Tuesday, November 28, 2023

असा मी माणुस नाही

 कोणाचा कायमचा

राग धरेल

द्वेष करेल
असा मी माणुस नाही
आज रागावलो तर
त्यासाठी व्यथित होणार नाही
मैत्र पुन्हा जुळवणार नाही
असाही मी माणुस नाही...
माझ्यावर जे रागावले
तर तो त्यांचा अधिकारच
मी त्या रागाच्या कारणांचा
विचार करणार नाही
असा मी माणुस नाही...
मी माझ्या वाटेत आलेला
पत्थर
(कदाचित सर्वांच्या)
हटवायच्या प्रयत्नांत मात्र
निरंतर
थकलो तरी
हटवायसाठी
झटेल निरंतर
कारण तो मला माझ्या
(कदाचित तुमच्याही)
मानवतेच्या दृष्टीला
अंध करतोय
असा पत्थर...
आकाशव्यापी....
हटवायचाय तो मला (नि तुम्हालाही)
माझा राग कोणा व्यक्तीवर
समुदायावर नाही
असलाच तर तो
केवळ माझ्यावर आहे!
म्हणुन तुमच्या रागाचेही
गीत मी
गाऊ शकतो...
वेदनांत आनंद शोधु शकतो!
पण तो पत्थर हटत नाही
काही केल्या...
ती वेदना
मात्र आता तरी
चिरंतन वाटतेय!
पण गड्या
माहित एक झालेय मला
या जगात चिरंतन काहीच नाही
तर ही वेदना
चिरंतन कशी?
कधी ना कधी
किमान
थडग्यावरती
अखेर विसावेल...!

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...