Tuesday, September 29, 2015

शून्य महाभारत...



१९९१ सालची गोष्ट आहे. मी तेंव्हा औंध येथे राहत होतो. माझे एक प्रकाशक मित्र आणि मी एके सकाळी औंधमधीलच त्यांच्या एका मित्राला भेटायला त्यांच्या घरी गेलो होतो. त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यात माझा सहभाग काहीच नसल्याने हालचे निरिक्षण करत होतो. नजर भिंतीवरील क्यलेंडरवर पडली. त्यावर एक चित्र, अनेकदा आधीही पाहिलेले, कृष्ण गीता सांगतोय आणि अर्जून अत्यंत विनम्रतेने गुढग्यावर बसून ऐकतोय.
मी त्या चित्रात जरा गुंगून गेलो. क्षणात असे वाटले कि समजा महाभारत युद्धात कृष्ण जर कौरवांच्या बाजुला गेला असता तर? बरे, त्यात अशक्य काहीच नव्हते.

कृष्णाकडे मदत मागायला दुर्योधनही गेला होता आणि अर्जुनही. आधी कोण आले यावर निकाल न देता आधी कोणाला पाहिले यावर कृष्णाने आपली सेना आणि शस्त्र हाती न घेणारा कृष्ण यात निवड करायला अर्जुनाला सांगितले. पण आधी आला होता तो दुर्योधन. समजा पहिला प्रश्न दुर्योधनाला विचारला असता तर आणि त्याने कृष्णालाच मागून घेतले असते तर?

या कल्पनेने मला अनेक वर्ष झपाटले. शेवटी ९७-९८ मद्ध्ये कधीतरी ही कादंबरी प्रत्यक्ष लिहायला घेतली. तत्वज्ञान किती निसरडे आहे आणि गतकाळातील त्याच घटना याचे बाजू बदलताच संदर्भ कसे बदलतात आणि नवी गीताही कसा आकार घेऊ शकते याचे विदारक दर्शन मी अवघ्या शंभरेक पानांत केले. द्रोण, भिष्म आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे द्रौपदीची चिरवेदना अभिव्यक्त केली. नवी गीताही लिहिली. पांडवांचे कृष्णाने बदललेल्या भुमिकेवरचे जे बदललेले विचार आहेत ते मानवी तळाला ढवळून काढणारे आहेत.
मानवी जीवन आणि त्याकडे पहायचे आपले दृष्टीकोन हे स्थायी नसतात. क्षणभंगूर असतात. आपल्याला जे प्रिय वाटते ते प्रिय वाटायला लावलेही गेलेले असू शकते. शेवटी मानवी जीवन काय आहे?

विभ्रमांतील भ्रम आणि आपण तरीही किती उरफोड करत आपल्यालाच सत्य माहित आहे असा आव आनत असतो! जीवन त्यामुळेच विलक्षण आणि जगण्यायोगे बनून जाते...

शून्य महाभारत...

यातुनच मानवी कोलाहलाची अंतिम शुन्यता मी दाखवली आहे!

(नवीन आवृत्ती प्राजक्त प्रकाशनाने प्रकाशित केली आहे व तिला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. वाचकांच्या मेल्स आनंद देवून जातात. लोक विचार करत नाही, तळगर्भात जायचा प्रयत्न करत नाहीत हा समजही भ्रम या सदरात मोडतो!)

12 comments:

