हणू ! या वयात हा तरुणपणा कौतुक करण्या सारखाच आहे हे नक्की
    शुद्धोदन आहेर यांनी ही सुरवात केली आणि त्यांनीच किंवा संजय सोनवणी सरांनी त्याचा खुलासायुक्त समारोप करावा ही इच्छा !
    अनोनिमास लिखाण बंद केल्या बद्दल संजय सरांचे शतशः

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  10. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  11. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  12. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  13. अहो पाटसकर दादा ,
    तुम्ही सांगितले म्हणून मलिक अंबर ची माहिती वाचली ती अशी आहे .
    Malik Ambar (1549 – 13 May 1626) was an Ethiopian born in Harar, sold as a child by his parents due to poverty. He was eventually brought to India and remained enslaved by the people that bought him. Nevertheless, in time he created an independent army that had up to 1500 men. This army resided in theDeccan region and was hired by many local kings. He eventually rose to become a very popular Prime Minister of the Ahmadnagar Sultanate, showing his administrative acumen in various fields. Malik is also regarded as a pioneer in Guerilla warfare in the Deccan region. He is credited with having carried out a systematic revenue settlement of major portions of the Deccan, which formed the basis for many subsequent settlements. He died in 1626. He is a figure of veneration to the Siddis of Gujarat. He humbled the might of the Mughals and Adil Shah of Bijapur and raised the falling status of the Nizam Shah
    त्यानंतर कर्णाचे आणि वैदिकांचे काय लिहिले आहे ते समजले नाही .
    पाटसकर सर आपण एखाद्या तद्न्य मानसोपचार तज्ञ गाठून आपली तपासणी करून घ्यावी असे सांगावेसे वाटते .

    कारण विषय इतका साधा आहे की श्री आहेर यांनी असे मत नांदले आहे की वैदिक येण्यापूर्वी इथे जातपात मानणारा समाज होता , हे संजय सोनावणी यांनी मान्य केले आहे का ? कारण त्यांचा आरोप असा असतो कि वैदिक लोकांनी जातपात आणून देशाचे वाटोळे केले ,
    दुसरी गोष्ट ,
    वैदिक काळापूर्वी इथे नेमके कोण होते ते क्रोनोलोजीकल सिक्वेन्स ने संजयने मांडावे , तो अनेकदा काळाचे गणित चुकवत असतो . संजयची धडपड काय असते ? तर , वैदिकांनी या समाजाला जातपात आणि उच्चनीच या प्रकरणात अडकवून आपली पोळी भाजून घेतली , पण तुम्हीच बघा - पाटसकरबुवा , श्री . आहेर काय सांगत आहेत ते , त्याचे विश्लेषण करायच्या ऐवजी तुम्ही काहीतरी बरळत आपलेच हसे करून घेत आहात . मग काय , लोक तुम्हाला डिवचणार , अगदी बायका पण ! त्यापेक्षा पत्रिका , भविष्य असल्या फालतू गोष्टी सांगण्यापेक्षा , या शुद्धोधन आहेर ने काय लिहिले आहे ते बघून प्रतिक्रिया द्या ! नमस्ते !

    ReplyDelete
  14. http://sanjaysonawani.blogspot.in/2015/08/blog-post_18.html

    ReplyDelete
  15. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  16. माननीय पाटसकर ,
    आपण काय लिहिता ते अगम्य वाटते . आपण अजून सोपे करून लिहाल का म्हणजे आम्हीही त्याचा आस्वाद घेऊ शकू .
    आपणास भविष्य या विषयाची आवड आहे हे पाहून बरे वाटले . सविस्तर भेटीचा योग आल्यास बरे वाटेल असे वाटते

    ReplyDelete
  17. मित्रा ,
    आगाशे आणि मैत्री ? शक्यच नाही ! शहाणा असशील तर ४ हात लांब रहा . - निरीश्वरवादी आणि आत्म घातकी माणूस आहे .
    मित्रा , शहाणा असशील तर लांब रहा !

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...