मेल्या हत्तीणीला
म्हणे उंदरीण
अगो भाग्यवंत
आहे किती?
रडते हे जग
भिंतींवरी किती
येतो असे वाटे
महापूर!
माझ्या सख्या किती
मेल्या गर्भवती
खाऊन त्या गोळ्या
खाण्यामध्ये...
तडफड त्यांची
पाहिली ना कोणी
नाही आले पाणी
डोळ्यांमध्ये.
चालता थकल्या
गर्भवती बाया
जात होत्या जेंव्हा
गांवाकडे---
कितीक जाहल्या
रस्त्यात बाळंत
कितीक त्या मेल्या
तडफड करीत...
नाही आले तेंव्हा
कोणा डोळा अश्रु
अश्रुंचे कारण
बनले हत्तीण!
जीवा-जीवांमध्ये
असे भेदभाव
क्षुद्र मी उंदरीण
कोणा सांगु?
जगावे शुन्यात
मरावे शुन्यात
आपले जीवन
उंदरीण!
supereb
ReplyDelete