  1. आप्पा - अशा लिहिण्याला काहीच अर्थ नाही शून्य किंमत आहे , कारण असे काहीही लिहिता येइल.
    बाप्पा - शिवाजी महाराज मुसलमान झाले असते तर ?आणि फक्त संभाजी महाराजाना औरंग्जेबानी त्या बदल्यात सोडले असते तर ?
    आप्पा - जसा बिभीषण रामास फितूर झाला तसा हनुमान रावणास फितूर झाला असता तर ?
    बाप्पा - अकबराचा राणा प्रतापने पराभव केला असता तर ?
    आप्पा - औरंगजेबाने सर्व हिंदू मंदिरे आनंदाने परत बांधून दिली असती तर ?
    बाप्पा - चिन्यांनी तिबेट हा भारताचा भूभाग असे मान्य केले तर ?
    आप्पा - अशा हजारो गोष्टी लिहिता येतील महाभारताची खरी मजा कशात आहे ते अभ्यासले पाहिजे . अशा कथा ३-४ पेग झाल्या की कधीही सुचू शकतात अगदी दिवसाला १ प्रमाणात अशा कादंबऱ्या लिहिता येतील .
    बाप्पा - मनमोहन देसाई असते तर असे कितीतरी सिनेमे त्यांनी बनवले असते किंवा गोडबोले यांनी - झुळूक , पुन्हा झुळूक , असे अनेक पुन्हा पुन्हा केले असते .
    आप्पा - कुछ मजा नाही आया यार !कशाला प्रकाशित करताय असला कचरा ?

    ReplyDelete
  2. "शून्य महाभारत" एक बिडंबन कादंबरी!
    सोनवणी साहेब लिहित रहा तुम्ही, महाराष्ट्रात जो पर्यंत ग्राहक वर्ग उपलब्ध आहे तो पर्यंत कादंबऱ्या लिहायला आणि छापून विकायला कुणाच्याही सल्याची मुळीच आवश्यकता नाही!
    वाचकांचे मनोरंजन होणे महत्वाचे, वरून वाचकांचे थोडेफार प्रबोधन झाल्यास सोन्याहून पिवळे! नाही का?

    ReplyDelete
  3. डॉ कऱ्हाडे सारख्या थोर विद्वानांनी सांगितल्यामुळे आम्ही कादंबरी वाचली पण अगदीच रटाळ लिखाण वाटले. त्यांनी म्हटले तशी मनोरंजनाची गोष्टच सोडा , पण प्रबोधन पण नाही. अगदी निराशा झाली. जो पर्यंत ग्राहक आहेत तोपर्यंत अशीच फसवणूक होत रहाणार आणि डॉ कऱ्हाडे आपण त्याचे समर्थन करत राहणार का ? अशी fantasy कुठलाच आनंद देत नाही.

    संजय सर आपणा कडून आमच्या खूप अपेक्षा आहेत. पानिपत वर आपण लिहिलेला लेख, बाबासाहेब पुरंधरे यांच्यावर लिहिलेला लेख आणि यशवंतराव होळकर यांच्यावर लिहिलेला लेख तसेच हरप्पन संस्कृतीवरचे आपले लिखाण अशी बरीच उदाहरणे देता येतील सध्याच्या सरकारातील अनेक दोष , स्मृती इराणी प्रकरण आणि कागदावरचे प्रगतीचे पुरावे आणि त्याचे विश्लेषण असे आपले लेखन चतुरस्त्र असते , त्या ऐवजी हा लेखन विषय अनावश्यक वाटतो , आपल्यापुढे अमाप काम पडले आहे. ही चैन आपणास परवडणारी नाही इतकेच या निमित्ताने सांगावेसे वाटते.आपण आम्हाला निराश न करता लिहित राहाल अशी आशा आहे .

    ReplyDelete
  4. कधीतरी रिमेक सिनेमा मूळ सिनेमाच्या इतका प्रसिद्ध होतो का? असले रामगढ के शोले आहे आणि गेले. पण लोकांनी त्याला हाड केले. पण रामगढच्या शोलेवले लोक आपले तेच तेच रेटत बसतात.

