Tuesday, December 17, 2019

असा भारत हवाय...

आम्हाला असा भारत हवाय
जेथे द्वेष करणारे
हिंसक जिहादी तालीबानी नसतील
आणि विकृत वैदिकवादी
विषमतेचे वीष पेरणारे
संघीस्टही नसतील
नसतील द्वेष्टे ब्रिगेडी
मुलनिवासीवादी
नक्षलवादी
आणि द्रविडस्थानवादी
तेंव्हा हा खरा भारत होईल
हा देश समतेच्या तत्वावरच चालेल
प्रत्येकाची वेदना
प्रत्येकाच्या काळजाला स्पर्शेल
सर्वांची स्वप्ने
महास्वप्नाचा भाग होतील
मतभेदांचा सन्मान होईल
पंण ही अनंत हृदये राहतील एक
असा भारत हवाय....
जेथे शांतता आणि सौहार्द
पुन्हा राज्य करेल
या अमानवी शक्तींचा
आत्मा बदलवून!
आम्हाला असा भारत हवाय
भारताचा आत्मा बदलू पाहणा-यांचा
आम्ही सर्वशक्तीनिशी
विरोध करणार
आज आम्ही हरुही
पण चिरंतन विजय आमचाच होणार!

2 comments:

  1. अतिशय वास्तववादी विचार. खरा भारत कसा असावा तर या कविते मध्ये व्यक्त केलेल्या विचार नुसार चालणारा.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...