नाचुन घ्या गड्यांनो...हासुन घ्या गड्यांनो
पुन्हा मिळेल संधी?...ना माहिती गड्यांनो!
जागतात भुते अंधारी...हैवानी प्रेरणांच्या
फुटतील ब्वांब कोठे...ठाउक कुणा गड्यांनो?
ते हिरवे कि भगवे...दिसतात सर्व काळे
रंगांधळे तर नव्हे....झालो अम्ही गड्यांनो?
मदांध राजसत्ता नि हिंस्त्र धर्माभिमानी
गर्दीत आसवांच्या...शोधुया धर्म गड्यांनो!
ही रात्र घोर आहे...जिला अंतच कसला नाही
होवुन भयभीत लपला प्रकाश कोठे गड्यांनो?
Subscribe to:
Post Comments (Atom)
जनानखान्यांचे अद्भुत विश्व!
जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...
-
आज मालवाहु रेल्वे, ट्रक, विमाने यामुळे मालवाहतुक अत्यंत वेगवान झाली आहे. मालवाहतुक हा जगातील एक अवाढव्य उद्योग बनला आहे. पण या साधनांचा शो...
-
मानवी इतिहासाचा एक महत्वाचा टप्पा होता व तो म्हणजे पाषाणयुग. पण मानवी संस्कृतीने "काष्ठयुगात" प्रवेशुन एक मोठीच झेप घेतली. हे ला...
ओ सर.......... क्या बात है. मस्त जमलं बघा........
ReplyDelete