    ReplyDelete
  5. ‘अभाअंनिस’चे अध्यक्ष श्याम मानव यांनीच दोन कोटी रूपयांसाठी डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली, असा आरोप सनातन संस्थेकडून मंगळवारी करण्यात आला. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत अभय वर्तक आणि संजीव पुनाळेकर यांनी ‘सनातन’ची बाजू मांडताना हे सांगितले. यावेळी संजीव पुनाळेकर यांनी सरकारी निधी मिळविण्यासाठी श्याम मानव यांनी दाभोलकरांची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला. याशिवाय, श्याम मानव हे आमच्या संघटनेवर उलट-सुलट आरोप करत असून त्यांनी ते सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा ‘सनातन’ची लेखी माफी मागावी, असेही अभय वर्तक यांच्याकडून सांगण्यात आले. ‘सनातन’च्या साधकांवर संमोहनाचा वापर करून त्यांना एखाद्या व्यक्तीचा खून करण्यासाठी उद्युक्त केले जाते. त्यामुळे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणी ‘सनातन’च्या समीर गायकवाडची ब्रेन मॅपिंग टेस्ट करावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी श्याम मानव यांनी केली होती. मात्र, या माध्यमातून श्याम मानव लोकांच्या मनात वैज्ञानिक गोष्टींविषयी भय उत्त्पन्न करत असून त्यांची ही मागणी विकृत असल्याचे वर्तक यांनी सांगितले. सनातन संस्थेत कुणावरही संमोहन शास्त्राचा प्रयोग केला जात नाही. संस्थेला बदनाम करण्यासाठीच असे आरोप सुरु आहेत. त्यामुळे त्यांनी एकतर आमच्यावरील आरोप सिद्ध करावेत, अन्यथा आमची माफी मागावी, असे वर्तक यांनी म्हटले.
    दरम्यान, ‘सनातन’च्या आरोपांना उत्तर देताना श्याम मानव यांनी ‘सनातन’चे पितळ उघडे पडल्यामुळेच ते आता माझ्यावर आरोप करत असल्याचे सांगितले. सरकारने जादूटोणा विरोधी कार्यक्रमासाठी आमच्या संस्थेला १ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र, आम्ही तो न स्विकारताच सरकारच्याच सामाजिक न्याय आणि कल्याण विभागाकडे सोपविण्याचा प्रस्ताव ठेवला. याशिवाय, आता आम्ही सनातनला कायदेशीर नव्हे तर सगळ्याच पातळ्यांवर सळो की पळो करून सोडू, असेही मानव यांनी म्हटले.

    ReplyDelete
  6. मारामाऱ्या आणि हल्ले हे केवळ आपल्यालाच करता येतात, अशा भ्रमात सनातन संघटनेने राहू नये. वेळ पडल्यास डाव्या चळवळीकडे तुम्हाला प्रत्युत्तर देण्यासाठी अख्खा नक्षलवाद आहे. त्यामुळे ‘सनातन’ने एकदा ही सगळी हिंसा कशासाठी याचे उत्तर द्यावे, असे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे (भारिप) नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. ते सांगली येथे पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी आंबेडकर यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला सनातन ही संस्थाच जबाबदार असल्याचा दावा केला. ‘सनातन’च्या अनेक मासिकांतून आपल्या विचारसरणीच्या विरोधात जे आहेत त्यांना संपवले पाहिजे, असा संदेश आपल्या साधकांना देण्यात आलेला आहे. तसेच, समीर गायकवाड हा आपला साधक असल्याचे सनातनने यापूर्वीच मान्य केले आहे. त्यामुळे पानसरे यांच्या हत्येमागे ‘सनातन’चाच हात असल्याचे सिद्ध होते, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
    याशिवाय, काही दिवसांपूर्वी समीर गायकवाडच्या बचावासाठी रिंगणात उतरलेल्या वकिलांच्या संघटनेने पत्रकारपरिषद घेऊन ‘आमच्या वाटेला जाल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असा इशारा दिल्याचेही आंबेडकरांनी यावेळी निदर्शनास आणून दिले. पोलिसांनी समीर गायकवाडला केवळ एक संशयित म्हणून अटक केली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी पोलिसांनी न्यायालयात पुरावा म्हणून सादर केलेल्या समीर गायकवाडच्या फोनवरील संभाषणात पानसरे यांच्या हत्येचा स्पष्टपणे उल्लेख आहे. त्यामुळे तो आता केवळ संशयित राहिलेला नाही. पानसरे आणि गायकवाड यांचे व्यक्तिगत भांडण असल्याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पानसरेंची हत्या व्यक्तिगत भांडणातून नाहीतर मग कशामुळे झाली? मग त्याचा एकच अर्थ निघतो तो म्हणजे ही हत्या सनातन संस्थेने अनेक मासिकांतून वारंवार आपल्या साधकांना दिलेल्या आदेशांमुळे झाली आहे, असे आंबेडकर यांनी म्हटले.

