Friday, July 22, 2016

असे घडले असते तर

जर काही असे घडले असते तर आपण सुसंस्कृत देशाचे नागरिक आहोत हे दिसले असते.

१) १९९० ला काश्मीरी पंडितांचे जे हत्याकांड आणि निर्वासन झाले याबाबत देशभरातील मुस्लिमांनी आक्रोश केला असता....

२) हिंदुंनीच बाबरी मशीद न पाडता न्यायालयीन आदेशाचा सन्मान ठेवला असता.

३) अखलाख प्रकरणात बहुसंख्य लोक त्याच्या बाजुने जसे उभे राहिले तसे मुस्लिमही बहुसंख्येने वेमुला किंवा अन्य कोणत्याही गैरैस्लामी अन्यायाविरुद्ध उभे राहिले असते
.
४) साध्वी ते पार सा-या महंतांची अधार्मिक वक्तव्ये जशी बहुतेकांनी फेटाळली तशीच झाकिरची बेवकुफ वक्तव्ये मुस्लिमांनीच फेटाळली असती.

५) मी वैदिक हे स्वतंत्र धर्माचे आहेत, हिंदुंशी संबंध नाही हे म्हणू शकतो...मी आजही जीवंत आहे....केवळ व्यंगचित्र काढले म्हणून चार्ली हेब्दो प्रकरणी नृशंस हत्याकांड होऊनही किती मुस्लिम निषेध करायला सामोरे आले? जगभरचे आले कि नाही हे सोडून देवू...भारतातील किती आले?

६) भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना संघ मान्य नाही व ते त्याबाबत बिनधास्त बोलतात. मी तर संघ हिंदुंचा नसून वैदिक धर्मियांचा आहे असे म्हणतो. किती मुस्लिम मिम किंवा भारतातील मुस्लिम तत्वज्ञानकेंद्रीत संघटनांचा जाहीर विरोध करतात?

७) आयसिसबद्दल भारतीय मुस्लिमांची नेमकी काय भुमिका आहे हे किरकोळ प्रतिक्रिया वगळता व्यापकपणे का दिसत नाही?

८) तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या वर्चस्वतावादाविरुद्ध महात्मा फुलेंच्या काळापासून जो रोष दिसून येतो तसा रोष अजलाफ मुस्लिमांचा अशरफांबद्दल का दिसून येत नाही? मुस्लिम धर्म चालवनारे अशरफ आहेत कि अजलाफ आहेत? कि दोहोंची मिलीभगत आहे आणि खाजगीत ज्याने त्याने आपली गुलामी स्विकारली आहे?

९) तथाकथित हिंदुंत एक वर्ग आहे जो मुस्लिमांचा द्वेष करतो. संघटनाही आहेत. काही कृतीही केल्या आहेत. पण आम्हीच त्यांच्या विरोधात तुमच्यापेक्षा जास्त रान उठवत असतो. या देशातील मुस्लिम हे भारतीय मुस्लिम आहे यावर मी आणि अगणित कितीतरी श्रद्धा ठेवतात. असंख्य मुस्लिमही अशीच भावना बाळगतात हा माझाही अनुभव आहे. पण राष्ट्रहिताच्या बाबी येतात तेंव्हा इमाम ते सामान्य मुस्लिम कोठे दडी मारतात? कि दारुल हरब नि दारुल इस्लम खाजगीत घट्ट डोक्यात बसला आहे? मग तुमच्या कोणत्याही भुमिकांवर विश्वास कसा ठेवायचा?

१०) संशयाच्या वातावरणात मैत्र होत नसते. भुमिका स्पष्ट तर हव्यातच कृतीतुनही दिसायला हव्यात. धर्मांधांशीचा लढा, हिंदु/वैदिक असोत कि मुस्लिम, जोवर कृतीतुन सिद्ध करत नाहीत तोवर लढला जाणार नाही. तुमची आजवरची या लढ्याबाबतची कृती काय आहे? इतिहासात जायला नको...वर्तमानकाळात काय आहे?

तर हे काही प्रश्न आहेत तर काही विधाने आहेत. मानवजातीला...किमन भारतियांना अमन-सुखात जगायचे असेल तर या विधानांची...प्रश्नांची एकदाची सोय लावावी लागेल. भारतीय घटना स्वतंत्रतावादी आहे. ती महनीय आहे. य स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही बेवकुफांसारखा करणार असू तर उद्या घटना अंमलात राहीलच असे नाही. कोणाही बेवकुफ धर्मांधाचे सरकार येईल आणि घरोघर अखलाक नाहीतर अन्य कोणे मारला जाईल.

आम्हाला आमचा देश मध्यपुर्व होऊ द्यायचा आहे काय यावर सर्वांनी विचार करावा.

2 comments:

  1. मी वैदिक हे स्वतंत्र धर्माचे आहेत, हिंदुंशी संबंध नाही हे म्हणू शकतो...मी आजही जीवंत आहे. भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना संघ मान्य नाही व ते त्याबाबत बिनधास्त बोलतात. मी तर संघ हिंदुंचा नसून वैदिक धर्मियांचा आहे असे म्हणतो.
    भारतात हे हिंदु/वैदिक अल्पसंख्य झाले तर काय परिस्थिती असेल ?
    संंघ मुलतत्ववादी असता तर बिनधास्त बोलता आले असते काय ?

    ReplyDelete
  2. अतिशय मार्मिक ! अभिनंदन !
    आपल्याकडून पाकिस्तान निर्मिती आणि जीना ,तसेच मौलाना आझाद यांनी वंदे मातरम ला केलेला विरोध याबाबत प्रतिक्रिया आल्यास त्यातून स्पष्ट होईल कि आज जी आपण म्हणता तशी मिली भगत दिसते त्याची मुळे पूर्वापार रुजवली गेलेली आहेत . आपण या देशाचे शेवटचे शासक आहोत हे खूळ ना मुस्लिमांच्या डोक्यातून जात आहे , ना ब्राह्मण - मराठा वर्गातून जात आहे .

    आपला लेख ही एक धोक्याची सूचनाच देऊन जात आहे - लवकरच मुस्लिम आणि हिंदू असे उघड उघड दोन तट समाजात पडणार आहेत , पुढे काय होईल ?त्यातच खलिस्तान , द्रविड अशा भावनांना फुंकर मारली गेली तर ?नागा लोक आत्ताच विद्रोहाची भाषा करत आहेत.
    चीनशी पुन्हा युद्ध झाले तर ? डावे पक्ष परत कोणाची बाजू घेतील ? १९६२ चे चित्र आठवले तर काय दिसते ? भारत देश ही संकल्पना अजूनही पूर्ण रुजली नाही का ?
    देशापेक्षा पक्ष , पक्षापेक्षा धर्म आणि धर्मापेक्षा जात आणि प्रांत श्रेष्ठ असतील तर काय होईल ?
    पाणीतंटे आणि लवाद काय इतिहास सांगतात ? यावर आपण लिहावे असे नम्रपणे सांगावेसे वाटते .

    ReplyDelete

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...