    ReplyDelete
  7. सनातनचे संस्थापक जे. बी. आठवले आणि त्यांच्या पत्नीने संमोहनशास्त्राच्या माध्यमातून माझ्या मुलीला जाळ्यात ओढले आहे. माझ्या निरागस मुलीला ब्रेन वॉश करून त्यांनी गुंतवून ठेवले. राज्यातील हजारो निरागस तरुण-तरुणींना धर्माच्या नावाने जाळ्यात ओढणाऱ्या सनातनच्या आश्रमांवर छापे टाकावेत, तसेच सनातनचे संस्थापक डॉ. आठवले यांना अटक करावी, अशी याचिका तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील राजेंद्र स्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.
    कॉ. गोिवद पानसरे हत्येप्रकरणी सनातनचा साधक असलेल्या समीर गायकवाडला अटक झाली. त्यानंतर सनातन संस्था व त्यात काम करणारे साधक संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो साधकांच्या माता-पित्यांचा जीव टांगणीला लागला आहे. राजेंद्र स्वामी आपल्या ३ मुली आणि २ मुलांसह सुखाने राहत होते. मोठी मुलगी अभियंता, दुसऱ्या मुलीचे पॉलिटेक्निक झालेले, एक मुलगा एमएस्सी तर दुसरा बारावीत आहे. सुसंस्कृत कुटुंब असलेल्या स्वामी यांची एम. कॉम.च्या पहिल्या वर्षांत शिकणारी मुलगी प्रियांका सनातनच्या संपर्कात आली आणि काहीच न सांगता ३ जुल २००९ रोजी घरातून गायब झाली. मुलगी सनातनच्या आश्रमात गेल्याचे कळाल्यावर वडिलांनी तिला परत आणण्यासाठी जंगजंग पछाडले. सनातन संस्थेच्या विचारांना आपली मुलगी बळी पडल्याचे त्यांनी अनेक नेत्यांना सांगितले. यात माजी मंत्री मधुकर चव्हाण, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह संभाजी भिडे, काशीचे शंकराचार्य यांचाही समावेश आहे.
    डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांची हत्या होण्यापूर्वी २०११मध्ये या संस्थेच्या कामकाजाचे गांभीर्य ओरडून साऱ्या जगाला सांगितले. मात्र, त्या वेळी कोणीच लक्ष दिले नाही, अशी खंत ते व्यक्त करतात. मुलीवर संमोहनशास्त्र व मानसोपचार करून मात्या-पित्याच्या संमतीविना डांबून ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. मुलीच्या शोधात सनातनच्या अनेक आश्रमांत हेलपाटे मारले. सनातनचे संस्थापक संमोहनशास्त्राच्या आधारे निरागस तरुण-तरुणींना फसवून जाळ्यात ओढत आहेत. धर्माचा चुकीचा अर्थ सांगून वाईट कामास प्रवृत्त करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्यांच्या प्रभावाखाली माझ्या मुलीने माझ्यावर खोटी फिर्याद दिल्याचेही त्यांनी सांगितले.

    ReplyDelete
  8. ‘सनातन संस्थे’कडून राजकीय दहशतवाद माजवण्याचा प्रयत्न होत आहे. केंद्र व राज्य सरकारचा राजाश्रय मिळाल्यामुळेच या संघटनेकडून जाहीरपणे धमक्या दिल्या जात आहेत,’ असे मत व्यक्त करुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सनातनवर बंदी आणण्याची मागणी केली. पानसरे प्रकरणाची ‘एसआयटी’ चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालीच व्हावी. तसेच, चौकशी पूर्ण होईपर्यंत एसआयटीच्या अधिकाऱ्याची व कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या पोलिस प्रमुखाची बदली करु नये, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
    सनातन संघटनेकडून ‘सनातन प्रभात’ या मुखपत्रातून उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत, तसेच पोलिस व पत्रकारांनाही धमक्या येत आहेत, असे सांगून राधाकृष्ण विखे- पाटील म्हणाले,‘ सरकारवर कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असूनही काही मंडळी याचे समर्थन करत आहेत. प्रथम त्या संपादकास अटक व्हायला हवी व संस्थेवर बंदी घालतानाच संस्थेच्या प्रमुखावर कारवाई व्हायला हवी. मुख्यमंत्री याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत हे आश्चर्याचे आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी सीबीआयला पुरेसे मनुष्यबळ देण्यात आले नव्हते. पानसरे हत्या प्रकरणाची चौकशीही धिम्या गतीने चालली होती. एखाद्या यंत्रणेत किती राजकीय हस्तक्षेप असावा याचे हे उत्तम उदाहरण असून सरकारला या दोन्ही हत्यांच्या तपासात अपयश आले आहे. कर्नाटक सरकार ज्या गतीने कारवाई करत आहे त्या तुलनेत महाराष्ट्र सरकार सुस्तावलेले आहे.’
    ‘प्रतिगामी शक्तींना व राजकीय दहशतवादाला विरोध करणाऱ्या सर्वाना एकत्र करुन दहशतवादी संघटनांचा बीमोड करण्याच्या मागणीसाठी राज्यपालांची भेट घेऊ,’ असेही त्यांनी सांगितले.

    ReplyDelete
  9. ‘सनातन’ संस्थेची एकूण विचारसरणी, त्यांचे ‘साहित्य’, प्रचाराची पद्धत इ. गोष्टी पुन्हा एकदा ऐरणीवर येणे, तपासल्या जाणे अपरिहार्य ठरते.
    अशा तऱ्हेने प्रयत्न केल्यास हे लक्षात येते की, ‘सनातन’ संस्थेच्या एकंदर कार्यपद्धतीत आक्रमकता किंवा िहसा यांचे वावडे नाही; किंबहुना त्यांच्या साहित्यात अनेकदा यावर भर दिलेला दिसून येतो. विशेषत: सध्याच्या परिस्थितीत, ज्याला ‘सनातन’ संस्था ‘कलियुगातील कलियुग’ म्हणते – अशी आक्रमकता, िहसा ही अपरिहार्य ठरते, असे ‘सनातन’चे मत असल्याचे दिसते.
    उदाहरणासाठी, आपण जर ‘सनातन भारतीय संस्कृती संस्था’द्वारा प्रकाशित ‘क्षात्रधर्म – साधकांचे रक्षण व दुर्जनांचा नाश’ (संकलक : डॉ. जयंत बाळाजी आठवले, डॉ. कुंदा जयंत आठवले) ही पुस्तिका बघितली तर त्यामध्ये जागोजागी / पानोपानी िहसेला उघड उत्तेजन देणारी, त्यासाठी पौराणिक वचने उद्धृत करून तिचे समर्थन करणारी वैचारिक मांडणी आढळते. वानगीदाखल खालील मजकूर त्या पुस्तिकेतूनच, जशाचा तसा उद्धृत करीत आहे :
    १. ‘‘अध्यात्माचा प्रसार व दुर्जनांचा नाश, ही साधनेची दोन अंगे आहेत. दुर्जनांच्या नाशाच्या लढाईची तयारी व प्रत्यक्ष लढाई या दोन्ही साधनाच होत.’’ — (पृष्ठ ४)
    २. ‘‘क्षात्रधर्माची आवश्यकता – शरीर आजारी असल्यास साधना नीट होत नाही. त्यावर उपाय म्हणून आपण औषधोपचार करतो. जरूर पडल्यास जिवाला धोका निर्माण करणारा सडलेला (गँगरीन झालेला) पाय कापूनही टाकतो. तसे हल्ली समाजपुरुष आजारी असल्याने, म्हणजे समाजामध्ये भ्रष्टाचारी, लाचलुचपतखोर, गुंड वगरेंचे प्रमाण खूप वाढलेले असल्याने, क्षत्रिय साधनेने त्यांना कापून काढल्यास, नष्ट केल्यास साधना करणे सोपे जाते.’’ (पृष्ठ ९)
    ३. ‘‘सायुज्य मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल, तर ईश्वरातील सर्व गुण भक्तात हवेत. भक्तात ईश्वराच्या मारक रूपाचा भाग नसेल तर त्याला ईश्वराशी एकरूप होता येत नाही. ईश्वराचे तारक रूप साधकात येतेच, पण स्वत:मध्ये मारक रूप आणून साधनेत पूर्णत्व आणणे हे क्षात्रधर्म साधनेनेच शक्य होते. कलियुगात ईश्वराच्या तारक रूपाची साधना ३०%, तर मारक रूपाची साधना ७०% महत्त्वाची आहे.’’ (पृष्ठ १२)
    ४. ‘‘साधक, साधुसंतच काय, तर राम कृष्णादी अवतारांनाही विरोध झाला, तसा आपल्यालाही होणार.’’ (अवतारांनी विरोध मोडून काढला, तसा आपणही मोडून काढू.) (पृष्ठ १५)
    ५. ‘‘क्षात्रधर्म साधना : शारीरिक : आताच्या लढय़ातील ३०% लढा शारीरिक प्रकारचा असेल. ५% साधकांना हत्यारे चालविण्याचे शिक्षणही आवश्यक ठरेल. त्यासाठी हत्यारांची सोय योग्य वेळी ईश्वरच करील.’’ (पृष्ठ २१)

    ReplyDelete
  10. ६. ‘‘एखाद्याला बंदुकीच्या गोळीच्या नेमबाजीचा सराव नसला तरी त्याची जरुरी नसते. नाम घेऊन त्याने बंदुकीतून गोळी सोडली की, नामातील सामर्थ्यांने नेम लागतोच. अर्जुन श्रीकृष्णाचे नाव घेऊन बाण सोडायचा, म्हणून तो सर्वोत्कृष्ट धनुर्धर होता.’’ (पृष्ठ २२)
    ७. ‘‘नुसते खोड तोडून चालत नाही, तर झाडाची पाळेमुळेही खणून काढावी लागतात. दुर्जनांबरोबर त्यांच्या दुर्जनतेची माहिती असणारे व पापाच्या पशांवर पोसलेले त्यांचे कुटुंबीय, कार्यालयीन सहकारी, अवैध कारखान्यातील कामगार वगरे सर्वाचा नाश करणे आवश्यक ठरते. कारण त्यांनी गुन्हेगारीविरुद्ध कृती न केल्याने गुन्हेगारीला मूकसंमती देऊन अप्रत्यक्षपणे प्रोत्साहनच दिलेले असते.’’ (पृष्ठ २७)
    ८. ‘‘प्रत्येकालाच दुर्जन अधिकाऱ्याचा नाश करणे शक्य होणार नाही. अशांनी दिसणाऱ्या प्रत्येक दुर्जनाचा नाश करावा.’’ (पृष्ठ २८)
    ९. रामायण, महाभारतातील िहसासमर्थक वचने : ‘‘प्रजेचे रक्षण न करणाऱ्या राज्यकर्त्यांना सर्वानी एकत्र होऊन पिसाळलेल्या कुत्र्याप्रमाणे ठार करावे.’’ (महाभारत १३.६१.३३), ‘‘राज्य घेण्याच्या कामी जर कोणी अडथळा करतील, तर त्यांचा वध करावा.’’ (महाभारत १२.१०.७), ‘‘दुष्टांची िहसा ही धर्मशास्त्राप्रमाणे अिहसाच होय.’’ (महाभारत १२.१५.४९) ‘‘अवध्याचा वध केल्याने जितके पातक लागते, तितकेच पातक वध्याचा वध न केल्याने लागते.’’ (रामायण ३.९०.३) (पृष्ठ २८,२९)
    पुस्तिकेच्या पृष्ठ २९ वर ‘प्रत्यक्ष कृतीतील टप्पे’ यामध्ये अशी सूचना आहे की, साधकांनी सर्व तऱ्हेच्या दुर्जनांच्या याद्या बनवाव्यात. ‘‘याद्या साधकांनी बनवल्याने त्यांच्या खरे-खोटेपणाचा प्रश्न येणार नाही’’(!) पुढे सर्व तऱ्हेच्या दुर्जनांचे प्रकार दिले आहेत, ज्यात होळी, गणेशोत्सवाची वर्गणी दहशतीने वसूल करणाऱ्यांपासून ते ‘अपेक्षेहून जास्त पसे असणारे शेजारी, नातेवाईक व ओळखीचे’ इथपर्यंत बरेच प्रकार आहेत, ज्यांचा सारांश- ‘‘थोडक्यात म्हणजे प्रत्येक स्वार्थी मनुष्य’’ – अशा शब्दांत दिलेला आहे.
    ‘सनातन’चा कार्यक्रम थोडक्यात: ‘‘१९९८-९९ : साधकांनी स्वत: दुर्जनांच्या याद्या बनवणे, १९९९-२००० : इतरांच्या तक्रारीच्या याद्या बनवणे व तोपर्यंत त्याची शहानिशा बुद्धीने व सहाव्या ज्ञानेन्द्रियाने करता येण्याइतकी स्वत:ची क्षमता वाढवणे आणि २००० सालापासून : दुर्जनांच्या नाशाच्या प्रत्यक्ष कृतीला सुरुवात – गाव, तालुका, शहर, जिल्हा, राज्य अशा तऱ्हेने टप्प्याटप्प्याने कार्य करणे’’ असा आहे!
    हे सर्व पाहिल्यावर हे लक्षात येते की, कदाचित जरी पानसरे यांच्या हत्येशी समीर गायकवाड याचा संबंध नसल्याचे पुढेमागे स्पष्ट झाले, तरीही ‘सनातन’ संस्थेची एकूण विचारप्रणाली, कार्यपद्धती ही अिहसक किंवा केवळ विचारांच्या परिवर्तनावर, मतपरिवर्तनावर भर देणारी नाही. ती निश्चितच आक्रमक आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारच्या विचारसरणीला स्थान असू शकत नाही, हे उघड आहे.

    ReplyDelete
  11. सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांनी त्यांच्या चरित्रात केलेले चमत्काराचे दावे सिद्ध करण्यासाठी पुढे यावे, असे आव्हान आज अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने करण्यात आले. त्यांनी ते आव्हान न स्वीकारल्यास भविष्यात आम्ही त्यांच्याविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करू, असा इशारा समितीचे पदाधिकारी डॉ. प्रदीप पाटील, ऍड. चंद्रकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. यावेळी माजी नगरसेविका ज्योती आदाटे, प्रियंका तुपलोंढे, नीलेश नवघटे, नीलेश आपटे, कौस्तुभ पोळ आदी उपस्थित होते.

    अंनिसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलेली भूमिका अशीः परमपूज्य आठवले गेली अनेक वर्षे अध्यात्म-धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धांचा प्रचार करीत आहेत. त्यांच्या चरित्रातच चमत्काराचे दावे करण्यात आले आहेत. ते असे, डॉ. आठवले यांच्या देहातूनच सुंगंधाची निर्मिती होते. सनातनच्या कार्याच्या ठिकाणी तो सुगंध पसरतो. डॉ. आठवले बोलताना समोरील श्रोत्यांची लाळ गोड होते. त्यांच्या त्वचेतून दैवी कणांची निर्मिती झाल्याने आश्रमातील गाद्यांवर ओम उठते. त्या चैतन्यामुळेच त्यांच्या संपर्कातील स्लीपरसारख्या वस्तूही पिवळ्या होतात. त्यांच्यातील वायुतत्त्वामुळे पांढरा सदरा, फरशी मऊ लागते. ते 2012 पासून अश्‍वनादाचे प्रकटीकरण करतात व तो नाद साधकाच्या घरीही ऐकू येतो. वास्तुदोषामुळे होणारे विकार ते अंगाऱ्याद्वारे दूर करतात. वास्तुप्रमाणेच ते वाहनदोषही दूर करतात. हे सारे दावे त्यांच्या चरित्रात-सनातन प्रभातच्या अंकात लिखित स्वरूपात आहेत. तो दैवी चमत्काराचा भाग असल्याने आम्ही ते सिद्ध करण्याचे आव्हान देत आहोत. ते आव्हान स्वीकारणार असतील तर त्यांना आव्हानाचा मसुदा देण्यात येईल. अगदी अलीकडे त्यांच्या एका साधकाने पनवेलच्या आश्रमात डास पळवून लावण्यासाठी मोबाईलवर डॉ. आठवलेंची रात्रभर भजने ऐकली आणि त्यानंतर एक डासही त्यांना चावला नाही. असे असेल तर डॉ. आठवले यांनी डास निर्मूलनाच्या चाचणीसाठीही पुढे यावे. त्यांच्या डास निर्मूलनाच्या या शक्तीचा अखंड देशाला-जगाला उपयोग होईल, असेही अंनिसने नमूद केले आहे.

    ReplyDelete
  12. मानव,आधी राज्याचा पाकिस्तान होतोय ते बघा'
    शनिवार, 3 ऑक्टोबर 2015 - 09:15 AM IST
    मुंबई - ‘सनातन’ संस्थेवरील जे आरोप आहेत त्याची जी काही चौकशी व्हायची ती होईलच; पण ‘अफगाणिस्तान’ होण्याआधी राज्याचा पाकिस्तान करण्याची जी क्रिया-प्रक्रिया सुरू आहे ती या मानवी भुतांना का दिसू नये?, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

    शिवसेनेने आज (शनिवार) सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या श्याम मानव यांच्यावर टीका केली आहे. श्याम मानव यांच्याकडून सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. यामुळे शिवसेनेने सनातन संस्थेची पाठराखण करताना मानव यांना लक्ष्य केले आहे.

    शिवसेनेने अग्रलेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रातील अनेक बिळांत छुपे पाकिस्तानी वळवळत आहेत. या सगळ्यांमुळे महाराष्ट्राचा अफगाणिस्तान आधीच झालाय व अशा हिरव्या दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी श्याम मानव वगैरे भुताखेतांकडून कधीच झाली नाही. हिंदू धर्माचा प्रचार, प्रसार करणार्‍या संस्था व व्यक्तींना खतम करायचे असा अफझलखानी विडा उचलणार्‍यांची मोठी यादी आहे. त्या यादीत अंधश्रद्धा निर्मूलनाच्या श्याम मानवांचे नाव सध्या आघाडीवर आहे. धर्म व अध्यात्म क्षेत्रातील आपले संत-महात्मे असतील (वाटल्यास त्यांना ‘बुवा’ म्हणा) नाही तर आता सनातनच्या निमित्ताने जे चालले आहे तो सर्व प्रकार म्हणजे हिंदुत्वाच्या प्रचारकांचा कोंडमारा करणारा आहे. सनातन संस्थेवर वेळीच बंदी न घातल्यास महाराष्ट्राचा अफगाणिस्तान होईल, अशी भीती या श्याम मानव नामक भुतास वाटत आहे. अशा भुतांची पैदास सध्या वाढू लागली आहे. हिंदुत्वविरोधी भुतांना हवा तसा नंगानाच करण्याची मुभा आपल्या देशातील तथाकथित अभिव्यक्ती स्वातंत्र्याने दिली आहे व त्या स्वातंत्र्याचा स्वैराचार करून ही भुते प्रसिद्धी मिळवत असतात. तोच त्यांच्या पोटापाण्याचा उद्योग असल्याने त्यांच्या रोजगाराची साधने बुडू नयेत असे दयाळू हिंदुत्ववाद्यांना वाटते.

    काही बुवा, महाराज असतील किंवा ‘सनातन’सारख्या संघटना असतील. आम्ही काही त्यांचे वकीलपत्र घेतलेले नाही, पण ज्याप्रकारे कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा यांना साधा जामीनही मिळू दिला जात नाही हासुद्धा तालिबानी प्रकार नाही काय? त्यांच्यावर जे काही आरोप ठेवले आहेत त्यांचा तपास, चौकशा, खटले सुरूच राहतील, पण जामीन नाकारणे ही न्याय्य हक्कांची पायमल्ली आहे, असेही शिवसेनेने म्हटले आहे

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...